त्याची केव्हाही आठवण आली तरी,
सर्वांगावर सरकन् काटा येतो,
डोक्यावरचा केस न केस उभा रहातो,
आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो,
अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर,
जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर,
कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले,
याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले,
तो आहेच असा भितीदायक,
आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक,
मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची,
नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची,
वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा,
पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा,
किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले,
पण याच्या समोर कोणी सुध्दा नाही टिकले,
एवढ्या वर्षांनंतर सुध्दा मला त्याचीच स्वप्ने पडतात,
तेरा,सतरा,एकोणीस,सत्तावीसचे,पाढे अजूनही अडतात,
कितिही अभ्यास केला तरी, ऐन वेळी, वाजवतो हा पुंगी,
गणिताचा पेपर म्हटले की टाकतात सगळे नांगी,
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
2 Jul 2016 - 10:55 am | खेडूत
:)
मस्त.
लेखन् विषयही आवडला.
2 Jul 2016 - 10:57 am | माहितगार
शेवटच्या कडव्याने सॉलीड क्लायमॅक्स केलाय =))
2 Jul 2016 - 11:09 am | नाखु
काही बाकी ठेवलं नाही वजा करताना!
तरी भागाकार काही सुटेना!
आणि (मुद्दलात)गुणाकार जमेना!
हिशोबकच्चा नाखु
2 Jul 2016 - 11:46 am | रातराणी
:)
2 Jul 2016 - 5:05 pm | जव्हेरगंज
+1
2 Jul 2016 - 1:12 pm | किसन शिंदे
भारी आहे.
शालेय जीवनात माझा नंबर एकचा शत्रू
2 Jul 2016 - 1:23 pm | प्रचेतस
नंतर मित्र झाला काय?
2 Jul 2016 - 1:26 pm | पद्मावति
=))
2 Jul 2016 - 6:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हा हा हा..... मस्त
3 Jul 2016 - 11:56 am | अत्रुप्त आत्मा
व्वाह. मज्जा आया.
4 Jul 2016 - 4:53 pm | सस्नेह
भारी गनीम गणित म्हणजे.