सारंगा : माझ्या पहिल्या प्रेमाची अजब-गजब कहाणी

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
10 Jun 2016 - 7:11 pm

.
... शबाब आप का नशे मे खुद ही चूर चूर है … मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है...
(लहानपणीच आमची ताटातूट झाल्यानंतर खूप वर्षांनी मी आपल्या गावी गेलो, तेंव्हा नदीवर माझी वाट बघत, आपल्याच विचारात गुंग सारंगा)
*****************************************************
सारंगाला मी शेवटल्यांदा बघितलं, तेंव्हा ती माझ्या नावाचं कुंकू लावून, मीलनोत्सुक नजरेनं माझ्याकडे बघत तिच्या झोपडीच्या दारात उभी होती
.
... पण हाय, दुसऱ्याच क्षणी तो अकल्पित प्रसंग घडून आला, आणि तिनं मला दिलेला ताईत ऱ्हदयाशी धरून अश्रू ढाळत गेली चाळीस वर्षं रोज हे गाणं ऐकत जगणं माझ्या नशिबी आलं :

सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन
मधुर तुम्हारे मिलन बिना, दिन कटते नहीं रैन ...
... संग तुम्हारे दो घड़ी, बीत गये जो पल
जल भरके मेरे नैन में, आज हुए ओझल
सुख लेके दुःख दे गयीं ... दो अखियाँ चंचल...

पण माझा हा दीर्घ विरह आता संपत आलेला आहे, आणि तिच्या मीलनासाठी महाप्रयाण करण्यापूर्वी माझ्या पहिल्या अन शेवटल्या प्रेमाची ही अजब कहाणी मी तुम्हाला सांगून जात आहे ...
**********************************************************************************

सारंगाला मी अगदी पहिल्यांदा बघितलं, तेंव्हा ती सात-आठ वर्षांची, तर मी बारा - तेराचा असेन.
.

माझे वडील गावातले नामांकित वैद्य होते. अधून मधून ते मला म्हणायचे "रे बाबू, जातोस का मांत्रिकाकडे आज औषधं आणायला ? ” मी तर अगदी एका पायावर तयार असायचो. कारण मग त्या दिवशी शाळेची सुट्टी, सारंगासोबत दिवसभर खेळणं, आणि उनाडक्या करत नदीकाठी हिंडणं ...

सारंगा गावाबाहेर नदीकाठी लमाणांच्या वस्तीत रहायची. तिथले ते सुरमा घालणारे, तांबारलेल्या लाल उग्र डोळ्यांचे रांगडे मरद आणि रंगीबेरंगी कळीदार घागरे, तट्ट- उठावदार काचोळ्या घालणाऱ्या त्यांच्या घट्ट्मुट्ट लुगाया, यांच्या बद्दल मला खूप आकर्षण, कुतूहल आणि थोडीशी भिती पण वाटायची
.

सारंगाचा बाप तिथला मांत्रिक आणि वैदू होता. बघणाऱ्याच्या उरात धडकीच भरेल असं रूप, पण आतून खूप प्रेमळ. वडिलांची चिठ्ठी घेऊन मी गेलो, की ती वाचत म्हणायचा “वैदसाब बी क्या क्या दवा मंगाते ... चार-पाच कलाक लगेंगे दवा बनाने मे... सारंगा बेटी, तू इसको शहद-पानी पिला, फिर तुम लोग जाव खेलने कूदने. शामतक वापस आ जाना”.

मग मी अन सारंगा नदीकाठी दूर दूर फिरायला जायचो. मधूनच नदीत डुंबायचो, झाडावर चढून कैऱ्या, जांभळं तोडायचो, तर कधी मला मामानं शहरातून आणून दिलेल्या लहानश्या ट्रान्झिस्टरवर हिंदी सिनेमाची गाणी ऐकत, नदीतल्या खडकांवर उन्हात लोळत पडायचो…
आम्हाला एकमेकांचा सहवास खूप म्हणजे खूपच आवडायचा. सारंगा म्हणायची - "ए बाबू, बडा होके तू मेरा मरद बनेगा ना रे ?" मला फ़ारसं काही कळायचं नाही, तरी मी हसून मान डोलवायचो.

पुढे अचानक एका अपघातात माझे आई-वडील दगावले, आणि मला शहरात मामाकडे जाऊन रहावे लागले. जाण्यापूर्वी मी सारंगाला शेवटचं भेटायला गेलो, तेंव्हा ती खूप रडली. मी तिला माझी आठवण म्हणून तो ट्रान्झिस्टर दिला, तिनं रडत रडत आपल्या गळ्यातला ताईत काढून माझ्या गळ्यात घातला अन म्हणाली, बाबू, मेरे को भूलेगा तो नै न रे शहर मे जाके ? मै तेरी राह देखूंगी. कसमसे.
... मात्र एकदा शहरात गेल्यावर पुन्हा गावी जाणं कधीच झालं नाही, आणि सारंगाशी भेट पण झाली नाही. शहरातलं आमचं आर्टस्कूल, मोठी लायब्ररी, म्यूझियम, नवे मित्र यात मी लवकरच रमलो.
... आणि सर्वात कहर म्हणजे हिंदी सिनेमे. त्यातल्या मधुबाला, सुरैय्या, शकीला, वैजयंतीमाला, वहिदा, मीनाकुमारी, शर्मिला, साधना वगैरे नायिका ...
.
.

आणि त्यातली अहोरात्र कानावर पडणारी गाणी…
... ओपी नय्यर, सचिन देव बर्मन, सज्जाद हुसेन, स्नेहल भाटकर, शंकर-जयकिशन, नौशाद, कल्याणजी आनंदजी, हेमंत कुमार, मदन मोहन, सलील चौधरी, गीता दत्त, आशा, लता, शमशाद, मुबारक, रफी, किशोर, मुकेश ... मी अगदी वेडावून जायचो. कोणत्याही प्रसंगी, कोणतंही दृश्य बघून किंवा कोणताही शब्द ऐकून मला त्यावरून एका मागोमाग एक गाणी आठवत जायची ... वेळी-अवेळी, नको तिथे, नको तेंव्हा डोक्यात त्या गाण्यांचं मोहोळ उठायचं ... मित्र म्हणायचे, हा नाद सोड बे साल्या, नाहीतर तुला भर्तीच करावं लागेल, मेंटल मध्ये.

शहरात मी जसजसा रमत गेलो, तसतशा हळुहळू जुन्या गावाकडया आठवणी धूसर होऊ लागल्या, मात्र सांरंगाचा ताईत मी गळ्यातून कधीच काढला नाही. “सारंगा तेरी यादमे” .. “बचपन की मोहोबत को, दिल से ना जुदा करना
.. “कोई लौटादे मेरे बिते हुए दिन”.. वगैरे गाणी ऐकताना डोळे ओलावायचे.

माझी चित्रकलेची पाचव्या वर्षांची शेवटली परिक्षा संपली, त्याच दिवशी अचानक गावाकडला एक मित्र भेटला. त्यानं सांगितलं की सारंगाचा बाप वारला... ती आता तिच्या म्हाताऱ्या आजीबरोबर नदीकाठच्या टेकडीवर एका झोपडीत रहाते, आणि आजीला चेटकीण ठरवून गाववाल्यांनी दोघींना वाळीत टाकलेलं आहे...
हे सगळं ऐकून मी अगदी सुन्न झालो. कसे चालले असेल त्यांचे आता ? काय करत असेल, आणि कशी दिसत असेल आता सारंगा ?
मग वेळ न दवडता मी लगेच गावी जायला निघालो …
वाटेत लहानपणापासून बघितलेली दृश्यं दिसू लागली, आणि मन उल्हसित झालं.
.
.......

नदीकाठी टेकडीवर एक लहानशी झोपडी दुरूनच दिसली. मी उत्सुकतेनं टेकडी चढून गेलो. सारंगाची आजी उन्हात खाटल्यावर बसली होती. मला बघताच ती हसून म्हणाली - “आ गया मी बच्चा ? मुझे मालूमैच था तुम आज आओगे करके. जा, नदीपर छोरी तेरी राह देखती कब से. ”

नदीवर गेलो. लांबून नदीतल्या खडकावर विसावलेली एक आकृती दिसत होती. सारंगाच असेल का ती ? जवळ जातो, तो माझी नजर अगदी खिळूनच राहिली. सारंगाच होती ती, आपल्याच तंद्रीत हरवलेली ... किती विलक्षण सुंदर दिसू लागली होती आता ... अद्भुत, अवर्णनीय, अद्वितीय लावण्यवती ...
.

लगेच मनात गाण्यांची महफ़िल सुरू झाली…
... आपके हसीन रुख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कुसूर है ...
... चौदहवी का चांद हो, या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो...

माझी चाहूल लागून तिची तंद्री भंगली, आणि तिनं माझ्याकडे नजर वळवली... बापरे, काय तिचे ते डोळे...
... नैना है जादू भरे, ओ गोरी तोरे नैना है जादू भरे ...

लगबगीनं उठून धावत येऊन ती म्हणाली, “कित्ती देर लगा दी तूने, मै बरसोंसे तेरा इंतजार कर रही थी बाबू…
मग आम्ही हातात हात घालून बालपणीच्या आठवणींची उजळणी करत कितीतरी वेळ फिरत राहिलो ... हळूहळू संध्याकाळ गहिरी होत होत रात्र अवतरत चालली... हलकिशी पावसाची सर वातावरण आणखीनच मदहोश करून गेली.

...ये राते, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा …

मधेच माझा हात सोडून सारंगा अवखळपणे ठुमकत पुढे निघाली...
... मतवाली नार ठुमक ठुमक चली जाय, इन कदमोंपे किसी का जिया ना ललचाय…
... ठुमक-ठुमक मत चलो ..किसी का दिल तड़पेगा...

या गाण्यांच्या नादात मी इतका हरवलो, की मला सर्व गोष्टींचा विसर पडला… चांदनी रात .. रंगीन समा.. साहिल..कश्ती.. हुस्न.. इश्क..मोहोब्बत.. जुल्फ़ोंकी घटा.. खुले गेसू.. बेकसी..बेकरारी.. मदहोशी..इंतजार.. शोख नजर.. दिल का तडपना.. उल्फत.. किस्मत.. बेचैनी.. मोहतरमा.. शोख नजर की बिजलियां... डोकं अगदी भणभणू लागलं, आणि मी भोवळ येऊन खाली पडणार, तेवढ्यात सारंगानं मला सावरलं. “क्या हो गया बाबू, अंधेरे से डर गये क्या ?”
मी म्हणालो, “नही सारंगा, इन पिच्चरों के गानों ने मुझे दीवाना बना डाला है .. दीवानोंसे ये मत पूछो, दीवानोंपे क्या गुजरी है ... दीवाना मुझ सा नही, इस अंबर के नीचे .. मै तो दीवाना दीवाना दीवाना …

और मुझे भी दिवाना बनाया है तूने, मेरे सनम
... मै पिया तेरी, तू माने या ना माने …

बाबू देख, मै तेरे नामसे माथेपे हमेशा सिंदूर लगाती... अब हम कभी जुदा नही होंगे.
.. नही होंगे जुदा, हम तुम… है मैने कसम ली …

सारंगा, तुझे ये सब गाने कैसे मालूम ? मी आश्चर्याने विचारले.
"अरे तू वो छोटा रेडू दे गया था नं, वो मै रोज सुंती ... तुम्हे याद करते करते"

"बाबू, तेरा मेरा साथ तो जनम जनम का है. मेरी दादीने मुझे जादूटोना सिखाया है, अब मै तुझे हमारे पिछले जन्मोंकी सैर कराती हूं, चल ." असं म्हणून सारंगानं हवेतून हात फिरवला, आणि तिच्या हातात एक खंजीर आला. तो खंजीर समोर धरून ती म्हणाली, “अब मेरी आंखोमे आंखे डालकर देख बाबू”
.

मी तसं करताच सभोवतलचं दृश्य वितळू लागलं, आणि क्षणार्धात आम्ही एका अगदी वेगळ्याच दुनियेत पहुचलो.

..आम्ही दोघं आता एका भव्य महालात होतो. माझ्या डोक्यावर मंदिल, अंगात झगझगीत अंगरखा, रत्ना-मोत्यांचे दागिने, कमरेला समशेर ... आणि सुंदर वेषात सजलेली सारंगा आरशात बघत होती..
.
हे बघून मी म्हणालो:
देखती ही राहो आज दर्पण ना तुम.. प्यार का ये महूरत निकल जाएगा
मुस्कुराओ न ऐसे चुराकर नजर, आईना देख सूरत मचल जाएगा...

आणखी एका जन्मात मी एक अजेय योद्धा आणि सारंगा एक राजकन्या होती.
.
आणि ती म्हणत होती:
..हाथ आया है जबसे तेरा हाथ में
आ गया है नया रंग जज़बात में
मैं कहाँ हूँ मुझे ये खबर ही नही
तेरे कदमों पे ही गिर न जाऊँ कहीं ..

गाणी म्हणतच आम्ही महालातल्या एका सुंदर मंचकावर विराजमान झालो. मी टाळी वाजवताच मधुर संगीत सुरु होऊन दोन सुंदर नर्तकी नृत्य करू लागल्या:

..हुजुरेवाला, जो हो इजाजत, तो हम ये सारे जहांसे कहदे … तुम्हारी निगाहोंपे मरते है हम, ये किसने कहा है के डरते है हम..

मंचकावरील लोडाला ऐटीने रेलत मी म्हणालो, “इजाजत है"
..तेवढ्यात काडकन दरवाजा मोडून आपल्या सहा हातात मोठमोठी शस्त्रे धारण केलेला एक भयंकर दैत्य आत शिरला आणि कडाडला “ कमीने, मेरे महल मी घुसनेकी जुर्रत तूने कैसे की ? मै तेरी बोटी बोटी करके कुत्तोंको खिला दूंगा..
.
पण प्रसंगावधान राखून मी न डगमगता माझी समशेर उपासली, आणि त्या दुष्टाची खांडोळी करून त्याच्या सर्व सैनिकांना यमसदनी पाठवले.

.
मग आम्ही आकाशमार्गे खूप दूर-दूरच्या च्या प्रदेशात गेलो... आमचे अनेक पूर्वजन्म बघितले, मग आम्ही पुन्हा या जन्मातल्या सारंगाच्या घरी परतलो.

तेवढ्यात अचानक सोसाट्याचा वारा सुटला, आकाशात विजा चमकू लागल्या, आणि ढगांचा प्रचंड गडगडाट व्हावा,तसा आवाज आला: “सारंगा, तूने मेरे भाई को मरावाया है इसका बदला लेने मै आया हूं... देख तेरी ये बुढियाका हश्र अब क्या होता है ..
असा आवाज येतो न येतो तोच सारंगाच्या आजीच्या जागी एक लहानशी कोंबडी दिसू लागली, आणि ती भेदरून इकडेतिकडे धावू लागली. आकाशातून हसण्याचा प्रचंड गडगडाट ऐकू आला, आणि आगीच्या लोळातून एक महाभयंकर दैत्य प्रकटला.
.
“अब मी तेरे इस दिवाने को कुत्ता बनाऊंगा और फिर तुझे मै कच्चाही खा जाऊंगा…

“बाबू, अब जल्दीसे यहांसे भाग जा.…ये तेरा कुछ नही बिगाड सकता जब तक तूने मेरा ताबीज पहन रखा होगा… अब मै जाती हू, हमारे इस दुश्मन को खतम करने के बाद मै फिर तुम्हे इसी जगह मिलूंगी, चाहे इसमे कितनेही जनम लाग जाए.. तबतक मेरा इंतजार करना. ये ताबीज जब बिलकुल काला पड जाए, तो समझाना अपने मीलनकी घडी आ गयी” .. असे म्हणता म्हणता सारंगा आगीची एक ज्वाला बनत उंच आकाशात विलीन झाली. तो भयंकर दैत्यही अदृष्य झाला. माझी तर बोबडीच वळली होती, कसेबसे स्वत:ला सावरत मोठ्या मुश्किलीने मी आपल्या घरी पहुचलो..

या घटनेला आता चाळीसेक वर्षे झाली असतील. मी रोज अश्रू ढाळत, सारंगाचे गाणे म्हणत गळ्यातल्या ताईताकडे बघत असतो. या चाळीस वर्षात मी काय काय केले, कसा जगलो, हे सांगण्यात मला काडीचेही स्वारस्थ्य नाही.

... पण गेल्या काही दिवसांपासून माझ्या गळ्यातला तो ताईत हळू हळू काळा पडत चालला आहे, आणि एक-दोन दिवसातच तो पूर्णपणे काळा होईल. माझी प्रतिक्षा आता संपत आली, मी आता तातडीने सारंगाने भेटण्याचे वचन दिलेल्या जागी जाणार. पुढे काय होईल हे ठाऊक नाही, पण माझी सारंगा मला नक्की भेटेल.
(समाप्त)

संस्कृतीकलासंगीतवाङ्मयकथाप्रेमकाव्यप्रवासमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

10 Jun 2016 - 7:22 pm | विवेकपटाईत

क्या बात है. एखादा सिनेमा बनवायला हरकत नाही.

एव्हरग्रीन चित्रगुप्त यांचा
हिरवट लेख आवडला.

प्रचेतस's picture

10 Jun 2016 - 8:01 pm | प्रचेतस

जबराट.
भारी लिहिलंय.

काका, तुमच्याकडून संग्रहालयांवरील लेखाची वाट बघतोय. लवकर लिहा.

हे सांगायच राहुन गेल होत
यासाठी धन्यवाद !!!!!!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2016 - 8:30 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं !

एखाद्या बॉलिवुडपटाची कहाणी बनू शकेल असा प्रवास आहे हा.

नमकिन's picture

11 Jun 2016 - 5:13 pm | नमकिन

एखादी अॅनिमेशन फिल्म नक्कीच करता येईल.
पण आता ६० व्या वर्षी काय करेल हिरो?

चित्रगुप्त's picture

4 Sep 2016 - 7:52 pm | चित्रगुप्त

पण आता ६० व्या वर्षी काय करेल हिरो?

तो तिथे जाईल तेंव्हाच कळेल त्याला. आणि ती सारंगा आहे ना जादूगरीण. करेल काहीतरी जुगाड.
पुढला भाग लिहू का ?

बोका-ए-आझम's picture

4 Sep 2016 - 8:00 pm | बोका-ए-आझम

लुटेरा मधल्या सोनाक्षी सिन्हासारखी दिसते थोडीफार.

जव्हेरगंज's picture

6 Sep 2016 - 9:20 pm | जव्हेरगंज

हे काय आहे?

जबरी.. तो खंजीर धरलेला फोटो भारी आहे.

ती अनुश्का शेट्टी आहे अरुंधती या तेलुगु चित्रपटातील. पिक्चर मस्तय एकदम.

तिमा's picture

7 Sep 2016 - 6:49 pm | तिमा

कहाणी अत्यंत आकर्षक आणि नेत्रसुखद झाली आहे. तुमच्या पाठोपाठ वर येऊन पुढे काय होते, ते बघण्याची तीव्र इच्छा आहे. तेंव्हा दुसरा भाग लिहा पाहू लवकर.

नीलमोहर's picture

7 Sep 2016 - 6:56 pm | नीलमोहर

एक नंबर..

च्या मारी चित्रगुप्तकाकांकडे ष्टुरी लिहिण्याची भन्नाट हातोटी आहे खरी. एक नंबर मस्त कथा! आवडलीच.

चौकटराजा's picture

8 Sep 2016 - 9:49 am | चौकटराजा

सुंदर चित्रे व ओघवती कथा व पूरक गाणी ! वा! त्रिवेणी संगम ! अभ्या, स्पा व आता चित्रगुप्त यांचं नक्की काय बलस्थान आहे चित्र,साहित्य की संगीत काय कळत नाही राव ! मिष्टानाचा कोट पुढे आल्यावर जसे हात स्तंभित होतात व मन स्तिमित होते तसं काहीसं झालंय !

संदीप डांगे's picture

18 Sep 2016 - 11:18 pm | संदीप डांगे

+१०००

पहिला फोटो सर्वात आवडत्या फोटोंपैकी एक आहे. =))

इरसाल's picture

8 Sep 2016 - 9:53 am | इरसाल

लिहाच लवकर पुढचा भाग.
चित्रांचे सिलेक्शन करुन कथा लिहायची हातोटी जबरदस्त आहे.

Vishvnath Shelar's picture

18 Sep 2016 - 3:12 pm | Vishvnath Shelar

Mee hi katha eka junya diwali ank made vachleli ahe ase mala aathavate ahe....

चित्रगुप्त's picture

14 Oct 2022 - 7:44 pm | चित्रगुप्त

बरेच काळानंतर आज मिपावर आलो आणि ही कथा आठवली. नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा वर आणतो आहे.

विजुभाऊ's picture

17 Oct 2022 - 10:12 pm | विजुभाऊ

सुंदर.
चित्रगुप्त बरे झाले कथा वर आणली.
एक खूप छान चित्रकथा वाचायला मिळाली

श्वेता व्यास's picture

18 Oct 2022 - 9:59 am | श्वेता व्यास

मस्त चित्रकथा, खूप आवडली. VFX चित्रपट सहज बनू शकतो यावर.

श्वेता२४'s picture

18 Oct 2022 - 10:55 am | श्वेता२४

आवडलि

श्वेता२४'s picture

18 Oct 2022 - 10:55 am | श्वेता२४

आवडलि

श्वेता२४'s picture

18 Oct 2022 - 10:56 am | श्वेता२४

आवडलि

कर्नलतपस्वी's picture

18 Oct 2022 - 2:06 pm | कर्नलतपस्वी

मस्तच गुफंले आहे.