मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
3 Jul 2016 - 11:42 pm

दिलखेचक! रापचिक! धमाल!
हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा!
सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला.
Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली.
मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला.
मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला.
फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती!
शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो -
जे कट्ट्याला आले त्यांना सलाम!
जे नाही आले त्यांनाही सलाम!
जे वेळ काढून आले त्यांना सलाम!
जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम!
लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम!
या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम!
आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!

हे ठिकाणवावरसमाजराहणीमौजमजाप्रकटनविचारबातमीअनुभव

प्रतिक्रिया

स्वप्नांची राणी's picture

11 Jul 2016 - 2:04 pm | स्वप्नांची राणी

अय्या...टका ..?? म्हणजे टका खराच आहे...????

वाशी कट्ट्यावरचा फोटो बघाकी...

किसन शिंदे's picture

4 Jul 2016 - 12:41 pm | किसन शिंदे

गप्पा सुरू दिसताहेत..

बहुतेक सगळेच जमलेले आहेत आणि हॉटेलच्या एका अवाढव्य कोपर्‍यात अस्ताव्यस्तपणे पसरून घोळक्याने गप्पा मारत आहेत, ओळख करून घेताहेत. काऊन्टरवरचा कॅशियर, हॉटेलचा मॅनेजर, काही वेटर्स आणि इतर टेबलावरील लोकांच्या चेहर्‍यावर या घोळक्याकडे पाहून 'काय उच्छाद मांडलाय' अशी त्रासिक भावना स्पष्ट दिसतेय. =))

"सर..सर, प्लीज बसून घ्या इथे!"
सुटाबूटातला मॅनेजर एका टेबलाच्या चेअर मागे पुढे सरकवत त्या मोठ्ठ्याने गोंधळ घालणार्‍या लोकांना ऑर्डरवजा विनवणी करतोय आणि ही धटिंग लोकं त्याच्या या विनवणीला सायन-पनवेल हायवेच्या फाट्यावर मारताहेत. इथे मॅनेजरचा चेहरा कडू एरंडेल तेल आणि अभयारीष्ट एकत्रच प्यायल्यासारखा.

गप्पा सुरूच...

"क्या लोग है यार. सुनतेही नही कुछ बोला तो और ऑर्डरभी देते नही." आता एक वेटर दुसर्‍या वेटरशी कुजबुजतोय. मग नंतर ते दोघे आणि एक तिसरा असे तिघेही मॅनेजरपाशी जाऊन कुजबुजतात.

"एक काम करो. इनमेंसे कोई एक डिसेंट (?) आदमीको पकडके उसके मुंहसे पयले ऑर्डर उगलवावो." =)) चौघांची व्युहरचना तयार होतेय. वाढत्या गोंधळामुळे यांना एकही माणूस डिसेंट वाटत नाही याला मिपाकरांचे दुर्दैव म्हणावे कि सुदैव? =))

गप्पा सुरूच...

मधूनच इतकी शांतता कशीये म्हणून हॉटेलमधल्या इतरांनी भुवया उंचावून या कोपर्‍याकडे पाह्यलं तर ही सगळी गोंधळ घालणारी लोकं अर्धवर्तुळाकार उभीयेत. गोंधळ घालणार्‍या कौरवांचा हा अर्धवर्तूळाकार चक्रव्युव्ह अभिमन्यू होऊन कोण भेदणार या विवंचनेत उभे राहीलेली मॅनेजर आणि इतर मंडळी. एकेकाचा परिचय होतोय.

लोकं परिचय देताहेत तरीही गप्पा सुरूच...

"मिळाली ब्वॉ कशीबशी ऑर्डर, त्या काकांना धन्यवाद द्यायला हवेयंत" मॅनेजरचा सुटकेचा निश्वास!!

"दिलेली ऑर्डर पटापट बनवून सर्व्ह करा रे म्हणजे हा जेवताना निदान आवाज तरी नाही करणार. नाहीतर अजून थोड्या वेळात प्रत्येक टेबलावर जेवणासोबत एक पॅरासेटमॉल द्यावी लागेल." लढाई सुरू करण्याच्या आदेशाबरोबर मॅनेजरचा केविलवाणा आशावाद !!! =))

यथावकाश सगळी लोकं जेवायला बसलीयेत आणि तरीही....

गप्पा सुरूच...

क्रमशः

माझीही शॅम्पेन's picture

4 Jul 2016 - 1:15 pm | माझीही शॅम्पेन

एक नम्बर किसन राव :)

इरसाल's picture

4 Jul 2016 - 12:45 pm | इरसाल

लैच भारी मजा केलेली दिसत आहे.
सगळ्यात वरुन पाचवा फोटो बराच "भारदस्त" दिसत आहे.

मृत्युन्जय's picture

4 Jul 2016 - 1:14 pm | मृत्युन्जय

कट्टा भन्नाट झालेला दिसतोय. पुढच्या कट्ट्याला शुभेच्छा.

इतका दणकून कट्टा झाला आणि इतकुशेच प्रतिसाद? लिहा की अजून!!

इतका दणकून कट्टा झाला आणि इतकुशेच प्रतिसाद? लिहा की अजून!!

कैलासवासी's picture

4 Jul 2016 - 2:06 pm | कैलासवासी

लय भारि...!! लाल सलाम

विपा's picture

4 Jul 2016 - 2:28 pm | विपा

बोका, अजया, टका, यापैकी कोणाशीहि ओळख नसतांना त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून सुचवलेले ठिकाण निश्चित केले व इतर मिपाकरांनीही त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.

पावसाळी अधिवेशनासाठी राजधानी म्हणून वाशी घोषित करावी असा ठराव मांडतो.
( हिवाळी अधिवेशनासाठी पुणे आहेच पण ते पिंपरीचिंचवड होण्याचा योग दिसतोय.)

सतिश गावडे's picture

4 Jul 2016 - 4:34 pm | सतिश गावडे

आम्ही अधूनमधून चुकचुकत होतो की रेस्टोरंटचा स्टाफ ज्या पद्धतीने कुजबुज करतोय त्यावरुन हे लोक विपा काकाना सुनावणार काहीतरी आपण सारे गेल्यावर.

नूतन सावंत's picture

4 Jul 2016 - 5:52 pm | नूतन सावंत

तुमची तक्रार केलीय त्या मॅनेजारने*विंक*

अरे वा कट्टा दणक्यात झालेला दिसतोय.

विशाखा राऊत's picture

4 Jul 2016 - 3:00 pm | विशाखा राऊत

भारी भारी भारी महाकट्टा... खुप दिवसांनी सगळ्यांना एकत्र बघितले.. मज्जा केली असेलच

सुबोध खरे's picture

4 Jul 2016 - 3:17 pm | सुबोध खरे

कट्टा आणि खादाडी
पदार्थ कुणी आणले या फंदात न पडता मी खात होतो यात आप्पे सुरळीच्या वड्या बाकरवड्या चिकन टिक्का पनीर मांचुरियन मनचाव सूप नवरतन कुर्मा व्हेज कढई पंजाबी रोटी दाल तडका आणि जीरा राईस आसा भक्कम मेनू होता.शेवटी मलई कुल्फीने उपासाचं पारणं फेडलं.आम्ही काही बारीक मंडळीनी चिकन टिक्का आणि कुलफी दोनदा घेतली.
म्हटलं होउ द्या खर्च
मिपा आहे बर्प आपलं घरचं

धनंजय माने's picture

4 Jul 2016 - 3:20 pm | धनंजय माने

बर्प
(हा/ही तृप्तीचा/ची ढेकर काय?)

हेमन्त वाघे's picture

4 Jul 2016 - 3:26 pm | हेमन्त वाघे

प्रथम बोका भाऊ चे संकल्पनेबद्दल आणि पाटील भाऊचे आयोजनाबद्दल आभार . NMMC हि जबरदस्त जागा होती , आणि फक्त खास सदस्यांबद्दल असलेल्या क्लब चा आम्ही चांगलाच (गैर ) फायदा घेतला !

आणि हा आता माझा दृष्टीकोण – मला खरेच इतकी धमाल येईल असे वाटले नाही . मी विचार केला होता कि जर कंटाळवाणा प्रकार असेल , फक्त आधीच ओळख असलेले लोक बोलत असतील , किंवा काही गंभीर चर्चा असेल ( आधुनिक मराठी साहित्याचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृस्ठीकोनातून विचार किंवा समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानातेकडे जाताना असल्या कलाविहीन कादंबर्या प्रतीविरोधी ठरतील का ?) वगैरे तर “कलटी “ मारून सतकायचे असे स्वताशीच ठरले होते .

पण गेल्यानन्तर १५ मिनिटात हे मी विसरलो आणि शेवटपर्यंत थांबलो . अनेक जणांशी विविध विषयांवर चर्चा केली , गप्पा मारल्या आणि खरेच धमाल आली !

गेल्या १०-१२ वर्षात एकटेपणा वाढला होता .... अनेकदा समारंभात जाऊन कोणाशीही फारसे न बोलता निघून येण्याची वृत्ती वाढली होती . आपण बरे कि आपले काम बरे . त्यामुळे मी खरोखरच विचार करीत होतो कि जावे कि न जावे .. पण या महा कट्ट्याने सर्व संशय खोटे ठरवले !

तसेच मी गेल्या वर्षी एका प्रसिध्ध आणि जुन्या संस्थलाच्या पावसाळी सहलीला गेलो होतो ; त्याची तुलना करावीशी वाटते . त्या “पावसाळी सहलीत “ जणू मी कोरडाच गेलो आणि कोरडाच आलो. तेथे अनेक जुने सदस्य आपापल्या तच गप्पा मारण्यात व्यग्र होते . ती सहल खरेच उत्तमपणे आयोजित केली होती पण मलाच तिकडे कंटाळा आला. न कोणी माझा फोने घेतला न मी कोणाचा .. आणि या सहलीनंतर न कोणी माझ्याशी संपर्क केला न मी कोणाशी .( नन्तर मला त्या संस्थळ वरून काढून टाकण्यात आले ;) दुसर्या कारणाने !)

मिपा कट्ट्याचे माझ्या दृष्टी ने हेच यश आहे कि मी पुढच्या कट्ट्याची आतुरतेने वाट बघत आहे .

तर केंव्हा करायचा कट्टा ??

कविता१९७८'s picture

4 Jul 2016 - 3:42 pm | कविता१९७८

( आधुनिक मराठी साहित्याचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृस्ठीकोनातून विचार किंवा समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानातेकडे जाताना असल्या कलाविहीन कादंबर्या प्रतीविरोधी ठरतील का ?)

असल्या विषयांवर चर्चा असती तर मी मिपा कट्ट्यांना कायमचं बाय बाय केलं असतं.

मुक्त विहारि's picture

4 Jul 2016 - 3:46 pm | मुक्त विहारि

तुम्ही म्हणाल तेंव्हा

आणि

तुम्ही ठरवाल त्या जागेवर.

पण कट्टा करायचा असेल तर दसर्‍याआधी केल्यास, मला जमू शकेल.

दसर्‍यानंतर फक्त शेती एके शेती.

अनिरुद्ध प्रभू's picture

4 Jul 2016 - 3:48 pm | अनिरुद्ध प्रभू

रच्याकाने मुवी रत्नागिरी कट्ट्याचा व्रुतांत कधी टंकताय?.....

मुक्त विहारि's picture

4 Jul 2016 - 5:25 pm | मुक्त विहारि

ही ह्या लिंक.

http://misalpav.com/node/36566

काही गंभीर चर्चा असेल ( आधुनिक मराठी साहित्याचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृस्ठीकोनातून विचार किंवा समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानातेकडे जाताना असल्या कलाविहीन कादंबर्या प्रतीविरोधी ठरतील का ?)

स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानता? बापरे. हे वाचूनच घाबरायला झाले :) . कट्ट्याला असले विषय पूर्ण वर्ज्य असतात :)

तर केंव्हा करायचा कट्टा ??

मोठे कट्टे तर जेव्हा होतील तेव्हा होतीलच. पण आपण नवी मुंबईकर मिनी कट्टे करूच.

हेमन्त वाघे's picture

4 Jul 2016 - 5:12 pm | हेमन्त वाघे

वरील विधाने आणि शब्द मूळचे पु . ला. चे आहेत ( खोगीर भरती - लेख - नाटक कसे बसवतात ) हे नम्रपणे नमूद करू इच्छितो !

काय म्हणता?

नीलमोहर's picture

4 Jul 2016 - 4:19 pm | नीलमोहर

' सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम!
आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!'

- याशिवाय आपल्या मिपा मालकांना जोरदार सलाम !!

टकाला कोणी फटके दिलेले दिसले नाही, त्यामुळे बाकरवडी, आंबाबर्फी कॅन्सल.

धनंजय माने's picture

4 Jul 2016 - 4:40 pm | धनंजय माने

टक्या ला फटके दिल्यास आंबाबर्फि बाकरवड़ी का....
चला, सुपारी उचलली आहे. (टक्या तुला व्यनि करतो रे ;) )

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 5:02 pm | टवाळ कार्टा

तू येच चायला....आम्च्या मागे मिपावर्चे एक भारदस्त व्यक्तिमत्व आणि तमाम अनाहिता ग्यांग आहे
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ

धनंजय माने's picture

4 Jul 2016 - 5:16 pm | धनंजय माने

हे आकाशातल्या बापा, या अजाण बालकास क्षमा कर. हा कुणाच्या जीवावर काय बोलतोय याचं याला समजत नाहीये.
(च्यायला टक्या, नीमो ला पाहिजेत फटके दिलेले फोटो, ते आपण सहज मॅनेज करु. नंतर आम्बा बर्फी आणि बाकरवडी ३०-७० ला शेयर करुन घेऊ की! ३० तुझे ७० माझे.)

पण तुमच्यासाठीही सेम ऑफर ठेवता येईल, फटक्यांऐवजी डंडे हा बदल करून आणि भेट म्हणून
काका हलवाईंची रसमलाई अ‍ॅड करता येईल.
काय म्हणता ?

(तुम्ही फोटो मॅनेज करण्याआधी मीच केलेला आहे, आता उद्या जाऊन चितळेंचे गुलाबजाम आणणे आले, धन्यवाद :)

धनंजय माने's picture

4 Jul 2016 - 8:30 pm | धनंजय माने

भलाई का ज़माना ही नहीं रहा!
मेरकु काय को डंडे होना यारो??? भाई बोलके सलाम करे तो भी मेरेकुच मारते? माँ की किरकिरी!

नीलमोहर's picture

4 Jul 2016 - 8:41 pm | नीलमोहर

भाई म्हणता म्हणून डंडे, बहन म्हणा बरं,
नाही कुठल्याही देशाच्या कुठल्याही कोपर्‍यात राखी कुरियर केली तर सांगा :)

धनंजय माने's picture

4 Jul 2016 - 9:13 pm | धनंजय माने

लेकिन आप तो ड्यू आयडी हो! भाई बोलना च बेटर है.

नीलमोहर's picture

4 Jul 2016 - 10:49 pm | नीलमोहर

केवढी खात्री तुम्हाला माझ्याबद्दल, माझ्यापेक्षाही जास्त.
त्या अथांग धाग्यात एक सेल्फीट टाकलाय बघा, खास मला डू वगैरे समजणाऱ्यांना समर्पित,
खात्री करून घ्या :)

धनंजय माने's picture

4 Jul 2016 - 11:30 pm | धनंजय माने

तुम्ही हम पाँच नावाची झी वरची सीरियल नव्हता का बघत?
काजल भाई माहिती असेल ना?
(अशा रीतीने १५० झालेले आहेत. आम्ही स्वेच्छा निवृत्ति घेतो)

टकाला कोणी फटके दिलेले दिसले नाही, त्यामुळे बाकरवडी, आंबाबर्फी कॅन्सल.

हे आधी सांगायचे ना निमो ;)

नीलमोहर's picture

4 Jul 2016 - 7:56 pm | नीलमोहर

हे काय आधी सांगितले होते की हो.

रैवारच्या गडबडीत लिहिलं तू.नाहीतर हाणलं असतं ना एवढं तू म्हणतेस तर ;)
आंबाबर्फीसाठी कायपन!

नीलमोहर's picture

4 Jul 2016 - 8:12 pm | नीलमोहर

तुम्हाला तशीच देईन आंबाबर्फी, गोड आहात तुम्ही ;)

पैसा's picture

4 Jul 2016 - 4:34 pm | पैसा

कट्ट्याला यायची खूप इच्छा होती. पण काही कारणांनी जमले नाही. पुढच्या वेळी बघू. माझी आठवण काढल्याबद्दल खूप धन्यवाद! चांगलेच बोलला असाल! =))

वल्ली, अजया आणि टक्कुमक्कुशोनु यांच्याशी फोनवर बोलले. टक्कुमक्कुची चौकशी करायची होती ती करून झाली. फोटो बघून डोळ्याचे पारणे फिटले आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Jul 2016 - 4:45 pm | कैलासवासी सोन्याबापु

मजा आली, छान वाटले सगळे, मंडळींच्या चेहऱ्यावर असलेला आनंद पाहता नुसते फोटो लोड केले असते तरी वृत्तांत वाचता आला असता

जियो आयोजक समिती, जियो मेम्बर मित्रलोक्स अन जियो मिपा

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 5:14 pm | टवाळ कार्टा

लागोपाठ दुसर्या धाग्यात १००+ झाल्याबद्दल बोक्याचा सत्कार हे चायनीज (का जपानी?) "इकडे या...इकडे या" करणारे मांजर देउन करण्यात येत आहे...लवकरच त्यांच्या फार्महाउसवर पुढचा कट्टा होवो ही अपेक्षा ;)

manjar

लवकरच त्यांच्या फार्महाउसवर पुढचा कट्टा होवो ही अपेक्षा
+१००

बोका-ए-आझम's picture

4 Jul 2016 - 9:06 pm | बोका-ए-आझम

तारीख बोला! कट्टा होईल!

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 9:10 pm | टवाळ कार्टा

जागा तुम्ची...तारिख तुम्ही ठरवणार :)

तिमा's picture

4 Jul 2016 - 5:15 pm | तिमा

छान जमवला कट्टा. घरबसल्या सगळ्या मंडळीशी ओळख झाली.

उमेश पाटील's picture

4 Jul 2016 - 5:35 pm | उमेश पाटील

कट्टा जोरात झालेला दिसतोय. या वेळी राहून गेलं पण पुढच्या कट्ट्याला नक्की भेटू...

५० फक्त's picture

4 Jul 2016 - 5:50 pm | ५० फक्त

मस्त झालाय, आता यापुढचं हिवाळी महाकट्टा आमच्याकडे,
हापिसाचंच क्लब हाउस तयार होईल तोवर मग जमवुयात.

सतिश गावडे's picture

4 Jul 2016 - 7:14 pm | सतिश गावडे

एकच नंबर. आम्ही वाट पाहतो हापिसाचंच क्लब हाउस तयार होण्याची ;)

प्रचेतस's picture

4 Jul 2016 - 7:17 pm | प्रचेतस

आणि तयार झालं तरी पण्णासरावांच्या तिथं येण्याची. :)

किसन शिंदे's picture

4 Jul 2016 - 7:20 pm | किसन शिंदे

तोपर्यंत न येण्याचा बहाणा क्रं ११३ तयार होईल. =))

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2016 - 7:49 pm | अत्रुप्त आत्मा

ब हाणा!

;)

नाखु's picture

5 Jul 2016 - 9:04 am | नाखु

बाहेर यायची संधी तरी द्या त्यांना !

"अरे आत्मु इतकया जवळच्या कट्ट्याला तरी येशील ना सुनबाईंना घेऊन्,फार दिवसात तू यांना भेटला नाहीस ते"

मिसामा

अनन्न्या's picture

4 Jul 2016 - 6:32 pm | अनन्न्या

मस्त फोटो! अति पावसामुळे कोकण रेल्वे रद्द झाली नाहीतर मी निघालेच होते.. आता पुढच्यावेळी!

क्या बात ! सहीच झाला की कट्टा ! फोटो आणि ओळख परेड आवडली. विपा काकांची मेंबरशीप क्लबने कॅन्सल तर केली नाही ना? ;)

आणि उल्काताई बर्‍याच फोटोस मध्ये दिसतीये की. आमची मिता पण आहे. ओळख परेड मध्ये काही काही नावं मिसिंग आहेत. लीमाऊ ची इरा फार च गोड आहे :)

सुबोध खरे's picture

4 Jul 2016 - 6:55 pm | सुबोध खरे

लीमाऊ ची इरा फार च गोड आहे
बाडीस

बोका-ए-आझम's picture

4 Jul 2016 - 8:59 pm | बोका-ए-आझम

भावी मिपाकरांनी पण कट्टा attend केला!

अगं मी खूपच उशिरा पोहोचले तिथे. सगळ्यांचे जेवण होत आले होते. शेवटचा भात आणि कुल्फी फक्त मी खाल्लं. हे इतके पदार्थ मागवले होते हे प्रतिसादात वाचून कळले. =))
इरा तर मला आत्ता फोटोत दिसली. खूपच गोड आहे.
म्हणून मी म्हंटलं की मी गेले होते का? कोणाच्या लक्षात पण नाही मी आले होते ते बहुदा. :(
पाच तास प्रवास व्यर्थ का?
पण नाही हो! शेवटी चहा पिताना खूप धमाल केली आणि घरी येताना सुरंगीताईशी खूप खूप गप्पा मारल्या. गप्पा मारायला मिळाल्या की मला भारी आवडतं.
खरोखर महाकट्टा आवडला. मस्तच झाला. :)

अगं मी खूपच उशिरा पोहोचले तिथे. सगळ्यांचे जेवण होत आले होते. शेवटचा भात आणि कुल्फी फक्त मी खाल्लं. हे इतके पदार्थ मागवले होते हे प्रतिसादात वाचून कळले. =))
इरा तर मला आत्ता फोटोत दिसली. खूपच गोड आहे.
म्हणून मी म्हंटलं की मी गेले होते का? कोणाच्या लक्षात पण नाही मी आले होते ते बहुदा. :(
पाच तास प्रवास व्यर्थ का?
पण नाही हो! शेवटी चहा पिताना खूप धमाल केली आणि घरी येताना सुरंगीताईशी खूप खूप गप्पा मारल्या. गप्पा मारायला मिळाल्या की मला भारी आवडतं.
खरोखर महाकट्टा आवडला. मस्तच झाला. :)

मीता's picture

4 Jul 2016 - 7:04 pm | मीता

मस्त कट्टा झाला .

पिलीयन रायडर's picture

4 Jul 2016 - 7:39 pm | पिलीयन रायडर

अपेक्षेपेक्षा फारच जोरात झालेला दिसतोय कट्टा!! होलसेलमध्ये खुप मिपाकर पहायला मिळाले!

नीलमोहर's picture

4 Jul 2016 - 7:51 pm | नीलमोहर

tk_01

सूड's picture

4 Jul 2016 - 7:53 pm | सूड

आवरा !! =)) =))

सस्नेह's picture

5 Jul 2016 - 5:15 pm | सस्नेह

आवराच्च कुणीतरी या नीमोला =))

माझीही शॅम्पेन's picture

4 Jul 2016 - 7:54 pm | माझीही शॅम्पेन

एकदम ठोSSSSठो . ROFL

प्रचेतस's picture

4 Jul 2016 - 7:58 pm | प्रचेतस

अगगागागा =))

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 8:02 pm | टवाळ कार्टा

आरारा...लै म्हन्जे लैच...तू भेटच आता =))
बाकी फोटोशॉप चांग्ले जम्ते तुला :)

आदूबाळ's picture

4 Jul 2016 - 8:20 pm | आदूबाळ

टका-टक!

धनंजय माने's picture

4 Jul 2016 - 8:32 pm | धनंजय माने

चान चान!

त्रिवेणी's picture

4 Jul 2016 - 8:33 pm | त्रिवेणी

जबरा फोटू.

फटूग्राफरला कशा दिसल्या नाहीत म्हणतो मी?;)

च्यायला, टक्याचे भोंडल्यातला हत्ती हे नामाभिदान खरे आहे म्हणा कि. ;)

कवितानागेश's picture

5 Jul 2016 - 12:46 am | कवितानागेश

बेस्ट फोटो!
=))

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jul 2016 - 8:15 am | अत्रुप्त आत्मा

आग्गागागागागा! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif टक्कूमक्कूशोनूSsssssssss http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif

ब़जरबट्टू's picture

5 Jul 2016 - 8:54 am | ब़जरबट्टू

जबरा.. :)

जिन्गल बेल's picture

5 Jul 2016 - 9:38 am | जिन्गल बेल

हसून हसून फुटले!!!!
:) :) :)

अजया's picture

4 Jul 2016 - 8:06 pm | अजया

=))))))
अरारारा

शान्तिप्रिय's picture

4 Jul 2016 - 8:08 pm | शान्तिप्रिय

आमचा उल्लेख झाला हे कळुन बरे वाट्ले
ट का जबरदस्त! भेटतोच आता कधितरी एकेकाला !
पुढच्या महाकट्ट्याला नक्की येतो.
असे वाटते की आता तहहयात नवी मुंबई हेच मिपा महाकट्ट्याचे ठिकाण असावे.

रेवती's picture

4 Jul 2016 - 10:35 pm | रेवती

भारीय................यापेक्षा जास्त बोलत नाही.

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Jul 2016 - 11:23 pm | माम्लेदारचा पन्खा

कोणाची ही क्रिएटीव्हिटी ? सलाम !

टकाचा शेवटचा फोटो कहर. डांगे सरांचे दर्शन झाले.

कोणाचं काहीही होवो, कट्ट्याला हवे असलेले साम्पल मिळाले आणि टक्क्याने आपले मार्क्स वाढवून घेतले


बाकी भाउबिजेला_मिळालेल्या_कापडाच्या_डिझाइनचे_शर्टस किती दिवस वापरणार हा मुग्गा?

टवाळ कार्टा's picture

5 Jul 2016 - 10:45 am | टवाळ कार्टा

उसातून आणलेला शर्ट आहे तो

ओके, म्हणून उसाला इतके कोल्हे लागलेत का? =))

टवाळ कार्टा's picture

5 Jul 2016 - 2:42 pm | टवाळ कार्टा

मांजरी आहेत त्या...बोक्याच्या कट्ट्याला आलेल्या ;)

भुमी's picture

5 Jul 2016 - 10:27 am | भुमी

विपा, बोका-ए-आझम, अजया यांनी उत्तम आयोजन केले होते. मिपाकरांच्या लक्षणिय उपस्थितीमुळे कट्टा संस्मरणिय ठरला.

सस्नेह's picture

5 Jul 2016 - 5:13 pm | सस्नेह

फोटो बघून मजा आली ! पण बऱ्याच मिपाकरांची नावे समजली नाहीत.
असो. भावी कोल्हापूर कट्ट्याला हजरी लावतील तेव्हा प्रत्यक्षच पाहीन म्हणते :)

केलात तर मागच्या वेळी केली होतीत तिथेच जेवणाची सोय झाली तर बघा, मसूराच्या भाजीची चव अजून लक्षात आहे.

चांदणे संदीप's picture

5 Jul 2016 - 6:43 pm | चांदणे संदीप

टका रॉक्स!!

बरच काही मिसल्या गेले आहे! :(

नेक्स्ट महाकट्टा आयोजित/प्रायोजितच करीन म्हण्तो!
सान्द्य

चांदणे संदीप's picture

5 Jul 2016 - 6:43 pm | चांदणे संदीप

टका रॉक्स!!

बरच काही मिसल्या गेले आहे! :(

नेक्स्ट महाकट्टा आयोजित/प्रायोजितच करीन म्हण्तो!
सान्द्य