या आधीचे लेखः
साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ...
साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"
साकिया (३) - "टकिला सनराईज"
साकिया (४) - "स्ट्रॉबेरी डायक्युरी"
===============================================================
बर्याच मिपाकरांनी मला नॉन अल्कोहोलिक किंवा लहान मुलांसाठी मॉकटेलची रेसिपी विचारली होती. ती आज देत आहे. बाकी सगळ्या अट्ट्ल लोकांसाठी पुढचे कॉकटेल या गुरुवारी.
आपल्याला माहीत आहे लहान मुलं फळं खायला आणि दुध प्यायला किती कटकट करतात. हे मॉकटेल लहान मुलं अतिशय चवीने पितात अगदी मागुन मागुन.
या वेळच्या मॉकटेलचे नाव आहे "चॉकलेट बनाना" (Chocolate Banana).
साहित्य:
- १ चमचा चॉकलेट सिरप
- १ केळं
- १ कप दुध
- १ साखरेत घोळवलेली चेरी (१/२ स्ट्रॉबेरी सुध्दा चालेल) (सजावटी साठी)
- २ चमचा साखर
- चिमूटभर कोको पावडर
- व्हीप क्रिम (किंवा घट्ट साय)
- बर्फ
कृती:
मिक्सर मध्ये मध्ये ५-६ बर्फाचे खडे घ्या त्यात दुध, साखर आणि केळं टाका. मिक्सर चालू करून द्रावण एकजीव होई पर्यंत ग्राईंड करा. आता एक उभा ग्लासात २-३ बर्फाचे खडे घ्या आणि त्याच्या वरच्या आतल्या कडेने चॉकलेट सिरप हळूहळू ग्लास गोल फिरवत सोडा. नंतर तयार झालेले द्रावण असलेल्या ग्लासमध्ये ओता. त्यावर व्हिप क्रिमने डेकोरेट करा आणि त्यावर कोको पावडर चिमटीने टाका. सगळं झाल्यावर एक चेरी मस्तपैकी त्यावर ठेवा.
तुमचे कॉकटेल तयार आहे (सजावटी सकट).
आता यात चॉकलेट, चेरी आणि व्हिप क्रिम दिसल्यावर बच्चे कंपनी एकदम खुश...
धन्यवाद...
- नाटक्या
प्रतिक्रिया
12 May 2009 - 8:36 am | सायली पानसे
इतक्या छान रेसिपी बद्दल धन्यवाद. आजच करुन बघेन.
12 May 2009 - 9:09 am | अनंता
मेरे लिये भी चॉकोलेट-बनाना बनाना|
फारच सुंदर रेसिपी!!! बच्चेकंपनी पागल होणार बहुतेक :)
12 May 2009 - 9:08 am | सहज
हातात चॉकलेट बनाना आणी हे गाणे लागलेले
बच्चे कंपनी खूश!!!
12 May 2009 - 9:13 am | यशोधरा
बच्चे कंपनीच कशाला, मोठेही आवडीने पितील की हे! मस्त दिसतय!
12 May 2009 - 9:37 am | ऋषिकेश
लै भारी!
(बाल)ऋषिकेश
12 May 2009 - 11:00 am | स्वाती दिनेश
झक्कास दिसते आहे , पटकन पेला उचलून चव पहावीशी वाटते आहे,
(तुमच्या सगळ्याच कॉकटेल/मॉकटेलचे पेले पाहिले की तसे वाटते ,:) )
स्वाती
12 May 2009 - 11:03 am | माधुरी दिक्षित
वाव!!! बघूनच तोंडाला पाणी सुटले
12 May 2009 - 11:07 am | परिकथेतील राजकुमार
लै भारी गुर्जी.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
12 May 2009 - 11:18 am | विसोबा खेचर
सु रे ख...!
नाटक्याचा विजय असो... :)
तात्या.
12 May 2009 - 11:29 am | काजुकतली
मस्तच... आमच्या बच्चेकंपनीला चॉकलेट अगदी प्रिय.... आज करुन पाहते.
रेसिपीबद्दल धन्यवाद.
साधना
12 May 2009 - 2:30 pm | प्राची
एकदम मस्त.
डोळ्याचं पारणं फिटलं.आता जिभेची मागणी पूरी करायला लागणार.
=P~ <:P =P~ <:P =P~
12 May 2009 - 9:18 pm | क्रान्ति
चॉकलेटप्रेमी लेकीला मनापासून आवडलेली पाकृ! फोटो पाहून लगेच प्रयोग करायला गेली बहुतेक! <:P
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
http://www.agnisakha.blogspot.com
12 May 2009 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाटक्यासेठ, काय जिव्हारी लागणारा फोटो टाकला राव...!
पैकीच्या पैकी मार्क दिले.. ! :)
12 May 2009 - 9:30 pm | प्राजु
=D>
तुमचं एक "फास्ट फास्ट कॉकटेल्स ऍण्ड मॉकटेल्स" असं पुस्तक प्रकाशित करायचं का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 May 2009 - 11:19 pm | समिधा
मी पण करुन बघेन, लेक तर फोटो बघुनच करुन दे म्हणुन मागे लागली आहे.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
12 May 2009 - 11:33 pm | धनंजय
आता छायाचित्र बघायला मिळाले!
(चव कधी घेत येईल?)