नुकतेच मी मराठी भाषेतील पण मोडी लिपीतील जगातील पहिलेच ईबुक वाचले. जयसिंगराव पवार लिखित "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" हे पुस्तक नवीनकुमार माळी यांनी मोडी लिपीत लिप्यंतरित करून ईबुक स्वरूपात सादर केले आहे. ई-बुक वाचून पूर्ण केले आणि नेहमीप्रमाणे माझ्या पुस्तक परिक्षणाच्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहिले. नेहमी पुस्तक परीक्षणाबद्दल मिपावर लिहीत नाही पण नेहमीच्या पुस्तकांपेक्षा हे वेगळं आहे म्हणून म्हटलं चोखंदळ मिपाकरांना या बद्दल सांगावं.
मोडी लिपीच्या प्रचारासाठी नवीनकुमार अतिशय समर्पित भावनेने आणि कल्पकतेने (dedication and innovation) काम करत आहेत. मोडी शिकवणाऱ्या त्यांच्या "मोडी लिपी शिका सरावातून (Modi Script Learn & Practice" पुस्तकाची ओळख काही दिवसांपूर्वी मी माझ्या ब्लॉगवर करून दिली होती ( http://kaushiklele-bookreview.blogspot.in/2017/10/modi-script-learn-prac... ). त्याचा पुढचा टप्पा म्हणून मोडी मुळाक्षरे शिकल्यावर विद्यार्थ्याला मोडीत वाचन सराव करता यावा या उद्देशाने त्यांनी हे ईपुस्तक तयार केलं आहे. नमुन्यादाखल त्यातलं पाहिलं पान :
ईपुस्तक तयार करायचे तर त्यासाठी मोडीत टायपिंग करता आलं पाहिजे. टायपिंग करायचं तर त्यासाठी मोडी फॉन्ट पाहिजे. या आधी काही व्यक्तींनी असे फॉण्ट बनवायच्या प्रयत्न केला होता पण त्या फॉन्ट मध्ये काही ना काही त्रुटी होत्या. त्यांनी प्रयत्नपूर्वक सुयोग्य फॉन्ट बनवला. हे काम वाटतं तितकं सोपं आणि पटकन होण्यासारखं नव्हतं हे मला जाणवलं म्हणून मी नवीनकुमारांना त्यांचा या प्रयासाबद्दल सविस्तरपणे लिहायला सांगितलं. माझ्या आग्रहाला मान देत त्यांनी या प्रयासाबद्दल मोकळेपणे लिहिलं आहे.
हे मनोगत आणि या पुस्तकाबद्दल अधिक माहिती तुम्ही इथे वाचू शकता. http://kaushiklele-bookreview.blogspot.in/2017/12/first-ebook-in-modi-script-story-of-modi-font.html (पूर्ण लेख पुन्हा इथे उतरवला नाहिये. फक्त लिंक दिलीये क्षमस्व)
नवीनकुमारांच्या प्रयत्नांना सुज्ञ मिपाकर नक्कीच दाद देतील, इतरांना याबद्दल सांगून मोडी प्रसारासाठी आपला हातभार लावतील याची खात्री आहे.
धन्यवाद,
कौशिक लेले
प्रतिक्रिया
11 Dec 2017 - 11:50 pm | दुर्गविहारी
वा !!! खुपच चांगला आणि अत्यावश्यक प्रयत्न. नवीनकुमार साहेबांचे अभिनंदन आणि हि माहिती पुढे आणल्याबद्दल तुमचे आभार.
12 Dec 2017 - 10:56 am | कौशिक लेले
धन्यवाद !!
12 Dec 2017 - 3:46 am | निनाद
मोडी लिपी जिवंत ठेवण्यासाठी चाललेली धडपड स्पृहणीय आहे.
12 Dec 2017 - 10:38 am | उपयोजक
भारी
12 Dec 2017 - 10:48 am | बोका-ए-आझम
सलाम! असं वाचलं की काही ' नवीन ' करायचा उत्साह येतो! धन्यवाद या ओळखीबद्दल.
12 Dec 2017 - 10:58 am | कौशिक लेले
तुम्हाला आवडलं हे वाचून बरं वाटलं.
12 Dec 2017 - 11:12 am | टवाळ कार्टा
मोडी लिपी लिहिता येणारे कोणी आहे का मिपावर?
12 Dec 2017 - 12:39 pm | मनिम्याऊ
वाचायला अवघड जाते.
13 Dec 2017 - 9:26 am | पिंगू
कांचन कराई आहेत.
12 Dec 2017 - 12:27 pm | सांरा
https://learn-modi-script.blogspot.in/2017/07/resource.html
https://learn-modi-script.blogspot.in/2017/07/modi-in-todays-world.html
12 Dec 2017 - 1:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्पृहणीय उपक्रम !
12 Dec 2017 - 3:07 pm | संग्राम
असेच म्हणतो ...
13 Dec 2017 - 6:33 pm | एस
अत्यंत कौतुकास्पद!
24 Dec 2017 - 11:49 am | मदनबाण
आपल्याला यातलं काही घंटा समजत नाही, पण स्तुत्य उपक्रम !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]
31 Dec 2017 - 1:05 pm | कौशिक लेले
:) धन्यवाद