कालच्या सॅडीस्ट मॅसोचिस्टच्या अर्थाच्या सुतावरुन आम्ही हा स्वर्ग गाठला आहे. मॅसोचिस्ट साहित्याचं फक्त सौंदर्य पकडून इथं उभं केलं आहे. आणखी एक म्हणजे जगाच्या साहित्यात 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही नाहीच्चे, हा विकृत माणूस आहे म्हणून कुणी आलं तर आपण बोलू शकणार नाही. कारण 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही आहे की नाही हे मला माहित नाहीच. एक उगी आपला शब्द म्हणून बरा वाटला 'मॅसोचिस्ट सौंदर्य' म्हणून वापरलाय - आणि मी सगळे शब्द असेच शब्दकोश वगैरे चाळून, खात्री वगैरे करुन न घेता वापरतो, नेहमीच.
तर मुख्य मुद्दा असा की 'मॅसोचिस्ट सौंदर्याच्या या अभिव्यक्तीमागे एक गूढ लपलंय. पण मी ते सांगत बसणार नाही. पुन्हा म्हणायचात झाला हा सुरु, आणि काही लोकांना तर उगाच बारीक कळ पण येते. पण आग्रह वगैरे असेलच तर सांगेन.
-------
तू मला श्वासात भरुन घे... पण इकडे डोळ्यात बघ.. तू मला बाहेर सोडू शकणार नाहीस..
-------
तुम्ही कधीतरी कुणावर असंच प्रेम केल्याची वेळ आलेली असते. ते चांगले किंवा वाईट किंवा आणखी कसले आहेत म्हणून नव्हे. प्रेम होऊन जातं. तुम्ही नेहमी सोबतच रहाल असं ते काही नसतं. पण याचा अर्थ तुम्ही एकमेकांना दु्खावणारच नाही असं नाही. त्याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता.
-------
काहीवेळा तुम्हाला त्या एका व्यक्तिची गरज असते जी तुम्हाला सोबत
फिरताना बोलू देईल, तुमच्या तक्रारी ऐकेल आणि मूर्खासारखा पहात राहिल, पण तुमच्यावर प्रेम मात्र तसाच करीत राहिल.
-------
मी लिहिणार असलेल्या प्रत्येक शब्दाला तु कारणीभूत आहेस. मी लिहिलेल्या सगळ्यालाच.
-------
मी कुठे सुरु होते आणि तु कुठे संपतेस हे न कळण्याच्या त्या भावनेवर माझं प्रेम आहे. आपण विसावलो असताना अंगाला होत रहाणारा स्पर्श.. त्वचेचा त्वचेशी.. काळजाचा काळजाशी. सदा असंच प्रेम कर.
-------
मला दिवसभर असंच तुझ्या मिठीत राहूनही सगळं सुख मिळू शकतं.
-------
माझ्यातील ती उणीव आहे असं मला वाटलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर, तुला हेवा वाटला असा तुच पहिला. आणि त्याबद्दल सांगताना ते कितीही विचित्र प्रकारे सांगितलंस तरी, ते अचूकच वाटलं. मला खरोखर सुंदर वाटायला सुरुवात करायला लावणारा तुच आहेस.
-------
असा कुणी शोधा ज्यासमोर तुम्ही जसे आहात तसेच असू शकता, काहीही बोलू शकता, तुम्ही हसू शकता, तुम्ही गालात हसू शकता. तुम्ही रडू शकता, ओरडू शकता, चुंबन घेऊ शकता आणि मिठी मारु शकता. तुम्ही भांडू शकता. रात्रीच्या शेवटास पुन्हा एक होऊ शकल्यानंतरही तो तसाच वेडपट असेल.
-------
माझा हात पकड आणि मला जाऊ नकोस देऊ. माझ्यासोबत दूर चल. आपण या गुंत्यातून उडू आणि आपल्याच दोघांच्या खासगी जगात हरवून जाऊ.
-------
साधी कामे
रोजचा क्रम
डावीकडे उजवीकडे
खाली नी वर
-------
तुझ्याशी बोलताना मी मूर्खासारखा हसत असतो.
-------
तुम्ही फार गोड आहात म्हणून कुणाला तरी आवडता असे कधीच मानू नका. ते कधीतरी कंटाळले सतानाचा तुम्ही फक्त एक पर्याय असता.
-------
प्रतिक्रिया
18 Mar 2012 - 3:46 am | बॅटमॅन
काही कळलं नाही. पण एक अवांतर संदर्भ आठवला त्या निमित्ताने.
आहिताग्नी राजवाडे यांच्या नासदीयसूक्तभाष्य खंड २ मध्ये मासोचिझमचे डीटेल वर्णन आहे-अर्थातच लैंगिक संदर्भात.
18 Mar 2012 - 6:16 am | सांजसंध्या
माहीतीबद्दल आभार..
18 Mar 2012 - 6:54 am | पैसा
तरी तुला सांगितलं होतं जास्त विचार करू नको म्हणून! बरं असो. बादवे यातल्या काही भागाची कविता चांगली होऊ शकेल.
18 Mar 2012 - 10:35 am | ५० फक्त
मला एवढंच कळालं
मी लिहिणार असलेल्या प्रत्येक शब्दाला तु कारणीभूत आहेस. मी लिहिलेल्या सगळ्यालाच. - कारण तु खोडरबर नाहीस.
मला दिवसभर असंच तुझ्या मिठीत राहूनही सगळं सुख मिळू शकतं.- ही एकतर २४*७ डिओची जाहिरात आहे किंवा सोफ्याची .
साधी कामे
रोजचा क्रम
डावीकडे उजवीकडे
खाली नी वर - वैश्विक सत्याची जाणिव करुन देणारं अभिनिवेशमुक्त भावनांचं स्वतंत्र उदाहरण.
18 Mar 2012 - 10:42 am | धन्या
वैश्विक सत्याची जाणिव करुन देणारा उच्च कोटीचा प्रतिसाद.
18 Mar 2012 - 1:15 pm | श्रावण मोडक
तरी तुला सांगत होतो, उगाच आधुनिकोत्तर वाचत जाऊ नकोस. नाही ऐकलं. भोग आता आपल्या कर्माची फळं... ;)
18 Mar 2012 - 1:25 pm | कवितानागेश
यक्क्स !!!!! :D
18 Mar 2012 - 2:17 pm | प्रभाकर पेठकर
काही (काही काय बर्याच) गोष्टी समजल्या नाहीत.....
मी कुठे सुरु होते आणि तु कुठे संपतेस हे न कळण्याच्या त्या भावनेवर माझं प्रेम आहे
इथे दोन्ही व्यक्ती स्त्रिलिंगी आहेत असा आपला माझा अंदाज. हा समलिंगी प्रेमाचा अविष्कार आहे का?
तुला हेवा वाटला असा तुच पहिला.
इथे भिन्न लिंगी संदर्भ आहेसे वाटते. नक्की काय प्रकार आहे असे समजायचे?
ते कधीतरी कंटाळले सतानाचा तुम्ही फक्त एक पर्याय असता.
हे असताना आहे की नसताना?
18 Mar 2012 - 6:48 pm | स्पंदना
मला शरदिनी गद्य लिहित असल्याचा भास होतोय. की शरदिनी ही यशवंतची डुआय्डी आहे?
19 Mar 2012 - 3:23 am | यकु
हा केवळ प्रेमाचा आविष्कार नाही आणि समलिंगी किंवा विषमलिंगी प्रेमाचा तर नाहीच नाही, पण सगळ्या प्रकारचं आणि पातळ्यांवरचं प्रेम सामावलं जाईल एवढा तो व्यापक आहे त्याच्याही पुढं त्यात प्रचंड मोठं गूढ आहे, पण मिलनाची ती स्थिती झटकन न ओलांडता त्या पॉईंटवर अवधान गढवता आलं तर.. आलेल्या प्रतिसादांतून तरी असे वाटत नाही की श्रृंगार किंवा मीलनाच्या पुढेही ते गूढ कुणाला जाणवलं आहे कारण तशी विचारणा झालेली नाही, आणि मी ते स्वत: होऊन सांगणे टाळू इच्छितो.
होय भिन्नलिंगी संदर्भ आहे.
तुम्ही फार गोड आहात म्हणून कुणालातरी आवडता असे कधीही मानू नका. ते कधीतरी कंटाळले असतानाचा तुम्ही फक्त एक पर्याय असता. ( सतानाचा मधील आधीचा अ ब्राऊझरने खाल्ला.. )
बॅटमॅनने वर नासदीयसूक्तभाष्याचा लैंगितेसंबंधात संदर्भ सांगितला आहे. मी वाचलं नसलं तरी मला विश्वास आहे नासदीय सूक्तातील ते वर्णन लैंगिकतेचा आविष्कार वाटले तरी ते तेवढेच असणार नाही.
सहज उपलब्ध असल्यास बॅटमॅनने जरुर नासदीयसूक्तभाष्य खंड २ मधील संबंधित भाग इथे द्यावा, यापेक्षाही जास्त मजा येईल.
19 Mar 2012 - 9:58 am | प्रभाकर पेठकर
हम्म्म्म...! म्हणजे (पुन्हा एकदा) माझी समज तोकडी पडली म्हणायची. असो.
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
19 Mar 2012 - 12:01 pm | यकु
नाही. मला तसं वाटलेलं नाही, वाटत नाहीय. :)
फक्त त्या बाजूने पाहिलं गेलेलं नाहीय असं मला सांगायचं आहे.
19 Mar 2012 - 12:18 pm | बॅटमॅन
नासदीयसूक्तभाष्यात मूळ ऋग्वेदातील नासदीय सूक्ताचा भाग फार कमी आहे. ते सूक्त अगदी मुळाशी जाऊन विश्व कसे निर्माण झाले असावे, याबद्दल विचार करते. राजवाडे हे तिथून तत्वज्ञान, तत्वज्ञानातून जीव शास्त्र आणि तिकडून कामशास्त्र असे वळतात. तात्विक विवेचन पहिल्या खंडात आहे तर दुसऱ्या खंडात निव्वळ कामशास्त्रविषयक विवेचन आहे.
19 Mar 2012 - 11:06 am | daredevils99
रतीब घालायचे कधी थांबविणार?
19 Mar 2012 - 12:22 pm | यकु
हे असलं बिल पुन्हा एकदा भरायचं चुकवून बघा.. फटकन रतिब बंद होऊन जाईल ;-)
19 Mar 2012 - 12:18 pm | बॅटमॅन
नासदीयसूक्तभाष्यात मूळ ऋग्वेदातील नासदीय सूक्ताचा भाग फार कमी आहे. ते सूक्त अगदी मुळाशी जाऊन विश्व कसे निर्माण झाले असावे, याबद्दल विचार करते. राजवाडे हे तिथून तत्वज्ञान, तत्वज्ञानातून जीव शास्त्र आणि तिकडून कामशास्त्र असे वळतात. तात्विक विवेचन पहिल्या खंडात आहे तर दुसऱ्या खंडात निव्वळ कामशास्त्रविषयक विवेचन आहे.
19 Mar 2012 - 5:11 pm | विजुभाऊ
आआआआआआआआआआआआआआआआआआ......चिंचोका फोडताना पायावर बत्ता बसला.