< दोन पक्षी (एकाच वेळी) >

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 4:16 pm

मिपावर मी सात वर्ष ११ महिन्यांपुर्वीच आलो आहे. तसे मिपाचे चिंतन आणि मनन खूप दिवसांपासून करत आहे. नव्या अवतारातील पुनरागमनात बरेचदा (पुन्हा) शाब्दिक चकमक झाली जिच्यामुळे हा लेख लिहिणे महत्वाचे वाटले.
प्रथम, मिपा काध्याकुट लिखाण याविषयीचा माझा समज म्हणजे निरर्थक ताणून धरलेले आणि आणि थापलेले किंवा अध्यात्म्,काव्य्,मनोरंजन्,साहित्य अनुभुती,इतीहास सारख्या जुनाट (कालबाह्य) संकल्पनांना मराठीतल्या तत्वज्ञान (जो माझाच प्रांत आहे) मिसळून नवरसात लेखन करणारे मिपाकवी आणि तत्सम मिपालेखक यांचा लेखन प्रपंच.

याचेच एक उदाहरण म्हणजे फक्त वाचकांना रंजक वाटावी याच हेतूने लिहिली जाणारी आधुनिक प्रकारची धड साहित्यीक नाही आणि काथ्याकुट नाही अशी चर्चाचोथ्या. या चर्चाचोथ्या म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या मिपावरील वाचनापैकी सर्वात शुल्लक आणि थिल्लर वाङमय प्रकारात मोडतील. (कारण उघड आहे माझ्या विरुद्द आघाडी करून माझी कोंडी केली गेली जाते)

काही तरी न वाचलेलं, वेगळं अनाघ्रात,चाकोरीबाहेरचं विश्व दाखवणारे साहित्यीक किंवा सामाजीक क्रिया,घटना,कल प्रवाह चार-पाच वेगवेगळ्या नावाने तोच विषय चर्चा चोथ्यात टाकणार्यांची आजकाल खूप गर्दी झाली आहे. एक तर अशा प्रकारच्या तीन विषयात एवढा कमी लिखाण अवकाश शिल्लक असतो कि त्यात फारसे नवे काही सांगता येतच नाही.या जानुणबुजून आणलेल्या भंपकपणामुळे अतिशोक्तीकडे कल वाढतो आणि लेखनात हेत्वारोप आणि बादरायण संबध हा एक गुण होऊन बसतो. अर्थात हा उद्योग जरी आक्र्स्ताळी बातमी(?) वाहीन्याचा आहे. मिपावरील एक नवीन चर्चाचोथ्या प्रकार आता या लोकांनी हाताळायला सुरुवात केली आहे.

खरे म्हणजे ' काथ्याकुट ' या प्रकारात लिहिण्यासाठी विचारांवर अजिबात ताबा नसणे महत्वाचे असते, मुक्त संहीतेसारखे. पण हि जाणती लेखक मंडळी उगाच वैचारीक्,माहीतीपुर्ण,समतोल किंवा सुस्पष्ट दिशा आणि मार्ग दाखवितात आणि अभ्यास वाढवा,तुम्ही अनुभव घेऊन पहा, स्त्रीयांचे अनुभव तुम्ही कसे अनुभवू शकता, असली खट्याळ पण रोकडी प्रश्नफैरी डागून वरील अटीला पद्धतशीर कलाटणी देतात. हा हातखंडा यायला खरच एक चांगला श्रोता+वाचक व्हाव लागतं हे मात्र मला मान्य.

याच लेखकातली काही मंडळी त्यांच्या व्यावसायीक कौशल्य आणि अनुभव यांच्या अनुषंगाने शास्त्रशुद्द माहीती देतात. आणि लेखकाचा अनुभव हा त्याला आललेला सापे़क्ष(अपवाद) असेल तरीही वैज्ञानीक-वैद्यकीय-सामाजीक कारण काय असेल ते सांगण्याचे धाडस करतात. खरतर हे सगळे लेखक आणि विचारवंत टोळ्यांनी कार्यरत असतात. एकमेकांना मदत करून हे मोठेपणा मिळवतील आणि आयुष्यभर फक्त लेखक किंवा विचारवंत म्हणवून घेण्यासाठी हे फुकट पदरमोड करतील. मग हेच टोळके म्हातारे होता होता प्रतिष्ठित ' मिपाकर ' होऊन बसतील आणि चांगले लिखाण करणाऱ्या एखाद्या नवख्याला आप्लयात ओढतील.

नावाच्या अगोदर 'प्राध्यापक' 'डॉक्टर' ' तज्ञ्,ईंजीनीयर, ' किंवा ' सल्लागार ' ह्या पदव्या लावणे यांच्यासाठी कंपूशाही पेक्षाही महत्वाचे असते. कुणी काही स्वातंत्र्य संकोच म्हणायला जावे तर 'तुम्ही इथे लिहू शकताय ना?' किंवा " स्वातंत्र्य संकोच (तर्कशुद्धपणे)सिद्ध करा " असली ठराविक ठेवणीतली उत्तरे देऊन मोकळे होतात. च्यायला वाचा म्हणावं माझे लांबलचक तर्कदुष्ट लांबोळी (आंबोळी नव्हे) प्रतीसाद वीस वेळा आणि सांगा किमान एकदातरी खरा अर्थ. (किमान मला तरी कळेल)
अजूनही काही लिहायचे आहे पण आता रात्रीचे पाचच पेग झालेत आलेत नंतर कधीतरी याच लेखाचा दुसरा भाग आणखीन विस्तारित लिहीन म्हणतोय. जाग तर येऊ द्या, हवे तर आपण लिहायाला (नंतर तेच वाचायलाही) घाबरत नाही ब्वा!

(मिपासाहित्यसेवेचा हार्डवेअरचा अनुभव नसल्याने काही संदर्भ खरे दिले गेले आहेत. चू.भू.द्या.घ्या.)

निवांत __ टाकून

मुक्तकविडंबनविनोदऔषधोपचारमौजमजाप्रतिक्रियाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

जेपी's picture

25 Feb 2016 - 4:23 pm | जेपी

चांगलय..

जेपी's picture

25 Feb 2016 - 4:29 pm | जेपी

आणी पुढचा भाग येऊद्या.
चार पेग टाकल्यावर आपण वाचायलाच काय,प्रतिसाद द्यायला पण घाबरत नाही..

सस्नेह's picture

25 Feb 2016 - 4:33 pm | सस्नेह

नाखुकाका राॅक्स दंगेखोर शाॅक्स !

अजया's picture

25 Feb 2016 - 4:44 pm | अजया

न घाबरता वाचले.हुश्श.

पैसा's picture

25 Feb 2016 - 5:26 pm | पैसा

एक झाड दोन पक्षी वाले पक्षी काय! लेख न घाबरता वाचला कारण पीत लेखन कमी दिसले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2016 - 10:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

कारण पीत लेखन कमी दिसले.

आँ, आसं कसं ?!

खुद्द लेखकच म्हणतो आहे की,

आता रात्रीचे पाचच पेग झालेत

म्हणजे हे केवळ पीत लेखन नाही तर ते चक्क पीत पीत (लिहिलेले) लेखन आहे :) ;)

======

बाकी, कॉफी पिता पिता लेख वाचण्याची चूक केली तर कॉफी नाकात जाईल असा लेख आहे =)) =))

यशोधरा's picture

25 Feb 2016 - 6:32 pm | यशोधरा

भारी सुडंबन!

होबासराव's picture

25 Feb 2016 - 6:38 pm | होबासराव

;)

रातराणी's picture

26 Feb 2016 - 12:23 am | रातराणी

:D

अभ्या..'s picture

26 Feb 2016 - 12:24 am | अभ्या..

यो नाखुन्स. ;)

प्रचेतस's picture

26 Feb 2016 - 9:07 am | प्रचेतस

णाखुन अंकल रॉक्स...

नीलमोहर's picture

26 Feb 2016 - 5:02 pm | नीलमोहर

मूळ लेखात विडंबनाला भरपूर स्कोप आहे वाटलं होतंच.
पण ते दोन पक्षी कुठले..

नाखु's picture

29 Feb 2016 - 9:39 am | नाखु

स्वाक्षरी वाचा तुम्हाला नक्की स्व सापडेल.

सर्व प्रतीसादकर्त्यांचे आभार

तळटीप: हे लिखाण कुठल्याही वृत्तपत्रात (हो हो अगदी दै फुपाटामध्येही नाही) छापून आले नाही.(आम्ही इसबगोल,सपट लोशन्,आणि हमखास आकड्याची जागा तुमच्या लेखाने वाया घलवू शकत नाही असे बाणेदार उत्तर मिळाले) तरी हतोस्ताहीत न होता मिपाकरांना गलितगात्र करण्यासाठी आवर्जून लेख इथे टंकला आहे

नीलमोहर's picture

29 Feb 2016 - 10:41 am | नीलमोहर

स्व सापडणे एवढे सोपे असते तर काय,

बाकी थोडे फार समजतेय असं वाटतेय,
अजून इथल्या लोणच्यात मुरलेले नसल्याने पटकन उजेड पडत नाही :)

मिपाविषयावर विडंबनावर विडंबने पाडून अजुन "लाजते, पुढे सरते, फिरते" च चालू आहे काय? ;)
चार वर्षात एक विडंबन सुखासुखी जमेना आम्हाला.

नीलमोहर's picture

29 Feb 2016 - 11:53 am | नीलमोहर

आमच्या मनचं दु:ख आम्हाला माहीत हो, हल्ली गंभीर काही लिहायचं म्हटलं तरी जमेनासं झालंय,
विडंबनं डोळ्यांपुढे फेर धरून नाचत म्हणतात, कोण होतीस तू, काय झालीस तू..
(पुढचे नॉट अ‍ॅप्लिकेबल :)

नवीन लेखविषयः आमची पळते तर तुमची का जळते? ;)

पळवा, जळवा. डीझेल संपल्यावर कळवा.
शुभेच्छा.

सुधांशुनूलकर's picture

26 Feb 2016 - 5:36 pm | सुधांशुनूलकर

नाखुकाका रॉक्स..
विडंबनखुळा सुधांशुनूलकर

जाता जाता - मी पक्षिप्रेमी असल्यामुळे हा धागा पक्ष्यांवर असेल असं वाटलं..

लेखक नाखु असल्याने, आमचा गोंधळ उडाला नाही.

बॅटमॅन's picture

26 Feb 2016 - 5:49 pm | बॅटमॅन

नाखुस रॉक्स

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2016 - 7:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त चालु आहे. नाखुकाका तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है.
प्रेरणेचा उल्लेख व्हायला हवा म्हणजे हे विडंबन आहे हे लक्षात येते. :)

-दिलीप बिरुटे

झक्कास! मूळ लेख वाचावेसे वाटेल असे.....

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2016 - 7:39 pm | अत्रुप्त आत्मा

हहीह्हीहही!

मुक्त विहारि's picture

26 Feb 2016 - 10:26 pm | मुक्त विहारि

सुंदर लेख.

अभ्या..'s picture

26 Feb 2016 - 10:35 pm | अभ्या..

नाखुन्स,
आय वाना मेक अ गोन्धळ ओन दिस धागा. मे आय??

नाखु's picture

29 Feb 2016 - 10:31 am | नाखु

यावा धागा आपलाच असा .

हाडक्या's picture

26 Feb 2016 - 10:41 pm | हाडक्या

नाखुं नी चिकणा स्क्वेअर-कट मारलाय असं नमूद करतो.. ;)

बोका-ए-आझम's picture

29 Feb 2016 - 11:03 am | बोका-ए-आझम

मगर स्टेडिअम के बाहर मारा!