सकिया (९) - गटारी अमावस्या स्पेशल.

नाटक्या's picture
नाटक्या in पाककृती
9 Aug 2010 - 11:58 am

या आधीचे लेखः

साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ..
साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"
साकिया (३) - "टकिला सनराईज"
साकिया (४) - "स्ट्रॉबेरी डायक्युरी"
सकिया (५) - "चॉकलेट बनाना" (लहान मुलांसाठी खास)
सकिया (६) - स्पायसी मार्गारिटा
===============================================================

मंडळी सर्वप्रथम या वेळेस बरेच दिवस कॉकटेल मिपावर टंकू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. आता गटारी निमित्य परा आणि सहजरावांनी केलेली आदेश वजा विनंती मानून हा लेख लिहीत आहे. गटारीसाठी नुसतेच कॉकटेल टाकणे मला काही पटेना. बराच वेळ विचार केला नंतर ठरवले की बरोबर चमचमीत सामीष भोजन असल्या शिवाय काही मजा नाही. म्हणून या वेळेस कॉकटेल सोबत एक सरप्राईज "गोंगुरा चिकन". हा चिकनचा प्रकार आंध्रप्रदेशात फार लोकप्रिय आहे. गोंगुरा म्हणजेच आपल्या कडची अंबाडीची भाजी (Sorrel Leaves). हा प्रकार आंबट-तिखट असल्यामुळे मदिरेसोबत खायला फारच छान लागतो. तर पटापट साहित्य आणि कृती बघुया. हो 'तिर्थ-प्रसादाला' फार उशीर नको.

साहित्य:

चिकन साठी:

१ किलो चिकन (बोनलेस असल्यास उत्तम)

३-४ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून

८-१० कढीपत्त्याची पाने

३ चमचे आले-लसूण पेस्ट

१ चमचा हळद

१-२ चमचे लाल तिखट

१ कप दही

५-६ हिरव्या मिरच्या (तिखट जास्त हव्या असल्यास जास्त वापरा)

२ वाट्या भरून अंबाडीची पाने

१ वाटी कोथींबिर

३-४ पुदिन्याची पाने

चवीनुसार मीठ

गरम मसाल्या साठी:

४ लवंगा

१ दालचिनीची कांडी

३-४ मसाल्याच्या वेलची

३ चमचे धणे

४-५ काळी मिरी

कृती:

चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून धुवून चांगले कोरडे करून घ्या. त्याला दही, हळद, १/२ चमचा मीठ, आले-लसूणाची पेस्ट आणि लाल तिखट लावुन १ तास मुरत ठेवा. एका तव्यावर गरम मसाल्याचे लागणारे सगळे पदार्थ भाजून त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घ्या (तयार गरम मसाला वापरला तरी चालेल पण ताज्या मसाल्याने जी चव येते तशी येणार नाही).


दुसर्‍या एका भांड्यात १/४ कप पाणी घ्या आणि ते तापवा. पाणी उकळू लागले की त्यात अंबाडीची पाने, कोथींबिर, मिरच्या आणि पुदिन्याची पाने टाका. २-३ मिनटात एक चांगली उकळी फुटली कि हे सर्व मिश्रण बाजुला ठेवुन थंड होऊ द्या. मिश्रण चांगले थंड झाले की ते मिक्सर मधून चांगले ग्राइंड करून घ्या.

आता एका जाड बुडाच्या भांड्यात तेल टाका आणि ते चांगले तापले की कांदा आणि कढीपत्ता टाकून परता. कांद्याला तेल सुटू लागले की त्यात मुरत ठेवलेले चिकन टाका. चिकन चांगले परतून घ्या.

नंतर त्यात १ वाटीभर पाणी टाकून मंद आचेवर १०-१५ मिनीटे झाकण ठेवून शिजवा. नंतर त्यात अंबाडीची केलेली पेस्ट टाका आणि आणखी १० मिनीटे मध्यम आचेवर शिजू द्या.

झाले चिकन तयार. चिकन बरोबर पोळी/रोटी/नान/पराठा काहीही चालते पण मी मात्र अगदी दाक्षिणात्य पध्दतीप्रमाणे गरमागरम कुरकुरीत डोसे करून घेतले. सौं. ने आधीच डोश्याचे पिठ आंबवून ठेवले होतेच म्हटले होऊन जावू दे. पटापट तव्यावरून डोसे काढले, कांदा/टोमॅटो चिरून घेतले आणि पान मांडले.

खायला बसण्या आधी प्रसादाबरोबर तिर्थ हवे(च) म्हणून तिर्थाची तयारी केली.

साहित्य:

- १ औंस कॉईनट्र्यू (Cointreau)

- १ औंस संत्र्याचा रस
- २ औंस व्होडका
- १ औंस डाळींबाचा रस
- ८-१० डाळींबाचे दाणे
- सजावटी साठी संत्र्याचे/डाळींबाचे साल, संत्र्याची फोड इ. इ. इ.
- बर्फ

कृती:

शेकर मध्ये बर्फाचे तुकडे, संत्र्याचा रस, व्होडका, कॉईनट्र्यू टाका आणि चांगले शेक करा. एका कॉकटेल ग्लासमध्ये डाळींबाचे दाणे टाका आणि त्यावर शेकर मधले द्रावण ओता. त्यावर एक चमचा वापरून अलगद डाळींबाचा रस सोडा. त्यावर संत्र्याची फोड, साल इ. लाउन सुशोभीत करा. कॉकटेल तयार आहे.
काही फोटो:

हे सगळे यथेच्छ आडवा होईस्तोवर हाणले. त्यानंतर मुखशुध्दी म्हणून पानाचा तोबरा भरला आणि अर्धा तास तुर्यावस्थेत गेलो.

त्यातुन जरा भानावर आल्यावर मिपावर आलो आणि स्वत:चे गुण स्वत: गायला बसलो.

डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.

धन्यवाद...

- नाटक्या

प्रतिक्रिया

बबलु's picture

9 Aug 2010 - 12:15 pm | बबलु

फायनली नाटक्याशेठ्ला वेळ मिळालेला आहे.

आनंद वाटला.

पा़कृ मस्तच.

धनंजय's picture

9 Aug 2010 - 12:35 pm | धनंजय

देर आये दुरुस्त आहे

हा हा हा नाटक्याशेठ कालच तुमची आठवण काढली होती आणि आज डब्बल बोनस. :)
शेवटचा फोटुच सगळचसांगुन जातोय. काय ते चिकन आणि काय ते डाळिंबी-संत्री कॉकटेल वाह!!!
नुसता फोटु पाहुनच गटारी साजरी झाली आमची :)

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Aug 2010 - 1:09 pm | बिपिन कार्यकर्ते

आहाहाहा!!!

सहज's picture

9 Aug 2010 - 1:12 pm | सहज

को लि टी!!!

गुरुवर्य अशीच आमची ज्ञानतृष्णा भागवत रहा :-)

श्रावण मोडक's picture

9 Aug 2010 - 1:16 pm | श्रावण मोडक

निषेध!!!

कॉकटेलचा फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटल...

--टुकुल

खादाड's picture

9 Aug 2010 - 3:46 pm | खादाड

फोटो पाहुन मजा आली बाकी आंबाडिची भाजी आणि चिकन हे कसं लागत असेल विचार करतो आहे !

इंटरनेटस्नेही's picture

9 Aug 2010 - 4:04 pm | इंटरनेटस्नेही

अप्रतिम

शेवटचा फोटो कोणत्या स्टेप चा आहे कळवावे हि विनंती.
आणि पाकृ स्वत केली असेल तर मेहनतीच कौतुक(फोटो काढण्याच्या).
बाकी पाकृ स्वत करून पाहू आणि मग दाद दिल्या जाईल तुम्हाला.

शॉळ्ळीड.. कॉकटेळ्ळ इस ळुकिंग ग्रेड!

चित्रा's picture

9 Aug 2010 - 6:20 pm | चित्रा

गोंगुरा चिकन चांगले रूचकर होईल असे दिसते आहे. अंबाडीचे लोणचेदेखील करतात ना?

कॅमेरा कोणता वापरलाय ?

संजा.

नाटक्या's picture

9 Aug 2010 - 9:27 pm | नाटक्या

Camera: NIKON CORPORATION
Model: NIKON D40
ISO: 400
Exposure: 1/60 sec
Aperture: 5.6
Focal Length: 55mm
Flash Used: Yes

प्रियाली's picture

9 Aug 2010 - 6:34 pm | प्रियाली

अंबाडी/ गोंगुरा अमेरिकेत कशी मिळवायची? (का मिळते इंडियन स्टोरात?)

नाटक्या's picture

9 Aug 2010 - 9:25 pm | नाटक्या

मिळते भारतीय दुकानांत. गोंगुरा विचारा (किंवा Sorrel Leaves). बे एरियात बहुतेक सगळ्या मोठ्या देशी दुकानात मिळते.

धमाल मुलगा's picture

9 Aug 2010 - 6:43 pm | धमाल मुलगा

गोंघुरा चिकन.... ओहोहोहोहोहो............. आम्ही आलरेडी सदेह स्वर्गात पोहोचलो आहोत असे नमुद करणेस अत्यंत आनंद होत आहे. :)

>>अंबाडीचे लोणचेदेखील करतात ना?
येस चित्राताई! ते लोणचं दहीभातात कालवुन आख्खा तळवा माखेल असा तो भात ओरपायचा :) मग काय ब्रम्हानंदी टाळी लागते...देवा देवा!!!

बा नाटक्या,
तुझ्या पायांचा फोटु काढून पाठव बाबा, फ्रेम करुन बारमध्ये लावेन म्हणतो. :)

अवांतर : शिरलास तुही स्वयंपाकघरात? =)) =))

प्रभो's picture

9 Aug 2010 - 7:09 pm | प्रभो

एक लंबर, नाटक्याशेठ!!!!

वेताळ's picture

9 Aug 2010 - 7:14 pm | वेताळ

काय सुरेख संगम आहे. मानल बुवा तुम्हाला नाटक्या शेठ....... एकदम खल्लास......

स्वाती२'s picture

9 Aug 2010 - 7:55 pm | स्वाती२

व्वा! तीर्थाच्या जोडीला प्रसादही!

अनिल हटेला's picture

9 Aug 2010 - 8:17 pm | अनिल हटेला

आहाहा !! :)

नि:शब्द !!!!!!!

शिल्पा ब's picture

9 Aug 2010 - 10:31 pm | शिल्पा ब

तोंडाला पाणी सुटलं...

राजेश घासकडवी's picture

9 Aug 2010 - 11:09 pm | राजेश घासकडवी

शेवटचा फोटो मस्त - तळीराम गार झाल्याचा. पण आम्हाला अंमळ वैचारिक अॅसिडिटी असल्यामुळे लवकर जळजळ होते. तेव्हा नुसती चित्रं वगैरे दाखवून काही मजा नाही... पुढच्या कट्ट्याला खिलवा (परवाच्या कट्ट्याप्रमाणे) आणि पिलवा देखील.

आमोद शिंदे's picture

10 Aug 2010 - 12:20 am | आमोद शिंदे

असंच म्हणतो. नुसतीच चित्रे दाखवून चालणार नाही.
अंबाडीचे चिकन डोश्या सोबत भन्नाटच आहे!!

अवांतर: ती छत्री घातलेली ड्रिंक्स कसली घेता हो. तुमच्या ह्या भन्नाट चिकन सोबत व्हिस्की ऑन द रॉक्सच पाहिजे.

भाग्यश्री's picture

9 Aug 2010 - 11:25 pm | भाग्यश्री

गोंगुरा चिकन भारीच !!
फोटो/पदार्थ इतके लाळगाळू आहेत की इव्हन प्लुटो व मिकि-मिनि माऊस सुद्धा जिभल्या चाटत पाहतायत त्यांच्याकडे ! :)

कपिलमुनी's picture

8 Aug 2018 - 1:21 pm | कपिलमुनी

यंदाचे कॉकटेल ??