इकडची तिकडची खादाडी, अर्थात, अन्न हे पूर्णब्रह्म..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
23 Jan 2009 - 8:53 am

राम राम मिपाकरहो,

आंतरजालावर उत्तमोत्तम पाककृतींचे आज अनेक ब्लॉग्ज उपलब्ध आहेत. तिथे मुशाफिरी करतांना विविध पाककृतींनी नटलेला, खाद्य संस्कृतीची सुंदर उधळण करणारा असा एखादा ब्लॉग सहजच दृष्टीस पडतो आणि डोळ्याचं पारणं फिटतं, जीव तृप्त होतो!

हे सदर केवळ अश्या ब्लॉगांसाठीच! त्या तमाम बल्लवाचार्यांच्या आणि सुगरणींच्या पाककलेची नोंद घेणे, त्याला मनमुराद दाद देणे व त्याची माहिती इतरांना करून देणे हे तुम्हाआम्हा खाद्यपंढरीच्या वारकर्‍यांचे परमकर्तव्य आहे असे आम्ही मानतो व त्याकरताच हे सदर आम्ही सुरू करत आहोत..

मिपाकरांनी येथे त्यांना भावलेल्या विविध पाककृतींच्या ब्लॉगांचे दुवे अगदी अवश्य द्यावेत आणि खाद्यधर्माचा प्रसार व प्रचार करावा ही विनंती!

खाद्यधर्म हा जगातला असा एकच धर्म आहे की जिथे कुठलेही वाद नाहीत, हेवेदावे नाहीत! मिसळपाव डॉट कॉम या खाद्यधर्माची बांधिलकी मानून जगातल्या सर्व ज्ञात-अज्ञात खाद्यधर्मगुरूंना या सदराद्वारे अभिवादन करत आहे, त्यांच्या पाककलेस सलाम करत आहे!

आपला,
तात्या अभ्यंकर,
संस्थापक, मिसळपाव धर्म.

आमच्यापासून सुरवात करतो..

१) मिपाकर चकली यांचा सुरेख खाद्यब्लॉग.

२) मीरा नावाच्या कुणा अन्नपूर्णेचा हा खाद्यब्लॉगही पाहण्याजोगा!

चला तर मंडळी, लागा कामाला आणि द्या उत्तमोत्तम खाद्यब्लॉगांचे दुवे! :)

आपला,
(रसिक) तात्या.

संस्कृतीपाकक्रियामौजमजाशिफारसमाध्यमवेधमाहितीप्रतिक्रियाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

23 Jan 2009 - 9:27 am | भाग्यश्री

वदनी कवळ घेता : व्हेज ,व्हेगन, हेल्दी आणि अतिशय व्हरायटी असलेला ब्लॉग.. माझा प्रचंड आवडता..

रुचिरा : हाही ब्लॉग छान आहे!

माझ्या नेहेमीच्या स्वयपाकाला मदत करणार्‍या, चकली आणि वदनी कवळ घेता खेरीज अजुन एक साईट मला खूप आवडते..
http://www.indianfoodforever.com/

तात्या, टॉपिक मस्त काढलात! सर्व खाद्य-ब्लॉग्सचे एका ठीकाणी संकलन करण्याची जरूरी होतीच! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

23 Jan 2009 - 9:28 am | विसोबा खेचर

तात्या, टॉपिक मस्त काढलात! सर्व खाद्य-ब्लॉग्सचे एका ठीकाणी संकलन करण्याची जरूरी होतीच!

अगं करशील काय, संस्थळ चालवायचंय बाब्बा! रात्र वैर्‍यांची आहे! ;)

आपला,
(आइडियाबाज!) तात्या.

वृषाली's picture

23 Jan 2009 - 10:58 am | वृषाली
नंदन's picture

23 Jan 2009 - 11:48 am | नंदन

१. महानंदी - तेलगू व इतर प्रकारचे खाणे, सुरेख फोटोज आणि इतर पूरक माहिती हे मुख्य वैशिष्ट्य.

२. नुपूर नामक एका मराठी गृहिणीचा 'वन हॉट स्टोव्ह' नामक खाद्यब्लॉग. ए टू झेड ऑफ मराठी फूड ही मालिका उल्लेखनीय.

३. कोकणी खाण्याबद्दलचा आई'ज रेसिपीज

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मॅन्ड्रेक's picture

23 Jan 2009 - 5:32 pm | मॅन्ड्रेक

हे सगळे ब्लॉग शोधत बसण्यापेक्शा आमच्या ब्लॉक मधे जेवायला या.
सस्स्नेह आमंत्रण.

लिखाळ's picture

23 Jan 2009 - 5:22 pm | लिखाळ

वा..छान धागा आहे.

इंडोबेस रेसिपी हे स्थळ छान आहे.

तसेच मिपावर स्वातीताई आणि पेठकरकाका यांनी लिहिलेल्या पाकृ सुद्धा खूप छान आहेत.
-- लिखाळ.

विसोबा खेचर's picture

23 Jan 2009 - 5:30 pm | विसोबा खेचर

तसेच मिपावर स्वातीताई आणि पेठकरकाका यांनी लिहिलेल्या पाकृ सुद्धा खूप छान आहेत.

शाल्मलीदेवींनाही दाद द्या की! :)

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Jan 2009 - 10:53 pm | llपुण्याचे पेशवेll

पांथस्थराव पण मासळीच्या पा.कृ. वारंवार टाकत असतात की हो.
पुण्याचे पेशवे
Since 1984

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2009 - 3:42 am | पिवळा डांबिस

पांथस्थरावांचं प्रकाशन थोडसं प्लेबॉय सारखं असतं.....
चित्रं इतकी छान असतात की मजकूराकडे अंमळ दुर्लक्ष होतं....
तुमचं काय मत?
:)
नाही म्हणजे आमची काही तक्रार नाही, पांथस्थराव! आप लगे रहो!!!!
:)

सर्किट's picture

24 Jan 2009 - 3:43 am | सर्किट (not verified)

एडिबल पॉर्न !

-- सर्किट

सहज's picture

24 Jan 2009 - 7:32 am | सहज

खाण्यातील एफ्.पी क्वीन.

अवांतर -नायजेलाने पदार्थ बनवलेले पाहताना तृप्त व्हायला होतेच पण नेहमी तेच खाल्ले तर आंतरजालावरील भारदस्त व्यक्तिमत्व बनण्यास जराही वेळ लागणार नाही.

प्रभाकर पेठकर's picture

24 Jan 2009 - 2:02 pm | प्रभाकर पेठकर

तसेच मिपावर स्वातीताई आणि पेठकरकाका यांनी लिहिलेल्या पाकृ सुद्धा खूप छान आहेत.

धन्यवाद तात्या. कार्यबाहुल्ल्यामुळे बरेच दिवसांत काही पाकृ देता आली नाही ह्याची मनास खंत आहे.

चकली's picture

23 Jan 2009 - 10:15 pm | चकली

या सगळ्या छान छान खाद्यब्लॉग मध्ये माझा समावेश पाहून खूप बरे वाटले. मिपा कर सच्चे खवय्ये आहेत हे प्रतिसादांवरून कळते.

चकली
http://chakali.blogspot.com

शितल's picture

23 Jan 2009 - 10:20 pm | शितल

तात्या,
अगदी मस्त दुवा चालु केला आहे. :)
चकली ताईंचा ब्लॉग तर खुपच छान आहे. मी आणी माझ्या मैत्रीणी त्याच्या ब्लॉगच्या आधारवर बरेच पदार्थ करत असतो. :)

शुभान्गी's picture

23 Jan 2009 - 10:38 pm | शुभान्गी

अतिशय आवडता विषय निवडला आहे.....cooking4allseasons.blogspot.com हा दुवा मला आवडतो.... नविन दुव्यासाठी सर्वान्ना धन्यवाद.

पक्या's picture

24 Jan 2009 - 12:47 am | पक्या

thecookscottage हा सुद्धा मस्त ब्लॉग आहे...दाद देण्याजोगा. पुणेकराचाच आहे.
त्यात हापुस आंबे, नीरा , गुळ , डिंक लाडू, हुरडा पार्टी , वैशाली रेस्टॉरंट, महाराष्ट्रियन थाळी , कयानी बेकरी , शिवाजी मार्केट वगैरे वेगळे विषय हाताळून अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. वाचनीय ब्लॉग आहे. रेसिपीज आणि फोटोज ही सुंदर आहेत.

ही एक झलक http://thecookscottage.typepad.com/curry/2008/12/mutton-kofta-curry.html

स्वातीदेव's picture

24 Jan 2009 - 1:42 am | स्वातीदेव

खूपच छान टॉपिक!! चकली यांचा ब्लॉग मला पण आवडतो.

मालवणी पदाथांसाठी ( हा शब्द नीट कसा लिहावा?) ही साइट चांगली आहे. http://ratnagirichronicle.com/cuisine.php
बाकी वर mention केल्याप्रमाणे 'वन हॉट स्टोव्ह' , आई'ज रेसिपीज हे सुद्धा चांगले आहेत.
मला खालील ब्लॉग्ज पण चांगले वाटतात.

http://enjoyindianfood.blogspot.com/
http://rohinivinayak.blogspot.com/
http://the-cooker.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

24 Jan 2009 - 3:08 am | संदीप चित्रे

पदार्थांसाठी (padaarthaaMsaaThee)
------------
मालवणी पदार्थांच्या ब्लॉगच्या दुव्यासाठी मनापासून धन्यवाद :)

प्रनित's picture

24 Jan 2009 - 2:40 am | प्रनित

http://vahrehvah.com/
अत्यन्त सोपी (व्हिडिओ सहित) आहे.
भारतीय, इटालियन, चायनीज, फ्रेंच, मेक्सिकन इ. पाकक्रुती आहेत.

सहज's picture

25 Jan 2009 - 10:01 am | सहज

मायक्रोव्हेव कुकिंगसाठी हा दुवा उपयोगी आहे.