४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे:

सुधीर वैद्य's picture
सुधीर वैद्य in जनातलं, मनातलं
31 Dec 2015 - 6:26 pm

४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे:

प्रत्येक माणूस आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवत असतो. ध्येय निश्चित करताना स्वत:ची कुवत (ability ) लक्षात घेणे जरुरीचे असते. तसेच ध्येय सिद्धीसाठी अपार श्रम आणि जोडीला कमीतकमी नशीब आवश्यक असते.

काहीवेळा ध्येय अपेक्षेप्रमाणे साध्य होते. काही वेळा प्रयत्न करून सुद्धा, अपेक्षित यश हुलकावणी देत राहते. यश किंवा अपयश ह्याची गाठ घालणारे नशीब असते. अपयश आले तरी माणूस प्रयत्न सोडत नाही पण यश मिळाले नाही तर मात्र कालांतराने निराश होतो.

ध्येय ठरवताना मनात असलेली 'आस ', प्रत्येक अपयशाबरोबर 'ध्यास ' मध्ये रुपांतरीत होत असते. परंतु एका टप्प्यावर तो माणूस अपयशाने एव्हडा खचून जातो कि हा प्रवास 'हव्यास ' ह्या निसरड्या रस्त्यावरून सुरु होतो. हाच तो क्षण असतो स्वत:ला सावरण्याचा.

यश मिळाले तरी प्रवास संपत नाही. यश टिकवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवावे लागतात. यश मिळाले तरी टक्कर देण्यासाठी नवीन स्पर्धक येतात . स्पर्धा म्हटले कि तुलना आली. परत हार - जीत चे tension आले.

यश टिकून राहिले तर अहंकार होण्याची भीती असते. एकदा माणसाला अहंकार झाला कि आजूबाजूच्या परिस्थितीचे त्याला भान रहात नाही, बरोबर -चूक ह्याच्या संकल्पना डळमळीत होतात, नितीमत्तेची नवीन व्याक्य तयार केली जाते आणि परत एकदा यशस्वी माणसाचा प्रवास कायम ' यशस्वी होण्याची आस ', मग यशस्वी होण्याचा ' ध्यास ' व त्यानंतर यशस्वी होण्याचा ' हव्यास ' असाच निसरड्या रस्त्यावरून सुरु होतो.

यश आणि अपयश ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकदा का माणूस यश आणि अपयशाच्या चक्रात गुरफटला कि तो ह्या प्रवासात मिळणाऱ्या आनंदाला पारखा होतो. यशाबरोबर पद - पैसा - मानमरातब मिळतो पण यशाचा मानसिक आनंद टिपण्यासाठी आवश्यक असलेले मन मात्र हरवलेले असते.

कामातील मिळणाऱ्या आनंदापेक्षा काहीच मोठे नसते,

सुधीर वैद्य
१७-१२-२०१५

Time Permitting, Follow me on .....

http://spandane.wordpress.com/
www.spandane.com

समाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिक्रियासमीक्षामतसल्लाप्रतिभा

प्रतिक्रिया

त्रिकालाबाधित सत्य.....