या आधीचे लेखः
साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ...
साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"
==========================================================
टकिला सनराईज
या वेळच्या कॉकटेलचे नाव आहे "टकिला सनराईज" (Tequila Sunrise)
साहित्य:
- २ औंस टकिला
- १ चमचा ग्रेनाडाईन (याची कृती दिलेली आहे)
- ३ औंस संत्र्याचा रस
- लिंबाचे आणि संत्र्याचे पातळ काप (सजावटी साठी)
- बर्फ
कृती:
प्रथम आपण ग्रेनाडाईन बनवण्याची कृती बघुया:
ग्रेनाडाईन हे डाळींबापासून बनवलेले सिरप आहे. या साठी तुम्हाला ४ डाळींब लागतील. प्रथम डाळींब साफ करून त्याच्या बिया मिक्सरमध्ये घालून १०-१२ मिनिटे ग्राईंड करून घ्या (रस काढण्यासाठी) नंतर ते वस्त्रगाळ करून फक्त ताजा रस एका पातेल्यात काढून घ्या. त्यात १/४ कप मध घालून चांगला ढवळा आणि मंद आचेवर जेमतेम उकळी फुटे पर्यंत तापवा. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवा. साधारणतः २ कप ग्रेनाडाईन तयार होईल. वापरून झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा.
अमेरिकेत (किंवा इतरत्र परदेशात) ग्रेनाडाईन तयार मिळते. त्यात पदार्थ टिकवण्यासाठी आवश्यक असे काही रासायनिक द्रव्य टाकल्यामुळे खराब होत नाही, तेव्हा ते फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही.
आता मुख्य कृती बघुया:
शेकर मध्ये मध्ये २-३ बर्फाचे खडे घ्या त्यात टकिला आणि ग्रेनाडाईन टाका. शेकरचे झाकण घट्ट बंद करून १५-२० सेकंद हलवून घ्या. शेकरमध्ये तयार झालेले द्रावण ५-६ बर्फाचे खडे असलेल्या ग्लासमध्ये ओता. आता संत्र्याचा रस अलगदपणे ग्लासमध्ये सोडा. लिंबाची आणि संत्र्याची काप सजावटी साठी वरुन ग्लासमध्ये टाका.
तुमचे कॉकटेल तयार आहे (सजावटी सकट).
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...
- नाटक्या
प्रतिक्रिया
14 Apr 2009 - 9:57 pm | बेसनलाडू
काय खल्लास दिसते आहे (येथे नाही, पिकासा वर. येथे दिसण्यासाठी मी शक्यतो फ्लिकर् वर टाकतो चित्रे :) ) च्यायला नाटक्याशेठ, खास या एका कॉक् टेल् साठी तुमच्याकडे एक चक्कर व्हायला हवीसे दिसते ;)
(आस्वादक)बेसनलाडू
15 Apr 2009 - 12:36 am | रेवती
फोटू दिसत नाही.:(
आपली ही मालिका जोरदार सुरु आहे.
(तेवढी त्या कैरीच्या पन्ह्याला कुठंतरी जागा द्या की साहेब या मालिकेत.;))
रेवती
15 Apr 2009 - 12:38 am | रेवती
दिसला गं बाई दिसला!
फोटू दिसला. एकदम भारी आहे.
रेवती
15 Apr 2009 - 12:54 am | नाटक्या
चालेल. पण त्यात कुठले मद्य टाकले तर चांगले लागेल तेव्हढे सांगा :-) ह. घ्या.
माझ्या पध्दतीने अमेरिकेत कैरीचे पन्हे कसे बनवायचे (कैरी न वापरता!!) याची कृती मी एक-दोन दिवसांत टाकीन...
बाकी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
- नाटक्या
15 Apr 2009 - 1:16 am | एक
ग्रेनाडाईन ची कृती आधी वाचली तेव्हा वाटलं "हॅ एवढे कश्ट असतील तर डायरेक्ट टकिलाच लावावी"
पण ही ओळ वाचून हायसं वाटलं
>>"अमेरिकेत (किंवा इतरत्र परदेशात) ग्रेनाडाईन तयार मिळते. >>"
आता या विकेंड्ला हे कॉक्टेल जरूर होईल.
15 Apr 2009 - 1:16 am | पिवळा डांबिस
"अरूणोदय झाऽऽलाऽऽ!!!"
मस्त रेसेपी, या विकांताला करून बघतो!!!
15 Apr 2009 - 1:37 am | संदीप चित्रे
आमच्यासारखे निदान'नजर से पी सकेंगे' :)
15 Apr 2009 - 1:52 am | दिपाली पाटिल
खुप च छान आहे... पुढ्च्या कट्ट्याला पण कॉकटेल ठेवा... :)
15 Apr 2009 - 6:36 am | अडाणि
राजे जरा लवकर येवु द्या की .... आपण दिलेली पेयं प्यायला आणि साधु लेख वाचायला व देवकाकांचा जालींदर महीमा ऐकायला असा जबरदस्त प्रोग्रम करावा म्हणतोय.
-
अफाट जगातील एक अडाणि.
15 Apr 2009 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार
मार डाला गुरुदेव मार डाला !
फोटु दिसत न्हाय :( मी खाली टाकत आहे.
![](http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Others/Tequila_Sunrise.jpg)
मदिरा भक्त परायण नाटक्याबुवा कॉकटेलवाले यांचा शिष्य
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
15 Apr 2009 - 12:39 pm | विसोबा खेचर
ज ब रा..! नाटक्या, मानला तुला लेका! :)
आपला,
(टकिलाप्रेमी) तात्या.
15 Apr 2009 - 1:59 pm | काजुकतली
आवडली पाकृ.
ही टेकिला न टाकता, फक्त नॉन्-अल्कोहोलिक अशी बनवायची असेल तर कशी करावी.. सुट्टीत मुलांना नेहमीपेक्षा वेगळी जरा हटके पेयं द्यायचा विचार आहे...
फोटु दिसत नाही बाप्पा... (आम्हाकडे मधुन मधुन पिकासा दिसत नाही :()
16 Apr 2009 - 1:11 pm | बबलु
"टकिला सनराईज" जबराट आहे !!!! खासच. आणि सोप्पी दिसतेय. मीही करू शकेन की.
बाकी... खास या एका कॉक् टेल् साठी तुमच्याकडे एक चक्कर व्हायला हवीसे दिसते
या बेलाच्या मताशी सहमत. (पण यावेळी परत माझ्या घरी करूया. हवंतर मी फ्रीमाँटला येतो बाटल्या आणायला मदत करण्यासाठी).
....बबलु
तळटीपः-- बाकी नाटक्याशेठ ... तुझ्या "कॉकटेल स्कील" ला दंडवत. ___/\___
16 Apr 2009 - 10:29 pm | दशानन
तु किती ही प्रयत्न केलास
विसरणार नाही तुला
आज नाही तर उद्या
भरणार ग्लास मी
ह्यात काही वाद नाही ;)
***
क्लासिक !
इ बुक तयार करा बॉस तुम्ही !
16 Apr 2009 - 10:40 pm | लिखाळ
वा !! टकिला सनराईज जोरात दिसते आहे.
ग्रेनाडाईन इथे मिळतच असावे..शोधतोच आता :)
-- लिखाळ.
16 Apr 2009 - 11:14 pm | ऋषिकेश
सुरेख रंग!.. मस्त!.. अजुन येऊ द्या!
ऋषिकेश