(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ)
_____________________________________
मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे
वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे.
मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो}
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.}
मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.
जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.}
वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :-
An Introduction to the "MantraŚãstra"
MANTRAS
दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे !
प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो.
वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो.
मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १}
या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती.
२)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता.
३}घरात अनेकदा मला न मिळणार्या,दॄष्टीस न पडणार्या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली.
४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली.
या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत.
या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख}
जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.
प्रतिक्रिया
15 Feb 2014 - 7:52 pm | आत्मशून्य
विचार ?
15 Feb 2014 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा
कर बरं विचार..प्रश्न आहे..!?...की विचार??? ;)
15 Feb 2014 - 11:11 pm | आत्मशून्य
...!
15 Feb 2014 - 10:16 am | सुबोध खरे
बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी.
एवढ सगळ वाचलं तरी काही समजलं नाही. बाबाजी लक्ष असू द्या.
कदाचित तांबडे बाबांचं चिंतन कमी पडतं आहे.
15 Feb 2014 - 7:55 pm | आत्मशून्य
अतिशय सहमत. माझ्या मनातले बोललात. या धाग्यावर सदस्यांनी चर्चेच्या नावाखाली इतका अनावश्यक धुमाकुळ घातला आहे की त्याचा धुरळा सामान्य सदस्याला इथे काय चालु आहे याचा थांगपत्ताच लागु देत नाहीये. शक्य झाले तर संपादकांनी याची नोंद घ्यावी.
15 Feb 2014 - 12:03 pm | इरसाल
लोक सत्यनारायणाचा प्रसाद म्हणुन खात असतील तर तोच आपणास श्रद्धा नसेल तर शिरा म्हणुन खायला काय हरकत आहे ?
15 Feb 2014 - 6:40 pm | लंबूटांग
हरकत प्रसाद म्हणून खाण्याला नसून तो प्रसाद खाऊन बुडालेली नाव वर आली वगैरे अनुभव आले सांगण्याला आहे. असो.
15 Feb 2014 - 6:53 pm | धन्या
दोन ओळींच्या मंत्राच्या जपाने जर हरवलेली वस्तू सापडू शकते तर प्रसाद खाऊन बुडालेली नाव वर का येऊ शकत नाही?
15 Feb 2014 - 7:06 pm | प्यारे१
पाणी गढूळ झालं म्हणून ओतून द्यायचं का पाण्यात तुरटी फिरवून, उकळून, गाळून घेऊन वापरायचं?
परंपरांमध्ये स्वार्थ शिरला नि त्यांचा गैरफायदा घेतला गेला तर तो परंपरांचा दोष आहे का? चुकीच्या रुढी परंपर फेका की. अडचण नाहीच. सरसकट सगळंच बंद करण्यात काय पॉईंट?
बहुसंख्य लोकांची तहान ज्या पाण्यानं भागणार आहे, ती समाजमनाची गरज आहे. शंभरातली २-३ टाळकी चार बुकं वाचून चर्चा करतात. पाणी फेकून देण्याचा उपाय आहेच पण त्याऐवजी दूध अथवा ताक अथवा दुसरा काही पर्याय देणार का घसा ओला करायला, तहान भागवायला?
सत्यनारायण सांगितला म्हणून कुणाचं वाईट नाही होत ना? आपले बुवा जी कथा सांगतात की ती वापरा.
(बुवा सत्यनारायण बंद करायचा का हो ;)?)
सत्यनारायणाला आक्षेप असेल तर असो, तो प्रगट व्हावा. मात्र त्याजोडीनं शरीराचं आरोग्य बिघडवणार्या दारुच्या पार्ट्या कधीतरी बंद करायला सांगा! आचरट डान्स बन्द करा. सत्यनारायणाचा प्रसाद नको पण इतर सगळं आनंदानं चालतं...!
असो.
15 Feb 2014 - 7:25 pm | लंबूटांग
आज पर्यंत मी माझी कोणती वस्तू हरवली की मी दारू पितो आणि मग ती मला सापडते असे सांगणारा मनुष्य पाहिलेला नाही. बरं दारू पिण्यामुळे नशा चढते ही सरळ कॉज ईफेक्ट रिलेशनशीप आहे. जी कसोट्यांवर सिद्ध करता येते जसे मंत्राच्या बाबतीत होत नाही. तुमची श्रद्धा असेल तर अनुभव येईल अशा कुबड्यांची गरज दारूला पडत नाही.
15 Feb 2014 - 7:34 pm | प्यारे१
असहमतीबद्दल सहमती.
15 Feb 2014 - 10:00 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!
श्रद्धा, झालंच तर पुण्य पाहिजे इ.इ. कुबड्या दारूला लागत नैत.
अन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रावर विश्वास नसतानाही तो मंत्र कसातरी जपला तरी परिणाम करतो असे म्हणणे म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हटल्यासारखेच आहे. असली दिशाभूल करण्याचे प्रायश्चित्त 'मोजून माराव्या पैजारा' असेच आहे.
15 Feb 2014 - 10:28 pm | धन्या
नाही हो. माणूस कितीही सभ्य असला आणि तो दारु प्यायला तर त्याला दारु चढतेच ती तसं असावं. म्हणजे मंत्र जपला की त्याचे फळ मिळणारच मग विश्वास असो वा नसो असं असावं.
15 Feb 2014 - 10:38 pm | बॅटमॅन
ओह अच्छा.
अफूची गोळी का काय म्हणतात ती हीच असावी बहुतेक मग ;)
16 Feb 2014 - 12:55 pm | धन्या
धर्म, अध्यात्मिकता आणि अधिभौतिकता हे तीन वेगळे प्रतल आहेत. :)
16 Feb 2014 - 2:30 pm | कवितानागेश
आणि या तिनही प्रतलांवर वेगवेगळ्या अफूच्या गोळ्या आपल्या सोयीप्रमाणे मिळतात. ;)
16 Feb 2014 - 11:36 pm | बॅटमॅन
अर्थातच. :)
15 Feb 2014 - 7:30 pm | धन्या
दारु केव्हाही वाईटच.
मात्र दारु चालते तर सत्यनारायणाचा प्रसाद का नको हे तर्कट अजब आहे. :)
15 Feb 2014 - 7:37 pm | प्यारे१
डायबॅटीक असल्यास चालू नये,
आवडत नसल्यास चालू नये,
वेगळ्या मतांच्या लोकांनी बनवला असल्यास चालू नये...
हरकत नाही.
17 Feb 2014 - 3:10 am | सोत्रि
हा हंत...हा हंत...
- (मद्यमुनी) सोकाजी
15 Feb 2014 - 12:34 pm | जेपी
सौ टके की बात इरसाल भाऊ . आता तरी थांबा .
15 Feb 2014 - 12:45 pm | धन्या
तिनशे व्हायला हवेत. अजून फक्त पंचवीस तर हवेत. ;)
म्हणा, "माला माले माला: प्रथमा".
15 Feb 2014 - 9:07 pm | कवितानागेश
हे 'माला माले' काय आहे?
तुला 'मारामारी' म्हणायचय का?
15 Feb 2014 - 9:53 pm | यसवायजी
२८५/३००
ओम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे ओम फट स्वाहा.
ओम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे ओम फट स्वाहा.
ओम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे ओम फट स्वाहा.
15 Feb 2014 - 10:29 pm | धन्या
तो आठवीच्या वर्गाला परिक्षेत कधी कधी दोन गुण मिळवून देणारा मंत्र आहे. ;)
17 Feb 2014 - 3:18 am | स्पंदना
मी फक्त पाचवीच्या परिक्षेत म्हणेन.
15 Feb 2014 - 10:42 pm | बॅटमॅन
आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाच्या विभक्त्या गो.
शब्द अन त्याचे लिंग दिले की विभक्त्या पाडणारे एक विभक्ती इंजिन लोकांनी तयार केलेय त्यात धनाजीरावांनी उल्लेखिलेल्या विभक्त्या पाहता येतील.
http://sanskrit.inria.fr/cgi-bin/SKT/sktdeclin?lex=SH&q=maalaa&t=VH&g=Fe...
16 Feb 2014 - 5:56 am | साती
आमच्यावेळेला हे यंत्र घेऊन परीक्षा देता यायला हवी होती.
आम्हाला डोकंच न्यायला परवानगी होती.
;)
16 Feb 2014 - 2:27 pm | कवितानागेश
हे यंत्र कसे काय विसरेन मी?
उगीच प्रतिसाद्संख्या वाढवत होते.
आता वाया गेला ना प्रतिसाद! :(
16 Feb 2014 - 9:07 am | खटपट्या
माझा अनिरुद्ध बाबाचा जप चालू आहे.
तीनशेचा टप्पा गाठनारच…
16 Feb 2014 - 4:42 pm | प्रकाश घाटपांडे
मंत्राच सोडा पण धाग्याचे सामर्थ्य तर मान्य आहे कि नाही?
16 Feb 2014 - 4:54 pm | हाडक्या
हा आमचा मंत्रसामर्थ्ययुक्त २९९ वा प्रतिसाद...!!!
16 Feb 2014 - 4:56 pm | आदूबाळ
आणि हां ३००वा - वीरेंद्र सेहेवाग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
16 Feb 2014 - 10:24 pm | प्यारे१
>>>स्मृतिप्रीत्यर्थ
का का आबा का? जगू द्या की त्याला! ;)
16 Feb 2014 - 4:55 pm | हाडक्या
आणि बॅटमॅन समर्थनार्थ हा ३०० वा..!!
जय हो..
16 Feb 2014 - 6:33 pm | प्रसाद गोडबोले
चर्चा पान क्रमांक १ च्या पुढे गेली की प्रतिसादापुढे "नवीन" असा टॅग दिसत नाही ...त्यामुळे नक्की कोणाची बॅटींग चालु आहे हे कळत नाही .... ह्याला काही उपाय आहे का ? एखादा मंत्र वगैरे ? :-D
16 Feb 2014 - 10:08 pm | पैसा
Ctrl+f मारा आ॑णि सर्च बॉक्समधे तारीख सर्च करा.
16 Feb 2014 - 9:55 pm | डँबिस००७
आपली ५०-६० लाखाच्या जागेचे कागदपत्राची फाईल एखाद्या ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये हरवले,गहाळ झाले मग
काय कराल? दुसर्या कोणाला अश्या कागदपत्राच्या फाईलचा काडीचाही उपयोग नसतो म्हणजे फाईल कोणाला
सापडली तरीही तो परत देईल, पदरचे पैसे व वेळ खर्च करेल ?
अश्यावेळेला पोलिस ही तुमची काही मदत करु शकत नाही.
मग अश्यावेळेला काय करावे.
ईथे असलेल्या चार बुक शिकलेल्या लोकांनी जरा प्रकाश पाडावा.
16 Feb 2014 - 10:04 pm | अर्धवटराव
खोसला का घोसला हा चित्रपट बघितला नाहि का?
16 Feb 2014 - 10:14 pm | डँबिस००७
घ्या म्हणजे झाली का पंचाईत !!
मग बसा दारुच्या ग्लासात दुखा:ला बूडवून !
7 Sep 2014 - 8:08 pm | उगाचच वाटल म्हणून
मी एवढा विद्वान नाही, टीकाकार ही अभ्यासू दिसतात पण लिहावसं वाटल म्हणून..
बरेच दिवस ही झालेत कोणी येथे येत नाही, मी आजच आलो सगळ वाचलं
माझ्या वाचनाप्रमाणे व नंतर मननाप्रमाणे काही मुद्दे मांडावेसे वाटले!
सुरुवातीस,
जगाची उत्पत्ती नादामधून झाली, विज्ञानाने सुध्दा असच म्हट्ल आहे (बिग, ब्यांग)
आपण सुध्दा रोज अक्षर समूहाचा आधार घेउनच एकमेकाशी संभाषण करित आहो, भावनेचा पसारा मांडत आहोत;
त्यातूनच एक्मेकाच्या सहमतीचा विरोधाचा परिणाम साधला जातो आहे. त्यात काही विशेष शब्द वापरले की त्यांची स्तुती/शिवी होते. विशिष्ट आवाज त्यांना लावले की त्यांची परिणामकारक शक्ति वाढते. कोणी ओरडले/विव्हळले की आपण वळून तिकडे पहातो मग आपण परिस्तिथि प्रमाणे त्यास प्रतिसाद देतो, पण ते तसे नसून त्याचा परिणाम आपल्यावर होतो हे खरे आहे.
भाषाशास्त्राचा आधार घेउन आपण एखादा मंत्र तयार करण्या सारखी आजची वेळ आहे असे मला वाटत नाही कारण आपण चर्चा करत मत मांडत नाही. हाच लेख कोणी परदेशी माणसाणे वाचला तर त्याला असा प्रश्न पडेल का? का तो मनात विचार करेल अरे कुरुक्षेत्रावरही पाकड्याच्या संख्ये पेक्षा कैक पटीने अधिक आणि असंख्य संहार केला आहे तिथे प्रत्येक शस्त्र मंत्रा पासूनच तयार केले होते कि काय जणू. आपण याची माहीती घेउ संशोधन करु आणी पेटंट घेउ व भारता वर कुरघोडी करून त्यांनाच हे शस्त्र वि़कू. त्यात त्याचा आत्मविश्वास असेल की हे काय आपण पहिल्यांदाच करतोय का आताही हे शक्य आहे, आणी यातूनही त्याला हा विस्वास असेल की यांची श्रध्धेची (अंध) जी काय लढाइ चालू आहे त्या वेळेत आपल पेटंट घेउन झालं असेल कारण भारतीय टेक्स्ट्स मध्ये काही लिहिलय म्हणजे कुठेतरी वाव नक्कीच आहे.
पहा माझा हा विचार पटतोय का ?
इथे सखोल विचार किंवा reading between the lines सगळेच करू शकतात याची मला जरा सुध्दा शंका नाही.
धन्यवाद.
21 Jan 2015 - 12:34 pm | अनुप ढेरे
हरवलेली विमानं सापडतील का या मंत्रानं?
8 May 2017 - 11:24 am | सतिश गावडे
काय चर्चा झाली होती राव. (पुन्हा एकदा) धमाल आली वाचून.
हल्लीचे मिपावरण दुषित झाले आहे. (सो कॉल्ड) अध्यात्म आणि मानसशास्त्र यांचे प्रदुषण खुपच झाल्याने असे करमणुकप्रधान धागे येत नाही.
8 May 2017 - 1:04 pm | प्रसाद गोडबोले
सध्या अध्यात्मातील तत्वज्ञान समजावं म्हणून केलेल्या प्रवाचनांपेक्षा तुंबडीभरायण पूजा करून जास्त छापी होते हे सत्य आम्हास उमगले आहे तस्मात आम्हीही अध्यात्मावर लिहिणे बंद केले आहे .
बाकी तुम्हाला पूजा घालायची असल्यास कळवा ;)