या आधीचे लेखः
==========================================================
स्ट्रॉबेरी मार्गारिटा
हे कॉकटेल मी आमच्या बे एरियाच्या मागच्या कट्ट्याला (अट्टाकट्टा) केले होते.
साहित्य:
- १/२ औंस ट्रिपल-सेक (Tripple Sec)
- १ औंस टकिला (Tequila)
- १ औंस लिंबाचा रस
- ४ स्ट्रॉबेरीज
- १/२ औंस डाळींबाचा रस
- मीठ
- बर्फ
मार्गारिटा ग्लास (आंतरजालावरून साभार)
कृती:
मिक्सर मध्ये १/२ भांडे भरून बर्फ घ्या त्यात लिंबाचा रस, ट्रिपल-सेक, टकिला आणि २-३ स्ट्राबेरीज टाका. चांगले एकजीव होई पर्यंत मिक्सर्मध्ये घुसळा. उरलेले लिंबू रिकाम्या कॉकटेल ग्लासच्या कडेला चोळा आणि एक बशीत मीठ पसरून त्यात ग्लास उपडा करा. आता ग्लासच्या कडेला मीठाचे फ्रॉस्टींग होईल. त्यात मिक्सरमध्ये तयार झालेली मार्गारीटा ओता. त्यात अलगदपणे डाळींबचा रस टाका. एक स्ट्रॉबेरी अर्धी कापून त्याला थोडी खाच पाडा आणि ग्लासच्या कडेला सजावटीसाठी लावा.
मार्गारिटा तयार आहे, सर्व करा. (किंवा स्वतःच पिऊन टाका ;-) )
यात जर टकिला आणि ट्रिपल-सेक नाही टाकले तर नॉन-अल्कोहोलिक मार्गारिटा बनेल. फक्त लिंबाच्या रसाचे प्रमाण दुप्पट करा.
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...
- नाटक्या
प्रतिक्रिया
21 Mar 2009 - 12:22 pm | परिकथेतील राजकुमार
गुरुदेव आ हा हा वाचता वाचता आणी चित्र बघता बघता मद्यानंदी टाळी लागली हो :)
धन्य धन्य आहात आपण. असेच उत्तमोत्तम आशीर्वाद येउद्यात अजुन.
मदिरा भक्त परायण नाटक्याबुवा कॉकटेलवाले यांचा शिष्य
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
21 Mar 2009 - 10:50 pm | भडकमकर मास्तर
हेच म्हणतो..
सुंदर फोटो...
..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Mar 2009 - 12:58 pm | अनिल हटेला
निव्वळ वर्णन वाचुन आणी चित्रे पाहुन म्हणावस वाटतय.
"मारीया मारीया ,
मार्गारीटा मारीया " ;-)
(कॉकटेल्सच्या बाबतीत ज्युनीयर केजीचा विद्यार्थी)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
21 Mar 2009 - 1:32 pm | गणपा
आहा रे नाटक्या, मस्त सुरवात झालीये..
आता येउदेत एका मागो माग एक कॉक्टेल्स आणि मॉकटेल्स.
आवर्जुन वाट पहतोय.
- गण्या
21 Mar 2009 - 1:38 pm | घाटावरचे भट
बेष्ट!!!
21 Mar 2009 - 1:43 pm | ढ
जाहिद आज पीने दे मसजिद में बैठ कर ।
या फिर वो जगह बता दे जहाँ खुदा ना हो ॥
मस्त हो नाटक्या भाऊ.
टिंग झालो !
21 Mar 2009 - 2:37 pm | घाशीराम कोतवाल १.२
टल्लि हुआ टल्ली हुआ 8} :* :O @) :\ [( :^o :* 8} [( <:P (|:
आता शेवटी I)
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
21 Mar 2009 - 3:11 pm | विसोबा खेचर
आहाहा! किती सुरेख फोटू! :)
सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था केलीस रे नाटक्या! :)
मराठी आंतरजालावरची ही सर्वात सुंदर आणि देखणी लेखमाला होणार याबाबत आता माझ्या मनात कसलाही किंतू नाही! आणि ही लेखमाला मिपावर येत आहे यापरीस दुसरा आनंद नाही! :)
परिकथेतल्या राजकुमाराचे मद्यानंदी टाळी हे शब्द अतिशय आवडून गेले! :)
असो, प रा सारखेच मीही खालीलप्रमाणे म्हणतो,
आपला,
(मदिरा भक्त परायण नाटक्याबुवा कॉकटेलवाले यांचा शिष्य) तात्याबुवा सिंगलमाल्टवाले! :)
22 Mar 2009 - 1:16 am | मीनल
लेखन आवडले.
तुम्हाला खूप माहिती आहे या विषयाची असे दिसते.
तयार झालेले पेय कुठल्या चवीचे असते ते लिहिल्यास बरे होईल.
काहींना कडू तयार काहींना तुरट तर काहिंना आंबट चव आवडते.
मला गोड वाईन आवडेल कदाचित. कुठली ट्राय करू?
डाळींबचा रस मिक्स केलेले तयार ज्युस पाहिले आहे.उदा: पिच,डाळींब किंवा डाळींब,संत्र.
अमेरिकेत फक्त डाळींबचा रस तयार मिळतो का कुठला?
मीनल.
22 Mar 2009 - 7:54 am | प्राजु
पोमोग्रॅनेट ज्युस मिळतो. मला आवडतो.
हा प्रकार मी नॉन अल्कोहोलिक करून पाहिन. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Mar 2009 - 3:40 am | पिवळा डांबिस
मला गोड वाईन आवडेल कदाचित. कुठली ट्राय करू?
पहिलाच अनुभव?
मग निस्संशय पोर्ट, पोर्ट आणि पोर्ट!!!
:)
अमेरिकेत फक्त डाळींबचा रस तयार मिळतो का कुठला?
इंडियन स्टोअरमध्ये मिळतो, पण त्यापेक्षा एखाद्या इराणी स्टोअरमधून आणा. इराणी डाळींबाच्या रसाला (आणि डाळींबांनासुद्धा!!) जबाब नाही....
30 Apr 2009 - 12:58 pm | ओ॑कार
अरे डांबिस माणसा तू पोर्ट ऐवजी रोझ वाईन पिऊन बघ.
मजा येईल.
ओंकार पुरंदरे
22 Mar 2009 - 12:17 pm | सुक्या
नाटक्याभो . . धन्यवाद . . .
आताच बनउन पाहीली . . ग्लासाच्या कडेला लावलेल्या स्ट्राबेरीच्या फ्रॉस्टींग ने मजा आला. बर्फाचा रस मिळाला नाही पन मिठाला खाच पाडुन ग्लासला लावल्यावर लै भारी दिसत होता.
<:P
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
22 Mar 2009 - 12:23 pm | बबलु
स्ट्रॉबेरी मार्गारिटा मस्तच. आपल्या अट्टाकट्ट्याची लगेच आठवण झाली. :)
(च्यायला.. लेखमालेतल्या एकेक लेखांचे printouts काढून ठेवणार आहे. म्हणजे कसं ईझी).
....बबलु
22 Mar 2009 - 2:06 pm | रेवा
22 Mar 2009 - 3:41 pm | दशानन
मस्तच माहीती !
:(
जले पे नमक ह्यालाच म्हणतात का हो ;)
22 Mar 2009 - 3:46 pm | रामदास
नमक असं जले हुए लोक म्हणतात.
23 Mar 2009 - 11:49 am | नाटक्या
तुम्ही तर आमच्यावर कडी केलीत.. मान गये!!
- नाटक्या
26 Mar 2009 - 3:43 am | पिवळा डांबिस
स्ट्रॉबेरी मार्गरिता चांगली आहे....
पण अजून येऊ द्यात...
मुख्य आख्यानाची वाट पहातोय!!
:)
26 Mar 2009 - 5:13 am | नाटक्या
पिडाकाका,
मनापासून धन्यवाद काही प्रश्नांची उत्तरे परस्पर दिल्याबद्दल. तुम्ही आख्यान सुरू करण्याबद्दल घाई करता आहात पण एकदम आख्यानाला हात घालण्याआधी थोडेसे नमन करावे... काय? जर तुमची आवड सांगीतलीत तर त्याबद्दल सुध्दा लिहीन. पट्टीचा खाणारा (आणि पिणारा) असला की बनवणार्याला जास्त हुरूप येतो. :-)
तयार झालेले पेय कुठल्या चवीचे असते ते लिहिल्यास बरे होईल.
पुढल्या वेळे पासून ते देखील देईन..
अमेरिकेत फक्त डाळींबचा रस तयार मिळतो का कुठला?
"ट्रेडर जो" मध्ये डाळींबाचा रस मिळतो. तसेच डाळींबाच्या रसाचे स्पार्कलिंग सायडर सुध्दा मिळते. पिडाकाकांनी सांगीतल्या प्रमाणे इराणी दुकानात एकदा बघीतला पाहीजे.
मला गोड वाईन आवडेल कदाचित. कुठली ट्राय करू?
पहिलाच अनुभव?
मग निस्संशय पोर्ट, पोर्ट आणि पोर्ट!!!
अगदी बरोबर...
बाकी सगळ्यांना पण प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद..
- नाटक्या
31 Mar 2009 - 3:48 pm | मैत्र
पोर्टचा जयजयकार वाचून असं जाणवलं की आपल्याला बॉ वाइन मधलं काहीही कळत नाही. कारण बरेच दिवस साउथ आफ्रिकन शिराझ, फ्रेंच बॉर्डु (आयला ते फ्रेंच शब्द आणि त्या व्हॅलिज) आणि तत्सम परंपरागत फ्रेंच रेड वाइन, थोडी फार मेर्लोट, आणि काही प्रमाणात कॉड किंवा हॅडॉक या मत्स्यावतारांबरोबर साउथ आफ्रिकन शार्डोने ची चव चाखल्यावर एक जुनी इटालियन पोर्ट फारशी काही आवडली नाही.
म्हणजे आपल्या समजण्यात काही तरी घोटाळा होतो आहे हे वरचं एकमत पाहून लक्षात आलं.
नाटक्या भाऊ आणि पिडा काका, हे कॉकटेल आख्यान झालं की तात्यांच्या उच्च पेयांच्या आधी एकदा एकदम तपशीलवार वाइन पुराणाचे अध्याय लिहाच!!
अवांतरः तात्या वेळ मिळेल तेव्हा ग्लेन फिडिच डिस्टिलरी भेटीबद्दल लिहीन म्हणतो. जवळ जवळ वर्ष होत आलं राहिलं आहे ते...
26 Mar 2009 - 6:48 am | सँडी
मस्तच! वीकांत सुरु झाल्यासारखं वाटतय आत्ताच!
अजुन येउद्यात!
>>इराणी डाळींब
अगदी बरोबर! रस्साळ असतात.