छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
31 Oct 2014 - 1:03 pm

http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
http://www.misalpav.com/node/28931

********************************************

नमस्कार मंडळी! दिवाळीच्या फराळाचा फन्ना उडवला का नाही! आणि दिवाळी अंकही बरेच वाचून झाले असतील! आता जराशा विश्रांतीनंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त चौथी स्पर्धा सुरू करूया चला!. नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. म्हणून या स्पर्धेचा विषय राहील उत्सव प्रकाशाचा! मग तो उत्सव एका पणतीचा असेल किंवा लखलखत्या रोषणाईचा, किंवा आकाशातल्या नैसर्गिक रोषणाईचा. 'प्रकाश उत्सव' ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात तर इथे!

प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. बर्‍याच जणांच्या विनंतीवरून ही मुदत ७ ऐवजी १५ दिवस करत आहोत. इतर सर्व नियम मात्र दुसर्‍या आणि तिसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील!

सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!

कलाजीवनमानतंत्रछायाचित्रणस्थिरचित्रप्रकटनसद्भावनाशुभेच्छाआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

ये ब्बात किल्लेदार! काय फोटो आहे!

स्पर्धेसाठी नाही वाचून जरा वाईट वाटलं..

किल्लेदार's picture

14 Nov 2014 - 4:43 pm | किल्लेदार

:)

हुकुमीएक्का's picture

14 Nov 2014 - 10:36 pm | हुकुमीएक्का

फोटो एकदम अप्रतिम आलाय. EXIF Data कळेल का?

किल्लेदार's picture

16 Nov 2014 - 1:54 pm | किल्लेदार

निकॉन D४०
ISO - २००
शटर स्पीड - १/५०
अपर्चर - ३.५