✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव

म
मदनबाण यांनी
Tue, 02/11/2014 - 03:51  ·  लेख
लेख
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ) _____________________________________ मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे. मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।। श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो} बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्। मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।। श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.} मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे. जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.} वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :- An Introduction to the "MantraŚãstra" MANTRAS दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे ! प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो. वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो. मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १} या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती. २)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्‍या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्‍याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता. ३}घरात अनेकदा मला न मिळणार्‍या,दॄष्टीस न पडणार्‍या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्‍या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली. ४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली. या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत. या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख} जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
113204 वाचन

💬 प्रतिसाद (322)

प्रतिक्रिया

>>>त्या अक्षरात किंवा नामात

प्यारे१
Tue, 02/11/2014 - 20:45 नवीन
>>>त्या अक्षरात किंवा नामात पॉवर असते ह्यात शंकाच नाही. >>>ते सिद्ध करायला आम्ही तयार आहोत. तुमच्याच मार्फत. रोज ११ माळा करा. >>>कुठलाही जप करा. >>>ॐ नमः शिवाय करा, >>>श्रीराम जयराम जयजय राम करा अथवा गायत्री करा. >>>महिन्यानंतर बोलू. इथंच! ह्याबाबत. बघा की. जमेल तुम्हाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओह ते!

बॅटमॅन
Tue, 02/11/2014 - 20:51 नवीन
ओह ते! मुळात हीरो आणि व्हिलन या दोहोंच्या नावाचा जप केला तरी परिणाम होतो या दाव्यामुळेच 'बाय इटसेल्फ' पॉवरचा दावा मोडीत निघालेला आहे हे कळत नसेल तर हाईट आहे. शिवाय मनोनिग्रहाच्या मुद्याला सोयीस्कर बगल दिलेली आहे, त्यामुळे मी सांगितलेल्या मुद्यांना अनुसरून बोलता येत असेल तर बघा. तेवढं कदाचित जमू शकेल तुम्हांला. मनोनिग्रह नसेल तर गायत्री काय अन म्हैसत्री काय, कशाचाच उपयोग नाही. प्लासिबो इफेक्टचे ट्रिगर यापलीकडे नक्की काय रोल आहे असा नेमका प्रश्न विचारला तरी रेकॉर्ड अडकलेलीच आहे तुमची. नेमका आक्षेपच कळला नाही तिथे आव्हानाला कसला अर्थ आलाय कपाळ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आता व्हिलनचं पक्कं झालं का

प्यारे१
Tue, 02/11/2014 - 21:11 नवीन
आता व्हिलनचं पक्कं झालं का डोक्यात? हरकत नाही. मंत्र चांगले असतात तसे वाईट सुद्धा असतात कधी सकाम असतात कधी वासनांतून मुक्ती मिळायला मदत करणारे असतात. संत मंत्र/ नाम नि नामी मध्ये फरक नाही असं अनुभवानं म्हणतात. आता मदनबाणनं दिलेल्या लिंक वाचा नि नंतर मग बोलू. मनोनिग्रह असेल तर जप होतो मात्र मनोनिग्रह नसेल तर जप केल्यानं तो होतो. बाकी प्लासिबो इफेक्ट मागेच संपला. संपादक कॄपेनं प्रतिसाद उडाले त्या धाग्यावरचे. जपानं मनोनिग्रह साधतो, मंत्रांच्या पठणानं त्या त्या दैवतापर्यंत जाता येतं. विशिष्ट अक्षर समुच्चयाचा उपयोग विशिष्ट तत्त्वामार्फत झाल्यास उपयोग होतो. विशिष्ट तत्त्वामार्फत न झाल्यास स्वतःच स्वत: केला तर त्या तत्त्वापर्यंत न्यायला मदत करतो. :) असो! तुमची तयारी नाही ना, जौ दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मनोनिग्रह असेल तर जप होतो

बॅटमॅन
Tue, 02/11/2014 - 21:21 नवीन
मनोनिग्रह असेल तर जप होतो मात्र मनोनिग्रह नसेल तर जप केल्यानं तो होतो. बाकी प्लासिबो इफेक्ट मागेच संपला. संपादक कॄपेनं प्रतिसाद उडाले त्या धाग्यावरचे. जपानं मनोनिग्रह साधतो, मंत्रांच्या पठणानं त्या त्या दैवतापर्यंत जाता येतं. विशिष्ट अक्षर समुच्चयाचा उपयोग विशिष्ट तत्त्वामार्फत झाल्यास उपयोग होतो. विशिष्ट तत्त्वामार्फत न झाल्यास स्वतःच स्वत: केला तर त्या तत्त्वापर्यंत न्यायला मदत करतो.
अब आगये लाईनपे. हाफ हार्टेडलि जप करून निग्रह होत नसतो. शेवटी जे काही व्हायचं ते मनोनिग्रहामुळेच होतं. निग्रह हा प्रायमरी आहे. शेवटी इथे सहमती जर असेल तर मग बाय इटसेल्फ पॉवर असते या दाव्याचा इतका जप कशासाठी चालला होता ते समजलं नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हहहहहहह्ह! असोच!

प्यारे१
Tue, 02/11/2014 - 22:24 नवीन
हहहहहहह्ह! असोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

असो! तुमची तयारी नाही ना, जौ

शाम भागवत
Wed, 10/22/2025 - 07:26 नवीन
असो! तुमची तयारी नाही ना, जौ दे!
हे एकदम छान केलंत. 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

चोरलेल्या गोष्टी मिळतील काय?

योगी९००
Tue, 02/11/2014 - 15:02 नवीन
मस्त लिहीले आहे. विश्वास ठेवणे थोडे अवघड आहे. मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! हा मंत्र मला आईने लहानपणी शिकवला होता. काही वस्तू हरवल्या तर हा मंत्र म्हणून आम्ही त्या वस्तू शोधायचो आणि बर्‍याचदा त्या वस्तू परत ही मिळायच्या. यात योगायोगाचा भाग जरी असला तरी हा मंत्र म्ह्णत जर शोध घेतला तर कदाचित आपण जे शोधतो त्यावर पुर्णपणे लक्ष लागत असावे (मनात मंत्र म्हणत असल्याने तिसरा कोणताच विचार येत नसावा. एक तर हरवलेल्या वस्तूचा विचार आणि दुसरा म्हणजे मंत्र याशिवाय तिसरा विचार नसल्याने आपले लक्ष नीट लागत असावे..) सहज म्हणून विचारतो. चोरलेल्या वस्तू या (किंवा दुसर्‍या कुठल्याही) मंत्रामुळे मिळतील काय? किंवा असा कोणाचा अनुभव आहे काय? चोरावर चेटूक करता येईल काय? (चेष्टा करायचा उद्द्देश नाही आहे.. सिरीयस्ली विचारत आहे).
  • Log in or register to post comments

चोरलेल्या वस्तू या (किंवा

मदनबाण
Tue, 02/11/2014 - 15:51 नवीन
चोरलेल्या वस्तू या (किंवा दुसर्‍या कुठल्याही) मंत्रामुळे मिळतील काय? किंवा असा कोणाचा अनुभव आहे काय? चोरावर चेटूक करता येईल काय? (चेष्टा करायचा उद्द्देश नाही आहे.. सिरीयस्ली विचारत आहे). नाही.माझा उद्देश अगदी स्पष्ट आहे तो म्हणजे, माझ्या जवळी जी काही माहिती आहे ती देणे... मंत्र-तंत्र-आणि यंत्र ही जगाला आपल्या देशाने दिलेली मोठी देणगी आहे असे मी समजतो आणि योग्य तीच माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

मदनबाण'जी... अत्यंत सुन्दर

मृगनयनी
Tue, 02/11/2014 - 17:50 नवीन
मदनबाण'जी... अत्यंत सुन्दर आणि श्रद्धावानांना उपयुक्त लेख! ... "कार्तवीर्यार्जुननाम..." हा मन्त्र खरंच खूप प्रभावी आहे. मी अनेकदा वस्तू हरवल्यानन्तर या मन्त्राचा अनुभव घेतलेला आहे. १०८ % हरवलेली वस्तू सापडते. त्याचबरोबर नामस्मरणाचेही माहात्म्य अगाध आहे. कोणतेही एक नाम जर सतत घेत राहिले, तर निश्चित त्या "नामा"ला एक विशिष्ट शक्ती प्राप्त होतेच. परन्तु "ते" नाम जर तुम्हाला तुमच्या "गुरु"ने दिले असेल तर नक्कीच त्याचा जास्त फायदा होतो. कारण "परमपूज्य", "सद्गुरु", "परमहंस" या पदावर पोचलेल्या गुरुकडून दीक्षा घेऊन त्याने दिलेले नाम जर सतत मुखात घोळवत ठेवले, तर त्याचा होणारा शुभ परिणाम हा कैकपटीने वाढलेला असतो. त्रेतायुगात यज्ञयागादि मार्गांनी तर द्वापारयुगात पूजन-अर्चन मार्गाने उचित देवतेला प्रसन्न करून घेतले जायचे. परन्तु कलीयुगात मात्र केवळ "नामस्मरणा"च्या मार्गाने देव प्रसन्न होतो. कर्मकांडांपेक्षा मानसपूजेला कलीयुगात जास्त महत्व आहे. आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत, असे मानतात. देवी, दत्त, गणेश, शन्कर .. सगळेच देव श्रेष्ठ आहेत. आणि त्या प्रत्येकाची नामेही श्रेष्ठच आहेत. परन्तु आपल्या गुरुने जे नाम आपल्याला घ्यायला सांगितले आहे, ते जर एकनिष्ठेने घेत राहिले, तर नक्कीच ते नाम आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ बनते आणि उचित फळही मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत

प्रचेतस
Tue, 02/11/2014 - 18:09 नवीन
कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत खल व्यक्तिरेखा म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या हजार हातांच्या बळावर उन्मत्त झालेला हा अर्जुन ऋषीमुनींशिवाय साक्षात देवादिकानांनाही त्रास देत फिरायचा. जमदग्नीची धेनू बलात्काराने हरण केली म्हणून भार्गवरामाने त्याचा वध केला. त्याच कार्तवीर्याजुनाच्याच मंत्राने हरवलेली वस्तू कशी सापडते यामागचे लॉजिक कुणी उलगडून सांगेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

तेच म्हणतो. पुराणांत वाईट

बॅटमॅन
Tue, 02/11/2014 - 18:19 नवीन
तेच म्हणतो. पुराणांत वाईट म्हणून गाजलेल्या नावाने जर असे कै होत असेल तर नामस्मरणाला कुठलेही नाम चालते असेच म्हटल्यागत झाले. तस्मात मंत्रात बाय इटसेल्फ काही पॉवर असते असे म्हणणार्‍यांचा दावा इथेच खोटा पडलेला आहे. इतके असूनही गमजा सांगतात म्हणजे निव्वळ हट्टीपणा, दुसरे काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

रावणरक्षास्त्रोत्र

प्रचेतस
Tue, 02/11/2014 - 18:29 नवीन
आता श्री रावणरक्षास्तोत्र म्हणायलाही हरकत नाही. श्रीअसुराय नम: ॥ अस्य श्रीरावणरक्षास्तोत्रमन्त्रस्य शुक्राचार्य ऋषि: । श्रीमन्दोदरीरावणौ दैत्य: । अनुष्टुप् छंद: । मन्दोदरी शक्ति: । श्रीमद्धप्रहस्तम् कीलकम् । श्रीदशग्रीवप्रीत्यर्थे रावणरक्षास्तोत्रमंत्रजपे विनियोग : ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आयला जबरीच =))

बॅटमॅन
Tue, 02/11/2014 - 18:41 नवीन
आयला जबरीच =)) =)) =)) एक कडक सॅल्यूट घ्यावा साहेब आमच्याकडून _/\_ नेत्री वीस हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथां चंदन पाझरे, करि बरे ते शस्त्र साचे खरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे ब्रूसाजी बघ वेन गॉथमिं खरे, त्या रावणासी स्मरे || रावणो राजमणि: सदा विजयते, मन्दोदरीशं भजे | येनात्राभिहता अहो कपिचमू: दैत्याय तस्मै नमः | यस्मान्नास्ति परायणं परतरं , पौलस्त्यदासोऽस्म्यहम् | तस्मिंश्चित्तलयः सदा भवतु मे, पौलस्त्य मामुद्धर ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगागगगगगगा =)) काय रे हे

प्रचेतस
Tue, 02/11/2014 - 18:47 नवीन
अगागगगगगगा =)) =)) =)) काय रे हे =))
ब्रूसाजी बघ वेन गॉथमिं खरे, त्या रावणासी स्मरे ||
ही ओळ तर काळजाला भिडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ही ही ही धन्स रे

बॅटमॅन
Tue, 02/11/2014 - 18:55 नवीन
ही ही ही ;) =)) धन्स रे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आधुनिक मंत्र का?

पैसा
Tue, 02/11/2014 - 21:26 नवीन
आधुनिक मंत्र का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

स्त्रॉत्र मंजरी हा कविता

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/11/2014 - 20:42 नवीन
स्त्रॉत्र मंजरी हा कविता खरवंडीकर व धनंजय खरवंडीकर यांचा एक चांगला कार्यक्रम झाला होता. त्यात रावणकृत शिवतांडव स्त्रोत्र म्हणले होते. फारच सुंदर वाटले कानाला. असो तुनळीवर रवींद्र साठेंनी म्हटलेले शिवतांडव स्तोत्र आहे http://www.youtube.com/watch?v=6-leWA6xkKw
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शिवतांडव स्तोत्र फेमस आहेच.

बॅटमॅन
Tue, 02/11/2014 - 20:44 नवीन
शिवतांडव स्तोत्र फेमस आहेच. ते, शिवाय महिम्न, शंकराचार्यांची एकूणेक स्तोत्रे आणि समर्थांचे भीमरूपी ही स्तोत्रे म्हणणे किंवा म्हटलेले ऐकणे म्हणजे नितांतसुंदर अनुभव आहे. विशेषतः भीमरूपीमध्ये जे वर्णन आहे त्याला तोड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

तो त्याच्य सहस्त्र हातांनी ती

स्पंदना
Wed, 02/12/2014 - 04:53 नवीन
तो त्याच्य सहस्त्र हातांनी ती वस्तू शोधतो अस ऐकलय. काहीही असो पण "हरवलेली" वस्तू सापडते हे मात्र खर. हा मंत्र त्या कार्त्रविर्याला कायमचा गुलाम करुन ठेवण्यासाठी आहे, त्याची उपासना नाही आहे ही. या मंत्रात कोठेही त्याचा उदो केलेला नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कार्तवीयोर्जुनो नाम राजा

बॅटमॅन
Wed, 02/12/2014 - 12:43 नवीन
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
यात गुलाम करणे कुठे दिसते तेवढे सांगावे. स्तोत्राच्या स्मरणाने अमुक तमुक होते वैग्रे फंडा तर भीमरूपीमध्येही आहे. त्याला काय हनुमानास गुलाम करणे म्हणणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

गुलाम असा डायरेक्ट नाही, पण

स्पंदना
गुरुवार, 02/13/2014 - 05:23 नवीन
गुलाम असा डायरेक्ट नाही, पण व्हिलन आहे अस म्हणताय म्हणुन सांगितल. या स्तोत्रात हा राजा फार महान आहे, अन त्याची स्तुती नाही आहे, उलत तुम्ही त्याच स्मरण केल की त्या गोष्टी तुम्हाला मिळतील अस सांगितलय. म्हणजे एका अर्थी तुम्ही नुसत त्याच नाव घ्या तो शोधेल. भिमरुपी मध्ये स्तुती आहे. तशी येथे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

स्तुती नसली तरी अन्यत्र

बॅटमॅन
गुरुवार, 02/13/2014 - 12:30 नवीन
स्तुती नसली तरी अन्यत्र व्हिलन ठरवलेल्याची इथे भलामणच आहे ना? हरवलेली वस्तू शोधून द्यायचे काम दिले याचा अर्थ त्याला अ‍ॅटलीस्ट या श्लोकात व्हिलन ठरवले जात नाही हे तर उघडच आहे. इतकाच मुद्दा होता. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

कोणतेही एक नाम जर सतत घेत

शाम भागवत
Wed, 10/22/2025 - 07:18 नवीन
कोणतेही एक नाम जर सतत घेत राहिले, तर निश्चित त्या "नामा"ला एक विशिष्ट शक्ती प्राप्त होतेच
. 🎯
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

कार्तवीयोर्जुनो नाम राजा

मदनबाण
Tue, 02/11/2014 - 15:27 नवीन
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ! या मंत्र प्रभावाचा पहिला अनुभव जो मी कथन केला आहे {जो माझ्या वडिलांच्या बाबतीत आहे, तेव्हा मी इयत्ता ५वीत होतो, या नंतर ही अनेक वेळा याचा अनुभव मी घेतला आहे हे वर आधीच नमूद केलेले आहे.} २०११ साली माझे इंदुर नगरीत जाणे झाले होते,त्यावेळी मार्तंड मंदिर {जुना राजवाडा} जाणे झाले होते,या आधीही मी अनेकदा इंदुर,उजैन या भागात लहाणपणा पासुन जात आलो आहे...आता काळानुरुप सर्वत्र शहरीकरणाचा वेढा वाढत चालला असल्याने सर्व भागांचे स्वरुप बदल्याचे जाणवते. स्कंद पर्वतावर शंकराने मणि आणि मल्ल या राक्षसांचा वध खंडा अर्थात तलवारीने केला त्याच खंडामुळे खंडोबा हे नामकरण झाले. मल्लारी वरुन मल्हारी हा शब्द तयार झाला तर मार्तंड शब्द कन्नड शब्द मुखमंडल मारि+तोंड = मार्तंड झाला.शंकराला मार्तंड भैरव असे ही संबोधले जाते.रविवार हा मुख्यत्वे मल्हारी मार्तंडाच्या उपासनेचा दिवस आहे. येळकोट शब्दाचा अर्थ येळु म्हणजे कन्नड भाषेत ७ संख्या दर्शवते मल्हारी मार्तंडाने ७ कोटी सैन्य घेउन मणि आणि मल्ल यांचा ७ व्या दिवशी रविवारी वध केला.मल्हारी मार्तंडाची संपूर्ण हिंदुस्थानात ११ ठिकाणी मंदिरे आहेत. १}जेजुरी २} निमगाव दावडी {पुणे} ३}शेबुड { अहमदनगर} ४}कामथवाडी ५} सातारे {औरंगाबाद} ६}पाली ७}नळदुर्ग ८} मंगसुळी {बेळगाव}९}मैलारसिंग {धारवाड}१०}मैलार देवरगुड {धारवाड} ११} मण्णमैलार {बेल्लारी} होळकर राजवंशाची हे कुलदैवत, त्यामुळे हे घराणे शैव पंथीय आहे हे आपल्या लक्षात येइल. लोकमाता या पदवीने सन्मानीत अहिल्याबाई होळकर यांचा जन्म १७२५ आणि शासनकाल १७६७ ते १७९५. अहिल्याबाई होळकर या त्यांच्या दान धर्मासाठी अत्यंत प्रसिद्ध होत्या, त्यांनी लोक कल्याण्यासाठी अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. धर्मशाळांचे निर्माण,बावड्यांचे निर्माण,कुंड आणि तलावांचे निर्माण तसेच गया पासुन रामेश्वर पर्यंत रस्त्याची निर्मीती केली जी आज ग्रांड ट्रंक रोड या नावाने परिचीत आहे. तर इंदुरातल्या मार्तंड मंदिरात मी अनेकवेळा गेलो होतो,पण यावेळी माझी नजर या लेखात दिलेल्या {तिथे असलेल्या} मंत्रावर यावेळीच गेली. खरतर या मंत्राचा संपूर्ण श्लोक आणि या आधी या मंत्राचा वापर कोणी केला होता का ? अशी जिज्ञासा माझ्या मनात अनेक वर्ष होती आणि यावेळी या मंदिरात त्याचे उत्तर मिळाले. Image removed. कॅमेरा :- निकॉन पी-१०० महेश्वर स्थित श्री राज राजेश्वर मंदिरात देवी अहिल्याबाई होळकर या मंत्राने नित्य शिवाभिषेक करायच्या. या मत्राच्या उपयोगीते बद्धल फोटोतील टीप क्रमांक १ वाचल्यास खालील प्रमाणे माहिती मिळते :- महेश्वर के श्री राजराजेश्वर शिव मंदिर में परम शिवभक्त देवी अहिल्याबाई,नित्य नियम से पूजन एवंम अभिषेक करने आती थी | मंदिर के गर्भगॄह में शिवलिंग के सम्मुख बैठकर उपरोक्त अभिषेक मंत्र का जाप करती थी | कहा जात है की इस मंत्र के नित्यपाठ एवं अभिषेक मंत्र द्वारा गत वैभव एवं खोई हुई वस्तु तथा सुख समॄद्धी प्राप्त होती है ! * मला या मंत्राचा संदर्भ हवा होता तो मिळाला.
  • Log in or register to post comments

तुमचा नामस्मरणावर विश्वास

शाम भागवत
Wed, 10/22/2025 - 07:34 नवीन
तुमचा नामस्मरणावर विश्वास असावा असं दिसतंय. त्यामुळे तुम्हाला या मंत्राचा अध्यात्मिक फायदाही होऊ शकतो. आपण जेंव्हां जन्माला येतो तेंव्हां आपण आपलं मूळ स्वरूप विसरतो. किंवा ते हरवतं. ते हरवलेलं मूळ स्वरूप या मंत्रामुळे परत गवसतं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

एक प्रश्न . हा मंत्र कंसातिल

जेपी
Tue, 02/11/2014 - 15:44 नवीन
एक प्रश्न . हा मंत्र कंसातिल वाक्या सह म्हणायचा की फक्त बाहेरचा .? () जेपी
  • Log in or register to post comments

कार्तवीयोर्जुनो नाम राजा

मदनबाण
Tue, 02/11/2014 - 15:53 नवीन
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ! एव्हढाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

धन्यवाद मदनबाणजी , मला ते

जेपी
Tue, 02/11/2014 - 18:26 नवीन
धन्यवाद मदनबाणजी , मला ते खंबे कंसासारखे दिसले . कदाचित कालच्या खंब्याचा प्रभाव असावा . =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

सहज विचारतेय.

कवितानागेश
Tue, 02/11/2014 - 17:04 नवीन
सहज विचारतेय. इथे चर्चा करणार्‍यांपैकी मदनबाण सोडून कुणी कुठल्या मंत्राचा स्वतः प्रयोग करुन पाहिलाय का? अतिअवांतरः योगी९०० यांच्याकडे जाउन एकदा चोरीचा आणि नंतर मंत्राचा प्रयोग करुन बघायचा असेल तर योगी९०० यांच्यासकट कोण कोण तयार आहे? ;)
  • Log in or register to post comments

योगी९०० यांच्याकडे जाउन एकदा

बॅटमॅन
Tue, 02/11/2014 - 17:05 नवीन
योगी९०० यांच्याकडे जाउन एकदा चोरीचा आणि नंतर मंत्राचा प्रयोग करुन बघायचा असेल तर योगी९०० यांच्यासकट कोण कोण तयार आहे?
मी तयार आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ठीकेय. जा. कर चोरी.

कवितानागेश
Tue, 02/11/2014 - 19:19 नवीन
ठीकेय. जा. कर चोरी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हॅ हॅ हॅ

बॅटमॅन
Tue, 02/11/2014 - 19:23 नवीन
हॅ हॅ हॅ ;) बाकी ते व्हिलनच्या नावाचे मंत्र कसे काय चांगलं काम करतात याबद्दल पब्लिकचं मौन रोचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

व्हिलनकडं सुद्धा साधनेची ताकद

प्यारे१
Tue, 02/11/2014 - 20:04 नवीन
व्हिलनकडं सुद्धा साधनेची ताकद असते. व्हिलन ती तुलनेनं वाईटासाठी वापरतो. त्यामुळं एखादी शक्ती त्या कार्तवीर्य अर्जुनाला 'वश' असेल, म्हणून त्याच्या नावाचा वापर होत असेल. रावणाला, बलिला दक्षिण भारतात पूजतातच. साधना अभ्यासासारखी तर त्याबदल्यात मिळणारी शक्ती पदवीसारखी असते. नीट अभ्यास केला किंवा कॉप्या न पकडता केल्या तरी पदवी मिळतेच. पदवी माणूस बेकार आहे म्हणून नाकारता येत नाही. तिचा परिणाम बराच काळ टिकतो असा मानायला जागा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

म्हणजे कोण व्हिलन कोण हीरो

बॅटमॅन
Tue, 02/11/2014 - 20:11 नवीन
=)) म्हणजे कोण व्हिलन कोण हीरो हेच निश्चित नाही. एका पुराणात व्हिलन म्हणतात तर दुसरीकडे कोणीतरी हीरो करतं. मृत्युंजयसारख्या कादंबर्‍या अन असली पुराणे यांत कसलाच फरक नाही. वरील स्पष्टीकरण वाचून मृत्युंजय वाचून तावातावाने युक्तिवाद करणार्‍या बालकांची आठवण येते. तोच आवेश अन तितकाच पोकळ वासा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आखिर कहना क्या चाहते हो!

प्यारे१
Tue, 02/11/2014 - 20:26 नवीन
आखिर कहना क्या चाहते हो! चल, सगळं झूठ आहे असं मान्य केलं. देव नाही, धर्म नाही, सगळी पुराणं पुचाट आहेत, झालं केलं मान्य. आम्ही आतापर्यंतचा वेळ फुकट घालवला. झाली चूक. मान्य. वरचे प्रतिसाद रद्दबातल समजावेत! कुठल्या कन्स्ट्रक्टीव्ह मार्गानं तुम्ही आम्हाला नेणार आहात ते सांगा! आता काय करुया?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कुठल्या कन्स्ट्रक्टीव्ह

बॅटमॅन
Tue, 02/11/2014 - 20:32 नवीन
कुठल्या कन्स्ट्रक्टीव्ह मार्गानं तुम्ही आम्हाला नेणार आहात ते सांगा!
असले छंद आम्हांला नाहीत.
आता काय करुया?
पाहिजे ते करा! तुम्हाला कोण अडवतंय????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आ...!!

योगी९००
Wed, 02/12/2014 - 12:03 नवीन
आहो माझा मोबाईल आधीच गेलाय चोरीला... आम्हाला नका चोरीला लावू... तुम्ही सर्व या मंत्राचे पठण करा आणि जर मोबाईल मिळाला तर मी स्वतः १ मार्च ( की ८ मार्च ?) च्या घारापुरीच्या कट्ट्याला येऊन सर्वांना पाणीपुरी खाऊ घालीन...आईस्क्रीमपण...!! चोरावर चेटूक केल्याने मला जादूटोणा कायद्याअंतर्गत पकडले जाईल काय? दुष्टप्रव्रुत्तीना आळा घालावा म्हणतोय मंत्रसामर्थ्याचा उपयोग करून..!! मदनबाण : तुम्हाला आता बहुतेक जादुटोणा कायद्यामुळे अटक होऊ शकते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मदनबाण : तुम्हाला आता बहुतेक

मदनबाण
Wed, 02/12/2014 - 16:21 नवीन
मदनबाण : तुम्हाला आता बहुतेक जादुटोणा कायद्यामुळे अटक होऊ शकते.. चालेल. हरकत नाही ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

:) अवांतर....

आत्मशून्य
गुरुवार, 02/13/2014 - 18:00 नवीन
एक चित्रपट पाहिला होता Now you see me! त्यात ४ जादुगार त्यांचा जादुचा प्रयोग म्हणुन लाइव शो मधे बँक जादुने लुटतात. अर्थातच शो संपल्यावर एफ बी आय त्यांना ताब्यात घेते व बँक कशी लूटली याची चौकशी करते. त्यात जादुच्या शक्यते बाबत मस्त धमाल संवाद आहे. तुम्हाला अटक झाली की तुम्ही पोलीसांना तशीच उत्तरे द्यावीत म्हणून हा चित्रपट आधीच अवश्य बघावा अशी शिफारस करतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बाकी तो कायदा मात्र खरोखर सुरेख आणी अभ्यासुन केला आहे...!

आत्मशून्य
गुरुवार, 02/13/2014 - 18:13 नवीन
दाभोळकरांचे याबाबत मनापासुन कौतुक वाटते. उगा आइने मुलीला देवासमोर निरंजन लावायला लावले... अथवा पोराला स्त्रोत्र म्हणायची सक्ती केली म्हणून कोर्टात खेचता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

शुभंकरोतीचे, वदनी कवळ घेता चे

मदनबाण
गुरुवार, 02/13/2014 - 18:40 नवीन
शुभंकरोतीचे, वदनी कवळ घेता चे दिवस आणि संस्कार कधीच गेले ! असे करणारे शुद्ध मराठीत बॅकवर्ड लोक म्हणुन पहायचा जमाना आहे हा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

या मंत्राचा प्रयोग केलाय,

रेवती
Tue, 02/11/2014 - 18:14 नवीन
या मंत्राचा प्रयोग केलाय, अर्थातच आज्जी सांगायची म्हणून. नंतर तो विस्मृतीत गेला. आज हा धागा पाहून आठवला. माझ्या हरवलेल्या गोष्टी सापडल्या का? तर हो! अगदी सगळ्या! मंत्रामुळे सापडल्या का? तर माहीत नाही. मंत्र विसरल्यावर किंवा तो वापरणे विसरल्यावरही वस्तू हरवल्या व सापडल्या म्हणून जे अजून वापरतात त्यांना नावे ठेवण्यात अर्थ नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते बघा! माऊश्री, आपण म्हणता तसा प्रयोग, चोरी व सापडणे यांस मी तयार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

छ्छप्पर फाडके प्रतिसाद..

टवाळ कार्टा
Tue, 02/11/2014 - 22:30 नवीन
छ्छप्पर फाडके प्रतिसाद...मांजरीने नखे दाखवली =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत

मदनबाण
Tue, 02/11/2014 - 20:00 नवीन
कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत खल व्यक्तिरेखा म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या हजार हातांच्या बळावर उन्मत्त झालेला हा अर्जुन ऋषीमुनींशिवाय साक्षात देवादिकानांनाही त्रास देत फिरायचा. जमदग्नीची धेनू बलात्काराने हरण केली म्हणून भार्गवरामाने त्याचा वध केला. ह्म्म... कार्तवीर्याची दुसरी बाजु देखील माहित असण्यास हरकत नसावी ! कार्तवीर्याचा जन्म, गर्ग ऋषींचा त्याला उपदेश व दत्तमाहात्म्याचे कथन. कार्तवीर्याची दत्तभेट, परीक्षा व त्याला दत्तप्रभूंचे वरदान व राज्यारोहण. कार्तवीर्याची विरक्ति, दत्तप्रभूंकडे आगमन, स्तुति, पुनःपरीक्षा व त्याचे प्रश्न. अवांतर :- रावण जरी राक्षस होता तरी तो दशग्रंथी ब्राम्हण होता. शंकाराने त्याचे आत्मलिंग रावणाला देवु केले होते या वरुन त्याची शंकाराप्रती भक्ती किती उच्चकोटीची होती हे सहज लक्षात येइल. असुर असुन तो विद्वत्तेत आणि भक्तीत कुठेच कमी नव्हता ! एकाद्या व्यक्तीची / व्यक्तीरेखेची एकच बाजु पाहुन मत बनवणे चुकीचे ठरेल. जाता जाता :- तुम्हा दोघांचे {वल्ली आणि बॅटमॅन}एकंदर प्रतिसाद आणि त्यातुन उपहास करण्याचा चाललेला क्षीण प्रयत्न पाहता या पुढे तुमच्या कुठल्याही प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. संपादक मंडळास विनंती :- या धाग्यात वल्ली आणि बॅटमॅन यांचे जे अवांतर प्रतिसाद आहेत ते कॄपया काढुन टाकावेत, अथवा त्यांना नविन धागा काढुन तिथे टिंगलटवाळी करण्यास मूभा द्यावी. हा धागा वाचनमात्र जरी केला तरी माझी त्याला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

>>या धाग्यात वल्ली आणि बॅटमॅन

सूड
Tue, 02/11/2014 - 21:01 नवीन
>>या धाग्यात वल्ली आणि बॅटमॅन यांचे जे अवांतर प्रतिसाद आहेत ते कॄपया काढुन टाकावेत, अथवा त्यांना नविन धागा काढुन तिथे टिंगलटवाळी करण्यास मूभा द्यावी. हा धागा वाचनमात्र जरी केला तरी माझी त्याला हरकत नाही. छे !! असं कसं? उलट संपादकावर शिंतोडे उडवले म्हणून तुमचाच प्रतिसाद काढतील. (आता मी हे असं लिहीलं ,म्हणून माझा प्रतिसादही जाईल तो निराळाच !!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सदस्य म्हणून चेष्टा केल्यावर

प्यारे१
Tue, 02/11/2014 - 21:18 नवीन
सदस्य म्हणून चेष्टा केल्यावर संपादक म्हणून कारवाई करता येते काय? ;) ह घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सदस्याने सदस्य म्हणून चेष्टा

सूड
Tue, 02/11/2014 - 21:37 नवीन
सदस्याने सदस्य म्हणून चेष्टा केल्यावर सदस्य संपादक म्हणून कारवाई करु शकत असावेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

संपादकांविषयी विनाकारण

प्रचेतस
Tue, 02/11/2014 - 21:40 नवीन
संपादकांविषयी विनाकारण कुत्सित बोलल्यामुळे आता बरं वाटत असेल ना जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हेहेहे!

पैसा
Tue, 02/11/2014 - 22:16 नवीन
"ती" पोटदुखीची गोष्ट का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हा संपादकांचा कंपू काय?

प्यारे१
Tue, 02/11/2014 - 22:25 नवीन
हा संपादकांचा कंपू काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा