पुणं कितिही बदललं,नवनविन रुप घेत गेलं तरी पुण्याच्या काही सांस्कृतिक खुणा,किंबहुना पाऊलखुणा आहेत. त्या काळानुरुप काहि तश्याच,काही बदललेल्या,तर काही अपरिहार्यपणे पुसल्या गेलेल्याही आहेत...अशीच एक जुनी आणी खास जुन्यासाठीच प्रसिद्ध असलेली एक काळाच्या ओघातही टिकलेली खुण म्हणजे आमचा लोकप्रीय जुना बाजार...
ऐतिहासिक शनिवारवाड्यापासुन पायी दहा मिनिटाच्या अंतरावर दर रविवारी आणी बुधवारी भरणारा हा बाजार म्हणजे एक प्रकारचा अघोषित सम्राटासारखा आहे... हे एक प्रकारचं गिर्हाईकी लोकाधारावर उभं असलेलं लोकं-राज्य आहे. माझ्या ऐकिव माहिती प्रमाणे हा बाजार जुना म्हणजे अगदी ब्रिटिशकालिन आमदानी पासुनचा आहे. त्याचं जुना हे नाव कालावाचक जेवढं आहे,त्यापेक्षा ते आत्मवाचक जास्त आहे. इथे आजही सगळ्या जुन्याच वस्तू मिळतात का हो..?,तर नाही, गरीब जनतेची सोय पाहाणारे कपड्यांचे/भांड्यांचे/चादरी/ब्लँकेटांचे/गृहोपयोगी वस्तुंचे ही स्टॉल्स इथे आहेत..पण ते काळाची गरज म्हणुन...!,जुन्या बाजाराचं खरं वैशिष्ठ्य म्हणजे अगदी शिवकालापासुन ते त्या आधी नंतरच्याही कालातली जुनी नाणी, भांडी,अडकित्ते,देवाची पुजेची उपकरणी,तलवारिंच्या मुठी(आणी तुंम्ही खात्रीचं गिर्हाइक वाटलात,तर पाती सुद्धा ;-) ) दुर्बिणी,होकायंत्रे,लाँगप्ले रेकॉर्ड्स,त्याचे प्लेअर्स,कासवछाप-किसण्या,पानाचे डबे,गाड्या,जुने पितळी वस्तरे,चुनाळ्या ,पितळ्या/तांब्याची भांडी अश्या असंख्य आणी नाना प्रकारच्या वस्तू इथे कित्येक वर्ष अव्याहत पणे विकल्या जात आहेत..
माझी या बाजाराशी ओळख अगदी लहानपणापासुनची(इयत्ता ७वी) आहे...आंम्ही रविवारी घरातुन सकाळी हादडुन झालं की ज्यादिवशी ५रु अ-खंड मिळतील,(तेही आपल्याला पाहुण्यांनी दिल्यानंतर आईनी(च),''दे रे इकडे अत्ता..!'' असं करुन कधितरी काढुन घेतलेले) म्हणजे तसे-परत मिळतील तेंव्हा मी २:५०रुपये- ५तास दरानी भाड्याची छोटी सायकल घेऊन आम्च्या ग्यांगमधिल येतिल त्या मित्रांसह जुन्याबाजारात कुच करायचो..अता त्यावेळी आमचं प्रमुख आकर्षण इथे ते काय होतं..?,तर इथे मिळणारे ऊल्हास नगरमेड हेडफोन आणी मुख्य म्हणजे इंग्रजी गाण्यांच्या कॅसेट्स,सोनी,बिलबेर्ड आदी कंपन्यांच्या अत्यंत महाग असलेल्या,जॅक्सन,फिल कॉलिन्स,पेट्शॉप बॉइज,बोनी एम या कलाकार/ग्रुपच्या,,,वापरलेल्या किंवा चोरुन आलेल्या क्यासेटी तिथे,तेंव्हा सुद्धा पंधरा ते पस्तीस रुपयांना मिळायच्या...(दुकानात जाऊन नव्यांच्या किमती ऐकणं सुद्ध तेंव्हा परवडायचं नाही,तर विकत घेऊन त्यातली गाणी कोण ऐकणार...?)
वस्तुतः या कॅसेटही दरवेळी आंम्ही घ्यायचोच असे नाही,पण तिथे फिरायला सुद्धा एक वेगळीच मजा वाटायची...इथे एक बरं आहे,तुंम्ही मालाची कितिही चौकशी केली,हाताळला तरी कोणिही वसकन..ठेवाss असं म्हणुन अंगावर येत नाही,अर्थात हाही काही अगदी पूर्ण सद्गुण नसुन ते एक प्रकारचं,गिर्हाइकाला वस्तूच्या प्रेमात-पडू द्यायचं कौशल्य आहे,हे तिथे मुरलेल्या गिर्हाइकाला कळुन येतच...! इथे खरेदी करताना काही गोष्टी गाडीबरोबर पार्क करुन आत शिरावं लागतं,नाहितर भल्या-भल्या गिर्हाइकांच्या हा बाजार अंगाशी आल्याशिवाय रहात नाही...!आपल्याला खरेदीतलं खूपच कळतं,हा भाव असला तर इथले व्यपारी ते दोन मिनिटात हेरुन आपला भावच करतात. बारगेनिंग हवं तितकं करा पण इरेस पडलात,तर तुम्हाला ती वस्तू अख्या बाजार समोर इज्जत घेऊन तो विक्रेता फुकट सुद्ध अंगावर मारायला कमी करत नाही. हां...अता गिर्हाईकी चलाखी हवी तेवढी करता येते..म्हणजे एखादी वस्तू अवडली तर आधी चेहेर्यावर 'फार अवडल्याचा' भाव आणणं,नंतर किमतीत उतरवुन...शेवटी ''येताना घेतो...'' असं म्हणुन,फार लांब न जात,त्या विक्रेत्याला दिसेल अश्या तसल्याच वस्तू विकणार्या दुसर्या स्टॉल समोर जाऊन उभं रहाणं,मग तो आपल्याला लांबुन हाक मारतो,मग ''आलोच'', असं खुणावत,,,जरावेळानी जाऊन,''बघा दादा आपण लास्ट मंजे लास्ट पाचशे देऊ''..असं एखाद वाक्य फेकणं, हे सगळं जमलं तर साधारण अपेक्षित भावात वस्तू हाती लागते. अर्थात यापेक्षाही रोखठोक डायरेक सेटलमेंट सारखे पर्याय वापरता येतात...पण सगळा गिर्हाइकी भावुकपणा दूर ठेऊन...!
त्यामुळेच मला, 'अगदी तय्यारातल्या तयार अट्टल गिर्हाइक' असं म्हणवणारा कुणी भेटला,तर मी त्याला हे च्यायलेंज अगदी बिन दिक्कत देऊ शकतो- हा बाजार उठवुन दाखवा...! आपण मानलं तुम्हाला...! ;-)
१)अता त्यावेळचं कॅसेटयुग संपत आलं असलं,तरी इथे अजुनही केसेट्स,टेप,वॉकमन्स आदी तुरळक प्रमाणात दिसतातच...!
२)अवजारं आणी हत्यारं-खाटिककामापासुन ते सुतारकामा,बांधकाम,लोहारकामा पर्यंतची...!
३)अता नाणी/नोटा-सातवाहन,गुप्तकाळ शिवकाळ,ब्रिटिशकाळापासुन ते,अगदी आजच्या काळापर्यंतची...
४)आणी अता हाय अँड टेरर पॉइंट ऑफ जुना बाजार... सावधपणे खरेदी करण्याच्या जुन्या वस्तू...
५)ह्या काचेच्या वस्तू...मी खास असल्याचा आव अणला,आणी मग त्यानी मला खास-आत नेऊन दाखवल्या...! ;-)
६)गृहोपयोगी वस्तूंची म्होट्टी रेंज...
७)दुर्बिणी,भिंग,होकायंत्र,घड्याळं..इ...इ...
८) ही आडवी पडलेली सुबक,नाजुकशी बाटली...(मेली भलतीच गोंडस होती,पण किमत ऐकल्यावर मी ही अडवा पडलो...! ;-) )
९)आणी आता सगळी जुनी भांडी,अडकित्ते,चुनाळ्या,पळी-पंचपात्रं,साखळ्या,पंचारत्या,तांबे,पितळी डबे,किसण्या,देव मूर्ती...इ...इ...
१०)हे मला अवडलेले खास २ अडकित्ते...यात सुपारी लवकर फुटेल..पण विक्रेत्याचा...भाव..?..तो नै लवकर फुटायच..! लै चकरा मारायला लावतात...तेंव्हा सुपारी'फुटते...! ;-)
११) आणी हा पण बाजारा इअतकीच जुनेपणाची साक्ष देणारा... कसा चमचम करतोय बघा...! :-)
प्रतिक्रिया
4 Apr 2012 - 8:49 pm | धन्या
जुन्या बाजाराची सचित्र ओळख आवडली. एखादया रविवारी जाऊया राव तिकडे.
4 Apr 2012 - 8:50 pm | अँग्री बर्ड
मी पण गेलोय, ते खूप वस्ताद आहेत. एक गॉगल आवडला होता मला, त्याची किंमत २०० रुपये अशी सांगितली गेली. मी म्ह्टल की ह्यात जनरल ने मुंबईला जाऊन येऊन कुठून तरी तो गॉगल ५० मध्ये पैदा करेन तरी मीच फायद्यात असेन असं म्हटल्यावर तो मला ७० ला मिळाला. अजून वापरतो आहे,७ महिने होऊन गेले या गोष्टीला. मुर्खासारखे काहीजण सारसबागेत दिवाळीपहाट असल्यासारखे लवकर उठून तिथे जातात तसे जाऊ नये, कारण नुकतीच दुकान लागलेली असतात आणि बोहोनी चांगली व्हावी ह्या हेतून ते पडेल भाव शक्यतो देत नाहीत. ४ वाजता जावे, आणि इस्ट इंडिया कंपनीची नाणी म्हणून जी काही खपवतात त्याबद्दल शंका आहे, इस्ट इंडिया कंपनी हनुमान , दत्ताची नाणी कश्याला छापेल ?
4 Apr 2012 - 8:51 pm | यकु
.(मेली भलतीच गोंडस होती,पण किमत ऐकल्यावर मी ही अडवा पडलो...!
=)) =)) =))
भारी बाजार आहे. मला जुन्या पुराण्या वस्तू आवडतात.
पुण्यात आल्यावर नक्की फिरुन येऊ या बाजारात.
आता पुढच्या वेळी गेलात तर माझं एक काम कराल का? रुंदीला दीड इंची आणि लांबीला साडेतीन फूट असलेलं फक्त म्यान (बाकदार) मिळतंय का बघा प्लीज.
च्यायला म्यानं कोण तयार करतात ते कितीतरी दिवस झाले शोधतोय, सापडत नाहीय.
4 Apr 2012 - 8:59 pm | अत्रुप्त आत्मा
@रुंदीला दीड इंची आणि लांबीला साडेतीन फूट असलेलं फक्त म्यान (बाकदार) मिळतंय का बघा प्लीज.>>> लै वेळा मिळवणार...यक्कूशेठ...! मिळाली या महिन्यात तर मे मधे येताना घेऊनच येइन... :-)
4 Apr 2012 - 9:04 pm | यकु
:)
व्वा, भारीच आहे मग बाजार.
थँक्स थँक्स थँक्स !!!
5 Apr 2012 - 3:41 pm | प्यारे१
>>>रुंदीला दीड इंची आणि लांबीला साडेतीन फूट असलेलं
मूळ शस्त्र कुणाकडं आहे? की माझ्याकडं तलवार आहे घाबरुन असा असं काही आहे??? ;)
5 Apr 2012 - 4:09 pm | यकु
>>>मूळ शस्त्र कुणाकडं आहे? की माझ्याकडं तलवार आहे घाबरुन असा असं काही आहे???
--- मूळ शस्त्र आमच्या बापजाद्यांचं होतं ते आमच्याकडं आलं आहे ;-) पण त्यावर म्यान नाहीय.
आणि ते फक्त साडेतीन फूटच असल्यानं इथून बसल्या बसल्या लांबवर बसलेल्या कुणाचा जीव घेऊ शकत नाही ;-)
हैदराबाद संस्थान खालसा झालं तेव्हा पांडे-पटवार्यांकडं असलेल्या शस्त्रांची जप्ती सुरु झाली तेव्हा पणजोबांनी बंदूक इमानदारीत सरकारकडं जमा केली. पण तेव्हाची परिस्थिती पहाता तलवार जवळ ठेवणं पणजोबांना आवश्यक वाटलं होतं म्हणे.
मग त्यांनी हे शस्त्र काही दिवस शेतातल्या विविक्षीत जागी नंगेच्या नंगे खुपसून ठेवायला लावले. त्यात म्यान कुठेतरी गहाळ झाले. तलवार कधीतरी परत घरी आली पुढे कधीतरी माझ्या हातात आली.
आता भानगड अशी आहे की ती जमा कुठे करायची आणि पोलीस खात्याची लचांडं मागं लाऊन कुणी घ्यायची?
मी औरंगाबादच्या संग्रहालयात विचारलं की तुम्ही पत्र द्या माझ्याकडे असा असा माणूस तलवार भेट म्हणून द्यायला सोबत घेऊन येणार आहे, पोलीसांनी मध्येच त्याला आत टाकण्याची कृपा करु नये. तर ते म्हणे नाही! तुम्ही आमच्या कागदाच्या हवाल्यावर ट्रकभरुन शस्त्रे दुसरीकडेच पाठवली तर?
पुन्हा ती तलवार पिढीजाद असल्यानं तिच्यात भावना गुंतणे वगैरे प्रकरण आहेच. तिच्यावर पणजोबांचं फारसीमध्ये नाव वगैरे कोरलेलं आहे आणि एवढी वर्षे झालीत तरी तिची धार कमी व्हायला तयार नाही, म्हणून मला तर ती फारच आवडते. गावाकडे गेलो कधीमधी तर चार हात मारुन बघतो ;-)
वातावरण गारठलं की थोडासा गंज येतो तिच्यावर म्हणून म्यान पाहिजेच. सध्या तलम कपड्यात ठेवलीय.
बाकी अशी शस्त्रं आमच्या गावातल्या जुन्या वाड्यावाड्याच्या ढासळणार्या भिंतीतून निघतातच.
5 Apr 2012 - 4:14 pm | प्यारे१
'माझं' लक्ष गेलं म्हणून हा एवढा इतिहास समजला.... :)
ह्या अ आ ला अशी सूक्ष्म निरीक्षण शक्ती नाही हो! त्याचं आपलं नुस्तं खाण्यापिण्यात लक्ष. ;)
- मी आणि मीच २२/७ चा- आपलं १२ गावचं पाणी इ.इ.- प्यारे
5 Apr 2012 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा
@दंगा करायला ख व, ख फ आणि व्यनि आहेत. तेवढं पथ्य पाळाच. :-O
@ह्या अ आ ला अशी सूक्ष्म निरीक्षण शक्ती नाही हो! >>> हमने अपनी सू.नि. शक्ति से ही आपको अभी पकडा है... ;-)
और... ये उप्पर के बारे मे आपका क्या खयाल है..? :-p
10 Apr 2012 - 6:02 pm | मालोजीराव
यक्कू,
ठराविक आकाराचे म्यान हवे असेल तर जोधपुर ला बनवून मिळेल....कोल्हापूर ला पण मिळू शकेल-चौकशी करा !
पिढीजात तलवार असेल तर स्वताकडेच ठेवा संग्रहालयात ठेवण्यापेक्षा...भावना गुंतलेल्या असतात खरे आहे,
आणि बिना म्यानची तलवार हवेत फिरवू नका,वीररसात जुनी तलवार फिरवल्यास ती म्यान करताना तलवारीला रक्त लावावे लागते.
आणि तलवार बाळगणारे लोक पोलिसांना घाबरत नाहीत ;)
- मालोजीराव
10 Apr 2012 - 6:14 pm | यकु
>>>>>ठराविक आकाराचे म्यान हवे असेल तर जोधपुर ला बनवून मिळेल....कोल्हापूर ला पण मिळू शकेल-चौकशी करा !
--- ओक्के! कधी संधी आली तर निश्चित चौकशी करेन.
>>>>>पिढीजात तलवार असेल तर स्वताकडेच ठेवा संग्रहालयात ठेवण्यापेक्षा...भावना गुंतलेल्या असतात खरे आहे,
---- हो ना, च्यायला भावनेचा प्रश्न असूनही मी एवढ्या उत्साहानं विचारलं त्या संग्रहालय वाल्यांना तर ते भलतेच काहीतरी बोलू लागले, म्हटलं गेलात तेल लावत ;-)
>>>>>आणि बिना म्यानची तलवार हवेत फिरवू नका,वीररसात जुनी तलवार फिरवल्यास ती म्यान करताना तलवारीला रक्त लावावे लागते.
---- मी रक्तबिक्त लावत नाय ब्वॉ.. आमच्या गावात एक गुरखा होता. त्याला 'कुकरी दिखाव ना' म्हटलं की तो म्हणायचा 'नै, बाहर निकाला तो उसकू खून पिलाना पडता है'.. च्यायला भानगडच असते.. पण मी खून बिन काही लावत नाही. काढतोच कधीतरी सटी सहा महिन्याला बाहेर. खून न दिल्याने ती तलवार नाराज होत नसेल अशी अपेक्षा ;-)
>>>>> आणि तलवार बाळगणारे लोक पोलिसांना घाबरत नाहीत
---- हॅहॅहॅ ;-)
4 Apr 2012 - 8:51 pm | Pearl
वेगळीच दुनिया आहे. आधी कधी पाहिली नव्हती.
पितळी खलबत्ते दिसत आहेत. चक्कर टाकायला हवी. :-)
4 Apr 2012 - 9:08 pm | रेवती
फोटो आवडले.
त्यातल्या कितीतरी वस्तू म्युझियममध्ये असायला हव्यात इतक्या जुन्या वाटताहेत.
4 Apr 2012 - 9:21 pm | इनिगोय
नमुनेदार किस्सेही असतील तुमच्या गाठीशी तर तेही येऊ द्यात.
4 Apr 2012 - 9:24 pm | प्रीती
धन्यवाद!! इतके सगळे फोटो टाकल्या बद्दल.
कारण आत्तापर्यंत अतीशय गल्लीच्छ भाग म्हणुनच ओळखत होते मी याला....पण आत गेल्यावर इतक्या चांगल्या वस्तु मिळत असतील तर एकदा चक्कर टाकलीच पहीजे.
11 Apr 2012 - 12:40 pm | Maharani
खरय!मी पण कधी या बाजारात गेले नाही.सुंदर फोटो बघुन आता चक्कर टाकायलाच हवी....धन्यवाद!!
4 Apr 2012 - 9:36 pm | स्मिता.
भटजीबुवा, एका वेगळ्याच आणि माहिती नसलेल्या बाजाराची ओळख आवडली.
आधी फुलांच्या बाजाराची आणि आता जुन्या बाजाराची ओळख करून देवून एका अर्थाने पुण्याचीच एक वेगळी ओळख करून देत आहात... आवडतंय.
अनेक जुन्या आणि सुंदर वस्तू तिथे दिसत आहेत पण त्यांची किंमत काय असेल हे जाणून घ्यावसं वाटत नाहीये ;)
4 Apr 2012 - 9:38 pm | पैसा
तुमच्या जुन्या जमान्यातल्या बर्याच वस्तू दिसताहेत. त्या पितळी वस्तूंमधे माझा जीव अडकलाय. काय किंमती असतात हो?
4 Apr 2012 - 9:54 pm | अत्रुप्त आत्मा
@त्या पितळी वस्तूंमधे माझा जीव अडकलाय. काय किंमती असतात हो?>>> २०० रुपाया पासुन ५हजार,,,१०हजारापर्यंत :-)
4 Apr 2012 - 9:52 pm | प्रचेतस
अधिक काय बोलू, तुमच्याबरोबरच आज सगळं पाहिलय हे.
बुवा एकेक दुकानांचे फोटो काढत पितळी वस्तूंसमोर त्यातही अडकित्यांसमोर अंमळ जास्तच थबकत होते. मी मात्र जिथे नाणी असतील तिथे बराच वेळ थांबत होतो. बर्याच ठिकाणी प्राचीन नाणी दिसली. मुघलकालीन नाण्यांचे जास्तच दिसले. बर्याच ठिकआणी शोधाशोध केल्यावर काही ठिकाणी तांब्याची सातवाहनकालीन नाणी बघितली. हत्ती आणि अस्पष्टसे दिसणारे उज्जैन चिन्ह असे छाप असणारी. पण लगेच घेतली मात्र नाहीत. आता पुढच्या फेर्यांमध्ये अजून धुंडाळून मगच घेतली जातील.
4 Apr 2012 - 9:53 pm | अन्या दातार
कोल्हापुरात पद्मा टॉकिजच्या समोर एका गल्लीत भरायचा (सध्या माहित नाही). रेकॉर्ड प्लेयर, जुने व्हॉल्ववाले रेडीओ याची बर्यापैकी व्हरायटी दिसायची. चाकू-गुप्त्या वगैरे 'खास' लोकांसाठी ;) पितळी वस्तू कधी दिसल्या नाहीत तिथे.
खरंच, या जागा माणसांचे निरीक्षण करण्यासाठी अगदी योग्य असतात. कोण कसे गोत्यात आणायचा प्रयत्न करतो, कोण दुकानदाराशी कसा भाव करतो हे बघण्या-ऐकण्यासारखे तसेच शिकण्यासारखे असते. :)
5 Apr 2012 - 12:47 am | अत्रुप्त आत्मा
@या जागा माणसांचे निरीक्षण करण्यासाठी अगदी योग्य असतात. कोण कसे गोत्यात आणायचा प्रयत्न करतो, कोण दुकानदाराशी कसा भाव करतो हे बघण्या-ऐकण्यासारखे तसेच शिकण्यासारखे असते. >>> हां....अशी गुणग्राहकता हवी ;-)
4 Apr 2012 - 10:04 pm | इष्टुर फाकडा
आम्ही या बाजारात दर महिन्यातून एकदा चक्कर मारायचो आर्मीतल्या जुन्या पाठपिशव्या शोधायला. भटकंतीसाठी उपयोगी अजूनही बर्याच गोष्टी शोधायला मजा यायची. हमरस्ता सोडून आतमध्ये या सगळ्या वस्तू मिळायच्या. तिथे आम्ही सगळ्यात जास्त शोधलेली आणि सापडलेली वस्तू म्हणजे जुना पितळी पाणी तापवायचा बंब :) या बम्बावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. एखाद्या पेशवेकालीन मात्तब्बर असामीचा तो बंब असावा असे आम्ही समजून आहोत ;)
4 Apr 2012 - 10:17 pm | सुहास..
आम्ही या बाजारात दर महिन्यातून एकदा चक्कर मारायचो आर्मीतल्या जुन्या पाठपिशव्या शोधायला. >>
+१
मी या जुन्या बाजारातील शुज , शाळेत - कॉलेजला खेळताना वापरले आहेत.
4 Apr 2012 - 10:31 pm | मृगनयनी
अ.आ. जी... छान लेख!..
अॅन्टीक वस्तू , पितळी दिवे, रणगाडा आणि स्पेशली जुनी नाणी पाहून मन भरून आले!!!!! :) छान वाटले! :)
आम्हाला आमच्या वरिष्ठांकडुन अद्यापही या एरियात एकटे जायला बन्दी घातल्या गेली आहे. ;) (पण तरीही आम्ही या जन्मी २ दा येथे लपून छपून - केवळ कुतुहलापोटी गेलेलो आहोत ;) ;) )
इथल्या पाकिटमारांची भीति आमच्या मनी अजूनही खोलवर रुजल्या गेली आहे.
:)
5 Apr 2012 - 12:24 am | मोदक
आर्मीतल्या पाठपिशव्यांची अधीक माहिती आहे का..?
कंफर्ट / कुशनींग कसे असते आणि(नव्या / जुन्या कसल्याही) कुठे मिळतील..? जुन्या बाजारात शोधेनच.
सध्या PEAK ची ४५ लीटरची सॅक वापरत आहे.. ४५ लीटर क्षमता असूनही लहान पडत आहे.
एकदा पुणे स्टेशनवर ITBP च्या जवानाला थांबवून त्याच्या सॅक बद्दल विचारले होते, पण त्याच्याकडे फारशी माहिती नव्हती. त्याच्या सॅकला एक AK 47 / AK 56 लटकत असल्याने जास्ती चिकीत्सा करून बघता आली नाही.
5 Apr 2012 - 3:36 pm | इष्टुर फाकडा
त्याच्या सॅकला एक AK 47 / AK 56 लटकत असल्याने जास्ती चिकीत्सा करून बघता आली नाही.
:) :)
हो हाच प्रश्न काही वर्षांपूर्वी मलाही होता कि मोठ्या पिशव्या कुठून घ्याव्यात. आम्हाला कॅम्प मध्ये एक शिवून देणारा मिळाला होता, त्याच्या कडून पट्टीवाल्या पाच पिशव्या शिवून घेतल्या होत्या साधारण ६० लिटर च्या असतील त्या. त्या दुकानवाल्याचा बाजार उठला असे वर्षभरापूर्वी ऐकायला मिळाले.
सध्या तरी हाताशी काही माहिती नाही. इथे Jack Wolfskin च्या खतरनाक पिशव्या पाहण्यात आल्या, पण किमतीही तश्याच आहेत.
असो, काही कळले तर व्यनी करेन.
5 Apr 2012 - 3:52 pm | वपाडाव
हा ब्रॅंड युरोपातला लै फेमस ब्रॅंड आहे. यांच्या फिरण्यासाठी / भटक्या जमातीसाठी बर्याच अॅक्सेसेरीज आहेत.
4 Apr 2012 - 10:07 pm | तर्री
पुण्यात ईतके वेळा येवून हे असले काही माहिती नव्हते.
माहिती मस्तच.
4 Apr 2012 - 10:12 pm | रेवती
वरील फोटू लेख पाहून एक गमतीदार माहिती आठवली. ती माझ्या सासूबाईंनी सांगितली आहे. त्यांच्या मैत्रिणीचे भले मोठे घर आहे आणि मैत्रिणीच्या नवर्याला जुन्याबाजारातून वस्तू आणायचे वेड आहे. चांगल्या स्थितीतील शीतकपाटे, मिक्सर्स, वॉशिंग मशिने विकत आणून तीनही मुलांच्या नव्या संसाराला भेट म्हणून दिले पण नव्या सुनांना कसे आवडणार? आता त्या वस्तू अडगळीत पडल्यात. त्याआधी एकदा चांगले मिळाले म्हणून पन्नास पाट आणले आणि अडगळीच्या खोलीत रंगवून/वाळवून ठेवून दिले. काही दिवसांनी विमानाचा तुटका पंख ट्रकमध्ये घालून आणला आणि पाटांसमोर ठेवून दिला. मुलांच्या लग्नकार्यात तरी पाट वापरू म्हणताना पुढे असलेल्या इतर भरपूर पसार्याने ते न वापरता सरळ बाहेरून विकत आणावे लागले होते.;)
10 Apr 2012 - 10:51 am | मोदक
मला माहीत असलेला गमतीदार किस्सा..
एकाच्या चारचाकीची गाडीची एकच व्हील कॅप रस्त्यात कुठेतरी पडली - हरवली.. आता एकासाठी इतर तीन बदली करायचे म्हणजे आतबट्ट्यातला व्यवहार, म्हणून मग तो तसली व्हील कॅप शोधायला जुन्या बाजारात गेला.
दुकानासमोर गाडी लावली.. दुकानदाराला लांबून व्हील कॅप चे डीझाईन दाखवले. दुकानदाराने आर्धा तास थांबवून घेतले आणि तसलीच एक चकाचक व्हील कॅप आणून दिली.
हा हिरो खूष होवून घरी आला.. नंतर कळाले.. दुसर्या साईड्ची एक कॅप गायब आहे. :-O
दुकानदाराने त्याच्याच गाडीची पलीकडची कॅप उडवली.. पॉलीश करून यालाच विकली. :-D
10 Apr 2012 - 2:25 pm | अत्रुप्त आत्मा
@दुकानदाराने त्याच्याच गाडीची पलीकडची कॅप उडवली..>>>
@पॉलीश करून यालाच विकली.>>> खपल्या गेलो आहे...
4 Apr 2012 - 11:08 pm | शिल्पा ब
मस्त. मला कुंकवाचे करंडे, अन हळदी- कुंकु- अक्षदा ठेवतात तो चकतीचा डबा आवडला. अडकीत्ते पण मस्त आहेत. बरोबर माहीतगार असेल तर अशा ठीकाणी खरेदी करुन एखादी अनमोल वस्तु पदरात पडु शकते.
मीसुद्धा इथे इस्टेट सेल मधे वगैरे जाउन काही जुनं छान मिळतं का पहात असते. वस्तु असतात पण खुपदा किंमत खुपच लावलेली असते..अन आपल्याला माहीती नसल्याने नेमका भावही करता येत नाही. असो.
4 Apr 2012 - 11:16 pm | अपूर्व कात्रे
एकदम खत्रुड आहे. आवडले आपल्याला...... पितळी वस्तु तर खल्लास एकदम........ पण किमती सुद्धा भारी आहेत.......... बरच्या/कट्यारी घेण्यासाठी चार आकडी रुपये घेउन यायला पाहिजे.
असो........
फोटो आवडले.....
4 Apr 2012 - 11:46 pm | ५० फक्त
उत्तम बाजार आहे, पण प्रचंड सावधगिरी लागते, पितळेच्या सगळ्याच वस्तु जुन्या नसतात, त्यातल्या जुन्या कोणत्या आणि नविन कोणत्या हे समजणे गरजेचे. तसेच वर रोहितने म्हणल्याप्रमाणे नाण्यांचे असते तसे.
तसं हल्ली हा जुना बाजार फार कमी झाला आहे, तिथं, व्यायामाची साधनं, बॅगा, बुट असलंच बरंच जास्त असतं. याचबरोबर याच्या समोर असणारा जुन्या फर्निचरचा बाजार सुद्धा चांगला आहे. भावनिक गुंतवणुक नसेल तर १ बिएचकेचं सगळं फर्निचर ५००००/- मध्ये सहज येतं. अगदी चकचकित करुन घरापर्यंत.
4 Apr 2012 - 11:49 pm | मोदक
आजच्या दिवसात चांगले असे खूप कांही चुकवले आहे याची जास्त जाणीव होत आहे तुमचे दोघांचे लेख वाचून.. :-(
5 Apr 2012 - 12:56 am | आनंदी गोपाळ
होस्टेलच्या दिवसांत हा चोरबाजार काय वाट्टेल ते देऊन जाई.
१४ रुपयांत मिळाला म्हणून हँडल मारण्याचा एक मिक्सर ब्लेंडर आणून फ्रूट ज्य्यूस केलेले.
लोखंडी 'टो' असलेले हंटर्स.
घडीचा स्टोव्ह.
मजबूत रॅकसॅक. खरं तर ट्रेकिंगचं सगळं सामान.
त्या काळात 'हिटलॉन' तिथेच मिळालेलं पहिल्यांदा.
होस्टेलच्या बेडमधले ढेकूण मारण्यासाठी तिथूनच स्टो-रिपेर वाल्यांचा तो स्पेशल स्टो आणलेला विकत मग पलंगाचे कोपरे लाल होईपर्यंत तापवलेले..
अॅण्टिक्स व्यतिरिक्त रोज उपयोगी वस्तूही भरपूर मिळतात तिथे.
5 Apr 2012 - 1:24 am | बाळ सप्रे
जुनी आठवण वगैरे ठीक आहे पण काळानुरुप स्थळ/ स्वरूप बदलणे गरजेचे आहे. रस्त्याचा एक भाग व्यापून केवळ बकालपणा वाढवत आहे हा जुना बाजार. विकत वगैरे घ्यायला कधी गेलो नाही पण रस्ता व्यापून असल्याने आणि एकंदर स्वरूप खरंतर किळसवाणं असल्यानं त्याबाजुला जावसं वाटत नाही.
पण त्यामुळेच वस्तूंचं वैविध्य पाहून कुतूहल वाटलं.
5 Apr 2012 - 11:19 am | अत्रुप्त आत्मा
@रस्त्याचा एक भाग व्यापून केवळ बकालपणा वाढवत आहे हा जुना बाजार. >>> गेले हो,ते दिवस...! अता त्यांना नव्या नियमात-बसवलय... रस्त्याचा फक्त फुटपाथ कडेचा,थोडा रस्त्याचा भागच त्यांना मिळतो... कालही तसेच बसलेले होते... त्यामुळे ट्रॅफिक सुरळीत चालले होते. :-)
17 Apr 2012 - 9:44 am | बाळ सप्रे
नियमात बसवलय म्हणून कयदेशीर होउ शकतो.. पण बकालपणा जात नाही ना !!
17 Apr 2012 - 5:18 pm | अत्रुप्त आत्मा
@पण बकालपणा जात नाही ना !! >>> ही अपेक्षा तुंम्ही त्यांच्याकडुन करता कशाला...? त्या वर्गाचा सामाजिक स्तर पहा...आणी मग अपेक्षा करा :-)
17 Apr 2012 - 5:57 pm | प्रचेतस
सहमत आहे.
मी स्वत: आत्म्याबरोबर तिथे त्या दिवशी फिरलोय. दुकाने जरी फूटपाथवर, रस्त्यावर असली तरी बकालपणा असा कुठेही दिसला नाही.
30 Apr 2012 - 4:19 pm | बाळ सप्रे
रस्ता हा वहातुकीसाठी असतो. फूटपाथ पादचार्यांसाठी.. तिथे दुकान थाटणे हाच बकालपणा.
आणि सामाजिक स्तर खालचा आहे म्हणून बकालपणा चालू द्यावा ??? त्यांच्याकडून असच रस्त्यावर व्यवसाय करायची अपेक्षा ठेवायची ??
2 May 2012 - 12:38 am | अत्रुप्त आत्मा
@रस्ता हा वहातुकीसाठी असतो. फूटपाथ पादचार्यांसाठी.. >>> ओ.... तुमचा रस्ता नंतर आलाय..जुना बाजार लै जुना आहे...माहितीये का..?
@तिथे दुकान थाटणे हाच बकालपणा. >>> यालाच जर तुंम्ही बकाल्पणा म्हणता,तर नाईलाज कशाला म्हणता तेही सांगा
@आणि सामाजिक स्तर खालचा आहे म्हणून बकालपणा चालू द्यावा ??? >>> अहो,महाशय. तो बकालपणा नाहीच आहे,त्यामुळे तुमचा प्रश्नच गैरलागू आहे.
@त्यांच्याकडून असच रस्त्यावर व्यवसाय करायची अपेक्षा ठेवायची ?? >>> तुम्ही अपेक्षा बिपेक्षा ठेऊ नका हो...त्यांचा हक्क आहे तो... त्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते बोला... कळू द्या तुमचे विचार एकदा.त्यांना तिथनं हकुन दिल्यावर त्यांनी कुठे जायचं तेही बोला...
2 May 2012 - 12:17 pm | बाळ सप्रे
अहो बाजार "लै जुना" आहे, त्यात अँटीक वस्तू असतात या गोष्टींचा अभिमान बाळगा पण रस्त्यावर भरतो याचं पण समर्थन??
त्यांना हाकलून द्या वगैरे कोण म्हणतय ?? पण काळानुसार बदलणे आवश्यक असते. एखाद्या मंडई/ संकुलात भरला हा बाजार तर जास्त चांगला नाही का दिसणार??
पूर्वी रस्त्यावर भरायचा, तेव्हा ठीक होतं.. तेव्हाची वाहतुकीची गरज तेवढीच होती..
बरं चोर बाजार आहे हा याबद्दलही अभिमान बाळगणार का??
"लै जुना" आहे म्हणून त्यानी चोरी केली तरी .. व्वा किती छान जुने चोर आहेत !!
2 May 2012 - 1:23 pm | अत्रुप्त आत्मा
@अहो बाजार "लै जुना" आहे, त्यात अँटीक वस्तू असतात या गोष्टींचा अभिमान बाळगा पण रस्त्यावर भरतो याचं पण समर्थन?? >>> अहो..समर्थन कुठाय हे..? वस्तुस्थिती आहे ती... ती आंम्ही सांगितली..इतकच...!
@त्यांना हाकलून द्या वगैरे कोण म्हणतय ?? पण काळानुसार बदलणे आवश्यक असते. >>> हा बदल त्यांना तर हवाच आहे...पण नगरपालिका दाद लागू देइल तर ना..!
@ एखाद्या मंडई/ संकुलात भरला हा बाजार तर जास्त चांगला नाही का दिसणार?? >>> असं आपल्याला वाटतं...आणी आंम्हालाही...फक्त सरकारी रेट्यातुन गरिबांची कामं खर्या अर्थी होण्याचा सु-दिन उगवणे गरजेचे आहे,ते होत नाही ना..?
@पूर्वी रस्त्यावर भरायचा, तेव्हा ठीक होतं.. तेव्हाची वाहतुकीची गरज तेवढीच होती.. >>> अताही वहातुकिची कोंडी टाळुनच बाजार चालतो आहे...
@बरं चोर बाजार आहे हा याबद्दलही अभिमान बाळगणार का?? >>> आंम्ही कुठं बाळगला अभिमान..? उगीच नाही ते आरोप करु नका हो महाशय...
@"लै जुना" आहे म्हणून त्यानी चोरी केली तरी .. व्वा किती छान जुने चोर आहेत !! >>> काय हो..? तुंम्हाला स्वतःला या बाजाराची माहिती किती आहे हो..? काहि माहिती नसताना असली बेजबाबदार वक्तव्य करता...म्हणुन विचारतोय. तो चोरांचा बाजार नाहिये...तिथे जुन्या वस्तूंबरोबरच चोरिचा मालही विकायला येतो,इतकच सत्य आहे...(व्यापारी तो माल विकत घेतात,चोरच तिथले व्यापारी नाहित.) आहे ते चुकिचच आहे..पण चालू जगरहाटीचा तो एक भाग आहे. हे समजुन घ्यायला हवं की नको?. त्याचं समर्थन मी केलेलं नाही...फक्त दखल घेतलेली आहे,हे जरा समजुन घ्या.
2 May 2012 - 1:47 pm | बाळ सप्रे
याला मी समर्थन समजलो.. वस्तुस्थिती सांगणे नाही..
बाकी तुम्हाला या बाजाराच्या वाईट बाजू दाखवल्याचं तर फारच वाईट वाटलेले दिसतेय
वाटलं चोरीच्या वस्तू विकणं तरी खटकेल..
असो ते तरी चुकीचं वाटतय ना.
2 May 2012 - 2:04 pm | अत्रुप्त आत्मा
@याला मी समर्थन समजलो.. वस्तुस्थिती सांगणे नाही.. >>> होतो गैरसमज कधी कधी...असो..!
@बाकी तुम्हाला या बाजाराच्या वाईट बाजू दाखवल्याचं तर फारच वाईट वाटलेले दिसतेय >>> मुळ्ळीच नाही...!
@वाटलं चोरीच्या वस्तू विकणं तरी खटकेल.. >>>खटकतं की...पण असं खटकलेलं सांगणं हे या लेखाच्या संदर्भात बसत नाही, हा लेख म्हणजे पुणे शहराच्या एका भागाचा ओळख वृतांत आहे..तपासणी शिबिर नव्हे... आणी खटकुन काय उपयोग नुस्तं..? यावरचे उपाय योजणं आपल्या हाती आहे का..?
@असो ते तरी चुकीचं वाटतय ना.>>> चुकिचं वाटणारच की..! चुकच आहे ते..! फक्त या चुक बरोबरची काळजी मी या लेखात वहावी,असं मला वाटत नाही.. :-)
5 Apr 2012 - 4:49 pm | किचेन
खर आहे.पण जुना बाजार हि अलिबाबाची गुहा आहे.वरून वाटत नाही पण आतमध्ये गेलात तर काय काय सापडेल त्याची कल्पनाही करू शकणार नाही.आणि बुधवार -रविवार ते शिस्तीत रस्त्याच्या एका बाजूला बसलेले असतात.अर्धा रस्ता रहदारीसाठी मोकळा असतो.मी कधी जुना बाजार भरलाय म्हणून खूप ट्राफिक झालाय अस बघितलं नाहीये.
7 Apr 2012 - 4:04 pm | अत्रुप्त आत्मा
@मी कधी जुना बाजार भरलाय म्हणून खूप ट्राफिक झालाय अस बघितलं नाहीये. >>> अगं किच्चु तै...आधी एक साइड पूर्ण बंद असायची आणी ट्रॅफिक जॅम पण व्हायचं... तु म्हणतेस तो नवा बदल गेल्या काही महिन्यातला आहे... :-)
10 Apr 2012 - 5:12 pm | किचेन
महिने नहि वर्ष.
5 Apr 2012 - 1:38 am | नंदन
मस्त फोटू हो, भटजीबुवा. एकदा फेरी मारायला हवी.
5 Apr 2012 - 1:52 am | पिवळा डांबिस
जुन्या वस्तूंचे फोटो आवडले...
आता पुढल्या वेळेस तुलाच घेऊन गेलं पाहिजे तिथे!
माहितगार असलेला बरा...
5 Apr 2012 - 5:20 am | सहज
मस्त चक्कर घडवून आणलीत!!!
5 Apr 2012 - 7:44 am | स्पा
चायला अफाट आहे हो हा बाजार ...
आवर्जून यायला हव...
वो अडकित्तोने तो जान हि लेली :)
5 Apr 2012 - 9:10 am | वपाडाव
बर्याचदा गेलोय इथे पण गाभार्यात गेलो नाही... म्हणुन बरंच मिस केलेलं दिसतंय... अजुन एक वेळ जाउन येतो...
5 Apr 2012 - 9:18 am | चौकटराजा
१९७० ला अकरावी झाल्याच्या निमिताने मला माझी आयुष्यतली पहिली फुलप्यांट मिळाली. त्या एका प्यांटवरच आठवडा काढावा लागे. रविवारी
धुवायची. दुसरी नवी घेणे दुरापास्त . कारण फी भरण्याला प्राधान्य. असाच मग जुन्या बाजाराची माहिती मिळाली. काही लोक याला चोर बाजार
ही म्हणतात.एका जागी जुने कपडे विकणारा बसला होता. एकदाची एक प्यांट पसंत केली. पनास सांगितले.. मला विसातच परवडत होती. ( मिसळ
हा प्रकार अर्ध्या रूपयाला मिळत असे ) सौदा फिसकटला. पुरते एक वर्ष एकच वापरली. ही परिस्थीती असताना एकाद्या मुलीवर इंप्रेशन पडण्याचा
प्रश्नच येत नसे. आपल्याला जुनी वापरलेली प्यांट वापरायची वेळ आली होती. हे आठवले की आजही अस्वस्थ व्हायला होते. बाकी ही जागा
निरखणे हा एक रोमान्स आहे. फक्त उन्ह उतरले असताना जावा.
बाकी अट्रुप्ट आटमा याणी ताकलेले फोतो पाहून दोले ट्रुप्ट जाले. ढ्ण्यवॉड !
5 Apr 2012 - 9:39 am | मृत्युन्जय
गुर्जी कधी नेताय बाजारला? ते माश्याचे कुलुप, पितळी बैलगाडी आणि आडकिते आणि दुर्बिणी लैच आवडल्यात बघा आपल्याला पण साले बार्गेनिंग जमत नाही. तुम्ही तयारीचे दिसाताय त्यातले. तुमच्याबरोबरच येतो खरेदीला.
5 Apr 2012 - 10:00 am | पियुशा
अरे व्वा !!!!
इथल्या काही वस्तु उदा. बैलगाडी ,घोडागाडी प्रचन्ड आवडली गेली आहे :)
5 Apr 2012 - 10:02 am | इरसाल
कधी मिळाला चानस तर नक्की येइन.
एका फोटोत स्वातंत्र्यदेवतेचा पितळी बॉट्ल ओपनर पाहून मौज वाटली.
5 Apr 2012 - 10:12 am | प्यारे१
अ आ.
आपला 'स्मायल्या' नी '...' (अल्मोस्ट)विरहीत लेख जास्त आवडला.
छान माहिती आणि फोटो.
>>>त्याचं जुना हे नाव कालावाचक जेवढं आहे,त्यापेक्षा ते आत्मवाचक जास्त आहे. <<
हे वाक्य विशेष भावलं.
अ-अवांतरः असेच मुद्देसूद नी विशेष म्हणजे बांधेसूद लिहीलेत तर जास्त बरे.
मिसळपाववर जास्तीत जास्त 'असंच' चांगलं वाचू या ना आपण सगळेच.
दंगा करायला ख व, ख फ आणि व्यनि आहेत. तेवढं पथ्य पाळाच. :)
5 Apr 2012 - 2:21 pm | चिंतामणी
>>>आपला 'स्मायल्या' नी '...' (अल्मोस्ट)विरहीत लेख जास्त आवडला.
(अजून भर घालतो) आणि नेहमीची वाट सोडून नवीन विषय निवडलेला आवडला.
5 Apr 2012 - 10:26 am | मुक्त विहारि
बरोबर कुणी माहितगार असल्याशिवाय खरेदी करु नका...
मला ग्रामोफोन इथेच मिळाला..पण ओळख असल्याने चांगला निघाला....
बाकी हे अत्रुप्त आत्मे मस्त आहेत....कुठे , कुठे भटकतात.....मस्त फोटो काढतात्...आणि माहिती पण देतात..
धन्यवाद हो अत्रुप्त आत्मे साहेब....
5 Apr 2012 - 10:56 am | निश
अत्रुप्त आत्मा साहेब, मस्त लेख व भारी पुणे...
आताही पुण्याला आलो कि बुधवारी जुन्या बाजारात एक फेरी असतेच.
तसही पुणे म्हंजे आमच सगळ्यात आवडिच ठिकाण ...
कलेजेचा टुकडा म्हणा हव तर...
पण पुणे ते पुणेच निव्वळ लाजवाब..
अत्रुप्त आत्मा साहेब एका सुंदर लेखासाठि तुमचे मनापासुन आभार
5 Apr 2012 - 10:58 am | मनराव
भटजीबुवा....
नव्या पुण्यातल्या जुन्या बाजाराची सैर मस्त करुन दिलीत
5 Apr 2012 - 11:42 am | स्वातीविशु
छान सचित्र लेख आवड्ला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. (वडिलांचा हात धरुन बाजारात फिरणे वगैरे) :)
त्या पितळेच्या वस्तू विशेष आवडल्या... मत्स्य कुलूप, कासव कुलूप, बैलगाडी, घोडागाडी, अडकीत्ते...
जुन्या बाजाराची सैर घडवून आणल्याबद्द्ल धन्यवाद. :)
5 Apr 2012 - 11:59 am | गवि
पुन्हा एकदा आपला आसमंत उघड्या डोळ्यांनी आणि संवेदनशील मनाने टिपण्याचं उत्तम उदाहरण.
पुन्हा एकदा धन्यवाद..
5 Apr 2012 - 1:36 pm | एम.जी.
मिलिटरीच्या हॅवरसॅक्स, टेन्ट्स अशा गोष्टी घेतल्या होत्या फार पूर्वी..
मुंबईच्या एका मित्राला जुन्या ट्रायुम्फला बसू शकेल असा एक पार्ट मिळाला होता. त्यासाठी तीन बुधवार आअणि तीन रविवार घालवले होते..
पण फोटो बघून पुन्हा आठवण जागी झाली.
तळाला स्टड्स असलेले स्पोर्ट्स शूजसुद्धा मस्त मिळायचे.
5 Apr 2012 - 1:52 pm | पहाटवारा
झकास फोटो अन ऊत्तम ओळख ..
होस्टेल डेज च्या सुरुवातीला , कुणीतरी सांगितले कि इथुन काहि घेउ नकोस .. चोरिचा माल असतो .. पोलिस मागे येतील .. तर आधी खरेच वाटले .. पण मग नंतर बर्याच फेर्या झाल्या .. अर्थात घेणे कमी अन घासाघीस जास्ती ..
5 Apr 2012 - 1:57 pm | प्रास
एका मनोहर विश्वाची उत्तम सचित्र ओळख करून दिलेली आहे.
जुन्या बाजारातील वस्तू बघून पारणं फिटलंय. कधी तरी जरूर तिथे भटकायला आवडेल.
आपला अत्यंत आभारी आहे.
5 Apr 2012 - 2:01 pm | मन१
हे असले लेख ताकताय ठिक आहे. पण तिथं हाकेच्या अंतरावर आम्ही असतानाही बोलावलो गेलो नाही.
तुमचा अखास अॅण्टिक शैलीत निषेध करण्यात येत आहे.
5 Apr 2012 - 2:08 pm | अत्रुप्त आत्मा
@पण तिथं हाकेच्या अंतरावर आम्ही असतानाही बोलावलो गेलो नाही. >>> ठिक आहे,पुढल्यावेळी योग्य अंतरावरुन हाक-मारली जाइल. ;-)
5 Apr 2012 - 2:01 pm | मन१
हे असले लेख ताकताय ठिक आहे. पण तिथं हाकेच्या अंतरावर आम्ही असतानाही बोलावलो गेलो नाही.
तुमचा अखास अॅण्टिक शैलीत निषेध करण्यात येत आहे.
5 Apr 2012 - 3:42 pm | चिगो
पितळी वस्तू आम्हालाही प्रचंड आवडतात, पण महागही असतात ब्वॉ..
मस्त बाजार.. तृप्त केलंत, आत्मारामा..
5 Apr 2012 - 4:15 pm | विजुभाऊ
इथे मिळणारी इस्त इंडिया कंपनीची नाणी एकदम बोगस असतात. ती अगदी १८३५ सालची असली तरी त्यावर यू के असे लिहिलेले असते. १८५७ च्या अगोदर मुघल सरकाराची नाणी कंपनी सरकार काढीत असे पण त्यावेळेस इंग्लंडचा युके झालेला नव्हता . मुघलकालीन नाणी मात्र भरपूर मिळतात. पेशवेकालीन नाणी मात्र फारशी दिसत नाहीत.
अवांतरः तुघलकाने काढलेल्या चाम्ड्याच्या नाण्यापैकी एखाद्या नाण्याबद्दल काही म्हैती मिळेल का?
5 Apr 2012 - 4:19 pm | नि३सोलपुरकर
धन्यवाद..साहेब
झकास फोटो अन ऊत्तम ओळख ..
कसब्यात असताना बर्याच वेळा चक्कर टाकलेली आहे,आजकाल त्या शुज वगेरे विकणार्या लोकानी बाजाराची बरीच जागा व्यापली आहे.
@ अन्या दातार :कोल्हापुरात पद्मा टॉकिजच्या समोर एका गल्लीत भरायचा (सध्या माहित नाही). रेकॉर्ड प्लेयर, जुने व्हॉल्ववाले रेडीओ याची बर्यापैकी व्हरायटी दिसायची...............
...............साहेबा आमच्या सोलापुरात देखील पद्मा टॉकिजच्या समोर एका गल्लीत असा बाजार भरतो दर मन्गलवारी.(आज ही)
अवातर : च्यायला काल बाजारात चक्कर टाकायला हवी होती राव... काही खास नाही तरी मिपा ची दोन अमुल्य रत्ने "याची
डोळा" पहायला मिळाले असते.
5 Apr 2012 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार
बाजाराची सफर आवडली.
5 Apr 2012 - 5:08 pm | किचेन
मी कसबा पेठेतली,आमच्या घरापासून काही अंतरावरच जुना बाजार आहे.आजोबा, बाबा,काका हे वेळ घालवायला तिथे चक्कर मारत असत,त्यांच्याबरोबर आम्हीही असायचोच.
माझ्या पणजोबांनी माझ्या बाबांना खेळण्यासाठी जुन्या बाजारातून काही पितळेची खेळणी आणली होती.ती हि तिथल्याच एका पितळी पेटीतून.त्यात काही पितळेच्या वाघ,सिंह,हत्ती असे अनेक प्राणी,पक्षी होते.नंतर मात्र ती पेटी माळ्यावर गेली.आई,बाबा,आजी,आजोबा नेहमी त्या खेलण्यान्बद्दल बोलत असत,पण ती खेळणी कुठे आहेत हे कोणलाच माहित नव्हत.आम्हाला मात्र ती बघण्याची खूप इच्छा होती.ती खेळणी शोधण्यासाठी आईने कित्येकवेळा पूर्ण वाडा स्वच्छ केला.अचानक एक दिवस आईने माळा साफ करायला घेतला तेव्हा ती पेटी सापडली.त्या सर्व मूर्ती अंत्यंत आकर्षक,सुबक आणि वजनदार आहेत. त्यात गौरींचे आकर्षक पितळेचे दोन मुखवटेही होते.तेव्हापासून आमच्या घरी गौरी बसतात
5 Apr 2012 - 6:04 pm | हारुन शेख
अ.आ. च्या creativity ला सलाम. असाच एक बाजार नाशिकला बालाजी मंदिराजवळ (कापडपेठ) आहे. पण ती पिढीजात दुकाने आहेत. शिवाय ते लोक रस्त्यावर विक्री करत नाहीत.जुनी नाणी गंगेवर बसणाऱ्या वैदू लोकांकडे अनेक प्रकारची मिळतात. पण जास्त माहिती नसल्याने कधी घेतली नाही. भद्रकाली मार्केट जवळ नळ बाजारापासून ते दूध बाजारापर्यंत जुन्या वस्तू अनेक मिळतात.पण इतक्या वेगवेगळ्या वस्तू नाही भेटत. पितळेच्या अनेक वस्तू सायान्ताराचा साबुदाणा वडा खाता खाता दृष्टीस पडल्या आहेत. पण त्याचे फोटो काढून अशी सुंदर माहिती देवून संकलन करण्याची बुद्धी आम्हाला देवाने देऊ नये याची खंत वाटते. आणि अशी बुद्धी असणार्या लोकांचे अतृप्त आत्मे जगात अजून वावरत आहेत याचा आनंद !
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
7 Apr 2012 - 12:12 pm | अविनाशकुलकर्णी
लेख लाईकला........
वापरलेले टुल्स..ड्रील्स, गाईंडींग व्हील्स व मशीन पारट्स मिळण्याचे हमहास ठिकाण म्हणे जुना बाजार..
अनेक वेळा माल खरेदी केला आहे..मजा येते हिंडताना बाजारात...
माल कमी भावात खरेदी करणे पण एक शास्त्र व कला आहे..
7 Apr 2012 - 7:50 pm | निनाद मुक्काम प...
लय भारी
हा सचित्र लेख पाहून मला एकदम मुंबईच्या चोर बाजाराची आठवण आली.
ह्या लेखामुळे अनेक पुणेकर ह्या बाजारात बाजारहाट करतील ह्यात शंका नाही.
8 Apr 2012 - 2:34 pm | सुधीर मुतालीक
भारी हय राव. कधी कधी अशा बाजाराच्या बाजुनं जाणं होतं पण त्यामध्ये असणारी गंमत बघायची द्रुष्टी नसते. आपल्या लिखाणामुळे वेगळ्या नजरेने बघता येइल. छान.
8 Apr 2012 - 3:06 pm | रघु सावंत
(मेली भलतीच गोंडस होती,पण किंमत ऐकल्यावर मी ही आडवा पडलो...! जरा त्या गोंडस बाटलीची किंमत सांगा म्हणजे इतर अंदाज बांधता येतील कारण वडीलां करिता अडकित्ता घेऊ म्हणत होतो
रघु सावंत
11 Apr 2012 - 12:13 am | अत्रुप्त आत्मा
@जरा त्या गोंडस बाटलीची किंमत सांगा >>> ''अवो..जादा नाय घेनार...फक्त ७०० रुपे द्या... '' ---इति विक्रेता.. :-(
8 Apr 2012 - 3:39 pm | रघु सावंत
सायबा यक्कू क्रूरसिंग ही शस्त्रे तुम्ची स्वत:ची आहेत जमा करायची जरुर नाही. आमच्याही घरी आहेत अशी शस्त्रे म्हणजे तलवार,खंजीर,व इतर
रघु सावंत
8 Apr 2012 - 5:08 pm | स्वाती दिनेश
बाजारात फिरुन यायला मजा आली.
स्वाती
11 Apr 2012 - 10:33 am | मदनबाण
माहितीपूर्ण धागा !
मला देवांना ओवाळायची पंचारती फार फार आवडली ! :)
कधी त्या भागात येण झालं तर मी नक्कीच ती घेईन ! :)
फोटो मस्तच आहेत...
13 Apr 2012 - 5:45 pm | अत्रुप्त आत्मा
धाग्यावर येऊन गेलेल्या सर्वांचे धन्यवाद... हा धागा अनेकांना विशेषत्वानी अवडला...तसे संदेशही अनेकांनी पाठवले,त्यामुळे पुण्यातल्या अश्याच काही जुन्या-[हयात असलेल्या] वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती देण्याचे मनाने घेतले आहे... जसे अठवत जाइल,तसे भेट देऊन वृत्तांत टाकणार आहे. :-)
16 Apr 2012 - 2:05 am | मोदक
वीकांत असेल आणि वल्ली व माझी सोबत चालणार असेल तर जरूर फोनवा... :-)
17 Apr 2012 - 9:21 am | अत्रुप्त आत्मा
@वल्ली व माझी सोबत चालणार असेल तर जरूर फोनवा... >>> चालणार असेल'' चा तीव्र णिषेध :evil:...चालणार असेल काय..? हवीच आहे... जाताना कळवले जाणारच आहे... :-)