मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली. गेल्या काही वर्षांत लहान दोन अक्षरी नावाचेही भरपूर सिनेमे येत गेले. सध्या तर इंग्रजी नावाच्या हिंदी सिनेमांचेही चलन आहे.
तरीही ह्या सर्वात ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ जास्त लक्षात राहतात. नुसते चांगले आणि लांब नावाचे सिनेमे म्हणून नव्हे, तर त्यांच्या लांबीमुळे सुद्धा. हिंदी (व मराठीही) सिनेमाची लांबी साधारणत: २:३० तास असते व इंग्रजी सिनेमे १:३० ते २:०० तासांचे असायचे. पण ह्याला अपवाद असणारे हे दोन सिनेमे. हम आपके हैं कौन - ३:४५ तास, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे - ३:१५ तास. आणखी काही अपवाद म्हणजे संगम (४ तास), शोले (३:३० तास) व लगान(३:४५). मुख्य म्हणजे हे सर्व सिनेमे तुफान चाललेत. पण म्हणून प्रत्येकाने मोठ्या लांबीचे सिनेमे बनविण्याचा प्रघात नाही आला.
आणखी एक प्रकार जो इंग्रजी सिनेमांतून आला. सिक्वेल. सिनेमाचा पुढील भाग काढणे. ’नगीना-निगाहें’, ’वास्तव-हथियार’, ’स्टाईल-एक्सक्यूज मी’. नुकतेच आलेले ’हेराफेरी- फिर हेराफेरी’ आणि ’सरकार-सरकार राज’. मी ऐकल्याप्रमाणे एन चंद्राने ’स्टाईल-एक्सक्यूज मी’ सोबत तिसरा सिनेमा काढणार आहेत. तसेच ’फिर हेराफेरी’ ही शेवटी असा अडकवून ठेवला आहे की त्यातून पुढे कथा चालू करू शकतात. २००२ मध्ये आलेल्या ’आंखे’चे ही दोन शेवट आहेत. जेणेकरून अर्धवट ठेवलेल्या प्रसंगापासून पुढील सिनेमा चालू करता येईल.
तरी आता लहान लांबीचे सिनेमे बनविणे हे ही जरा फॅशनमध्ये आहे.१:३० तास ते २ तासाचे. तरी हे सर्व एकाच कथेची लांबी होती हो. त्यात मग नवीन प्रकाराची भर घातली राम गोपाल वर्माने. सिनेमा ’डरना मना हैं’. ह्यात वापरल्या सहा कथा. तीन कथालेखक, एक दिग्दर्शक. मग त्याला छेद दिला त्यानेच. ’डरना जरूरी है’. सहा कथा, सात दिग्दर्शक. पण त्या प्रकारातही जास्त कोणी हात मारायचा प्रयत्न नाही केला. ह्यामागचे कारण बहुधा असेल की ते चालले नाहीत. तरी ह्याच प्रकारात मागील वर्षी आला ’दस कहानियां’. १०-१२ मिनिटांच्या कथा. हा सिनेमा मी परवा पाहिला टीव्ही वर. पूर्ण नाही पहायला मिळाला. पण एक फायदा आहे. वेगवेगळ्या कथा असल्याने पुन्हा पाहताना कुठल्याही कथेपासून सुरूवात करू शकतो. ;)
असो, हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आज एका वाहिनीवर नवीन हिंदी सिनेमाची माहिती पाहिली. ’मुंबई कटींग’ नावाचा नवीन सिनेमा येणार आहे. त्यात ११ लघुकथा आहेत. ११ दिग्दर्शक. जवळपास १० मिनिटांची एक कथा, म्हणजे ११० मिनिटे म्हटले तर चित्रपटगृहात जास्तीत जास्त २ तास.
चला पाहूया, हा सिनेमा काय बदल घडवून आणतो ते.
प्रतिक्रिया
31 Jul 2008 - 1:31 am | प्रियाली
लांबलचक नावं ठेवण्यात मराठी चित्रपट मागे नाहीत ;)
१. बोट लावीन तिथे गुदगुल्या
२. थांब लक्ष्मी कुंकू लावते
३. आयत्या बिळात नागोबा - आयत्या घरात घरोबा
४. चंदनाची चोळी अंग अंग जाळी
५. आंधळा मागतो एक डोळा
६. देवा तुझी सोन्याची जेजुरी
७. पोरीची धमाल बापाची कमाल
८. शांतता! कोर्ट चालू आहे. :)
९. सुंदरा मनामध्ये भरली
१०. गाव तसे चांगले पण वेशीला टांगले
वगैरे वगैरे, आठवायचे म्हटले तर लांब यादी असेल.
31 Jul 2008 - 2:35 am | अनामिक
जल बिन मछली नृत्य बिन बिजली वरचं संध्याचं नृत्य बघा... काय ते अंगविक्षेप केलेत तिने... ह. ह. पु. वा. होते!
31 Jul 2008 - 3:38 am | राधा
सिक्वल सिनेमात,
धुम्...........धुम २...............धुम ३.......................
विसरला की र तु............;)
31 Jul 2008 - 8:30 am | विसोबा खेचर
देवदत्ता, हिंदी शिणेमांविषयी तुझा बराच अभ्यास दिसतो...! :)
अवांतर - अनुष्का आता हिंदी शिणेमात येत्ये अशी खबर आहे रे! :)
तात्या.
31 Jul 2008 - 2:52 pm | येडा अण्णा
पहीली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर
सासू नंबरी जावई दस नंबरी
31 Jul 2008 - 7:10 pm | पारिजातक
अलबर्ट पिंटो को घुस्सा क्यो अत है? असला काही तरी लांब लचक नावाचा एक सिनेमा आहे बघा.
आम्हाला फ़क्त नावच लक्षात राहिल.
दमशेराज मधे वापरायचो आम्ही. नक्की भेंडी चढ़ायची !!! ;)
पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
31 Jul 2008 - 8:07 pm | देवदत्त
अरेच्च्या... मी लेखन केले होते ते लघु कथांवरील सिनेमाच्या माहितीवरून आणि त्याकरीता.
इथे तर लांब नावांची स्पर्धा चालू झाली ;)
मराठी सिनेमे मी तसे कमीच बघितले. पण जेव्हा मिळेल तेव्हा बघत असतो. सिनेमागृहात मी बहुधा दोनच मराठी चित्रपट पाहिलेत. पहिला 'झपाटलेला', आणि दुसरा 'लेकरू'. बाकी सर्व व्हिडीयो कॅसेट/ सीडी आणून. किंवा मग टीव्ही/केबलवर. जेव्हा सिनेमागृहात जास्त जाणे सुरू झाले तेव्हा मराठी सिनेमेच कमी झाले होते.
लांब नावाचे चित्रपट तुम्ही सांगितलेले आहेतच आणखी आठवणारे म्हणजे,
मुझे मेरी बीवी से बचाओ.
सलीम लंगडे पे मत रो
मेरा पती सिर्फ मेरा है
दुल्हन वोही जो पिया मन भाये.
प्रियाली, तुम्ही सांगितलेली नावे माहित होती पण काल लक्षात नव्हती.
राधाजी, खरोखरच धूम मी कसा विसरलो. :( माझे आवडते दोन्ही ही भाग. तिसरा भाग येत आहे ते परवाच कळले.
'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है' आणि 'सलीम लंगडे पे मत रो' ह्या दोन सिनेमांची नावे माहित असल्याने मी आमच्या गटाला डम्बशराडमध्ये (असेच ना ते?) हरण्यापासून वाचवले होते :)
तात्या, माझा अभ्यास जास्त नाही. आणि गेल्या दोन वर्षांत तर खूप कमी झाला. पण सिनेमा पहायला, सिनेमावर बोलायला खूप आवडते.
अनुष्का वहिनी हिंदी सिनेमात? माझ्याकडून शुभेच्छा.
31 Jul 2008 - 8:14 pm | प्रियाली
हा पकाऊ चित्रपट मी लहानपणी पाहिला होता. टिव्हीवर लागला म्हणून हो. कुणाला बघायला मिळालाच तर भारतीय चित्रपटातील एक व्यर्थ आर्टफिल्म म्हणून बघावा.
अरविंद देसाई की अजीब दास्तान
1 Aug 2008 - 12:22 pm | पारिजातक
धन्यवाद देवदत्त राव!!!
पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
31 Jul 2008 - 9:28 pm | अनामिक
शिनुमाचं काय घिउन बस्लात? आज काल महाजालावर लोक आपलं टोपणनावबी लई लांब ठेवत्यात... आता हेच बगा -"एक षष्ठांश गोरी यमी" :/
यमे - ह. घे.
31 Jul 2008 - 9:40 pm | मुक्तसुनीत
"एक षष्ठांश गोरी यमी" ला पु.ल. देशपांड्यांच्या चितळे मास्तरांचा संदर्भ आहे :-)
31 Jul 2008 - 10:47 pm | छोटा डॉन
"एक षष्ठांश गोरी यमी" ही व्यक्तीरेखा पु. लं. नी त्यांच्या "हरितात्या" ह्या व्यक्तीरेखेत वापरली आहे असा माझा आंदाज आहे.
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचे वर्णन करताना हरितात्या म्हणतात "आहाहा, काय ते सौंदर्य. ह्या यमीपेक्षा कमीत कमी ६ पट गोरी असली पाहिजे ती." ... [ असेच काहितरी आहे, नक्की आठवत नाही.]
पण "चितळे मास्तर" एकदम क्लास !
असो. जास्त विषयांतर नको ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
31 Jul 2008 - 11:11 pm | मुक्तसुनीत
येस सर ! आमची गल्लत झाली ! :-)
1 Aug 2008 - 2:27 am | अनामिक
हो ते आले होते लक्षात, पण मला लांबलचक नावा बद्दल आश्चर्य वाटलं. प्रत्येकवेळी मिपावर प्रवेश करताना किती कष्ट पडत असतील!
31 Jul 2008 - 9:43 pm | डोमकावळा
पाप को जलाकर राख कर दूंगा.
5 Aug 2008 - 11:23 pm | देवदत्त
लिहिलंय की राव. :) असो, त्याबाबत काही म्हणणे नाही ;)
मध्येच वाटलं होतं की मोठ्या नावाचे नसीरूद्दीन शहाचेच सिनेमे आहेत की काय?