(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ)
_____________________________________
मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे
वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे.
मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो}
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.}
मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.
जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.}
वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :-
An Introduction to the "MantraŚãstra"
MANTRAS
दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे !
प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो.
वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो.
मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १}
या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती.
२)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता.
३}घरात अनेकदा मला न मिळणार्या,दॄष्टीस न पडणार्या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली.
४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली.
या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत.
या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख}
जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.
प्रतिक्रिया
11 Feb 2014 - 9:13 am | बॅटमॅन
मन्त्र शब्दाची व्याख्या परंपरेनुसार ठीकच आहे.
पण परंपरेवर नक्की किती विश्वास ठेवावा त्याचा काहीएक विवेक करणे क्रमप्राप्त आहे. त्या विवेकालाच विरोध करून त्या विरोधाचे उदात्तीकरण कोणी करू पाहील तर माझा त्याला विरोध असेलच.
बाकी दोन श्लोकांत अमुक एक क्याटेगरी घ्यावी अन मी त्यातला सर्वश्रेष्ठ आहे असे सांगावे असा कृष्णाचा फंडा आहे. ते ठीकच आहे, पण सो व्हॉट??? आंधळा भक्तिभाव का ठेवावा? परंपरेतल्या बर्याच गोष्टी मला पटतात, पण म्हणून सर्वच पटतात असे नाही.
आणि
याच्या नावाखाली काहीही नॉनसेन्स फैलावण्याचे लैसन्स मिळाल्यागत मुक्ताफळे लोक उधळतात तिकडे दुर्लक्ष करू नये.
11 Feb 2014 - 9:15 am | मदनबाण
बाकी दोन श्लोकांत अमुक एक क्याटेगरी घ्यावी अन मी त्यातला सर्वश्रेष्ठ आहे असे सांगावे असा कृष्णाचा फंडा आहे.
आमच्यासाठी श्रीकॄष्ण हे भगवंतच आहेत, आपल्यासाठी ते फक्त फंडा सागणारे असेल तर तो दोष आमचा नाही.
याच्या नावाखाली काहीही नॉनसेन्स फैलावण्याचे लैसन्स मिळाल्यागत मुक्ताफळे लोक उधळतात तिकडे दुर्लक्ष करू नये.
आपण सेंस शोधला तर नॉनसेन्स अपोआप बाजुला होते, असा माझा अत्ता पर्यंतचा अनुभव आहे. मंत्र शास्त्राचा अनुभव घेणारे असंख्य आहेत, आणि त्यात मी सुद्धा आहे.
11 Feb 2014 - 9:16 am | बॅटमॅन
कृष्ण तुमच्यासाठी भगवंत असेल तर अवश्य असूदे. मला त्या मताची काहीच अडचण नाही, उलट आदर आहे. त्याच्याबद्दल माझ्याही मनात आदर आहे, सबब कुणाला तरी तो भगवंत वाटणे साहजिक आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या भूमिकांत बेशिक विरोध असायची शक्यता कमीच- अॅट लीस्ट या केसमध्ये.
अन आपण सेन्स शोधावा याचा अर्थ नॉनसेन्स पॉइंट आउटही करू नये असा माझ्या मते अर्थ होत नाही.
11 Feb 2014 - 9:23 am | मदनबाण
कृष्ण तुमच्यासाठी भगवंत असेल तर अवश्य असूदे. मला त्या मताची काहीच अडचण नाही, उलट आदर आहे. त्याच्याबद्दल माझ्याही मनात आदर आहे, सबब कुणाला तरी तो भगवंत वाटणे साहजिक आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या भूमिकांत बेशिक विरोध असायची शक्यता कमीच- अॅट लीस्ट या केसमध्ये.
दोन्ही श्लोकांच्या बाजुला जे कंसा मी लिहले आहे ते असत्य आहे का ? असेल तर का ? हे आपणच स्पष्ट करावे. ते कॄष्णाने सांगितले म्हणुनच म्हणुन सत्य आहे असा या उदाहरणांचा अर्थ नसुन, सत्यच कॄष्णाने सांगितले आहे. जप हा मंत्रांच केला जातो,हा माझा समज आहे, तसेच गायत्री सुद्धा मंत्रच आहे... हे दर्शवणे या उदाहरणांचा उद्धेश आहे.
अन आपण सेन्स शोधावा याचा अर्थ नॉनसेन्स पॉइंट आउटही करू नये असा माझ्या मते अर्थ होत नाही.
मान्य आहे, परंतु मंत्रशास्त्र हेच नॉनसेन्स आहे असा अर्थ मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे या आपल्याच विधानातुन प्रतित होतो आहे असे मला वाटते.
जाता जाता :--- कोका कोला कोका कोला असा शब्द प्रयोग मंत्र समजुन लाखो माळा ओढल्या तरी त्यातुन काहीही निष्पन्न होणार नाही. परंतु अगदी श्री राम जय राम जय जय राम असा जप करण्यांना मात्र नक्कीच फायदा झालेला दिसेल.
यात कोका कोला वाला नॉनसेंस झाला आणि रामनाम हे सेंस झाले.विवेक बुद्धीचा वापर केला की नॉनसेंसचा अडथळा येवु नये असे मला वाटते. तसही ज्ञान वापरुन गैर प्रकार होत नाही असे कोणी सांगितले आहे ? तुम्ही त्याचा वापर कसा करता त्यावर त्याचे परिणाम अवलंबुन असतात. नोनसेंस करणारे नसतातच असा कुठलाही दावा माझ्या विधानात नाही.
11 Feb 2014 - 9:25 am | बॅटमॅन
ठीक.
पैला परिच्छेद टेक्निकल आहे आणि त्यावर असहमती नाही- निव्वळ शब्दार्थदृष्ट्या पाहिल्यास.
अन मंत्रांवर लिटरली विश्वास ठेवणे मला पटत नाही. याचा अर्थ मंत्रशास्त्राच्या 'पॉवर' ला विरुद्ध जात असेल तर जाऊदे.
अन कोकाकोला विरुद्ध श्री राम म्हणाल तर मग वाल्मिकीही सुरुवातीला मरा मरा असा जप करीत असे म्हणतात. ते एक असोच. पण मंत्रामुळे ज्या अक्षरसमुच्चयाचा बोध होतो त्यात बाय इटसेल्फ काही 'पॉवर' असते हे मला पटत नाही. तेव्हा या मुद्याशी असहमती तर असणारच आहे. हा दावा असेल तर सिद्ध करून दाखवा असे माझे साधे म्हणणे आहे. करता येत नसेल तर मग मी या दाव्याच्या सत्यतेबद्दल कायम शंका उपस्थित करणार. मग कुणी माझी समज काढो नैतर अजून काही.
11 Feb 2014 - 9:27 am | मदनबाण
पण मंत्रामुळे ज्या अक्षरसमुच्चयाचा बोध होतो त्यात बाय इटसेल्फ काही 'पॉवर' असते हे मला पटत नाही.
आपल्याला पटत नाही या निष्कर्षाप्रत आपण कसे आलात ? ते जरा स्पष्ट करुन सांगा. किती मंत्रांचा आपण अभ्यास केलात ? आणि अभ्यास केला नसेल तर निष्कर्ष कसा काढलात ?
पण मंत्रामुळे ज्या अक्षरसमुच्चयाचा बोध होतो त्यात बाय इटसेल्फ काही 'पॉवर' असते हे मला पटत नाही.
वरती जे लिहले आहे ते परत एकदा वाचावे !
हा दावा असेल तर सिद्ध करून दाखवा असे माझे साधे म्हणणे आहे. करता येत नसेल तर मग मी या दाव्याच्या सत्यतेबद्दल कायम शंका उपस्थित करणार. मग कुणी माझी समज काढो नैतर अजून काही.
अभ्यास आणि अनुभव न घेता शंका उपस्थीत करणे हे कुठल्याही वैज्ञानिक किंवा अभ्यासु वॄतीचे लक्षण आहे असे मला वाटत नसल्याने मी इथेच थांबतो.
जाता जाता :- आगीला हात लावला तर भाजते या विधानाची सत्यता तेव्हाच येउ शकते जेव्हा आपण अग्नीस स्पर्श कराल किंवा अग्नीचा आपणास स्पर्श होइल. तो पर्यंत अग्नी थंड लागतो आणि त्याने भाजत नसेल ना ? या शंकेस उत्तर म्हणजे दुर्लक्ष करणे किंवा जालीय भाषेत सांगायचे तर फाट्यावर मारणे, जे आम्ही नेहमीच करतो. ;)
* आपल्याशी या विषयावर फक्त वैचारिक विरोध राहिल याची कॄपया नोंद घ्यावी.
11 Feb 2014 - 9:29 am | बॅटमॅन
सांगतो. मी किती मंत्र अभ्यासले हा प्रश्न इथे लागू नाही, कारण माझ्या शंकेला त्याची गरज नाही.
पण मुळात शंका उपस्थित करणे हे चूक आहे असे तर आपले मत नाही ना?
हां तर जेव्हा जेव्हा कोणी नामस्मरण करतो आणि त्याला जो काही फायदा होतो, तो सर्वस्वी नामस्मरण करणार्याचा निग्रह, त्याची भावना आणि तो व नामदीक्षा देणारा यांतील नात्यावर अवलंबून असतो. निव्वळ त्या अक्षरात काहीही नसते असे माझे मत आहे.
बाकी पास.
अन
हरकत नाही, सेमच.
11 Feb 2014 - 9:31 am | मदनबाण
सांगतो. मी किती मंत्र अभ्यासले हा प्रश्न इथे लागू नाही, कारण माझ्या शंकेला त्याची गरज नाही.
ह्म्म... जो शंका घेतो त्यानी त्या शंकेच्या निरसनार्थ अभ्यास किंवा साधना करुन पहावी, त्याने उत्तर मिळते का ते शोधावे.
शंका काय हव्या तितक्या काढता येतील. पण मग त्याला काहीही अर्थ उरत नाही.
पण मुळात शंका उपस्थित करणे हे चूक आहे असे तर आपले मत नाही ना?
शंका आली तर त्याचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न केले जातात, पण म्हणुन प्रयत्न न-करता नुसत्याच शंका काढणे हे मूर्खपणाचे लक्षण ठरेल असे वाटते... समर्थांनी पढत मूर्खाची लक्षणे सांगितलेली आहेतच !
जेव्हा जेव्हा कोणी नामस्मरण करतो आणि त्याला जो काही फायदा होतो, तो सर्वस्वी नामस्मरण करणार्याचा निग्रह, त्याची भावना आणि तो व नामदीक्षा देणारा यांतील नात्यावर अवलंबून असतो.
सहमत आहेत, यातही अनेक गोष्टी येउ शकतील परंतु जर अक्षरात सामर्थ्य नसेल तर नामस्मरण कसले ? राम नामातच सामर्थ्य आहे म्हणुन त्याचा जप केला जातो.
वरती आपण म्हणालात :- अन कोकाकोला विरुद्ध श्री राम म्हणाल तर मग वाल्मिकीही सुरुवातीला मरा मरा असा जप करीत असे म्हणतात.
मरा मरा असे आपण बराच काळ म्हणुन बघा,मुखात राम येते की नाही हे आपल्यालाच पडताळुन पाहता येइल. वाल्याचा वाल्मिकी झाला तो याच "नाम" सामर्थ्याने असे अत्ता पर्यंत मी समजत आलो आहे.
जाता जाता :- तूर्तास इथे थांबावे म्हणतो.
11 Feb 2014 - 9:33 am | बॅटमॅन
प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो. शंका विचारणार्याला मूर्खात काढणे हा उपाय कैक लोक करतात, पण त्यातून काहीच साध्य होत नाही. असे प्रत्येक गोष्टीत केले तर त्याला काहीच अर्थ नाही.
असहमत. पण यावर नंतर कधीतरी. गुरू मेहरबान तो रावण नाम भी पुण्यवान.
मरा मरा असे लै वेळेस म्ह्टल्यावर राम राम होणे तर फक्त शाब्दिक परिणाम आहे. रामनामाच्या पावरचा इथे कैच संबंध नै.
पण आता असो. असहमती राहणार हे कळून चुकले आहे सबब राहूदे.
11 Feb 2014 - 9:34 am | प्रचेतस
माझ्या आठवणीप्रमाणे वाल्या कोळ्याची कथा वाल्मिकी रामायणात नाही. तरी नक्की आठवत नाही. असलीच तरी उत्तरकाण्डातच असावी आणि प्रक्षिप्त असावी.
11 Feb 2014 - 9:46 am | मदनबाण
माझ्या आठवणीप्रमाणे वाल्या कोळ्याची कथा वाल्मिकी रामायणात नाही. तरी नक्की आठवत नाही. असलीच तरी उत्तरकाण्डातच असावी आणि प्रक्षिप्त असावी.
प्रक्षिप्त असो वा नसो त्याने नाम महात्याला आणि शब्द सामर्थ्याला काहीही फरक पडत नाही.
11 Feb 2014 - 9:36 am | मदनबाण
शंका विचारणार्याला मूर्खात काढणे हा उपाय कैक लोक करतात, पण त्यातून काहीच साध्य होत नाही. असे प्रत्येक गोष्टीत केले तर त्याला काहीच अर्थ नाही.
जो प्रयत्न न करता,त्या विषयी वाचन न-करता फक्त शंकाच काढतो त्यांनाच मूर्ख समजावे.जो शंका विचारतो त्याने याचे उत्तर स्वतः शोधण्याचे कष्ट का घेउ नये ? असला हरी तर देइल खाटल्यावरी हा विचार चुकीचा असल्यानेच प्रयत्नांती परमेश्वर असा विचार ठेवावा.मी शंका विचारेन पण माझ्या बाजुने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार नाही हा दॄष्टीकोन चुकीचा आहे.
असहमत. पण यावर नंतर कधीतरी. गुरू मेहरबान तो रावण नाम भी पुण्यवान.
अहं गुरु की करनी गुरु जायेगा चेले की करनी चेला :- उड जायेगा हंस अकेका हे कबिराचे निर्गुण भजन ऐकावे... झाल्यास बोध होइल.
मरा मरा असे लै वेळेस म्ह्टल्यावर राम राम होणे तर फक्त शाब्दिक परिणाम आहे. रामनामाच्या पावरचा इथे कैच संबंध नै.
शाब्दिक परिणामाने वॄत्तीत्,वर्तनात आणि चित्तात बदल होणे हा नामाचा परिणाम आहे,आणि त्याला योग्य त्या मंत्राच उपयुक्त ठरतो. वरती कोका-कोलाचे उदा. आधीच देउन झाल्याने त्याची पुनरावॄत्ती टाळतो.
असहमती राहणार हे कळून चुकले आहे सबब राहूदे.
होय असहमती तर राहणारच !
11 Feb 2014 - 9:37 am | बॅटमॅन
तुम्हाला शंका विचारली याचा अर्थ मी बाकी वाचन करत नाही असा होत नाही. उत्तर द्यायचे नसेल किंवा देववत नसेल तर राहूदे पण हे आकांडतांडव आक्रस्ताळेपणाचे लक्षण आहे. असो, चालूद्या.
11 Feb 2014 - 9:39 am | मदनबाण
तुम्हाला शंका विचारली याचा अर्थ मी बाकी वाचन करत नाही असा होत नाही.
असे असेल तर दिलेले दोन्ही पिडीएफचे दुवे वाचुन काढावे ही विनंती ! आशा आहे की तुला पडलेल्या शंकाचे उत्तर मिळेल.
उत्तर द्यायचे नसेल किंवा देववत नसेल तर राहूदे पण हे आकांडतांडव आक्रस्ताळेपणाचे लक्षण आहे. असो, चालूद्या.
मी माझे म्हणणे अगदी स्पष्टपणे मांडले आहे, ते जर आक्रस्ताळेपणाचे लक्षण आहे असे वाटत असेल तर तसेही हरकत नाही ! पण नुसती शंका विचारण्या पेक्षा वाचन करुन / संदर्भ देउन मग शंका विचारली की समोरच्यासही त्या बद्धल उत्तर देण्यास / विचार करण्यास प्रचॄत्त व्हावे असे वाटण्यास हरकत नसावी, परंतु मी किती मंत्र अभ्यासले हा प्रश्न इथे लागू नाही, कारण माझ्या शंकेला त्याची गरज नाही.असे विधान करणे नक्कीच सुज्ञपणाचे लक्षण वाटत नाही. ;)
असो...
11 Feb 2014 - 9:41 am | अर्धवटराव
त्या अक्षरात बरच काहि असतं. ऐकायला गंमत वाटेल, पण सर्व सेन्सेस मेलेला (म्हणजे आंधळा, मुका, बहिरा, त्वचेची संवेदना गमावलेला) माणुस केवळ त्या अक्षराच्या/अक्षर समुहाच्या सहाय्याने योग्य ठिकाणि पोचतो. (ज्याला काहि दिसत नाहि, ऐकु येत नाहि, बोलता येत नाहि अशा माणसाला मूळात कुठलही अक्षर कळेलच कसं ही अगदी प्राथमीक आणि रास्त शंका आहे. आणि इथेच त्या अक्षरांचं महत्व आहे. कुठल्याही इंद्रीयाचा वापर न करता त्या अक्षरांचा वापर/वावर होतो. असो. तो वेगळा विषय आहे.)
सध्या इत्यलम् !!
11 Feb 2014 - 9:43 am | बॅटमॅन
हे कसे ते ऐकायला आवडेल. बाकी इन एनी केस अक्षरे ही केवळ प्रतीके आहेत. त्यांना काहीएक अर्थ आहे तो फक्त आपण दिलेला आहे.
11 Feb 2014 - 9:44 am | अर्धवटराव
पण हि चर्चा त्याबद्द्ल नाहि.
अगदी ओबडधोबड शब्दात सांगायचं झालं तर अक्षर व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही स्टेट मधे आहे. त्यांचं हँडशेकींग मंत्रामुळे होतं. (तत्वतः अव्यक्त अॅज सच काहि नसतं. पण सामर्थ्याचं प्रकटन समजुन घ्यायला अव्यक्त शब्द वापरावा लागतो).
12 Feb 2014 - 4:40 am | स्पंदना
काय प्रतिक्रिया आहे?
हॅटस ऑफ अर्धवटराव! हॅटस ऑफ!!
12 Feb 2014 - 11:17 am | यसवायजी
अक्षरे ही केवळ प्रतीके आहेत. त्यांना काहीएक अर्थ आहे तो फक्त आपण दिलेला आहे.
+१
अक्षरं नसणार्या काही थीम ऐकल्या तरी BP बदलतं. बाईक चालवताना 'धूम्-धूम' ऐवजी 'कहीं दीप जले कही दिल' ऐकलं तर काय होइल?
गीतरामारणातले "जोड झणिं कार्मुका सोड रे सायका मार ही त्राटिका, रामचंद्रा" ऐकल्यावर खुद्द रामाला स्फुरण चढेल.
शब्दांपेक्षा सूर्,ताल,लय ही महत्वाचे आहेत. बाकी प्रत्येकाचे मनाचे खेळ.
मी सकाळी गडबडीत आवरताना चाची ४२० मधील "दौडा दौडा भागा भागा सा" हे गाणं म्हणतो, (मला) फायदा होतो.:) पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की ह्या मंत्रात काही 'पावर' आहे.
बाकी इथे चाल्लेली मजा पाहून आज खात्री झाली, अजुन बर्याच निर्मल बाबांना स्कोप आहे. ;)
दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिये!!!
जाता-जाता: या काही व्यक्ती हरवल्या आहेत. कोणता मंत्र म्हणता येईल?? :))
11 Feb 2014 - 9:19 am | प्यारे१
@ मदनबाण,
>>> आपले अनुभव व्यक्त स्वरुपातले नि निश्चितच फायदेशीर अशा स्वरुपाचे असले तरी वैयक्तिक आहेत नि त्याला कारणमीमांसा देता येण्यासारखी आहे. योगायोग अनेक प्रकारे झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो योगायोग तुमच्याच बाबतीत अधिक वेळा झाला असल्याची शक्यता ही जास्त आहे. सापशिडीतला ठोकळा फेकताना ६ चाच आकडा सलग चार वेळा येऊ शकतो. चिकीत्सा करा चिकीत्सा करा......
माझ्या मते प्रामाणिकपणं सांगायचं तर मंत्राचं- (बीजमंत्राचं काम)- ह्याच्या वरच्या पातळीवर चालायला हवं. आराध्य देवते ची उपासना करत करत तिच्याशी एकरुप होण्याची क्षमता बीजमंत्रामध्ये असताना व्यावहारिक पातळीवर मंत्रांचा उपयोग न करावासा वाटणं/ तशी इच्छा न होणं हे जास्त श्रेयस्कर नि जास्त शरणागत झाल्याचं द्योतक मानलं जावं.
व्यवहार व्यवहाराच्या जागी, साधना साधनेच्या जागी असावी. (असे वस्तु शोधून देणारे मंत्र सकाम मंत्र झाले. वापरु नयेत असं माझं मत. तुमचं वेगळं असेल कदाचित. ह्याबाबत मतभेद असण्याची शक्यता आहे. असायला हरकत नाही.)
ब्रुस ऑलमाईटी मधला ब्रुस अत्यंत क्षुल्लक गोष्टींसाठी आपल्या ताकदीचा वापर करतो असं काहीसं.
11 Feb 2014 - 9:21 am | मदनबाण
सापशिडीतला ठोकळा फेकताना ६ चाच आकडा सलग चार वेळा येऊ शकतो. चिकीत्सा करा चिकीत्सा करा......
मी कोणाच्याही कोणत्याही मताचा या बाबतीत विरोध करत नाही,कारण आलेला अनुभव हा व्यक्तिगत आहे.या मंत्राचा वापर करुन इतरांनाही असेच अनुभव आल्याचे माझ्या माहितीत आहेत... तसेच ते असत्य कथन करतील / केले असे मला कुठल्याही प्रकारे वाटत नाही ! जसे खरडीत सांगितले तेच परत सांगतो, गाडी चालवणार्यालाच गाडीची जजमेंट कळते, आणि ती अनुभवातुनच येते.ती जजमेंट कोणालाही शिकवता येत नाही,अनुभावातुनच ती येते आणि त्यासाठी गाडी चालवणे हा अनुभव घेणे क्रमप्राप्त आहे.
माझ्या मते प्रामाणिकपणं सांगायचं तर मंत्राचं- (बीजमंत्राचं काम)- ह्याच्या वरच्या पातळीवर चालायला हवं. आराध्य देवते ची उपासना करत करत तिच्याशी एकरुप होण्याची क्षमता बीजमंत्रामध्ये असताना व्यावहारिक पातळीवर मंत्रांचा उपयोग न करावासा वाटणं/ तशी इच्छा न होणं हे जास्त श्रेयस्कर नि जास्त शरणागत झाल्याचं द्योतक मानलं जावं.
मत्रांचा उपयोग कसा करावा यावर बराच विचार / चर्चा / वाचन करता येइल्.पण त्याचा प्रभाव समजुन,जाणवुन घेण्यासाठी त्याचा वापर करुन पाहणेही तितकेच आवश्यक आहे.मी काही योगी-बाबा,साधु-सन्यासी नाही,इथल्या सर्वांसारखाच सामान्य गॄहस्थाश्रमी माणुस आहे.प्रपंचात पडले की त्यासंबंधी सर्व गरजा,कर्तव्य आणि इतर सर्व गोष्टींना मी बांधील आहे आणि त्यापासुन पळ काढता येत नाही.मंत्र हे मनुष्याच्या हितासाठी वापरले तर सांसारिक गोष्टींची पूर्तता करुन देखील इच्च्छित उद्धिष्ट साधण्याची इच्छा नक्कीच ठेवता येते आणि तिथे पोहचाताही येउ शकते ! बीज मंत्रांचा कसा उपयोग केला जावा हे त्याच्या उद्धेशावर अवलंबुन आहे ! उदा. क्लीं हा आकर्षण निर्माण करणारा आहे तर श्रीं हा अर्थशक्तीशी निगडीत आहे. याचे वेगवेगळे उपयोग आणि रचना करुन त्याने देखील वेगवेगळे परिणाम साध्य केले जाउ शकतात्.मंत्रांचा व्याव्हारिक पातळीवर उपयोग केला जाउ नये असा कुठलाही नियम माझ्या पाहण्यात नाही,किंवा पुढे जाउन हे सांगावेसे वाटेल की अनेक मंत्रांनी सर्व साधारण मनुष्यास त्याच्या आयुष्यात मदत व्हावी हा एकमेव उद्देश रचना करणार्यांचा असेल.शंकराचार्यांनी कनकधारा स्त्रोत्र रचले ते स्वतःसाठी नाहीच !अगदी रामरक्षेत सुद्धा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥ अशी रचना आहे,मंत्रात्मक श्लोक रचनेतला श्लोक हा मंत्र म्हणुन देखील वापरता येतोच की...
तसाही वरती दिलेला हा मंत्र माझ्या माहिती प्रमाणे बीज मंत्र नाही.वटवाघुळ मानवाला अनुभव जाणुन घ्यायची इच्छा दिसली म्हणुनच माझा अनुभव इथे कथन केला इतकेच !
व्यवहार व्यवहाराच्या जागी, साधना साधनेच्या जागी असावी.
सहमत ! पण व्यवहारात देखील सर्वसाधारण मंत्रांचा वापर करता येतो आणि ते निषिद्ध नाही,नाहीतर दिवाळीत लक्ष्मी पुजनात लोकांनी वेळ घालवला नसता ! ;)
11 Feb 2014 - 7:49 pm | प्यारे१
>>>मंत्रांचा व्याव्हारिक पातळीवर उपयोग केला जाउ नये असा कुठलाही नियम माझ्या पाहण्यात नाही,किंवा पुढे जाउन हे सांगावेसे वाटेल की अनेक मंत्रांनी सर्व साधारण मनुष्यास त्याच्या आयुष्यात मदत व्हावी हा एकमेव उद्देश रचना करणार्यांचा असेल.
बापाला पोरगा सगळ्यात जास्त कधी प्रिय होतो?
'बाबा, काळजी करु नका, मी माझ्या हिमतीवर भरपूर कमावलंय नि त्यामुळं मला कशाचीही कमी नाही. तरी मिळालं ते तुमच्याच आशीर्वादानं मिळालं ही भावना मुलामध्ये दिसते तेव्हा!'
बापाची इस्टेट पोराचीच होणार आहे. तरीही लहानपणी आमिषापोटी बाबा, मी आज दोन तास अभ्यास केला, मला आता चॉकलेट द्या ही पहिली पायरी आहे तर मोठेपणी बाबालाच काही उलटसुलट म्हणून त्याला द्यायला भाग पाडणारे महाभाग असतात!
नियम लिखित काहीही नाही तरी स्तोत्र म्हणताना कृतज्ञ पणाची भावना एवढाच विषय असावा. अथर्वशीर्षाची फलश्रुति अथवा श्रीसुक्ताची देखील फलश्रुति काही ठिकाणी म्हटली जात नाही. ती भाटगिरी झाली.
'मागणं कधीतरी थांबावं'. देणाराच 'माझा आहे' ही भावना आपल्याला अतिशय समाधान देते.
ती निश्चिंती एकदा आली की सोनं नाणं असलं नसलं तरी काही फरक पडत नाही. निष्काळजी पणा नकोच मात्र एखादी गोष्ट गेली तर त्याबद्दल हळहळ नको करायला.
तुमचं उदाहरण चांगलं आहेच. पण त्याची परिक्षा सारखी घेण्याची वेळ आपल्यामुळं नको यायला!
बर्याचदा नाणं आपलं खोटं असतं नि बदनाम सगळं तत्त्वज्ञान होतं. एवढंच.
11 Feb 2014 - 2:25 pm | सूड
>>माझ्या मते प्रामाणिकपणं सांगायचं तर मंत्राचं- (बीजमंत्राचं काम)- ह्याच्या वरच्या पातळीवर चालायला हवं. आराध्य देवते ची उपासना करत करत तिच्याशी एकरुप होण्याची क्षमता बीजमंत्रामध्ये असताना व्यावहारिक पातळीवर मंत्रांचा उपयोग न करावासा वाटणं/ तशी इच्छा न होणं हे जास्त श्रेयस्कर नि जास्त शरणागत झाल्याचं द्योतक मानलं जावं.
व्यवहार व्यवहाराच्या जागी, साधना साधनेच्या जागी असावी. (असे वस्तु शोधून देणारे मंत्र सकाम मंत्र झाले. वापरु नयेत असं माझं मत. तुमचं वेगळं असेल कदाचित. ह्याबाबत मतभेद असण्याची शक्यता आहे. असायला हरकत नाही.)
ब्रुस ऑलमाईटी मधला ब्रुस अत्यंत क्षुल्लक गोष्टींसाठी आपल्या ताकदीचा वापर करतो असं काहीसं.
कधी नव्हे ते प्यारेकाकांशी सहमत. पण प्यारेकाका बोलतायेत ते वायलं नि मदनबाण बोलतायेत ते वायलं असं वाटलं.
11 Feb 2014 - 10:32 am | आदूबाळ
मदनबाणजी, आधीची चर्चा मी वाचली नाहीये, पण तुमचे अनुभव वाचले. असे अनुभव पूर्वीपण ऐकले आहेत. असे म्हणजे कॉज-इफेक्ट रिलेशनशिप नसलेले. (अडकलेले पैसे कुठलातरी अंगारा खाऊन मिळाले, मारुतीला तेल घालून हव्या त्या प्रोजेक्टवर बदली मिळाली, वगैरे.)
त्या "अविश्वसनीय" घटनेला मंत्र/अंगारा/तेल हेच कारणीभूत असेल असा निष्कर्ष कसा काढला जातो? समजा "ती" घटना घडायच्या आधी काही दुसरा कार्यकारणभाव नसलेला बदल केला (उदा. डावा भांग उजवा केला, दोन पायांत दोन वेगळ्या रंगाचे मोजे घातले) तर तो त्याचा परिणाम नाही कशावरून?
मी हे खवचटपणे विचारत नाहीये - श्रद्धा कशी तयार होते हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.
11 Feb 2014 - 11:05 am | बाळ सप्रे
सहमत.. जेव्हा परिणामावरुन तत्कालिन परिस्थितीतील पॅटर्न शोधुन कारण ठरवले जाते तेव्हा अशा श्रद्धा तयार होतात.
11 Feb 2014 - 12:34 pm | थॉर माणूस
सहमत.
दिलेली उदाहरणेसुद्धा तशी आर्थिकदृष्ट्या (इतरांसाठी) तितक्या महत्वाच्या ठरू न शकणार्या वस्तूंची आहेत. हजाराच्या नोटा असलेले पाकिट खिशातून फलाटावर पडले आणि केवळ मंत्रोच्चाराच्या प्रभावाने सापडले वगैरे काही किस्सा असता तर (देणार्याचा प्रामाणिकपणा वगैरे मंत्रांमूळेच असे मानत) विश्वास ठेवायला थोडी जागा तरी निर्माण होते.
>>>श्रद्धा कशी तयार होते हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.
अगदी हेच जाणून घेण्याची माझीसुद्धा इच्छा आहे.
माझी अजून एक शंका आहे, जर हे सगळे मंत्रोच्चार वगैरे इतका विचार करून निर्माण झाले आहेत तर मग संस्कृत न जाणणारे इतर संपूर्ण जग यांच्या प्रभावापासून, फायद्यांपासून कायम वंचितच रहाणार आणि तोट्यांनाही सामोरे जात रहाणार असे म्हणायचे का? (इथे उगाच खवचटपणा करण्याचा प्रयत्न नाही. कृपया गैरसमज नकोत.)
11 Feb 2014 - 7:29 pm | आनंद
माझ पाकिट ४/५ हजार रु. क्रेडिट व डेबिट कार्ड सकट २ वेळा ( हैद्राबाद व पुण्यात ) रसत्यावर पड्ले असताना घरपोच तसेच्या तसेच मिळाले आहे कोणत्याही मंत्राशिवाय. त्याशिवाय अख्खी २ व्हिलर घरा पासुन १ लांब दुकाना समोर विसरुन आलो असताना (२ दिवस मला पत्ता ही नव्हता कि ती पार्किग मध्ये नाहिए)मला ओळखणार्यांचा घरी फोन आला.
हे ही कोणत्याही मंत्राशिवाय. मोबाइल तर किता वेळा परत मिळाला हे मोजणही मी सोडुन दिलय.
11 Feb 2014 - 7:43 pm | आनंद
मंत्रशक्ती बद्द्ल माहित नाही पण जगात अजुन चांगुल पणा शिल्लक आहे ह्या वर माझा विश्वास आहे.
11 Feb 2014 - 7:44 pm | बॅटमॅन
हेच अन असेच म्हणतो.
12 Feb 2014 - 11:45 am | थॉर माणूस
अगदी सहमत. कशाचा संबंध कशाला लावायचा हे शेवटी ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे.
11 Feb 2014 - 11:06 am | सौंदाळा
सहमत. अनिरुध्द्बापु भक्तांना / शिष्यांना 'अनिरुद्धाय नमः' म्हणायला सांगतात म्हणे आणि शिष्यदेखिल हा जप करुन कसा फायदा झाला वगैरे सांगत असतात.
तस्मात आमचा विचार यावर असा आहे की कोणताही मंत्र / शब्द्समुच्चय उच्चारुन अंतर्मनात सतत चांगले विचार झिरपणे महत्वाचे. राम-राम, श्रीराम जय्र राम जय जय राम, गण गण गणात बोते, सोSह्म्, ओम् नमः शिवाय ही केवळ समाजमान्य प्रातिनिधीक उदाहरणे आहेत.
उद्या कोका-कोला, कोका-कोला, रावण/रावण जप करुन जर एखाद्याच्या मनात वरील शब्दांप्रमाणेच भाव जाग्रुत झाले तरी हरकत नसावी.
मात्र मदनबाण यांनी म्हटल्याप्रमाणे माझे व्यक्तीगत अनुभव नाहीत (अर्थात मी मंत्रपठण करत नाही) पण प्रचंड इच्छाशक्ती असताना माझ्या आयुष्यात २ अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या आहेत (ज्यात मला करण्यासारखे काही नव्हते फक्त जसे सतत व्हावे वाटत होते तसे घडले.)
11 Feb 2014 - 11:57 am | अनिरुद्ध प
तसेच चर्चा श्री मदनबाण यांची उत्तरे अभ्यासपूर्ण आहेत.
11 Feb 2014 - 2:15 pm | जेपी
कधी काहि हरवल्यास फायदा होईल का बगतो . नंतर पुना येऊन प्रतिसाद देतो .बाकी चर्चा चालुद्या .
(हरवलेला)जेपी
11 Feb 2014 - 2:26 pm | बॅटमॅन
अरेरेरे, असे हरवू नका. त्यासाठी "अ आ ई उ उ ओ मेरा दिल ना तोडो" चा महामंत्र जपा.
11 Feb 2014 - 2:30 pm | कवितानागेश
गमतीदार चर्चा! ;)
11 Feb 2014 - 2:44 pm | प्रचेतस
सहमत.
11 Feb 2014 - 2:50 pm | बॅटमॅन
अर्थातच.
पण महाभारतात अस्त्रे सोडण्याआधी कुठले मंत्र म्हणायचे त्याचे एक मॅन्युअल मिळाले आहे अलीकडे. त्यातले मंत्र बघायला आवडतील.
बाकी या मंत्रचळाला भुलणार्या अन स्वतःला सुशिक्षित वगैरे म्हणवणार्यांना पाहून मणोरंजण फार होते. आपल्या समाजात लोकांना येडे बनवणे किती सोपे आहे हे लगेच समजते.
11 Feb 2014 - 2:56 pm | प्रचेतस
:)
ह्या बाबतीत मात्र किञ्चित असहमत.
जो जे वांछिल ते तो. अर्थात मानणे अथवा न मानणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे आणि तेव्हढे त्याला स्वातंत्र्य हवेच.
11 Feb 2014 - 2:58 pm | बॅटमॅन
पूर्ण मान्य! पण म्हणून हिरीरीने हवेत सिंहगड रायगड बांधत असतील तर पायाचा दगडच नाहीये हे सांगितले पाहिजे असे वाटते. असो.
11 Feb 2014 - 3:01 pm | प्रचेतस
ते बाकी खरे. :)
11 Feb 2014 - 7:55 pm | प्यारे१
>>> हिरीरीने हवेत सिंहगड रायगड बांधत असतील तर पायाचा दगडच नाहीये हे सांगितले पाहिजे असे वाटते.
कुठल्या मुद्द्यावर नकार देताय ते तरी सांगा की! आम्ही होय म्हणून जसं काही होत नाही तसं तुम्ही बळंच नाहीच म्हणून काही होणारे का?
'माझं मत' एवढंच उत्तर आहे का? की आणखी काही विषय आहे?
11 Feb 2014 - 8:05 pm | बॅटमॅन
कितीवेळा तेच ते सांगू? मंत्राची बाय इटसेल्फ अशी काहीही पावर नसते. तो कार्तवीर्यार्जुनाचा मंत्रही हेच सिद्ध करतो. अशासाठी की पुराणांत त्याचे हात परशुरामाने तोडले असे नमूद आहे. अशा व्हिलनचा मंत्र जपून काही होत असेल तर मग कोका कोला किंवा फँटाचा जप केला तरी व्हायला पाहिजे. याला सहमती नसेल तर का नाही?
अन मंत्राचा जप केल्यावर जे होते त्याची कारणमीमांसा करताना मंत्राचा इफेक्ट नक्की कसा गणायचा याबद्दलही अतिशय भोंगळ मीमांसा आलेली आहे.
बाय इटसेल्फ त्या अक्षरांत काही पॉवर असते हे सिद्ध करायचे बर्डन ऑफ प्रूफ तुमच्यावर आहे. सिद्ध करता येत नसेल तर उचकायचं काम नाही.
11 Feb 2014 - 8:21 pm | प्यारे१
सिद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
मंत्राचा अनुभव आला असं स्पष्टपणं मदनबाण, नि अडखळत (त्यांना काहीही बोलत नाहीये, गैरसमज नसावा) रेवतीतै, योगी ९०० ह्यांनी सांगितलं. अनेकजण सांगत आहेत की बाबा आम्हाला काहीतरी फरक पडला. ते अनुभव नाकारणार आहोत का आपण? म्हणजे कोंबडं झाकायचा प्रयत्न कोण करतंय? प्रत्येक प्रयोगासाठी लागणारी उपकरणं वेगवेगळी असतात हे मान्य नाही तर का बोलतोय आपण?
पेढा खाताना एखाद्याला सुख मिळेल दुसर्या एखाद्या ताप आलेल्या माणसाला तोंडाला चव नाही म्हणून नाही मिळणार म्हणून पेढा वाईट असतो का? ताप जायला हवा आधी. ताप गेल्यावर कडूपणा निवळायला हवा तोंडाचा. नंतर लागेल पेढा गोड.
त्या अक्षरात किंवा नामात पॉवर असते ह्यात शंकाच नाही.
ते सिद्ध करायला आम्ही तयार आहोत. तुमच्याच मार्फत. रोज ११ माळा करा.
कुठलाही जप करा.
ॐ नमः शिवाय करा,
श्रीराम जयराम जयजय राम करा अथवा गायत्री करा.
महिन्यानंतर बोलू. इथंच!
11 Feb 2014 - 8:30 pm | बॅटमॅन
नक्की दावा काय आहे हे समजून घेण्यात गफलत होते आहे.
वेड पांघरून पेडगावचे तिकीट मागू पाहताहात, तरी सांगतो. शेवटी कुणीतरी एकाने डोकं वापरलं पाहिजे.
मंत्रबिंत्र म्हणून जो फायदा होतो, तो त्या विशिष्ट अक्षरसमुच्चयामुळे न होता आपल्या मनोनिग्रहामुळे होतो असा आक्षेप आहे. निग्रह असेल तर नाम जपा अथवा नका जपू, नाम रामाचे घ्या अथवा तुमच्या लाडक्या व्हिलन रावणाचे, फायदा हा होणारच. तस्मात त्यात नामाचा रोल काय असा प्रश्न केला तर तीच तीच रेकॉर्ड वाजवताय.
इतकं सगळं करूनही पुन्हा तेच! राहुलबाबाची आठवण येऊ लागलीये आत्ता. काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात ते बंगाल कुठल्याही समस्येवर 'विमेन्स एम्पॉवरमेंट' हे उत्तर ठरलेलं आहे. शिवाय अडचणीत आणणारे प्रश्न विचारले की "व्हॉट इफ आय आस्क यू द सेम क्वेश्चन" हे ब्रह्मास्त्र! इथेही तेच दिसतंय. डोकं वापरायला आपल्या देशात बंदी असते की कसे, अशी शंका आता मूळ धरू लागली आहे.
11 Feb 2014 - 8:38 pm | प्यारे१
ते आव्हान नाही स्वीकारत का मग?
11 Feb 2014 - 8:42 pm | बॅटमॅन
कसलं चोरीचं?
मुळात अशा मंत्राच्या जपाने काहीएक फलप्राप्ती होते असा दावा असणार्यांनी ते सिद्ध करायचे असते. बर्डन ऑफ प्रूफ त्यांच्यावर असते. हे डोक्शात शिरत नसेल तर वाद घालणे व्यर्थ आहे.
11 Feb 2014 - 8:45 pm | प्यारे१
>>>त्या अक्षरात किंवा नामात पॉवर असते ह्यात शंकाच नाही.
>>>ते सिद्ध करायला आम्ही तयार आहोत. तुमच्याच मार्फत. रोज ११ माळा करा.
>>>कुठलाही जप करा.
>>>ॐ नमः शिवाय करा,
>>>श्रीराम जयराम जयजय राम करा अथवा गायत्री करा.
>>>महिन्यानंतर बोलू. इथंच!
ह्याबाबत. बघा की. जमेल तुम्हाला!
11 Feb 2014 - 8:51 pm | बॅटमॅन
ओह ते!
मुळात हीरो आणि व्हिलन या दोहोंच्या नावाचा जप केला तरी परिणाम होतो या दाव्यामुळेच 'बाय इटसेल्फ' पॉवरचा दावा मोडीत निघालेला आहे हे कळत नसेल तर हाईट आहे. शिवाय मनोनिग्रहाच्या मुद्याला सोयीस्कर बगल दिलेली आहे, त्यामुळे मी सांगितलेल्या मुद्यांना अनुसरून बोलता येत असेल तर बघा. तेवढं कदाचित जमू शकेल तुम्हांला. मनोनिग्रह नसेल तर गायत्री काय अन म्हैसत्री काय, कशाचाच उपयोग नाही. प्लासिबो इफेक्टचे ट्रिगर यापलीकडे नक्की काय रोल आहे असा नेमका प्रश्न विचारला तरी रेकॉर्ड अडकलेलीच आहे तुमची.
नेमका आक्षेपच कळला नाही तिथे आव्हानाला कसला अर्थ आलाय कपाळ!
11 Feb 2014 - 9:11 pm | प्यारे१
आता व्हिलनचं पक्कं झालं का डोक्यात? हरकत नाही. मंत्र चांगले असतात तसे वाईट सुद्धा असतात कधी सकाम असतात कधी वासनांतून मुक्ती मिळायला मदत करणारे असतात. संत मंत्र/ नाम नि नामी मध्ये फरक नाही असं अनुभवानं म्हणतात.
आता मदनबाणनं दिलेल्या लिंक वाचा नि नंतर मग बोलू.
मनोनिग्रह असेल तर जप होतो मात्र मनोनिग्रह नसेल तर जप केल्यानं तो होतो. बाकी प्लासिबो इफेक्ट मागेच संपला. संपादक कॄपेनं प्रतिसाद उडाले त्या धाग्यावरचे. जपानं मनोनिग्रह साधतो, मंत्रांच्या पठणानं त्या त्या दैवतापर्यंत जाता येतं. विशिष्ट अक्षर समुच्चयाचा उपयोग विशिष्ट तत्त्वामार्फत झाल्यास उपयोग होतो. विशिष्ट तत्त्वामार्फत न झाल्यास स्वतःच स्वत: केला तर त्या तत्त्वापर्यंत न्यायला मदत करतो. :)
असो! तुमची तयारी नाही ना, जौ दे!
11 Feb 2014 - 9:21 pm | बॅटमॅन
अब आगये लाईनपे.
हाफ हार्टेडलि जप करून निग्रह होत नसतो. शेवटी जे काही व्हायचं ते मनोनिग्रहामुळेच होतं. निग्रह हा प्रायमरी आहे.
शेवटी इथे सहमती जर असेल तर मग बाय इटसेल्फ पॉवर असते या दाव्याचा इतका जप कशासाठी चालला होता ते समजलं नाही. असो.
11 Feb 2014 - 10:24 pm | प्यारे१
हहहहहहह्ह!
असोच!
11 Feb 2014 - 3:02 pm | योगी९००
मस्त लिहीले आहे. विश्वास ठेवणे थोडे अवघड आहे.
मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
हा मंत्र मला आईने लहानपणी शिकवला होता. काही वस्तू हरवल्या तर हा मंत्र म्हणून आम्ही त्या वस्तू शोधायचो आणि बर्याचदा त्या वस्तू परत ही मिळायच्या. यात योगायोगाचा भाग जरी असला तरी हा मंत्र म्ह्णत जर शोध घेतला तर कदाचित आपण जे शोधतो त्यावर पुर्णपणे लक्ष लागत असावे (मनात मंत्र म्हणत असल्याने तिसरा कोणताच विचार येत नसावा. एक तर हरवलेल्या वस्तूचा विचार आणि दुसरा म्हणजे मंत्र याशिवाय तिसरा विचार नसल्याने आपले लक्ष नीट लागत असावे..)
सहज म्हणून विचारतो. चोरलेल्या वस्तू या (किंवा दुसर्या कुठल्याही) मंत्रामुळे मिळतील काय? किंवा असा कोणाचा अनुभव आहे काय? चोरावर चेटूक करता येईल काय? (चेष्टा करायचा उद्द्देश नाही आहे.. सिरीयस्ली विचारत आहे).
11 Feb 2014 - 3:51 pm | मदनबाण
चोरलेल्या वस्तू या (किंवा दुसर्या कुठल्याही) मंत्रामुळे मिळतील काय? किंवा असा कोणाचा अनुभव आहे काय? चोरावर चेटूक करता येईल काय? (चेष्टा करायचा उद्द्देश नाही आहे.. सिरीयस्ली विचारत आहे).
नाही.माझा उद्देश अगदी स्पष्ट आहे तो म्हणजे, माझ्या जवळी जी काही माहिती आहे ती देणे... मंत्र-तंत्र-आणि यंत्र ही जगाला आपल्या देशाने दिलेली मोठी देणगी आहे असे मी समजतो आणि योग्य तीच माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
11 Feb 2014 - 5:50 pm | मृगनयनी
मदनबाण'जी... अत्यंत सुन्दर आणि श्रद्धावानांना उपयुक्त लेख! ... "कार्तवीर्यार्जुननाम..." हा मन्त्र खरंच खूप प्रभावी आहे. मी अनेकदा वस्तू हरवल्यानन्तर या मन्त्राचा अनुभव घेतलेला आहे. १०८ % हरवलेली वस्तू सापडते.
त्याचबरोबर नामस्मरणाचेही माहात्म्य अगाध आहे. कोणतेही एक नाम जर सतत घेत राहिले, तर निश्चित त्या "नामा"ला एक विशिष्ट शक्ती प्राप्त होतेच. परन्तु "ते" नाम जर तुम्हाला तुमच्या "गुरु"ने दिले असेल तर नक्कीच त्याचा जास्त फायदा होतो. कारण "परमपूज्य", "सद्गुरु", "परमहंस" या पदावर पोचलेल्या गुरुकडून दीक्षा घेऊन त्याने दिलेले नाम जर सतत मुखात घोळवत ठेवले, तर त्याचा होणारा शुभ परिणाम हा कैकपटीने वाढलेला असतो.
त्रेतायुगात यज्ञयागादि मार्गांनी तर द्वापारयुगात पूजन-अर्चन मार्गाने उचित देवतेला प्रसन्न करून घेतले जायचे. परन्तु कलीयुगात मात्र केवळ "नामस्मरणा"च्या मार्गाने देव प्रसन्न होतो. कर्मकांडांपेक्षा मानसपूजेला कलीयुगात जास्त महत्व आहे. आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत, असे मानतात. देवी, दत्त, गणेश, शन्कर .. सगळेच देव श्रेष्ठ आहेत. आणि त्या प्रत्येकाची नामेही श्रेष्ठच आहेत. परन्तु आपल्या गुरुने जे नाम आपल्याला घ्यायला सांगितले आहे, ते जर एकनिष्ठेने घेत राहिले, तर नक्कीच ते नाम आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ बनते आणि उचित फळही मिळते.
11 Feb 2014 - 6:09 pm | प्रचेतस
कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत खल व्यक्तिरेखा म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या हजार हातांच्या बळावर उन्मत्त झालेला हा अर्जुन ऋषीमुनींशिवाय साक्षात देवादिकानांनाही त्रास देत फिरायचा. जमदग्नीची धेनू बलात्काराने हरण केली म्हणून भार्गवरामाने त्याचा वध केला.
त्याच कार्तवीर्याजुनाच्याच मंत्राने हरवलेली वस्तू कशी सापडते यामागचे लॉजिक कुणी उलगडून सांगेल काय?
11 Feb 2014 - 6:19 pm | बॅटमॅन
तेच म्हणतो. पुराणांत वाईट म्हणून गाजलेल्या नावाने जर असे कै होत असेल तर नामस्मरणाला कुठलेही नाम चालते असेच म्हटल्यागत झाले. तस्मात मंत्रात बाय इटसेल्फ काही पॉवर असते असे म्हणणार्यांचा दावा इथेच खोटा पडलेला आहे. इतके असूनही गमजा सांगतात म्हणजे निव्वळ हट्टीपणा, दुसरे काही नाही.
11 Feb 2014 - 6:29 pm | प्रचेतस
आता श्री रावणरक्षास्तोत्र म्हणायलाही हरकत नाही.
श्रीअसुराय नम: ॥ अस्य श्रीरावणरक्षास्तोत्रमन्त्रस्य
शुक्राचार्य ऋषि: । श्रीमन्दोदरीरावणौ दैत्य: ।
अनुष्टुप् छंद: । मन्दोदरी शक्ति: ।
श्रीमद्धप्रहस्तम् कीलकम् ।
श्रीदशग्रीवप्रीत्यर्थे रावणरक्षास्तोत्रमंत्रजपे विनियोग : ||
11 Feb 2014 - 6:41 pm | बॅटमॅन
आयला जबरीच =)) =)) =))
एक कडक सॅल्यूट घ्यावा साहेब आमच्याकडून _/\_
नेत्री वीस हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे
माथां चंदन पाझरे, करि बरे ते शस्त्र साचे खरे
माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे
ब्रूसाजी बघ वेन गॉथमिं खरे, त्या रावणासी स्मरे ||
रावणो राजमणि: सदा विजयते, मन्दोदरीशं भजे |
येनात्राभिहता अहो कपिचमू: दैत्याय तस्मै नमः |
यस्मान्नास्ति परायणं परतरं , पौलस्त्यदासोऽस्म्यहम् |
तस्मिंश्चित्तलयः सदा भवतु मे, पौलस्त्य मामुद्धर ||
11 Feb 2014 - 6:47 pm | प्रचेतस
अगागगगगगगा =)) =)) =))
काय रे हे =))
ही ओळ तर काळजाला भिडली.
11 Feb 2014 - 6:55 pm | बॅटमॅन
ही ही ही ;) =))
धन्स रे :)
11 Feb 2014 - 9:26 pm | पैसा
आधुनिक मंत्र का?
11 Feb 2014 - 8:42 pm | प्रकाश घाटपांडे
स्त्रॉत्र मंजरी हा कविता खरवंडीकर व धनंजय खरवंडीकर यांचा एक चांगला कार्यक्रम झाला होता. त्यात रावणकृत शिवतांडव स्त्रोत्र म्हणले होते. फारच सुंदर वाटले कानाला. असो तुनळीवर रवींद्र साठेंनी म्हटलेले शिवतांडव स्तोत्र आहे
http://www.youtube.com/watch?v=6-leWA6xkKw
11 Feb 2014 - 8:44 pm | बॅटमॅन
शिवतांडव स्तोत्र फेमस आहेच. ते, शिवाय महिम्न, शंकराचार्यांची एकूणेक स्तोत्रे आणि समर्थांचे भीमरूपी ही स्तोत्रे म्हणणे किंवा म्हटलेले ऐकणे म्हणजे नितांतसुंदर अनुभव आहे. विशेषतः भीमरूपीमध्ये जे वर्णन आहे त्याला तोड नाही.
12 Feb 2014 - 4:53 am | स्पंदना
तो त्याच्य सहस्त्र हातांनी ती वस्तू शोधतो अस ऐकलय.
काहीही असो पण "हरवलेली" वस्तू सापडते हे मात्र खर. हा मंत्र त्या कार्त्रविर्याला कायमचा गुलाम करुन ठेवण्यासाठी आहे, त्याची उपासना नाही आहे ही. या मंत्रात कोठेही त्याचा उदो केलेला नाही आहे.
12 Feb 2014 - 12:43 pm | बॅटमॅन
यात गुलाम करणे कुठे दिसते तेवढे सांगावे. स्तोत्राच्या स्मरणाने अमुक तमुक होते वैग्रे फंडा तर भीमरूपीमध्येही आहे. त्याला काय हनुमानास गुलाम करणे म्हणणार का?
13 Feb 2014 - 5:23 am | स्पंदना
गुलाम असा डायरेक्ट नाही, पण व्हिलन आहे अस म्हणताय म्हणुन सांगितल. या स्तोत्रात हा राजा फार महान आहे, अन त्याची स्तुती नाही आहे, उलत तुम्ही त्याच स्मरण केल की त्या गोष्टी तुम्हाला मिळतील अस सांगितलय. म्हणजे एका अर्थी तुम्ही नुसत त्याच नाव घ्या तो शोधेल.
भिमरुपी मध्ये स्तुती आहे. तशी येथे नाही.
13 Feb 2014 - 12:30 pm | बॅटमॅन
स्तुती नसली तरी अन्यत्र व्हिलन ठरवलेल्याची इथे भलामणच आहे ना? हरवलेली वस्तू शोधून द्यायचे काम दिले याचा अर्थ त्याला अॅटलीस्ट या श्लोकात व्हिलन ठरवले जात नाही हे तर उघडच आहे.
इतकाच मुद्दा होता. असो.
11 Feb 2014 - 3:27 pm | मदनबाण
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ! या मंत्र प्रभावाचा पहिला अनुभव जो मी कथन केला आहे {जो माझ्या वडिलांच्या बाबतीत आहे, तेव्हा मी इयत्ता ५वीत होतो, या नंतर ही अनेक वेळा याचा अनुभव मी घेतला आहे हे वर आधीच नमूद केलेले आहे.}
२०११ साली माझे इंदुर नगरीत जाणे झाले होते,त्यावेळी मार्तंड मंदिर {जुना राजवाडा} जाणे झाले होते,या आधीही मी अनेकदा इंदुर,उजैन या भागात लहाणपणा पासुन जात आलो आहे...आता काळानुरुप सर्वत्र शहरीकरणाचा वेढा वाढत चालला असल्याने सर्व भागांचे स्वरुप बदल्याचे जाणवते.
स्कंद पर्वतावर शंकराने मणि आणि मल्ल या राक्षसांचा वध खंडा अर्थात तलवारीने केला त्याच खंडामुळे खंडोबा हे नामकरण झाले. मल्लारी वरुन मल्हारी हा शब्द तयार झाला तर मार्तंड शब्द कन्नड शब्द मुखमंडल मारि+तोंड = मार्तंड झाला.शंकराला मार्तंड भैरव असे ही संबोधले जाते.रविवार हा मुख्यत्वे मल्हारी मार्तंडाच्या उपासनेचा दिवस आहे. येळकोट शब्दाचा अर्थ येळु म्हणजे कन्नड भाषेत ७ संख्या दर्शवते मल्हारी मार्तंडाने ७ कोटी सैन्य घेउन मणि आणि मल्ल यांचा ७ व्या दिवशी रविवारी वध केला.मल्हारी मार्तंडाची संपूर्ण हिंदुस्थानात ११ ठिकाणी मंदिरे आहेत.
१}जेजुरी २} निमगाव दावडी {पुणे} ३}शेबुड { अहमदनगर} ४}कामथवाडी ५} सातारे {औरंगाबाद} ६}पाली ७}नळदुर्ग ८} मंगसुळी {बेळगाव}९}मैलारसिंग {धारवाड}१०}मैलार देवरगुड {धारवाड} ११} मण्णमैलार {बेल्लारी}
होळकर राजवंशाची हे कुलदैवत, त्यामुळे हे घराणे शैव पंथीय आहे हे आपल्या लक्षात येइल. लोकमाता या पदवीने सन्मानीत अहिल्याबाई होळकर यांचा जन्म १७२५ आणि शासनकाल १७६७ ते १७९५. अहिल्याबाई होळकर या त्यांच्या दान धर्मासाठी अत्यंत प्रसिद्ध होत्या, त्यांनी लोक कल्याण्यासाठी अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. धर्मशाळांचे निर्माण,बावड्यांचे निर्माण,कुंड आणि तलावांचे निर्माण तसेच गया पासुन रामेश्वर पर्यंत रस्त्याची निर्मीती केली जी आज ग्रांड ट्रंक रोड या नावाने परिचीत आहे.
तर इंदुरातल्या मार्तंड मंदिरात मी अनेकवेळा गेलो होतो,पण यावेळी माझी नजर या लेखात दिलेल्या {तिथे असलेल्या} मंत्रावर यावेळीच गेली. खरतर या मंत्राचा संपूर्ण श्लोक आणि या आधी या मंत्राचा वापर कोणी केला होता का ? अशी जिज्ञासा माझ्या मनात अनेक वर्ष होती आणि यावेळी या मंदिरात त्याचे उत्तर मिळाले.
कॅमेरा :- निकॉन पी-१००
महेश्वर स्थित श्री राज राजेश्वर मंदिरात देवी अहिल्याबाई होळकर या मंत्राने नित्य शिवाभिषेक करायच्या. या मत्राच्या उपयोगीते बद्धल फोटोतील टीप क्रमांक १ वाचल्यास खालील प्रमाणे माहिती मिळते :-
महेश्वर के श्री राजराजेश्वर शिव मंदिर में परम शिवभक्त देवी अहिल्याबाई,नित्य नियम से पूजन एवंम अभिषेक करने आती थी | मंदिर के गर्भगॄह में शिवलिंग के सम्मुख बैठकर उपरोक्त अभिषेक मंत्र का जाप करती थी | कहा जात है की इस मंत्र के नित्यपाठ एवं अभिषेक मंत्र द्वारा गत वैभव एवं खोई हुई वस्तु तथा सुख समॄद्धी प्राप्त होती है !
* मला या मंत्राचा संदर्भ हवा होता तो मिळाला.
11 Feb 2014 - 3:44 pm | जेपी
एक प्रश्न . हा मंत्र कंसातिल वाक्या सह म्हणायचा की फक्त बाहेरचा .?
() जेपी
11 Feb 2014 - 3:53 pm | मदनबाण
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ! एव्हढाच.
11 Feb 2014 - 6:26 pm | जेपी
धन्यवाद मदनबाणजी , मला ते खंबे कंसासारखे दिसले .
कदाचित कालच्या खंब्याचा प्रभाव असावा . =))
11 Feb 2014 - 5:04 pm | कवितानागेश
सहज विचारतेय.
इथे चर्चा करणार्यांपैकी मदनबाण सोडून कुणी कुठल्या मंत्राचा स्वतः प्रयोग करुन पाहिलाय का?
अतिअवांतरः योगी९०० यांच्याकडे जाउन एकदा चोरीचा आणि नंतर मंत्राचा प्रयोग करुन बघायचा असेल तर योगी९०० यांच्यासकट कोण कोण तयार आहे? ;)
11 Feb 2014 - 5:05 pm | बॅटमॅन
मी तयार आहे ;)
11 Feb 2014 - 7:19 pm | कवितानागेश
ठीकेय. जा. कर चोरी. ;)
11 Feb 2014 - 7:23 pm | बॅटमॅन
हॅ हॅ हॅ ;)
बाकी ते व्हिलनच्या नावाचे मंत्र कसे काय चांगलं काम करतात याबद्दल पब्लिकचं मौन रोचक आहे.
11 Feb 2014 - 8:04 pm | प्यारे१
व्हिलनकडं सुद्धा साधनेची ताकद असते. व्हिलन ती तुलनेनं वाईटासाठी वापरतो.
त्यामुळं एखादी शक्ती त्या कार्तवीर्य अर्जुनाला 'वश' असेल, म्हणून त्याच्या नावाचा वापर होत असेल.
रावणाला, बलिला दक्षिण भारतात पूजतातच.
साधना अभ्यासासारखी तर त्याबदल्यात मिळणारी शक्ती पदवीसारखी असते.
नीट अभ्यास केला किंवा कॉप्या न पकडता केल्या तरी पदवी मिळतेच.
पदवी माणूस बेकार आहे म्हणून नाकारता येत नाही. तिचा परिणाम बराच काळ टिकतो असा मानायला जागा आहे.
11 Feb 2014 - 8:11 pm | बॅटमॅन
=))
म्हणजे कोण व्हिलन कोण हीरो हेच निश्चित नाही. एका पुराणात व्हिलन म्हणतात तर दुसरीकडे कोणीतरी हीरो करतं. मृत्युंजयसारख्या कादंबर्या अन असली पुराणे यांत कसलाच फरक नाही. वरील स्पष्टीकरण वाचून मृत्युंजय वाचून तावातावाने युक्तिवाद करणार्या बालकांची आठवण येते. तोच आवेश अन तितकाच पोकळ वासा.
11 Feb 2014 - 8:26 pm | प्यारे१
आखिर कहना क्या चाहते हो!
चल, सगळं झूठ आहे असं मान्य केलं. देव नाही, धर्म नाही, सगळी पुराणं पुचाट आहेत, झालं केलं मान्य.
आम्ही आतापर्यंतचा वेळ फुकट घालवला. झाली चूक. मान्य. वरचे प्रतिसाद रद्दबातल समजावेत!
कुठल्या कन्स्ट्रक्टीव्ह मार्गानं तुम्ही आम्हाला नेणार आहात ते सांगा!
आता काय करुया?
11 Feb 2014 - 8:32 pm | बॅटमॅन
असले छंद आम्हांला नाहीत.
पाहिजे ते करा! तुम्हाला कोण अडवतंय????
12 Feb 2014 - 12:03 pm | योगी९००
आहो माझा मोबाईल आधीच गेलाय चोरीला... आम्हाला नका चोरीला लावू...
तुम्ही सर्व या मंत्राचे पठण करा आणि जर मोबाईल मिळाला तर मी स्वतः १ मार्च ( की ८ मार्च ?) च्या घारापुरीच्या कट्ट्याला येऊन सर्वांना पाणीपुरी खाऊ घालीन...आईस्क्रीमपण...!!
चोरावर चेटूक केल्याने मला जादूटोणा कायद्याअंतर्गत पकडले जाईल काय? दुष्टप्रव्रुत्तीना आळा घालावा म्हणतोय मंत्रसामर्थ्याचा उपयोग करून..!!
मदनबाण : तुम्हाला आता बहुतेक जादुटोणा कायद्यामुळे अटक होऊ शकते..
12 Feb 2014 - 4:21 pm | मदनबाण
मदनबाण : तुम्हाला आता बहुतेक जादुटोणा कायद्यामुळे अटक होऊ शकते..
चालेल. हरकत नाही ! ;)
13 Feb 2014 - 6:00 pm | आत्मशून्य
एक चित्रपट पाहिला होता Now you see me! त्यात ४ जादुगार त्यांचा जादुचा प्रयोग म्हणुन लाइव शो मधे बँक जादुने लुटतात. अर्थातच शो संपल्यावर एफ बी आय त्यांना ताब्यात घेते व बँक कशी लूटली याची चौकशी करते. त्यात जादुच्या शक्यते बाबत मस्त धमाल संवाद आहे. तुम्हाला अटक झाली की तुम्ही पोलीसांना तशीच उत्तरे द्यावीत म्हणून हा चित्रपट आधीच अवश्य बघावा अशी शिफारस करतो ;)
13 Feb 2014 - 6:13 pm | आत्मशून्य
दाभोळकरांचे याबाबत मनापासुन कौतुक वाटते. उगा आइने मुलीला देवासमोर निरंजन लावायला लावले... अथवा पोराला स्त्रोत्र म्हणायची सक्ती केली म्हणून कोर्टात खेचता येत नाही.
13 Feb 2014 - 6:40 pm | मदनबाण
शुभंकरोतीचे, वदनी कवळ घेता चे दिवस आणि संस्कार कधीच गेले !
असे करणारे शुद्ध मराठीत बॅकवर्ड लोक म्हणुन पहायचा जमाना आहे हा....
11 Feb 2014 - 6:14 pm | रेवती
या मंत्राचा प्रयोग केलाय, अर्थातच आज्जी सांगायची म्हणून. नंतर तो विस्मृतीत गेला. आज हा धागा पाहून आठवला. माझ्या हरवलेल्या गोष्टी सापडल्या का? तर हो! अगदी सगळ्या! मंत्रामुळे सापडल्या का? तर माहीत नाही. मंत्र विसरल्यावर किंवा तो वापरणे विसरल्यावरही वस्तू हरवल्या व सापडल्या म्हणून जे अजून वापरतात त्यांना नावे ठेवण्यात अर्थ नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते बघा!
माऊश्री, आपण म्हणता तसा प्रयोग, चोरी व सापडणे यांस मी तयार नाही.
11 Feb 2014 - 10:30 pm | टवाळ कार्टा
छ्छप्पर फाडके प्रतिसाद...मांजरीने नखे दाखवली =))
11 Feb 2014 - 8:00 pm | मदनबाण
कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत खल व्यक्तिरेखा म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या हजार हातांच्या बळावर उन्मत्त झालेला हा अर्जुन ऋषीमुनींशिवाय साक्षात देवादिकानांनाही त्रास देत फिरायचा. जमदग्नीची धेनू बलात्काराने हरण केली म्हणून भार्गवरामाने त्याचा वध केला.
ह्म्म... कार्तवीर्याची दुसरी बाजु देखील माहित असण्यास हरकत नसावी !
कार्तवीर्याचा जन्म, गर्ग ऋषींचा त्याला उपदेश व दत्तमाहात्म्याचे कथन.
कार्तवीर्याची दत्तभेट, परीक्षा व त्याला दत्तप्रभूंचे वरदान व राज्यारोहण.
कार्तवीर्याची विरक्ति, दत्तप्रभूंकडे आगमन, स्तुति, पुनःपरीक्षा व त्याचे प्रश्न.
अवांतर :- रावण जरी राक्षस होता तरी तो दशग्रंथी ब्राम्हण होता. शंकाराने त्याचे आत्मलिंग रावणाला देवु केले होते या वरुन त्याची शंकाराप्रती भक्ती किती उच्चकोटीची होती हे सहज लक्षात येइल. असुर असुन तो विद्वत्तेत आणि भक्तीत कुठेच कमी नव्हता ! एकाद्या व्यक्तीची / व्यक्तीरेखेची एकच बाजु पाहुन मत बनवणे चुकीचे ठरेल.
जाता जाता :- तुम्हा दोघांचे {वल्ली आणि बॅटमॅन}एकंदर प्रतिसाद आणि त्यातुन उपहास करण्याचा चाललेला क्षीण प्रयत्न पाहता या पुढे तुमच्या कुठल्याही प्रश्नांना मी उत्तर देणार नाही.
संपादक मंडळास विनंती :- या धाग्यात वल्ली आणि बॅटमॅन यांचे जे अवांतर प्रतिसाद आहेत ते कॄपया काढुन टाकावेत, अथवा त्यांना नविन धागा काढुन तिथे टिंगलटवाळी करण्यास मूभा द्यावी. हा धागा वाचनमात्र जरी केला तरी माझी त्याला हरकत नाही.
11 Feb 2014 - 9:01 pm | सूड
>>या धाग्यात वल्ली आणि बॅटमॅन यांचे जे अवांतर प्रतिसाद आहेत ते कॄपया काढुन टाकावेत, अथवा त्यांना नविन धागा काढुन तिथे टिंगलटवाळी करण्यास मूभा द्यावी. हा धागा वाचनमात्र जरी केला तरी माझी त्याला हरकत नाही.
छे !! असं कसं? उलट संपादकावर शिंतोडे उडवले म्हणून तुमचाच प्रतिसाद काढतील.
(आता मी हे असं लिहीलं ,म्हणून माझा प्रतिसादही जाईल तो निराळाच !!)
11 Feb 2014 - 9:18 pm | प्यारे१
सदस्य म्हणून चेष्टा केल्यावर संपादक म्हणून कारवाई करता येते काय? ;)
ह घ्या!
11 Feb 2014 - 9:37 pm | सूड
सदस्याने सदस्य म्हणून चेष्टा केल्यावर सदस्य संपादक म्हणून कारवाई करु शकत असावेत. ;)