http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
---------------------------
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons)
स्पर्धेचे नियम दुसर्या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस. इतर सर्व नियम सुद्धा दुसर्या स्पर्धेप्रमाणेच!
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
प्रतिक्रिया
29 Sep 2014 - 2:35 am | जुइ
सर्व छायाचित्रे सुरेख आहेत
29 Sep 2014 - 12:56 pm | वेल्लाभट
खलास आहेत बुआ सगळी छायाचित्र!
29 Sep 2014 - 1:28 pm | आरोही
गुलमर्ग येथे जवळपास ९००० फुट उंचीवर असलेल्या बर्फाच्या पठारावर असताना अचानक तापमानात झालेला बदल आणि अनुभवलेली बर्फवृष्टी .
29 Sep 2014 - 3:25 pm | मेघवेडा
चैतन्य महाप्रभु दीक्षितांचे शब्द उसने घेऊन -
त्या थेंबांशी हितगुज व्हावे छान टपोरे
अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे
29 Sep 2014 - 3:28 pm | प्यारे१
ही स्पर्धा, स्पर्धा म्हणून रद्द करावी अशी नम्र विनंती करण्यात येत आहे.
आमच्या दृष्टीनं सगळेच विजेते आहेत.
अत्यंत सुंदर छायाचित्रांना उजवं डावं करुन कुणाचाही हिरमोड करण्याची इच्छा नाही किंबहुना तसं करताच येणार नाही.
29 Sep 2014 - 5:55 pm | सुखी
29 Sep 2014 - 5:58 pm | सुखी
आता पब्लिक शेअर केलय, तरि फोटो दिसत नाहिये.
29 Sep 2014 - 6:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटो थंबनेलवरून नाही तर पूर्णपणे उघडलेल्या चित्राच्या URL ने चिकटवल्यास समस्या येत नाही.
29 Sep 2014 - 6:06 pm | सूड
मस्त फोटो!!
आता पुणेरी कमेंटः येवढं पाणी शिंपडताय, आलं का गुलाब शुद्धीवर??
29 Sep 2014 - 6:43 pm | सुखी
:ड :ड पावसाच पाणी आहे ते
29 Sep 2014 - 6:22 pm | प्रचेतस
स्पर्धेसाठी नाही
ताम्हिणी घाट
29 Sep 2014 - 6:44 pm | प्यारे१
आमचाही प्रयत्न. डिसेंबर २००८ उटी चे फटु आहेत. ऋतु हिवाळा.
30 Sep 2014 - 5:50 am | श्रीरंग_जोशी
~ हिवाळा ~
माणसाच्या इच्छाशक्तीची, चिकाटीची, चिवटपणाची, संयमाची कसोटी पाहणारा ऋतू.
रोजच्या जगण्यावर अनेक मर्यादा आणणारा पण बरेच काही शिकवून जाणारा ऋतू.
पांढऱ्या रंगातही असलेल्या छटांची जाणिव करून देणारा ऋतू.
हिवाळ्यातील एक निवांत सकाळी काढलेले हे छायाचित्र हिवाळ्यास समर्पित.
EXIF: Canon PowerShot SX30 IS; F stop: f/5.8; Exposure: 1/640; Focal length: 150 mm
चित्रावर क्लिक केल्यास नव्या टॅबमध्ये मोठ्या क्षेत्रफळात बघता येईल.
30 Sep 2014 - 2:36 pm | सूड
एकच नंबर !!
30 Sep 2014 - 7:37 am | वेल्लाभट
माझी प्रवेशिका:
ऋतु: पावसाळा
फोटो ठाणे येथील येऊर च्या जंगलात घेतलेला आहे. तशी कधीही फोटोग्राफीसाठी ही सुंदर जागा आहे पण पावसाळ्यात तर येऊरला बहार येते.
अॅपर्चर एफ ४
शटरस्पीड १/१००
आयएसओ ६४०
फोकल लेन्ग्थ १० एम एम
एक्स्पोजर -०.३ स्टेप
30 Sep 2014 - 11:15 am | सस्नेह
१. उरमोडी धरण सज्जनगड
२. आणि ३. ठोसेघर धबधबा
30 Sep 2014 - 12:01 pm | रुपी
ठिकाण : मॅमॉथ लेक्स, कॅलिफोर्निया
कॅमेरा : Canon PowerShot S5 IS
Lens : 6-72mm
Focal Length 66.8mm
Exposure 1/125
F Number f/3.5
ISO 80
30 Sep 2014 - 12:11 pm | स्पा
आह ... अप्रतिम फ्रेम
30 Sep 2014 - 12:19 pm | सह्यमित्र
EXIF (साधारण, specific values आठवत नाहीयेत):
Nikon D3100
Nikkor AF-S 18-55 f/3.5-5.6 @ 18 mm
Aperture: f/8
Shutter Interval: ~3 sec
ND 64 Filter Used
ठिकाण: जुन्न्नर जवळील डोंगर रांग.
30 Sep 2014 - 12:34 pm | इशा१२३
एकाहून एक अप्रतिम फोटो आहेत.उन्हाळा,पावसाळा,हिवाळा असे विभाग नाहि का करता येणार?मत देण फार अवघड काम आहे.
30 Sep 2014 - 2:34 pm | दिपक.कुवेत
प्यारे ला अनुमोदन. निवड करणं खरचं अवघड काम आहे. आता मी हि थोडा हातभार लावावा असं वाटु लागलय.
30 Sep 2014 - 3:18 pm | मोहन
Nikon COOLPIX S800C
f/4.3
Exposure - 1/320
ISO 125
30 Sep 2014 - 3:24 pm | मी एक ट्रेकर
मनमाड जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावरून टिपलेले दृश्य. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या या ठिकाणी पावसाळ्यात दिसणारा सुंदर परिसर.
Camera: Canon 550D
30 Sep 2014 - 4:17 pm | वेल्लाभट
अंकाईच्या गावात !
जब्बरदस्त फोटो, आणि ठिकाण आहे मित्रा ! क्या बात है
30 Sep 2014 - 6:11 pm | रेवती
आई ग्ग! किती सुरेख फोटो आहे. अंगावर काटा आला अगदी! मी वर्षानुवर्षे भारतात न जाऊन भयंकर काहीतरी मिस करतीये असे वाटतय. फोटू अतोनात मस्त आहे.
30 Sep 2014 - 6:23 pm | एस
ती हळब्याची शेंडी आहे ना? की इखारा आहे? धोडपवरून यांचे फोटो सुरेख येतात असं ऐकलंय.
30 Sep 2014 - 10:29 pm | मी एक ट्रेकर
हडबिची शेंडी आणि डावीकडचा डोंगर गोरखगड
30 Sep 2014 - 4:02 pm | प्रभाकर पेठकर
छायाचित्रण क्षेत्रात एक मूलभूत विधान वाचलेलं आहे. 'निसर्ग कधी फसवत नाही.' (Nature never deceives)
म्हणजेच, निसर्ग जसा 'दिसतो' तस्साच छायाचित्रात बंदिस्त होतो. (छायाचित्रणाचा प्राथमिक अनुभव गृहीत धरला आहे.)
सुंदर, विलोभनीय निसर्गाचे जे अनंत तुकडे जगभर विखुरलेले आहेत ते नजरेस पडताच रसिकाच्या तोंडून उत्स्फुर्त दाद जाते...व्व्वा!
निसर्गाचे रुपडे छायाचित्रात बंदिस्त करताना त्या दृष्याचे वैशिष्ट्य अधोरेखित करणे जसे, सूर्यास्ताचा लालीमा, सुर्योद्याचा अंधाराचा घेतला जाणारा वेध, पावसाचा धुवाँधार स्वभाव, निसर्गाचं यःकश्चित मनुष्यप्राण्यावर आक्रमण करणारं रौद्र रुप वगैरे वगैरे महत्त्वाचे आणि कौशल्याचे असते. विविध स्पीड (फिल्मचा, कॅमेराचा), संवेदनक्षमता (ISO), लेन्सचा वापर, डेफ्थ ऑफ फिल्डचावापर, छायाप्रकाशचा खेळ अशा असंख्य बाबीतून छायाचित्रकाराचे कौशल्य दिसून येते.
मतदान करताना वर वर्णिलेल्या कौशल्याला जास्त मार्क द्यावेत. निसर्ग दृष्य चांगले आहे म्हणून छायाचित्र चांगले दिसते आहे की छायाचित्रकाराचे कांही विशिष्ट कौशल्य/कल्पकता त्यामागे आहे ह्याचा विचार करावा आणि क्रमांक द्यावेत. म्हणजे, सुंदर निसर्गाची 'फ्रेम' निवडण्यात छायाचित्रकाराचे कांहीच कौशल्य नसते असे मी म्हणत नाहीये. तेही महत्त्वाचे आहे. पण नुसतीच 'फ्रेम' सुंदर आहे की छायाचित्रकाराचे कसब पणास लागले आहे ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत हे मतदान करताना ध्यानात ठेवावे.
श्री. स्वॅप्स ह्यावर जास्त चांगले मार्गदर्शन करू शकतील, त्यांनी ते तसे करावे अशी विनंती मी करेन.
30 Sep 2014 - 5:43 pm | एस
या विषयावर मी मतदान संपल्यावर लिहिणे जास्त उचित ठरेल असे पूर्वानुभवावरून वाटतेय. :-) आपण मांडलेला दृष्टिकोन योग्यच आहे. यातले छायाचित्रकाराच्या कौशल्याला जास्त दाद दिली गेली पाहिजे या मुद्द्याबाबत अगदी सहमत. जास्त काही लिहीत नाही.
30 Sep 2014 - 7:15 pm | sagarparadkar
1 Oct 2014 - 12:18 am | टपरी
1 Oct 2014 - 12:23 am | टपरी
1 Oct 2014 - 12:29 am | टपरी
GOOGLE + वापरुन फोटो टाकण्यासाठी काय करावे लागेल?
1 Oct 2014 - 12:43 am | श्रीरंग_जोशी
सदर फोटो पब्लिकली शेअर केला आहे का?
याबद्दल खात्री करण्यासाठी तुमचे स्वतःचे गूगल लॉगिन नसताना फोटोची लिंक ब्राउझरमधून ओपन करा.
फोटो दिसत असेल तर इथेही दिसू शकेल. नसल्यास प्रथम पब्लिकली शेअर करण्याची प्रक्रिया पार पाडावी.
फोटोची लिंक स्लाइड शो सुरू असताना राइट क्लिक करून 'Copy Image URL' ने मिळवली आहे असे गृहित धरले आहे.
1 Oct 2014 - 1:06 am | टपरी
धन्यवात, मदत करण्यासाठी
1 Oct 2014 - 1:00 am | टपरी
https://lh5.googleusercontent.com/-jFPLKagFnrI/VCa2U9DYzPI/AAAAAAAABXc/q...
1 Oct 2014 - 1:09 am | श्रीरंग_जोशी
तुम्ही दिलेली लिंक वापरून...
फोटो खरंच सुंदर आहे.
1 Oct 2014 - 8:05 am | आनन्दिता
1 Oct 2014 - 8:36 am | किसन शिंदे
दोन्ही फोटो अप्रतिम आहेत, विशेषतः पहिला!
1 Oct 2014 - 9:05 am | विकास
असेच काही फोटो
बर्फाच्या season मध्ये विमानातून घेतलेला बॉस्टन विमानतळा जवळील फोटो
बर्फाळा
उन्हाळ्याच्या शेवटाला चालू झालेला सफरचंदांचा हंगाम
आणि हा: हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट....
1 Oct 2014 - 3:57 pm | अजया
मस्त फोटो.सफरचंदाची झाडं वाकली आहेत फळांनी!!
1 Oct 2014 - 8:06 pm | चित्रगुप्त
मस्त आहेत सर्वांचेच फोटो.
माझा पण एकः अमेरिकेतील फॉल: