... असंही होतं ना कधी कधी....
... असंही होतं ना कधी कधी....
अंगणातलं सुखाचं बी
बहरातली पाखरांची गाणी
हरवून जातात कुठंकुठं....
पण मनाचा सर्च कायम असतो
दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार
मनातलं मांजर हसतंच कि मजेदार!
... असंही होतं ना कधी कधी....
बियांना कोंब येईपर्यंत
आपलाच नसतो पेशन्स !
दु:खाच्या माजणार्या ताणावर
आपलाच नसतो कंट्रोल!
वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो,
पण तशा वैराण रानातही
एखादे रानफुल हसून बोलतंच कि
एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि!
... असंही होतं ना कधी कधी....
आटून जातात सगळे झरे
वाटत नाही काहीच खरे
पण अभेद्य पाषाणाखालून
थंडगार झरे झुळझुळतातच कि!
स्वप्नापुस्तकात तरी कुठून येतात
प्रेमाविश्वासाच्या कहाण्या?
दिवे विझून टाकणारी वादळे
श्वासाश्वासात असतात,
पण दिव्याभोवती ओंजळ नसतेच
हे तरी खरे कुठे?
प्रेमळ असणे strongच राणी,
प्रेम न उमजण,
हा तर राजाचा विकनेस!
आपण धुमसत्या वेदनेला
संपवून टाकतोही आतल्याआत!
पण घाव बसल्या फांदीवरतीच
नवी पालवी तरारून फुटते....
.... असंही होतंच कि....
जाळून उरल्या वेदनेची
उडून जावी वार्यावरती,
इतकी हलकी राख होत नाही!
ती भस्म होऊन कणखरपणे
दोन भिवयांमध्ये विराजमान होते.
दोन निर्लेप डोळ्यांनी
भूत भविष्य पहात राहते...
सुखाच्या बियांची लालसा
धुमसत्या वेदनांची ठसठस...
सरते उरते उ र ते स र ते....
मनाच्या पाखराचा मग मस्त
Kaleidoscope होत जातो.....
- शिवकन्या
वाचने
13656
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
http://www.misalpav.com/node
छान आहे कविता. मांजरांचा
In reply to छान आहे कविता. मांजरांचा by अनुप ढेरे
आता कळलं तुम्ही माझ्या मतांचा विरोध का करता ते ;)
In reply to आता कळलं तुम्ही माझ्या मतांचा विरोध का करता ते ;) by बोका-ए-आझम
:)
अप्रतिम... खूप सुंदर...
एखादे रानफुल हसून बोलतंच कि
छान....आवडली.
कहर!! अप्रतिम उतरलीये!!
जबरी जवाब !
ज्जे बात
मस्तच.
सुरेख!
सुरेख
कविता आवडली, हे वेगळे मला
कविता सुंदर!
मनातलं मांजर!
वाह मस्तच!
आवडली
मस्त मस्त मस्त!
वा फारच छान ! मनातले मांजर,
In reply to वा फारच छान ! मनातले मांजर, by पथिक
नवी माहिती कळाली. धन्स. :-)
In reply to नवी माहिती कळाली. धन्स. :-) by शिव कन्या
अर्थ तोच निघतो.. म्हणून मला
भन्नाट उतरली आहे
हेही एकदम मस्त. Alice चं
सर्व रसिक, अभ्यासू वाचकांचे
आवडली.