मिपावर नवीन कादंबरी - मोबियस

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in पुस्तक पान
7 Feb 2017 - 10:40 am

मोबियस :
मोबियस नावाचा एक पट्टा मोबियस नावाच्या शास्त्रज्ञाने जगासमोर आणला. याचे वैशिष्ट्य याच्या पृष्ठभागाला एकच बाजू किंवा एकच सीमा असते. आपण एखादी मोबियस स्ट्रिप सहज बनवू शकतो एक कागदाची पट्टी घ्यायची व त्याला मधे पीळ पाडून तिची टोके चिकटवून टाकायची. आता यावरुन जर एखादी मुंगी एकाच दिशेने प्रवास करु लागली तर ती परत त्याच बिंदूपाशी येऊन थांबते. या प्रवासात ती एकदाही कागदाची कड ओलांडत नाही पण कागदाच्या दोन्ही बाजूने प्रवास करते. दिसायला हे सोपे आहे पण गणितात यावर बराच अभ्यास झालेला आहे, जो मी येथे लिहू शकत नाही व मला एखाद्या गणीततज्ञासारखे लिहिताही येणार नाही. पण या मोबियस स्ट्रिपमधे व आपल्या आयुष्यामधे मला विलक्षण साम्य आढळते. तसेच ते ॲबे कोबो या जपानी लेखकालाही भावले असावे. त्याच्या ‘‘सुना नो ओना’’ या कादंबरीत नायकाच्या एका मित्राचे किंवा परिचिताचे नाव म्हणूनच त्याने मोबियस ठेवले असावे. पण मी त्याच्या कादंबरीचा अनुवाद केला आणि त्याचे नाव ठेवले ‘‘मोबियस ’’ कारण माणसाचा प्रवास परत त्याच बिंदूपाशी येऊन थांबतो हे मला पुरते पटले आहे.

आता लेखकाचा परिचय..
त्याची सुना नो ओना ही कादंबरी १९६२ साली प्रकाशित झाली आणि एका रात्रीत त्याचे जगभर नाव झाले. या पुस्तकाचे २० भाषांमधे अनुवाद झालेला आहे... आता २१ म्हणायला हरकत नाही. त्यानंतर ॲबेने सात कादंबऱ्या लिहिल्या आणि त्याही बऱ्याच लोकप्रिय झाल्या. टोक्यो मेडिकल स्कूल मधे शिक्षण घेत असताना त्याच्या कमी गुणांमुळे त्याला सैन्यात भरती व्हावे लागणार होते पण याने टि.बीचा एक बनावट दाखला सादर करुन त्यातून सुटका करुन घेतली. तसेही त्याला जपानचा त्या युद्धातील सहभाग विशेष मान्य नसावा. त्याची रवानगी त्याच्या जन्मगावी म्हणजे मुकडेन, मांचुरिया येथे करण्यात आली. त्यावेळेस तेथे जपानची वसाहत होती. दुर्दैवाने तेथे खरेच एका साथीच्या तापात त्याच्या डॉक्टर वडिलांचा मृत्यु झाला.

जनरल मॅकारथरच्या जपानमधे मग ॲबेचे अत्यंत हाल झाले. त्या हलाखीच्या दिवसातत्याने रस्त्यावर भाज्या विकल्या, कोळसे विकले व कसेबसे आपले व बायकोचे पोट भरले. पण तो आपला लिहितच होता, त्याची बायको त्याच्या लिखाणासाठी रेखाचित्रे काढत असे ती त्याच्या जुन्या कादंबऱ्यातून अजूनही दिसतात. १९५१ साली त्याने कथेसाठी असणारे प्रतिष्ठेचे आकुतागावा पारितोषिक जिंकले. त्यानंतर अनेक वर्षांनी सुना नो ओना प्रकाशित झाली.

ॲबे कोबोच्या कादंबरीतील पात्रे आणि कथानक साधारणत: प्रतिकात्मक असतात. पण येथे मात्र तसे झालेले दिसत नाही. या कादंबरीचं कथानक सरळ पण आघात करणारे आहे. मी बराच संयम बाळगून याचा अनुवाद केलेला आहे हे कृपया लक्षात घ्यावे.

फ्रान्झ काफ्काच्या लेखनाचा ॲबे कोबोच्या लेखनावर बराच प्रभाव आहे. पण त्याच्यावर अजून एका गोष्टीचा प्रभाव आहे आणि तो म्हणजे एका ग्रीक दंतकथेचा. सिसिफस नावाच्या या दंतकथेत कोरिन्थचा राजा सिसिफसला त्याच्या कुटील कारस्थानी स्वभावासाठी (आणि त्याच्या परिणामांसाठी) एक शिक्षा मिळते यात त्याला एक मोठी शिळा डोग़राच्या शिखरावर घेऊन जा असा आदेश असतो पण यात एक भानगड असते ती म्हणजे ती शिळा तेथे पोहोचण्याआधी परत त्याच्या अंगावर गडगडत येऊन पडते... ॲबे कोबोच्या बऱ्याच कथांमधे अशी एक गोष्ट असते ती वरील शिळेसारखी असते, उदा. न थांबणारे वादळ, भूक न भागणारे राक्षस इ.इ.इ.
ही गोष्ट आहे एका किटक गोळा करणाऱ्या शाळामास्तराची व एका स्त्रीची. पण यात अजून एक पात्र आहे ते म्हणजे वाळू...

तर ही गोष्ट आहे त्याची, तिची व वाळूची.....
तर वाचूया... सुना नो ओना...

मूळ लेखक : ॲबे कोबो
मराठी अनुवाद : जयंत कुलकर्णी.
या अनुवादाचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत हे कृपया लक्षात घ्यावे. याचा कुठल्याही प्रकारे वापर करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक.

प्रतिक्रिया

पैसा's picture

7 Feb 2017 - 10:44 am | पैसा

वाचकांना मेजवानी!! वाट बघत आहे.

सस्नेह's picture

7 Feb 2017 - 11:42 am | सस्नेह

असेच म्हणते !

फारच छान! प्रकाशनपूर्व आहे का ?
वाट पहातो.

(अवांतरः सिमा, पिळ,गणीतात, भुक, स्त्रिची, हे शब्द खटकले.)

ताल लय's picture

7 Feb 2017 - 11:11 am | ताल लय

सुंदर, नविन मेजवानिच्या प्रतिक्षेत

ताल लय's picture

7 Feb 2017 - 11:12 am | ताल लय

सुंदर, नविन मेजवानिच्या प्रतिक्षेत

सामान्य वाचक's picture

7 Feb 2017 - 12:10 pm | सामान्य वाचक

प्रतीक्षा

इशा१२३'s picture

7 Feb 2017 - 12:25 pm | इशा१२३

अरे वा!मेजवानीच.

इशा१२३'s picture

7 Feb 2017 - 12:25 pm | इशा१२३

अरे वा!मेजवानीच.

मराठी कथालेखक's picture

7 Feb 2017 - 12:58 pm | मराठी कथालेखक

टोक्यो मेडिकल स्कूल मधे शिक्षण घेत असताना त्याच्या कमी गुणांमुळे त्याला सैन्यात भरती व्हावे लागणार होते

दुसर्‍या महायुद्धानंतर जपानला स्वतःचे सैन्य नव्हते ना ?

अॅस्ट्रोनाट विनय's picture

7 Feb 2017 - 1:02 pm | अॅस्ट्रोनाट विनय

उत्सुक आहे वाचायला. पटापट येऊ द्या सगळे भाग.

कपिलमुनी's picture

7 Feb 2017 - 1:49 pm | कपिलमुनी

प्रतीक्षेत

संजय पाटिल's picture

7 Feb 2017 - 3:46 pm | संजय पाटिल

येउदे लवकर..

आता यावरुन जर एखादी मुंगी एकाच दिशेने प्रवास करु लागली तर ती परत त्याच बिंदूपाशी येऊन थांबते. या प्रवासात ती एकदाही कागदाची कड ओलांडत नाही पण कागदाच्या दोन्ही बाजूने प्रवास करते.

मोबियस स्ट्रिपचं एक वैशिष्ट्य म्हणजे द्विमिती वस्तू मोबियस स्ट्रिपवरून फिरवून आणली की त्याच्या बाजवा बदलतात - डाव्याची उजवी आणि उजव्याची डावी होते. मिपावरचे पदार्थवैज्ञानिक जास्त अधिकाराने समजावू शकतील. लेखकाला हे 'बाजू बदलणं' ही अभिप्रेत होतं का?

जयंत नारळीकरांनी थ्री-डी मोबियस स्ट्रिपची कल्पना करून एक विज्ञानकथा लिहिली आहे.

कारण माणसाचा प्रवास परत त्याच बिंदूपाशी येऊन थांबतो हे मला पुरते पटले आहे.

यावरून डोरिस लेसिंग या लेखिकेची आठवण झाली. तिच्या लेखनात ही थीम वारंवार येते.

अनुप ढेरे's picture

7 Feb 2017 - 5:29 pm | अनुप ढेरे

थ्री-डी मोबियस स्ट्रिपची कल्पना करून एक विज्ञानकथा लिहिली आहे.

उजव्या सोंडेचा गणपती राईट?

हो, बरोबर! फॉर्म हरवलेला राईट आर्म स्पिनर आणि त्याला मदत करणारा त्याचा शास्त्रज्ञ मित्र, वगैरे.

एस's picture

7 Feb 2017 - 6:06 pm | एस

वाचायला हवी.

बादवे, कादंबरीच्या अनुवादाची वाट पाहतो आहे.

यक्षांची देणगी या कथासंग्रहात आहे.

गामा पैलवान's picture

7 Feb 2017 - 7:24 pm | गामा पैलवान

आदूबाळ,

उजव्या सोंडेच्या गणपतीत मूलकणांची फिरकी (स्पिन) वापरून त्रिमितीय मोबियस पट्टा बनवता येईल अशी काहीशी कल्पना होती. जबरी कथासंग्रह होता. मराठीतल्या बहुधा पहिल्या विज्ञानकथा होत्या त्या.

आ.न.,
-गा.पै.

लोकसत्तेमध्ये निरंजन घाटे यांचा लेख आला होता.

त्याप्रमाणे:

‘विज्ञानकथा’ हा साहित्यप्रकार मराठीत सर्वप्रथम १९१६ मध्ये अवतरला. श्री. बा. रानडे यांची ‘तारेचे हास्य’ ही कथा त्या वर्षी ‘मासिक मनोरंजन’च्या अंकात मार्च महिन्यात प्रसिद्ध झाली.

या सुरुवातीच्या मराठी विज्ञानकथा आता वाचायला मजा येईल.

'यक्षांची देणगी' फारा वर्षांपूर्वी वाचलंय. त्यात आहे ही कथा? मला आठवत कशी नाही!! असो. परत वाचतो. डॉ. नारळीकरांचा हा कथासंग्रह काही इतका खास वाटला नव्हता, पण त्यांची 'प्रेषित' ही विज्ञान कादंबरी मात्र फार जबरदस्त आहे. एकच नंबर.

म्हंजे आपल्या पुढे धावत जाणारी सगळीच वाहनं शेवटी सिग्नल जवळ आपल्या सोबतच असतात असं ?

जव्हेरगंज's picture

7 Feb 2017 - 6:31 pm | जव्हेरगंज

वा!!

आवडीने वाट पाहतोय!!

येऊ द्या!

खटपट्या's picture

7 Feb 2017 - 7:23 pm | खटपट्या

वाट पहातोय.

मोदक's picture

7 Feb 2017 - 8:42 pm | मोदक

+१११

प्रचेतस's picture

7 Feb 2017 - 9:02 pm | प्रचेतस

उत्तम

अनरँडम's picture

7 Feb 2017 - 9:51 pm | अनरँडम

अनुवादाबद्दल अभिनंदन. कादंबरी वाचण्यास उत्सुक आहे. तुम्ही मूळ जपानी भाषेतून अनुवाद केला आहे का? तसे असल्यास पुन्हा एकदा अभिनंदन.

कादंबरीचे मुखपृष्ठ छान आहे.

आषाढ_दर्द_गाणे's picture

8 Feb 2017 - 12:06 am | आषाढ_दर्द_गाणे

उत्सुकतेने

दीपक११७७'s picture

8 Feb 2017 - 10:53 am | दीपक११७७

उत्सुक आहे वाचायला.

चित्रगुप्त's picture

9 Feb 2017 - 4:19 am | चित्रगुप्त

अगदी अपरिचित भाषेतली कादंबरी मराठीत वाचायला मिळणार, उत्सुकतेने वाट बघत आहे.

अरे वा.. कादंबरी वाचायला उत्सुक :)

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 8:48 am | पिलीयन रायडर

ह्या धाग्यात खाली जी अनुक्रमणिका टाकली आहे त्यासाठी १००००००००० वेळा धन्यवाद!!!