✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुणेरी कथालेखक - २

D
DEADPOOL यांनी
Fri, 11/27/2015 - 22:31  ·  लेख
लेख
पुनश्च गजाननाच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने! १.तुळशीबागेत 'भेटेल' तुला मी. यातील भेटेल शब्दात अत्यंत मोठा गर्भितार्थ आहे. त्यामुळे या शब्दांवर आक्षेप घेणाऱ्यास घाणघापुरचा मेसेज पाठविण्यात येईल! २.आम्ही पुण्यातील असण्यावर आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीने शनिवारवाड्याचा प्रथम मालक कोण याचा शोध घ्यावा. (ती वास्तू आम्ही पेशव्यांना भेट दिली होती) ३."कथा ५१ भागातच का?" हा लाडिक प्रश्न विचारणार्या लोकांस 'एकीवरील आकड्यांचे महत्व' हे चा.द.रसोड यांचे पुस्तक पाठविण्यात येईल. (सोबत बिलसुद्धा पाठविण्यात येईल, काळजी नसावी) ४.शुद्धलेखनाच्या चुका काढणाऱ्या आसामीस २० रुपये देऊन ११ रुपयांची वस्तू घेण्यास पाठविण्यात येईल. (२० रूपये आपल्या तीर्थरूपांकडून व्याजसहित वसूल करण्यात येतील.) ५.जरा मोठा भाग टाकायला हवा होता, अशी प्रतिक्रिया देणाऱ्यास आमच्याकडे विनामूल्य टायपिंग करण्यास मिळेल. (आम्ही सांगू तेच टाईप करावे लागेल.) ६.पुढील भाग टाकण्यास आम्ही पराशेठ यांना आदर्श मानतो. ७.विनाकारण खरडवही भरवू नये, अन्यथा आपली कागद, दौत, व लेखणी घेण्याची ऐपत नाही असे आम्ही समजू. ८.कथेमधील उपमा न समजल्यास आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन करून व्य.नि करु नये. आमच्या असामान्य प्रतिभेचा प्रत्यय आला म्हणून दगडूशेठास ११ रुपयांचा प्रसाद वहावा! ९.आमच्या कथेत नाट्य व काव्य ओतप्रोत भरले असल्याने,यांवर चित्रपट निघू शकतो, असे काही महाभाग विचार करु शकतात. परंतु विश्वाची लोकसंख्या लक्षात घेता, अपूर्ण कलाकारांच्या संख्येमुळे काही पात्रांसाठी परग्रहवासियांना घेण्यास आम्ही उदार अंत:करणाने परवानगी दिली आहे. १०.कथेवर स्तुतीपर प्रतिसाद देण्यास परवानगी आहे. (पुनश्च उदार अंत:करण!) ११.वाट चुकलेल्या प्रतिसादास व व्यक्तीस कात्रजचा घाट दाखविण्यात येईल!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नाट्य
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
विडंबन
भाषा
प्रतिशब्द
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
विनोद
तंत्र

प्रतिक्रिया द्या
9996 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

प्रथम भाग!

DEADPOOL
Fri, 11/27/2015 - 22:37 नवीन
www.misalpav.com/node/33886
  • Log in or register to post comments

कात्रज बाइपासतरी दाखवा लवकर

कंजूस
Sat, 11/28/2015 - 05:45 नवीन
कात्रज बाइपासतरी दाखवा लवकर पोहोचू खेड शिवापुरच्या ढाब्यांवर.
  • Log in or register to post comments

हा वो!

DEADPOOL
Sun, 11/29/2015 - 13:06 नवीन
आणू की अच्छे दिन! थाम्बा जरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अति सर्वत्र वर्जयेत

सुबोध खरे
Sat, 11/28/2015 - 06:43 नवीन
अति सर्वत्र वर्जयेत
  • Log in or register to post comments

काय राव!

दत्ताभाऊ गोंदीकर
Sat, 11/28/2015 - 08:56 नवीन
कथा कधी लिहिणार ?
  • Log in or register to post comments

एक मराठी कथालेखक आहेत ,ते

जेपी
Sat, 11/28/2015 - 09:00 नवीन
एक मराठी कथालेखक आहेत ,ते स्वपिडन करतातात. तुम्ही परपीडनाचा वसा घेतला आहे का ??
  • Log in or register to post comments

yes!!!!

DEADPOOL
Sat, 11/28/2015 - 09:11 नवीन
yes!!!!
  • Log in or register to post comments

तुमाला सुबेच्चा आन पुस्पगुच्च

जेपी
Sat, 11/28/2015 - 11:14 नवीन
तुमाला सुबेच्चा आन पुस्पगुच्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

सात प्रतिसादांतच पूस्पगुच्?

बोका-ए-आझम
Sat, 11/28/2015 - 14:48 नवीन
पूर्वीचं मिपा राहिलं नाही हेच खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

पाट्या बहाद्दर

महासंग्राम
Sat, 11/28/2015 - 10:12 नवीन
तुम्हाला मिपावरचा पाट्याबहाद्दर हा खिताब देण्यात येत आहे….
  • Log in or register to post comments

असहिष्णुतेमुळे आम्ही

DEADPOOL
Sat, 11/28/2015 - 11:05 नवीन
असहिष्णुतेमुळे आम्ही हा किताब परत करत आहोत!
  • Log in or register to post comments

च्यायला, आवडलं राव हे!!

जव्हेरगंज
Sat, 11/28/2015 - 21:26 नवीन
च्यायला, आवडलं राव हे!! मागच्या भागापेक्षा हे जबरी!! लय भारी!!
  • Log in or register to post comments

धंस्स!

DEADPOOL
Sat, 11/28/2015 - 21:40 नवीन
राव काही ग्रामीण कथा येऊ द्या की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

वाट बघतोय

आनंद कांबीकर
Sun, 11/29/2015 - 00:42 नवीन
51 भागी कथेची!
  • Log in or register to post comments

वाट बघतोय

आनंद कांबीकर
Sun, 11/29/2015 - 00:46 नवीन
51 भागी कथेची!
  • Log in or register to post comments

अहो त्या कथेचा उल्लेख फक्त विनोदासाठी आहे!

DEADPOOL
Sun, 11/29/2015 - 10:40 नवीन
अहो त्या कथेचा उल्लेख फक्त विनोदासाठी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद कांबीकर

आता कथा येवू द्य), कौतुक झाले

शित्रेउमेश
Tue, 12/01/2015 - 08:37 नवीन
आता कथा येवू द्य), कौतुक झाले असेल तर...(आम्ही पण पुणेकरच...;))
  • Log in or register to post comments

तुम्ही मूळचे पुणेकर दिसत नाही

पैसा
Tue, 12/01/2015 - 09:39 नवीन
तुम्ही मूळचे पुणेकर दिसत नाही!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा