मनाच्या आकाशवाणी केंद्रावरून !

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
6 Nov 2015 - 3:48 pm

मध्यमध्वनीलहरी ४२० कि.ह.
आम्ही मनाच्या आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत.
सकाळचे पाच वाजून पंचावन्न मिनिटे आणि तीन सेकंद झालेत.
आमच्या आज प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा...
सकाळच्या सभेत सुरुवातीला ऐकू या ‘भक्तीवंदना’!
यात ज्याच्यात्याच्या मनाचे श्लोक सादर होतील!
त्यानंतर ‘मनाची शेती’ कार्यक्रमात,
‘मनातल्या गाजर गवताला आळा कसा घालावा?’
याविषयी मार्गदर्शन केले जाईल.
दिवसभराच्या जगण्याच्या झेंगटाचा आढावा घेतला जाईल,
‘हवामनाचा अंदाज’ मध्ये!
विविध वाहिन्यांवरून प्रक्षेपित होणाऱ्या
भल्याबुऱ्या बातम्यांचे सहक्षेपण दरघटकेला होईलच!
गृहिणींसाठी ‘मनातल्या पाककृती आणि प्रत्यक्षातील रसनिष्पत्ती’
या विषयावर कोरडी चर्चा होईल.

दुपारच्या कामगार सभेत
‘कार्यालयीन मन:शैली’ या सदरात
‘रिकाम्या वेळेतील मनाचे उद्योग’ याविषयी
गभळक्षऋ यांची मुलाखत सादर होईल.
त्यानंतर ‘देश कि सुरिली धडकन’
मनाचे आकाशवाणी केंद्र पुनःपुनःप्रक्षेपित करेल!

संध्याकाळी सहा वाजता
‘आपले मन, आपली माणसं’ यात
जुन्या आठवणी, कातर वेळा,
हरवलेले क्षण, सापडलेल्या डायऱ्या
इत्यादींचा इमोसनल आढावा घेतला जाईल.

‘फोनइन’ मध्ये मनाच्या मनपसंत
गीतांचा कार्यक्रम सादर होईल!
रात्री साडेदहा वाजता ‘बेला के फूल’!
whatsapp, फेबुक, गुगल, स्काईप, तूनळी
इत्यादी कशावरूनही मन रेंगाळत राहील.
रात्री ठीक अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी
मनाच्या आकाशवाणी केंद्राचे बाह्य प्रसारण
आपोआप विराम पावेल!

अनर्थशास्त्रकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कवितामांडणीवावरसंस्कृतीकलामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रमौजमजा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Nov 2015 - 4:00 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे...

चांदणे संदीप's picture

6 Nov 2015 - 4:44 pm | चांदणे संदीप

मस्तच!

एस's picture

7 Nov 2015 - 12:54 am | एस

:-)

रातराणी's picture

7 Nov 2015 - 1:14 am | रातराणी

मन असा आयडी नाहीये का अजून.

सतिश गावडे's picture

7 Nov 2015 - 10:41 am | सतिश गावडे

मन
मन१
मनराव

अजूनही बरेच असतील...

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2015 - 5:01 pm | टवाळ कार्टा

मनरंग असाही एक आयडी आहे भौतेक

स्वाती दिनेश's picture

7 Nov 2015 - 1:26 am | स्वाती दिनेश

आवडले स्फुट!
स्वाती

इडली डोसा's picture

7 Nov 2015 - 1:31 am | इडली डोसा

आवडले.

संदीप डांगे's picture

7 Nov 2015 - 2:08 am | संदीप डांगे

सहज सुंदर सालस.... :-)

मांत्रिक's picture

7 Nov 2015 - 10:23 am | मांत्रिक

मस्त आणि नर्मविनोदी..
मनातल्या पाककृती आणि प्रत्यक्षातील रसनिष्पत्ती हे अगदी गंमतीशीर...

सतिश गावडे's picture

7 Nov 2015 - 10:41 am | सतिश गावडे

मस्त... आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Nov 2015 - 5:41 pm | अत्रुप्त आत्मा

हही हही हही!

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2015 - 8:43 pm | टवाळ कार्टा

कसं जम्तं हो असं हसायला =))

मांत्रिक's picture

7 Nov 2015 - 9:09 pm | मांत्रिक

हह्ही हह्ही हह्ही
असं हसायचं असतं ते टक्कुमहाराज.
इतकं पण कळत नै? हुम्म!!!
दू दू दू टक्का!!!!
तुम्ही निरर्थक अत्मरंजनात गुंतल्याने वैश्विक मनोरंजनात चाललेल्या व्यक्तीगत स्वप्नरंजनाची तुम्हाला माहिती नाही हा सार्वत्रिक प्रश्णरंजन आहे....
दू दू दू....

टवाळ कार्टा's picture

8 Nov 2015 - 11:02 am | टवाळ कार्टा

हही हही हही! आणि हह्ही हह्ही हह्ही यात फरक आहे

बाकी

तुम्ही निरर्थक अत्मरंजनात गुंतल्याने वैश्विक मनोरंजनात चाललेल्या व्यक्तीगत स्वप्नरंजनाची तुम्हाला माहिती नाही हा सार्वत्रिक प्रश्णरंजन आहे....

हे भारीये =))

एक एकटा एकटाच's picture

7 Nov 2015 - 6:25 pm | एक एकटा एकटाच

आवडलं

परिकथेतील राजकुमार's picture

7 Nov 2015 - 8:22 pm | परिकथेतील राजकुमार

हेच मुक्तक पुरुष आयडी कडून आले असते, तर मिपाच्या आकाशवाणी केंद्रावरून काय काय प्रतिक्रिया प्रसारीत झाल्या असते बरे परा? ;)

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2015 - 8:42 pm | टवाळ कार्टा

कहर =))

_मनश्री_'s picture

7 Nov 2015 - 8:32 pm | _मनश्री_

आवडले.
छान लिहिले आहे...
1

पैसा's picture

7 Nov 2015 - 8:34 pm | पैसा

छान लिहिलंय!

राघवेंद्र's picture

8 Nov 2015 - 1:44 am | राघवेंद्र

मस्त !!!