कोण म्हणतो रात्र झाली
आताच अमुच्या जेवणाची
आता कुठे सुरवात झाली
बघुया चला - या फोडणीची
नुकतीच टेट्रापॅकमधुनी
डालड्याला जाग आली
पदरही खोचला हिने अन्
जिरे-मिरीची आग झाली
प्रियेस माझ्या आजतर मी
दगडफुले कित्येक वाहिली
हिंग कुटला मी असा की
धुंदी आजही राहीली
त्याच गंधाने अजुनी
जेवणाचा बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
भूक बाकी - कहर आहे!
समजून घ्या; खाण्याला, गाण्याला नि विडंबनाला वयाची अट नसते :)
प्रतिक्रिया
4 Mar 2009 - 9:40 am | सुक्या
आज काय चालु आहे हो मिपावर?
विडंबनावर विडंबन . . चालु आहे . . चालु द्या. चालु द्या.
चालु द्या.
चालु द्या.
चालु द्या.
=))
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
4 Mar 2009 - 9:49 am | वेताळ
पण नेमकी कोणती तेच समजले नाही. बाकी हिंगाचा गंध आला बर का. =))
वेताळ
4 Mar 2009 - 10:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
या फोडणीमुळेच विकासरावांना शिंका आल्या का? =))
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
4 Mar 2009 - 10:48 am | विसोबा खेचर
पदरही खोचला हिने अन्
जिरे-मिरीची आग झाली
भोत अच्छे! :)
आपला,
(फोडणीप्रेमी) तात्या.
4 Mar 2009 - 11:48 am | जागु
बेसन लाडू भारी जमलाय की.
4 Mar 2009 - 5:27 pm | लिखाळ
त्याच गंधाने अजुनी
जेवणाचा बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
भूक बाकी - कहर आहे!
समजून घ्या; खाण्याला, गाण्याला नि विडंबनाला वयाची अट नसते
वा वा वा.. मस्त आहे :)
-- लिखाळ.
4 Mar 2009 - 5:30 pm | आनंदयात्री
सही रे बेला.
4 Mar 2009 - 6:52 pm | पुष्कराज
माझ्या कवितेच छान विडंबन तुम्ही केल आहे
4 Mar 2009 - 6:55 pm | चतुरंग
हिंग, जिरे, मिरे तडका मारलेले खमंग विडंबन आवडले!! ;)
चतुरंग
4 Mar 2009 - 9:05 pm | क्रान्ति
मिसळपाव आहे म्हणून फक्त खादाडीच करत रहायची की काय? कुणी रांधण्याची शिकवणी घेतोय तर कुणी फोडण्या घालतोय! चालू द्या. आम्हाला काय, खमंग खाण्याशी मतलब! तसेही आम्ही मुलखाचे खादाड!
क्रान्ति
4 Mar 2009 - 9:54 pm | नाटक्या
धन्य आहात...
- नाटक्या
6 Mar 2009 - 10:35 am | दत्ता काळे
प्रियेस माझ्या आजतर मी
दगडफुले कित्येक वाहिली
हिंग कुटला मी असा की
धुंदी आजही राहीली
- ह्या कडव्याला जरा वेगळा आणि जास्त खमंग वास आहे.
( खडा हिंग होता कां ? )