रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल.
रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी.
गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले. या संदर्भातील काही लेख आंतरजाल तसेच व्हॉटसएप इ.वर उपलब्ध आहेत त्यातील हा एक त्यात असलेल्या तपशीलवार माहितीमुळे इथे देत आहे.
*** बहुचर्चित अशा सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा आज निकाल लागलाय. सलमान या प्रकरणात दोषी आढळलाय... त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय तसंच २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आलाय. पण, ही शिक्षा रविंद्र पाटीलच्या उद्ध्वस्त आयुष्यासमोर काहीच नाही... रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला.
➡रविंद्रनं दाखल केली होती एफआयआर...
याच रविंद्र पाटीलनंच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दिली होती. मूळचा धुळ्याचा असलेला रवींद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल.... मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होता. रवींद्रचे दोन्ही मोठे भाऊसुध्दा पोलीस दलातच कार्यरत होते.
➡रविंद्रनं कोर्टात दिली होती खरी साक्ष...
रविंद्र हा या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार होता... रविंद्रनं वांद्रे कोर्टात, सलमाननं जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला... यावेळी तो मद्य प्यायलेला होता... आपण त्याला याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती.
➡रविंद्रवरचा दबाव वाढला...
यानंतर, 'हिट अॅन्ड रन' प्रकरणामुळे रविंद्रवरचा दबाव वाढला होता. तो कोर्टात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायलाही घाबरत होता. त्यामुळेच तो डिप्रेशनमध्ये गेला...
➡पोलिसांचीच रविंद्रला वाटत होती भीती...
सीनिअर पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरीवर अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रविंद्रला नोकरीवरून काढलं होतं. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला... त्यामुळे रविंद्रच्या डिप्रेशनमध्ये अजूनच वाढ झाली. त्यानं मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला.
➡कुटुंबीयांपासूनही दूर झाला रविंद्र...
मुंबई सोडल्यानंतर रविंद्र अनेकदा चोरून लपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता. कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता हात घेण्याचा सल्ला दिला होता पण रविंद्रनं त्यांचं ऐकलं नाही...
➡साक्ष बदलण्यासाठी दबाव...
रविंद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी रविंद्रवर खूप जास्त दबाव होता. परंतु, रविंद्रनं शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष बदलली नाही. कुठलीही लाच त्यानं स्वीकारली नाही. धमक्यांना भीक घातली नाही.
➡कोर्टात अनुपस्थित राहण्यासाठी तुरुंगवास...
सलमान खान प्रकरणात कोर्टात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला जेलमध्ये धाडण्यात आलं. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचं सांगत रविंद्रनं आपल्याला तुरुंगात सीरियल किलर्सपासून दूर ठेवण्याची विनंती कोर्टात केली होती. पण, त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.
➡भीक मागण्याची वेळ...
कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रविंद्र बेपत्ता झाला होता... त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचं सांगितलं जातं.
➡रविंद्रचे अखेरचे काही क्षण...
दारूचं व्यसन... आणि क्षयरोग
२०००७ मध्ये तो सेवरी म्युनिसिपल हॉस्पीटलमध्ये सापडला. खूप दारू प्यायल्याचा परिणाम म्हणून रविंद्रला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे, त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम झाला नाही... आणि खंगून खंगून रविंद्रनं याच हॉस्पीटलमध्ये ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. यावेळी, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपैकीही कुणी उपस्थित नव्हतं.
➡न्यायालयानं रविंद्रची साक्ष ग्राह्य धरली...
रविंद्रच्या मृत्यूनंतर २०१४ साली जेव्हा सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला पुन्हा सुरू झाला तेव्हा रविंद्रनं वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य धरण्याची सरकारी वकिलांची मागणी मान्य करण्यात आली...
सलमान खान ला पाच वर्षाची सजा झाली. सेशन कोर्ट जवळ बरेच सेलिब्रिटी सपोर्ट करीता आले होते. ब-याच जणांनी टीव्ही चॅनेल समोर चमकून घेतले. काहींनी अकलेचे तारे तोडले.
या सर्व केसचा उत्कृष्ट तपास करणा-या पोलीसांसाठी एकाही व्यक्तीने किंवा मिडीयाने प्रशंसा उद्गार काढलेले दिसले नाही.
सिनेस्टार ला शिक्षा झाली म्हणून सगळे चवीने चर्चा करतात. मिडीया टी.आर.पी. वाढवत बसली. हिरोला आणखी सूपरस्टार बनवतील.
जर हि शिक्षा झाली नसती तर पोलीसांचे वाभाडे मिडीयाने काढले असते आणि पोलीस तेव्हा बदनामीच्या किताबातील हीरो झाले असते. ***
सौजन्य: zeenews.india.com
या बाबतची आणखी माहिती खालील दुव्यांवर मिळू शकेल.
१. http://m.indiatimes.com/news/india/even-death-didnt-shake-his-conviction...
२. https://patil.wordpress.com/2013/07/08/ravindra-patil-salman-khan-hit-ru...
३. http://lighthouseinsights.in/blogger-soumyadipta-banerjee-deletes-his-po...
दि. ०७/०५/२०१५ च्या मटा मध्येही याबद्दल बातमी आली आहे.
या शिवाय अजूनही बरेच दुवे गुगल वर 'रवींद्र पाटील' या नावाने शोध घेतल्यास मिळू शकतात.
या खटल्यामुळे त्यांची माहिती थोडीफार वर येत आहे नाहीतर ज्या एका माणसाच्या साक्षीमुळे मुख्यत्वे सलमानवर खटला दाखल झाला आणि तो दोषी ठरून शिक्षा ही झाली, त्याचं जगणं आणि मरण दोन्ही अंधारातच राहिलं असतं.
एका धडधाकट देखण्या तरुणाचे केवळ पाच वर्षांच्या कालावधीत झालेले विदारक परिवर्तन मनाला चटका लावून जाते. त्यांची शोकांतिका वाचून कोणाही संवेदनशील माणसाचे मन हेलावून जाईल. सगळ्यात वाईट गोष्ट ही की एका होतकरू तरूणाच्या आयुष्याची परवड होत असतांना कोणीच त्याची मदत केली नाही, स्वत: त्याचं कुटुंब, त्यातही २ भाऊ पोलीस दलातच असतांनाही असं बेवारस मरण एखाद्याला यावं याहून दुर्दैव ते काय?
पोलिस खातं आपल्या रक्षणासाठी आहे असा आपला समज आहे पण हे पोलिसच जेव्हा काही पैशांसाठी विकले जातात आणि अधिकारांचा गैरवापर करून आपल्याच एका सहकाऱ्याच्या जिवावर उठतात तेव्हा कायदा आणि न्यायाची अपेक्षा आपण कोणाकडून करायची ?
'बीइंग ह्यूमन' ही संस्था काढणाऱ्या चि.कु.सलमानच्या माणूसकी बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे.
स्वत: गुन्हा करूनही तो कबूल न करता सुटकेसाठी कोणत्याही थराला जाऊन, गुन्हा आपल्या ड्रायव्हरवर ढकलू पाहणारा आणि कोर्टात शपथ घेऊन निर्लज्जपणे खोटं बोलणारा हा माणूस ढोंगीपणाचा कळस आहे.
त्याची बाजू घेणारे फिल्म इंडस्ट्रीतील लोक आणि बथ्थड बिनडोक चाहते त्याला डोक्यावर घेऊन नाचताएत, त्याच्या नावावर अजूनही बरेच गुन्हे जमा आहेत हेही ते सोयिस्कर रित्या विसरतायत. चित्रपटात अन्यायाविरुध्द पेटून उठणारा, वाईट प्रवृत्तिंचा विनाश करणारा हा 'हिरो' प्रत्यक्ष आयुष्यात किती खलप्रवृत्तिचा निघाला हे कळूनही लोक त्याला सपोर्ट करणे सोडत नाहीत !!
अपघातानंतर सलमानने स्वत:हून जखमींची मदत करायला हवी होती, पोलिसांना कळवायला हवे होते, पण त्याने तिथून पळ काढण्यात धन्यता मानली, तेव्हा त्याची ह्यूमैनिटी कुठे गेली होती ?
नंतरही झालेली चूक सुधारण्याचा त्याने प्रयत्न केला नाही, उलट हे प्रकरण कुठल्याही प्रकारे दडपण्याचाच त्याचा आणि संबंधितांचा प्रयत्न होता. त्याने सरळ मार्गाने गुन्हा कबूल केला असता तर केव्हाच कायद्यानुसार मिळालेली शिक्षा भोगून आज एक प्रामाणिक नागरिक म्हणून तो उजळ माथ्याने फिरू शकला असता, पण एवढा उदात्त विचार त्याने केला असता तर काय होते..
या खटल्यातील अजुन एक दुर्लक्षलेली व्यक्ति म्हणजे कमाल खान, सलमानचा गायक मित्र/चुलत भाऊ, अपघाताचा दुसरा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार !! त्याला ह्या पूर्ण खटल्यातून पध्दतशीरपणे वगळण्यात आलं, तो कधीच समोर आला नाही जेव्हा खरंतर पहिली साक्ष त्याची असायला हवी होती.
१ साक्षीदार ज्याला साक्षीला कधी बोलावलेच गेले नाही
२ रा साक्षीदार ज्याला साक्षीदार संरक्षण (witness protection) मिळायला हवे होते ते दिले नाही, तो देशोधडीला लागून हाल हाल होऊन गेला तरी कोणाला काही पत्ता नाही.
हे सर्व आपल्या देशात, आपल्या कायद्या अंतर्गतच होऊ शकते, कोणी कसा विश्वास ठेवायचा अशा कायदा आणि न्यायव्यवस्थेवर !!
सलमानला शिक्षा झाली नाही झाली तरी त्याच्यामुळे हकनाक गेलेले दोन जीव परत येणार आहेत थोडीच, फक्त त्यांना न्याय मिळाला तरी ठीकच म्हणायचं.
यातील दुवे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून लोकांनी सलमानचा मुखवट्या आडचा चेहरा ओळखून त्याचा उदो उदो करणं बंद करावं यासाठी हा एक छोटासा प्रयत्न..
हा धागा रवींद्र पाटील यांना एक श्रध्दांजली म्हणून ...
त्यांच्या आत्म्याला शांति लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करण्याशिवाय अजून आपण काय करू शकतो ?
प्रतिक्रिया
8 May 2015 - 10:29 am | पैसा
प्रचंड संताप आणि तिरस्कार वाटतो. पण आपण काही करू शकत नाही म्हणून हतबलता येते. काल फेसबुकवर लिहिले होते तेच इथे विचारते. पाकिस्तानला कशाला हसायचं? Aren't we too a failed state?
11 Dec 2015 - 9:42 am | पगला गजोधर
8 May 2015 - 10:34 am | प्राची अश्विनी
+११११११
8 May 2015 - 10:36 am | आनन्दा
संपूर्ण सहमत.
8 May 2015 - 10:44 am | नीलमोहर
त्यांची छायाचित्रे ही उपलब्ध आहेत पण ती बघवत नाहीत्, जीव तुटतो अक्षरशः, म्हणून टाकायची हिंमत झाली नाही.
8 May 2015 - 3:46 pm | बॅटमॅन
अगदी असेच.
8 May 2015 - 10:58 am | जिन्क्स
ही काळी बाजू पण लोकांसमोर आली पाहिजे. हा धागा वेगवेगळ्या माध्यमांवर/संकेत्स्थळांवर प्रकाशित केला तर चालेल ना?
8 May 2015 - 11:25 am | नीलमोहर
माझीही तीच इच्छा आहे,
जास्तीत जास्त लोकांपर्यन्त हे पोहोचावे.
8 May 2015 - 11:17 am | गणेशा
ओह .. हे मला माहीत नव्हते.. अतिशय वाईट वाटले ...
या केसची एकही बातमी मी नंतर कधे वाचली नव्हती कारण शिक्षा होणार नाही याला असे वाटले होते...
तरीही शिक्षा झाली तरी हे सुट्ट्या घेवु शकतात.. आणि सामान्य माणुस पोलिस कचाट्यात सापडल्यावर मरणे ही मुश्किल त्याचे..
अवघड आहे सारे
8 May 2015 - 11:19 am | एक एकटा एकटाच
संपुर्ण सहमत
8 May 2015 - 11:20 am | यशोधरा
सगळे त्रासदायक आणि संतापजनक आहे.
8 May 2015 - 12:02 pm | पगला गजोधर
बरेचशे राजकारणीसुद्धा सपोर्ट करीता आले होते.
8 May 2015 - 12:47 pm | मंदार दिलीप जोशी
या एकंदर विषयावर प्रतिक्रिया या लिंकवर
http://mandarvichar.blogspot.in/2015/05/blog-post.html
8 May 2015 - 12:53 pm | सस्नेह
एका कर्तव्यदक्ष कर्मचार्याची शोचनीय आणि संतापजनक शोकांतिका !
इथे मांडल्याबद्दल आभार.
8 May 2015 - 1:13 pm | तिमा
हे वाचल्यावर असे वाटते, की या जगांत जर खरंच देव असता आणि सर्व गुन्हेगारांना शिक्षा करत असता तर किती बरं झालं असतं.
8 May 2015 - 1:30 pm | जिन्क्स
हाय कोर्टानी निर्णय रद्द केला :( ...
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5761903029856800459&Se...
8 May 2015 - 2:56 pm | अभिरुप
खूप वाईट झाले रविंद्र पाटील यांच्या बरोबर... एका सेलिब्रिटीच्या अमानुष गुन्ह्याची एफ आय आर नोंद करुन त्याला शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करणार्या एका कर्तव्यदक्ष पोलिसाचा बळी गेला.
आज बर्याच वर्तमान पत्रांनी पाटील यांची आठवण काढली पण त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगी प्रसार माध्यमे कुठे गेली होती कुणास ठाऊक?
असो...कै.पाटील यांना श्रद्धांजली,अमानुषपणे निष्पाप जीवांना यमसदनी धाडणार्या सो कॉल्ड दानशूर सेलिब्रिटीचा निषेध आणि भारतीय न्यायव्यवस्थेचा विजय असो(जरी १३ वर्षांनी न्याय मिळाला असेल तरीही).
धन्यवाद नीलमोहर साहेब या लेखाबद्दल...
8 May 2015 - 5:33 pm | नीलमोहर
पण मी 'साहेब' असेन असं का बरं वाट्लं तुम्हाला..
8 May 2015 - 3:58 pm | _मनश्री_
रवींद्र पाटील यांना श्रध्दांजली
8 May 2015 - 3:58 pm | _मनश्री_
रवींद्र पाटील यांना श्रध्दांजली
8 May 2015 - 4:56 pm | स्पंदना
काय सिद्ध झालं शेवटी?
हरअमखोर, लाचखोर, हत्यारे आणि राक्षसीवृत्तीच्या लोकांच काहीही वाकडं आणि वाईट होत नाही. चांगले लोक मात्र तळतळुन मरतात.
8 May 2015 - 4:59 pm | सूड
आणि असं असूनही या देशातली न्यायव्यवस्था किती चांगली आहे हे सतत सांगितलं जातं....बारा वर्ष झाली. काय उपयोग ह्या असल्या निकालाचा!!
थोडक्यात काय पैसा आणि प्रसिद्धी असली की तुम्ही काहीही करायला मोकळे!!
8 May 2015 - 5:12 pm | स्पंदना
नुसती न्याय व्यवस्थाच नव्हे सूड, साध्या आपल्या त्पल्या आयुष्यात पहा. हेच दिसत.
घाण तोंडाच्या माणसाच्या तोंडाला लागू नको, तुझाच अपमान होइल.
तो भांडखोर आहे सोडून दे.
तो व्यक्तीसापेक्ष वागतोय, त्याच्या अधिकाराचा वापर करुनब्दबाव टाकतोय. असू दे! सोडुन द्या! कशाला भांडन?
लबाड माण्स तर हमखास यशस्वी होतात. खरं बोलणारा वाईट होतो. निरपेक्ष वागणारा गरीब रहातो, साधी वागणुक असणारा लाथा खातो. प्रेमळ आहे म्हणुन फायदा घेतला जातो.
8 May 2015 - 5:27 pm | नीलमोहर
खरयाचा जमाना आधी नव्ह्ता, आत्ता नाही आणि कधीच नसेल,
काय करता बोला !!
8 May 2015 - 6:05 pm | लालगरूड
:-(
8 May 2015 - 6:11 pm | चुकलामाकला
बघवत नाही.
8 May 2015 - 7:52 pm | अर्धवटराव
डोळ्यात पाणि आलं :(
9 May 2015 - 2:50 pm | रवीराज
एका देखण्या आणि उमद्या व्यक्तिमत्वाचा कारुण्यमय अंत झाला भ्रष्ट समाजव्यवस्थेद्वारे.
10 May 2015 - 3:28 pm | कानडाऊ योगेशु
+१
एका राजबिंड्या तरुणाचे झालेले हाल पाहवत नाही.
8 May 2015 - 6:09 pm | चुकलामाकला
नक्षलवाद यातूनच जन्म घेतो.
8 May 2015 - 6:16 pm | रेवती
फार वाईट झालं. ही रामकहाणी माहित नव्हती, दोन दिवसांपूर्वी समजली आणि अस्वस्थता आलीये ती अजून जात नाही. सलमान किंवा तसलेच लोक कितीजणांचे शाप घेऊन मरणार आहेत कोणास ठाऊक! रविंद्र पाटील एवढा चांगला, तरणा मनुष्य पण दशा केलीन त्या मेल्या सलमाननं!
8 May 2015 - 6:31 pm | सूड
हे एवढं असूनही सलमानला जामीन मिळावा म्हणून लोक उपासतापास करत होते. कुठे जर सो कॉल्ड देव असेलच तर असल्या देशात का जन्माला घातलंस हे एकदा तरी विचारावं म्हणतो!!
8 May 2015 - 6:44 pm | कविता१९७८
रवींद्र पाटील यांना श्रध्दांजली, ऐकुन खुपवाईट वाटले आणि सलमानबद्दल तिरस्कार
8 May 2015 - 6:49 pm | पिलीयन रायडर
मुर्ख बिनडोक लोकांचा देश आहे आपला...
त्या सलमानला रात्री झोप कशी लागते???? आणि चॅरिटी करतो म्हणे..
8 May 2015 - 7:01 pm | बॅटमॅन
सलमानच्या झोपेचं काय घेऊन बसलात, इथले वायझेड लोक त्याला सपोर्ट करतात ते पाहिलं की......असोच्च्च.
8 May 2015 - 7:19 pm | पिलीयन रायडर
सलमानला जे जे लोक सपोर्ट करत आहेत त्यांना देव करो नि फुटपाथवर उभे असताना कुणी तरी जोरदार धडकावं.. हातपाय तरी मोडु देत साल्यांचे..
8 May 2015 - 7:19 pm | एस
+१
8 May 2015 - 7:40 pm | नूतन सावंत
नीलमोहर,राविन्द्राची कथा आणि व्यथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न पाहून बरे वाटले.इथल्या सर्वांनी त्याची व्यथा वाचून वाईट वाटले,संताप आला.पण अजून एक गोष्ट कळली ताल त्याची प्रतिक्रिया काय असेल?.माझ्या माहितीप्रमाणे रविन्द्रला तुरुंगात घातल्यवर एड्सचे इंजेक्शन देण्यात आले होते.कुठे फेडतील हे पाप?.बाकी हे सगळे समजल्यावर देव खरेच आहे का?याची शंका येते,आणि बाबा सलीम सेलेब्रेशनच्या गोष्टी करताहेत.
8 May 2015 - 10:26 pm | नीलमोहर
ती एड्सची बातमी खरी नसावी कारण त्यांचा मृत्यु टीबी नेच झाल्याचे ऐकिवात आहे. तरी काही सांगता येत नाही, या देशात आता काहीही होऊ शकतं.
8 May 2015 - 10:53 pm | अगम्य
त्याला एड्स चे इंजेक्शन दिले होते की नाही हे माहित नाही. एड्स मुळे रुग्णाची प्रतिकारक्षमता खालावते आणि बर्याच वेळा रुग्ण टीबीला प्रतिकार करू न शकल्याने दगावतो. अशा प्रकारे एड्स हे root cause असून मृत्यूचे final cause टीबी होते.
10 May 2015 - 1:44 pm | द-बाहुबली
तरीही रक्त तपासणीमधे HIV होता काय याचे निदान होतेच होते. त्यामुळे एड्स चे इंजेक्शन ही शक्यता कमीच. कारण अजुन गदारोळ उठला असता (?).
11 May 2015 - 11:01 am | अगम्य
त्याच्या रक्त तपासणीमधे HIV आढळला होता की नाही हे माहित नाही. कदाचित आढळला असेल पण दडपले असेल. अथवा आढळला नसेल आणि तशी नोन्द असेल. नाही तर गदारोळ झाला असता.
8 May 2015 - 7:46 pm | मदनबाण
आणि हे म्हणे " बइंग ह्युमन" !
सत्यासाठी अटळ राहणार्या रविंद्र पाटील यांना कोटी कोटी प्रणाम !
मदनबाण.....
8 May 2015 - 7:52 pm | विवेकपटाईत
रवींद्र पाटील याचा मृत्य नाही झाला अपितु जाणून बुजून केलेली हत्या आहे. दोषी मुंबई पोलीसचे अधिकारी आणि सलमान खान आहेत. त्यांच्यावर रवींद्र पाटील याच्या हत्याच मुकदमा चालला पाहिजे. पण काय करणार शेवटी 'गांधीजींचे चित्र" जिंदाबाद म्हणावे लागेल. आज न्याय परिसरात न्यायाची हत्या झाली हेच म्हणता येईल.
8 May 2015 - 7:54 pm | मोहनराव
वाईट झाले पाटील बाबतीत.. रवींद्र पाटील यांना श्रध्दांजली!!
मला कळत नाही इतके दिवस ही बातमी का समोर आली नाही?
त्या सल्लूला चांगलीच अद्द्ल घडली पाहिजे.
8 May 2015 - 8:00 pm | मधुरा देशपांडे
अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आहे हे. हतबल वाटु लागतं. त्या सलमानची बाजु घेणार्यांबद्दल तर काय बोलणार.
8 May 2015 - 10:40 pm | मदनबाण
Salman Hit & Run Case: Will Ravindra Patil get justice?
MUST READ: Prime witness Ravindra Patil's statement lead to Salman Khan's conviction!
How Salman Khan hit and run case ruined bodyguard Ravindra Patil’s life
Ravindra Patil's statement: 'I asked Salman to drive slowly, but he didn’t listen'
mid-day archives: Salman Khan's bodyguard's statement in 2002
The tragic case of police constable Ravindra Patil who stood against Salman Khan in the 2002 hit and run case!
SALMAN KHAN's Hit and run Case RAVINDRA PATIL: THE DEATH OF A MESSENGER
Vindication For Salman’s Bodyguard Patil Who Maintained That Khan Was Driving That Nigh
Even Death Didn't Shake His Conviction.He Was Ravindra Patil -The Prime Witness In Salman Hit-And-Run Case
Bodyguard Ravindra Patil – The prime witness in Salman Khan 2002 hit-and-run case
Ravindra Patil – Salman Khan’s bodyguard who paid with his life for speaking truth
Shocking story of Salman's bodyguard, constable Ravindra Patil
Tale behind the tale of Salman Khan’s bodyguard Ravindra Patil
मदनबाण.....
8 May 2015 - 11:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
पैसा आणि प्रसिद्धी असली तर न्यायव्यवस्थेला किती चपळ बनवता येते याचे
आणि
आपल्या खरेपणाची शान शेवटपर्यंत शाबूत ठेवणार्या माणसाची किती परवड होऊन मृत्यू होऊ शकतो याचे
उत्तम उदाहरण असलेली केस !!!
मनात चीड आणि शरम यापेक्षा इतर कोणत्या भावना उरत नाहीत. :(
9 May 2015 - 7:08 am | विवेकपटाईत
सत्यपथावर चालणे सौपे नसते, सत्ययुगात राजा हरिश्चंद्राचे हाल हाल झाले होते. बहुतेकांना ही कथा खोटी वाटते. पण सत्य मार्गावर चालणार्यासाठी ही कथा एक चेतावणी आहे. रवींद्र पाटील यांनी ही कथा ऐकली होती, पण पोलिसात असून ही त्याला कथेतला मर्म कळले नसावे. सत्यमार्गावर चालण्याचा परिणाम भोगावे लागला. एका पद्धतशीर रीतीने त्याची हत्या झाली.
9 May 2015 - 10:16 am | उगा काहितरीच
लेख दुसरीकडे (whatsapp) वर शेअर करण्याची परवानगी आहे का ?
11 May 2015 - 11:55 am | नीलमोहर
फक्त लेखाचा इथला संदर्भ द्या म्हणजे झालं..
10 May 2015 - 6:47 pm | उगा काहितरीच
धन्यवाद ! तुमची परवानगी येण्याच्या अगोदर लिंक दिली होती पण लोक लिंक उघडून वाचायची तसदी घेत नाहीत ना म्हणून लेख टाकायचा .
11 May 2015 - 11:54 am | नीलमोहर
लेख टाकायला काहीच हरकत नाही..
9 May 2015 - 10:18 am | किसन शिंदे
हा लेख वाचला आणि काल न्यूजवर सलमानची सुटका झाल्यानंतर फटाके फोडून नाचणारी निर्बुद्ध डोकी आठवली. :(
9 May 2015 - 6:02 pm | ह भ प
"सलमान ला जर शि़क्षा झाली असती तर माझा पैशांवरचा विश्वास उडाला असता"
अशी एक पोस्ट पण व्हत्सप्प वर फिरत होती
10 May 2015 - 7:13 pm | तिमा
व्हत्सप्प वर सध्या एक कार्टून फिरतंय. फूटपाथवर झोपलेल्या सर्वांना कुशलतेने चुकवून ड्रायव्हिंग करणार्या ड्रायव्हरला, आरटीओ ऑफिसर एक दारुची बाटली दाखवून म्हणतोय," आता हेच परत, ही बाटली पिऊन केलंस तर लायसेन्स मिळेल!
कार्टून कर्त्याला सलाम.
11 May 2015 - 9:25 am | अर्धवटराव
मराठी माणसाचा कैवार घेणारे थोर राजकारणी सलमानच्या भेटीला धावत गेले... त्यांना हे पाटलाचं पोर हकनाक मेल्याचं काहि सोयरं-सुतक नसावं.
11 May 2015 - 3:52 pm | सूड
त्यांना फक्त मतदानावेळी मराठी माणसाच्या मायेचे उमाळे येतात.
11 May 2015 - 6:12 pm | पिलीयन रायडर
आमच्या एक काकु.. ज्या जनरली बर्याच सेन्सिबल आणि त्यांच्या मते मॉडर्न वागतात त्यांचा हा डायलॉग..
"का ग?? का चिडलीएस आमच्या सलमानवर एवढी? भेट बर तू मला एकदा..."
"का चिडु नये काकु?"
"ए तो इंडियाचा हार्ट थ्रॉब आहे बरं का..."
"म्हणुन माणसं मारायची परवानगी मिळते का?"
"अगं पण झाले ना त्याला १३ वर्ष.. आता काय त्याचं.."
सासरचं नातं आहे म्हणुन संताप गिळत..."मी नाही सहन करु शकत असल्या गोष्टी... "
मी जरा ऐकवायच्या मुड मध्ये येतेय म्हण्लं की काकु लगेच "अरे काका आला वाटतं.. बोल त्याच्याशी..."
हे शिकले सवरले लोक असं बोलतील तर रस्त्यावर फटाके फोडणारे आणि कॅमेरासाठी सलमानची गाणी गाणारे लोक वेगळं काय करणारेत अजुन??
11 May 2015 - 6:28 pm | सूड
काकू आमचा सलमान म्हणजे सलमान ह्यांच्या घरी वारावर जेवायला जात असावा अशा स्टाईलने बोलतायेत!!
11 May 2015 - 6:30 pm | पिलीयन रायडर
काकू वागतातही तश्याच!!
11 May 2015 - 6:38 pm | बॅटमॅन
माईसाहेबांची आठवण झाली उगीच.
12 May 2015 - 2:24 pm | मराठी_माणूस
सहमत. हे पाहील्यावर, त्याच्या सिनेमावर बहीष्कार टाकणे वगैरे गोष्टी अशक्यप्राय वाटतात.
11 Dec 2015 - 5:35 am | स्रुजा
अवघड आहे !!!
आणि खरंच उद्वेगजन्य प्रकार. प्रॉब्लेम असा आहे की आज सुपात आहेत त्यांना विसर पडलाय की आपण ही जात्यात भरडले जाऊ शकतो. फुटपाथ वर झोपायचं की नाही हा फक्त तांत्रिक मुद्दा झाला. दारु पिऊन गाडी फक्त फुटपाथवर च नाही जात, रस्त्यावर देखील कुणाला ही धडकु शकते. तेंव्हा काय म्हणणार अभिजीत (गायक) सारखे लोकं? सगळा पैशांचा माज आहे. हायकोर्टाने चक्क एका दिवसात आधीच्या सगळ्या कोर्ट्स चे निकाल फिरवले. शरमेची बाब आहे.
हे प्रकरण चालू असताना, त्याला शिक्षा सुनावलेली असताना देखील बजरंगी भाईजान तुफान चालला. आता तर तो निर्दोष सुटलाय. आता विचारायलाच नको/ आपल्या सहिष्णुतेला अजुन नवे धुमारे फुटतील.
12 May 2015 - 4:52 pm | नीलमोहर
सुशिक्षित सुजाण नागरिकांनी बहिष्कार टाकूनही फार उपयोग नाही (मला नाही वाटत हे लोक सलमानचे पिक्चर पहात असतील), कारण आपल्या देशाची कमाल लोकसंख्या ही अशिक्षित अडाणी लोकांपासून बनली आहे जे अशा माणसांना डोक्यावर घेऊन नाचतात भलेही तो गुन्हेगार का असेना.
सलमान सारख्या हिरोचे पिक्चर कोट्यावधींचा गल्ला कमावतात ते अशाच अर्धवट लोकांच्या जीवावर.
बहिष्कार हीच शिक्षा त्याच्यासाठी योग्य आहे आणि लोकांनी हे करावंच..
11 Dec 2015 - 12:31 pm | मराठी_माणूस
ह्याना पण अशिक्षित अडाणीच म्हणणार का ?
http://www.loksatta.com/mumbai-news/indiscipline-advocate-1169389/
11 Dec 2015 - 2:08 pm | नीलमोहर
हे सुशिक्षित अडाणी, ती एक वेगळीच जमात असते.
'न्यायालयातील वकीलवर्ग एकीकडे त्याचे मोबाइलद्वारे छायाचित्र घेण्यास धडपडत होते, तर तरुण महिला वकिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. एरव्ही न्यायालयात मोबाइल वापरण्यावर बंदी आहे. छायाचित्र काढणे तर दूरची गोष्ट. परंतु दुसऱ्यांना सल्ला देणाऱ्या वकीलवर्ग व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाच त्याचा विसर पडल्याचे चित्र होते.'
- हे तर खासच.
it happens only in india
10 Dec 2015 - 2:31 pm | नीलमोहर
तुम्हाला कधीतरी न्याय मिळेल अशी आशा होती, आपल्या देशाच्या थोडा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता,
चमत्काराचीच आस होती बहुधा. सगळं फोल ठरलं शेवटी.
सराईतपणे खर्याचं खोटं आणि खोट्याचं खरं सिध्द केलं गेलं, त्याच न्यायाने तुम्हालाही खोटं ठरवलं गेलं.
' रविंद्र पाटील पूर्णपणे अविश्वसनीय साक्षीदार ' - हाय कोर्ट
- सलमानची निर्दोष सुटका.
अंतिम विजय सत्याचा होतो म्हणतात,
अंतिम सत्य - गाडी कोणीच चालवत नव्हतं, अॅक्सीडेंट आपोआप झाला, एक माणूस गेला,
काही जखमी झाले कायमचे अपंग झाले, प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं, साक्षीदारांनी सांगितलं ते सगळं खोटं.
सगळं खोटं - फक्त एक सलमान खरा, त्याचं नाव खरं, त्याचा पैसा खरा..
हेच अंतिम सत्य.
माफ करा रविंद्र पाटील __/\__
10 Dec 2015 - 2:40 pm | कविता१९७८
सलमान ईथुन सुटलाय पण देवापुढे काय, ईथेच करायचय अन ईथेच भोगायचय.
10 Dec 2015 - 2:46 pm | pacificready
लो बा गं टि यांची आठवण आली.
कायद्याची अंमलबजावणी हा चेष्टेचा विषय झाला आहे.
10 Dec 2015 - 4:24 pm | सूड
तुम्हाला खरंच वाटतं अशी कोणती तरी शक्ती शिक्षा देत असते? मी अजून तरी अशी शिक्षा मिळालेली बघितली नाहीये.
10 Dec 2015 - 4:46 pm | बॅटमॅन
ते एक वाक्य आहे बघ, बर्याच लोकांच्या नावावर खपवले जाणारे. मथितार्थ असा की टेररिस्ट लोकांना काय शिक्षा द्यायची ते देव बघून घेईल. माझे काम म्हणजे त्याच्यापर्यंत त्यांना पोचवणे हे आहे.
10 Dec 2015 - 5:01 pm | नीलमोहर
त्यांना बहुधा नियती किंवा कर्माचे फळ या अर्थाने म्हणायचं असेल.
माझाही असाच समज होता की माणूस जे कर्म करतो चांगलं/ वाईट तशीच फळं त्याला या जन्मातच मिळतात.
मात्र तसं काही नसतं हे अनेकदा सर्रास दिसून येतं. अशी अनेक उदाहरणं दिसतात की चांगले लोकं विनाकारण
त्रास काढतात आणि दुष्ट प्रवृत्ती करून सवरून आरामात राहतात.
जसं सलमान अनेक गुन्हे करून उजळ माथ्याने, गुर्मीत समाजात वावरतोय आणि रविंद्र पाटील सत्याच्या,
न्यायाच्या मागे लागून हकनाक जीव गमावून बसले.
Poetic justice नावाचं काही अस्तित्वात नसतं बहुतेक.
10 Dec 2015 - 5:15 pm | कविता१९७८
हो मला नियति आणि कर्माबद्दलच बोलायचे होते, देव हा शब्द त्यावेळी अचानक सुचला अन तो मी लिहीला.
10 Dec 2015 - 6:58 pm | मंदार कात्रे
People get VERDICT in Courts , NOT JUSTICE !
न्यायालयात निकाल मिळतो , न्याय नव्हे !!!
10 Dec 2015 - 2:45 pm | सुबोध खरे
परवा एका काळवीटाचा आत्मा जोधपुर न्यायालयाच्या आसपास घुटमळतन दिसला. तिथल्या मुख्य न्यायाधीशांना भेटून म्हणाला
साहेब मी आत्महत्या केली आहे. उगाच सलमानला का अडकवता? सोडून द्या बिचार्याला.
10 Dec 2015 - 8:23 pm | मदनबाण
@ डॉक
त्या काळवीटाच्या आत्म्याचे म्हणणे ऐकुन "केवळ" अर्ध्या मिनीटाच निकाल दिला जाईल बघा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference
10 Dec 2015 - 8:30 pm | मंदार कात्रे
11 Dec 2015 - 10:58 am | एक सामान्य मानव
डॉक्टर तुमच्यासारख्या सुजाण आणि सुशिक्षीत लोकांनी अंधश्रद्धा पसरवणे चूक आहे. हे आत्मा वगैरे थोतांड आहे. खरी आतली बातमी अशी आहे. (खास प्रतिनिधीकडून)
"काही बिश्णोई लोकांनी काळवीटाची शिकार केली. आपल्या सल्लूभाईला ते कळलं. नायकचं तो! निघाला वाचवायला काळवीटाला. नायिकाही सोबत त्याची (काळवीटाची हो) काळजी घ्यायला. सोबत स्वसंरक्षणासाठी बंदुक होती. जंगलात काळवीट सापडले पण ते जखमी. त्याला घेऊन भरधाव वेगाने नायक परतले उपचारासाठी. पण रस्त्यात काळवीट मरण पावले. पण दुष्ट बिश्णोई लोकांनी शिकार हातची गेली म्हणून नायकाला अडकवले. साधाभोळा नायक अडकला जसा नेहमी सिनेमात अडकतो. (वाचा फारएण्ड यांची परीक्षणे)."
पण काळजी नसावी. शेवटी हे सत्य समोर येणार व काळवीटाला न्याय मिळणार.
पण निकाल येईपर्यंत ही गुप्त बातमी फोडू नये.
10 Dec 2015 - 3:10 pm | नाखु
वाईट वाटले.
पण कंपनीत/मित्रांमध्ये त्याबाबत जे ऐक्ले ते धक्कादायक होते जवळच्या लोकांनीही त्यांची साथ सोडली होती आणि सतत धमकीच्या दडपणाखाली रहावे लागले होते.पोलिस विभागाने तर अक्षरशः वाळीत टाकले होते.
खरं का आपुलकी वाटावी या खात्याबद्दल. का फक्त सिंघम सारखा सिनेमा पाहून टाळया पिटाव्यात???
माफ करा रविंद्र पाटील __/\__
10 Dec 2015 - 3:47 pm | शान्तिप्रिय
अचूक माहिति दिल्याबद्दल धन्यवाद. इतक्या लवकर उच्च न्यायालय असा निर्णय देइल अशी अपेक्शा नव्हती.
मी आता सलमानचा एकहि चित्रपट पाह्णार नाहि
इतकेच नव्हे तर सलमानच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन माझ्या परीने सर्वान्ना करेन.
10 Dec 2015 - 3:58 pm | कविता१९७८
रविन्र्द पाटलाचे कळल्यापासुनच मी सलमानचे सिनेमे पाहणे सोडलय
10 Dec 2015 - 4:12 pm | गवि
झालं ते सगळं संशयास्पद आहेच.
पण "आता यापुढे सलमानचा चित्रपट बघणार नाही" असं अनेकजण अनेकठिकाणी म्हणताना दिसताहेत.
आज निर्दोष मुक्ततेचा निर्णय आला म्हणून बहिष्कार?
--- म्हणजे आजचा निर्णय चुकीचा आहे याची खात्री वाटताना दिसते. म्हणजे तो गुन्हेगार आहे हे स्वत:शी पटलेलं होतं.
मग आत्तापर्यंत सिनेमे पाहणं चालू का ठेवलं होतं?
आज दोषी ठरवून शिक्षा झाली असती (आत्ताच्या उलट निर्णय) तर सिनेमे बघणं चालू ठेवलं असतं का?
निव्वळ उत्सुकतेपोटी प्रश्न उत्पन्न केलेत. प्रतिसाद इथे असला तरी तो एका कोणाला उद्देशून नाही.
10 Dec 2015 - 5:46 pm | नीलमोहर
मुळात सलमान किंवा अगदी शाहरूख, आमिरच्या सद्य चित्रपटांतून कोणाला काय मिळतं हा मोठा प्रश्न आहे.
यांचे शेवटचे कोणते सिनेमे पाहिले तेही आठवत नाही.
सलमानच्या फॅन्ससाठी 'भाईटार्डस' bhaitards हा अगदी चपखल शब्द ज्याने शोधून काढलाय त्याला खरंच सलाम !!
हे लोक नवीन आले होते तेव्हा त्यांनी काही चित्रपटात चांगलं काम केलेलं आहे,
उदा: अंदाज अपना अपना, कभी हां कभी ना, जो जिता वही सिकंदर इ.
मात्र जसे ते स्टार झाले, डोक्यात हवा जाऊ लागली, तसतशी त्यांच्या सिनेमांची गुणवत्ता घसरू लागली
आणि तद्दन गल्लाभरू चित्रपट करणे त्यांनी सुरू केले आणि सुरूच ठेवले आहे.(थोडाफार आमिरचा अपवाद वगळता)
10 Dec 2015 - 6:16 pm | सुबोध खरे
गवि साहेब
सलमान, शाहरुख, अमीर खान आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे लोक पाहतात कसे याचे मला आश्चर्य वाटते. पन्नाशीला आलेले किंवा झालेले नायक म्हणून २० वर्षच्या मुलीबरोबर प्रणय अभिनय करतात. हेच मला किळसवाणे आणि वैचारिक दिवाळखोरीचे वाटते.(मराठीत एके काळी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेरडे सोडून नायक नव्हते तशीच गत.)
अ १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात तुम्हाला एकही तरुण चेहरा सापडत नाही? ( १२५ कोटीच्या देशात तुम्हाला पंतप्रधान होण्यसाठी एकही लायक नेता सापडत नाही आणि तुम्हाला परदेशाकडे पाहावे लागते याच लयीत वाचावे).
याकारणास्तव नेते आणि अभिनेते यांबद्दल मला फारसा आदर नाही.
यांचे सिनेमे पाहणे मी सन २००० पासूनच सोडून दिलेले आहे.
10 Dec 2015 - 3:57 pm | मराठी_माणूस
त्याच्या चित्र॑पटावर बहीष्कार घालणे सामान्य माणसाला सहज शक्य असताना त्याचे सिनेमे हाउसफुल्ल चालतात. त्यावर भरभरुन लिहले जाते, त्याच्या जाहीरती सतत झळकत असतात. आपला समाज अजुन परीपक्व झाला नाही असे म्हणावेसे वाटते.
तो निर्दोष आहे आणि अपघात तर झाला आहे, मग आता काय नव्याने शोध सुरु होणार का ? की आता आम्ही हे सर्व विसरुन जायचे ?
10 Dec 2015 - 4:01 pm | सतिश पाटील
धिक्कार असो याला डोक्यावर घेऊन नाचणार्यांचा...
बिंग ह्युमन असो व आणखी केलेल्या समाजसेवा असो...
असली समाजसेवा कोर्टात पुराव्यानिशी सादर करून, केलेल्या गुन्ह्यातून सवलत वा मुक्ती मिळवण्यासाठी केलेली योजनाबद्ध धडपड आहे.
याच्या घरात गणेशोत्सव साजरा होतो, हे दाखवण्यासाठी प्रसारमाध्यमे पुढे पुढे करतात
याने एक मुलगी बहिण म्हणून दत्तक घेतली आणि तिच्या लग्नासाठी केलेला खर्च बातमीदार दिवसभर दूरदर्शनवर दाखवतात
कशासाठी ???????
10 Dec 2015 - 4:32 pm | प्रसाद भागवत १९८७
च्र्निजीव सलमान खान टी आर पी आहे मेडिया साठी त्यमुळे हे सर्व चालते आहे भारतात .
सलमान नंतर पण अशी बरीच पक्राने झाली त्यातील आरोपींना शिक्षा पण झाली पण भारतात पैसेच जीक्तात नाय विकत घेत येतो
10 Dec 2015 - 4:39 pm | नगरीनिरंजन
जे काही झालं त्यातून एक समाज म्हणून आपली लायकी दिसते. आपण इतरवेळी निवांत असतो. चलता है. छोटे-मोठे नियम तोडतो; चिरीमिरी देतो. आपल्याला वाटतं काही होत नाही. पण त्यातून कणाहीन, लाचार समाज घडत जातो. नियम तोडून स्वतःचा फायदा करुन घेणार्याला व्यवहारचतुर आणि नियमासाठी नुकसान करुन घेणार्याला मूर्ख ठरवले जाते. योग्य त्या गोष्टीसाठी ठामपणे उभे राहणे हा जिथे मूर्खपणा समजतात त्या समाजात वेगळं काय अपेक्षित आहे?
आता समजा लोक धिक्कार करतील, बहिष्कार घालतील वगैरे आणि कोणी-कोणी यथामती-यथाशक्ती शिक्षा द्यायला बघेल. अशाने त्याला कमी-जास्त शिक्षा होईलही पण दारु पिऊन निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरला असल्यास कायद्याने जी वाजवी सजा व्हायला पाहिजे ती होणार नाही. महासत्तेच्या गप्पा मारणे सोपे आहे; पण त्यासाठीची साधी बाराखडीही आपल्याला येत नाही.
10 Dec 2015 - 4:45 pm | प्रसाद भागवत १९८७
एकाने चूक केली म्हून पूर्ण समाज दोषी कसा काय असू शकतो परतेक समज मध्ये चागले आणि वाईत असे दोनी परकारचे लोक असतात