... असंही होतं ना कधी कधी....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
17 Sep 2016 - 10:32 am

... असंही होतं ना कधी कधी....
अंगणातलं सुखाचं बी
बहरातली पाखरांची गाणी
हरवून जातात कुठंकुठं....
पण मनाचा सर्च कायम असतो
दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार
मनातलं मांजर हसतंच कि मजेदार!

... असंही होतं ना कधी कधी....
बियांना कोंब येईपर्यंत
आपलाच नसतो पेशन्स !
दु:खाच्या माजणार्या ताणावर
आपलाच नसतो कंट्रोल!
वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो,
पण तशा वैराण रानातही
एखादे रानफुल हसून बोलतंच कि
एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि!
... असंही होतं ना कधी कधी....

आटून जातात सगळे झरे
वाटत नाही काहीच खरे
पण अभेद्य पाषाणाखालून
थंडगार झरे झुळझुळतातच कि!

स्वप्नापुस्तकात तरी कुठून येतात
प्रेमाविश्वासाच्या कहाण्या?
दिवे विझून टाकणारी वादळे
श्वासाश्वासात असतात,
पण दिव्याभोवती ओंजळ नसतेच
हे तरी खरे कुठे?
प्रेमळ असणे strongच राणी,
प्रेम न उमजण,
हा तर राजाचा विकनेस!

आपण धुमसत्या वेदनेला
संपवून टाकतोही आतल्याआत!
पण घाव बसल्या फांदीवरतीच
नवी पालवी तरारून फुटते....
.... असंही होतंच कि....

जाळून उरल्या वेदनेची
उडून जावी वार्यावरती,
इतकी हलकी राख होत नाही!

ती भस्म होऊन कणखरपणे
दोन भिवयांमध्ये विराजमान होते.
दोन निर्लेप डोळ्यांनी
भूत भविष्य पहात राहते...
सुखाच्या बियांची लालसा
धुमसत्या वेदनांची ठसठस...
सरते उरते उ र ते स र ते....
मनाच्या पाखराचा मग मस्त
Kaleidoscope होत जातो.....

- शिवकन्या

अदभूतअभय-लेखनकविता माझीकाणकोणफ्री स्टाइलमुक्त कवितासांत्वनाधोरणवावरकवितामुक्तकसाहित्यिकजीवनमान

प्रतिक्रिया

शिव कन्या's picture

17 Sep 2016 - 10:38 am | शिव कन्या

http://www.misalpav.com/node/37387 रातराणीची ही कविता वाचता वाचता, मनात ही कविता उमटत गेली...

अनुप ढेरे's picture

17 Sep 2016 - 10:44 am | अनुप ढेरे

छान आहे कविता. मांजरांचा तिटकारा असूनदेखील मनातलं मा़ंजर कल्पना आवडून गेली.

अनुप ढेरे's picture

18 Sep 2016 - 1:06 pm | अनुप ढेरे

हा हा हा __/\__

प्रभास's picture

17 Sep 2016 - 10:49 am | प्रभास

अप्रतिम... खूप सुंदर...
मनातलं मांजर तर प्रचंड आवडून गेलं...

एखादे रानफुल हसून बोलतंच कि
एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि!

पण अभेद्य पाषाणाखालून
थंडगार झरे झुळझुळतातच कि!

जबरदस्त बहर आलाय प्रतिभेला... एक नंबरच...

Jabberwocky's picture

17 Sep 2016 - 10:56 am | Jabberwocky

छान....आवडली.
खरच अस होत कधीकधी.....

रातराणी's picture

17 Sep 2016 - 12:22 pm | रातराणी

कहर!! अप्रतिम उतरलीये!!

सस्नेह's picture

17 Sep 2016 - 12:47 pm | सस्नेह

ये भी सच है...!

चाणक्य's picture

17 Sep 2016 - 1:24 pm | चाणक्य

मस्तच.

अंतरा आनंद's picture

17 Sep 2016 - 3:37 pm | अंतरा आनंद

मस्तच.

पद्मावति's picture

17 Sep 2016 - 4:06 pm | पद्मावति

सुरेख!

एक एकटा एकटाच's picture

17 Sep 2016 - 4:18 pm | एक एकटा एकटाच

सुरेख

विवेकपटाईत's picture

18 Sep 2016 - 9:32 am | विवेकपटाईत

कविता आवडली, हे वेगळे मला मांजर आवडत नाही...

पैसा's picture

18 Sep 2016 - 10:04 am | पैसा

आवडली!

बोका-ए-आझम's picture

18 Sep 2016 - 12:17 pm | बोका-ए-आझम

भारी कल्पना आहे. थोडी गुलजार style वाटली, विशेषतः सर्च सारख्या शब्दांचा वापर.

निनाव's picture

18 Sep 2016 - 5:49 pm | निनाव

वाह मस्तच!

ज्योति अळवणी's picture

18 Sep 2016 - 9:04 pm | ज्योति अळवणी

आवडली

अजया's picture

18 Sep 2016 - 9:13 pm | अजया

मस्त मस्त मस्त!

वा फारच छान ! मनातले मांजर, नि निळा पक्षी दोन्ही आवडले. बाय द वे, इकॉलॉजिकली "तण" हि प्युअरली "अँथ्रोपोसेंट्रिक" कोंसेप्ट आहे :)

शिव कन्या's picture

19 Sep 2016 - 6:51 pm | शिव कन्या

नवी माहिती कळाली. धन्स. :-)

बारीकशी नोंद....
कवितेत दुखाच्या माजणार्या 'ताणावर' असंच आहे
तणावर नाही.

अर्थ तोच निघतो.. म्हणून मला वाटलं टायपींग मिष्टेक असावी..

सामान्य वाचक's picture

19 Sep 2016 - 11:20 am | सामान्य वाचक

मांजर आणि निळा पक्षी
जाम पटला

इनिगोय's picture

19 Sep 2016 - 11:25 am | इनिगोय

हेही एकदम मस्त. Alice चं मांजर आठवलं :)

शिव कन्या's picture

19 Sep 2016 - 6:53 pm | शिव कन्या

सर्व रसिक, अभ्यासू वाचकांचे दिल से आभार.

यशोधरा's picture

20 Sep 2016 - 7:23 am | यशोधरा

आवडली.