सांग सांग भोलानाथ...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
22 Apr 2012 - 4:36 pm

आज मार्केटयार्डातुन फुलं घेऊन परत येताना,डोस्क्यावरच्या उन्हानी आणी आधी मार्केटमधे याच उन्हाळ्यामुळे फुलांच्या अव्वाच्यास्सव्वा वाढलेल्या रेटनी चांगलाच तापलो होतो.साली आंम्ही कायमची गिर्‍हाइकं असुनही अतिमहाग किमतीनी अती पडिक माल उचलायची वेळ आली की हे असच होतं.बाहेर पार्किंगकडे येऊन आमच्या न्हेमीच्या हाटिलवर गेलो.तर आज तेही काही अ-परिहार्य कारणानी बंद...! म्हणुन दुसरी टपरी गाठली आणी तिथे चहा देणार्‍या पोर्‍यानी सक्काळीच घातलेल्या इस्त्रीच्या शर्टवर चहा सांडवला.मग त्याच्या मालकाच्या शिव्या उघड आणी माझ्या मनात देऊन झाल्या.आज आपला दिवस नाही.असं मनाशी पुटपुटत गाडी काढली आणी कुठेतरी निरा मारावी,म्हणुन घराकडे परतत असताना ''ती'' टपरी हुडकायला लागलो.लक्ष्मीनारायण टॉकिजपर्यंत एकही निरा केंद्र नाही हे माहित होतच पण आज दिवस आपला नाही हे जाणवलेलं असल्यानी पुढच्याही टपर्‍या बंद असल्या तर मनास ताप नको,म्हणुन वाटेत दिसलेल्या पाणपोइवर चांगलं तिन ग्लास गारगार पाणी प्यायलो.आणी पाणी पितापिता इतक छान का वाटतय याचा अंदाज येइ पर्यंत मोगर्‍याचा पाण्याला लागलेला सुगंध इतका छान लागला की मी त्यानी बराचसा थंड जाहलो.

त्या पाणपोइवर कुण्यातरी सज्जनानी प्रत्येक रांजणात मोगर्‍याची आठ/दहा फुलं टाकलिवती.मी मनात म्हणालो कोण असेल हा खरोखरचा भूतदयावादी,असेल तो असो.पण ही आयडिया बेस्ट आहे.अता डोक्यावर उन्ह तेवढच असलं तरी मन जरा शांत झालेलं असल्यानी मी कानात मोबॉइल रेडिओ लावला आणी निघालो.तिथेही कोणत्यातरी स्टेशनवर हीच उन्हाळ्याची चर्चा चालली होती. आणी गाण तरी कोणतं लागावं तर ,सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय..? आहाहाहाहा... त्यानंतर मी असा सुखावलो म्हणता,की वाटलं,या गाण्याच्या सोबतीनी हे इथलं रणरणतं उन्हच काय,मी सहारा वाळवंट देखिल सहज पार करू शकेन...इतका या गाण्यानी माझ्या मनावर अल्हाद दायक आनंदाचा शिडकावा केला

अता हे गाणं लहानपणीचच असलं तरी इतक्यावेळा ऐकुनही त्याची महती आज जशी पटली तशी यापूर्वी पटली नव्हती. एकतर ते गाणं त्याच्या बोबड्या आणी निर्मळ निरागस बोली इतक्याच निर्मळ निरागस छोट्या मुलीनी गायलय.त्यामुळे मला तर जुन्या अठवणींबरोबर का कोण जाणे वाक्यावाक्याला मनात सुखद हसूही येत होतं आणी गेलं ते सुखी बालपण म्हणुन डोळ्यांच्या कडाही ओलावत होत्या...त्यातल्या प्रत्येक ओळीला मनाच्या उचंबळणे,आनंदानी उड्या मारणे, अश्या बर्‍याच भावावस्था मी अनुभवत होतो,गाडी चालवता चालवताच स्वतःशी हसतही होतो.(कडेचं पब्लिक हा वेडा झालाय का..? अश्या नजरेनी पहात असेलही...आणी मी म्हणतो असलं पहात तर असू दे...ह्या असल्या वेडं होण्याचे फायदे असे असतील तर तेही आंम्हाला हवेच आहेत.)

मी घरी आल्या आल्या नेटावर येऊन आधी ते गाणं डाऊनलोड केलं आणी त्याच्या ओळीही http://www.geetmanjusha.com/marathi/lyrics/980.html गीतंमंजुषेवरुन मिळवल्या. कित्ती साधा सरळ आणी सुखद अर्थ आहे पहा ना...! आधी ते नंदिबैल वाल्याच्या हाका आणी गुबु..गुबु..गुबु ऐकतानाच काय मज्जा वाटते. आणी पुढे हे गाणं त्या शुंदल शुंदल ग्गो-गोड ल्हान मुलीच्या आवाजात चालु होतं.मला तर गाण सुरु झाल्यावर ते गुबुगुब पेशवेपार्कातल्या छोट्यांच्या रेल्वेगाडीच्या झुकुझुकु बरोबर मिक्स होऊन ऐकू यायला लागलं इतका मी मनानी आज मागे गेलो.

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून, सुटटी मिळेल काय ?

अता मला सांगा या वरच्या कल्पने इतकि लहानांच्याच काय,पण मोठ्यांच्या जिवनातही खरी मौज दुसरी कोणती आहे बरं..? आपल्यालाही कामामुळे वैतागलो असताना एखाद्या ओव्हरपॅक दिवशी अशीच सुट्टी मिळावी असं मनापासुन वाटत नाही का..?

भोलानाथ दुपारी आई *झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

ही पहिल्या कडव्यातली कल्पना म्हणजे तर बाल जिवनातली अगदी मुलंभूत कामना आहे.की मनासारखं सहज घडुन यावं..पण ते ही निर्विघ्नपणे...आणी बोनबोभाट. :-)
याच कडव्यात पहिल्या ओळीतला तो बोबडा * बोल ऐकुन मी हसलो आणी रडलोही...!

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवडयातनं रविवार, येतील का रे तीनदा

हे कडवं तर मला बालपणातल्या आणी माणसाच्या जिवनातल्या एका सर्वोच्च आनंदाचं प्रतिक वाटतं,आणी असं वाटण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यात नुसती भरपुर सुट्टी,,,म्हणजे ऐदी पणानी लोळण्यासाठी,असं ध्वनीत न होता, माणसाच्या जिवनातला ताण आणी व्याप सुसैह्य व्हावा असं ध्वनीत होतं म्हणुन.

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर

आता हा मात्र थोडासा जिवनातला पळवाद आहे,पण असलाच तर मुद्दाम लादल्या गेलेल्या आणी विरोध करता न येणार्‍या छळ-वादा मुळे आलेला पळवाद आहे...इथे माला कुठल्या तरी लेखात वाचलेलं वाक्य अठवतं,लेखक म्हणतो...सुट्टी सक्तिची आणी शिक्षण ऐच्छिक आसावं,असं माझं मत आहे. मला वाटतं या वाक्यात दोष काढायचेच म्हटले, तर भरपुर बेहिशोबीपणा,स्वैरवर्तनाला वाव असे दोष काढता येतील. पण दुसरी बाजु बघितली तर अशी जिवन पद्धती मिळाली तर आपल्या पैकी कित्येकांना ती अवडेल,हवे ते हवे तेवढे शिका,,,सालं त्या परिक्षा नकोत,डिग्र्या नकोत,नोकर्‍यांसाठीचे नसती क्वालिफिकेशन्स नकोत...हवं त्या विषयात प्राविण्य मिळवावं आणी त्यातलाच व्यवसाय निवडुन सरळ जगाच्या बाजारात दोन हात करायला उतरावं... नैय्या डुबी तो डुबी...नही तो ऊस पार....और डुब भी जाए,तो निकल कर वापिस जाओ ऊस पार...असा बराचसा आशावाद घेऊन तरी जगता येइल... :-)

मित्रांनो खरच सांगतो,मला माझ्या बालपणा विषयी जशी अत्रुप्ती आजही आहे,हे जाणवतय,तशी मी अत्ताच माझ्या मनोदेवतेकडे हे मागुन बसलोयही,की मला आनंदी करणार्‍या अश्या प्रत्येक बाबतीत मला माझ्या मनानी असच अत्रुप्त ठेवावं...कारण जगण्यातली गोडी कमी झाली तर ही अत्रुप्तीच मला वाचवणार आहे....
=====================================================================
हे गाण आज मला आनंदी करुन गेलं...तुंम्हालाही करेल कदाचित... बघा बर ऐकुन... :-)

संगीतसंस्कृतीवावरसमाजजीवनमानविचारअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

मस्त हो पराग सर.
फटक्यात आवडलेच!

आणखी लिहा.

संजय क्षीरसागर's picture

22 Apr 2012 - 5:34 pm | संजय क्षीरसागर

इतक्या साध्या विषयाची इतकी सुरेख मांडणी, जिओ!

सर्वसाक्षी's picture

22 Apr 2012 - 9:53 pm | सर्वसाक्षी

आत्मारामपंत,

आनंद देणार्‍या ह्या छोट्या गोष्टी आठवतात आणि सुखावतात. चांगला लेख

पैसा's picture

22 Apr 2012 - 9:56 pm | पैसा

गाण्याइतकंच छान लिहिलंत! मस्त!

मूकवाचक's picture

24 Apr 2012 - 11:07 am | मूकवाचक

+१

JAGOMOHANPYARE's picture

22 Apr 2012 - 10:32 pm | JAGOMOHANPYARE

अगदी छान

JAGOMOHANPYARE's picture

22 Apr 2012 - 10:35 pm | JAGOMOHANPYARE

मी इथलं ऐकलं.... http://www.youtube.com/watch?v=p8JFImzIcms डाउनलोडून घेतलं.

मस्त लिहिलंय पण टायमिंग थोडं चुकलंय बुवा, असो.

प्रचेतस's picture

23 Apr 2012 - 10:10 am | प्रचेतस

रणरणतं उन्ह, भर दुपारी हिंडल्यामुळे झालेली डोक्याची मंडई अशातच दिसलेली पाणपोई, पाणी ते पण मोगर्‍याचा सुगंध असलेले. एक सुंदर मुक्तक जन्माला घातलेत बुवा.

बाकी हल्लीच तुम्ही अत्रुप्तीच्या वाटेवरून त्रुप्तीच्या वाटेवर निघाल्याचे समजते.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Apr 2012 - 10:48 am | अत्रुप्त आत्मा

@त्रुप्तीच्या वाटेवर>>> दुष्ट...दुष्ट...काड्यालाऊ ;-) अग्यावेताळ :-p

प्रचेतस's picture

23 Apr 2012 - 9:59 pm | प्रचेतस

सांग सांग भोलानाथ, आत्मा मुक्त होईल काय
अतृप्तीच्या वाटेवरुन तृप्ती मिळेल काय?
भोलानाथ.. भोलानाथ....
बुगु बुगु...

अत्रुप्त आत्मा's picture

23 Apr 2012 - 10:22 pm | अत्रुप्त आत्मा

@अतृप्तीच्या वाटेवरुन तृप्ती मिळेल काय? >>> ...दुष्ट...दुष्ट...दुष्ट... ;-)

अ.आ.<< >> वल्ली

आत्म्यांनी इतका त्रागा करून घ्यायचा नसतो.
बरं नसतं तब्येतीला ते.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Apr 2012 - 10:46 am | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ह्ही ह्ही ह्ही :-D

धन्या's picture

23 Apr 2012 - 10:21 am | धन्या

रणरणत्या उन्हात "सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? " हे गाणं ऐकून इतकं सुंदर मुक्तक लिहिलं... वाह उस्ताद !!!

मस्त हो भटजीबुवा.
आज बाहेर छान अंधारुन आलय. बहुतेक पाउस पडेलच.
तुम्ही दिलेलं गाण काही ऐकता आलं नाही. पण माझ्याकडे जे आहे ते देतोय. त्यात तो गोग्गोड बोबडा आवाज आहे. :)

अमृत's picture

23 Apr 2012 - 4:07 pm | अमृत

आज पहाटेच इकडे वादळास़अट पाऊस पडला. ऑफीसची बस पकडायला छत्री घेऊन निघावे लागले. अजुनही खूप गारवा आहे हवेत.

(दाक्षिणात्य) अमृत

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ;)

भारिच .....

अत्रुप्त आत्मा's picture

23 Apr 2012 - 9:44 pm | अत्रुप्त आत्मा

सांग सांग भोलानाssथ,हिला शिक्षा होइल का?
दांबिश मुग्गी लब्बाड आमची सरळ होइल का..?

दांबिश मुग्गी चुकवत आहे,गणिताचा पेपर... ;-)
हातावरती छड्या बसुन,दुखेल का रे कोपर... :-D

जेनी...'s picture

24 Apr 2012 - 11:03 am | जेनी...

:-o

\(

:(

:P

:D

अत्रुप्त आत्मा's picture

24 Apr 2012 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा

वेगवेगळ्या स्मायल्या,जणू सगळे सावत्र भाऊ...
तूच सांग या प्रतिक्रीयेचा मी काय अर्थ लाऊ..? ;-)

अग अग दांबिश मुली,अशी नक्को ना गं चिडू
एकाच विडंबन हाय-स्कूल मधले आपण सारे ''भिडू'' :-)