माझा एक लंगोटीयार सध्या पुण्यातून मनीला (फिलीपाईन्स) इथे स्थलांतरित झालाय. सध्या तो एकटाच तिकडे गेलाय. थोड्याच दिवसात घर शोधून कुटूंब स्थलांतरित करेल.
मिसळपावकरांपैकी कोणी मनीला इथे आहेत का? माझ्या मित्राला घर शोधायला मदत करु शकेल अशी माहीती कोणाला असल्यास कृपया व्य. नि. तून संपर्क साधावा.
धन्यवाद!
चतुरंग
प्रतिक्रिया
21 Dec 2008 - 9:59 am | विसोबा खेचर
मला खालील गाण्यांची मप३ हवी आहेत. कुणाकडे असल्यास, वा कुणी जालावर शोधून मला ती tatya7@gmail.com या पत्त्यावर पाठवल्यास मी आभारी राहीन..
१) मेने तुझे मांगा तुझे जाना है.. (चित्रपट : दिवार) हा पाहा यूनळीचा दुवा.
२) पिया बावरी.. (चित्रपट: रेखाचा खूबसुरत)
३) गाबुजी गाबुजी गम गम (चित्रपट : दिवार) हा पाहा यूनळीचा दुवा.
( हे गाणे तर छान आहेच परंतु आपल्या पुनमच्या दिसण्यामुळेही हे गाणे अंमळ त्रास देऊन जाते! ते असो..! ;) )
बाकी दोघांचे आहेत परंतु पिया बावरीचा यूनळीचादेखील दुवा मला जालावर भेटला नाही. जालावर ही गाणी मिळवण्याकरता व उतरवून घेण्याकरता मी बरेच यत्न केले परंतु मला अपयश आले. कुणी मदत करेल काय?
संगीताचा अभ्यास करण्याकरता मला ही गाणी माझ्या भ्रमणध्वनीत हवी आहेत. यूनळीच्या दुव्यातली गाणी भ्रम्णध्वनीत नीट दिसत नाहीत. म्हणून तिन्ही गाण्यांची मप३ आवृत्तीच हवी आहे.
तात्या.
21 Dec 2008 - 10:43 am | लंबूटांग
मैने तुझे मांगा तुझे जाना है.. (चित्रपट : दिवार) दीवार चा पूर्ण अल्बम
गाबुजी गाबुजी गम गम हे गाणे दिवार चित्रपटात नसून त्रिशूल चित्रपटात आहे. हा घ्या दुवा
पिया बावरी इथे मिळेल.
21 Dec 2008 - 3:48 pm | विसोबा खेचर
लंबुटांगराव,
आपण दिलेल्या दुव्यांवरून मेने तुझे मांगा व गाबुजी गाबुजी ही दोन्ही गाणी भेटली..
भोत भोत मेहेरबानी.. :)
गाबुजी गाबुजी गम गम हे गाणे दिवार चित्रपटात नसून त्रिशूल चित्रपटात आहे.
आपलं म्हणणं खर आहे. आमची मिष्टेक झाली..
आपला,
शशीतात्या कपूर.
21 Dec 2008 - 10:35 am | संजय अभ्यंकर
तात्यानू,
"पिया बावरी" आताच पाठवले.
"मैने तुझे मांगा" शोधतोय.
"गाबूजी ..." माझ्या जवळ नाही.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
21 Dec 2008 - 3:40 pm | विसोबा खेचर
अभ्यंकरसाहेब,
आपण पाठवलेले पिया बावरी मिळाले!
भोत भोत मेहेरबानी! :)
आपला,
(आडनांवबंधु) तात्या अभ्यंकर.
21 Dec 2008 - 10:44 am | आजानुकर्ण
पटनी कम्प्युटर्सचा एक प्रकल्प तिथे चालू आहे. पटनीमध्ये कोणी ओळखीचे असले तर बघा. विशेषतः ईएआय मध्ये
आपला
(एण्टरप्राईझेस कन्सल्टण्ट) आजानुकर्ण