मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
11 Feb 2014 - 3:51 am

(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ)

_____________________________________

मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे
वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे.
मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी

महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।।

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो}

बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।।

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.}

मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.

जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.}
वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :-
An Introduction to the "MantraŚãstra"
MANTRAS
दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे !

प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो.
वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो.

मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १}
या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती.
२)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्‍या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्‍याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता.
३}घरात अनेकदा मला न मिळणार्‍या,दॄष्टीस न पडणार्‍या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्‍या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली.
४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली.
या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत.
या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख}

जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.

मांडणीसंस्कृतीप्रकटनविचारअनुभवमत

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Feb 2014 - 9:40 pm | प्रचेतस

संपादकांविषयी विनाकारण कुत्सित बोलल्यामुळे आता बरं वाटत असेल ना जरा.

पैसा's picture

11 Feb 2014 - 10:16 pm | पैसा

"ती" पोटदुखीची गोष्ट का?

प्यारे१'s picture

11 Feb 2014 - 10:25 pm | प्यारे१

हा संपादकांचा कंपू काय? ;)

प्रचेतस's picture

11 Feb 2014 - 10:25 pm | प्रचेतस

अगदी अगदी. =))

>>संपादकांविषयी विनाकारण कुत्सित बोलल्यामुळे आता बरं वाटत असेल ना जरा.

जे दिसलंय ते बोललो, आता तुम्हाला ते कुत्सित वाटलं असेल तर तसं समजा.

काय दिसलं नेमकं ते तरी सांगा सर्वांना.

संपादकही सदस्यच आहेत सूड भौ, कधी कधी त्यांनाही आपले म्हणा. :P

प्रचेतस's picture

11 Feb 2014 - 9:13 pm | प्रचेतस

तुम्हा दोघांचे {वल्ली आणि बॅटमॅन}एकंदर प्रतिसाद आणि त्यातुन उपहास करण्याचा चाललेला क्षीण प्रयत्न पाहता या पुढे तुमच्या कुठल्याही प्रश्नांना मी उत्तर देणार नाही.

उपहास अथवा टिंगलटवाळी करण्याचा कुठलाही प्रयत्न नाही किंवा दुसर्‍यांच्या श्रद्धांचा अवमान करण्याचा हेतूही नाही.
किञ्चितसा उपहासात्मक का होईना पण विरोधाचा सूरही नको असेल तर मात्र असोच.

ह्म्म... कार्तवीर्याची दुसरी बाजु देखील माहित असण्यास हरकत नसावी !

तू दिलेले दत्ताबद्दलचे इतर दुवेही वाचलेत. हे दत्तमाहात्म्य तुलनेने बरेच अलीकडचे आहे. ज्या मूळ दत्तपुराणावरून हे रचले गेले आहे ते दत्तपुराण साधारण १२/१३ व्या शतकात रचले गेले असावे. दत्ताचा सर्वात जुना उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे महाभारतात येतो. दत्ताच्या वरदानामुळे कार्तवीर्याला सहस्र हात लाभले हा इतका आणि इतकाच उल्लेख आहे जो माझ्या मताप्रमाणे प्रक्षिप्त आहे. अर्थात ५/६ व्या शतकात (अगदी गुप्तकाळानंतरच) महाभारतात घुसडला गेला असावा. तस्मात आपण हे कितपत ग्राह्य धरावे ह्याबाबतीत शंकाच आहे.

रावण जरी राक्षस होता तरी तो दशग्रंथी ब्राम्हण होता

हे मान्यच. रावण हा विश्रवा मुनीचा व राक्षसकन्या केकसीचा पुत्र. वेदांचे अध्ययन त्याने केले होतेच असे स्पष्ट उल्लेख आहेतच.
पण यावरून महाभारतातील यक्षप्रश्नांची आठवण होते.
यक्षः हे राजा, कुल, वृत्त, वेदाध्ययन आणि वेदांचे ज्ञान यापैकी कोणत्या उपायाने ब्राह्मण्य प्राप्त होते.
युधिष्ठिरः कुल हे ब्राह्मण्याचे साधन नव्हे, वेदाध्ययन आणि त्यांचे ज्ञान हे एकच साधन असून तेही ब्राह्मण्याचे साधन नव्हे. केवळ वृत्त अथवा सदाचार हेच एकमेव ब्राह्मण्याचे साधन आहे. चारी वेदांचे अध्ययन करूनही जो दुर्वृत्त आहे तो शूद्रांहूनही हीन होय.
वृत्तं यत्नेन संरक्ष्यं ब्राह्मणेन विशेषतः |
अक्षीणवृत्तो न क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः ||

बॅटमॅन's picture

11 Feb 2014 - 9:23 pm | बॅटमॅन

+१११११११११११११११११११११.

ज्या मूळ दत्तपुराणावरून हे रचले गेले आहे ते दत्तपुराण साधारण १२/१३ व्या शतकात रचले गेले असावे. दत्ताचा सर्वात जुना उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे महाभारतात येतो. दत्ताच्या वरदानामुळे कार्तवीर्याला सहस्र हात लाभले हा इतका आणि इतकाच उल्लेख आहे जो माझ्या मताप्रमाणे प्रक्षिप्त आहे. अर्थात ५/६ व्या शतकात (अगदी गुप्तकाळानंतरच) महाभारतात घुसडला गेला असावा. तस्मात आपण हे कितपत ग्राह्य धरावे ह्याबाबतीत शंकाच आहे.

तुझ्या जवळपास प्रत्येक प्रतिसादात घुसडला गेला असावा,प्रक्षिप्त असावे हे मी बर्‍याच वेळा वाचले आहे.याचे दुवे उपलब्ध करुन दिल्यास वाचन करता येइल.माझ्या परीने जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा जवळपास कुठल्याही विषयाच्या धाग्यावर मी त्या विषयी माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो आणि दुवे देतो म्हणजे समोरच्याला तुमचा मुद्दा पडताळुन पाहता येतो. या धाग्यावरही तुझ्या प्रश्नांना उत्तर म्हणुन दिलेले दुवे योग्यच आहेत.
जे या धाग्यात मी वारंवार म्हणत आलो आहे तेच परत एकदा सांगतो की नुसत्या शंका काढायच्या असतील तर ते कोणीही काढु शकतो.तू वाचण्यास संदर्भ देणार नसलास तर दरवेळा मलाही तुझा विधाना बद्धल शंका वाटते असे सातत्याने म्हणता येउ शकेल. ;)
रावणाचा विषय मधेच तुम्ही दोघांनी काढला, त्यामुळे मला उदा. देताना असे निदर्शनास आणायचे होते की जर रावण व्हिलन ठरत असेल तरी त्याच्या गुणांकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही आणि त्याच्या क्षमतेकडे देखील्.तसेच रावणावर जर मंत्र चालत नसेल तर रावणकृत शिवतांडव स्त्रोत्र कसे चालते ? तो व्हिलन आहे ना ? ;)
बाकी रावण व्हिलन असला तरीही हिंदूस्थानात आजही काही ठिकाणी त्याची पुजा केली जाते.तसेच रावणाची बायको मंदोदरी हिचे माहेर जयपुर पासुन जवळ असलेले मंदोर {Mandore} असल्याचे समजते,व तिथेही त्याचें मंदिर उभारण्यात आलेले आहे.

संदर्भ :- In MP's Ravan village, the demon king is a revered deity
A temple in Jodhpur for Ravana
बाकी वटवाघुळ मानवाने दिलेले दोन्ही दुवे वाचुन त्यांचे मत काय आहे हे अजुन सांगायचे कष्ट घेतलेले या धाग्यात दिसले नाहीत ! ;) असो... त्याच्याकडुन ती अपेक्षा ठेवणे देखील गैर आहे हे त्याच्या प्रतिसादातुन व्यक्त होणार्‍या विचार सरणीतुन जाणवते.

प्रचेतस's picture

11 Feb 2014 - 10:51 pm | प्रचेतस

तू वाचण्यास संदर्भ देणार नसलास तर दरवेळा मलाही तुझा विधाना बद्धल शंका वाटते असे सातत्याने म्हणता येउ शकेल.

मान्य.
महाभारतातील कार्तवीर्य अर्जुनाबद्दलच्या दत्ताच्या वरदानाबाबतच उल्लेख येथे बघ
http://www.sacred-texts.com/hin/m03/m03115.htm

आता उल्लेख प्रक्षिप्त असण्याबाबत-
उल्लेख घुसडले गेल्याबद्दलचे थेट दुवे देता येत नाहीत. पण साधारण पुराणे वेदोत्तर काळात रचले गेल्याबद्दलचे सुस्पष्ट पुरावे आहेत. गरूड पुराण, विष्णू पुराण, ब्रह्म पुराण, वराहपुराण, स्कंद पुराण यांमध्ये सातवाहन राजे, चंद्रगुप्त मौर्य त्याचा पुत्र बिंदुसार आणि सम्राट अशोक यांचे उल्लेख आहेत. नमुन्यादाखल विष्णूपुराणातला हा संदर्भ बघ.

http://www.sacred-texts.com/hin/vp/vp117.htm

साहजिकच हे पुराण नंतर रचले गेले आहे. तिथे जरी ह्या राजांचा उल्लेख भविष्यकालातील राजे असा असला तरी तो केवळ हे पुराण अत्यंत जुन्या काळात रचले गेले आहे हे दाखवण्यापुरताच आहे.

तात्पर्य काय तर वेद, पुराणे ह्यात स्थलकालांची बरीच उदाहरणे येतात त्यावरून ह्यांचा काळ साधारणपणे काढता येतो. महाभारताचेच उदाहरण घेतले तर त्यातील काही घटनांचा उल्लेख कधी घुसडण्यात आला असावा ते सांगता येते. उदा. महाभारतात यवन, शक, हूणादिकांचे उल्लेख आहेत ते सर्व मौर्यकाळानंतरचे आहेत कारण त्याआधी भारतावर ह्या टोळ्यांची आक्रमणे झाली नव्हती. वेदांतही ह्यांचे उल्लेख आढळत नाहीत. तस्मात प्रत्येक वेळी दुवे देणे शक्य नसते.

आता शिवतांडवस्तोत्राबद्दल म्हटले तर वाल्मिकी रामायणात हे स्तोत्रच नाही. त्याची एकंदरीत भाषा बघता शंकराचार्यांसारख्या महान व्यक्तिनेच ते रचले असावे याची शक्यता जास्त आहे. पण ह्याचा रचयिता नक्की कोण ते माहित नाही. पण रावण खासच नाही.

मदनबाण's picture

11 Feb 2014 - 11:21 pm | मदनबाण

ह्म्म... हरकत नाही परंतु त्यामुळे मी दिलेले संदर्भ चुकीचे ठरतात असा अर्थ होत नाही.

उल्लेख घुसडले गेल्याबद्दलचे थेट दुवे देता येत नाहीत.
हा.आता मुद्द्यावर आलास,तुमच्याच {{ इथे फक्त तुला उद्धेशुन नाही}} शब्दात सांगायचे झाले तर जर पुरावा नसेल तर सत्य कसे मानायचे ? ;)
असो... इथे मी बरोबर किंवा तू किंवा इतर कोणीही चूक आहे हे मला दर्शवायचे नाही, माझा तो उद्देश नाही. जो अनुभव घेतला तोच लिहला. ज्यांना मंत्राची प्रचिती /अनुभव याच्या सत्यतेची खात्री पटवायची असेल त्यांनी स्वतः प्रयत्न करुन पहावा हीच माफक अपेक्षा आहे. :) साखर गोड लागते हे समजुन घेण्यासाठी ती चाखावीच लागते.
पटले तर घ्या नाहीतर सोडुन द्या... ;) उगाच साखर गोड कशी हे तुम्हीच पटवुन द्या...ती कडुच आहे. अश्या विधानांना अर्थ उरत नाही.साखर चाखा आणि पहा !

प्रचेतस's picture

11 Feb 2014 - 11:40 pm | प्रचेतस

थेट दुवे देता येत नाहित म्हणजे म्हणजे हे पुरावे शोधायचे काम जालावर कष्टप्रद आहे. त्यासाठी वेद, पुराणे आदी साधने सखोलपणे अभ्यासावी लागतात. जालावर हे फारच अभावाने दिसते.
आता महाभारतातील प्रक्षिप्त भाग ओळखण्यासाठी ते सर्वच वाचावे लागते .कमीत कमी 3 ते 4 वाचनानंतर ते निश्चितपणे ओळखता येते असे माझ्या अनुभवानुसार सांगतो.काहिवेळा मुर्तिशास्त्राचा अभ्यासही कामी येतो. उदा. गीतेतील अध्यायात विष्णूचे वर्णन शंख,चक्र, गदा, पद्म असे आहे तर विष्णूच्या गुप्तोत्ताराकाली न मूर्ति ह्या वर्णनाबरहुकूम आढळतात. त्याआधीच्या विष्णू मूर्त्तित पद्माच्या जागी अभयमुद्रा दिसते. साहजिकच ह्या वरून हे अध्याय नंतर लिहिले गेले असावेत असा तर्क लढवता येतो. आता ह्याचे पुरावे आयकोनोग्राफ़ीशिवाय कुठून आणनार?

बाकी तुझ्या मतांचा आणि त्या मागच्या भावनेचा आदर आहेच. त्यावर टीका नाहीच आणि नसेल.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Feb 2014 - 8:02 pm | प्रकाश घाटपांडे

कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी मधे माईंड डायव्हर्टींग टेक्निक्स साठी स्त्रोत्र,म्ंत्र, पाढे यासारख्या गोष्टींचा देखील उपयोग होतो. विचारांच्या दुष्टचक्राशी सामना करायला ही टेक्निक्स उपयोगाला येतात. हा माझ्यासारख्याचा देखील स्वानुभव आहे.
आलामंतर कोलामंतर छू हा मंत्र आपण लहानमुलांना दुखापत झाली की वापरतो. त्याला वेदना होत असते पण आपण हा मंत्र म्हणून त्याचे लक्ष वेदनेपासून विचलीत करतो. नंतर तो आपले दु:ख विसरुन हसायला पण लागतो. खरतर आलामंतर कोलामंतर छू या शब्दांना काय अर्थ आहे का? एकदा मला कुणी तरी विचारत होत की गण गण गणात बोते म्हणजे काय? मी त्याला म्हणल आलामंतर कोलामंतर छू!
धागाकर्त्याने दिलेल्या उदाहरणे आपल्या आयुष्यात घडत असतात. अशा प्रसंगात मन भरकटते, मनावर चिंता काळजी वगैरे गोष्टींचा ताण येतो, अशा प्रसंगी मन शांत ठेवण्यासाठी या (अंध)श्रद्धांचा उपयोग होतो.

काका नेहमीच मार्मिकपणे बोलतात. सहमत!

ब्याट्या काकांचे म्हणणे बरोबर आहे.
पण "आला मंतर कोला मंतर छू " या शब्दात सुद्धा मंत्र सामर्थ्य आहे हे तुला ठौक आहे का?
हा मंत्र उलट लिहीला तर त्यात एक गुप्त संदेश आहे.
हा मंत्र अकरा , एकवीस किंवा एक्कावन्न वेळा उलट लिहीला आणि अक्षरे एका विषिष्ठ क्रमाने जुळवलीत तर तो गुप्त संदेश त्या त्या प्रमाणात तुमच्या हाती लागेल. धन प्राप्ती होईल, मूल नसलेल्यास मूल होईल , स्वर्गात जागा रीझर्व होईल , मोक्ष मिळेल , क्षीरसागरात हंसाचा जन्म मिळेल.. ई.

बॅटमॅन's picture

12 Feb 2014 - 12:37 am | बॅटमॅन

अरे हो की हो विजुभौ!!! विसरलोच बघा.

मूर्खासारखे सैन्य बिन्य बाळगण्यापेक्षा कमंडलूधारी साधूंचीच फौज ठेवायला पाहिजे होती भारतानं, पाकडे मेले असते क्षणार्धात!

मूर्खागमनी अन अबुद्धशेपपणाचा कळस आहे झालं.

मदनबाण's picture

11 Feb 2014 - 10:35 pm | मदनबाण

प्रकाका आपण दोन्ही बाजुने विचार करता हे मला ठावुक आहे. ;) फक्त एकच सांगावेसे वाटले की गॉगल लावला नजरेस सगळ्या वस्तु त्याच रंगाच्या दिसु लागतात्.तसेच अंधश्रद्धे बाबतीत आहे. ;)

आपल्या वाचनासाठी :-
Mantra
A mantra can make the impossible possible
Benefits of Mantra Chanting
The Power of Mantra Chanting

रामपुरी's picture

11 Feb 2014 - 10:08 pm | रामपुरी

ओबामाला हा मंत्र माहीत असता तर उगीच पाकिस्तानात सैन्य घुसवायची गरजच पडली नसती. पाच पन्नास माणसं हा मंत्र म्हणत बसवली असती की तो ओसामा स्वतःहून चालत व्हाईट हाऊस मधे गेला असता. काय म्हणता?

हा.हा.हा चांगला विनोद आहे, पण ओसामा ओबामाच्या घरी राहत नव्हता, की तो ओबामाची कुठलीही वस्तु नव्हता ! ;) शिवाय तो पळाला होता अफगाणिस्तानातुन पाकिस्तानात, हरवला नव्हता कै. ;)

रामपुरी's picture

11 Feb 2014 - 11:54 pm | रामपुरी

मग त्या मंत्रावर एक "*" छापून खाली "अटी लागू" हा जाहीरातीतला संदेश सुद्धा लिहा की. म्हणजे आमच्यासारख्या अडाणी, सामान्य पामरांना समजेल की हा मंत्र कधी चालणार आणि कधी नाही ते.
(अवांतर: "बाटगा धर्मांतरीत जास्त कडवा" या चालीवर आता "जास्त सुशिक्षित जास्त अंधश्रद्ध" अशी नवीन म्हण रुढ करता येईल काय? आणखी उदाहरणे द्यायची झालीच तर नाडीवाले, ओशोवाले, इत्यादी इत्यादी)

बॅटमॅन's picture

12 Feb 2014 - 1:02 am | बॅटमॅन

जास्त सुशिक्षित जास्त अंधश्रद्ध

अगदी अगदी!! अशिक्षित माणूस फार तर फार 'आमचे म्हाराज' म्हणेल पण हे सुशिक्षित चार चोपड्यांची नावे सांगतील इतकाच काय तो फरक. बाकी सगळं सेम टु सेम!

प्यारे१'s picture

12 Feb 2014 - 1:02 pm | प्यारे१

(नया दिन नयी शुरुवात!)
हे सगळ्यासाठीच लागू होतं. नाही का?

आमचा अमुक म्हणतो, आमचा तमुक म्हणतो, ही लिंक, ती लिंक चालूच असतंय की. तिथं विश्वास ठेवायला प्रत्यवाय येत नाही तो? ;)
कालच्या मटाला ९५ % संशोधनं बोगस असतात अशी बातमी होती ब्वा! ;)

रामपुरी's picture

12 Feb 2014 - 10:34 pm | रामपुरी

"कालच्या मटाला ९५ % संशोधनं बोगस असतात अशी बातमी होती ब्वा"
कालच्या .....ला बातमी होती "मटा बोगस आहे" :)

प्यारे१'s picture

12 Feb 2014 - 11:38 pm | प्यारे१

पांडुरंग पांडुरंग!

योगी९००'s picture

12 Feb 2014 - 12:16 pm | योगी९००

पाच पन्नास माणसं हा मंत्र म्हणत बसवली असती की तो ओसामा स्वतःहून चालत व्हाईट हाऊस मधे गेला असता. काय म्हणता?
काहितरीच काय?..ओसामा तीन/चार बायकांबरोबर बरेच दिवस रहात होता. त्याला बाहेरही पडता येत नव्हते..म्हणून त्याने स्वतः ओबामाला फोनकरून स्वत:चीच सुपारी दिली.

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2014 - 10:25 pm | टवाळ कार्टा

आम्रिकेने पण हाच मंत्र वापरायला हवा होता...तो लादेन केव्हाचा सापडला असता...च्यायला उगाच बाँब्ची फेकाफेकी झाली :)

अजुन एक...हा मंत्र गुगलबाबाला अस्सल भारतीय पर्याय असेल का? म्हणजे आपण बोलु शकु...फक्त मंत्र म्हणुन काहीही न करता शोधता येइल हवे ते :)

आणि हे तर आपल्या पुराणांमधे आधीच लिहिले आहे :) आपण कित्ती कित्ती जगाच्य पुढे होतो "तेव्हा"

पैसा's picture

11 Feb 2014 - 10:59 pm | पैसा

बाणा, काही म्हण, मूळ धाग्यापेक्षा तुझा अवांतराचा धागा नुसता धावतो आहे! :-/

मदनबाण's picture

11 Feb 2014 - 11:35 pm | मदनबाण

@ पै तै
खरचं की ! ;)

गप्प बैस! माझा प्रतिसाद मात्र खाली ढकलला गेला तो मंत्र म्हणून वर आण. कधी नव्हे तो प्रतिसाद द्यायचा आणि असं व्हायचं म्हणजे वाईट वाटणारच की!

मदनबाण's picture

12 Feb 2014 - 1:31 am | मदनबाण

:P

मिपावर असे धागे वरचेवर येत राहोत. छान करमणूक होते असे धागे आणि त्यांच्या प्रतिसादांमधून.

या धाग्याने त्रिशतक पार करावे म्हणून मी अनिरुद्ध बाबाचा जप चालू केला आहे

अर्धवटराव's picture

12 Feb 2014 - 5:28 am | अर्धवटराव

शेवटी श्रद्धा, अंधश्रद्धा, झाकलेल्या मुठीत लपलेल्या शास्त्राच्या तशाच शास्त्रीय कसोट्या, पहिले प्रयोग कि अनुभव (कामाचे/बिनकामाचे), थोडंफार स्कोर सेटलींग, कोण जास्त मट्ठ हा वाद... इत्यादी सर्व सोपस्कार पार पाडुन अपेक्षेप्रमाणे हा धागा शतक ठोकता झाला. बरं वाटलं. फास्टेस्ट शतकाचा विक्रम य धाग्याच्या नावावर येईल काय?

अवांतरः
एक क्षुल्लक मुद्दा चर्चेत आलाच नाहि. "मंत्र" शब्दाचा सर्व क्रियाकलाप "मन" या एण्टीटीवर अवलंबुन आहे. आपण सो कॉल्ड शास्त्रीय कसोट्यांच्या आधारे गणीतीय प्रमेय सोडवण्याच्या पद्धतीचा अवलंब करुन मंत्रांच्या प्रभावाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न (नक्की करतोय का?? दावा करायला काय हरकत आहे म्हणा ;) ) ज्या "मंत्रा"वर करायचा विचार करतोय, त्याची प्राथमीक रिक्वायएमेण्ट "मन" या तत्वाच्या क्लॅरीटीशी आहे. कुठलं तत्व अपेक्षीत आहे इथे? तर ते म्हणजे स्थळ-काळ बाधीत जगात स्थळ-काळ अबाधीत तत्वाचं रिप्रझेंटेशन करणारं तत्व... ज्याला "मन" म्हणतात. दोन कॉम्प्लेक्स केमीकल्स एकत्र येऊन एक ट्युमर/मासांचा गोळा तयार करतात व तो गोळा वाढत वाढत एक दिवस टरफल फोडुन बाहेर येतो, हा फिनॉमिनॉन म्हणजे एका "बाळाचा जन्म" होय, असा प्रत्यारोप करणारं तत्व म्हणजे मन. मंत्रांच्या प्रभावाचा तपास करताना इथुन सुरुवात करावी लागते.
असो. एण्टरटेनमेण्टच्या उद्दीष्टाने प्रेरीत चर्चेत तसंही असले मुद्दे यायची गरज नाहि...

प्यारे१'s picture

12 Feb 2014 - 12:59 pm | प्यारे१

http://misalpav.com/comment/553986#comment-553986

>>>प्रत्येक प्रयोगासाठी लागणारी उपकरणं वेगवेगळी असतात हे मान्य नाही तर का बोलतोय आपण?

(मी किती शाना हाय ते नको का सांगायला? ;) )

>>>एण्टरटेनमेण्टच्या उद्दीष्टाने प्रेरीत चर्चेत तसंही असले मुद्दे यायची गरज नाहि...

ह्याबाबत लई वेळा सहमत!

बॅटमॅन's picture

12 Feb 2014 - 1:02 pm | बॅटमॅन

मुद्दा मान्यच.

पुढे?

अर्धवटराव's picture

12 Feb 2014 - 7:31 pm | अर्धवटराव

अम्म्म्म्म्म्म्.... बॅट्या...आयला, आम्हाला तुझे सगळे मुद्दे, गुद्दे, युद्धे मान्य असतात...नव्हे, आवडतात प्रचंड...आणि तुला आमचा फकस्त येक्क मुद्दा मान्य होय...इ ना चॉलबे. असो...चॉलबे चॉलबे.

>> पुढे
-- पुढे एकच...भंग का रंग जमा हो चकाचका...फिर लो पान चबाय...

बॅटमॅन's picture

12 Feb 2014 - 7:42 pm | बॅटमॅन

.भंग का रंग जमा हो चकाचका...फिर लो पान चबाय...

अगली पंक्ति बुलवायो जी, सस्पिन्सवा सहत नहि जाय!

स्पंदना's picture

13 Feb 2014 - 5:28 am | स्पंदना

अगली पंक्ती....
ऐसा झटका लगे जिया को पुनरजनम हुई जाय।
ओ खाय के...

प्यारे१'s picture

12 Feb 2014 - 11:46 pm | प्यारे१

>>> इ ना चॉलबे.असो...चॉलबे चॉलबे.

ही चीटींग हाय राव! नक्की काय? चॉलबे का ना चॉलबे?

अर्धवटराव's picture

12 Feb 2014 - 8:48 pm | अर्धवटराव

सायकॉलॉजी इज द ओन्ली सायन्स विदाउट डेफीनेशन असं म्हणतात ना... जिथे मोजमापाची परिमाणं तयार करता येत नाहि पण परिणाम सुद्धा नाकारतायेत नाहि. ते मिस्टीसीझम नाहि, पण तर्काला पुरेसा वाव पण देत नाहि.

तिमा's picture

12 Feb 2014 - 1:15 pm | तिमा

इतका विनोदी धागा यापूर्वी कधीच वाचला नव्हता. पाशवी शक्तींनी वाचायला पाहिजे होता. त्यांच्या प्रतिक्रियांनी आणखीनच मौज वाटली असती.
बाकी बॅटमन यांची तुफानी बॅटिंग बघून, त्यांनी बॅटस्मन हे नांव घ्यावे असे सुचवतो.

पैसा's picture

12 Feb 2014 - 2:29 pm | पैसा

पाशवी शक्तींनी वाचायला पाहिजे होता. त्यांच्या प्रतिक्रियांनी आणखीनच मौज वाटली असती.

त्यांच्यावर मंत्र टाकलाय. बोलायचं नाय म्हणून! ;)

मी या मंत्राचा प्रयोग हा धागा हरवला की करुन पाहाणार आहे ;)

तुम्हाला मंत्राची नाही, कंपू बनवायची गरज आहे. ;)

आयुर्हित's picture

12 Feb 2014 - 3:31 pm | आयुर्हित

अत्यंत चांगला विषय आहे.मदनबाण यांना मनापासून धन्यवाद.

"मंत्रोपचार" हे एक शास्त्र आहे, ज्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होतात, झालेल्या आहेत.प्रत्येकाने जरूर याचा सखोल अभ्यास करून मगच प्रतिसाद द्यावेत हि विनंती. पृथ्वी सपाट आहे, पृथ्वी केंद्र स्थानी असून पृथ्वीभोवती सूर्य व तारे फिरतात असे पश्चिमेच्या काही धर्मग्रंथात सांगितल्याचे आठवते. परंतु "सत्यमेव जयते" हेच खरे आहे. सत्य सर्वांसमोर येईल असे प्रत्येकाने वागावे, बोलावे व कृती करावि, यातच सर्व मानव जातीचे कल्याण आहे.

परंतु काही अल्पबुद्धी जीवांना आपल्याला खूप बुद्धी आहे,असे दाखवण्या पलीकडे काही येत नाही. व कोणी नवीन काही सांगतो आहे त्याचे आभार न मानता लेख भरकटत नेण्या पलीकडे व अर्थाचा विपर्यास करण्याकडेच भर असतो.

संपादक मंडळाने अशा अल्पबुद्धी जीवांना समाज द्यावी जेणेकरून सर्व चर्चा सकारात्मक दिशेकडे होईल.
धन्यवाद.

यसवायजी's picture

12 Feb 2014 - 4:10 pm | यसवायजी

सरकारने अशा अंधश्रद्धा पसरवणार्‍या बुद्धीवान जीवांना अटक करावी जेणेकरुन देशाची वाटचाल सकारात्मक दिशेकडे होईल.

तिमा's picture

12 Feb 2014 - 4:01 pm | तिमा

अल्पबुद्धी जीवांना

चुकून 'अल्पजीवी बुद्धांना' असं वाचलं.
(एकच बुद्ध, बाकी सारे निर्बुद्ध!)

प्यारे१'s picture

12 Feb 2014 - 4:10 pm | प्यारे१

आमचा वाश्या प्रबुद्ध! ;)
-हलकाफुलका मोड

यसवायजी's picture

12 Feb 2014 - 4:29 pm | यसवायजी

@ मदनबाण -
या धाग्यावर हा अंजनेय मंत्र सुचवायचा विचार आहे.
ॐ श्री वज्रदेहाय रामभक्ताय वायुपुत्राय नमोsस्तुते ।

याचा काही फायदा होईल का? नसल्यास दुसरा एखादा मंत्र सांगावा अशी विनंती. (मला पण गरज आहे)
तुमचा मंत्रांवरचा विश्वास पाहता २-३ महिन्यात सकारात्मक बदल घडतील अशी आशा करतो.

अजुन एक शंका-
मंत्र स्वतःच म्हणावा लागतो का दुसर्‍याने आपल्या साठी म्हटला तरी चालतो? नाही म्हणजे प्राजक्ता ताईंना लवकरच प्रमोशन मिळवून देउ आणी जंगी पार्टी घेउ की. दुध का दुध पानी का पानी.

धागा नीट वाचलात तर मी माझा "अनुभव" कथन केला आहे,कोणाला काही सुचवण्यासाठी नाही.

तुमचा मंत्रांवरचा विश्वास पाहता २-३ महिन्यात सकारात्मक बदल घडतील अशी आशा करतो.
जो पर्यंत वरचे बोलवणे येत नाही तो पर्यंत सकारात्मकच जगावे असा माझा विचार आहे.

मंत्र स्वतःच म्हणावा लागतो का दुसर्‍याने आपल्या साठी म्हटला तरी चालतो? नाही म्हणजे प्राजक्ता ताईंना लवकरच प्रमोशन मिळवून देउ आणी जंगी पार्टी घेउ की. दुध का दुध पानी का पानी.
दुसर्‍याने पाणी प्यायले तर तुमची तहान भागते का ? ;) तुम्हाला जरा पार्टीची इच्छा असेल तर तुम्ही खटपट केलीत तर माझी ना नाही बरं का ! ;) हो आणि तसे झालेच समजा तर त्या पार्टीचा वॄतांत इथे टाकायला विसरु नका हं ;)

यसवायजी's picture

12 Feb 2014 - 4:53 pm | यसवायजी

धिस इज नॉट फेअर.

धागा नीट वाचलात तर मी माझा "अनुभव" कथन केला आहे,कोणाला काही सुचवण्यासाठी नाही.

शहाणे करुन सोडावे सकळजन. द्या की आम्हाला पण ४ मंत्र. एकमेका सहाय्य करु. आता मी म्हणतोय की प्रयत्न करतो तर तुम्ही नाही म्हणताय.

मग काय?? देताय का प्रमोशन आणी पगारवाढीचा मंत्र? ;)

द्या हो आम्हांलाही द्या. पगार वाढला तर झैरात करत हिंडू तुमच्या मंत्राची, हौदिल्लो बे यसवायजी?

"आमचे येथे सर्व मंत्रांची झैरात करून मिळेल. प्रत्येक मंत्रासाठी वेगळा चार्ज पडेल!"

यसवायजी's picture

12 Feb 2014 - 5:06 pm | यसवायजी

पहिल्या दोन महिन्यात गुण आला नाही तर पुढच्या दोन महिन्यात येईल. पैसे परत मिळणार नाहीत, मंत्र बदलून मिळणार नाही..

बॅटमॅन's picture

12 Feb 2014 - 5:49 pm | बॅटमॅन

हा हा हा =))

मदनबाण's picture

12 Feb 2014 - 5:49 pm | मदनबाण

शहाणे करुन सोडावे सकळजन.
मी दीड-शाहण्यांना शाहणं करायचा प्रयत्न करत नाही ! ;)
द्या की आम्हाला पण ४ मंत्र. एकमेका सहाय्य करु. आता मी म्हणतोय की प्रयत्न करतो तर तुम्ही नाही म्हणताय.
अहो हनुमान मंत्र तुम्हीच जालावर शोधलात ना ? अजुन हवे असेल तर गुगलबाबा आहेच की समर्थ ! ;) शिवाय तुम्हीच म्हणताय की प्रयत्न करतो आहे, मग करा की... कोणी अडवलय ? ;) प्रयत्न केलात की अनेक पर्याय सापडतील ! ;) फक्त तो प्रयत्न प्रामाणिक हवा ! ;)

फक्त तो प्रयत्न प्रामाणिक हवा !

अगदी अगदी. अन माणूस पुण्यवान हवा. म्हणजे तुकाराम सदेह वैकुंठास गेलेल्या विमानातला बिझनेस क्लास, ज्ञानेश्वरांनी वेद म्हणवून घेतलेला रेडा अन रामदास मिरजेच्या किल्ल्यातील ज्या जंगीतून बाहेर पडले ती जंगी असं सर्व काही दिसू शकतं.

मंत्र स्वतःच म्हणावा लागतो का दुसर्‍याने आपल्या साठी म्हटला तरी चालतो?

माझ्या माहितीत असे भटजी/ज्योतिषी आहेत की जे आपण पैसे दिले की ते आपल्यासाठी होम/हवन/याग/ग्रहांची शांती/मंत्रजप करतात.

करतात ते, फल आपल्याला मिळते. आपण फक्त समिधा, त्यांचा वेळ ईत्यादीचा मोबदला दयायचा.

मदनबाण's picture

13 Feb 2014 - 2:10 am | मदनबाण

माझ्या माहितीत असे भटजी/ज्योतिषी आहेत की जे आपण पैसे दिले की ते आपल्यासाठी होम/हवन/याग/ग्रहांची शांती/मंत्रजप करतात.
करतात ते, फल आपल्याला मिळते. आपण फक्त समिधा, त्यांचा वेळ ईत्यादीचा मोबदला दयायचा.

खरं आहे, संकल्प करुन असे करतात्.मी जे सुरुवातीला २ पीडीएफ चे दुवे दिले त्यातल्या २ र्‍या पीडीएफ मधे पान क्रमांक ९ वर याचा संदर्भ मिळेल.

कवितानागेश's picture

12 Feb 2014 - 5:55 pm | कवितानागेश

काय ठरलं शेवटी?
कुणाकुणाचा मनोनिग्रह झालाय प्रयोग करण्यासाठी? ;)
चोरी जाउ दे. निदान कुणीतरी एखादी वस्तू तरी हरवा रे....

बॅटमॅन's picture

12 Feb 2014 - 5:57 pm | बॅटमॅन

समजा कुणी हृदय चोरलं असेल कुणाचं तर हा मंत्र लागू होतो का गं मौ?

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2014 - 6:01 pm | पिलीयन रायडर

पुरूष आहेस म्हणुन की वेलेन्टाइन डे जवळ आलाय म्हणुन असं बोल्लास??

मंत्राबद्दल सांगितल्यावर माझा नवरा हेच्च म्हणालाय काल..

दोन्हीपैकी कुठलेही एक कारण घ्या, किंवा दोन्ही घ्या किंवा कुठलेही घेऊ नका.

नक्की फरक काय पडतो त्याने?

पैसा's picture

12 Feb 2014 - 6:30 pm | पैसा

त्या कार्तवीर्याने गाय चोरून नेली होती. तुम्हाला पण हृदयाच्या बदल्यात एक गाय मिळेल नंतर! ते स्वल्पहालप्राशनार्थ गाय पाळणे वैग्रे विसरलास काय?

आदूबाळ's picture

12 Feb 2014 - 6:39 pm | आदूबाळ

हृदयाच्या बदल्यात एक गाय मिळेल

"तसल्या" काही आवडी नसल्यास हृदयाच्या बदल्यात a guy हा सौदा घाट्याचा पडेल...

पैसा's picture

12 Feb 2014 - 6:42 pm | पैसा

अगागागा! =)) मग बैल (बाईल) चालेल की!

ठ्ठो!!!! मेल्या आदूबाळा भेटच तू एकदा =))

टिवटिव's picture

13 Feb 2014 - 1:54 am | टिवटिव

बेक्कार...

स्वल्पहालप्राशनार्थ गाय नै हो म्हैस म्हटलो मी.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2014 - 6:00 pm | पिलीयन रायडर

मी घरी सांगुन ठेवलय.. काही हरवलं की आधी मला सांगा... आपण मंत्र म्हणु..

मला तरी हा प्रयोग करुन पहायचय.. कारणं काही का असेनात, वस्तु मिळाल्याशी मतलब.. जर मंत्र म्हणुन मिळत असेल तर तसं..

थांबा.. थांबा...

माझी सोन्याची फिरकी १-२ आठवड्या पुर्वी घरातच हरवली आहे.. कानातलं सापडलय, पण फिरकी नाही..

म्हणुन पाहु का हा मंत्र???

गिरकी's picture

12 Feb 2014 - 6:09 pm | गिरकी

या मंत्राचा माझा अनुभव संमिश्र आहे… मी साधारण १०-११ वी मध्ये असताना माझ्या ताईच्या कॉलेज मध्ये आमचा क्यामेरा हरवला होत…. त्यानंतर आईने तो मंत्र खूप वेळा म्हणला आणि मग एक दोन दिवसात ताईच्याच एका मित्राला कॉलेज च्या बागेत तो क्यामेरा झाडाच्या ढोली मध्ये सापडला … आता तो तिथे कसा गेला आणि त्यालाच कसा सापडला वगैरे वर आईनी काही विचार केला नाही.

त्यानंतर एखाद्या वर्षातच आमची एक सोन्याची चेन हरवली. आईनी खुपदा मंत्र म्हणला. पण ती काही मिळाली नाही. आम्ही त्या चेन बद्दल विसरून पण गेलो होतो. पण योगा योगाने एका वर्षानी ती घरातच एका वापरात नसलेल्या कोटाच्या खिशात सापडली….

आणि त्यानंतर ३ वर्षापूर्वी ट्रेन मधून जात असताना माझी एक मोठ्ठी अमेरिकन टुरीस्टर ची ब्याग गेली. त्यात माझी आयुष्यभराची कमाई म्हणजे माझी लहानपणीपासून चे शैक्षणिक दस्तावेज आणि मी कुठून कुठून जमवलेली पुस्तके आणि माझ्या हस्तलिखित गोष्टी असा जीवापाड जपलेला खजिना होता… त्यामुळे मी श्रद्धाळू नसूनही अनेक दिवस तो मंत्र म्हणत राहिले… आईने पण म्हणला…. पण आज तागायत मला त्याचा काहीच उपयोग नाही झाला…

आपण श्रद्धेने जर काम केले तरच त्याचा फायदा होईल. श्रद्धा वाढविण्यासाठी मंत्र शास्त्र म्हणजे काय, कसे काम करते हे समजून घेतल्यावर आपल्यालाही पटेल व अपेक्षित परिणाम निश्चितपणे साधला जाईल

फायदा नै झाला तर श्रद्धा नाही इ.इ. खुस्पटे काढायला लोक कायम पुढं असतात. तुमच्या संमिश्र अनुभवांना श्रद्धाहीन असल्यामुळेच तसे अण्भव आले असेही म्हणतील. अंधश्रद्धेचे दुकान चालायला पाहिजे ना शेवटी, तसे कैतरी केलेच पाहिजे!

शिद's picture

12 Feb 2014 - 6:36 pm | शिद

तुमच्या संमिश्र अनुभवांना श्रद्धाहीन असल्यामुळेच तसे अण्भव आले असेही म्हणतील.

बॅटमॅन'भाऊ, तुम्ही प्रतिसाद टंकत असताना 'आयुर्हित' साहेबांनी

आपण श्रद्धेने जर काम केले तरच त्याचा फायदा होईल.

हे लिहीले व पोस्ट केले देखील... आहात कुठे? :)

पण मुळात एखाद्या गोष्टीचा अनुभवच नाही आला तर श्रद्धा कशी बसेल बरं ?
आईला अनुभव आला त्यावरून माझी श्रद्धा बसणं मला शक्य नाही वाटत….
' श्रद्धेने केले तरच अनुभव येईल ' हे विधान फारच सेफ म्हणता येइल… ते तर अनिरुध्ह बापू पण म्हणाले होते की श्रद्धेनेमंत्र की नामस्मरण काहीतरी केले की बलात्कार होणार नाही … पण अशा कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा बसणे कसे शक्य आहे ? सारासार विचार करून पटायला तर हवं ना?

माताय चर्चेत काय चाललय काईच कळणा . धाग्याचे काश्मीर होणे या म्हणीचा प्रत्यय आला .

(काश्मीरी)जेपी

किंवा धाग्यावर मंत्र बसणे किंवा धाग्याला मंत्रचळ लागणे.

किंवा धाग्यावर मंत्र बसणे . =))

असले भन्नाट धागे काढण्यासाठी काही मिळेल का ?

आत्मशून्य's picture

12 Feb 2014 - 6:47 pm | आत्मशून्य

आलामंतर कोलामंतर छू

ही थिअरी क्लासीक आहे. बिनतोड! फक्त अशा घटनात (जिथे) आलामंतर कोलामंतर छू न ऐकलेल्या कडुनही तिव्र अनपेक्षित सहकार्य कसे काय मिळते यावर आपले स्पश्टीकरण वाचायला आवडेल. "योगायोग" हे कारण सोडुन.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Feb 2014 - 7:11 pm | बिपिन कार्यकर्ते

माझं जुनं मिपा हरवलंय... मंत्राचा जप सुरू करतो आहे. बघुया, परत मिळतं का, आणि किती दिवसात मिळतं ते!

कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !

and so on... and on...

तिमा's picture

12 Feb 2014 - 7:22 pm | तिमा

नवीन मिपाचे नांव मंपा ठेवावे असे सुचवतो.

मंपा = मंत्रा पाव!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2014 - 11:31 pm | अत्रुप्त आत्मा

@मंपा = मंत्रा पाव! =))

आत्मशून्य's picture

12 Feb 2014 - 7:23 pm | आत्मशून्य

उगा डायवर बदल्ले म्हुन. गाडी हरवली कंप्लेट मारनेत काय अर्थ हाय ?

पैसा's picture

12 Feb 2014 - 7:38 pm | पैसा

तू डायवरलाच सांगून र्‍हायलास!

आत्मशून्य's picture

12 Feb 2014 - 7:44 pm | आत्मशून्य

इतर काही शक्ति तुम्हाला वश असतील तर त्यांचे काम तुमच्यामार्गे लावतो. करा यांना सहकार्य.

पैसा's picture

12 Feb 2014 - 7:46 pm | पैसा

तुमच्या सगळ्यांपेक्षा मी णवीण!

आत्मशून्य's picture

12 Feb 2014 - 7:51 pm | आत्मशून्य

पण त्या पाण्यात जातात. हेच या जगाचे वास्तव आहे.

प्यारे१'s picture

12 Feb 2014 - 8:34 pm | प्यारे१

आब्जेक्शन!

ते डायवर नाय तर इन्ट्रक्टर हायेत आसं इशेष सूत्रांकडून कळतं! ;)
(गांधीवादी बिका हाणणार आमाला ;) )

आत्मशून्य's picture

12 Feb 2014 - 8:41 pm | आत्मशून्य

त्या खरच स्वभावाने प्रांजळ आहेत हेच त्यांचे चांगुलपण आहे, त्यांचे बाबत छोट्या मोठ्या तांत्रीक बाबी सोडुन आशयच ल़क्षात घ्यायचा. अन्यथा मी इतर काही शक्ती म्हणजेच मंत्रशक्ती ज्या संबंधी हा धागा आहे याचा उल्लेख केल्यानंतर त्यांचा भरकटलेला प्रतिसाद मनावर घेतला नसता काय.