मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सकिया (७) - स्कूप युअर लक

नाटक्या · · पाककृती
या आधीचे लेखः साकिया - पुर्वतयारी साकिया (१) .. साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम" साकिया (३) - "टकिला सनराईज" साकिया (४) - "स्ट्रॉबेरी डायक्युरी" सकिया (५) - "चॉकलेट बनाना" (लहान मुलांसाठी खास) सकिया (६) - स्पायसी मार्गारिटा =============================================================== स्कूप युअर लक मंडळी सर्वप्रथम या वेळेस बरेच दिवस कॉकटेल मिपावर टंकू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. या वेळेस जे कॉकटेल देत आहे ते प्यायचे नसून खायचे आहे, हा संपुर्ण पणे नवीन प्रकार आहे. पार्टीसाठी अतिशय उत्तम. आपल्याला माहित असेल की लिक्यूर असलेले चॉकलेटस प्रसिध्द आहेत. हे चित्र पहा:
अशाच प्रकारचा आणखी एक प्रकार या वेळेस बघणार आहोत. आपण बर्‍याच वेळेस लहान मुलांसाठी जेली बनवतो. तसाच जेली बनवायचा आहे फक्त त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मदिरा वापरून. कृती: १ जेलोचे पाकीट घ्या. कोणतेही चालेल. अननस, लिंबू, चेरी, स्ट्रॉबेरी, कलिंगड इ. बरेच प्रकार मिळतात. त्याच्या चवीला साजेशी कोणतीही मदिरा घ्या. उदा. अननसा बरोबर रम चांगली लागते, चेरी बरोबर स्कॉच व्हिस्की, लिंबू किंवा कलिंगडा बरोबर व्होडका अथवा टकिला, स्ट्रॉबेरी बरोबर जिन इ. इ. इ. मी ट्रॉपीकल फ्यूजन आणि रम वापरले. एका मोठ्या भांड्यात २ कप पाणी गरम करा. उकळले नाही तरी चालेल पण कोमट नको. त्यात जेलोची पावडर टाकून ते चांगले ढवळा. मिश्रण थंड होई पर्यंत थांबा. थंड झाल्यावर त्यात एक कप भरून मदिरा टाका. मिश्रण चांगले ढवळा. बर्फाच्या किंवा जेली बनवण्यासाठी जे साचे मिळतात त्यात मिश्रण ओता आणि फ्रिजमध्ये ठेवा. साधारणतः ३ तासांनी जेलो छान तयार होईल, एका काचेच्या बोल मध्ये हलकेच काढून घ्या. एका वेळेस जर दोन तिन प्रकारच्या जेली बनवल्यात तर पार्टीसाठी फार सुंदर दिसतात. काही फोटो:
डिस्क्लेमरः १. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत. २. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे. धन्यवाद... - नाटक्या

वाचन 13764 प्रतिक्रिया 27