कुकुचकू - रुपये १२,०००/- फक्त !

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
8 Feb 2016 - 10:54 pm

थोड्या दिवसांपूर्वी आमच्या ऑफिसमधली ज्येष्ठ (आणि श्रेष्ठ!) पार्शिण बरेच दिवस गायब होती. पारशी लोक हे तसे खुशालचेंडू आणि स्वच्छंदी असल्यामुळे ऑफिसातल्या कोणालाच तसं तिचं नसणं खटकलं नाही. मात्र बरेच दिवस होऊनही ती ऑफिसला न आल्यामुळे तिच्याविषयी थोडी चर्चा हळूहळू सुरु झाली. अखेर एक दिवस बाईसाहेब उगवल्या ती एक चित्तथरारक कहाणी घेऊनच ! तो अख्खा दिवस ती प्रत्येकाला वेगवेगळे गाठून तीच गोष्ट सांगत होती. खास लोकाग्रहास्तव तिने पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांसाठी ती हकीकत साभिनय करून दाखवली ती अशी :

ह्या बाईची एक मुलगी मुंबईत बांद्रा इथे राहते. एके दिवशी वैतागून तिने आपल्या आईला ( म्हणजे आमच्या पर्शियन फुलाला ) फोन केला आणि म्हणाली , आई, "हल्ली मला रात्रीची झोप मिळत नाही. " फुलाने विचारलं , त्यात काय नवीन ? सगळ्या नवीन लग्न झालेल्या मुलींची ही तक्रार असतेच ! त्यावर तिची मुलगी अजूनच चिडली आणि म्हणाली, तुला जसं वाटतंय तसं काही नाहीये गं …दोन दिवस आमच्या घरी येउन राहा म्हणजे तुला कळेल ! त्यावर पर्शियन फूल तिच्या घरी जाउन मुक्काम ठोकून बसलं …. दिवस बारा गेला…. मग रात्र झाली ….सगळे आपापल्या खोलीत झोपले … मध्यरात्री २ वाजता घरामागच्या झोपड्यांच्या बाजूने १ दणकट कोंबडा ह्यांच्या घराखाली येउन सकाळी ६ वाजेपर्यंत घसा साफ करत होता …. त्याला हाकलले तरी तो उडून जायचा आणि परत परत येउन तोच कुचकुचाट करत होता. घरातले सगळे त्यामुळे हैराण झाले होते. सकाळी त्यांच्या घरी गोलमेज परिषद भरली… विषय एकच … कुक्कुट स्वामींचा बंदोबस्त !

सगळ्यांनी सगळ्या युक्त्या सांगितल्या मात्र त्या आधी तो कोंबडा नक्की कोणाचा आहे हे शोधणे क्रमप्राप्त होते म्हणून सगळे कुटुंब मागच्या झोपडपट्टीत गेले आणि चौकशी केली पण त्याचा मालक किंवा मालकीण सापडली नाही. तसेच सगळे परत आले. पर्शियन फुलाने हुशारी करून बृहनमुंबई महानगरपालिकेच्या वार्डला फोन लावला आणि ह्याचा उपाय विचारला. त्यांनी पहिले २ तास फोन उचललाच नाही. नंतर पलीकडच्या माणसाने ही बाब आमच्या अखत्यारीत येत नाही अशी माहिती दिली आणि पालिकेच्या चतुष्पाद विभागाला फोन करा असे सांगितले. चतुष्पाद विभागाने समस्या ऐकून कोंबडा हा द्विपाद असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असे सांगितले. तुम्ही देवनार कत्तलखान्याला फोन करा असा सल्ला दिला.

देवनार कत्तलखान्याच्या विभागात मुळातच शुकशुकाट पण करणार काय … तिने नंबर शोधून तिथे फोन लावला… त्यांचे ठराविक साचेबद्ध उत्तर …. इथे फक्त भाकड चतुष्पाद जनावरे येतात आणि तसेही कोंबडा पकडण्याचे आम्हाला प्रशिक्षण नाही त्यामुळे तुमचा प्रश्न तुम्हीच सोडवा. पर्शियन फूल स्वत वार्डला गेले आणि तिथल्या लोकांना स्वताची व्यथा सांगितली. वार्डच्या लोकांना तिची भाषा आणि अजीजी पाहून दया आली आणि त्यांनी काहीतरी मदत करतो असे आश्वासन दिले. मात्र ह्या लोकांनीही " आम्हाला कोंबडा पकडता येत नाही तसेच आमच्याकडे माणसे आणि जाळी नाही… त्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल असे सांगितले. सदरच्या गोष्टी दुसर्या वार्डला उपलब्ध आहेत पण त्या तुम्हालाच खर्च करून आणाव्या लागतील असे सांगितले. त्यांच्याकडून त्या माणसांचा पत्ता घेऊन पर्शियन फूल तिथे गेले . त्या दिवशी ती माणसे भेटली नाहीत. त्यांच्यातली एकच फोन नंबर मिळाल्यामुळे तिने त्याला फोन केला आणि मदत करण्याची विनंती केली. त्याने टेम्पो,जाळी आणि ४ माणसे ह्याचा रु. ६०००/- खर्च होईल असे सांगितले. तुम्ही आम्हाला घ्यायला या कारण आम्हाला रस्ता माहित नाही असेही त्यांनी सांगितले . बाई त्यालाही तयार झाल्या. पर्शियन फूल तसे नाजुक असल्यामुळे हा सगळा द्राविडी प्राणायाम बाइसाहेब ट्याक्सिनेच करत होत्या त्यामुळे त्या खर्चाची गणतीच नसते.

ठरलेल्या दिवशी पर्शियन फूल उठून बांद्र्याहून मालाडला गेले आणि टेम्पोसकट ४ माणसे आणि जाळी घेऊन आले पण बाईंचे दुर्दैव आड आले …. त्या दिवशी कोंबडा दिसलाही नाही …. अर्धा दिवस वाया गेला पण कोंबडा काही दिसला नाही … माणसे मात्र पैसे घेऊन गेली …. पर्शियन फूल रागाने लालेलाल झाले …. घरातला फोन फोडून झाला …. चिडलेल्या अवस्थेत ती शेजारच्या पोल्ट्री सेंटर मध्ये गेली आणि तिथल्या माणसाला तू तो कोंबडा पकडशील का असे विचारले. तो तयार झाला पण त्याचेही त्याने ५०० रुपये मागितले. बाई नाईलाजाने हो म्हणाली. कोंबडी वाल्याने जाळी न वापरतच एकदाचा ३ दिवसांनी तो उच्छादी कोंबडा पकडला आणि त्याला दुकानात घेऊन गेला. त्याचे म्हणणे होते कि त्याचा मालक आला तर त्याला तो कोंबडा परत द्यावा लागेल म्हणून तो त्याने २ दिवस ठेवून घेतला . पर्शियन फुलाने एका प्राणीमित्र संघटनेच्या वकिलाला गाठून असे सापडलेले प्राणी किती दिवस ठेवावेत वगैरे कायदेशीर सल्लाही घेतला.

एक ख्रिश्चन म्हातारी तो कोंबडा पाहून त्याच्याकडे तो मागायला आली. त्याने पर्शियन फुलाला फोन करून बोलावून घेतले. म्हातारीने कोंबडा खायला मागितला म्हणून फूल अवाक झाले. म्हातारी म्हणाली, हा कोंबडा माझाच आहे मात्र मला आता वयोमानपरत्वे त्याला पकडणे शक्य होत नाही. पकडायला गेले कि तो उडून झाडावर बसतो. कोणीतरी मला सांगितले कि तुम्ही त्याला पकडलाय म्हणून मी इथे पाहायला आले. आज आमच्याकडे पाहुणे येणार असल्यामुळे मला तो हवा आहे , मी घरी पाणी तापवत ठेवलेच आहे .…तुम्हि तो माझ्या हवाली करा म्हणजे मी त्याला घेऊन जाईन . कोंबडीवाला म्हणाला आता तुम्हाला हा माझ्याकडून विकत घ्यावा लागेल … म्हातारी चिडली आणि बडबड करायला लागली… तिने पर्शियन फुलाला सांगितले मुकाट्याने माझा कोंबडा मिळवून दे नाहीतर मी तक्रार करेन… शेवटी पर्शियन फुलाच्या नवर्याने अजून ५०० रुपये दिले आणि कोंबडा म्हातारीला दिला. त्यावर म्हातारी खुश होऊन पर्शियन फुलाला म्हणाली माझ्या अजून २-३ कोंबड्या अजून अशाच फिरत आहेत… त्या पकडून देतेस का ? मी तुला पैसे देईन !!!पुढे म्हातारीने कोंबड्याला त्याच दिवशी रीतसर मुक्ती दिली.
ह्या सगळ्या प्रसंगात पर्शियन फुलाचे जवळपास ७-८ हजार रूपये आणि ऑफिसची ५ दिवस सुट्टी इतकी सामग्री घालवून तिच्या मुलीच्या घरी शांती (खेचून !!) आणली. सगळी कथा ऐकून झाल्यानंतर मी तिला शांतपणे विचारले कि कोंबडीवाल्याचा पर्याय अगोदरच वापरला असतास तर तुझे कितीतरी पैसे वाचले असते त्यावर ती शांतपणे म्हणाली … वी आर बावाजीस नो …. अवर ब्रेन वर्क्स धिस वे ओन्ली !!

कथामुक्तकविनोदमौजमजाविचारआस्वादसमीक्षाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

8 Feb 2016 - 11:04 pm | संदीप डांगे

छान आहे, एका कोंबड्याची गोष्ट! सत्य नेहमीच कल्पनेपेक्षा विचित्र असतं. :-)

सतिश गावडे's picture

8 Feb 2016 - 11:07 pm | सतिश गावडे

भारीच आहे सत्यकथा :)

खटपट्या's picture

8 Feb 2016 - 11:35 pm | खटपट्या

वा, मजा आली. तीने तुम्हाला सांगीतले असते तर आखील कळवा मिपा मंड्ळ गेले असते मदतीला. तेवढाच गावठी कोंबडा हादडायला मिळाला असता.

टवाळ कार्टा's picture

9 Feb 2016 - 10:11 am | टवाळ कार्टा

खिक्क...हेच्च लिहायला आलेलो

आदूबाळ's picture

8 Feb 2016 - 11:35 pm | आदूबाळ

लोल. बावा लोक कहर खतरनाक असतात!

शि बि आय's picture

8 Feb 2016 - 11:38 pm | शि बि आय

हा हा हा... आमच्या घराच्या आजूबाजूला पण मोप कोंबडया हाये ... पाठवा की तुमच्या कोंबडी पकडू टोळीला ..
र च्या क भारी लिवलय राव...
एक कोंबडं असा पण वात आणू शकतं.

उगा काहितरीच's picture

9 Feb 2016 - 1:20 am | उगा काहितरीच

माझ्या या लेखाची आठवण आली. काय सूपिक आहेत मिपाकरांचे डोके ! भन्नाट !!

विद्यार्थी's picture

9 Feb 2016 - 1:43 am | विद्यार्थी

वाह वाह... एकदम खुमासदार लेख आहे.

राजाभाऊ's picture

9 Feb 2016 - 5:52 am | राजाभाऊ

ती पारशीण बहुतेक त्या कोंबड्याची, पुर्वजन्माची देणेकरी असावी म्हणुन तो वसुलीला यायचा. १२,००० रुपये वसुल झाल्यावर त्याला मुक्ती मिळाली... :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Feb 2016 - 6:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खी खी खी!!! ए डिकरा तु काय हसवते रे सक्काळी सक्काळी.

सतिश गावडे's picture

9 Feb 2016 - 9:31 am | सतिश गावडे

त्यांनी रात्रीच हसवले होते. तुम्हाला पहाटेला कोंबडयाने बांग दिल्यावर जाग आली असणार म्हणून तुम्हाला ते सक्काळी सक्काळी हसवत आहेत असं वाटत आहे.

चांदणे संदीप's picture

9 Feb 2016 - 12:49 pm | चांदणे संदीप

अरे डिकरा तेरा पर्तिसाद वाचून मी दुपारी हसते बघ! =))

तिने अगोदर ओफिसवाल्यांचा सल्ला का घेतला नाही यातच सगळं आलं.चांगलीच ओळखते ती ओफिसवाल्यांना.

मदनबाण's picture

9 Feb 2016 - 7:08 am | मदनबाण

मस्तच ! :)
अश्याच एका पारशी फूलाकडुन हल्लीच "ट्रेनिंग" घेतले आहे. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch

मुक्त विहारि's picture

9 Feb 2016 - 8:15 am | मुक्त विहारि

कथेने हसवले.

आमची दर शनिवारी (आमच्याकडे दर शनिवारी भजन नामक ध्वनीप्रदूषण असते.)अशीच रडकथा असल्याने, प्राणी परवडले पण माणूस नको, अशीच विचारसरणी व्हायला लागली आहे.

स्वगत : माणसाची प्रगती, मानसपूजे कडून आरडा-ओरडीकडे.

नाखु's picture

9 Feb 2016 - 9:20 am | नाखु

तुम्ही न किंचाळताही अगदी मनातल्या प्रार्थनेने देवाची प्रार्थना करू शकता.

बाबांची वचने भक्ती (फक्त) मनापासून बेंबीदेठापासून नाही या प्रवचनातून साभार.

नितवाचक नाखु

मानसपूजा हीच खरी पूजा.

इति, जगन्नाथ कुंटे (उर्फ संन्यासी अवधूतानंद) ह्यांच्या बर्‍याच पुस्तकातील एक वाक्य.

संदीप डांगे's picture

9 Feb 2016 - 9:23 am | संदीप डांगे

:(

सतिश गावडे's picture

9 Feb 2016 - 9:35 am | सतिश गावडे

ते भजनी मंडली सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर त्यांची "भजने" म्हणत असतील तर त्याचा गाणी समजून आस्वाद घ्या.

आहे विटेवरी उभा, त्याला पाहू चला रे
हा नाशिवंत देह त्याला वाहू चला रे

हे "भजन" मी अगदी लहान असताना ऐकले होते. ते लक्षात राहिले ते त्याच्या "दो हंसोंका जोडा बिछड गयो रे" या चालीमुळे. :)

मुक्त विहारि's picture

9 Feb 2016 - 11:48 am | मुक्त विहारि

टाळाच्या ठणठणात, शब्द पण हरवून जातात.

एक सल्ला : १००% बहिरे नसाल तर, चुकूनही मंदिर असलेल्या सोसायटीत सदनिका घेवू नका.

असो,

गुरु पण नको आणि त्यांचे हे त्रासदायक भक्तगण तर नकोच नको.

चिनार's picture

9 Feb 2016 - 9:46 am | चिनार

एक नम्बर!!!
मस्त जमलीये...मजा आ गया !!!

विजय पुरोहित's picture

9 Feb 2016 - 9:56 am | विजय पुरोहित

मस्तच... धमाल कथा...

यशोधरा's picture

9 Feb 2016 - 10:18 am | यशोधरा

=))

एस's picture

9 Feb 2016 - 10:21 am | एस

हाहाहा!

बबन ताम्बे's picture

9 Feb 2016 - 11:20 am | बबन ताम्बे

आवडली.

मयुरMK's picture

9 Feb 2016 - 11:29 am | मयुरMK

:)

मृत्युन्जय's picture

9 Feb 2016 - 11:40 am | मृत्युन्जय

धमाल आली वाचताना.

नीलमोहर's picture

9 Feb 2016 - 12:29 pm | नीलमोहर

आमच्याकडे पण पहाटेपासून कुकूचकू सुरू असतं, आरवण्याचा आवाज येतो पण ते कोंबडे कुठले, कधी दिसत नाहीत.
मला आवडतं पण ते ऐकायला, सकाळ झाल्याचा 'फील' येतो त्यामुळे :)

श्रीगुरुजी's picture

9 Feb 2016 - 2:22 pm | श्रीगुरुजी

मस्त!

या कोंबड्याप्रमाणेच पहाटे ४ पासून घराच्या अंगणात असलेल्या आंब्याच्या झाडावर सूर लावून बसलेले कोकीळ हा एक उच्छाद आहे. ते दोन कोकीळ बहुदा आवाज काढून कोकिळेला पटविण्याचा प्रयत्न करीत असावेत. सुरवातीला 'कूहूहू' असे खर्जात सुरू करून पट्टी वाढवित नेतात आणि नंतर आवाज इतका टिपेला पोहोचतो की त्यांचा आवाज फाटतो आणि सूर थांबतो. काही क्षण थांबून पुन्हा एकदा रियाझ सुरू. भयंकर वैताग आहे. आता जसा उन्हाळा सुरू होईल तसा त्यांचा उच्छाद जास्त वाढेल.

टवाळ कार्टा's picture

9 Feb 2016 - 2:32 pm | टवाळ कार्टा

पुणे सोडा =))

नीलमोहर's picture

9 Feb 2016 - 4:10 pm | नीलमोहर

मी कोकीळांच्या अशा जुगलबंदीचे रेकॉर्डिंग करत असते, त्यांचे ascending order मधील कुहू कुहू करत जाणे प्रचंड आवडते. को़कीळांमुळेच उन्हाळाही जास्त आवडतो :)
सकाळी सकाळी पक्ष्यांच्या आवाजासोबत उठण्यात एक वेगळाच आनंद असतो, फ्रेश वाटतं एकदम.

श्रीगुरुजी's picture

9 Feb 2016 - 10:55 pm | श्रीगुरुजी

सकाळी सकाळी पक्ष्यांच्या आवाजासोबत उठण्यात एक वेगळाच आनंद असतो, फ्रेश वाटतं एकदम.

+१

आमच्या अंगणातल्या झाडांवर किमान २० वेगवेगळे पक्षी येतात. त्यातल्या बुलबुल, नाचण, दयाळ, सुभग, शिंपी इ. चा किलबिलाट खूप आवडतो. फक्त को़कीळ आणि भारद्वाजांचे घुत्कार पहाटे ताप देतात.

मस्त एकदम. आवडले पर्शिअन फूल. हे सगळे बोम्मन ईराणीचे पावणे रावळे इतके स्टीरीओटाईप गंडॅक्स असतात काय?

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Feb 2016 - 3:56 pm | माम्लेदारचा पन्खा

हे पर्श्यन फूल त्याचीच मेव्हणी आहे....

अगागागागागा. लैच क्लोज बसला. ही पारशी मज्जा तुम्हा मुंबईकरांना राव.
आमच्या हितं इन मिन दोन फॅमिल्या हायेत. जब्बर पैसेवाले असलेने असले किस्से कळत नाहीत.
इथल्या एका पारशाने त्याचा बार विकत मागायसाठी रिवॉल्व्हर घेऊन आलेल्या डॉनला चारचौघात वाजिवला होता. तो किस्सा फेमस आहे. सटीक पब्लिक राव.

होबासराव's picture

9 Feb 2016 - 3:35 pm | होबासराव

:))

अभिजीत अवलिया's picture

9 Feb 2016 - 11:18 pm | अभिजीत अवलिया

ही सत्य घटना आहे?

रातराणी's picture

13 Feb 2016 - 12:02 pm | रातराणी

खीखीखी भारीच आहेत कि आंटी :))

प्राची अश्विनी's picture

13 Feb 2016 - 12:26 pm | प्राची अश्विनी

सही लिहिलयं. खरंच झालं का असं?

प्राची अश्विनी's picture

13 Feb 2016 - 12:26 pm | प्राची अश्विनी

सही लिहिलयं. खरंच झालं का असं?

मनिमौ's picture

13 Feb 2016 - 6:35 pm | मनिमौ

लाल अंकल विषयी बोलत आहेस का?

स्टेशन्जवळचे गुडलक. ते पारशी हायेत की दाऊदी बोहरा ते जर्रासे कन्फ्युज है पण माझ्या अंदाजाने पारशीच.

बादवे गुडलक, स्टार आणि नाझ ही नावे झरत्रुष्ट अप्रुव्हड आहेत काय? आदूबाळ, बोकेश किंवा गविराज सांगू शकतील भौतेक.

विजय पुरोहित's picture

13 Feb 2016 - 8:10 pm | विजय पुरोहित

स्टार फक्त माॅमेडियन वाटतं. गुडलक, नाझ बर्यापैकी पारशी वाटतात...

आपल्याकडे जशा दीपाली, रूपाली, सोनाली असतात तशा त्यांच्यात पेरिनाझ, बेनाझ, महानाझ, देलनाझ वगैरे असतात. झाद हे अजून एक. शक्यतो पुरुषांना. एखादी पेरिझाद निघते, नाही असं नाही, पण झाद शक्यतो पुरुष. शहरझाद, मेघझाद, कैझाद, अलझाद वगैरे नावं असतात.
गुडलक आणि स्टारचं माहित नाही पण नाझ पारश्यांमध्ये
ब-यापैकी असतं.

त्याचं स्पेलिंग ते vala असं करत असतील तर पारशी. wala असं करत असतील तर बोहरी.उदाहरणार्थ Motivala हे पारशी आणि Motiwala हे बोहरी.

जव्हेरगंज's picture

13 Feb 2016 - 7:51 pm | जव्हेरगंज

लय भारी !!!

चलत मुसाफिर's picture

15 Feb 2016 - 9:34 am | चलत मुसाफिर

"माझा कोंबडा कोणी मारयिला" या भावपूर्ण गीताची आठवण झाली!

स्वाती दिनेश's picture

16 Feb 2016 - 1:49 am | स्वाती दिनेश

खुसखुशीत लिहिले आहे,
स्वाती

पैसा's picture

16 Feb 2016 - 2:35 pm | पैसा

=))

मी-सौरभ's picture

16 Feb 2016 - 4:50 pm | मी-सौरभ

बावाजि की जय हो!!!

चिगो's picture

16 Feb 2016 - 6:28 pm | चिगो

कोंबड्यांच्या आरवण्याचा लैच उच्छाद असतो साला.. माझ्या SDO पोस्टींगमध्ये माझ्या आधीच्या साहेबाला कुणीतरी कोंबडा-कोंबडीची जोडी दिली. त्यांची पिलावळ झाली मोठी. आता हा झाला इमोशनल.. मला चार्ज देतांना म्हणे मारु नको. मी पण हो म्हणालो येड्यासारखा..

तर त्यातला एक गिर्रेबाज कोंबडा साला नेमका बेडरुमच्या खिडकीशी येऊन बोंबलायचा रोज.. एकतर दिवस लवकर उजाडतो इथे. पार पिसाळलो मी.. सकाळी उठल्या-उठल्या नेमबाजी सुरु व्हायची.. त्याला पकडून कापला तर त्याचा आत्मा घुसलयासारखा दुसरा कोंबडा तिथंच येऊन बोंबलायचा.. शेवटी तीन-चार शहीद झाल्यावर ही परंपरा थांबली आणि मला सुखाची झोप लाभली..

मज्जा आली परत हा लेख वाचायला =))

साहना's picture

25 Oct 2016 - 2:08 am | साहना

दोन दा लेख वाचला. खरोखर मजेशीर घटना आहे आणि तुम्ही लिहली सुद्धा छान आहे

आमच्या शेजारी एक जोडपे राहायचे ह्यांचा कुत्रा रात्रभर ओरडून आमचा जीव खायचा. जोडपे कदाचित झोपेच्या गोळ्या घेत असल्याने त्यांना त्रास होत नव्हता. आम्ही अनेकदा तक्रार केली तर हि लोक मलाच शिव्या द्यायची. दर रविवारी हे जोडपे घरी कसल्या तरी संप्रदायाची भजने ठेवायची आणि बाहेरून एक गुरुजीवजा माणूस येत असे. ह्याच्याशी ओळख करून घेतली. ह्यांच्या संप्रदायाला ५००० रुपयांची देणगी दिली. पुढच्या रविवारी बाबाजी महाराजांनी जोडप्याला सांगितले कि कुत्र्याच्या भोवती काळ्या शक्ती आहेत आणि कुत्र्यामुळे कलह निर्माण होईल. त्या कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा. संध्याकाती महिला मला भेटली आणि कुत्र्याचे काय करावे अशी विचारणा केली. मी "तुमचा कुत्रा काही ठीक वाटत नाही" माझ्या चेहेऱ्यावरचे भीती पाहून ती महिला तर फारच घाबरली कुत्रा घरी आहे तोपर्यंत रात्री झोपायला सुद्धा तयार नव्हती. कुत्र्याला कुठे तर high way वर सोडून यायला सुद्धा तयार होती पण माझ्या मनात भूतदया असल्याने मी पदरचे पैसे खर्च करून कुत्रा एक प्राणी मित्र संघटनेला भेट दिला. नंतर मला वेट ने सांगितले कि त्याला कसला तरी पोटाचा आजार होता आणि त्यामुळे संध्याकाळी खाल्ले कि तो पोटदुखीने ओरडायचा. सध्या तो बरा आहे.