गुलछडी-
या गेल्या संपूर्ण सिझन मधे आमची सारी भिस्त या बयेवरच होती. चित्रविचित्र हवामानामुळे लिलि'बाय नी मार्केटात नीटसा पायच कधी ठेवला नाही.आणी ठेवला तेंव्हापण तो हाय(खाण्या इतक्या) रेटनीच! त्यामुळे गेला श्रावण ते नवरात्र हा सिझन मला फुलांच्या रांगोळ्यांमधे मुख्य आकार-रचनेसाठी गुलछडी'लाच हताशी घ्यायला लागली. या फरकानी होतं ते इतकच की,गुलछडीची फुलं लिली सारखी अदल्या दिवशी/रात्री वगैरे कट करता येत नाहीत. सगळा जागेवर "खेळ" आणी त्यामुळे काटा ढिला व्हायची वेळ! असो... तरिही या गुलछडीमुळे फुलांच्या रांगोळ्यांना सुबकपणा आणी बहार येते...अता जास्त बोलतंही नाही.तुंम्ही फोटो'त बघा...आणी सांगा आमास्नी,गुलछडीबायनी रांगोळी सजली का नाय ते...!? :)
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२२)
२३)
२४)
२५)
२६)
२७)
२८)
२९)
३०)
३१)
३२)
३३)
३४)
=============================================================================
सर्व फोटो-कॅमेरा- मायक्रोमॅक्स ए-८८ फोन-कॅमेरा.(पिकासा/गुगल-प्लस संस्कारीत.)
प्रतिक्रिया
16 Nov 2013 - 4:06 pm | अनन्न्या
उगाच नाही मी मिपा रांगोळी प्रदर्शनात तुम्हाला पहिला नंबर दिला, आधीच!!!
16 Nov 2013 - 4:14 pm | यसवायजी
मस्तच..
मला हरीभरी २६ नं जास्त आवडली.
16 Nov 2013 - 4:22 pm | रुमानी
सगळयाच रांगोल्या छान आल्यत..! :)
16 Nov 2013 - 4:41 pm | प्रचेतस
एकापेक्षा एक सुरेख रांगोळ्या.
आणि मॉनिटर रिपेर झाल्याबद्दल अभिनंदन :)
16 Nov 2013 - 4:53 pm | शिद
अगदी मन प्रसन्न करण्यार्या आहेत सगळ्या रांगोळ्या... मस्तचं!!!
16 Nov 2013 - 5:02 pm | स्पंदना
अंगात कला आहे तुमच्या आत्मुस. (ए! कोण रे नाना म्हणालं ते?)
एक प्रश्न आहे. इतक्या रांगोळीतून तुम्ही मग त्या पुजास्थानी कसे पोहोचता? म्हणजे जे काही षोडशोपचार करायचे ते कसे पार पाडता? त्यावेळी रांगोळी खराब होत नाही का?
16 Nov 2013 - 5:05 pm | त्रिवेणी
फोटो बघताना मलाही हाच प्रश्न पडला होता.
पण वाटले की पुजा झाल्यावर परत नव्याने काढली असेल.
16 Nov 2013 - 5:34 pm | अत्रुप्त आत्मा
@ इतक्या रांगोळीतून तुम्ही मग त्या पुजास्थानी कसे पोहोचता? म्हणजे जे काही षोडशोपचार करायचे ते कसे पार पाडता? त्यावेळी रांगोळी खराब होत नाही का?>>> ते सर्व येणेप्रमाणे घडते...
आधी गेल्यावर पुजेची मांडणी..नंतर पुजा सांगता सांगता एका बाजुला फुलांचं(र्हायलेलं किंवा गुलछडी सारखं)आयत्या वेळचं "कटिंग"... नंतर सत्यनारायण असेल तर(तोंडपाठ) कथा सांगता सांगता...पुजेसमोर रांगोळी..५अध्याय/आरत्या/मंत्रपुष्प संपेपर्यंत रांगोळी काढून होते. सगळा मिळून दिड ते दोन तास जातात. याशिवाय जेंव्हा वास्तुशांति सारखे मोठे कार्यक्रम असतात,तेंव्हा बाकिच्या सहाय्यक पुरोहितांवर मधल्या कामांचा भर दिलेला असतो,आणी मी रांगोळी'त गायबतो. :)
16 Nov 2013 - 5:38 pm | स्पंदना
__/\__ !!
17 Nov 2013 - 8:58 pm | मृगनयनी
अतृप्त आत्मा'जी... हॅट्स ऑफ...... इतक्या सुन्दर सुन्दर कलाकृतींसाठी!!!!!....
३,२६, ३२ या नम्बरच्या रान्गोळ्या सर्वांत जास्त आवडल्या....... ३ नम्बरच्या रान्गोळीचे कलर कॉम्बिनेशन- अ प्र ति म !!!!!!!!!!!!!!! .. सुपर्ब!!!!!!!! :)
16 Nov 2013 - 5:03 pm | त्रिवेणी
खुपच सुंदर._/\_
16 Nov 2013 - 5:03 pm | अधिराज
छान, एकापेक्षा एक!
16 Nov 2013 - 10:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
कलाकार आत्मा !
अतिसुंदर ! कामाचे नियोजन पण भारी !!
16 Nov 2013 - 11:05 pm | जेनी...
११) , २०), २६) अप्रतिम
बाकिच्या सुंदर .
गुर्जि आम्हाला तुमचा खरच अभिमान वाटतो .
16 Nov 2013 - 11:35 pm | सानिकास्वप्निल
सुरेख, सुंदर, झक्कस, भारी, +१११११११११११, जबरी, अप्रतिम....
__/\____/\____/\____/\____/\__
17 Nov 2013 - 4:36 am | प्यारे१
अनेक फुले फुलावी, 'बुवा'हस्ते पावन व्हावी
काही सार्थकता घडावी, ह्या नश्वर फुलांची!
( स्वा. सावरकरांची क्षमा मागून)
बहोत खूब दिवेकर बुवा बहोत खूब!
17 Nov 2013 - 7:21 am | अमेय६३७७
एकसे एक आहेत सर्व, मस्तच
17 Nov 2013 - 2:12 pm | चाणक्य
एकसो एक रांगोळ्या. प्रत्यक्ष काय भारी दिसत असतील.
17 Nov 2013 - 11:52 pm | पाषाणभेद
म्या काय म्हंतो बुवा, कसं काय जमतं बुवा तुम्हाला हे आस्लं? सकाळी सकाळी लावित्या का काय? हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ
18 Nov 2013 - 4:02 pm | अत्रुप्त आत्मा
@ सकाळी सकाळी लावित्या का काय? हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ>>> :D अहो,(रांगोळ्या काढण्याच्या)-मोहाची दारू हाय ती,एकदा चढली की कायपन करून घेतीया बगा....! =))
18 Nov 2013 - 6:26 am | जुइ
खुपच छान रांगोळ्या काढल्या आहेत
18 Nov 2013 - 8:40 am | किसन शिंदे
जबराट रांगोळ्या आहेत हो बुवा!! सगळ्याच भारी दिसतात, पण त्यातल्या त्यात ३ आणि ३२ नंबरची लयंच खास!! :)
आणि हो फुलांची नाय काय..फुलांच्या! :P
18 Nov 2013 - 3:58 pm | अत्रुप्त आत्मा
@आणि हो फुलांची नाय काय..फुलांच्या! Blum 3>>> :D
घाई घाईत चूक घडते,किसन'देवांच्या नजरेस-पडते
संपादकीय अधिकारात,दुरुस्त करायला काय बिघडते? :p
18 Nov 2013 - 8:47 am | जयंत कुलकर्णी
फुले मुळात सुंदर, त्यांचा रंग आल्हादायक. सुंदर वस्तूंची सुंदर मांडणी केली की काय होते याचे हे उदाहरण !
18 Nov 2013 - 10:01 am | इन्दुसुता
छानच... बघून मन प्रसन झाले.
18 Nov 2013 - 11:23 am | स्पा
अफाट
__/\__
18 Nov 2013 - 12:17 pm | विटेकर
फारच सुंदर !
18 Nov 2013 - 1:07 pm | दिपक.कुवेत
तुमच्या कलेला सलाम!
18 Nov 2013 - 4:28 pm | मी-सौरभ
नेहमी प्रमाणेच आवडेश
18 Nov 2013 - 4:31 pm | यशोधरा
सुरेख रांगोळ्या!
18 Nov 2013 - 4:32 pm | जेपी
आवडल्या
18 Nov 2013 - 5:06 pm | थॉर माणूस
जबरदस्त कला आहे.
सगळ्याच रांगोळ्या सुंदर आहेत. २७ आणि ३४ च्या डीजाईन्स तर खासच.
19 Nov 2013 - 9:50 am | पियुशा
" ये हाथ हमको दे दो आत्मुस काका " ;)
लै भारी , १ लंबर , ग्रेट , तुम्हारी कला देख के दील गार्डन - गार्डन हो गया :)
19 Nov 2013 - 4:31 pm | अत्रुप्त आत्मा
@ ये हाथ हमको दे दो आत्मुस काका >>> का? का? का? का?
4 Dec 2013 - 9:29 am | स्मिता चौगुले
+१११११
" ये हाथ हमको दे दो आत्मुस काका "
19 Nov 2013 - 2:33 pm | लव उ
एकदम भारी
19 Nov 2013 - 2:50 pm | राजेंद्र मेहेंदळे
याचे क्लासेस काढा बुवा __/\__
19 Nov 2013 - 4:16 pm | चिमी
सर्वच रांगोळ्या खुपच छान आहेत :)
20 Nov 2013 - 9:54 pm | सुधीर
__/\__
20 Nov 2013 - 10:06 pm | पैसा
मस्तच रांगोळ्या!
21 Nov 2013 - 10:57 am | मृत्युन्जय
कला आहे हो गुर्जी तुमच्या हातात. छानच आहेत रांगोळ्या.
2 Dec 2013 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा
सर्वांना धन्यवाद! आणी आभार! :)
2 Dec 2013 - 6:46 pm | युगन्धरा@मिसलपाव
तुमच्या सगळ्या रांगोळ्या पाहिल्या आहेत मी खुप आवडल्या मला.
या मार्गशीष गुरुवारी मी पण तश्याच काढणार आहे.
2 Dec 2013 - 7:10 pm | मोहनराव
मस्तच!!
4 Dec 2013 - 3:30 pm | kanchanbari
अप्रतिम
5 Dec 2013 - 5:29 am | दीपा माने
फुलांच्या रांगोळ्या आणि अत्रुप्त आत्मा एक छानच समीकरण बनले आहे.
ह्याची जाणीव खास मला व्यनिवरून केली ह्याचा नवलमिश्रित आनंद वाटला.
5 Dec 2013 - 11:18 am | अत्रुप्त आत्मा
@ह्याची जाणीव खास मला व्यनिवरून केली ह्याचा नवलमिश्रित आनंद वाटला>>> :) थांकू थांकू :)
त्याच काय आहे ना,की मला रांगोळीच्या धाग्यावर नेहमी हमखास येणारी लोकं भेटली नाहीत की घरच्या कार्यात काही नातेवाईक आले नाहीत,कीमन कसं खट्टू होतं..तसं वाट्टं! :(
म्हणून खरडीत आगत्याचं आमंत्रण पाठवलं,इतकच. :)
5 Dec 2013 - 8:20 am | मुक्त विहारि
मस्तच..
5 Dec 2013 - 9:39 am | शैलेन्द्र
मस्त जमल्यात सगळ्या.. दोन दिवस घरात मस्त वातावरण आणि सुवास दरवळत असेल..
5 Dec 2013 - 1:35 pm | हरिप्रिया_
मस्तच!!
8 Dec 2013 - 2:39 pm | भाग्यश्री कुलकर्णी
खुप छान. मन प्रसन्न झाले.
17 Nov 2014 - 7:44 pm | प्रसाद गोडबोले
अप्रतिम !!
प्रत्येक रांगोळी एक से बढकर एक आहे :)
17 Nov 2014 - 8:39 pm | भिंगरी
हे अ आ कशा कशात निपुण आहेत?
लेखन भारी,प्रतिसाद भारी,स्मायल्या भारीच भारी.
आणि...........
रांगोळ्या तर लईईईईईईईईईईई भारी.