तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी
झटक्यात हाय गेली लागून आणिबाणी
अडवून मीच धरले होते किती दमाने
(फ्रेश्नर घरात नाही, भरपूर ओत पाणी!)
गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा
बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी
दररोज एक काढा साइट् नवी मराठी
इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी!
प्रतिसाद हा कुणाचा आहे कुणास पत्ता?
(खोटी मिठास वाणी; खोटे छदाम, नाणी)
बोके चलाख, सोदे गुरकावले कशाला?
येता पुढ्यात माऊ गातात गोड गाणी
प्रेरणा: मी बोचलो म्हणाले
प्रतिक्रिया
6 Feb 2009 - 12:33 pm | केशवसुमार
बेसन सेठ,
एकदम जबरा.. सगळेच शेर एकसे एक..ह.ह.पु.वा..
केशवसुमार
(स्वगत: केश्या हा कच्चा माल तुझ्या नजरेतून सुटला कसा?)
6 Feb 2009 - 12:57 pm | सहज
ज ब रा
:-)
6 Feb 2009 - 1:35 pm | अवलिया
मस्त
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
6 Feb 2009 - 1:05 pm | कवटी
बेला मस्तच रे...
सगळे शेर एक से एक जमलेत....
जबरदस्त!
कवटी
6 Feb 2009 - 1:16 pm | घाटावरचे भट
खल्लास!!!
6 Feb 2009 - 2:21 pm | बिपिन कार्यकर्ते
सहमत...
बिपिन कार्यकर्ते
6 Feb 2009 - 2:06 pm | श्रावण मोडक
सर्वांशी सहमत. प्रत्येक शेर सरस.
6 Feb 2009 - 4:20 pm | बाळ्या पाल्हाळकर (not verified)
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
23 Jan 2016 - 12:00 am | जव्हेरगंज
बाळ्या पाल्हाळकर (not verified)???
हा (not verified) काय लोचा आहे?
6 Feb 2009 - 9:25 pm | llपुण्याचे पेशवेll
बेलाशेठ झक्कास. तोडले आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
6 Feb 2009 - 11:01 pm | चतुरंग
क्या बात है! ह. ह. पु. वा.!!
एकदम षटकारांची बरसातच!! जियो!!
चतुरंग
7 Feb 2009 - 8:30 am | दत्ता काळे
विडंबन खास झाले आहे.
मुळ कविता/गझलही फार छान आहे.
7 Feb 2009 - 1:10 pm | मदनबाण
गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा
बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी
मस्तचं...
मदनबाण.....
:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
8 Feb 2009 - 7:04 am | संदीप चित्रे
>> गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा
बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी
8 Feb 2009 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लगे रहो ! :)
9 Feb 2009 - 4:09 pm | विसोबा खेचर
मस्त विडंबन रे! :)
दररोज एक काढा साइट् नवी मराठी
इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी!
हा हा हा! हे मात्र खरे हो...! अहो आमच्यावर ओकार्या काढण्याकरता काही असंतुष्ट आंतरजालीय आत्मे संस्थळे आणि ब्लॉग काढतच असतात! :)
आपला,
(बर्याच जणांना न पचलेला) तात्या.
22 Jan 2016 - 9:39 pm | राघव
दंडवत स्वीकारावा __/\__
8 Aug 2020 - 1:57 am | चित्रगुप्त
साष्टांग दंडवत गुरुदेव.
प्रतिसादांमधे विसोबा खेचर आणि अन्य जुन्या जाणत्यांची नावे वाचून मिपावरचे जुने दिवस आठवले.