साकिया (८) - माय व्हॅलेंन्टाईन

नाटक्या's picture
नाटक्या in पाककृती
23 Dec 2009 - 2:57 pm

या आधीचे लेखः

साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ..
साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"
साकिया (३) - "टकिला सनराईज"
साकिया (४) - "स्ट्रॉबेरी डायक्युरी"
साकिया (५) - "चॉकलेट बनाना" (लहान मुलांसाठी खास)
साकिया (६) - स्पायसी मार्गारिटा
साकिया (७) - स्कूप युअर लक
===============================================================

सहजरावांच्या "पाचक व मादक" बघीतल्या नंतर माझ्या असे लक्षात आले की काही प्रकारच्या मदिरा ज्या पुर्वी भारतात मिळत नव्हत्या त्या देखील आता मिळू लागल्या असाव्यात. या पास्तिस बद्द्ल अशोक राणेंनी एक सुंदर लेख लिहीला आहे. पास्तिस हे माझे देखील अत्यंत आवडते पेय. म्हणूनच मी यावेळी पास्तिस (Pastis Pernod) पासून बनवलेले एक कॉकटेल तुम्हाला कसे बनवायचे ते सांगतो आहे.

या वेळच्या कॉकटेलचे नाव आहे "माय व्हॅलेंन्टाईन" (My Valentine)

साहित्य:

- २ औंस पास्तिस
- १ औंस कॉईनट्रो (Cointreu)
- १ औंस क्रिम दी मेंथे (Crème de menthe)
- १ औंस लिंबाचा रस
- ३ औंस अननसाचा रस
- सजावटी साठी अननसाचे पातळ त्रिकोणी काप आणि काही पाने, लिंबाचे पातळ काप, साखरेत घोळवलेली चेरी इ. इ. इ.
- बर्फ

कृती:

शेकर मध्ये बर्फाचे खडे घ्या. त्यात पास्तिस, कॉईनट्रो, लिंबाचा रस आणि क्रिम दी मेंथे घेऊन चांगले एक मिनीटभर शेक करा. तयार झालेले मिश्रण एका मोठ्या ग्लासमध्ये ओतून घ्या. त्यात अननसाचा रस अलगद सोडा. असा अलगद रस सोडायचा असेल तर एक चमचा घेऊन त्याच्या एका टोकावरून रस ओघळून ग्लासात आतल्या बाजूला अगदी चिकटून सोडा.

आता या मदिरेला सजवण्यासाठी एका टुथपिक वर साखरेत घोळवलेली चेरी, अननसाचे/लिंबाचे काप, अननसाचे पान लावा. जर एखाददुसरे फॅन्सी स्ट्रॉ असतील तर त्या ग्लासमध्ये ठेवा.

काही फोटो:

पाहीलंत माझी व्हॅलेंटाईन काय गोड दिसते आहे ते... अहो बघताय काय असे टक लावून? तुमची स्वतःची व्हॅलेंटाईन घ्या आणि मग लावा बरं का ओठांना..

डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.

धन्यवाद...

- नाटक्या

प्रतिक्रिया

दशानन's picture

23 Dec 2009 - 3:01 pm | दशानन

अरारारा !

मारलंस रे भावा..... ठार जीव घेतलास बघ ;)

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

टुकुल's picture

23 Dec 2009 - 9:16 pm | टुकुल

फोटो मधला हिरवा रंग एकदम जहर..
मस्त कॉकटेल, करुन पाहतो.
तुमच्या पिटार्‍यातुन अजुन खजिना येवद्यात.

--टुकुल

अडाणि's picture

24 Dec 2009 - 3:37 am | अडाणि

हिरवा रंग फारच मस्त दिसतो आहे एकदम खल्लास.... पास्तिस मला स्वतला फार आवडत नाही पण करून बघायला पाहिजे एकदा...

शंका - अननस रस हळू का बरे सोडायचा ? डायरेक्ट बाटलीतून ओतल्याने काय होईल ?

-
अफाट जगातील एक अडाणि.

धमाल मुलगा's picture

23 Dec 2009 - 9:58 pm | धमाल मुलगा

नुसतं फोटो पाहुनच आमची समाधी लागली!

नाटक्याशेठ,
बाकी काही नाही, तरी निदान तुमच्या हातची कॉकटेलं चाखायला तरी तिकडची वारी करायला लावणार बव्हतेक तुम्ही! :)

असा अलगद रस सोडायचा असेल तर एक चमचा घेऊन त्याच्या एका टोकावरून रस ओघळून ग्लासात आतल्या बाजूला अगदी चिकटून सोडा.

:) ह्यावरुन आमचा एक मित्र करायचा तो प्रकार आठवला. तो पठ्ठ्या आधी ग्लासात पाणी भरुन घ्यायचा आणि मग स्टिरर त्या पाण्याला चिकटेल न चिकटेल अश्या बेताने टेकवुन त्यावरुन हळुहळु व्हिस्की सोडायचा! सरळ सरळ पाणी आणि व्हिस्की असे २ लेअर्स वेगळे दिसायचे.

एक वैयक्तिक प्रश्नः साहेब, आपण ही कला कुठे कार्यशाळेमध्ये वगैरे जाऊन शिकलात की आपले आपणच? :)

श्रावण मोडक's picture

24 Dec 2009 - 10:56 am | श्रावण मोडक

तिकडची वारी...? च्यायला, म्हणजे कॉकटेलला मुकणे आले.
असो, त्याच दुःखात आता काही तरी घ्यावे!!!
बाकी धमु, या गोष्टींची कार्य'शाळा' असते? कैच्याकैच!!! ती फक्त 'शाळा' असते. ;)

प्रभो's picture

24 Dec 2009 - 11:03 am | प्रभो

येस्स..फक्त शाळा ...मधुशाळा.... :)

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

चतुरंग's picture

23 Dec 2009 - 9:44 pm | चतुरंग

क्या बात है नाटक्याशेठ!! कातिल कॉकटेल आणि केवळ रंग!!! :?

असा अलगद रस सोडायचा असेल तर एक चमचा घेऊन त्याच्या एका टोकावरून रस ओघळून ग्लासात आतल्या बाजूला अगदी चिकटून सोडा.
वा वा! किती बारकाईने केलंय कॉकटेल हे समजतं. जियो!! :)

(खुद के साथ बातां : रंग्या, तुला तो गणपा मांसाहारी आणि हा नाटक्या मद्यपी बनवणार लवकरच! :( )

(शेकर)चतुरंग

व्हॅलेंटाईन म्हटल्यासरशी लाल रंगाचे पेय बघायची अपेक्षा होती - बघतो तर बुवा हिरवट आहे!

सुंदर!

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2009 - 8:47 am | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा. श्री धनंजय यांच्याशी सहमत आहे. खरेतर लाल- गुलाबी असे सुंदर द्रव्य दिसेलसे वाटले होते. पण बुवा हिरवट आहे. ;)
असो त्या गुलाबी रंगाची कसर शेजारील शिल्पाने भरुन काढली.
हिरवा रंगही एकदम कातील आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2009 - 2:49 pm | परिकथेतील राजकुमार

गुरुदेव __/\__

एकदम "मार डाला" ! खत्तरनाक आहेत फोटु.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मदनबाण's picture

26 Dec 2009 - 4:46 pm | मदनबाण

च्यामारी हे पेय नक्कीच "मादक" असणार... ;)
शेवटचा फोटो पाहुन ग्लास उचलावा वाटला हे मात्र नक्की !!! :)

(सोमरस एके सोमरस...सोमरस दुणे... :? ) ;)
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia