शाळेतील संम्मेलन..

Primary tabs

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
25 Jun 2012 - 5:31 am

मूळ स्त्रोत (http://www.misalpav.com/node/22060)

वरील लेख वांचत असतांना, युट्युब मध्ये गाणी बाल-गीते शोधायला लागलो.त्यात काही गाणी लहान मूलांच्या स्नेह-संम्मेलनात वापरलेली पाहिली.त्या गाण्यांच्या तालावर नाचत असतांना, मुले बर्‍याच चूका करत होती आणि आपण चूका करत आहोत किंवा आपला जोडीदार चूक करत आहे, हे काही त्यांच्या लक्षात येत न्हवते.

मला पण माझा शाळेतील स्नेह-संम्मेलनातील , मी नाटकात भाग घेतला होता तेंव्हाचा किस्सा आठवला.तसा मी माझ्या शाळेत पहिल्या १० क्र.त येत असल्याने (७०-८०. मुलांत. म्हणजे वासरांत लंगडी गाय शहाणी. अगदी ह्या म्हणी प्रमाणेच. पुढे मोठ्या शाळेत गेल्यावर आमचे मार्कांचे गूण घसरले पण अंगचे गूण उधळायला सुरुवात झाली ) मी सर्व गूण संपन्न आहे असा शिक्षकांचा समज झाला.

४थीत असतांना, बाईंनी स्नेह संम्मेलनात आम्हा मुलांचे नाटक बसवायचे ठरवले.माझे पाठांतर पक्के असल्याने मला नाटकात घेतले.सुदैवाने माझे अख्खे नाटक ३/४ दिवसांतच पाठ झाले.नाटकाची थोडक्यात कथा सांगतो.

एक राजपूत्र असतो.त्याला भाज्या आणि फळे आवडत नसतात्.राजा-आणि राणी त्याला खूप समजवतात , पण तो काही ऐकतच नसतो. प्रधान (म्हणजे, मी केलेला रोल) राजपूत्राला फूस लावत असतो.शेवटी एकदा दरबारात परी येते आणि प्रत्येक भाजीला आणि फळांना बोलावते.ते प्रत्येक जण आपले आपले गूणधर्म सांगतात.शेवटी राजपूत्र भाज्या आणि फळे खायला लागतो.

ह्यात मला आणि परीला संवाद भरपूर होते.मी प्रत्येकाचे दोष दाखवणार, तर परी गूण्.माझा थोडा रोल झाला आणि मग परीचा रोल चालू झाला.समोर गर्दी बघून आमची "वर्गभगिनी" घाबरली.तिचे , मी आहे परी , मी आहे परी , काही संपेना. ती पुढे न बोलल्यामूळे मला पण संवाद बोलता येईना.मग मीच चालू केले.

प्रधान :तुम्हाला काही सांगायचे आहे का?
परी : हो
प्रधानः राजपूत्राने फळे खावीत, भाज्या खाव्यात असे तुम्हाला वाटते का?
परी : हो
प्रधान : मग आपण कोबी पासून सुरुवात करू या का?
परी : हो
प्रधान : मग बोलाव कोबीला..का मी बोलावू...
परी: हो...

मग ती कोबी आली, तिने गाणे वगैरे गात आपले गूण-वर्णन केले.ते चालू असतांना मी हळूच त्या परीला म्हणालो... लोकांकडे न बघता, राणी-कडे बघून संवाद म्हण....मग काय त्या परीने नंतर सगळे संवाद राणीकडे बघूनच म्हटले....पुढे मोठ्या शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांत भाग घेतला... पण लक्षात मात्र हाच एक प्रसंग राहिला...

कलानृत्यसंगीतसंस्कृतीनाट्यमौजमजाप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

25 Jun 2012 - 5:49 am | मराठमोळा

स्टेज म्हंटलं की मग लहान काय तर मोठ्यांचीही हालत खराब होऊ शकते. काहींना लहानपणापासून स्टेज डेअरींग उपजत असतं तर काहीं कधीच स्टेजवर जायला तयार होत नाहीत. बर्‍याचदा शाळेत्/कॉलेजात आणि संमेलनात देखील ऐनवेळी पाठ फिरवणारे लोक्स असतात.. त्या मानाने मुलीने स्टेजवर कमीत कमी उभे राहुन चांगलेच धैर्य दाखवले म्हणायचे.

अवांतरः काही तुनळी चित्रफितींची आठवण झाली. :)

मुक्त विहारि's picture

25 Jun 2012 - 6:20 am | मुक्त विहारि

संम्मेलने, समूहगान, सांघिक खेळ आणि वक्रुत्व स्पर्धा , निकोप मनाने केल्या तर नंतरच्या स्पर्धात्मक काळात चांगलाच फायदा होतो. ह्या लिंक (http://www.youtube.com/watch?v=E-aCSvL0-x) मधील मूलांचा एकमेकांशी अजिबात ताळमेळ नाही.पण प्रत्येक जण ते क्षण मस्त उपभोगत आहेत्.गाणे संपल्यावर पण , ते , कोण कुठे चूकले त्याची अनावश्यक चर्चा करत नाही आहेत.

आपण सगळे पण असेच वागलो. तर स्वर्ग आणि हिंदूस्थानात काहीच फरक राहणार नाही...

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 5:51 am | श्रीरंग_जोशी

मुवि - मजा आली बघा आपला अनुभव वाचून.
अन अश्या बऱ्याच मजेदार आठवणीही जाग्या झाल्या...

यासाठी आपले मनापासून आभार...!

शुचि's picture

25 Jun 2012 - 6:08 am | शुचि

आईला अफाट हसते आहे. - अफाट!!!!
कथादेखील भारी आहे :) खरच लहानपण आठविले.

स्पंदना's picture

25 Jun 2012 - 8:28 am | स्पंदना

>>आईला अफाट हसते आहे. - अफाट!!>>>>

कुणाच्या ग?

तुला आयला ऽ ऽ म्हणायचा आहे का?

शुचि's picture

25 Jun 2012 - 7:26 pm | शुचि

अगं सहसा वापरत नसलेले शब्द वापरले की अशी फजिती होते :(

स्पंदना's picture

25 Jun 2012 - 8:29 am | स्पंदना

अंह मुवि?? बरेच हुषार होता की वो तुमी??
लेख आवडला .

मुक्त विहारि's picture

25 Jun 2012 - 9:11 am | मुक्त विहारि

हा, पण शाळेतील बर्‍याच उपक्रमात भाग घ्यायचो.शाळा मस्त एंजॉय केली.फक्त शिक्षणात कधी रस वाटलाच नाही.पाठांतरामूळे , शाळेत तगून गेलो.

संजय क्षीरसागर's picture

25 Jun 2012 - 11:36 am | संजय क्षीरसागर

हे तुझे पाळण्यातले गुण गल्फ मधल्या अपघातात उपयोगी पडले

मुक्त विहारि's picture

26 Jun 2012 - 12:04 am | मुक्त विहारि

कारण, मला संकंटांचा कधी बाउ वाटलाच नाही. संकटे येणारच. पण ती आली की आपल्याला अनुभव देवून जातात.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Jun 2012 - 11:40 am | विश्वनाथ मेहेंदळे

मस्त अनुभव. कॉलेजातले काही किस्से आठवले. आम्ही तेव्हा या प्रकाराला सावरकर होणे म्हणत असू.

मुक्त विहारि's picture

25 Jun 2012 - 5:22 pm | मुक्त विहारि

आम्हाला ही मजा वाटेल...

प्रास's picture

25 Jun 2012 - 7:40 pm | प्रास

तुमचे अनुभव इथे प्रतिसादातच लिहा म्हणावं. विमेंचे प्रतिसाद उच्च असतात किंबहुना विमेंचं लिखाण प्रतिसादातच खुलतं.

काय विमे, लिहिताय मग इथेच सावरकरांचे किस्से....? ;-)

किलमाऊस्की's picture

25 Jun 2012 - 10:30 pm | किलमाऊस्की

आवडलं. माझाही एक किस्सा. शाळेत वक्तृत्व स्पर्धेत वगैरे फार सहभाग नसायचा पण नाचकाम भरपूर केलय. एकदा आंतरशालेय नाचाच्या स्पर्धेत नाचता नाचता एक स्टेप विसरायला झाली आणि मग आमची गाडी गडबडली. आपण चुकलोय या भीतीमुळे पुढचा सगळा नाच डोळे बंद करून केला. ;-) साधारण ४००-५०० प्रेक्षकांसमोर... वास्तविक चूक कोणालाही समजली नसती. पण मी डोळे अचानक बंद केल्याने प्रेक्षकांमध्ये कुजबुज सुरू झाली. :-D पण आपण चुकणार ही भीती गेली त्यामुळे. चुका झाल्या तरच त्या निस्तरायचं कशा हे चुका केल्यावरच शिकता येतं.

अन खुप आवडले,
एकदम मस्त प्रसंगावधान अन तेही लहान वया॑तले .....
मस्त.

सोत्रि's picture

20 Jul 2012 - 9:08 am | सोत्रि

छाsssन!

-(नाटकी) सोकाजी