लाल करा ओ माझी लाल करा

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
3 May 2018 - 1:48 pm

लाल करा ओ , माझी लाल करा

येता जाता लाल करा

पुसा मला तुम्ही येता जाता

पुसूनि पुरते हाल करा ,

लाल करा ओ लाल करा

येता जाता लाल करा

भजा मज तुम्ही भाई दादा

तुमचाच राहीन , हा पक्का वादा

गॉड बोलुनी बेहाल करा

लाल करा ओ माझी लाल करा

येता जाता लाल करा

समजू नका मज ऐरागैरा

नीट बघून घ्या माझा चेहरा

या गोंडस, लोभस मित्रासाठी

प्रेमाची पखाल करा

लाल करा ओ माझी लाल करा

येता जाता लाल करा

नका कटू कधी बोलत जाऊ

बनेन मग मी शंभू न शाहू

च्छाताड पुढे , मग फुगतील बाहू

कशाला स्वतःला हलाल करा

लाल करा थोडी लाल करा ओ

येता जाता लाल करा

क्रोध द्वेष जरा लांब राहू दे

प्रतिसादाने न्हाऊन जाऊ दे

पाठीवरती कशाला उगाचच

या छातीवरती वार करा

लाल करा ओ माझी लाल करा

येता जाता लाल करा

कल्पनेत मी रमतो गातो

एकलाच मी प्रेम वाटतो

बिनडोक्याच्या या वाघासाठी

मायेची तुम्ही शाल धरा

चुटकीसरशी काम करा

लाल करा माझी लाल करा

येता जाता लाल करा

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

miss you!काहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलमाझी कवितामार्गदर्शनमुक्त कविताधोरणमांडणीमुक्तकसमाजजीवनमानतंत्रआईस्क्रीमआरोग्यकालवणखरवसपौष्टिक पदार्थमत्स्याहारी

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

3 May 2018 - 2:02 pm | अभ्या..

व्वा,
जियो लाल

खिलजि's picture

3 May 2018 - 2:06 pm | खिलजि

धन्यवाद मित्रा . आज तुझ्या अभिप्रायाच्या खुशीमध्ये काही टिम्ब फ्री .......

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2018 - 9:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

-दिलीप बिरुटे

दुर्गविहारी's picture

3 May 2018 - 9:49 pm | दुर्गविहारी

लेखनाचा दर्जा सुधारा. तुम्ही चांगले लिहू शकता. उगाच भारंभार लिहीण्यापेक्षा मोजकेच आणि सकस लिहा.

प्रसाद गोडबोले's picture

3 May 2018 - 10:21 pm | प्रसाद गोडबोले

दुत्त दुत्त !

लोकांचे मणोरंजण झालेली बघवत नाही ना तुम्हाला =))))

खिलजीराव तुम्ही घाब्रु नका , मिपा हे कुठल्याही एका ठरावीक विचारसरणीचे समर्थक नाही. तुम्ही रोज किमान एक तरी कविता पाडाच !
प्रतिसाद देत नसलो तरीही आम्ही वाचत आहोच ! आस्तिकनास्तिकपाव अन मोदी अन पप्पु वादा पेक्षा तुमच्या कविता नक्कीच भारी आहेत !

आणि हो कवितेत शेवटी " खिलजी म्हणे " किंव्वा " खिलजी अल्लाउद्देनपीरु" किंव्वा " कहे खिलजी" अशी काहीतरी स्वाक्षरी घ्या की !

जेम्स वांड's picture

4 May 2018 - 11:08 pm | जेम्स वांड

खिलजि नाव वाचून खालचे खचाखच तलवार काम वाचले की बरे असते पण एकदम खाली 'सिद्धेश विलास पाटणकर' वाचले की खिलजि शेंडी उडवत बोधगयेत तर्पणाला बसल्यागत फीलिंग येतं. :D

अनन्त्_यात्री's picture

3 May 2018 - 10:20 pm | अनन्त्_यात्री

...कब मुझे छोडेगा?

नाखु's picture

7 May 2018 - 10:06 am | नाखु

औरभी रंग लायेंगे

काव्य पानिपत धारातीर्थी वाचक नाखु वाचकांचीच पत्रेवाला

चित्रगुप्त's picture

3 May 2018 - 10:45 pm | चित्रगुप्त

कवितेच्या बाबतीत तरी ज्या ज्या वेळी जे जे मनात उमटत राहील ते ते तात्काळ लिहीत रहाणे बरे, त्या वेळी बर्‍या-वाईटाचा विचार करत बसलो तर लिहीणेच खुंटण्याची शक्यता असते. नंतर प्रसिद्ध करण्यापूर्वी शक्यतो पुन्हा पुन्हा वाचून काही सुधारणा केल्या जाऊ शकतात. मात्र चित्रकलेप्रमाणेच काही सुचल्यावर पटकन केलेल्या स्केचमधे जो ताजेपणा आणि जोम असतो तो त्यावर जास्त काम करण्यातून हरपत जावा, तसे कवितेच्या बाबतीतही होऊ शकते.
एकंदरित खिलजींचा कविता प्रवास जोमात चालला आहे, हे छान.
घ्या तुमची (कविता) लाल करतो:
.

.

.

प्रसाद गोडबोले's picture

3 May 2018 - 10:48 pm | प्रसाद गोडबोले

ख्या ख्या ख्या

ह्या निमित्ताने मला माझ्या मॉडर्न आर्ट चित्रकलेची आठवण आली

http://www.misalpav.com/node/31366 =))))

गामा पैलवान's picture

3 May 2018 - 11:12 pm | गामा पैलवान

सिविपा, काय प्रेमळ कविता आहे हो. कुणाच्या तरी गाली लाली चढेल. थोडी लाल मात्रा कमी करा म्हणतो! ;-)
आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद चित्रगुप्त साहेब

तीन चित्रांची भेट

त्रिमूर्तीवानी भासली

पाहिल्यात प्रसन्न उधळण आनंदाची

दुसऱ्यात काळजीची लाल लकेर दाटली

तिसरं असंच काहीसं पण जरा येगळं त्या दोघांपेक्षा

वर रात्र तर खाली दूर कुठेतरी चूल पेटली

या लाल रंगात खरंच आहे साऱ्या रंगांची लाली

कुठे मुक्त उधळण आनंदाची तर कुठे पेटतात मशाली

मी खरंच आता विचार करतोय

कल्पना येऊ द्यायच्या अश्याच बाहेर

कि मूग गिळून गप्प बसायचं

कसं नि कुठे आणि किती थांबायचं

सांगा असं तोंड दाबून अजून किती जगायचं

मलाही वाटतं साऱ्यांनी मला एकदा तरी समजावं

काय लिहिलंय त्यापेक्षा काय सांगतोय ते उमजावं

दुसऱ्यानी नाही केली तरी चालेल

पण आयुष्यात एकदा तरी स्वतःची लाल करावं

सिद्धेश्वर विलास पाटणकर

चित्रगुप्त's picture

4 May 2018 - 8:13 pm | चित्रगुप्त

वा. मस्त शीघ्रकवन.

अभिजीत अवलिया's picture

4 May 2018 - 9:47 pm | अभिजीत अवलिया

काय अचाट वेग आहे तुमचा कविता पाडण्याचा. साॅरी करण्याचा.
विराट कोहलीला पण इतके सातत्य जमले नाही शतके ठोकताना.

खिलजि's picture

5 May 2018 - 1:53 pm | खिलजि

धन्यवाद मित्रा

जेम्स वांड's picture

5 May 2018 - 3:30 pm | जेम्स वांड

स्वमुखाने माझी स्वतःचीच लाल करा हो म्हणण्याला लैच दम लागतो, नाहीतर लोक! आयुष्यात आलेले पसाभर अनुभव आढयपणे मांडून लोकांनी आपली लाल करावी ही अपेक्षा बाळगून असतात (ते ही जालावर)

रच्याकने, तुम्ही इथे स्वतःच स्वतःची लाल का करून घेताय?
Laughter

खिलजि's picture

5 May 2018 - 3:46 pm | खिलजि

मी एक लाल बावटा आहे

पाटणकर घराण्याचा दिवटा आहे

शेंडीपासून गरापर्यंत पवित्र नारळ व्हायचं व्हतं

पण आज एक पावटा आहे

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही

लाल झाल्याशिवाय दिवस काय पुढे जात नाही

कुणी नाही केली तर

स्वतःहून केल्याशिवाय राहत नाही

तिमा's picture

5 May 2018 - 3:50 pm | तिमा

काय लाल करा, ते जरा संदिग्ध आहे. पण बहुतेक,
'माकड म्हणतं, माझीच लाल', या म्हणीतलाच अवयव अभिप्रेत असावा. लोकांनी नाही केली तर , खूप मिसळ खा, पाव न खाता! त्यानेही कार्य सिद्धीस जाईल.

-- खिल(वा)जी

खिलजि's picture

5 May 2018 - 3:56 pm | खिलजि

अवयव , आपण त्याला अवयव म्हणालात . हहपुवा .