http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
---------------------------
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons)
स्पर्धेचे नियम दुसर्या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस. इतर सर्व नियम सुद्धा दुसर्या स्पर्धेप्रमाणेच!
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
प्रतिक्रिया
25 Sep 2014 - 5:46 am | मस्तानी
Camera DSC-H10
Lens -
Focal Length 11.4mm
Exposure 1/160
F Number f/9
ISO 125
Camera make SONY
Flash Not used
मिशिगन मधील सर्वात सुंदर ऋतु म्हणजे पानगळती चालू होण्याआधी जेव्हा झाडांचे रंग बदलतात तो Fall / Autumn. गेल्या वर्षी काढलेला हा फोटो आणि आता या वर्षीचे रंग बघण्याची उत्सुकता आहेच !
25 Sep 2014 - 9:49 am | किसन शिंदे
क्लास फोटो आहे!! बघताक्षणीच लाल रंग डोळ्यात भरतो.
26 Sep 2014 - 8:56 pm | मस्तानी
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे !
मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि.
एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?
26 Sep 2014 - 8:57 pm | मस्तानी
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे !
मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि.
एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?
26 Sep 2014 - 9:00 pm | पैसा
तुम्हीच काढलाय ना? मग स्पर्धेसाठी का नाही? आणि मतदानासाठी वेगळा धागा येईल तिथे मत द्या. आता नाही.
26 Sep 2014 - 9:06 pm | मस्तानी
काहीतरी घोळ होतोय. मी एक दुसरा फोटो टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि तो दुसरा स्पर्धेसाठी नाही असं म्हणायचं होत पण तो दिसताच नाहीये :(
वरचा झाडाची पाने लालबुंद असलेला फोटो मीच काढलाय आणि स्पर्धेसाठी आहे.
26 Sep 2014 - 9:08 pm | मस्तानी
मतदानाचा धागा आला कि जरूर मत नोंदवेन !
25 Sep 2014 - 9:04 am | प्रभाकर पेठकर
एक सांगावेसे वाटते.
छायाचित्रणाचा विषय जाहिर झाल्या नंतर त्या विषयाला अनुषंगून विचार करणे आणि चांगले छायाचित्र मिळविणे, कामाच्या धबडक्यातून वेळ काढणे, जरा कठीण जाते.
महिन्याला एक विषय घ्यावा. पुढच्या महिन्याचा विषय आदल्या महिन्यात जाहिर केला तर बरे असे वाटते. आधीच्या विषयावरील छायाचित्रे पाहणे त्यावर विचार करून मतप्रदर्शन करणे (मला त्यातील जास्त काही कळत नसल्याने मी मत देण्यास अनुत्सुक असतो, हा भाग वेगळा) आणि नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच.
ह्या सर्वगोष्टींचा (आधी केला नसेल तर) विचार व्हावा ही विनंती.
25 Sep 2014 - 9:46 am | मदनबाण
काकाश्रींशी सहमत !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!
25 Sep 2014 - 11:38 am | दिपक.कुवेत
हो हो जरा मुदत वाढवून दिली तर आम्हिही काहि तारे तोडू....
25 Sep 2014 - 10:11 am | भिंगरी
नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच.
एकदम सहमत
25 Sep 2014 - 10:12 am | विलासराव
25 Sep 2014 - 6:00 pm | आदूबाळ
जबरी आहे!
26 Sep 2014 - 11:34 pm | आनन्दिता
खुप आवडला!
25 Sep 2014 - 11:31 am | स्पा
Camera निकोन डि३१००
Lens - ५५-२००
Focal Length १००मिमि
Exposure १/३२०
F Number f/७
ISO १००
25 Sep 2014 - 12:05 pm | मृत्युन्जय
सही आहे. रंग एकदम जिवंत कैद झाल्यासारखे वाटतात.
25 Sep 2014 - 1:06 pm | किसन शिंदे
ज ह ब ह रा ट!!
25 Sep 2014 - 2:25 pm | सौंदाळा
खल्लास च्यामारी, बेष्ट
स्पर्धेची वाट बघु नको रे. एक धागा काढुन आम्हाला मेजवानी दे एकदम
25 Sep 2014 - 2:30 pm | स्पा
(स्पर्धेसाठी नाही )
25 Sep 2014 - 2:34 pm | सौंदाळा
सहीच
26 Sep 2014 - 10:51 am | अविनाश पांढरकर
दोन्ही फोटो एकदम मस्त!!
26 Sep 2014 - 11:02 am | काळा पहाड
बच्चे की जान लोगे क्या? असले फोटो काढणारे असल्यावर आम्ही लोकांनी स्पर्धेत यायलाच नको.
26 Sep 2014 - 11:02 pm | खटपट्या
हेच म्हणतो.
या फोटो मध्ये वर गडद हीरवा आणि खाली पोपटी ही कीमया कशी साधली ?
27 Sep 2014 - 10:40 am | स्पा
@ हीरवा आणि खाली पोपटी ही कीमया कशी साधली ?>>
निसर्गाची किमया आहे ती , डोंगरात पुर्ण अंधारुन आलेलं होतं आणि खाली माळरानात मस्त कोवळं ऊन सांडलेलं होतं. फोटो पेक्षा प्रत्यक्ष द्रुष्य अफाट होतं :-)
25 Sep 2014 - 11:39 am | दिपक.कुवेत
सॉल्लीड आहे रे फोटो. कुठलं ठिकाण आहे हे?
25 Sep 2014 - 11:45 am | स्पा
बदलापूर - कोंडेश्वर
25 Sep 2014 - 11:56 am | दिपक.कुवेत
जायचं का पुढल्या वर्षी आल्यावर?? जुन-जुलै मधेच येणं होणार आहे.
25 Sep 2014 - 11:44 am | वेल्लाभट
पहिलाच ऑटम्न चा फोटो नेत्रसुखद. स्पा यांची एन्ट्रीही दणदणीत. वा ! उत्तम स्पर्धा.
25 Sep 2014 - 12:04 pm | मृत्युन्जय
घरातुन सहज बाहेर पडलेलो असताना Samsung SII या मोबाइल फोनने घेतलेला आहे.
25 Sep 2014 - 12:32 pm | मीता
29 Sep 2014 - 4:19 pm | असंका
अप्रतिम!!
25 Sep 2014 - 12:34 pm | अनिता ठाकूर
सर्व फोटो सुंदर आहेत.मात्र, फोटोचे ठिकाण, शीर्षक, शक्य असेल तेथे एक दोन ओळींत माहिती दिल्यास बरे होईल.
25 Sep 2014 - 8:06 pm | असंका
+१
25 Sep 2014 - 1:13 pm | प्यारे१
नाद खुळा गणपतीपुळा नागिण धुरळा फटु!
लई भारी आहेत सगळेच.
25 Sep 2014 - 2:21 pm | प्रचेतस
ग्रीष्म
पेडगावच्या बहादूरगडात
25 Sep 2014 - 2:24 pm | प्यारे१
अरे किती वेळा ते अपडेटवणं?
25 Sep 2014 - 4:24 pm | इशा१२३
पर्णहिन झाड...ग्रीष्मातील दाहकता दाखवणारा मावळतीचा सुर्य..
राजा सिट्,कुर्ग
26 Sep 2014 - 11:23 am | मृत्युन्जय
खुपच सुंदर आहे फोटो
27 Sep 2014 - 7:42 am | इशा१२३
:smile:
25 Sep 2014 - 6:30 pm | गणपा
वाह काय एकसे एक फोटो आहेत. एकादिवसाच्या मुदतीत हे असं तर १२-१५ दिवसांची पुर्वसुचना दिली तर काय होईल राव.
25 Sep 2014 - 8:10 pm | असंका
विषय कोण निवडतंय हो एवढे सुंदर सुंदर?
25 Sep 2014 - 9:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
शरद (पानगळ) ऋतू...
.
कॅमेरा : Sony Exmor 10.2 MP DSC-TX7
स्विट्झरलंडमधल्या शरद ऋतुमध्ये रेल्वे प्रवासात टिपलेला एक क्षण.
25 Sep 2014 - 10:33 pm | पैसा
या वेळेला मत देणं शक्यच दिसत नाही! कोणाचं म्हणून नाव घेऊ?
25 Sep 2014 - 11:25 pm | श्रीरंग_जोशी
इथे केवळ मत द्यायचे आहे हो नाव घ्यायचा आग्रह कुणी केलाय =)).
सर्वच फोटो एकाहून एक आहेत. अजून जे येणार आहेत त्यांच्याबाबत उत्कंठा आहे.
26 Sep 2014 - 11:48 pm | पैसा
मी माझ्या नवर्याचं पण कधी "नाव घेतलं" नाही! (त्याच्या नावाने फक्त शंख करते!) तर आणखी कुणाचं घेणार? :P
26 Sep 2014 - 11:59 pm | श्रीरंग_जोशी
यावरून आठवले. एक ज्येष्ठ मिपाकर मिपाला पुरूषांची मंगळागौर म्हणून संबोधत असतात.
आजवर मिपावर उखाण्यांचा धागा आलाय की नाही?
27 Sep 2014 - 12:31 am | सूड
येऊन गेलाय बहुतेक, परत काढलात तरी हरकत नाही. ;)
26 Sep 2014 - 5:47 am | पहाटवारा
खरंतर हे फोटो पाहून असे वाटतेय कि नुसत्या ऋतु विषयाच्या ग्रीष्म, हेमंत, वर्षा .. अशा शाखा करुन त्याची स्पर्धा घ्यवी .. इतके विविध फोटो मिळतील..
पहाटावारा
26 Sep 2014 - 6:47 am | रेवती
हे सगळे फोटू तर बोलती बंद स्वरुपाचे आहेत. यावेळी मी मतदानाचा हक्क वापरला तर मलाच वाईट वाटेल.
26 Sep 2014 - 11:55 am | किसन शिंदे
26 Sep 2014 - 11:57 am | स्पा
किसन सर , फोटोबद्दल काहीतरी तरी लिहा कि.. काही अंदाज येत नाहीये :P
26 Sep 2014 - 9:27 pm | किसन शिंदे
अर्रर्रर्र!! चूकीचा फोटो टाकला का? वास्तविक काळे ढग बघून पाहणार्याला पावसाळ्यातले काळे ढग वैगेरे वाटतील या हिशोबाने फोटो टाकला होता. ;) पण आता तुमच्यासारख्या सरांना..नाय नाय! हेडसरांना हा फोटो कळाला नाही म्हणजे म्या पामराचीच मोठी चूक झाली.
26 Sep 2014 - 10:08 pm | सूड
जमतंय जमतंय !! कोण म्हणतं फक्त कोकणातल्याच लोकांना खवचटपणे लिहीता येतं. ;)
26 Sep 2014 - 11:01 pm | स्पा
द्येवा तो फोटो कूठे काढलाय, xref याबद्दल बोलत होतो म्या
26 Sep 2014 - 12:05 pm | जिन्गल बेल
26 Sep 2014 - 12:10 pm | स्पा
मस्त
26 Sep 2014 - 12:10 pm | ज्ञानोबाचे पैजार
मळवलीला उतरुन लोहगडावर जाताना वाटेत काढलेला एक फोटो.
पैजारबुवा,
26 Sep 2014 - 12:11 pm | स्पा
वा पैजा ब्वा , मस्त आलाय फटू
26 Sep 2014 - 12:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद स्पा सर,
तुम्ही केलेल्या जाहिर कौतुका मुळे प्रेरीत होउन अजुन एक फोटो टाकायचे धाडस करतो आहे.
हा फोटो अर्थात स्पर्धेसाठी नाही
लोहगडाच्या सहली मधे काढलेला अजुन एक फोटो
सर्वांना परिचीत असलेल हे एक ठिकाण आहे. त्या मुळे या बद्दल फार काहि बोलण्याची गरज नाही.
पैजारबुवा,
29 Sep 2014 - 4:27 pm | असंका
हा फोटो अव्वल येणार दादा! फक्त हा एकच ऋतु. बाकी अस्ले काय नसले काय, याच्याशिवाय व्यर्थ!
26 Sep 2014 - 12:16 pm | पैसा
सगळ्यांनी फोटो डाऊनलोड करून डेस्कटॉपवर ब्याकग्रौंड म्हणून वाप्रायला पर्वांगी द्या रे!
26 Sep 2014 - 3:03 pm | सुखी
माझी पण entry...
नवीन धागा काधणार होतो, तुर्तास एवढेच..
26 Sep 2014 - 3:04 pm | सुखी
फोटो का दिसत नाहिये?
26 Sep 2014 - 6:44 pm | पैसा
फोटोंना पब्लिक अॅक्सेस द्या.
26 Sep 2014 - 9:36 pm | सुखी
पैसाताई,access दिला आहे,तरिही दिसत नाहिये. परत upload करुन पाहिल.
26 Sep 2014 - 9:48 pm | पैसा
मी बघितले आताच.
26 Sep 2014 - 10:17 pm | श्रीरंग_जोशी
जीमेल वर ज्या आयडेन आयडीने लॉगिन करून फोटो शेअर केला आहे त्याने लॉग आउट करावे व फोटोचा दुवा उघडावा
https://plus.google.com/photos/107373005822261978111/albums/606330362973...
मी माझे जिमील जीमेल लॉगिन असताना प्रयत्न केल्यास खालील संदेश मिळाला.
26 Sep 2014 - 7:50 pm | सुखी
26 Sep 2014 - 8:02 pm | सखी
सगळेच फोटो सुरेख आहेत, मत कोणाला द्यायचे खरचं कठीण होणारं. सं.मं विषय एकदम सही आहे.
26 Sep 2014 - 11:01 pm | खटपट्या
बरेच फोटो दिसत नाहीयेत !!
27 Sep 2014 - 1:34 am | संदीप डांगे
27 Sep 2014 - 5:47 am | सानिकास्वप्निल
ऑटम्न /शरद ऋतु मधली एक मोहक संध्याकाळ आणि निष्पर्ण तरु (ठिकाण - डोव्हर - क्लिफ्स).
27 Sep 2014 - 11:27 am | चौकटराजा
क
27 Sep 2014 - 11:39 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्त !
27 Sep 2014 - 11:43 am | स्पा
सुरेखच
27 Sep 2014 - 11:53 am | किसन शिंदे
झक्कास!
28 Sep 2014 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा
चौ.रा.काका... जब्बरदस्त फोटो आहे हो.......!
28 Sep 2014 - 11:57 pm | श्रीरंग_जोशी
देवताओंके चहीते फोटोजमेंसे हमारा सबसे पसंदीदा फोटो.
(वाक्याव्हेर: हिंदी ट्रॉय).
27 Sep 2014 - 11:55 am | विलासराव
सहजच. पहीले तीन धरमशाला ,हिमाचल. शेवटचा उजणी धरण.
27 Sep 2014 - 1:07 pm | किल्लेदार
कुल्लू मनाली रस्ता ….
डिसेंबर महिना. वेळ साधारण संध्याकाळचे ४. ही कदाचित पॉपलर नावाची झाडे आहेत. (या भागात बरीच पॉप्युलर आहेत. :) )
27 Sep 2014 - 7:17 pm | लंबूटांग
गेल्या वर्षी व्हर्मॉन्टला काढला आहे.
वरील फोटो दिसत नसल्यास येथे जाऊन बघावे https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk
पूर्ण अल्बम बघायची इच्छा असल्यास येथे बघता येईल https://app.box.com/s/z2mby00x8rxzp2t47lxo
https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk
28 Sep 2014 - 9:08 pm | चतुरंग
आमची पण एक एंट्री...
शिकागोतल्या एका बर्फाळ दिवसानंतरची गंभीर आणि किंचित उदास करडी छ्टा असलेली संध्याकाळ. सगळीकडे निष्पर्ण झाडांचे खराटे आणि दिसेल तेथपर्यंत साचलेले हिम.
दुर्दैवाने एक्झिफ डाटा उपलब्ध नाहीये. :(
29 Sep 2014 - 12:33 am | सूड
सगळ्या रथीमहारथींमध्ये मज पामराची थोडी भर !!
29 Sep 2014 - 12:35 am | सूड
सुधागड ट्रेकला पावसाची बारीकशी सर येऊन गेल्यावर काढलेला फोटो. एक्सिफ डेटा वैगरे सध्या हाताशी नाहीये.
29 Sep 2014 - 1:41 pm | स्पा
कड्क...
29 Sep 2014 - 4:30 pm | असंका
काय फोटो हो दादा! काय नजर आहे!!
30 Sep 2014 - 10:11 am | भिंगरी
सुस्नात,टवटवीत प्राजक्तं.
खुपच छान.
29 Sep 2014 - 12:36 am | खटपट्या
30 Sep 2014 - 2:30 pm | दिपक.कुवेत
तिसरा फोटो खुपच आवडलाय.
1 Oct 2014 - 12:48 am | खटपट्या
धन्यवाद दिपकजी, स्पर्धेसाठी कोणता द्यावा, या विचारात आहे.