अवकाशाचा वेध १ : सप्तर्षी व कृष्ण विवर

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
27 Jan 2014 - 3:58 pm

रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे सप्तर्षी उर्फ Big Dipper म्हणजे हे वेद व पुराणात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. आकाशात जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे :

  1. अंगिरस (Epsilon of Ursa Major)
  2. अत्रि (Delta Ursae Majoris)
  3. क्रतु (Dubhe; Alpha of Ursae Majoris)
  4. पुलस्त्य (Gamma Ursae Majoris)
  5. पुलह (Merak; Beta Ursae Mejoris)
  6. मरीचि (Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris)
  7. वसिष्ठ (Mizar; Zeta Ursae Majoris).

सप्तर्षींमधील ताऱ्यांचा आकाशातला (घड्याळ्याच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेनुसार-clockwise-सव्य)क्रम (α) क्रतु (β) पुलह (γ) पुलस्त्य (δ) अत्रि (ε) अंगिरस) (ζ) वसिष्ठ (शेजारी अरुंधती)
आणि (η) मरीचि असा आहे.

वसिष्ठ ताऱ्याजवळ अरुंधतीचा तारा (Alcor) असतो.
आपल्या नुसत्या डोळ्यांनी अरुंधती दिसते कि नाही हे पाहावे. दिसत असल्यास आपल्या डोळ्यांची नजर चांगली आहे असे आपले हुशार पूर्वज मानत असत.

सप्तर्षीं उपयोग रात्रीच्या वेळेला ध्रुव तारा शोधण्यासाठी होतो व वेळही कळते.

ह्या सप्तर्षीच्या जवळ असलेल्या उत्तरमुकुट /बुमरंग उर्फ Corona Borealis असलेल्या तारका समुहात/नक्षत्रात परवाच २३ जानेवारीला एक नवीन कृष्णविवर सापडलेले आहे, जे आपल्या पृथ्वीपासून ३९००,०००,००० प्रकाश वर्षे दूर आहे.

हे कृष्ण विवर शोधण्यासाठी चंद्रा क्ष किरण निरीक्षणयान ची मोलाची मदत लाभली आहे.

हे फोटो पाहिल्यावर ह्या विश्वात आपण किती क्षुद्र आहोत, ह्याची कल्पना येते.

(क्रमश:)

संस्कृतीइतिहासऔषधोपचारभूगोलछायाचित्रणप्रकटनमाध्यमवेधमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

मोठ्या अपेक्षेने लेख उघडला होता. :(
असो. लिहित रहा

अनिरुद्ध प's picture

27 Jan 2014 - 4:17 pm | अनिरुद्ध प

तसेच माहिती पुर्ण लेख पु ले शु

मी_आहे_ना's picture

27 Jan 2014 - 5:19 pm | मी_आहे_ना

ह्या सप्तर्षींच्याच आकाराचा अगदी छोटा पुंजका असतो ना? त्याला / त्या नक्षत्राला काय म्हणतात? (आम्ही काहीतरी सप्तर्षींच्या बायका म्हणायचो बहुधा)

परिंदा's picture

27 Jan 2014 - 6:50 pm | परिंदा

ursa minor

मराठीत काय म्हणतात ते माहित नाही!

भटक्य आणि उनाड's picture

27 Jan 2014 - 10:43 pm | भटक्य आणि उनाड

क्रूत्तिका...

कृत्तिका नक्षत्र. हे नक्षत्र वृषभ राशीचाही भाग असल्याने त्याला त्या आभासी बैलाचं वशिंडही समजतात अनेकदा.

arunjoshi123's picture

27 Jan 2014 - 6:42 pm | arunjoshi123

छान लेख.
हे तारे एकमेकांपासून कितीतरी प्रकाशवर्षे दूर आहेत. त्यांचा तसा काही परस्पर संबंध नाही. ते स्वतःभोवती तसेच त्यांच्या दीर्घीकेत फिरत असणार. मग त्यांचा दिसणारा "हा" आकार बदलायला किती वर्षे लागतील?

रात्रीचा कट्टाही होऊ द्या .

भटक्य आणि उनाड's picture

27 Jan 2014 - 10:46 pm | भटक्य आणि उनाड

रात्रीचा कट्टा.. खगोल मडळ.. वागणी येथे..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jan 2014 - 4:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी पण, मी पण.... तिथे जाऊन कुडकुडत झोपायचे.

आयुर्हित's picture

30 Jan 2014 - 12:15 pm | आयुर्हित

मग फोटोत दाखवलेले कृष्ण विवर हे काय कृवि चे भूत आहे?
थोडक्यात बिग बँग व्हायला कृ वि हेच तर कारण आहे.
या मुद्द्यावर आपण मिपावर वादविवाद करायला आहोत.

असले तरी माझ्या माहितीनुसार कृष्ण विवराचा फोटो काढता येत नाही...

थोडक्यात तुम्हीहि "कृष्ण विवर"असते याला मान्यता दिली हे महत्त्वाचे आहे.
फार महत्त्वाचे बोललात, धन्यवाद.

कृष्ण विवराचा फोटो काढता येत नाही याचा अर्थ मी Optical view(प्रकाशमय दृश्य)असा घेतो, कारण कृवि च्या मुखातून प्रकाश किरणे बाहेर पडू शकत नाही.आणि म्हणूनच दिलेल्या फोटोत दोन काळे क्षेत्र (डार्क स्पॉट)दिसतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jan 2014 - 1:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडक्यात बिग बँग व्हायला कृ वि हेच तर कारण आहे.
या मुद्द्यावर आपण मिपावर वादविवाद करायला आहोत.

आपण थोर आहात, मी क्षुद्र आहे. मी हार कबूल करते.

काहीतरी चुकीचा अर्थ काढलाय आपण!
अहो, येथे कोणाला कमी लेखायचा मुळीच उद्देश नाही.
वादविवाद करायला म्हणजे व्यवस्थितपणे मुद्दा पटवून देणे हा होय.

पण आपला "ब्रेकिंग न्यूज-कृष्णविवरं नाहीतच-स्टीफन हॉकिंग" हा लेख मिपावर नाही हे थोडे खटकलेच!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jan 2014 - 5:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

इश्श!

यसवायजी's picture

27 Jan 2014 - 7:11 pm | यसवायजी

चांगली माहिती आहे. पण लिंकांपेक्षा इथेच फोटो आणी जास्त माहिती द्यावी हि विनंती.
पुभाप्र.

धन्या's picture

27 Jan 2014 - 7:15 pm | धन्या

अपेक्षाभंग.

बॅटमॅन's picture

27 Jan 2014 - 7:33 pm | बॅटमॅन

के एल पी डी.

आता कोणी फुलफॉर्म विचारलंन तर काय सांगशील?

बॅटमॅन's picture

27 Jan 2014 - 7:43 pm | बॅटमॅन

बहुत चर्चेअंती

खास लम्हें पे धोका

असा त्याचा लॉङ्गफॉर्म निश्चित करण्यात आला होता ;) अर्थ तोच पण टंकताना णो टेण्षण =))

यसवायजी's picture

27 Jan 2014 - 7:51 pm | यसवायजी

:D
यावर्न कालेजातल्या ग्रुपची आठवण झाली. GBGM Group..
ग्रेट बॉईज ऑफ ग्रेट माईन्ड्स..
आणी दुसरा अर्थ.. गोड बोलुन xx xx.. ग्रुप.
:))
बाकी धागा खरच केएलपीडी झालाय :D

बॅटमॅन's picture

27 Jan 2014 - 7:56 pm | बॅटमॅन

हा हा हा हा =))

खरंच, गोड बोलणारे गामापैलवानच म्हटले पाहिजेत नैका ;) =))

सूड's picture

27 Jan 2014 - 8:18 pm | सूड

>>खास लम्हें पे धोका

__/\__
हे असं फक्त तुलाच सुचू शकतं रे बाबा !!

थोडी दुरुस्ती: मला नै सुचलं, मुसुशेठची क्रियेटिव्हिटी आ।ए ही. :)

स्वच्छंदी_मनोज's picture

27 Jan 2014 - 8:08 pm | स्वच्छंदी_मनोज

छान माहीती पण दोन शंका -

१. हे सर्व तारे आहेत की ग्रह?

२. अरुंधती हा तारा सहाव्या तार्‍याजवळ दिसतो तर सातवा तारा वसीष्ठ कसा?

दिनेश सायगल's picture

27 Jan 2014 - 8:32 pm | दिनेश सायगल

कॉपि पेस्ट मारलेल दिसतय.
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%...

पैसा's picture

27 Jan 2014 - 10:45 pm | पैसा

खरंच की! श्री. आयुर्हित, असा विकिवरचा मजकूर कॉपी पेस्ट करू नका प्लीज. नवे स्वतंत्र काही लिहा.

आयुर्हित's picture

27 Jan 2014 - 11:08 pm | आयुर्हित

अहो ह्या साऱ्या शास्त्रीय संज्ञा/नाम आहेत, त्या बदलणार थोडीच?

पैसा's picture

27 Jan 2014 - 11:25 pm | पैसा

लेखच तिथून अख्खा कॉपी केला आहे. आणि मग पुढे कृष्णविवराची माहिती दिली आहे. ती ओरिजिनल आहे का ते कृपया सांगा.

प्रचेतस's picture

27 Jan 2014 - 11:34 pm | प्रचेतस

लेखकाने उत्साहाच्या भरात तिकडून चोप्य पस्ते केलेलं दिसतंय. =))

"कृष्णविवराची माहिती ओरिजिनल आहे का? "
पण असा प्रश्न का पडावा बरे?

कुठलाही लेख परत कॉपी करावा लागू नये म्हणूनच तर एवढ्या लिंक्स टाकल्यात! तरी शंका कसली घेत आहात?

पैसा's picture

30 Jan 2014 - 12:52 pm | पैसा

लिंक्स सुद्धा आम्हाला गुगलच्या मदतीने शोधता येतात. तिथल्या लेखांवर तुमची काही मौलिक टिप्पणी किंवा इंग्लिश लेख असेल तर त्याचे भाषांतर असे काही अपेक्षित आहे.

आयुर्हित's picture

30 Jan 2014 - 1:11 pm | आयुर्हित

सूचना मान्य.
धन्यवाद.

यसवायजी's picture

27 Jan 2014 - 11:34 pm | यसवायजी

:))

आनन्दिता's picture

27 Jan 2014 - 8:36 pm | आनन्दिता

इन्सुलिन काका... जरा विस्तृत माहीती द्या की नुसत्या लिंका कसल्या देता?.

आयुर्हित's picture

27 Jan 2014 - 8:50 pm | आयुर्हित

इन्सुलिन काका???? कोण आहेत हे?

कृष्ण विवर चे फोटो बघितले काय?

(माझ्या मते लिंक्समध्ये खरोखर विस्तृत माहीती आहेच, आपल्याला कोणती माहिती हवी आहे, जी लिंक्स मध्ये मिळाली नाही?)

धन्यवाद.

सप्तर्षीं उपयोग रात्रीच्या वेळेला ध्रुव तारा शोधण्यासाठी होतो व वेळही कळते.

सप्तर्षीचा उपयोग करुन वेळ कशी कळते? यावर कोणी प्रकाश टाकेल का?

सप्तर्षींवरुन ध्रुव तारा (पर्यायाने दिशा) कळते हे माहिती आहे, पण वेळ (म्हणजे किती वाजले) हे कसे समजते?

आयुर्हित भौ,
जरा समजवाल का?

नेमक्या वेळेचे माहिती नाही मात्र बराच सराव असेल तर त्याच्या त्या त्या महिन्यातील उगवण्याच्या वेळेवरून ढोबळ वेळेचा अंदाज करता येऊ शकावा.

जेव्हा सप्तर्षी आकाशात नसतात तेव्हा इंग्रजी एम आकाराची शर्मिष्ठा आकाशात असते. तिच्यावरूनही ध्रुव ओळखता येतो. सूर्यास्त होताना आकाशात काय आहे (शर्मिष्ठा की सप्तर्षी?) व कुठे आहे वगैरे वरून काळ (कोणता महिना) अंदाज करता यावा
महिना माहिती असेल तर या दोघांपैकी जे काही आकाशात दिसते आहे त्याच्या स्थानावरून (त्यातील किती व कोणते तारे दिसताहेत वगैरेवरून) वेळेचे अंदाज सरावाने करता येईल. मात्र या दोन तारकासमुहावरून तरी वेळ शोधायचा तुम्हाला अपेक्षित असा ठोस फॉर्म्युला अस्तित्त्वत नसावा.

एक गंमतः वशिष्ठ आणि अरूंधती हे डोळ्यांना दिसते तितके साधे प्रकरण नाहिये. लग्नाच्या वेळी जोडप्याचे प्रतीक म्हणून ज्या तार्‍याकडे दाखवले जाते त्यापैकी वशिष्ठ हा जुळा तारा आहे. म्हणजे प्रत्यक्षात तो एक तारा नसून ती चार तार्‍यांची एकमेकांभोवती फिरणारी सिस्टिम आहे. थोडक्यात अरूंधती सोबत चार वशिष्ठ आहेत ;)

आता लग्नाळु जोडप्यासमोर असा आदर्श ठेवल्यानंतरही सचोटीने संसार करावा हे कुठल्या तोंडाने बोलतात ते वशिष्ठ-अरूंधतीच जाणे

प्रसाद गोडबोले's picture

28 Jan 2014 - 2:55 pm | प्रसाद गोडबोले

हे फोटो पाहिल्यावर ह्या विश्वात आपण किती क्षुद्र आहोत, ह्याची कल्पना येते

बाकी सगळं ठीक पण ह्या वरील विधाना मागील तर्क काही लक्षात येत नाही ... उगाच काहीतरी मोठ्ठी गोष्ट दिसली म्हणुन आपण क्षुद्र कसे ठरतो ? उगाचच काहीही ...

असो .

तो वर हे पहा .... काहीतरी रीलेट झाले तर कळवा

किं ज्योतिस्तवभानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं |
स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे |
चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने|
किं तत्राहमतो भवान्परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो ||

आयुर्हित's picture

30 Jan 2014 - 1:19 am | आयुर्हित

अहं ब्रम्हास्मि|

अनिरुद्ध प's picture

30 Jan 2014 - 5:15 pm | अनिरुद्ध प

साहेब अवकाश या विषयाची विस्त्रुत मराठी माहीती खाली मिळेल . . .
http://www.avakashvedh.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jan 2014 - 1:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तिथे माहिती आहे हे मान्य, पण विस्तृत?

अनिरुद्ध प's picture

31 Jan 2014 - 1:22 pm | अनिरुद्ध प

नजरिया दुसरे काय?कारण मला तरी आयुर्हित यानी दिलेल्या लिन्क्स पेक्षा ईथली माहिती जास्त विस्त्रुत वाटली ती सुद्धा मराठी भाषेतली.

भारी श्लोक आहे बे. कुठला आहे म्हणे?

प्रसाद गोडबोले's picture

9 Feb 2014 - 12:45 am | प्रसाद गोडबोले

श्रीमदाद्यशंकराचार्य कृत एकश्लोकि

http://sanskritdocuments.org/all_pdf/ekashloki.pdf

बॅटमॅन's picture

9 Feb 2014 - 1:48 am | बॅटमॅन

ओह अच्छा, धन्यवाद!