नमस्कार मंडळी,
नुकताच "जागतीक प्रेमदिन उर्फ व्हॅलेंटाईन डे" मोठ्ठ्य जोशात पार पडला ( हे वाक्य माझ्याबद्दलच आहे असे काही नाही). बहुतेक सर्वांनी आपापल्या "प्रिय अथवा प्रियेला" शुभेच्छा देताना अथवा पटवताना अनेक काव्ये रचली असतील अथवा इंटरनेटवरुन ढापुन परस्पर तिच्यापर्यंत पोचवली असतील, ह्यात एक वेगळीच मज्जा असते नाही ?
अश "प्रेमरसाने" ओथंबुन भरलेल्या कविता गाऊन दाखवण्याची तर वेगळीच नशा ...!
असो. आपला आज "तो विषय" नाही ...
सध्या आम्ही एका वेगळ्याच समस्येने त्रस्त आहोत. म्हटलं तर ही समस्या आमच्याशी निगडीत आहे म्हटलं तर नाही, पण समस्या आहे हे नक्की ...!
तर मुद्दा असा की समजा एखादी व्यक्ती आपल्या खुपच "मागे लागली" असेल व आपल्याला तिच्यात्/त्याच्यात म्हणावा एवढा इंटरेस्ट नसेल व आपण ते पदोपदी जाणवुन दिले असेल व तरीही ती आपला "पिच्छा सोडायला" तयार नसेल तर काय करावे ?
तिला प्रत्येक अथवा अप्रत्येकक्षरित्या बर्याच वेळा "बै, तुला वाटते तसे काही नाही, मला ह्यात इंटरेस्ट नाही " हे सांगुन झाले असेल व तरीही ते आपलेच म्हणणे पुढे रेटत असेल व सारखे तुमच्या मागे लचांड असल्यासारखे मागे लागत असेल तर तुम्ही काय कराल ?
प्रत्येक्ष भेटीत, फोनवर, समस पाठवुन, इ-मेल्स, चॅट व शक्य तितक्या बाकीच्या मार्गाने समजा ती व्यक्ती तुमचा पिच्छाच सोडत नसेल तर काय ?
सुचवा मला काही उपाय ...
पण हो, मला इथे काही "अशेतशे उटपटांग" उपाय नको आहेत, काय आहे ती व्यक्ती जराशी हळवी आहे, उगीच मनाला लाऊन घेईल ...
म्हणुन एखाद्या मस्त कवितेतुन "अ-प्रत्येक्षपणे" तिला समजेल व जरुरीइतकेच मनाला लागेल असा संदेश द्यायचा आहे ...
तर शुद्ध भाषेत सांगायचे तर "मला एक झकास काव्य हवे आहे " ...!
आमची प्रकृती कविमनाची नसल्याने आमचे घोडे इथे अडले आहे, आता तुमच्या मदतीच्या प्रतिक्षेत ...!
पण हो, एक अट आहे बरं का ...!
खाली दिलेली "एक ओळ अथवा एक तुकडा " शक्यतो "काव्यात अथवा जमल्यास प्रत्येक कडव्यात" आला पाहिजे ...
तरच खरी मज्जा ...!
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!( पार्श्वभुमी अशी की बरेच उपाय वापरुन झाले आहेत, पण परिणाम शुन्य. ती काही उमेद हरत नाही ... :( )
बघा बरं काही जमतेय का ????
लै लै लै उपकार होतील मिपाकरांचे ...
जनरली "प्रेमकाव्ये" प्रसवणार्या मान्यवर व होतकरु कवींना आमची खास विनंती की त्यांनी कॄपया ह्यात ४ हात मारावेत ...!
"सर्वात आवडलेल्या रचनेला" आम्ही काही काळ आमच्या खरडवहीच्या स्वागत मजकुरात स्थान देऊ व त्या व्यक्तीचे खास आभार मानु ...!
चला, लागा कामाला ...!
"या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....! "
डिस्केमर : हा प्रसंग माझ्याशीच रिलेटेड आहे असे काही नाही, मांडायला सोपे जावे म्हणुन तशी शब्दरचना केलेली आढळेल ... ;)
प्रतिक्रिया
17 Feb 2009 - 8:10 pm | शंकरराव
धोत-याला कधी गुलाब येत नाही
कव्यस्पर्धा घेउन समस्यापुर्ती होत नाही
अजुन सुचेल तस.. वेळ मिळाल्यावर टाकू
19 Feb 2009 - 7:53 pm | विजुभाऊ
बेगॉन/ डायझोन्/टीक२०
सगळे एकदम वापरुन पाहिले
कितीही झटकले तरी झुरळ काही मरत नाही
जीव तुटता तुटता पुनर्जन्म होतो
हात पाय हलत रहतात
अधुनमधुन पंख फडफडतो
जातो जातो वाटते पण जीव काही जात नाही
कितीही झटकले तरी काही झुरळ मरत नाही
तु काहीही कर पोसलेला नेता आहे
मी इथल्या सगळया
समाजाच्या नामर्दगानीवर
कुरतडत राहीन अंधारात तुलाच.
जगत राहीन तुझ्या उष्ट्यावर
आणि माज करेन त्यावरच.
तूच शेवटी हरणार आहेस
मी असाच आहे शतकांपासुन
तु ही असाच आहेस शतकांपासुन
सोशीक आणि सहनशील
निवडणूका वगैरे जन्तुनशाकाना
आम्ही दाद देत नाही.
हे सांगितल्यावाचुन ते रहात नाही
या उपायांनी काही होत नाही,
आमची जाड कातडी
कशालाच दाद देत नाही
हे ठाउक आहे म्हणुन
ती काही उमेद हारत नाही ...!
19 Feb 2009 - 8:05 pm | छोटा डॉन
जरी आमच्या विषयाशी संबंधीत नसले तरी कवितेत व्यक्त झालेले विचार आणि काव्याची थीम मस्त आहे ...
सुरेख हो विजुभाऊ ...!
------
( निगरगट्ट स्वयंघोषीत नेता ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
17 Feb 2009 - 8:13 pm | सूहास (not verified)
"मी तिला सा॑गीतले की मी
झोपेत घोरतो "
"ती म्हणाली तु जाउन डॉक्टरला
का विचारत नाही "
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
17 Feb 2009 - 8:34 pm | लिखाळ
पूर्वीची स्थिती -
वाढदिवस विसरलो तिचा
केली इतर मुलींशी सलगी
म्हणाली मनमिळाऊ तू
त्या तर तुझ्या बहिणी
व्हॅलेंटाईनला दिले फूल पिवळे
आणि चॉकलेट डेला किटकॅट
म्हणाली चल मारु गप्पा
कॉलेजच्या फाटकात
समजून चुकलो मी आता
ती काही बधत नाही
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
सध्याची काल्पनिक स्थिती :)
बराच विचार केला
अन लिहिले मिपावरती
आताच पाहिले आली ती
घेऊन नवा आयडी
उपायाबद्दल विचार चालू आहे....
-- लिखाळ.
17 Feb 2009 - 8:48 pm | ऍडीजोशी (not verified)
डाणराव बंगलोरी,
फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ह्या ओळी खरडतोय. आस्वाद घ्यावा.
१
घेऊन ये तिला आपल्या ढोसरीला,
पाय लाऊन पळेल तिच्या पाठीला.
२
तुझ्या डोळ्यांची नशा लय मस्त आहे,
पण त्याहून शिवास रिगलची रंगत लय जास्त आहे.
३
कोण तू तुझं नाव आठवत नाही,
किती डोकं खाजवलं काही सुचत नाही,
काल पासून प्यायलो नाही,
बहुदा म्हणूनच काही स्मरत नाही.
४
मी आहे छोटा डॉन,
मोठी आहे माझी मान,
जास्त मागे लागून नकोस,
गरम करीन तुझा कान.
५
किती आल्या किती गेल्या,
त्यात आता तुझी भर पडली,
तुला पाहून असं वाटतं,
का ही आयुष्यात कडमडली.
६
जाऊ दे गं मला, नको मागे लागुस,
दारू पितान चकणा संपल्यासारखी नको वागूस.
आता तुझ्या ओळी घेऊन
या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....!
दारूचं पण असंच असतं, किती आणली तरी पुरत नाही.
या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....!
आज काल डाण्याला झालंय काय? देशी सुद्धा चढत नाही...
या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....!
तरी तुला सांगत होतो, लफडं करणं दारू पिण्याइतकं सोप्प नाही.
17 Feb 2009 - 8:52 pm | छोटा डॉन
_/\_
ऍडीमहाशय, धन्य आहात आपण ...!
ह्याबद्दल आपल्याला आमच्याकडुन "एक लिटर दुध व सव्वाशे ग्रॅम कंदी पेढे" लागु, भेटल्यावर देतो व वरुन भाजलेली बडीशेप खाऊ घालतो.
=)) =)) =))
खल्लासऽऽऽऽ
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
17 Feb 2009 - 9:27 pm | ब्रिटिश टिंग्या
एड्याभौ लै भारी!
या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....!
लष्कर-ए-खरडाने धडा शिकवला तरीही , उच्चभ्रू अहंकार सोडत नाही! ;)
17 Feb 2009 - 9:37 pm | शितल
>>लष्कर-ए-खरडाने धडा शिकवला तरीही , उच्चभ्रू अहंकार सोडत नाही!
=))
डॉन्या, ह्या टिंग्याला ४ दिवस तुझ्याबरोबर ठेव, मग बघ तिने तुला दुरून बघितले तरी काळा गॉगल लावुन रस्त्याच्या कडे कडेन निघुन जाईल. ;)
18 Feb 2009 - 7:54 am | दशानन
शितल चा उपाय जबरा आहे.... ट्राय कर रे डोन्या !
* बाकी एडी भाउ धन्य आहेस.
18 Feb 2009 - 9:56 pm | संदीप चित्रे
>> या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....!
तरी तुला सांगत होतो, लफडं करणं दारू पिण्याइतकं सोप्प नाही.
या ओळी मस्त जुळल्या आहेत ऍडी :)
17 Feb 2009 - 8:49 pm | ऍडीजोशी (not verified)
आपल्या सौम्याचं काय झालं रे?????????????
17 Feb 2009 - 10:19 pm | ब्रिटिश टिंग्या
>> आपल्या सौम्याचं काय झालं रे?????????????
आपली सौम्या :O
17 Feb 2009 - 9:00 pm | सूहास (not verified)
या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....!
तरी तुला सांगत होतो, लफडं करणं दारू पिण्याइतकं सोप्प नाही.
स॑ प लो...
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
17 Feb 2009 - 9:30 pm | अमृतांजन
माझा ७ वेळेचा अनुभव असा आहे की, काही प्रश्न/ई. विचारावे लागतात-
१. तुला बहीण आहे का असे विचारणे
२. सतत तिला अवघड जाणाऱ्या विषयांबद्दल बोलत राहणे व त्याबद्दल प्रॉब्लेम विचारत बसणे
३. पर्स विकत घेउन तिला विचारणे, तुला आवडली का ग? आज किनै एका माणसाचा बर्थ्डे आहे
४. खूप जोरात चालणे- बरोबर असल्यास आणि सतत सांगणे, किती हळू चालतेस
५. तिच्या कपड्यांवर सतत टिका करणे
६. तुला आयुष्यात काहीही मदत लागली मला सांग बरका, मी धाऊन येईन, असे म्हणणे
७. मला सैन्यात भरती व्हायचे आहे असे सांगणे
८. मी अजुन ४ वर्षे तरी शिकणार आहे, नोकरी-बिकरीचा विचार नाही असे सांगणे
९. ढासळत्या समाजव्यवस्थेबद्दल, संकुचित राजकारणावर, क्रिकेट्वर सतत चर्चा करणे
१०. सुहागरात्री मांजर मारणे ही कथा माहीत असल्यास त्यास्वरुपाची कथा सांगणे
११. ई
17 Feb 2009 - 9:34 pm | ब्रिटिश टिंग्या
क्रमांक ३ आणि ६ लै भारी! :)
17 Feb 2009 - 9:45 pm | बाकरवडी
मस्तच १ णंबर
येउद्या अजून ...........
17 Feb 2009 - 10:26 pm | अमृतांजन
११. आमच्या घरी आईच्या म्हणण्यापुढे कोणाचे ढिम्म चालत नाही असे सांगणे
17 Feb 2009 - 10:33 pm | अमृतांजन
ह्या सगळ्यासाठी एक एकाच वाक्याचा रामबाण उपाय आहे पण तो वाचून मिसळपाव खातांना जोरदार ठसका लागेल. त्यामुळे इथे नको.
17 Feb 2009 - 9:48 pm | ऍडीजोशी (not verified)
मला सैन्यात भरती व्हायचे आहे असे सांगणे
ह्या कारणावर माझ्या एका मित्राने कितीतरी जीवघेण्या प्रसंगांतून सुटका करून घेतली आहे :)
17 Feb 2009 - 9:47 pm | सिद्धेश
या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....!
अगं नेतेसुद्धा खुर्ची उबवायची इतकी जिद्द धरत नाहीत.....
या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....!
बॉलीवूडवाले बघ दररोज घेऊन फिरतात नवीन बाई......
या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....!
तुज्या मायला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही........
आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका |
पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||
17 Feb 2009 - 9:57 pm | प्रभाकर पेठकर
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
(पण मला समजत नाही)
तिला नाकारण्याची तूच उमेद का हरत नाहीस?
एकदाची तिला आपली (म्हणजे तूझी होऽऽ!) का म्हणत नाहीस?
अंगे भिजली जलधारांनी,
ऐशा ललना स्वये येऊनी,
देती आलींगन चुंबुनी,
तेच पुरूष भाग्याचे.
(बाकी सर्व दुर्भाग्याचे)
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
17 Feb 2009 - 10:13 pm | अनामिक
डॉन्याचे मनोगत खालच्या (ट ला ट जोडून केलेल्या) कवितेत मांडायचा प्रयत्न केला आहे.......
******************************
ऐक मित्रा सांगतो, तुले माही गोष्टं
पोट्टी लागली मागे, पण हाये लई खाष्ट
काय म्हणतो? सांगू तुला ति हाय कशी...
रंग्याची कविता वाच, वाटंल म्हैसचं जशी
म्हणली मला ति, तिचा माह्यावर जडला जीव
ऐकुन तिचे शब्द, माही मलाच आली किव
आता जवा तवा मला ति करत र्हायते फोन
सारकं वाट्टे लावाव्या तिच्या कानाखाली दोन
रागात येवून मी तिला येकदा सांगीतलं तसं
पण माहा हात वाट्टे तिला जशी मोराची पिसं
ति दिसली की आजकाल मी बदलतो वाट माही
पर ति येतेच माह्या मागं कारण काढून काही
येकदा तिच्यादेखत तिच्या बहिणीला मारला डोळा
तर म्हणते कशी मला 'तू येडा की खुळा'
म्हणलं नको मागे लागू माह्या, मी न्हाई सोम्यागोम्या
पर तिला मात्र वाटे, ति माझी सौम्या मी तिचा गोम्या
कंटाळलो तिला सांगून 'बाई माहा पिच्छा सोड'
पर मेल्याशिवाय जित्याची कधी जाते का खोड?
म्हणे मला ति... जल्मभर देईल माही साथ
राहु सोबत आपण दोघं जसे चुन्ना आणि काथ
हा इचार करुन माह्या काळजात होते धस्सं
आता उरलेलं आयुष्य मी जगुतरी कसं?
काय काय न्हाई केलं, पर ति दुर काई जाईना
माह्यासाठचा आनंद तिच्या मनात काई माईना
लै केलेत उपाय, या उपायांनी काही होत न्हाई,
खरं हाय तिचं प्रेम, ती काही उमेद हारत न्हाई ...!
******************************
-अनामिक
17 Feb 2009 - 10:17 pm | छोटा डॉन
एकदम सुरेख काव्य "अनामिकभाऊ", सह्ही है ..!
मज्जा आली, आभारी आहे ...!
असेच अजुन येऊ द्यात ..! :)
------
( भलताच खाष्टं ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
17 Feb 2009 - 10:22 pm | प्रभाकर पेठकर
व्वा! मस्त जमली आहे कविता. लईच वरिजनल.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
17 Feb 2009 - 10:30 pm | चतुरंग
छुपा रुस्तुम आहेस की! कविता मस्तच झालीये! :)
अजून येऊदेत!!
चतुरंग
17 Feb 2009 - 10:57 pm | अवलिया
हे तू नीट समजुन का घेत नाही
कसं तुला काहीच समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याबरोबर मला राहवत नाही !
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
अगदी सहज आवडते का विचारतेस,
भावना माझ्या तुला का जाणवत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याबरोबर मला करमत नाही !
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
तू जवळ असलीस की खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ नाही !
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
मात्र कधी कधी असं वाटतं ,
तू दाखवतेस तुला समजत नाही !
भावना माझ्या चांगल्या तु जाणतेस,
पण मुद्दामच तू मला सोडत नाही
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
भेटण्याने आता काही होणार नाही,
मी तुझ्याबरोबर क्षणही जगणार नाही !
व्हावा वियोग ही तर देवाचीच इच्छा,
त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !!
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
तुझं नि माझं विळाभोपळ्याच नातं,
हा काही आज उद्याचा खेळ नाही !
तुझाच मी आणी माझीच तू,
असं स्वप्नातही शक्य होणार नाही !
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तू हे समजुन का घेत नाही...
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
--अवलिया
भेटण्यासाठी तुला तैयार होतो
पण तुझे फर्मान आले, साद नाही
17 Feb 2009 - 10:27 pm | विसोबा खेचर
अरे वा! धागा अंमळ मजेशीर! :)
आमचं तत्व -
आली अंगावर, घेतली शंगावर! :)
आपला,
(सांड) तात्या.
बाय द वे डॉन्या, भानगड काय आहे? सांभाळ रे बाबा..!
:)
तात्या.
17 Feb 2009 - 10:36 pm | छोटा डॉन
>>आली अंगावर, घेतली शंगावर!
तात्यानु, ही "शंगावर" काय भानगड आहे हो ?
इथे मला २ शक्यता वाटतात , शिंगावर किंवा अंगावर , कसेही चालेल ;)
पण नकोच ..! ;)
>>बाय द वे डॉन्या, भानगड काय आहे? सांभाळ रे बाबा..!
=))
काही नाही हो, जरासा अंमळ विरंगुळा चालु आहे.
टेन्शन नाही जास्त ...!
------
( मजेशीर ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
17 Feb 2009 - 10:43 pm | विसोबा खेचर
इथे मला २ शक्यता वाटतात , शिंगावर किंवा अंगावर , कसेही चालेल
येस्स! कसंही चालेल! बाय द वे, अंगावर आली तर फारच बरं! स्थूलपणमुळे स्वत:हून अलिकडे श्रम जरा कमीच होतात! ;)
तात्या.
17 Feb 2009 - 10:44 pm | अवलिया
स्थूलपणमुळे स्वत:हून अलिकडे श्रम जरा कमीच होतात
पलिकडे करुन बघा....
--अवलिया
18 Feb 2009 - 8:49 am | त्रास
रोडरोमियो च्या ध्याग्यावर हिरिरीने मते देणारे कुठे आहेत?
18 Feb 2009 - 8:53 am | छोटा डॉन
अगदी करेक्ट ...!
म्हणलं तर हा "रोडरोमियोगिरी"चाच प्रकार, फक्त इथे व्हिक्टीम एक "स्त्री" नाही व ( अजाणतेपणी ! ) त्रास देणारे अनोळखी नसुन ओळखीचे व चांगल्या संबंधातले आहेत.
बाकी त्राससाहेबांनी जे काही गॄहीतक लावले त्याच्याशी सहमत आहे.
कॄपया ह्या परिस्थीतीत इतर मान्यवरांनी त्यांची मते मांडावीत ...!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
18 Feb 2009 - 10:56 am | सहज
धागा अंमळ मजेदार कल्पनाविलास आहे.
जर का कल्पनाविलास नसेल तर सोपे काम म्हणजे त्या व्यक्तिला हा धागा दिसेल अशी व्यवस्था करवणे.
अजुन एक सल्ला - जोवर कुठे मॅटर सेटल होत नाही तोवर असु दे की नाहीतरी तुम्हाला इतर "बहिणीबरोबर" जाउ देतेय ना. मग प्रॉब्लेम काय हाय? अनुभव एक मोठी गोष्ट आहे.
18 Feb 2009 - 1:51 pm | धमाल मुलगा
काय च्यायला कवटी चालते एकेकाची!!
भले बहाद्दर रे :)
बाकी, आ.का.का.क.ना.हे.ज.जा.आ.हे.वे.सां.न.ल. पण तरीही तुमच्यासाठी एखादा प्रयत्न करुन पाहतो ;)
तिचा मला वीट येतो हे तिला कळत नाही,
फटकन तोडणं मला काही जमत नाही...
मग मी करतो फोन बंद,
उपसुन टाकतो मोडेमच्याही तारा ...
रिती बाटली उशाशी, झोपतो तसाच उपाशी,
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
स्वप्नांतसुध्दा येत राहते,
क्षणोक्षणी भिवविते!
आता तर दारुसुध्दा चढत नाही,
मांडलेला हा छळ सुटत नाही!
या उपायांनी काही होत नाही...या उपायांनी काही होत नाही!
ती काही उमेद हारत नाही ...!!!
****************************************************
च्यायला, कविता म्हणता म्हणता हे काय होऊन बसलं?
शहाण्यानं उंटाच्या शेपटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला जाऊ नये हेच खरं.
बाकी, ते प्रथितयश कवी अन् काय काय म्हणताहात त्यांनी इकडं पाहीलं नाही म्हणून गळे कसले काढता? तुमची लायकी ती काय? तुम्ही धागे ते काय काढता?
अहो, जरा उच्चभ्रु व्हा, तुमच्या शब्दाला वजन मिळू दे, मग पहा धागा काढल्याकाढल्या कसे छप्पन प्रतिसाद पडतात...
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
18 Feb 2009 - 2:04 pm | आनंदयात्री
>>बाकी, ते प्रथितयश कवी अन् काय काय म्हणताहात त्यांनी इकडं पाहीलं नाही म्हणून गळे कसले काढता?
खरे आहे .. प्रथितयश कवी जरी नाही आले तरी प्रथितयश विडंबक बनण्याची स्वप्ने बघणारे आले आहेत वर आयडी बदलुन.
18 Feb 2009 - 6:31 pm | शितल
>>>स्वप्नांतसुध्दा येत राहते,
क्षणोक्षणी भिवविते!
=))
हॉरर शो पाहुन झोपत जाऊ नकोस. ;)
अरे वा, धम्या देखिल एक सुसाह्य कवि आहे की. ;)
डॉन्या, बघ तुझ्या एका उमेदीने किती जणातील कविला हाक दिली. :)
18 Feb 2009 - 5:08 pm | विनायक प्रभू
आपली यंट्री व्यं. नी. मधे. बघा जमली आहे का डॉनराव
18 Feb 2009 - 5:09 pm | आनंदयात्री
हितं पब्लिश करा .. अडचण असेल तर * टाका.
18 Feb 2009 - 5:12 pm | छोटा डॉन
काय ???
तुम्ही "*" टाका म्हणताय ?
नाय जमणार, तुम्ही काय "*" सोडुन नुसती क्रियापदे वाचणार काय ?
कर्म, सर्वनाम वगैरे नको का ?
बाकी कविता झ्याक्क आहे ... ;)
------
" * "छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
18 Feb 2009 - 5:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बाकी कविता झ्याक्क आहे ... Wink
अहो डानराव, मग आमालाबी द्या की वाचाला ...
आंद्याशेट, लोकं इतरांचं लिखाण, प्रतिसाद आपल्या नावावर खपवतात. तुम्ही वर एक लंबर कविता लिहून सही भलत्याच टुकार नावानं केलीत! ;-)
अदिती
18 Feb 2009 - 5:19 pm | अवलिया
अहो डानराव, मग आमालाबी द्या की वाचाला ...
डान राव म्या पन ह्येच बोल्तो.....
परभु एकतर इथे टाका नाही तर व्यनी करा...
--अवलिया
18 Feb 2009 - 5:22 pm | विनायक प्रभू
इथे टाकु शकत नाही.
टँगुळ नको मला.
18 Feb 2009 - 5:23 pm | अवलिया
व्यनी करा
मी ख व मधे लावतो...
--अवलिया
18 Feb 2009 - 5:24 pm | छोटा डॉन
>>डान राव म्या पन ह्येच बोल्तो.....
आंतरजालीय इतिहासातली अजरामर हाक ... " ( प्रभु ) काका, मला वाचव ..!"
बाय द वे, आपण अशा गप्पा कम प्रतिसाद देत बसतो व काही "जागरुक" लोक ह्यालाच "कंपुबाजांचे प्रतिसाद वाढवणे" म्हणतात ...
आहे की नाही डोक्याला शॉट ???
एक तर प्रभुमास्तरांकडुन व्यनीने कविता मागुन घ्या अथवा त्यांची परवानगी घ्या, मग मी तुम्हाला व्यनीने पाठवतो ..
पण ही सो कॉल्ड कंपुबाजी ताबडतोब बंद करा ... ;)
------
( १ नंबरचा कंपुबाज ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
18 Feb 2009 - 5:26 pm | आनंदयात्री
उगाचच प्रतिसाद देतोय. तिरका प्रतिसाद छान दिसतो म्हणुन !!
18 Feb 2009 - 5:28 pm | ब्रिटिश टिंग्या
मी पण! ;)
बाय द वे.....कालपासुन मी +१, सहमत, असेच बोल्तो असे प्रतिसाद देणे बंद केले आहे!
18 Feb 2009 - 6:25 pm | शितल
>>उगाचच प्रतिसाद देतोय. तिरका प्रतिसाद छान दिसतो म्हणुन !!
=))
ह्याला काम नाही वाटते आज. :)
18 Feb 2009 - 5:29 pm | अवलिया
आंतरजालीय इतिहासातली अजरामर हाक ... " ( प्रभु ) काका, मला वाचव ..!"
ठ्ठो !!!! =))
बाय द वे, आपण अशा गप्पा कम प्रतिसाद देत बसतो व काही "जागरुक" लोक ह्यालाच "कंपुबाजांचे प्रतिसाद वाढवणे" म्हणतात ...
म्हणु द्या हो... त्यांचा कंपु कमी पडत असावा
आहे की नाही डोक्याला शॉट ???
त्यांच्या डोक्याला असेल तर आहे. पण प्रश्न अजुन एक उभा रहातो? जावु द्या
एक तर प्रभुमास्तरांकडुन व्यनीने कविता मागुन घ्या अथवा त्यांची परवानगी घ्या, मग मी तुम्हाला व्यनीने पाठवतो ..
पण ही सो कॉल्ड कंपुबाजी ताबडतोब बंद करा ...
लै भारी ... दमबाजी लै भारी...
पाध्यांचे दगड संपले मला मारुन म्हणुन तुम्ही बोलत आहात....
--अवलिया
18 Feb 2009 - 5:41 pm | विनायक प्रभू
परवानगी दिली. मला कट पेस्ट जमत नाही. म्हणुन फकत अवलियाला टंकली. त्यांनी १८ वर्षे पुर्ण केलेल्या वाचायची इच्छा असलेल्या सदस्याला ती व्य. नी. करावी. हो नाही तर पाध्ये रागावतील.
18 Feb 2009 - 5:43 pm | अवलिया
पण पाध्यांनीच मागितली तर देवु ना?
--अवलिया
18 Feb 2009 - 5:17 pm | विनायक प्रभू
पावती बद्दल धन्यवाद.
च्या मारी कवी पौगंडावस्थेत जागृत होतो आहे काय.
18 Feb 2009 - 5:34 pm | विनायक प्रभू
कंपुबाज म्हणणार्यांची ऐसे की तैसी.
सर्व मानवजमात कंपू म्हणुनच वाढली.
हो करतो कंपू
कोण काय करणार आहे मला.
बो.क्.बो.भा नको मला.
कंपुवालेका बोलबाला
नवकवी
वि.प्र.
18 Feb 2009 - 5:37 pm | अवलिया
नवकवींच्या कंपुत स्वागत
--अवलिया
18 Feb 2009 - 5:41 pm | अवलिया
प्रतिसादांचे अर्धशतक करण्यासाठी प्रतिसाद दिला.
५१ वा प्रतिसाद आला की हा उडवला तरी चालेल
--अवलिया
18 Feb 2009 - 6:21 pm | विनायक प्रभू
रेशनिंग दिवस परत आले काय?
19 Feb 2009 - 6:56 am | शितल
पळ, पळ पळालो, लप, लप लपलो,
पण
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
अग बाई, जा ग बाई म्हणलो
पण
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
अस तसं , नको तसं बोललो
पण
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
खाज खाज खाजवल डोक तुमचं आणी माझ
पण
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!