मिपावर मध्यंतरी 'काही वेगळे चित्रपट' या धाग्यावर हॉलीवुडचे बरायचश्या सुंदर चित्रपटांचे उल्लेख मिळाले, त्यापैकी 'टॉम हँक्स' अभिनीत 'फॉरेस्ट गम्प' पासून सुरवात केली. निसर्गाने मानवाला बनवताना कोणते रसायन वापरले याचा उलगाड़ा अजूनही आपल्याला झालेला नाही, फॉरेस्ट गम्प मधून पुन्हा एकदा हे रसायन समजुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. विन्स्टन ग्रूम या लेखकाने लिहिलेल्या "फॉरेस्ट गम्प' याच शीर्षकाच्या कादंबरीवर हा चित्रपटला ऑस्करचे उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, अभिनेता, संपादन इत्यादी एकूण सहा पुरस्कार मिळाले. प्रमुख भूमिकेत असणारा टॉम हॅन्क्स याला तर सर्वांगसुंदर अभिनयाकरिता सलग दुसऱ्या वर्षी "ऑस्कर' मिळाला होता. चित्रपटाची सुरवात होते तो जेनिला भेटायला आलेला फॉरेस्ट एका बस स्टॉप वर फ्लॅशबॅक मधे स्वताची गोष्ट सांगत असताना, बोलताना तो कायम, "My mumma always said" ने सुरवात करतो. त्याच्या सगळयाच गोष्टी निराळ्या होत्या, लहानपणापासून पायाला लागलेल्या सपोर्ट मुळे कायमच सगळ्यांचा चेष्टेचा विषय बननेला फॉरेस्टचा आईवर नितांत विश्वास आहे कारण त्याची ममा नेहमी त्याला सांगत असते, "लक्षात ठेव, तू इतर सर्वांसारखाच आहेस, थोडासुद्धा निराळा नाहीस.' पुढे शाळेत गेल्यावर त्याला मैत्रीण भेटते 'जेनी', हिच्या बरोबर त्याच मैत्रीच नातं अगदी मोरपिसाप्रमाणे आहे आसान फॉरेस्टला वाटतं आणि अगदी आयुष्यभर तो ते नातं तसच जपतो.एके दिवशी जेनी व तो रस्त्याने जात असताना केवळ त्रास देण्याकरिता तीन मुले सायकलवरून त्याचा पाठलाग करू लागतात. तेव्हा जेनी फॉरेस्टला सांगते, "रन फॉरेस्ट रन !'' तोही जीव एकवटून धावू लागतो-सुरवातीला अडखळणारा फॉरेस्टला तिचा आवाज जणू अनोखी ऊर्जा देतो तोही वेगाने, अधिक वेगाने धावू लागतो.सळ्या निसटून-गळून पडतात... पाय वाऱ्याचा वेग पकडतात आणि एका नव्या फॉरेस्टचा जन्म होतो.
कॉलेज मध्ये गेल्यावर या धावण्याच्या वेगाने त्याने अमेरिकन फुटबॉल च्या टीम मध्ये स्थान मिळते. यासगळ्यांमधे दूर निघून गेलेली त्याची बेस्ट फ्रेंड 'जेनी' एका बाजूने कायम त्याची सोबत करत असते. यथावकाश कॉलेज पासआउट होऊन फॉरेस्ट सैन्यात भरती व्हायला निघतो. व्हिएतनाम युद्धामधे आपल्या मित्रांचा जीव वाचवण्यासाठी फॉरेस्टला शौर्य पदक मिळतं, पण या सर्वांत, आपण जिवलग मित्र बूबा याला मात्र युद्धामध्ये वाचवू शकत नाही याचे एक शल्य राहते. पुढे त्या दोघांनी ठरवल्याप्रमाणे तो "बूबा आणि गम्प' नावाची मासेमारीची कंपनी तो सुरू करतो. यातही त्याला प्रचंड यश मिळतं. मग 'जेनी' पुन्हा त्याच्या आयुष्यात येते तेव्हा जेनीला प्रपोज केल्यानंतर ती नकार देते तेव्हा टॉम हँक्स अर्थात फॉरेस्ट म्हणतो, "I an not smart, but i know what love is…" एखादया लहान मुलाने बोलावं इतकं निरागसतेने टॉम हे वाक्य म्हणतो. कदाचित या जान कुर्बान अभिनयासाठीच त्याला ऑस्कर मिळालं असणार. जेनिच्या रूपाने फॉरेस्टच्या आयुष्यात आलेला बहर ती निघुन गेल्याने जाते आणि यामुळे कोलमडलेला फॉरेस्ट नकळत पुन्हा एकदा धावायला सुरवात करतो अगदी न थकता न थांबता.....
सतत दोन-तीन वर्षे धावत असलेल्या फॉरेस्ट अचानकपणे थांबाव असं वाटतं, ज्या नकळतपणे तो धावायला सुरवात करतो त्याच नकळतपणाने थांबतो सुद्धा आणि म्हणतो,"मी आता दमलोय. मी घरी जाणार".
पुढे काही दिवसांनी त्याला जेनीच पत्र येते त्यात ती त्याला भेटायला बोलवते, तिथे त्याला जेनी सांगते की हां आपला मुलगा आहे जेनी त्याला त्यांच्या मुलाबद्दल सांगते तेंव्हा तो तिला विचारतो." Is he like me? she says no he is OK." हे वाक्य सांगून जाते कि त्याला त्याचातली कमतरता माहित असते.
चित्रपटाच्या शेवटी एका विस्तीर्ण झाडाखाली जेनीचे थडगे आहे. त्याच्याजवळ उभे राहून बापलेकांचे क्षेमकुशल तो थडग्यातील जेनीला सविस्तरपणे सांगतो आहे. त्याने तिला "सवडीने वाचण्याकरिता' एक पत्रही लिहिले आहे, तो ते वाचण्यासाठी तिथे ठेवतो तिथून परतताना आकाशात उडणारे पक्षी त्याचे लक्ष वेधून घेतात. लहानपणी दोघांनी मिळूनकेलेली प्रार्थना त्याला आठवते.
'सेविंग प्रायवेट रायन' म्हणा की 'दा विंची कोड' या मुळे मी टॉम हँक्स चा आधीपासूनच पंखा होतो पण 'फॉरेस्ट गम्प' पाहिल्यानंतर त्याच्यावर अजूनच जास्त जीव जड़ला अस म्हणायला हरकत नाही. माणसाने किती निरागसतेने अभिनय करावा. एकूणच काय संवाद म्हणा किंवा अभिनय सगळ्याचा लेवल वर 'फॉरेस्ट गम्प' आपली छाप नकळत पाडतो. आयुष्यात नक्की पहावा असा हा चित्रपट.
प्रतिक्रिया
24 Nov 2015 - 1:12 pm | पिशी अबोली
फार आवडता चित्रपट. परत पाहिला पाहिजे. खरंच त्याच्या निरागसतेवर जीव जडावा इतका छान अभिनय आहे त्याचा. :)
24 Nov 2015 - 1:28 pm | मितान
सुदर सिनेमा आहे हा ! टॉम हैंक्स चं अप्रतिम काम !!
24 Nov 2015 - 2:22 pm | वेल्लाभट
प्रचंड प्रचंड आवडता पिक्चर....
टॉम हँक्सच आवडतो जाम
त्यामुळे त्याचं कुठलंही काम आवडतं.
फॉरेस्ट गंप इस अ ब्यूटिफुल मूव्ही. ब्यूटिफुल.
24 Nov 2015 - 2:40 pm | चांदणे संदीप
+11111111111111111111111111
मस्त लिहील आहे... आवडल!
Sandy
24 Nov 2015 - 3:21 pm | बाबा योगिराज
येक लंभर पिचकर हाय भौ त्यों. लै म्हणजे लै च भेष्ट पिचकर.
टॉम भौ च काम तर लै जाब्राट. आपन भी पंखा है उस पिचकर का.
24 Nov 2015 - 3:21 pm | बाबा योगिराज
येक लंभर पिचकर हाय भौ त्यों. लै म्हणजे लै च भेष्ट पिचकर.
टॉम भौ च काम तर लै जाब्राट. आपन भी पंखा है उस पिचकर का.
24 Nov 2015 - 3:32 pm | बोका-ए-आझम
काही अप्रतिम असतात. काही ' बाप ' असतात. फाॅरेस्ट गम्प हा बाप क्याटेगरीतला आहे. टाॅम हँक्सचं भूमिकेचं बेअरिंग निव्वळ अफाट. त्याच्या नजरेत जो लहान मुलासारखा निरागसपणा आहे तो एक क्षणभरही गढूळ होत नाही.
24 Nov 2015 - 3:39 pm | महासंग्राम
अगदी सहमत.… तुमच्याशी त्यामध्ये टॉम "I am not smart, but i know what love is… हे वाक्य ज्या निरागसतेने म्हणतो ना टचकन पाणी येतं डोळ्यात.
24 Nov 2015 - 3:43 pm | उगा काहितरीच
नितांत सुंदर चित्रपट !
24 Nov 2015 - 4:16 pm | पद्मावति
अत्यंत आवडीचा चित्रपट. कितीही वेळा पाहु शकते. शेवटचा जेनीच्या ग्रेव समोरचा प्रसंग प्रत्येक वेळेस रडवतो.
24 Nov 2015 - 7:46 pm | एस
टॉम हँक्सचा कुठलाच चित्रपट टाळण्यासारखा नसतो. फॉरेस्ट गम्प हा तर भारी आहे त्या लिस्टमधला. अजून एक आवडता चित्रपट म्हणजे 'कास्ट अवे'.
25 Nov 2015 - 2:38 am | रातराणी
टॉम हॅंक्सचे सगळेच मूवी आवडतात. यु हॅव गोट मेल असो की स्लीप्लेस इन सियाटल की फॉरेस्ट गंप असो की कास्ट् अवे प्रत्येक भूमिकेत तो तोच वाटतो.
25 Nov 2015 - 2:04 pm | अमृत
यू हॅव गॉट अ मेल, कास्ट अवे, अपोलो १३, कॅच मी इफ यु कॅन, द ट्रमिनल, दा विंची कोड, एंजल अन्द डेमोन, सेविंग प्रायवेट रायन सगळेच उत्कृष्ट आहेत. अवश्य बघा.
27 Nov 2015 - 11:57 pm | DEADPOOL
saving mr. banks राहिला!
25 Nov 2015 - 7:15 pm | अजिंक्य विश्वास
बिग, फिडाडेल्फिया, हे सुद्धा एकदा नक्की बघण्यासारखे आहेत.
27 Nov 2015 - 5:27 pm | शिव कन्या
व्यवस्थित परिचय..... बघणार.
27 Nov 2015 - 10:09 pm | श्रीरंग
I am not smart, but i know what love is…
प्रत्येक वेळी पाहताना पोटात खोल खोल खड्डा पडल्यासारखं होतं या वाक्याला. लेखन, दिग्दर्शन, अभिनय.. सर्वच केवळ अप्रतीम.
(*टिम बर्टनचा "बिग फिश" पण आवर्जून पहा. नक्की आवडेल)
28 Nov 2015 - 10:03 am | महासंग्राम
खरच लाखामोलाच वाक्य आहे हे…
27 Nov 2015 - 10:15 pm | जातवेद
नुकताच आलेला 'ब्रिज ऑफ स्पाईज' पण अवश्य बघा, छान आहे.
28 Nov 2015 - 10:01 am | महासंग्राम
व्यक्तीशः ब्रिज ऑफ स्पाइज मला थोडा स्लो वाटला पण टॉम काका भन्नाट आहेत….
27 Nov 2015 - 10:30 pm | अजया
हा धागा वाचून कालच हा चित्रपट बघितला.
सर्वच बाबतीत अतिशय उत्कृष्ट. धन्यवाद .
आता इथे रेकमेंड झालेले सर्वच टाॅम हँक्सचे चित्रपट बघायचा विचार आहे.
28 Nov 2015 - 9:59 am | महासंग्राम
सगळे नक्की पहा पण सुरवात सेविंग प्रायवेट रायन पासून करा …. आणि हो 'सेप्रारा' हा विन डिजल (हाच उच्चार असावा बहुतेक) चा पहिला चित्रपट आहे बरं का !!
27 Nov 2015 - 11:54 pm | DEADPOOL
सर टॉम!
28 Nov 2015 - 11:49 am | सिरुसेरि
"वे टू पर्डिशन" गाजलेला आहे .
28 Nov 2015 - 4:42 pm | जव्हेरगंज