लाडका
तो सर्वांचाच लाडका होता.. तीन भावांत शेंडेफळ म्हणून आईचा लाडका.. आपले नाव हाच काढणार म्हणून बापाचा लाडका.. अभ्यासात हुशार म्हणून शिक्षकांचा लाडका.. आणि मित्रांच्या ग्रूपची, बोले तर जान होता.. शांत स्वभाव आणि लाघवी बोलणे, कामानिमित्त जिथे जाईल तिथे आपली छाप पाडणारच.. ऑफिसमधल्या बॉसचाही लाडका न झाल्यास नवलच..!!
एक दिवस पुढे आलेल्या पोटावरून हात फिरवत बायको म्हणाली, इथेही आईपेक्षा बाबाच जास्त लाडके होणार वाटते.. तो फक्त हसला, तशी पुढे म्हणाली, "आता माझ्या बाबांचाही लाडका जावई होणार आहेस, नातवंड देण्यात पहिला नंबर लावला म्हणून दिवाळीला तुला बाईक घेऊन देणार आहेत.."
बस्स...! त्याच बाईकने घात केला..!! एकच अपघात... आणि तो देवाचाही लाडका झाला..!!!
- अंड्या उर्फ आनंद
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
.
.
.
.
.
.
.
.
.
.
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
लाडका
तो सर्वांचाच लाडका होता.. तीन भावांत शेंडेफळ म्हणून आईचा लाडका.. आपले नाव हाच काढणार म्हणून बापाचा लाडका.. वर्गातला सिन्सिअर मुलगा म्हणून शिक्षकांचा लाडका.. आणि मित्रांच्या ग्रूपची बोले तर जान होता.. शांत स्वभाव आणि लाघवी बोलणे, कामानिमित्त जिथे जाईल तिथे आपली छाप पाडणारच.. ऑफिसमध्येही सर्वांचा लाडका न झाल्यास नवलच.. तिथल्याच एका सहकारीणीच्या प्रेमात पडला.. तिला आपली सहचारीणी बनवायची स्वप्ने रंगवू लागला.. पण सर्वांना आवडणारा तो.. नेमका तिलाच नाही आवडला.. पण तो हिंमत नाही हरला, ना तो खचला.. अखेर त्याने तिला दाखवूनच दिले.. तूच ती एक दुर्दैवी होतीस, अन्यथा मी होतो सर्वांचाच लाडका.. जेव्हा गळफास घेऊन लटकला, तेव्हा मैताला त्याच्या जनसागर लोटला..!!
- अंड्या उर्फ आनंद
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
.
.
.
.
.
.
.
.
.
.
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
लाडकी
ती घरात सर्वांचीच लाडकी होती.. एकुलती एक मुलगी तर होतीच पण तिचा स्वभावही लाघवी होता.. तळहाताच्या फोडापेक्षाही तिला जास्त जपले जायचे.. तिने साधी आंछी करताच वैद्य हकिमांची धावपळ उडायची.. तिच्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द म्हणजे घरच्यांसाठी आदेशच जणू.. तिचे लाड करण्यात कोणी कधीही कसूर केली नव्हती..
एखाद्या राजकुमारीसारखीच ती वयात आली.. अन माया ममता वात्सल्य या व्यतिरीक्तही तिला आणखी कशाची तरी गरज भासू लागली.. पण आजवर तिचे सारे हट्ट पुरवणार्या बाबांनी एक हट्ट मात्र नाही पुरवला.. जेव्हा ती अगदीच हट्टाला पेटली तेव्हा तिला खेळवणार्या हातांनीच तिचा गळा घोटला.. अर्थात त्यांचाही नाईलाज होताच....... जमीनदाराची पोर असून वेशीबाहेरील पोराच्या प्रेमात पडली होती..!
- अंड्या उर्फ आनंद
प्रतिक्रिया
23 Sep 2013 - 9:52 pm | साळसकर
एक डाव अंड्याचा पण... थोडासा वेगळा प्रयोग.. :)
23 Sep 2013 - 10:59 pm | शिवोऽहम्
छान!
Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both..
असं काहीसं झालं तर माणुस ह्या रस्त्यानं गेला तर असं, आणि त्या रस्त्यानं गेला तर तसं होणार!
'रन लोला रन' मध्ये एकाच गोष्टीच्या अनेक फॅसेट्सवर कॅमेरा आहे. तसं सुरवातीच्या दोन गोष्टी वाचुन वाटलं.
24 Sep 2013 - 12:32 am | कवितानागेश
CHANGALA PRAYOG
24 Sep 2013 - 6:51 am | अत्रुप्त आत्मा
:)
24 Sep 2013 - 7:02 pm | पैसा
लाडक्यांच्या तीन तर्हा. शिवोऽहम यानी म्हटल्याप्रमाणे एकाच गोष्टीचा तीन बाजूनी विचार करून अशी तिहेरी कथा लिहिता येईल.
4 Oct 2013 - 3:31 pm | साळसकर
धन्यवाद सर्व च प्रतिसादांचे.. मिसळपाव पुन्हा चालू झाले बरे वाटले..
5 Oct 2013 - 4:28 am | पाषाणभेद
मस्त आहे कथा अन प्रयोगही.
5 Oct 2013 - 11:32 am | मुक्त विहारि
आवडल्या..