'सामना'च्या 2011 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. अंकात जागेच्या उपलब्धतेनुसार काही मजकूर गाळला गेला आहे. येथे दिलेला लेख पूर्ण आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
नुकताच एका मित्राच्या आग्रहामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या, अण्णांच्या, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात भाग घ्यायला जे. एम. रोड वर गेलो होतो. नुसतंच घोषणाबाजी करायला बरं का, हे उपोषण वगैरे माझ्या कुपोषित तब्येतीला मानवत नाही. तर तिथे एक घोषणा ऐकली ‘एक दोन तीन चार, बंद करा हा भ्रष्टाचार’. ही घोषणा ऐकली आणि हसून हसून मुरकुंडी वळली. डोळ्यात पाणी येईपर्यंत हसत होतो. बाकीचे आंदोलक ‘अरे! वेडे लोकही आंदोलनात सहभागी होत आहेत, अण्णांचा विजय असो’ असा भाव असलेल्या नजरेने माझ्याकडे बघायला लागल्यावर माझ्या मित्राने मला तिथून जवळजवळ खेचतच घरी आणले. घरी पोहोचे पर्यंत मी आपला हसतच होतो.
एक दोन तीन चार, बंद करा हा भ्रष्टाचार! अरे, तो भ्रष्टाचार काय घरच्या फडताळात लपलेले झुरळ आहे झाडू हालवून हुसकावून लावायला? भ्रष्टाचार आपल्या भारतीयांच्या नसानसात भिनला आहे. इतका भिनला आहे की जसे आपण श्वासोच्छ्वास नकळत करतो, लक्षात न ठेवता तसेच आपण भ्रष्टाचार करतो आहोत. बघा हं, म्हणजे, ऑफिसात जाऊन ऑफिसची मालमत्ता वापरून वैयक्तिक कामे करणे, खूप काम करतो आहे असे भासवून पाट्या टाकणे, मुलांना 'नेहमी खरे बोलावे' असे शिकवून 'अरे बाबा घरात नाहीत म्हणून सांगा काकांना' असे सांगणे, ऑफिसात खूप काम आहे उशीर होईल घरी यायला असे सांगून मित्रांबरोबर पार्ट्या झोडणे, दुकानदाराने चुकून एक नोट जास्त दिल्यावर 'जाऊदे असाही लुटतोच तो मला' असा विचार करून ती नोट तशीच दडपवणे हे असले भ्रष्टाचार आपण कळत न कळत दररोज करतोच. मला सांगा, एक दोन तीन चार असे म्हणून हे सगळे बंद होणार आहे का?
हे सगळे मी माझ्या लांब नाकवाल्या मित्राला सांगत होतो, ‘ऑन द टेबल’ बरं का, आमच्या आवडत्या बारमधे. त्याचे नाक लांब असल्यामुळे त्याला थेट विधात्याने ज्यात त्यात नाक खुपसायला अवनीवर धाडले आहे असे त्याचे मत आहे. त्यामुळे त्याला बर्यााच आतल्या गोटातल्या गोष्टी माहिती असतात, ह्याचमुळे त्याला मी माझा मित्र कम मार्गदर्शक कम हितचिंतकही मानतो. तोही ती घोषणा ऐकून छप्परफाड हसण्यात मशगुल झाला. आता त्याचे हसणे 7-8 मिनिटे तरी थांबणार नव्हते. त्यामुळे मग मी आजूबाजूला बघायला सुरुवात केली आणि समोरच्या टेबलावर लक्ष गेले.
त्या टेबलावर, चिकन लॉलीपॉपच्या फस्त झालेल्या डीश, चिकन चिली ड्रायची अर्धवट संपलेली डीश, उकडलेली अंडी, उकडलेले शेंगदाणे, शेव, चकली आणि त्याबरोबर इम्पिरिअल ब्लुच्या दोन रिकाम्या झालेल्या चपट्याआणि थम्स अपच्या दोन तीन रिकाम्या बाटल्या असा 'खान-पान'चा अद्भुत संगम झालेला होता.
हे दृश्य बघून एकदम चमकलो. भारतीय कुठल्या-कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचार करतात ह्यावर मी आणि माझ्या लांब नाकावाल्या मित्राने नुकतीच चर्चा केली होती पण भारतीय माणूस दारूचा पण ‘भ्रष्टाचार’ करतो हे माझ्या लक्षातच आले नव्हते. हा दारूचा भ्रष्टाचार म्हणजे ‘खोपडी’ तयार करणे नव्हे किंवा फुग्यांतून दारू शहरां-शहरांत ‘इंपोर्ट – एक्स्पोर्ट’ करणे नव्हे तर चक्क 'दारू पिण्यात' भ्रष्टाचार. तुम्हालाही लांब नाकावाल्या मित्रासारखे छप्परफाड हसावेसे वाटायला लागले ना!
दारू पिण्यात कसला आलाय भ्रष्टाचार? असे वाटणे साहजिकच आहे. भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण. दारू पिण्यातला हा भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट पद्धतीने दारू पिणे. हे आपण करतो दारूबद्दल तपशीलवार माहिती नसल्यामुळे. आपण बहुतेक भारतीय खिशाला परवडणारी दारू (फक्त) चढण्यासाठी पितो, दारूच्या चवीशी आणि एकंदर दारूच्या तपशिलाशी काही देणे घेणे नसते. चार मित्रांबरोबर बसून सुख दुःख शेअर करण्यासाठी आपणदारूचा आधार घेतो आणि मग अजून एक येऊदे, अजून एक येऊदे असे करत करत आपण दारू पिण्याऐवजी दारूच आपल्याला प्यायला लागते.
आपण सरबतं पितो वेगवेगळ्या मोसमात त्या त्या मोसमाला साजेशी, ते आनंद मिळवण्यासाठी, त्या मोसमातल्या मिळणार्याग फळांच्या चवीची अनुभुती घेण्यासाठी, त्या मोसमातल्या वातावरणाला जुळवूनघेण्यासाठी. दारूचेही तसेच असते. दारूचे वेगवेगळे प्रकार हे प्रसंगानुरुप ‘चाखायचे’ असतात. दारू पिण्यापेक्षा अनुभवण्यातच खरी गंमत असते.
आता बघा ना, व्हिस्कीचे इतके प्रकार आहेत, सिंगल मॉल्ट आणि ब्लेन्डेड त्यात पुन्हा स्कॉच, आयरिश, बर्बन, कॅनडीअन, जॅपनीज आणि भारतीय अश्या व्हरायटीज. पण असल्या तपशिलांची काहीही तमा न बाळगता 'भर गिलास, कर खलास' असा आपल्या खाक्या असतो. ह्या सगळ्या व्हिस्कींना त्यांची अंगभूत चव असते, गंध असतो, रंग असतो. हा रंग, गंध आणि विशिष्ट चव ओक वृक्षाच्या लाकडापासून बनवलेल्या पिंपात व्हिस्की वर्षानुवर्षे मुरवत ठेवून मेहनतीने आणलेली असते. पिताना त्यांची अनुभुती घ्यायची असते. त्यातला आनंद लुटायचा असतो. पण आपण काय करतो? व्हिस्की कडू-कडू म्हणून, हाय रे कर्मा, तिच्यात कोला सदृश सॉफ्ट ड्रिंक्स (पेप्सी, थंम्स अप, कोक) मिसळून तिची मूळ चवच घालवून टाकतो आणि पितो मद्यार्क (अल्कोहोल) असलेले मादक द्रव्य. हे तर जाऊद्या पण व्हिस्कीला गोड करण्यासाठी मिरिंडा घालून पिणारा महाभाग बघितला आणि तेव्हा 'देवा, हाच दिवस बघण्यासाठी जिवंत ठेवलेस का रे?' असे कळवळून ओरडावेसे वाटले होते.
व्हिस्की हा तसा बराचसा मर्दानी, रांगडा प्रकार. सर्वांचाच तो झेपेल असे नाही. व्हिस्की, जगातल्या सर्वच भागांमध्ये सर्वात जास्त प्यायला जाणारा दारूचा प्रकार आहे. तरीही सर्वत्र खर्याा अर्थाने व्हिस्की पिण्याची पद्धत सारखीच आहे. वर्षानुवर्षे मुरवत ठेवलेली व्हिस्की तशीच म्हणजे ‘नीट’ किंवा ‘स्ट्रेट’ पिऊन तिचा आस्वाद घेण्याची चीज आहे. तिच्यातल्या मद्यार्काच्या प्रमाणामुळे आणि तीव्र(स्ट्रॉन्ग) चवीमुळे ‘नीट’ घेणे तसे जरा अवघडच आहे, ‘कच्च्या (रॉ)’ चवीशी नाळ जुळेपर्यंत. असे असल्यास व्हिस्कीत किंचित पाणी घालून तिला थोडे खुलवून (Bruise) प्राशणं करण्यातला आनंद हा शब्दातीत आहे. पाण्यामुळे चव थोडी सौम्य तर होतेच पण व्हिस्कीचा स्वाद आणि गंध खर्याद अर्थाने खुलून येते आणि थेट इंद्राच्या दरबारात बसून वारुणी चाखल्याची अनुभुती येते. ‘नीट’ घेणे जमत असेल आणि पाणी नको असेल तर व्हिस्की ऑन द रॉक्स घेण्यातही असीम आनंद आहे. ऑन द रॉक्स साठी साधारण 4-5 बर्फाचे खडे ग्लासमध्ये टाकून त्यावरून व्हिस्की ओघळत ओतायची. व्हिस्की बर्फावरून ओघळताना बर्फाचा थंडपणा घेऊन थंड होते आणि बर्फ वितळून थोडे पाणी व्हिस्कीमध्ये मिसळून स्वाद आणि गंध खुलतो. हे जर खूपच कठीण असेल तर सोडा आणि पाणी टाकूनही आस्वाद घेता येऊ शकतो. सोड्यामुळे व्हिस्कीचा स्वाद खुलून येतो. पण सिंगलमॉल्ट सारख्या उच्च दर्ज्याच्या व्हिस्कीत पाणी किंवा सोड्याची भेसळ चव आणि गंध दोन्ही मारून टाकते. तेव्हा सोडा फक्त ब्लेंडेड व्हिस्कीबरोबरच.
व्हिस्की कधी प्यायची ह्यालाही महत्त्व आहे. जेवण्याच्या आधी व्हिस्कीचे एक दोन पेग मस्त जठराग्नी प्रज्वलित करतात. रविवारची दुपार, मटण मस्त रटरटून शिजते आहे, त्याचा सुगंध घरात दरवळतो आहे आणि हातात ऑन द रॉक्स व्हिस्की, अशी काही भूक प्रदीप्त होईल की काही विचारू नका. जर भरपूर प्यायची असेल तर मात्र रिकाम्या किंवा अनश्या पोटी पिण्यासारखा दुसरा भ्रष्टाचार नाही. हलके जेवण घेऊनआतड्यांना कामाला लावा आणि मग तुम्ही तुमच्या कामाला लागा. पोट भरलेले असल्यामुळे मद्यार्क शरीरात भिनायला अथवा शोषला जायला वेळ लागतो आणि भरपूर प्रमाणात दारू प्यायली जाऊ जाते. अजून एक करायचे छोटे पेग बनवायचे आणि ‘लंबी रेस का घोडा’ ह्या न्यायाला जगून अगदी हळूहळू पीत जायचे, उगाच ‘भर गिलास, कर खलास’ असे करून पिण्यातली गंमत घालवण्याला काय अर्थ आहे?
व्हिस्की खालोखाल जास्त प्रमाणात प्यायला जाणारा प्रकार म्हणजे रम. मस्त पावसात चिंब भिजून ओलेचिंब झाल्यावर शरीराबरोबरच मनालाही उबदार करणारी ही अस्सल चीज. अंगात भिनणार्याब ह्या रमला स्वतःचे अंग असते बरं का. ऊसापासून बनणार्याउ ह्या रमचा स्वाद अंमळ गोडसर असतो. ह्या गोडसर स्वादाबरोबरच अतिशय तीव्र गंध असतो रमला आणि तो रम प्यायच्या आधी उपभोगायचा असतो. रमचाग्लास भरून मनसोक्त हुंगायचा हा गंध. मग एक एक घोट घेऊन चटकन न गिळता, जिभेवर घोळवत घोळवत प्रत्येक ‘टेस्ट बडला’ स्वाद देत प्यावी ही रम. अश्या प्रकारे प्यायल्यावर अश्या काही चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात की पावसात ओलेचिंब झाल्याचे सार्थक होते आणि पुन्हा एकदा भिजण्याची आस लागून राहते.
रमच्या तीव्र गंधामुळे श्वास रोखून झटकन गिळून टाकणारे दर्दीही (?) बघितले आहेत. तेव्हा का पितोस रे बाबा असा प्रश्न विचारायची तीव्र (रमच्या गंधाइतकीच तीव्र) इच्छा झाली होती. पण रम खर्या अर्थाने अनुभवायची तर ‘नीट’च घ्यायला हवी असे काही नाही. तशी घ्यायला जमले तर मग काय हो सोन्याहून पिवळेच. रम सोडा, कोक ह्यांच्या जोडीनेही तेवढाच आनंद देते. व्हिस्कीसारखी शिस्त किंवा औपचारिकता जास्त नाही रमची. फक्त जिभेवर घोळवत घोळवत प्यायची शिस्त पाळली की मग ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा.
बाकीचे श्वेतवर्णिय प्रकार म्हणजे व्हाईट रम, व्होडका, जीन हे सगळे प्रकार बहुतकरून कॉकटेल्स मध्येच जास्त खुलतात आणि परमानंद देतात. त्यांच्या श्वेत रंगामुळे रंगेबिरंगी कॉकटेल्स बनवताना ह्यांचा वापर केला जातो. आपल्याकडे ह्या प्रकाराला तितका लोकाश्रय नाहीयेय. पण ह्या सगळ्या श्वेतवर्णिय दारू प्रकारांचा आस्वाद घ्यायचा तर ‘नीट’ घेण्याशिवाय पर्याय नसतो. श्वेत रंगासाठी हे सगळे प्रकार बरेच फिल्टर केलेले असतात. शिवाय मूळ ज्या धान्यापासून बनवलेले असतात त्यात बरेच स्वाद मिसळलेले असतात आणि ते अजिबात तीव्र नसतात. जसे की जीन मध्ये जुनिपर बेरी ह्या फळाचा स्वाद असतो. व्होडका तर आता असंख्य प्रकारच्या स्वादात मिळते. व्हाईट रम संत्र्याच्या स्वादात मिळते. हे स्वाद जर मुळात अनुभवायचे तर ‘नीट’ घेण्याशिवाय गत्यंतर नसते. तरीही हे सर्व प्रकार सोडा आणि सायट्रस चवीच्या सॉफ्ट ड्रिंक्सबरोबर(च) चवदार लागतात. त्यांच्यात कोक किंवा तत्सम कोलाजन्य पेय मिसळून पिणे म्हणजे कडक चहा बनवून त्या वरून सायीचे दूध घालून पिण्यासारखे आहे.
एकंदरीतच कुठलाही दारू प्रकार मूळ स्वाद, रंग आणि गंध ह्यांचा आस्वाद घेऊन पिण्यातच मजा आहे. एक दोन पेन नंतर हळूहळू चित्तवृत्ती प्रफुल्लित व्ह्यायला लागतात. कानाच्या पाळ्यांना मुंग्या येऊनएकदम पिसासारखे हलके वाटायला लागून एक सहजावस्था प्राप्त होते. तिथेच थांबले पाहिजे आणि त्या हलक्या आणि तरल अवस्थेची अनुभुती घेत घेत धुंद व्हायचे असते. आपले हलके झालेले विमान जमिनीपासूनदोन बोटे वर जाण्यातच खरी गंमत, दारू पिण्याचे शुद्ध आचरण, ते आकाशापासून दोन बोटे खाली इतके वर जाऊ देणे म्हणजे दारू पिण्याचे भ्रष्ट आचरण.
हाच तो 'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार. काय पटतेय का आता?
पटलं असेल तर चला एक मस्त घोषणा देऊयात, ‘एक दोन तीन चार, बंद करा हा दारूतला भ्रष्टाचार’!
चियर्स! :)
प्रतिक्रिया
2 Nov 2011 - 4:51 pm | आत्मशून्य
चियर्स :) , मिपावर लाइक करायची सोय नसल्याने आपल्या 'दारु पिण्या'तला भ्रष्टाचारा विरोधी आंदोलनाला संपूर्ण पाठींबा या प्रतीसादरूपाने देत आहे. भ्रश्टाचार चिंगम है सोकाजीराव सिंघम है.
2 Nov 2011 - 5:14 pm | दादा कोंडके
मस्त चटपटीत लेख.
2 Nov 2011 - 6:17 pm | वपाडाव
सोकाजी, तु यार बाजी मारतोस हा प्रत्येक वेळी....
कडक अन फर्मास लेख....
आवड्या !!!
2 Nov 2011 - 5:44 pm | राजघराणं
एकदम भारी
2 Nov 2011 - 5:56 pm | प्रचेतस
मस्त फर्मास लेख.
बाकी मद्यपान करत असल्याने लेखकाच्या भावनांशी फारसा समरस होवू शकलो नाही.
2 Nov 2011 - 6:10 pm | सोत्रि
नसल्याने असे म्हणायचे होते का?
- (समरसतेने मद्यपान करणारा ) सोकाजी
2 Nov 2011 - 6:25 pm | प्रचेतस
नसल्यानेच म्हणायचे होते.
पण बूच काढून ते तुम्ही आमच्या प्रतिसादास मारल्याने ते आता संपादितही करता येत नाही. :(
2 Nov 2011 - 6:35 pm | चेतन सुभाष गुगळे
त्यांना नसल्यानेच म्हणायचे होते, परंतु तुमचा लेख वाचून न पिताच त्यांना चढली आणि त्या नशेत त्यांनी चूकीचे टंकले. न पिणार्याला तुम्ही इलेक्ट्रॉनिकली पाजली हा तुमचाच दोष नव्हे काय?
2 Nov 2011 - 6:46 pm | सोत्रि
च्यायला राव, घ्या.... दोष माझाच का?
असो, पण ह्या व्हर्चुअल जगात असा eDaru पाजणारा बहुदा मी एकटाच असावा.
Guinness World Records मधे नाव द्यावे का? गेला बाजार Limca book of records मधे तरी ?
:)
- (दोषी) सोकाजी
2 Nov 2011 - 7:06 pm | चेतन सुभाष गुगळे
बरं ते जाऊ द्या. आधी व्हिडीओ अपलोड कसा करायचा ते बघा की...
या धाग्यावर http://www.youtube.com/watch?v=GemgghLnKBE असा एखादा छानसा व्हिडीओ असायला हवाच.
आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स तरी कशासाठी हो? लिमका शब्द देखील तुमच्या करिता वापरणे हे तुम्हाला अंडरेस्टिमेट करण्यासारखं आहे. आपण तुमच्याकरिता व्होडका बुक ऑफ रेकॉर्ड्स बनवुयात आणि त्यात तुमचे सगळे पिण्याचे आणि पाजण्याचे / इ-पाजण्याचे विक्रम नोंदवुयात.
3 Nov 2011 - 9:45 am | वपाडाव
हिप हिप हुर्रे...
3 Nov 2011 - 12:10 pm | शाहिर
आपण तुमच्याकरिता व्होडका बुक ऑफ रेकॉर्ड्स बनवुयात आणि त्यात तुमचे सगळे पिण्याचे आणि पाजण्याचे / इ-पाजण्याचे विक्रम नोंदवुयात.
3 Nov 2011 - 12:20 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद शाहिर.
साधारणत: असं होतं ना की जे मद्यपान करीत नाहीत ते मद्यपींना सोबत म्हणून एखादं नर्मपेय पितात. अशाच एका सॉफ्टड्रिंकच्या नावाचं पुस्तक अशा हार्डड्रिंकर माणसाकरिता वापरावं हा त्याच्या क्षमतेचा अपमान आहे असं मला वाटून गेलं आणि तो नर्म(पेय)विनोद माझ्याकडून घडला.
तसंही माझ्याकडून विनोदी लेखन व्हावं अशी अनेक सदस्यांनी मागणी केलीय आणि मी नेमका इथेच कमी पडतो. तरी आज एक विनोदी लेख लिहायला नेटाने (न पिता) बसणार आहेच. असे छोटे विनोद हा सरावाचा भाग आहे.
3 Nov 2011 - 1:49 pm | सोत्रि
चेतन, जमले रे :)
- (तंत्रज्ञ) सोकाजी
3 Nov 2011 - 3:01 pm | चेतन सुभाष गुगळे
मी ही शिकून घेईन म्हणतो तुमच्याकडून. प्यायला नव्हे... व्हिडिओ चढवायला...
2 Nov 2011 - 5:59 pm | विसुनाना
लेख आवडला.
आमच्याकडून कसलाच भ्रष्टाचार होत नाही हे समजल्याने बरे वाटले.
तोंड वेडेवाकडे करत दारू पिणारे लोक पाहिले की दया येते.
एकदा 'कोन्यॅक' कशी प्यावी ते न समजल्याने सोडा आणि बर्फ घालून प्यायलो. हा भ्रष्टाचार झाला का?
2 Nov 2011 - 6:19 pm | तिमा
परमिट नसताना हॉटेलात किंवा घरी दारु पिणे हा सुद्धा भ्रष्टाचारच झाला.
लेखाचा सूर एकूण आम्ही काय ते जाणकार, बाकीचे सर्व ............ असा वाटला.
2 Nov 2011 - 6:34 pm | सोत्रि
हा खराखुरा भ्रष्टाचार झाला, पिण्यातला नव्हे.
नाही नाही, हा भ्रष्टाचार मीही करतो. लेखाचा, हा भ्रष्टाचार टाळावा असा सूर आहे :)
जगात चार ठिकाणी फिरून, चार वेगवेगळया जाणकार लोकांबरोबर बसून प्यायल्यामुळे पिण्याचे शुद्ध आचरण मला कळले. ते आचरणात १००% आणतोच असे नाही, आणी आणणे शक्य असतेच असेही नाही. पण ते शुद्ध आचरण काय हे चार लोकांना कळावे असा सूर लावायचा प्रयत्न होता.
- (बीना परमिट घरात दारू पिणारा) सोकाजी
2 Nov 2011 - 9:07 pm | आनंदी गोपाळ
पर्मिटबाजी हा ऑफिशियल सर्कारी भ्रष्टाचार आहे! *** रुपये दिले की पर्मनंट पर्मिट मिळतं. घरपोच ;)
(२ घोट टाकून 'आनंदी' झालेला) गोपाळ
2 Nov 2011 - 6:40 pm | इष्टुर फाकडा
एकदमच आवडला हा लेख :) माझ्याच मनातलं खूप चांगल्या पद्धतीने समोर आल्यासारखं वाटलं. सुंदर
2 Nov 2011 - 7:07 pm | शाहिर
दर्दी आहात ओ ....
रम जरा कड्वट लागते म्हणुन सोडा घालतो ..पण व्हिस्की मात्र ऑन द रॉक्स पिण्यात जी मजा आहे ..ति कशात नाही ...
( जॅक डॅनियल आणी ब्लॅक लेबल ऑन द रॉक्स पिली होती ... आठवण आली कि अजुन चव जाणवते )
बाकी बीयर बद्दल का दुजाभाव ??
19 Nov 2011 - 9:22 pm | स्वागत
जॅक डॅनियल आणी ब्लॅक लेबल ऑन द रॉक्स
2 Nov 2011 - 7:08 pm | शाहिर
प्र का टा आ
2 Nov 2011 - 7:56 pm | गणेशा
लेख भारीच ...
दारु पित नसलो तरी आपल्या लिखानातुन तिची नशा चाखली .. आवडली.
2 Nov 2011 - 8:30 pm | वसईचे किल्लेदार
कोण्या एका काळी कसलेसे (नस्ते) दुख: निवारण्या हेतु आम्हीही घेत होतो ओन द रोक्स ... आता मात्र पक्का भ्रष्टाचारी झालोय!
2 Nov 2011 - 8:42 pm | नगरीनिरंजन
हा असला पानभ्रष्टाचार आम्ही अनेक वर्षे केला आणि मग आम्हाला आमची चूक हळूहळू कळोन आली.
तुमचा लेख, क्रिस्टल ग्लास मध्ये बर्फाच्या खड्यांवर सोनेरी व्हिस्की उतरावी तसा, मस्त उतरला आहे.
2 Nov 2011 - 10:14 pm | आनंदी गोपाळ
एक सीन लै जब्रा आवडलेला.
त्या पाण्याच्या टाकी खाली हे ३ मित्र बसलेले.
तिघांचे ३ वेगळे ग्लास.
रम चा खंबा. (जुना भिक्षुक - OldMonk) अन चखन्याला फरसाण!
एकदम ऑथेंटिक!
सुरुवात होस्टेल ला होते.
बियर ने होते. (४ जणात १ बियर अन तिचे 'पेग' बनवून पाणी मिक्ष करून पिणारे, अन पिऊन तर्र झालेले मला ठाऊक आहेत)
नंतर रम अन सोबत पाणीच परवडतं. चखन्याला २ दिवस जुनं १ केळ ही चालतं ३ जणांत..
मग हळू हळू ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अन मग डॉक्टरेट मिळते. :D
2 Nov 2011 - 9:17 pm | अर्धवटराव
मित्रा... एक बैठक होउनच जाउ दे या बाणीवर !!!!!!!!
(भ्रष्टाचारी) अर्धवटराव
2 Nov 2011 - 10:10 pm | आनंदी गोपाळ
चांगभलं म्हणा. सालुट वगैरे हिक्डं मिसळी सोबत काय कामाचं? :दिवे:
(एकाच धाग्यावर ३ प्रतिसाद दिलेला: तिप्पट आनंदी)
-गोपाळ
3 Nov 2011 - 12:15 am | अर्धवटराव
अओ हिकडं येळकोट कराचा हाय काय... "सालुद" म्हणणारं पब्लीक कसलं पट्टीचं पेताड असतय ते बघा येकदा.
(सालुदी) अर्धवटराव
2 Nov 2011 - 9:24 pm | अतुल पाटील
खुप छान लेख.
2 Nov 2011 - 9:41 pm | यकु
बुक्मार्क्ड!
हेही ट्राय करुन पाहून
काय हो सोकाजी..एक गाढवासारखा प्रश्न विचारतो तुम्हाला.. ही स्कॉच स्कॉच म्हणतात तिचा ( टू बी पर्टिक्युलर 'टीचर्स' ) एक आठशे रुपयांचा खंबा सोड्यासोबत पिऊन बघितला होता मी एकदा तिचं गुणगाण ऐकून... च्यायला कैच होईना.. नुसतं पोट फुगलं.. ती तशीच असते की हमारा कुछ चुक्या?
(सोकाजी-शिष्य) यशवंत
2 Nov 2011 - 10:02 pm | आनंदी गोपाळ
आपल्याच्यानं नै होत ते!
ती इंग्लीश दारू पिणार्यात 'सोशल' दारूडे पण असतात. म्हणजे टिचर्स खंबा समोर असला तरी '३ फिंगर्स' पिऊन गप पडणारे. मग तितकी दारू हापिसात पण प्याली तरी चालते. तिकडे जेवणा आधी कोणती, दर्म्यान कोणती अन नंतर ब्र्यांडी वगैरे कोणती? अशा दारवा असतात. आपल्याकडे दारूकाम करायचं, अन मग हादडायला बसायचं असला प्रकार!
याची एक मस्त आठवण सांगतो.
रात्री सुमारे १२ वाजता 'बसलो' होतो. आमचं संपत आलेलं होतं. हॉटेल मित्राचंच. एक मोट्ठी फॉर्चूनर गाडी येऊन उभी राहीली समोर. ४-६ 'तरूण' उतरले. तारूण्याच्या नशेत असतील ;) त्यांनी जेवण मागवलं. मटनच हवं अन त्यात नळीच हवी. नडून बसले. कुक ने शांतपणे ४-६ 'जुन्या' नळ्या काढल्या. त्यात कणीक भरली. बाकी उरलेलं मटन अन या नळ्या गरम करून वाढल्या. मग सगळे मर्द गडी नळ्या वरपून जेवले.
तात्पर्यः टींग झाल्याशिवाय जेवण करू नै, अन केलं कि मग वर्पून खावं. ते चवीने पिणं देशि लोकांना जमत नै.
(३ घोट घेऊन) "आनंदी" - गोपाळ
2 Nov 2011 - 11:17 pm | निनाद मुक्काम प...
लेख आवडला
पण त्याची सुरवात मात्र अन्ना ह्यांचे आन्दोलन त्यांची खिल्ली मग डायरेक्ट बार व् तेथून गाडी थेट मद्या पिण्याचा भ्रटाचार आणि त्यानंतर गाडी थेट मद्याच्या मनमोहक दुनियेकडे घसरली. त्यात बियर चा समावेश नाही. माझ्या मते जगात सर्वात जास्त व् बहुतेक देशात बियर लोकप्रिय आहे.
खुद यूके व् संपूर्ण युरोपात बियर आणी फूटबोल हे समीकरण प्रसिद्द आहे. रम म्हणजे करेबियन बेटे तर वोडका म्हणजे रशिया /पोलैंड
त्र फ्रांस व् इटली म्हणजे वारुनी ( लाल ,सफेद ) व् लिक्यर म्हणजेच सुगंधी मद्द्य ह्यासाठी प्रसिद्द आहे.
पूर्वी मोजक्या देशात वारुनी बनायची त्यांना वारुणी च्या विश्वातील जुने विश्व व् अलीकडच्या काळात अमेरिका ,दक्षिण अफ्रीका . ऑस्टेलिया हे नवीन देश वारुणी उत्पादनात अग्रेसर आहेत त्याना नवीन विश्व म्हटले जाते.
भारतात महाराष्ट हे राज्य वारुणी उत्पादनात अग्रेसर असून परदेशात ही वारुणी लोकप्रिय होत आहे. मात्र अजुन बरीच मजल दर्ज्याच्या बाबतीत मारायची आहे.
आपल्या मद्य पिण्यात भर्ष्टाचार ही संकल्पना मला पटली नाही
कुठल्याही देशात मद्य बनते तेव्हा ते पिण्याची पध्धत ही त्या देशातील हवामानावर अवलंबून असते. उदा स्कॉच व् सिंगल मोल्ट ही ठंड प्रदेशात निट प्यायची पध्धत प्रचलीत आहे. हयात ओंन द रोंक सुध्धा आले.
मात्र भारतात त्यांचे अनुकरण करणे ( हयात थंडीच्या दिवसतील उत्तर भारतातील पट्टा सोडल्यास ) शक्य नाही. भारतात म्हणून पानी व् सोडा मिश्रित पितात.
थंडीत रशियात वजा २० ते सायबेरिया मध्ये वजा ४० तापमान असते. तेथे वोडका शोट ( ६० ते ९० मिलीलीटर ) नीट पिण्याचा रिवाज आहे.
माझा एक पंजाब डा पुत्तर एक रशियन कन्येसोबत पब मध्ये गेला .ती नीट वोडका पीते म्हणून ह्याने सुद्धा नीट प्यायला सुरवात केली. एक खंबा दोघानी संपवला मात्र साहेब जमीनीवर धारातीर्थी पडले. तर बाईसाहेब बर्यापैकी शुध्धीत होत्या. तेव्हा वेस्टन कल्चर चे अन्धानुकरण करणे योग्य नाही .आपल्या देशात जे योग्य वाटते असे सुयोग्य बदल करून मद्याचा आनंदलुटणे
गरजेचे असते.
अमेरिकेत सुरवातीला बरेच ब्रिटिश रहिवाशी असल्याने स्कॉच व् सिंगल मोल्ट चे प्रभुत्व होते मात्र स्वतःची अमेरिकन विस्की असणे त्याना गरजेचे वाटू लागले. मग जेक डेनियल ,बर्बान विस्की असे त्यांनी ब्रेंड विकसीत केले. मात्र जगभरात जेडी ही कोक सोबत घेतली जाते व् जेडी कोक व् बकार्डी( रम ) कोक ज्याला क्यूबे लिब्रे सुद्ध्धा म्हणतात हे दोन प्रकार जगभरातील कोणत्याही क्लब मध्ये जास्त प्रमाणात विकले जातात.
ते नीट प्यायले जात नाहीत.
भारतात धान्यापासून दारू बनत नाही. मग परदेशातील स्कॉच किंवा विस्की साथी जे ग्रेन वापरले ते भारतात आयत केले जाते. ( मात्र ते निकृष्ट दर्जाचे असते.) सरकार भारतात दारू बनवू देत नाही. परदेशातून आयात
केलेल्या मालावर जबर कर लावते. मग दर्जामध्ये तडजोड करून भारतात भारतीय मद्य बनते,( जागतिक कीर्तीचे बार टेंडर व् एक प्रख्यात परदेशी मद्य कंपनीचे सल्लागार असलेल्या व्यक्तिशी माझी भेट झाली .त्याने सांगीतले. '' मी गोव्यात गेलो असतांना फेणी चाखली. प्रचंड आवडली'' मी गोव्यातील काही प्रमुख फेनी उत्पादकांना सांगितले की थोड़े आधुनिक तंत्राने ही फेणी बनवली तर जगात प्रमुख मद्य म्हणून तीचे नाव होऊ शकते .
ब्राज़ील ची टकीला तशी भारताशी फेणी
ह्यावर उत्साहीत होऊं त्या लोकांनी सरकारी दरबारी खटपट केली. व् ह्यातून कीती महसूल व् परकीय चलन येइल ह्याची रूपरेषा मांडली. ( आज ब्राज़ील मध्ये टकीला , व् कशाषा ( साखरे पासून बनलेले लिक्युर जगभरातून परकीय चलन देशाला देते.) मात्र त्यांना उत्तर असे मिळाले की मदया च्या नावाने भारताची ओळख होणे ही चांगली गोष्ट नाही. तेव्हा प्रस्ताव मोडीत निघाला. ह्याचा अर्थ गोवेकरंची फेनी किंवा आदिवासी लोकांची मोहाची दारू ही भारतीय संस्कृतीचा भाग नाहीच.
2 Nov 2011 - 11:49 pm | सोत्रि
हे पटले नाही. फेणी आणि मोहाची ह्या भारतीय संस्कृतीचा भाग आहेतच.
मी मोहाची दारू प्यायली आहे. गावी माझ्या मित्राचे आजोबा घरी बनवायचे, शुद्ध पाण्याने आणि चांगल्या पद्धतीने.
अतिशय चवदार असते मोहाची दारू. फेणी अजुन ट्राय केली नाहीयेय.
पण ह्या दोन्ही प्रकारांना व्यवस्थित ब्रॅन्डिंग आणी मार्केटिंग करून जगप्रसिद्ध करण्याची खुप ईच्छा मात्र आहे.
अर्थात सरकार दरबारी हे घोडे अडणार आहे हे माहित आहेच. पण त्यावरही उपाय आहेत ;)
- (स्वयंघोषित दारू संस्कृती रक्षक) सोकाजी
3 Nov 2011 - 12:14 pm | निनाद मुक्काम प...
@ह्याचा अर्थ गोवेकरंची फेनी किंवा आदिवासी लोकांची मोहाची दारू ही भारतीय संस्कृतीचा भाग नाहीच.
अहो मी ते उपहासाने म्हटले आहे.
बाकी तुम्ही म्हणता तसे व्यवस्थित मार्केटिंग केले तर अनेकांना रोजगार व सरकारला महसूल मिळेल . अनधिकृत हातभट्ट्या फोफावणार नाही.
सध्या फक्त एकाच लिकर किंग ची भारतीय बाजारपेठेवर मक्तेदारी आहे. म्हणून तो देईन ते प्यायचे तेही तो सांगेन त्यांच्या किमतीत
धान्यापासून दारू ह्या उपक्रमात गैर काहीच नाही, मात्र त्यात पारदर्शकता हवी.
( प्या आणी पियू द्या )
मधुशाला प्रेमी मुक्काम पोस्ट
3 Nov 2011 - 4:06 pm | गवि
फेणी अजुन ट्राय केली नाहीयेय.
पण ह्या दोन्ही प्रकारांना व्यवस्थित ब्रॅन्डिंग आणी मार्केटिंग करून जगप्रसिद्ध करण्याची खुप ईच्छा मात्र आहे.
जरुर करा ब्रँड...
अहो काय सांगू त्या फेणीची रंगत. इथे (मुंबईत) मिळत नाही म्हणून.. (का बरे मिळत नसावी??)
....नाहीतर अन्य कशाला हात लावला नसता.
काजूफेणी आणि त्याचा आरोमा.. सोबत सुरमईची किंवा पापलेटाची तुकडी.. बस्स.
लेख आवडला आहे.
3 Nov 2011 - 12:30 am | इष्टुर फाकडा
कुठल्याही देशात मद्य बनते तेव्हा ते पिण्याची पध्धत ही त्या देशातील हवामानावर अवलंबून असते. उदा स्कॉच व् सिंगल मोल्ट ही ठंड प्रदेशात निट प्यायची पध्धत प्रचलीत आहे. हयात ओंन द रोंक सुध्धा आले.
नाही पटले, मुख्यतः जर थंडी हाच मुद्दा असेल तर ऑन दि रॉक्स का ओढतील?
शिवाय, मद्यार्क हा तुम्ही पाणी किंवा काहीही मिसळले तेरी कमी होतच नाही. प्रश्न उरतो कोणती चवीने प्यायची आणि कोणती 'चालवायची' याचा...
सोकाजीरावांचा stand चवीवर आहे येवढंच !
2 Nov 2011 - 11:17 pm | मन१
मी स्वतः तर घेत नाहिच पण एरव्ही जवळच्या मित्रांच्या टोळक्यात असतानाही कधीही दारुच्या गप्पा निघाल्यावर अचानक "नाही , नका हो असे पिउ. भले व्हा, भले रहा. व्यसन सोडा." अशी विचित्र बडबड भाबडेपणाने सतत करण्याची माझी खोड आहे. दुष्परिणाम जमतील तेव्हढे बिंबवायचा माझा प्रयत्न असतो.
इतके असूनही लेखात काहितरी वाचण्यासारखे वाटले; अगदि शेवटपर्यंत. घट्ट व्यसनाधीनेतेपेक्षा वेगळी अशी एक काही आस्वादकता जाणवली. मुख्य म्हणजे भसाभसा ढोसण्यापेक्षा अल्लाद २-४ पेगमध्येच तरंगायचे केलेले वर्णन भावले.
2 Nov 2011 - 11:21 pm | अशोक पतिल
पूरी दुनिया फिरुन आलात राव ! पण एकदा अस्सल गावरानी ( आदिवासी लोकान्ची ) मोहाची घेवून बघा की जरा !
2 Nov 2011 - 11:31 pm | आशु जोग
आमचे काही सज्जन मित्र दारुमधे कोक घालून पितात
त्यांच्या बाटल्या पिऊन संपल्या की आमचा सुजय बोरवणकर त्या बाटल्यात कोक घालून पितो
अशा भ्रष्टाचारी लोकांसाठी एक नव्हे हजार अण्णा हवेत
बाकी त्रिलोकेकरशेठचे लेखन विनोदी आणि माहितीपूर्णसुद्धा
2 Nov 2011 - 11:42 pm | निनाद मुक्काम प...
मोहाची .जांभूळ चव चाखली आहे. नाद खुळा
दारू म्हणजे हार्ड ड्रिंक किंव बियर असे समीकरण आपल्या डोक्यात फिट्ट असते. मात्र
गरम दुधात हॉट चोकलेट टाकल्यावर ते ढवळून मग वरून त्यात बेलीज ( हे क्रीम लिक्यूर मिसळावे) दारू व दुध ही कल्पना जरी प्रथमदर्शनी विचित्र वाटली तरी खात्रीने सांगतो .थंडीच्या दिवसात हे ड्रिंक लई भारी वाटते.
बेलीज मध्ये केरेमेल व हेझल नट हे फ्लेवर मिळतात .
नारळाच्या चवीत रम म्हणजे मालिबू ( ह्याची बाटली पांढरी असून नारळाचे चित्र असते ही अनेक हिंदी सिनेमात बार चे दृश्य असेल तर हमखास दिसते. ) ती अननसाच्या रसासोबत मस्त लागते.
बहुताशी लीक्यार मध्ये अल्कोहोल हे १७ % असते त्यामुळे ते हार्ड ड्रिंक मध्ये मोडत नाही. व ते ऑन द रॉक पियू शकतात .
ब्रीझर सारख्या पांचट ड्रिंक पेक्षा कधीही चांगले.
3 Nov 2011 - 12:17 am | मोग्याम्बो
अत्यंत उपयुक्त आणि गुणकारी माहिती ....
या माहितीचा लाभ नक्कीच घेईन.
3 Nov 2011 - 12:37 am | वरुण मोहिते
सुरेख लेख ह्याच भावना आहेत....................रोज २ पेग किवा १ बीयार पिनारा .........बोलन्यासाराखा खुप.....आहे.....निवात बसु कधितरि.
3 Nov 2011 - 12:45 pm | जे.पी.मॉर्गन
वा वा वा सोकाजीराव ! दिल खुष केलंत. खुद्द अॅबरडीनमध्ये शिवासच्या "तीर्थ"क्षेत्री आमच्या एका सीनियर स्कॉटिश मित्रानी स्कॉचच्या प्राशनाबद्दल संस्कारांचं पाथेय पाजलं होतं. त्यानंतर मदिरेविषयी (दारू म्हणणं अपमानास्पद वाटतं) इतक्या कळकळीने सांगणारे तुम्हीच !
आपल्या सूचना सर आँखोंपर :).
जे पी.
3 Nov 2011 - 1:31 pm | गणपा
आम्ही दारवा खात नसलो म्हणुन काय झाल? पण भ्रष्टाचार म्हटल की मग तो कुठल्याही क्षेत्रातला का असेना तो हटवण्यासाठी तुम्हाला पुर्ण पाठिंबा देऊ.
बोला कुठे बसायच उपोषणाला?
3 Nov 2011 - 2:00 pm | सुनील
तीन भारतीयांनी नकली व्हिस्की शोधयंत्राचा शोध लावला आहे. रोचक माहिती.
3 Nov 2011 - 2:15 pm | सुनील
लेख आवडला.
वर निनाद यांनी म्हटल्याप्रमाणे पिण्याचे यम-नियम पाश्चिमात्य देशांत बनवले गेले हे खरे आहे. परंतु, आम्हाला जर त्यांनी बनविलेल्या दारवा हव्या असतील तर त्या त्यांच्या प्रथेप्रमाणेच चाखल्या पाहिजेत. उद्या एखाद्या ब्रिटिशाला श्रीखंड आवडले म्हणून जर तो ते ब्रेडबरोबर खाऊ पाहील तर त्याला श्रीखंड-पुरीची चव येणार नाही.
थोडक्यात, विदेशी दारवा विदेशी प्रथेप्रमाणेच घ्याव्यात भारतीय नव्हेत.
टकीला घ्यावी ती तोंडाला लिंबू-मीठाचा गिलावा करून एका दमात!
बियर नेहेमी "नीट"च प्यायची असते पण करोना मात्र एखादी लिंबाची फोड टाकून प्यावी!
उत्तम स्कॉच तसेच उत्तम ब्रँडी (कोन्याक) देखिल "नीट"च उत्तम!
वोड्का फळ-रसाबरोबर तर रमची मजा कोक (थंम्सअपही चालेल) समवेतच!
3 Nov 2011 - 2:50 pm | धमाल मुलगा
आवडीच्या विषयावर मोठ्या सवडीनं तबियतीत लिहिलंय की!
एकदम झक्कास हां.
सगळंच आमच्या आवडीचंच की हे. ...एक रम सोडली तर.
बाकी, हेगचा एकेक स्मॉल पेग मोजून २-३ बर्फाच्या खड्यांवर अगदी घरंगळत ओतून तिची मजा घेणं हाही एक झक्कास अनुभव हाँऽ.. मस्त गोडसर चव आणि अॅरोमा दिल खुष करुन टाकतो अग्दी. :)
आणखी काय बोलू? पिण्यावर बोलायचं तर हातात एखादा जाम असल्याशिवाय मझा नाही, आणि सध्या जाम देणारी एखादी साकीही नजरेच्या टप्प्यात नाही!
तस्मात, इत्यलम्! ;)
-( पिण्याचे नखरे करणारा ) ध. :)
3 Nov 2011 - 4:12 pm | इंटरनेटस्नेही
अरे पण तू तर आजकाल ब्रीझर मध्येच ओके होतोस ना? ;)
3 Nov 2011 - 4:14 pm | गवि
ब्रीझर म्हणजे ते लालपिवळं साखरपाणी का?
3 Nov 2011 - 4:38 pm | धमाल मुलगा
>>ब्रीझर म्हणजे ते लालपिवळं साखरपाणी का?
अगदी अगदी! :D
>>अरे पण तू तर आजकाल ब्रीझर मध्येच ओके होतोस ना?
तो प्रभाव बाटलीतल्या पेयाचा नसून नुकत्याच भेटलेल्या बाटलीतल्या राक्षसाचा होता. ;)
पर्यातर न पिताच बहकला होता पुढचे चार पाच दिवस.
3 Nov 2011 - 4:41 pm | गवि
त्यातला क्रॅनबेरी फ्लेवर केवळ लाल रंगाने मोह पडून घेतला.
अगागागा.. डांगीअडुळसा कितीतरी चांगलं की त्यापेक्षा..
3 Nov 2011 - 5:37 pm | धमाल मुलगा
मेलो तिच्यायला!!!!!
3 Nov 2011 - 5:02 pm | वपाडाव
इंट्या, धम्या म्हातारपणाकडे झुकत चाललेला तरुण आहे....
तुझ्या सारखा नोहे... फुलपाखरी पदार्पण करणारा...
-(फुल्ल्टु तरुण असलेला) वप्या
3 Nov 2011 - 5:39 pm | धमाल मुलगा
म्हातारपणाकडं वगैरे म्हणू नये. अनुभवसिध्दीकडे वाटचाल असं म्हणावं. भारदस्त वाटतं. ;)
3 Nov 2011 - 4:49 pm | विवेक मोडक
धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद देणारे सर्व बेवडे हलकट आहेत.
3 Nov 2011 - 5:05 pm | वपाडाव
धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद देणारे सर्व हलकट बेवडे आहेत.
3 Nov 2011 - 5:39 pm | सोत्रि
प्रतिसाद देणारे सर्व हलकट बेवडे आहेत, हे ठीक आहे पण धागाकर्ता हलकट का म्हणुन ?
- ( सोज्वळ ) सोकाजी :)
3 Nov 2011 - 5:39 pm | धमाल मुलगा
कधी बसुया? :D
3 Nov 2011 - 5:40 pm | सोत्रि
सोमवार नंतर कधीही.
- (बैठकोत्सुक) सोकाजी
3 Nov 2011 - 11:33 pm | आशु जोग
>> धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद देणारे सर्व बेवडे हलकट आहेत.
धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद देणारे सर्व बेवडे कॉक तेलकट आहेत.
4 Nov 2011 - 7:15 pm | रश्मि दाते
आणि प्रतीसाद ही आवड्ले
4 Nov 2011 - 7:46 pm | निनाद मुक्काम प...
@ सागर ,आनंद
अरे थंडीचा मुद्दा ह्यासाठी दिला की त्या वातावरणात दारू शरीरात लवकर चढत नाही. शरीरात पित्त सुद्धा कमी होते.( आपल्याकडे हिवाळा आला की खायची चंगळ असते हा काल तब्येत कमाविण्यासाठी चांगला असतो. ह्या बातावारणात दारू नीट प्यायलेली झेपते. अभक्ष खाल्लेले पचते .युके पेक्षा जास्त विस्की आपल्या एकट्या पंजाबात विकली जाते )
मात्र भारतात मुंबई किवा दक्षिण भारतात उष्ण हवेत सब्जा सारखे पदार्थ शरीरातील दाह कमी व्हावा म्हणून सरबता समवेत पितात .पाण्यात वाळे घालतात. भारतात उन्हाळ्यात गळवे ,घामोळे होतात त्यात अजून नीट विस्की प्यायलो ( जोडीला चमचमीत तेलकट पण चविष्ट जेवण असेल ) तर लिवर चे हाल पाहायला नको.
थंड प्रदेशात व जगात कोठेही बियर ही चिल्ड सर्व करतात.( कारण बियर मध्ये अल्कोहोल चे प्रमाण कमी असते. )
ऑन द रॉक च्या मागील तत्व असे आहे. की बर्फाचा खड्यामुळे त्या विस्कीमधील गंध उफाळून येतो.( मात्र स्कॉट लेंड मधील एका ब्रेवरीज ला भेट दिली असता त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की बर्फ जसा विरघळायला लागतो तसे तसे विस्कीची चव बदलते. त्यापेक्षा रामबाण उपाय म्हणजे विस्कीच्या ग्लास मध्ये पाण्याचा हलका हबका म्हणजेच काही थेंब फक्त टाकावेत नी मग तिचा आस्वाद घ्यावा. येथे ब्रेवरीज मधील माझे फोटो टाकण्याचा अनावर मोह होत आहे. पण....)
करोना सोबत लिंब आणी मीठ ह्याच्या वापरामागे तेथील दमट व उष्ण हवामानात शरीरातील मिठाचे प्रमाण कमी होते तेव्हा दारू पितांना दि हायद्रेशन होऊ नये म्हणून पितात. भारतात देखील ही प्रथा अनकूल ठरते.
कुठल्याही देशातील कपडे ,खान पान संस्कृती ही त्या भवतालच्या वातावरणाशी व पिकणाऱ्या पिकांवर अवलंबून असते.
ती लोक अर्धे कच्चे अभक्ष भक्षण करतात म्हणून आपण खाण्यात त्यांचे अनुकरण करत नाही.
त्या लोकांनी भारतीय जेवण ,करी स्वतःला हवी तशी ( म्हणजे कितीतरी वेळा करी मध्ये पिठी साखर घालून ) खातात म्हणजे बांगलादेशी मालकीच्या भारतीय उपहारगृहात हे प्रकार सर्र्रास आढळतात..
म्हणून परदेशातील भारतीय जेवण हा अपवाद वगळता आपल्यासाठी नाईट मेयर असते. पण गोरे त्यात खुश असतात.
आज त्यांचाकडे वारुणी रूम टेम्प्रेचर ला सर्व करायची असेल ( तर आपल्याकडे ती आपल्या रूम टेम्प्रेचर ला सर्व करून चालत नाही )
ती लोक चीज व ओलीव हे चकणा म्हणून वापरतात तर आपला चकणा झणझणीत असतो.
त्यांचाकडे रूम मध्ये हिटर तर आपल्याकडे वातानुकुलीत यंत्रे असतात. हॉलीवूड चे सिनेमे ,कादंबर्या जसेच्या तसे भारतीय रसिकाच्या माथी मारल्यावर त्या पहिल्याच दिवशी राम म्हणतात.
मात्र त्यात भारतीय अभिरुची ला झेपेले असे सुयोग्य बदल केले तर ते हिट देखील होतात. ह्यातून काय तो बोध घ्वावा.
मात्र परदेशात दारू विषयी माहिती दिली जाते कार्यशाळा होतात. त्यांच्या संस्कृतीत दारू निषिद्ध मनात नसल्याने मुलांना ती कशी प्यावी ह्याचे टेबल मेनर्स शिकवले जातात.
आपल्याकडे चोरीचा मामला असतो म्हणून मात्र आजकाल भारतात वाईन कल्चर रुजवण्यासाठी खास कार्यशाळा असतात .आमच्या स्तर अकेडमी सुद्धा विविध मद्यांवर कार्यशाळा घेते .
7 Nov 2011 - 12:50 pm | सोत्रि
असहमत, गंध 'उफाळून' येत नसावा ;) खुलत असावा.
इथे सहमत. कारण बर्फ जसा विरघळायला लागतो तसे व्हिस्कीतील पाण्याचे प्रमाण वाढत जाउन व्हिस्कीची चव बदलते
- (कार्यशाळेत हजेरी लावण्याची इच्छा असलेला ) सोकाजी
8 Nov 2011 - 12:31 am | आनंदी गोपाळ
च्याय्ला!
कंच्याबी गोस्टिचा इक्ता अभ्यास करावा का? असं म्हंतो मी.
(शिकोणी घेताका इचार्नारा)
आनंदी गोपाळ
8 Nov 2011 - 3:57 am | निनाद मुक्काम प...
गोपाळ साहेब हा आमच्या हॉटेल मेनेजमेंट च्या शिक्षणातील एक भाग होता.
बाकी मकारांमध्ये विशेष रुची असल्याने ह्या विषयाला केवळ अभ्यास न पाहता माझ्या जीवनशैलीचा एक भाग बनवला.
भारतातील पहिली महिला बार टेंडर व ह्या शेत्रातील पितामह जिने मुंबईत सर्वप्रथम कॉकटेल कल्चर रुजवले अश्या आमचा शिक्षिका शद्बी बसू ह्यांचा स्तर अकेदेमी मध्ये शिकायला मिळाले. त्यांचामुळे जगभरातील ह्या शेत्रातील प्रसिध्द व्यक्तींशी संबन्ध आला.
म्हणून थोडे ह्या विषया बद्दल आपुलकीने लिहितो .
सध्या रहात असलेल्या युरोपियन खंडात मद्याला त्यांच्या संस्कृतीत अढळ स्थान आहे. त्यामुळे कधी काळी शिकलेले लक्षात आहे.
त्यात सोकाजी सारखी दर्दी माणसे एवढे सुरेख लेख काढतात त्याला आपला खारीचा वाटा ( चकण्या एवढा ) मी लिहितो .
बाकी कधीही माझ्या खव मध्ये येऊन धडाका काही प्रश्न असल्यास त्यांचे माझ्या कुवतीनुसार निरसन करेन.
4 Nov 2011 - 11:58 pm | आशु जोग
निनाद मुक्काम प...
फारच माहितीपूर्ण आणि वेगळा विचार, भान देणारा प्रतिसाद