नमस्कार मंडळी,
प्रस्तावना :
१. ही कोणतीही जाहीरात नाही.
२. ह्यात कोणताही स्वार्थ नाही.
३. कोणतेही साहित्यमुल्य/सेटल द स्कोर नाही.
४. गैरसमज नकोत. ;)
धन्यवाद.
खरं तर मराठी आंजावरून तात्पुरता सन्यास घ्यायचं ठरवलं होतं, पण पुन्हा एकदा उफाळून आलंच. वांझोटे धागे, चर्चा, जुलाब लावणार्या कविता, मराठी माणूस आहोत हे सिद्ध करणारे चरणखेचक धागे आणि रिकामचोट शतकी प्रतिसाद.. ( अर्थात यात माझाही सहभाग असेलही) पण यातून खरच काय साध्य करतोय असा विचार मनात आला.
असो,
मूळ मुद्द्यावर येऊया,
मी मिपावर आलो ते "राघव - पुर्वीचा मुमुक्षु" या व्यक्तीमुळे. सुरुवातीला केवळ मनोरंजन म्हणून याकडे पाहिले आणि हळूहळू एक सदस्य झालो ते कायमचा. माझा पहिला-वहिला कौल चांगला चर्चिला गेला पण तो आता नव्या मिपा धोरणांमुळे अस्तित्वात नाही.
आता सध्याच्या चर्चा/सेटल द स्कोर्/विडंबने/सुखावणारे लिखाण पहाता एक विचार असाही स्पर्शून गेला की काहीतरी विधायक घडले तर वाईट काय? म्हणून हा प्रपंच.
भाग १ यासाठी म्हंटल आहे की भाग २ हा सामुदायीक/चर्चेला अनुसरून असावा.
तर हा भाग माझ्या नोकरदार मिपाकरांसाठी :)
काही मुद्दे खाली मांडत आहे
१. एकंदरीत मराठी माणसे नोकरीमधे उच्चपदस्थ कमी दिसतात - यात आपण मिपावर एखादे नोकरी विषयक सदर सुरु केल्यास उपयुक्त ठरेल. ( मी या आधी काही मिपाकरांना भेटल्यानंतर मदत केली आहे हे नम्रपणे नमूद करु ईच्छितो.)
२. परदेशात नोकरी हवी असल्यास मराठी लोक उच्चपदस्थ असले तरी आणि माझ्या अनुभवाप्रमाणे मदत करणारे कमीच.
३. भारतातही आपल्या कंपनीत नोकर्यांसाठी जागा उपलब्ध असतात, त्यात जर मिपावरच्या एक व्यक्तीचा फायदा झाला तरी धन्यच.
:::नोकरी आणि ईतर प्रस्ताव येत असतील तर ते निर्धोक पुढे यावेत ही अपेक्षा.
सध्या हा चर्चा प्रस्ताव सुरु ठेवतो..
ओपन फोरम...
पुढचे पुढे
प्रतिक्रिया
21 Mar 2012 - 7:59 pm | पैसा
चांगल्या चर्चेला शुभेच्छा!
21 Mar 2012 - 8:02 pm | रेवती
वेलकम हो साहेब.
21 Mar 2012 - 8:30 pm | चिरोटा
चांगला प्रस्ताव. करून दाखवण्याच्या वेड्या कल्पनांतून आपण लोक बाहेर आलो आहोत असा अंदाज आहे.नोकरीसाठी मदत करणे म्हणजे वशीलेबाजी ही व्याख्या आता ईतिहासजमा झाली आहे.
21 Mar 2012 - 8:54 pm | मराठमोळा
>>.नोकरीसाठी मदत करणे म्हणजे वशीलेबाजी ही व्याख्या आता ईतिहासजमा झाली आहे.
+१
सहमत आहे :)
21 Mar 2012 - 8:32 pm | विजय_आंग्रे
>>एकंदरीत मराठी माणसे नोकरीमधे उच्चपदस्थ कमी दिसतात<<
हे तुम्हाला कुणी सांगीतले?
21 Mar 2012 - 8:38 pm | मराठमोळा
>>हे तुम्हाला कुणी सांगीतले?
विजय साहेब,
हे मला कुणी सांगितले नाही. हे माझे वैयक्तीक निरिक्षण आहे हे नमूद करु इच्छितो. गैरसमज नसावा. :)
22 Mar 2012 - 4:50 am | स्पंदना
निरिक्षण आहे ते. अन बर्याच अंशी खर ही आहे.
बाकि ममो चांगला विचार. ( अपर्णा बघ कुठ ठिगळ लागतय का )
21 Mar 2012 - 9:01 pm | यकु
१. एकंदरीत मराठी माणसे नोकरीमधे >>>>उच्चपदस्थ<<<< कमी दिसतात - यात आपण मिपावर एखादे नोकरी विषयक सदर सुरु केल्यास उपयुक्त ठरेल. ( मी या आधी काही मिपाकरांना भेटल्यानंतर मदत केली आहे हे नम्रपणे नमूद करु ईच्छितो.)
२. >>>>परदेशात नोकरी हवी असल्यास<<<< मराठी लोक >>>उच्चपदस्थ<<< असले तरी आणि माझ्या अनुभवाप्रमाणे मदत करणारे कमीच.
एक निर्धोक प्रस्ताव लिहिला होता, पण उच्चपदस्थ, उच्चपदस्थ आणि परदेशातील नोकरी हे वाचून साशंक झालो आणि आता लगेच फारच क्षुल्लक मदत होईल असे वाटले. तेव्हा 'उच्चपदस्थ', 'उच्चपदस्थ', 'परदेशात नोकरी' करु इच्छिणार्या किती लोकांना मदत करतात ते आधी पाहू इच्छितो. बाकी इथून काढून टाकण्यापूर्वी माझा प्रस्ताव वाचलेल्यांना तो गरजूंपर्यंत पोहोचाविण्यास कधीही खुला आहे.
22 Mar 2012 - 8:01 am | मराठमोळा
थोडी गल्लत..
केवळ उच्चपदस्थांच्या/परदेशातील नोकरीसाठी हा धागा नाही. मी स्वतः देखील कुणी उच्चपदस्थ नाही. :) मराठी लोक उच्चपदस्थ कमी असतात म्हणून मराठी लोकांना नोकरीसाठी डाववले जात असावे असे माझे मत आहे. आपण आपल्या लोकांना मदत करावी अशी अपेक्षा आहे.
तुमचा प्रस्ताव जरूर मांडा. :)
22 Mar 2012 - 1:00 am | सांजसंध्या
चांगला विचार. (मात्र अनावश्यक शेरेबाजी टाळता आली असती हे वै.म :) )
22 Mar 2012 - 4:16 am | निनाद
उत्तम प्रस्ताव आहे! मदत घ्यायला-करायला आवडेल.
22 Mar 2012 - 9:12 am | फारएन्ड
तीन्ही मुद्द्यांशी सहमत आहे.
22 Mar 2012 - 10:23 am | सस्नेह
मदत ही कोणत्या सदरात मोडते हे लक्षात आले नाही. तसेच याबाबत कार्पोरेट जगतात इच्छा असुनहि काही मदत करता येईलसे वाटत नाही. पण उपक्रम ( सुरु झाल्यास ) स्तुत्य आहे.
22 Mar 2012 - 10:54 am | शिल्पा ब
जर कोणती मदत हवी असेल याचा अंदाज नाही तर ती तुम्ही करुच शकणार नाही असं का वाटतं? जागा उपलब्ध असेल तर त्याबद्दल सांगितलं तरी पुरे असंतं...कमीत कमी ज्याला इच्छा आहे ती/तो प्रयत्न तर करेल!!
कमाल आहे तुमच्या नकारात्मक विचारांची!!
22 Mar 2012 - 10:34 am | सर्वसाक्षी
ममोंचा प्रस्ताव रास्त आणि हितकारक वाटतो. ममोंचे विशेष आभार.
असाच विचार माझ्याही मनात आहे. आपण जिथे कुठे नोकरी करत आहोत तिथे वा आपले मित्र वा आप्त यांच्याकडे संधी उपलब्ध असल्यास त्याची माहिती आपण वावरत असलेल्या मराठी माणसांच्या संस्थळावर देणे उचित ठरावे. जर पदासाठी पात्र उमेदवार घ्यायचा तर तो इथेही मिळण्याची शक्यता आहे.
संपादकांनी असे सदर चालु करायचा विचार अवश्य करावा. वरील विचार योग्य वाटल्यास किमान संपादक/ संचालक/ मालक वगैरे मंडळींनी इथे संधीची माहिती प्रसिद्ध करण्याची अनुमती द्यावी. ज्या उमेदवारास स्वारस्य असेल तो लेखकाला व्यनि पाठवेल, त्यामुळे इतरांना उपद्रव होण्याची शक्यता नाही. फसवणुकीची शक्यता वा कायदेशीर बाबी विचारात घेता संपादक/ संचालक/ मालक वगैरे मंडळींनी "सदर नोकरी संबंधी हे संस्थळ इथे जाहिरात केलेल्या माहितीसाठी जबाबदार नाही, इच्छुकांनी सर्व माहिती स्वतः मिळवावी आणि आपल्या मर्जिने व आपल्या जबाबदारीवर अर्ज करावे" असे दावाखंडन विधान देणे योग्य ठरेल.
संपादक/ संचालक/ मालक वगैरेंनी लवकरात लवकर कौल द्यावा. होकार असेल तर मी जिथे नोकरी करतो तिथे काही पदांसाठी उमेदवार हवे आहेत त्याचा तपशिल इथे देता येईल.
22 Mar 2012 - 10:42 am | धन्या
ममोचा प्रस्ताव आणि सर्वसाक्षींचं हे मुद्देसुद "इम्प्लिमेंटेशन" दोन्ही उत्तम. संमंने विचार करायला हरकत नसावी.
22 Mar 2012 - 11:17 am | पैसा
एक सामान्य सदस्य या नात्याने तुमच्या विचारांशी सहमत आहे. सदर सुरू करणे किंवा इतर कोणत्याही धोरणात्मक गोष्टीबद्दल संपादक मंडळ, सल्लागार आणि मालक चर्चा करून संस्थळाच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतीलच. पण या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. तोपर्यंत खरडफळ्यावर अशा रिक्त पदांबद्दल माहिती द्यायला काही अडचण येऊ नये. शिवाय खरडफळ्यापर्यंत फक्त लॉग इन करणारे सदस्य जाऊ शकतात त्यामुळे इथे ओपन जाहिराती केल्या आहेत असं होणार नाही.
23 Mar 2012 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असा एक धागा मागे कोणीतरी काढल्याचे आठवते. कुठे कुठे रिक्त पदे आहेत. असं काहीतरी होतं.
-दिलीप बिरुटे
22 Mar 2012 - 10:45 am | ५० फक्त
अशी माहिती मध्यंतरी मा. श्री. परा, यांचे खरडवहीत दिसुन येत असे, असो उपक्रम चांगला, त्यातल्या त्यात समोरच्या कोप-यामागं असलेलं रिसेशनचं वादळ पाहता महत्वाचा.
22 Mar 2012 - 11:36 am | राघव
ममो, चांगला प्रस्ताव. शक्य तेवढी मदत करण्यास आनंदच होईल.
कट्ट्यांचा उपयोग याकामी मोलाचा होईल, व्यक्तिशः भेटणे शक्य झाल्यामुळे. शेवटी नाही म्हटले तरी प्रत्येकाला आपण कोणाला मदत करतोय हे जाणून घ्यायची इच्छा असणारच.
अर्थात् केवळ नोकरीविषयक मदत मिळेल म्हणून मिपावर सदस्यसंख्या वाढू नये.
ही जॉबसाईट नाही एवढा संदेश जरी मिळाला तरी पुरे.
राघव
22 Mar 2012 - 12:20 pm | परिकथेतील राजकुमार
ही गावची धुणी आम्ही एकदा धुतली होती. पण त्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ आणि एकाही पैशाचा परमार्थ नसतान देखील आणि मुख्य म्हणजे ही धुणी आम्ही आमच्या खरडवहीत धुवत असताना देखील, अधिकारी वर्गाकडून त्याविषयी नाराजी आणि शंका उपस्थीत झाल्याने तो उपक्रम बंद केला.
असो...
हे अतिशय धडधडीत खोटे आहे ह्याची सर्व मिपाकरांनी नोंद घ्यावी.
अजूनही बाटली आणि ३% च्या प्रतिक्षेत असलेला.
परा
22 Mar 2012 - 12:26 pm | इरसाल
शक्य होइल तितकी मदत करेन हे आश्वासन.
22 Mar 2012 - 12:33 pm | विजय_आंग्रे
चांगला उपक्रम
शुभेच्छा..!!
22 Mar 2012 - 3:33 pm | स्वातीविशु
चांगला प्रस्ताव आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा. :)
22 Mar 2012 - 6:22 pm | पिंगू
चांगला प्रस्ताव आहे खरा. पण नंतर याचा बट्ट्याबोळ होऊ नये हीच भावना आहे.
- पिंगू
23 Mar 2012 - 1:48 pm | सुहास..
ईथे ईतके विधायक चालु असताना, असा प्रश्न का पडावा ब्वा !!
हे बघ , गोडसे वि. गांधी, न जमल्यास सावरकर, स्त्री समानता वि. पुरुषांचे हक्क , आरक्षण,परदेशातील संस्कार आणि हे कमी पडत असेल तर, मी केलेला काशिदा, माझ्या भाच्याच्या मुलीच्या जावयाच्या भावाच्या बायकोच्या मुलाने ( वय वर्षे सात) घरातल्या भिंतीवर काढलेली चित्रे, घरातल्या किचन मध्ये दळलेले दळण, मुक्तचड्डीतल्या ...आपल हे...मुक्तछंदातील कविता, माझ्या गाडीतल्या फ्लिप मधील पुसणीचा कपडा गायब होतो - मदत हवी आहे, खड्ड्यामध्ये कसे जायचे - कृपया मदत करा, बायकोला गिफ्ट काय देवू- सल्ला द्या, बायको संशय धरते - मिपाकरांनो मदत करा, मॅनेजर शिव्या घालतो - काय करावे , शु लेस बांधता येत नाही - शिकवणी मिळेल का ? ही दारू कशी बनते, ते कॉकटेल कसे बनवाने, वर तोंड करून ते कसे प्यावे ? ;)
आता अजुन किती विधायक हवे आहे रे तुला ;)
23 Mar 2012 - 2:04 pm | यकु
बराबर हायेऽ!
आणि वरुन स्वत: नोकरी न मिळवू शकणार्या, किंवा मिळवण्याची धमक असली तरी आयतीच मिळायची सोय तयार करुन दिलेल्या रिकामचोट माणसांना उच्चपदस्थांनी इथे सहज नोकर्या मिळवून दिल्या तर ती काय दिवे लावणार आहेत? इथूनच नोकर्या मिळवतील आणि इथेच येऊन पडीक पडतील पुन्हा.. ;-)
म्हणजे हे विधायक की विघातक की आणखी कसं ते कळत नाहीय.. :)
25 Mar 2012 - 5:27 am | मराठमोळा
नमस्कार मंडळी,
या धाग्यावर (मी काढल्यामुळे की काय? ;) ) पण फार लोकांनी रस दाखवला नाही. ज्यांनी दाखवला त्यांचे विषेश आभार.
मराठी लोकांची मदत करण्याची भावना देखील कमी आहे असे दिसुन आले आहे. त्यामुळे इतर लोक कधी कधी पात्रता नसताना देखील नोकरीसाठी निवडले जातात. अर्थात मी स्वतः अशा कोणत्याही प्रकाराखाली भरडला गेलोय असे मुळीच नाही, पण एकंदरीत जे अनुभव आहेत त्यातून हा प्रस्ताव मांडला होता. मराठी आंतरजालाचा उपयोग केवळ टाईमपाससाठी न होता काही विधायक करण्यात देखील झाला असता तर आनंदच वाटला असता.
असो..
बाकी जे काही प्रतिसाद आहेत त्यावरुन संम्/मालक काय तो निर्णय घेतीलच. निर्णय नाहीच झाला तरी अगदी धागा अप्रकाशित केला तरी हरकत नाही. :)
धन्यवाद,
25 Mar 2012 - 6:42 am | यकु
मदत आवश्यक असणारा एक गरजवंत दाखवून द्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा मराठी लोकांच्या मदत करण्याच्या भावनेकडे पहा असं म्हणू इच्छितो. :)
उगाच भुई धोपटून काय होणार आहे?
25 Mar 2012 - 7:58 am | मराठमोळा
>>मदत आवश्यक असणारा एक गरजवंत दाखवून द्या
हे विधान तुम्ही का केलेत ते मला माहित नाहे परंतु मदतीची गरज सर्वांनाच कुठे ना कुठे भासते. आणि आपल्या माहितीतही बरेच लोक असतात की ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, कदाचित ते मिपाकर नसतील पण आपले मित्र आप्तेष्ट असतील. कुणी मिपाकर देखील इथे स्वतःहून मदत मागायला कदाचित संकोच मानत असेल पण एकदा मार्ग खुला झाला की आपोआपच त्याचा फायदा सर्वांना होईलसे वाटते.
असो,
आता या क्षणी कुणा-कुणाला मदतीची गरज आहे हा मुद्दा नाही. आणि कुणी स्वतःहून जाहीरपणे मदत मागावी आणि मग प्रस्तावाचा विचार व्हावा हेदेखील रास्त वाटत नाही.
धन्यवाद.
25 Mar 2012 - 8:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ममो, मिपाकर सदस्य म्हणून मला वाटतं की, एक प्रयोग करुन पाहा. जमलं तर करावं नाही तर सोडून द्यावं.
-दिलीप बिरुटे
25 Mar 2012 - 8:18 am | यकु
ममो,
मदत घेणारा आत्ता तरी इथे कुणी दिसत नाही, आणि तुम्ही लगेच मराठी लोकांमध्ये मदतीची भावना कमी असते असलं काही मानून बसलात म्हणून मी गरजवंत दाखवून द्या म्हणजे खरं काय ते उघड होईल हे म्हणतोय.
25 Mar 2012 - 8:37 am | मराठमोळा
>>मदत घेणारा आत्ता तरी इथे कुणी दिसत नाही,
यक्कू शेट,
एखाद्या धाग्यावर डायरेक्ट कुणी मला नोकरी हवी आहे/शोधतो आहे असे कुणी जाहीरपणे सांगणार नाही असे मला वाटते. गरजवंतच शोधायचा झाला तर तुम्ही स्वतः सांगा तुमच्या आताच्या नोकरीपेक्षा चांगल्या पगाराची तुम्हाला आवडेल अश्या नोकरीची आणि तुम्ही पात्र असाल अशी जाहीरात दिसली तर तुम्ही अर्ज करणार नाही का?
>>तुम्ही लगेच मराठी लोकांमध्ये मदतीची भावना कमी असते
हे मी ह्या धाग्यावरुन नाही तर मला/मित्रांना प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांवरुन म्हणतोय, भारतातच नाही तर परदेशातही मराठी लोकांची संख्या नोकरीमधे कमीच दिसते. उदा. मी आहे तिथे शनिवार रविवारी चालण्यार्या पंजाबी/तामिळ्/तेलगु शाळादेखील १९८०-९० पासून अस्तित्त्वात आहेत इतकी त्यांची संख्या लक्षणीय आहे. हे केवळ एक उदाहरणादाखल.. ईतर लोकांमधे एकमेकाला हात देऊन वर खेचण्याची वृत्ती जास्त प्रमाणात दिसून येते. बरेचसे मराठी लोक मदत सोडाच पण मराठी बोलण्यातदेखील कमीपणा मानतात.
>>ममो, मिपाकर सदस्य म्हणून मला वाटतं की, एक प्रयोग करुन पाहा. जमलं तर करावं नाही तर सोडून द्यावं.
बिरुटे सर धन्यवाद.. केवळ नोकरीविषयकच विधायक करावं असं मनात नाहीये, प्रयोगही करता येईल, पण त्याला पाठींबा सुद्धा नसेल तर मग हा प्रयोग नक्कीच फसेल यात वाद नाही. आणि सदस्य म्हणून हा प्रयोग मी एकटा संम/मालक यांच्या संमतीशिवाय कसा करणार?
25 Mar 2012 - 8:53 am | यकु
मायबोलीवर नोकरीची गरज असणारे आणि नोकरदाराची गरज असणारे दोन्ही एका धाग्यावर आपापल्या गरजा मांडत असताना कधीतरी वाचल्याचे आठवते.
नाही. गल्लत होतेय, माझं नाव यशवंत आहे, गरजवंत नाही. :)
बाकी चर्चेचा रोख कळला.
राम राम.
25 Mar 2012 - 8:57 am | मराठमोळा
>>बाकी चर्चेचा रोख कळला.
तुमचीही गल्लत होतेय..
( मला सध्याच्या नोकरीत मिळणारा पगार कदाचितच दुसरी नोकरी देऊ शकेल ;) )
25 Mar 2012 - 9:31 am | यकु
फक्त हेच सांगायचं होतं तर इथे चाललेल्या गोष्टींबद्दल उद्विग्नता, मराठी उच्चपदस्थांबद्दल शेरेबाजी, पुन्हा मराठी माणसं मदत करीत नाहीत ही शेरेबाजी... वावावा..
आणि 'गरजवंत दाखवा' हे तुम्ही नेमक्या कुठल्या आशयावरुन वैयक्तिक घेतलेत आणि पुन्हा त्यात मलाही ओढून स्वतःच्या पगाराकडे निर्देश केलात रामजाणे.
असो.
25 Mar 2012 - 10:03 am | पैसा
तुमचे दोघांचेही सुरुवातीचे प्रतिसाद उपप्रतिसाद पाहता गाडी रूळ सोडून भरकटतेय! अय्यो, सुर को पकडके रख्खो जी!
मला काय वाटतं ममो, बिरुटे सर म्हणतात तसा प्रयोग म्हणून तुम्ही नवा धागा सुरू करा. ज्याना उपयोग होण्यासारखा असेल ते तुम्हाला संपर्क करतील. फार सगळे डिटेल्स न देता काय ओपनिंग आहे, पात्रता काय असावी वगैरे दिलत तरी पुरे. तिथेच बाकीचे आपापली माहिती देऊ शकतील.