जुन्या पुण्यातला-जुना बाजार

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
4 Apr 2012 - 8:32 pm

पुणं कितिही बदललं,नवनविन रुप घेत गेलं तरी पुण्याच्या काही सांस्कृतिक खुणा,किंबहुना पाऊलखुणा आहेत. त्या काळानुरुप काहि तश्याच,काही बदललेल्या,तर काही अपरिहार्यपणे पुसल्या गेलेल्याही आहेत...अशीच एक जुनी आणी खास जुन्यासाठीच प्रसिद्ध असलेली एक काळाच्या ओघातही टिकलेली खुण म्हणजे आमचा लोकप्रीय जुना बाजार...

ऐतिहासिक शनिवारवाड्यापासुन पायी दहा मिनिटाच्या अंतरावर दर रविवारी आणी बुधवारी भरणारा हा बाजार म्हणजे एक प्रकारचा अघोषित सम्राटासारखा आहे... हे एक प्रकारचं गिर्‍हाईकी लोकाधारावर उभं असलेलं लोकं-राज्य आहे. माझ्या ऐकिव माहिती प्रमाणे हा बाजार जुना म्हणजे अगदी ब्रिटिशकालिन आमदानी पासुनचा आहे. त्याचं जुना हे नाव कालावाचक जेवढं आहे,त्यापेक्षा ते आत्मवाचक जास्त आहे. इथे आजही सगळ्या जुन्याच वस्तू मिळतात का हो..?,तर नाही, गरीब जनतेची सोय पाहाणारे कपड्यांचे/भांड्यांचे/चादरी/ब्लँकेटांचे/गृहोपयोगी वस्तुंचे ही स्टॉल्स इथे आहेत..पण ते काळाची गरज म्हणुन...!,जुन्या बाजाराचं खरं वैशिष्ठ्य म्हणजे अगदी शिवकालापासुन ते त्या आधी नंतरच्याही कालातली जुनी नाणी, भांडी,अडकित्ते,देवाची पुजेची उपकरणी,तलवारिंच्या मुठी(आणी तुंम्ही खात्रीचं गिर्‍हाइक वाटलात,तर पाती सुद्धा ;-) ) दुर्बिणी,होकायंत्रे,लाँगप्ले रेकॉर्ड्स,त्याचे प्लेअर्स,कासवछाप-किसण्या,पानाचे डबे,गाड्या,जुने पितळी वस्तरे,चुनाळ्या ,पितळ्या/तांब्याची भांडी अश्या असंख्य आणी नाना प्रकारच्या वस्तू इथे कित्येक वर्ष अव्याहत पणे विकल्या जात आहेत..

माझी या बाजाराशी ओळख अगदी लहानपणापासुनची(इयत्ता ७वी) आहे...आंम्ही रविवारी घरातुन सकाळी हादडुन झालं की ज्यादिवशी ५रु अ-खंड मिळतील,(तेही आपल्याला पाहुण्यांनी दिल्यानंतर आईनी(च),''दे रे इकडे अत्ता..!'' असं करुन कधितरी काढुन घेतलेले) म्हणजे तसे-परत मिळतील तेंव्हा मी २:५०रुपये- ५तास दरानी भाड्याची छोटी सायकल घेऊन आम्च्या ग्यांगमधिल येतिल त्या मित्रांसह जुन्याबाजारात कुच करायचो..अता त्यावेळी आमचं प्रमुख आकर्षण इथे ते काय होतं..?,तर इथे मिळणारे ऊल्हास नगरमेड हेडफोन आणी मुख्य म्हणजे इंग्रजी गाण्यांच्या कॅसेट्स,सोनी,बिलबेर्ड आदी कंपन्यांच्या अत्यंत महाग असलेल्या,जॅक्सन,फिल कॉलिन्स,पेट्शॉप बॉइज,बोनी एम या कलाकार/ग्रुपच्या,,,वापरलेल्या किंवा चोरुन आलेल्या क्यासेटी तिथे,तेंव्हा सुद्धा पंधरा ते पस्तीस रुपयांना मिळायच्या...(दुकानात जाऊन नव्यांच्या किमती ऐकणं सुद्ध तेंव्हा परवडायचं नाही,तर विकत घेऊन त्यातली गाणी कोण ऐकणार...?)

वस्तुतः या कॅसेटही दरवेळी आंम्ही घ्यायचोच असे नाही,पण तिथे फिरायला सुद्धा एक वेगळीच मजा वाटायची...इथे एक बरं आहे,तुंम्ही मालाची कितिही चौकशी केली,हाताळला तरी कोणिही वसकन..ठेवाss असं म्हणुन अंगावर येत नाही,अर्थात हाही काही अगदी पूर्ण सद्गुण नसुन ते एक प्रकारचं,गिर्‍हाइकाला वस्तूच्या प्रेमात-पडू द्यायचं कौशल्य आहे,हे तिथे मुरलेल्या गिर्‍हाइकाला कळुन येतच...! इथे खरेदी करताना काही गोष्टी गाडीबरोबर पार्क करुन आत शिरावं लागतं,नाहितर भल्या-भल्या गिर्‍हाइकांच्या हा बाजार अंगाशी आल्याशिवाय रहात नाही...!आपल्याला खरेदीतलं खूपच कळतं,हा भाव असला तर इथले व्यपारी ते दोन मिनिटात हेरुन आपला भावच करतात. बारगेनिंग हवं तितकं करा पण इरेस पडलात,तर तुम्हाला ती वस्तू अख्या बाजार समोर इज्जत घेऊन तो विक्रेता फुकट सुद्ध अंगावर मारायला कमी करत नाही. हां...अता गिर्‍हाईकी चलाखी हवी तेवढी करता येते..म्हणजे एखादी वस्तू अवडली तर आधी चेहेर्‍यावर 'फार अवडल्याचा' भाव आणणं,नंतर किमतीत उतरवुन...शेवटी ''येताना घेतो...'' असं म्हणुन,फार लांब न जात,त्या विक्रेत्याला दिसेल अश्या तसल्याच वस्तू विकणार्‍या दुसर्‍या स्टॉल समोर जाऊन उभं रहाणं,मग तो आपल्याला लांबुन हाक मारतो,मग ''आलोच'', असं खुणावत,,,जरावेळानी जाऊन,''बघा दादा आपण लास्ट मंजे लास्ट पाचशे देऊ''..असं एखाद वाक्य फेकणं, हे सगळं जमलं तर साधारण अपेक्षित भावात वस्तू हाती लागते. अर्थात यापेक्षाही रोखठोक डायरेक सेटलमेंट सारखे पर्याय वापरता येतात...पण सगळा गिर्‍हाइकी भावुकपणा दूर ठेऊन...!

त्यामुळेच मला, 'अगदी तय्यारातल्या तयार अट्टल गिर्‍हाइक' असं म्हणवणारा कुणी भेटला,तर मी त्याला हे च्यायलेंज अगदी बिन दिक्कत देऊ शकतो- हा बाजार उठवुन दाखवा...! आपण मानलं तुम्हाला...! ;-)

१)अता त्यावेळचं कॅसेटयुग संपत आलं असलं,तरी इथे अजुनही केसेट्स,टेप,वॉकमन्स आदी तुरळक प्रमाणात दिसतातच...!



२)अवजारं आणी हत्यारं-खाटिककामापासुन ते सुतारकामा,बांधकाम,लोहारकामा पर्यंतची...!




३)अता नाणी/नोटा-सातवाहन,गुप्तकाळ शिवकाळ,ब्रिटिशकाळापासुन ते,अगदी आजच्या काळापर्यंतची...



४)आणी अता हाय अँड टेरर पॉइंट ऑफ जुना बाजार... सावधपणे खरेदी करण्याच्या जुन्या वस्तू...




५)ह्या काचेच्या वस्तू...मी खास असल्याचा आव अणला,आणी मग त्यानी मला खास-आत नेऊन दाखवल्या...! ;-)

६)गृहोपयोगी वस्तूंची म्होट्टी रेंज...

७)दुर्बिणी,भिंग,होकायंत्र,घड्याळं..इ...इ...





८) ही आडवी पडलेली सुबक,नाजुकशी बाटली...(मेली भलतीच गोंडस होती,पण किमत ऐकल्यावर मी ही अडवा पडलो...! ;-) )

९)आणी आता सगळी जुनी भांडी,अडकित्ते,चुनाळ्या,पळी-पंचपात्रं,साखळ्या,पंचारत्या,तांबे,पितळी डबे,किसण्या,देव मूर्ती...इ...इ...












१०)हे मला अवडलेले खास २ अडकित्ते...यात सुपारी लवकर फुटेल..पण विक्रेत्याचा...भाव..?..तो नै लवकर फुटायच..! लै चकरा मारायला लावतात...तेंव्हा सुपारी'फुटते...! ;-)

११) आणी हा पण बाजारा इअतकीच जुनेपणाची साक्ष देणारा... कसा चमचम करतोय बघा...! :-)

संस्कृतीवावरसमाजजीवनमानविचारआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 May 2012 - 10:28 am | विश्वनाथ मेहेंदळे

च्यायला, तुम्ही दोघे काय पॅकेज डील मध्ये येता काय रे ?

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2012 - 2:28 pm | अत्रुप्त आत्मा

अभिष्टा's picture

16 Apr 2012 - 12:12 pm | अभिष्टा

इथे छान वस्तू दिसत आहेत :-) पुर्वी रस्ता चुकून मुंबईतल्या चोरबाजारात जाऊन पोहोचले होते तेव्हा जिकडे तिकडे हत्यारंच दिसली होती. एवढी हत्यारं पाहून जिथून आले त्याच रस्त्याने परत गेले होते. नंतर तिकडे फिरकलेच नाही.

कवितानागेश's picture

17 Apr 2012 - 5:22 pm | कवितानागेश

मला माझ्याकडच्या जुन्या कॅसेट्स, वॉकमन, कॅसेट प्लेयर, १-२ जुने मोबाईल फोन्स, चार्जर्स वगरै विकायचय.
१) मला तिथे जाउन बसता येईल का की हाकलतील?
२) माझ्याबरोबर कोण कोण येणार? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2012 - 5:27 pm | अत्रुप्त आत्मा

@मला माझ्याकडच्या जुन्या कॅसेट्स, वॉकमन, कॅसेट प्लेयर, १-२ जुने मोबाईल फोन्स, चार्जर्स वगरै विकायचय.
१) मला तिथे जाउन बसता येईल का की हाकलतील? >>>
२) माझ्याबरोबर कोण कोण येणार? >>> म्या हाय ना...फक्त तिथे गेल्यावर गुरगुरायचं नाय ;-)

बहोत खूब, ले़ख नजरेतून सुटल्यानं प्रतिसादाला उशीर झाला, लगे रहो!

इरसाल's picture

3 May 2012 - 3:29 pm | इरसाल

बघा होतेय काय

मी-सौरभ's picture

3 May 2012 - 4:34 pm | मी-सौरभ

होणारच :)
आमच्या शुभेच्छा!!

मी-सौरभ's picture

14 May 2012 - 4:28 pm | मी-सौरभ

हा धागा अजुन इथेच???

धाग्यात 'सचिनचा' उल्लेख आलाय की काय???

इरसाल's picture

14 May 2012 - 6:09 pm | इरसाल

तो पण पुरा करुन टाकतो.

खुश ......... झाले १००

अत्रुप्त आत्मा's picture

18 May 2012 - 4:25 pm | अत्रुप्त आत्मा

@तो पण पुरा करुन टाकतो.
खुश ......... झाले १०० >>> :-D आमची शंभरी भरवल्याबद्दल धण्यवाद > ;-)

प्रसाद गोडबोले's picture

7 May 2014 - 10:11 pm | प्रसाद गोडबोले

लय भारी जागा आहे ही !

आता पुण्यात आलो की एकदा आत्मुबुवांसोबत इथे चक्कर मारायलाच पाहिजे !!

बाकी तुम्हाला आवडलेले दोन्ही अडकित्ते बेस्ट आहेत ..एस्पिशीयली दुसरा तर लयच भारी ! घेतला का विकत ? कितीला पडला ??

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2014 - 7:04 pm | अत्रुप्त आत्मा

घेतला होता...होता म्हणायचे..कारण आमच्या कर् नाटक ;) वाल्या एका मित्रानी तो माझ्या कडून नेला... हिंदीत अगवा करना .. म्हणातात ना तसा.

पार शृंगेरीला गेल्यावर सांगितलन मला.. :-/

वर म्हणतो..तू पुण्यातलाच तुला मिळेल की दुसरा! :-/

मी अता एका चित्याच्या अडकित्त्यावर गेली ३ महिने नजर ठेऊन आहे. इक्रेता मेला १४०० वर अडून बसलाय.. :-/

ट्रेकिंगचे पहिले पिट्टू इथूनच घेतलेले आम्ही... एकच नंबर जागा आहे ही.

एकदा ठासणीची बंदूक घ्यायची इच्छा आहे पण इथे मिळाली नाही... *bomb* *mamba* *crazy*

माझीही शॅम्पेन's picture

8 May 2014 - 1:15 pm | माझीही शॅम्पेन

वाह बुवा .... __/|\__

भन्नाट धागा .. ह्या सगळ्या वस्तू जबरा आहेत

सही रे सई's picture

30 Jan 2017 - 8:11 pm | सही रे सई

मस्त मस्त .. पुण्याची आठवण अजूनच तीव्र झाली .. खफ च्या निमित्ताने हा लेख वाचायला मिळाला हे एक बर झाल.

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 9:17 pm | संदीप डांगे

हा धागा भारी. वर काढण्याचे पाप माथी घेतोच! =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

31 Jan 2017 - 1:03 pm | हतोळकरांचा प्रसाद

भारी असतो हा बाजार! कॉलेजच्या बाजूलाच असल्याने कॉलेजच्या दिवसात दर बुधवारी चक्कर असायची! खासकरून कॉम्पुटरचे पार्ट मिळवण्यासाठी. १०० रु. किलो हार्ड डिस्क विकल्या जायच्या. किलोभर घ्यायच्या, लागली तर लागली एखादी चांगली डिस्क! माझ्या एका मित्राला एक ८० GB (त्याकाळात खूप जास्त समजली जायची) लागली होती! :):)