सपान

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
26 Dec 2014 - 2:56 am

साळंला सुट्टी पडली की दादा येतो.
न्हायतर तो तिकडं शेरात पोरांच्या संगट -हातोय.
आई, अण्णा, आज्जी त्याच्याच मागं असत्येत.
लाड करायला.

दादाची माज्यावर लई माया.
माजं तो आईकणार म्हन्जे धापैकी धा.

आज्जी म्हन्ली, "उठा आन्जाक्का”.
"दादा कुठंय?” म्या इचारलं.
“अण्णा गेलेत त्याला आणायला,” आज्जीबाई म्हन्ली.
"कायबी बोलू नग. राती दादाच्याच कुशीत झोपली व्हती,” म्या बोल्ली.

"दादा, दादू, दाद्या...” म्या बोलावलं. यीना तो.
आई आली. “रडू नकोस. दादा येतोय संध्याकाळी.”
"काल आला की” म्या पुन्ना बोल्ले.
“स्वप्न पडलं तुला दादा आल्याचं. खोटं असतं ते”, आई म्हन्ली.

खोटं?
मंग हेच सपान.

हेला कसं घालवायचं असतंय?
पुन्यांदा उलिसं झोपून?

* शतशब्दकथा

कथाअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 2:59 am | मुक्त विहारि

चालायचेच....

एक असेच, २/३ वर्षे उद्धस्थ झालेले कुटुंब आठवले.

एस's picture

26 Dec 2014 - 7:55 am | एस

आन्जीच्या मानानं आई खूपच शहरी वळणाचं बोलतेय. तेवढं एक वगळता बाकी कथा मस्त.

आधीच्या कथांत या संदर्भात सूचक उल्लेख (विखुरलेले) आहेत.

प्रचेतस's picture

26 Dec 2014 - 9:24 am | प्रचेतस

मस्त

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 9:28 am | टवाळ कार्टा

मस्त :)

खटपट्या's picture

26 Dec 2014 - 9:53 am | खटपट्या

मस्त !!

:)

स्वप्न आणि वास्तव याच्यातल्या सीमारेषा धूसर होण्याचा अनुभव आंजीला(ही) आला हे पाहून भारी वाटलं.

मस्त.आंजीला असं सक्काळी सक्काळी भेटलं की लै ब्येस वाट्टं.

पण ह्या स्वरूपात नको...

ह्या स्वरूपातली आंजी आता दिवसभर अस्वस्थ करणार.

आतिवास's picture

26 Dec 2014 - 11:49 am | आतिवास

मुवि, या कथेमुळे तुम्हाला काही दुखरे क्षण आठवताहेत - त्याबद्दल मला माफ करा.
पण ही कथा फक्त ''स्वप्न'' याबद्दल आहे; enjoy :-)

खेडूत's picture

26 Dec 2014 - 1:01 pm | खेडूत

असंच वाटलं होतं ...
ही कथा पण आवडली !

तेच त्या कथेचे यश आहे...

"जीवन फार क्षणभंगूर आहे."

आहे तो क्षण आनंदाने जगा. उद्याचा काय भरवसा?

कदाचित ह्या आंजूचे भावाचे पटत नसेल.तो मोठा असल्याने ह्या आंजूचे ऐकत पण नसेल.त्यामुळे तिला त्याचा राग पण येत असेल.

आणि तो गेल्या नंतर मात्र तिला भावाची कमतरता जाणवते.

एक उत्तम भावस्पर्शी चित्र उभे राहिले.

फार उत्तम लिहीले आहे.

मोजक्याच शब्दांत पण फार परीणामकारक...

मला कथा अतिशय आवडली.

माफी नका मागू....

उलट मीच धन्यवाद देतो....

"जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना."

बोका-ए-आझम's picture

26 Dec 2014 - 11:15 am | बोका-ए-आझम

मस्त!

चिगो's picture

26 Dec 2014 - 11:36 am | चिगो

आन्जी म्हंजे निरागसता, धा पैकी धा..

उमा @ मिपा's picture

26 Dec 2014 - 12:51 pm | उमा @ मिपा

खोटं?
मंग हेच सपान.

हेला कसं घालवायचं असतंय?
पुन्यांदा उलिसं झोपून?

किती निरागस आणि साधा उपाय. अशीच रहा आन्जे.

माधुरी विनायक's picture

26 Dec 2014 - 12:59 pm | माधुरी विनायक

आन्जीप्रेमींमध्ये आता मी पण...

मधुरा देशपांडे's picture

26 Dec 2014 - 1:03 pm | मधुरा देशपांडे

आन्जी नेहमीप्रमाणेच आवडली.

स्पंदना's picture

26 Dec 2014 - 3:02 pm | स्पंदना

आन्जी येकलंबर!

आतिवास's picture

2 Jan 2015 - 3:39 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2015 - 6:34 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

हेला कसं घालवायचं असतंय?
पुन्यांदा उलिसं झोपून? >>> .... _/\_

पैसा's picture

2 Jan 2015 - 9:25 pm | पैसा

डोळ्यावर पांघरूण ओढलं की भीती वाटणार्‍या सावल्या दिसेनाशा होतात तसंच हे!

इशा१२३'s picture

5 Jan 2015 - 8:41 pm | इशा१२३

आन्जी मस्तच..