आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का?
आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे.
अनेक सासवा माझी सून म्हणजे माझी मुलगीच असा चार लोकांसमोर दिखावा करण्यासाठी बोलतात. आणि प्रत्यक्षामध्ये आपल्या सुनेबरोबर स्पर्धा आणि राजकारण करतात. त्याना फक्त आपल्या सो कॉल्ड घराण्याला सून हवी असते, तिचे स्वताचे अस्तित्व आणि तिचे स्वताचे विचार नको असतात. तिची स्वताची ओळख पण तिने पुसावी असेच त्यांना वाटते. मला जे करायला मिळाले नाही, ते सुनेलाही मिळू नये अशी बर्याच जणींची इच्छा असते.
नवीन सुनेला "सुपर वुमन" चा आदर्श दिला जातो. तिने नोकरी करावी, घर सांभाळावे, पाहुणे नातेवाईक सांभाळावे, देवधर्म सांभाळावे, सगळ्यांची सेवा करावी, सगळ्याना साग्रसंगीत खाऊ पीऊ घालावे आणि सगळे करून सदा हसत आनंदी असावे अशी अपेक्षा असते. बर जर मुलगा कधी सुनेला फिरायला नेत असेल तर तो म्हणे सुनेला खूप लाडावून ठेवतो, आणि जावई मुलीला फिरायला नेत असेल सारखा, तर आमचे जावई खूप हौशी असे कौतुक. मुलगा सुनेला कधी मदत करत असेल कामात तर तो बायकोचा गुलाम, आणि जावयाने मुलीला मदत केली तर जावई खूप काळजी घेणारा. असले वातावरण असेल तर मुली कशा तयार होतील एकत्र कुटुंबात राहिला?
एकत्र कुटुंबात राहायचे असेल तर फक्त नवीन लग्न करून आलेल्या सुनेनेच तडजोड करून चालणार नाही. बाकीच्यांनीही केलीच पाहिजे. आणि वयाने अनुभवाने मोठे म्हणून पहिले पाऊल सासूने आणि सासर्याने उचलले पाहिजे.
खूपशे सासू सासरे आपल्या नव्या सुनेशी अहंकाराने वागतात, मग तिच्या मनात त्यांच्याविषयी आईवडीलांसारखे प्रेम कुठून निर्माण होणार? पण हेच लोक सुनेने शेवटपर्यंत मुलीसारखीच आपली सेवा करावी अशी इच्छा करतात.
माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नातला एक प्रसंग सांगते. गेल्यावर्षी त्याचे लग्न झाले, मुलगी गोव्याकडची होती व तिचे कुटुंब साधेच होते. माझ्या मावशीचे कुटुंब ही जरा जुन्या विचारांचे आहे. तर झाले काय , लग्नाच्या आदल्या दिवशी जेव्हा सगळे हॉल वर गेलो तर मुलीकडच्यांचा अजून पत्ताच नव्हता व पुजेसाठी उशीर होत होता. लोक चुळबुळ, कुजबुज करत होते. शेवटी दोनतीन तास उशीराने मुलीकडचे आले, त्यावेळी मुलीने स्वताच्या लग्नासाठी येताना साडीऐवजी गुढग्यापर्यंत केपरी आणि घट्ट टिशर्ट घातला होता. ते बघून मावशीचे घरचे व नातेवाईक चिडले. मला ही ते खटकले , कारण तसे तिने मुद्दाम केल्यासारखे वाटत होते. साडी नाही निदान अशा वेळी पूर्ण कपडे तर घालावे. तर नातेवाईक मावशीकडे तक्रार करू लागले. मावशीला रडायलाच येत होते हे बघून आणि ऐकून. लोकांची अपेक्षा होती की मावशीनी जाऊन मुलीला व तिच्या आईला फैलावर घ्यावे. पण मावशी समजूतदारपणे वागली व म्हणाली ,"मी तिला असे काही बोलणार नाही, कारण अजून आमची तेवढी ओळख नाही, जवळीक नाही. त्यामुळे तिचा गैरसमजच होईल आणि मुली सासू सासरे सुरवातीला काय बोलले ते चांगलेच लक्षात ठेवतात शेवटपर्यंत. त्यापेक्षा मी माझी नाराजी प्रसाद (मावशीचा मुलगा) जवळ सांगते, तो समजावेल तिला तिच्या कलाने".
खरोखरच मला मावाशीच्या वागण्याचे खूप कौतुक वाटले, तिच्या जागी दुसर्या एखादीला सुनेला सुनवायची व सासूपणा दाखवायची ही आयतीच संधी वाटली असती.
---------------------------------------------------------------------------------
लेखात काही चुका असतील तर माफ करावे अशी विनंती.
प्रतिक्रिया
9 Mar 2013 - 6:14 pm | श्री गावसेना प्रमुख
मला जे करायला मिळाले नाही, ते सुनेलाही मिळू नये अशी बर्याच जणींची इच्छा असते.
असे बर्याच वेळेला घडते,हे फक्त सासु सुनेच्या नात्यातच नाही,हे सगळ्या प्रकारच्या नात्यात घडु शकते
हि एक विकृत मनोवृत्तीच असावी
(बाकी एक खर की तुमच सुध्ह लेखन लय्य्च सुदरल,तुम्हाला माझ्याकडुन एक व्हाइट लिली)
10 Mar 2013 - 11:46 am | धन्या
"ममाज बॉय" च्या जोडीतील बॉयचं लग्न झालं की ममा बिथरुन जाते आणि मग काल परवा आलेल्या सुनेनं आपल्या बॉयला आपल्यापासून दूर नेऊ नये यासाठी ममा कुठल्याही थराला जाऊ शकते.
अशा वेळी बॉयला थोडीफार अक्कल असेल तर त्या सुनेचा निभाव लागतो. नाही तर मग गोष्टी घटस्फोटापर्यंत जातात.
9 Mar 2013 - 6:33 pm | नाना चेंगट
>>>एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?
ठरलं की कळवा तोवर तमाकू चघळतो.. योग्य ठिकाणीच पिंक मारतो.
9 Mar 2013 - 7:04 pm | बॅटमॅन
+११११११११११११११११११.
(पिंकिंगचंद्र) बॅटमॅन.
9 Mar 2013 - 6:47 pm | चित्रगुप्त
....ठरलं की कळवा तोवर तमाकू चघळतो.. योग्य ठिकाणीच पिंक मारतो.....
हेच म्हणतो. आम्ही पण थांबलो आहोत, काय ठरले ते वाचायला.
10 Mar 2013 - 12:09 am | शुचि
सेम हियर!!
10 Mar 2013 - 4:10 pm | कवितानागेश
कशाबद्दल गं बाई 'सेम हियर'?
तमाकू चघळण्याबद्दल?? :P
29 Mar 2013 - 2:59 pm | श्रिया
सेम हियर!! कशाबद्दल लेखातल्या प्रसंगाबद्दल कि विचारांसाठी?
10 Mar 2013 - 12:23 am | जेनी...
उदारण कायच्या काय दिलय राव ...
प्रत्येक मुलगी ... मग ती कितीहि फॅसनेबल असुदे स्वताहाच्या लग्नाची गोग्गो स्वप्न बघत असते ... ती हॉलवर जाताना
केप्री घालते ... हे जरा पचायला अवघड जातय .
अजुन एक तुमच्या मावशीच्या मुलाचं लगिन हल्लीच्या काळातलय .. मग आधी तो प्रसाद भेटलाच असेल कि मुलीला ..
त्याला वागण्याबोलण्यातनं मुलीचा स्वभाव , राहाणीमान कळलच असेल कि ...
मग त्रागा कशाला ???
असो .. बाकि तुम्हाला वाटत असेल कि असले टॉपिक काढुन मिपाकराना गंडवुन शतक गाठाल तर
जेवढ मी मिपाला ओळखते तेवढ्यावुन सांगते
इथे :
१) तमाकु चोळतोय
२) पोपकोर्ण घेतलय जोडीला लेमोनेड पण
३) सुद्धलेखन सुधारलय बाईंचं
४ ) तुमचं लगिन झालय कावो ?
५ ) मावशी भारी धीराची ... माझी आय असती तर मुस्काडात ठेवुन दीली असती :-/
६ ) केप्री न टैट टीशर्ट ?? प्रसादला आवडत असतिल ते कपडे ...
७ ) मावशीला सर्प्राइझ द्यायचं असेल ..
आमचे ब्रह्मे काका असते तर म्हणाले असते ... प्रसाद लग्नाला नै म्हणाला असता तर मी लुनाच घेवुन आलो असतो न डब्बल शीट पळुन गेलो असतो =))
=))
11 Mar 2013 - 8:31 am | स्मिता चौगुले
+१११
10 Mar 2013 - 10:56 am | चित्रगुप्त
................."तिने नोकरी करावी, घर सांभाळावे, पाहुणे नातेवाईक सांभाळावे, देवधर्म सांभाळावे, सगळ्यांची सेवा करावी, सगळ्याना साग्रसंगीत खाऊ पीऊ घालावे आणि सगळे करून सदा हसत आनंदी असावे अशी अपेक्षा असते......"
हाय रे देवा, काय हे आर्य स्त्रीचे आयुष्य... या बेड्या कधी तुटणार ? हे सर्व वाचून आमचा कंठ अगदी दाटदाटून आलेला आहे....
.... सासू घरात झाडू-पोछा करते आहे, सासरेबुवा भांडी घासत आहेत (अर्थात त्या दोघांना सूनबाईने घरात येऊ दिले असेल तर) नवरोबा ऑफिसातून घरी आल्यावर घामाघूम होत बल्लवाचार्य बनले आहेत, आणि सूनबाई पिझा मागवून खाता खाता फेसबुक वर लाईकत आहेत, वा माहेरची मंडळी आणि मित्र-मैत्रिणीशी मोबाइलवर बोलत आहेत.... असे आयुष्य भारतवर्षातील घरोघरी, प्रत्येक भगिनीच्या वाट्याला जेंव्हा येइल, तेंव्हाच खरी पहाट उगवली, असे म्हणता येईल. तोवर नाचेंनी म्हटल्याप्रमाणे तंबाखू चोळत बसणे प्राप्त आहे...
10 Mar 2013 - 11:26 am | डॉ सुहास म्हात्रे
या लेखाने आपण केवळ स्वतःचे मराठी सुधारले आहे हे दाखवून दिले असे नाही तर अगदी पूजाताईंनाही स्वच्छ मराठी लिहायला (नकळत ?) भाग पाडलेत... येवढा परिमाणकारक हा लेख आहे...
इतके काही, इतक्या कमी वेळात फारच कमी जणांना, फारच कमी वेळ जमते. म्हणून अभिनंदन !
असो... प्रतिक्रिया वाचायला आम्हीही पोपकोर्ण घेवून पुढची सीट पकडून बसलो आहोत ;)
10 Mar 2013 - 6:52 pm | जेनी...
:-/
10 Mar 2013 - 10:50 pm | बॅटमॅन
+११११११११११.
त्यांचे स्वच्छ मराठी वाचून अंमळ विचित्रच वाट्टेय =))
11 Mar 2013 - 8:32 am | स्मिता चौगुले
+१११
29 Mar 2013 - 5:15 pm | टवाळ कार्टा
=)) =)) =))
10 Mar 2013 - 3:53 pm | परिकथेतील राजकुमार
मला आधी, 'काही कुटूंब एकत्र नांदतात; ह्याला कोण जबाबदार आहे?' अशा आशयाचा धागा वाटला होता.
असो..
10 Mar 2013 - 4:22 pm | अविनाशकुलकर्णी
स्त्री च स्त्रीचा दुस्वास करते..तिचा खरा मित्र पुरुषच असतो...
10 Mar 2013 - 4:30 pm | श्री गावसेना प्रमुख
10 Mar 2013 - 6:36 pm | आदूबाळ
त्यांच्या प्रतिसादाच्या शेवटी "का?" असं टाकलं की नवीन काकू तयार होईल...:))
10 Mar 2013 - 4:50 pm | मनीषा
तुमच्या मावशीच्या संयमाचे कौतुक वाटते.
आता त्यांचे एकत्र कुटुंब आहे कि विभक्त?
-- पण 'दुरून डोंगर साजरे' असे नाही का वाटत तुम्हाला?
10 Mar 2013 - 5:38 pm | अधिराज
एकत्र कुटुंबाला धक्का न लागू देण्याची जबाबदारी हि नवीन सदस्याची माफ करा नवीन सुनेचीच असली पाहिजे. तडजोड नवीन सुनेनेच केली पाहिजे.
ती जेव्हा ह्या प्रयत्नात खरी ठरेल तेव्हा बाकिच्यांकडून प्रेमापोटी आपोआप तडजोड केली जाईल.
चला आता पळतो.
10 Mar 2013 - 6:23 pm | वेताळ
तुमच्या फेमिलीत किती लोक आहेत?त्यावरुन देखिल तुम्ही अभ्यासु शकता तुमच्या प्रश्नाचे उत्तर.ते मिळालेकि आम्हाला पण सांगा.
10 Mar 2013 - 7:21 pm | पैसा
निबंध आणि शुद्धलेखन ठीकठाक. निबंधाची सुरुवात आणि शेवट यात विरोधाभास आहे. मुलगी गोव्याची होती यातून काय सांगायचे आहे? लग्न दूर कुठेतरी असेल तर प्रवासातून येणारी मुलगी प्रवासाच्या आरामशीर कपड्यांवरच येणार ना?
10 Mar 2013 - 7:21 pm | कवितानागेश
या अश्या कपड्यांचा बदला म्हणून नवर्या मुलानी पुढचे सहा महिने मुलीच्या माहेरी तिच्याबरोबर जाताना आवर्जून धोतर नेसावे! बरी अद्दल घडेल. आणि त्यानंतर 'एकत्र' कुटुंब सुखानी नांदेल! ;)
- स्वयंघोषित सुपर वूमन माउ ;)
11 Mar 2013 - 8:34 am | स्मिता चौगुले
:)
10 Mar 2013 - 8:28 pm | चित्रगुप्त
.....मुलानी पुढचे सहा महिने मुलीच्या माहेरी तिच्याबरोबर जाताना आवर्जून धोतर नेसावे!...
...सहमत.
थोडासा बदल: "फक्त धोतर"
10 Mar 2013 - 10:57 pm | अन्या दातार
"Everybody's responsibility is nobody's responsibility" असे काहीसे कुणीतरी म्हणलेय ना? ते इथे लागू होत असावे!
11 Mar 2013 - 9:59 am | लिलि काळे
श्री गा.प्रमुख,धन्या,अन्या,नाना,बॅटमॅन,स्मिताताई,ज्योतिताई,शुचिताई,चित्रगुप्त,मनिषाताई,पूजाताई,परिकथेतील राजकुमार्,लीमाउजेट,आदूबाळ, वेताळ, अधिराज, इस्पीकचा एक्का, अविनाश तुम्हा सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
29 Mar 2013 - 3:09 pm | सूड
भारीच सुधारलंय !!
29 Mar 2013 - 4:09 pm | चावटमेला
बादवे, प्रसाद काय म्हणाला त्या मुलीला नंतर? नाही प्रसंग तुम्ही सांगितलाय म्हणून विचारलं, उगाच दुसर्याच्या भानगडीत मी कशाला नाक खुपसु? ;)
30 Mar 2013 - 12:30 pm | ज्ञानोबाचे पैजार
प्रस्तुत लेख लिहीताना लेखिक अत्यंत गोंधळलेली असावी. किंवा माझ्या सारख्या सामान्य वाचकाची आकलन शक्ती कमी पडत असावी. नक्की अक्षेप कशावर घेतलाय हे समजणे जरा कठीण जात आहे.
उदा. एकीकडे लेखिका म्हणते आहे की सासरच्या मंडळींनी समजुतदार पणा दाखवला पाहीजे.
या नंतर मग मावशीच्या मुलाच्या लग्नातले उदाहरण लेखिका देते. या प्रसंगात मावशीने दाखवलेल्या समजुतदार पणा दाखवल्याचेच दिसते. म्हणजे मावशी वागल्या ते योग्य की अयोग्य?
प्रवासात सोयीचे म्हणुन मुलीने ते कपडे घातले होते की लग्नातल्या विधींनापण तेच कपडे घालुन बसली होती याचा खुलासा नाही. त्या मुळे अक्षेप कशावर आहे ते समजत नाही.
पुर्ण कपडे म्हणजे काय? याचेही पुरेसे स्पष्टीकरण येथे मिळत नाही.
या विधाना वरुन साडी म्हणजे पुर्ण कपड्यांपेक्षा जास्त काहीतरी असते असे वाटते. तरी सुध्दा, यावरुन, पुर्ण कपडे म्हणजे काय ते पुरेसे स्पष्ट होत नाही.
हे लिहीणारी लेखिका नवर्यामुलीने घातलेल्या कपड्यांबद्दल अक्षेप घेताना दिसते. म्हणजे येणारी मुलगी कशीही वागली तरी सासरच्यांनी मुकाटपणे सगळे सहन करत रहावे असे काही लेखिकेला सुचवायचे आहे का?
अशा अनेक शंका आहेत. पण त्या वरील शंकांची उत्तरे मिळाल्या नंतर विचारण्यात येतील.
लेखिका बाईंना नम्र विनंती की आम्हाला अजाण बालक समजुन त्याचे अज्ञान दुर करण्याच्या कळकळीने वरील शंकांचा खुलासा करावा. मोठ्या दिलदार पणे जर आपण खुलासा करुन आमच्या सामान्यज्ञानात भर पाडली तर आम्ही आपले आजन्म ॠणी राहू.
8 Apr 2013 - 4:56 pm | स्मिता चौगुले
+१
:)
8 Apr 2013 - 6:48 pm | जेनी...
पैबु काका असतिल नसतिल तेवढे ++++++++ स्स्स्स तुमच्या पोष्टाला ...
10 Apr 2013 - 10:51 pm | चुचु
सा सु = दु रुन डॉन्ग र सा ज रे
13 Apr 2013 - 4:43 pm | प्रियाकूल
सासू= सारख्या सुचना
13 Apr 2013 - 5:56 pm | आदूबाळ
सून = सूचना नकोत!