मरणावेळेच्या शूटिंगची सोय आणि इतर सेवा पुरवल्या जातील. अधिक माहीतीसाठी वाचा..

Nile's picture
Nile in जनातलं, मनातलं
11 Sep 2011 - 2:27 pm

काही लोकांनी मरणाचेवेळी त्यांचे व्हिडो शुटिंग केले जावे अशी अपेक्षा आम्हाजवळ व्यक्त केली. सदर इच्छेची दखल घेऊन आम्ही इनिशीएटीव्ह घेतलेला आहे. त्या धाग्यावर अवांतर होऊन इतर सदस्यांना भलते सलते अनुभव येऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवत आहोत.

मूर्खांसाठी, गाढवांसाठी अन नीट न वाचता येणार्‍यांसाठी विशेष सूचना.( रडारडी करायच्या आधी धागा कोणत्या सदरांत आहे हे पहावे.
)
वरील सर्व मरणेच्छुक लोकांना विडो शुटिंगचा लाभ देण्याची सोय आम्ही करू. (दमड्या तयार ठेवा!!)
त्यासाठी मात्र काही शेड्युल/अटी बिटी आहेत ते पाळले गेलेत तर गफलती होणार नाहीत. त्यातल्या काही खाली लिहतो.

१. आधी कान्ट्र्याक्ट वर मरणदिन ठरवून सही करून द्यावी लागेल. मरणाचा दीन एखाद आठवडा पुढे मागे झाल्यास हरकत नाही. दिवस अगदी बरोबर आल्यास ५०% सूट मिळेल.

२. कॉन्ट्र्याक्ट् साईनिंग डेट आणी व्हिडो कॉपीराईट स्टार्ट डेट एकच असेल. तेव्हा मरणाला उशीर होऊन कॉपीराईट संपल्यास निळे आणी व्हिडो शुटिंग कंपनी कोणताही मोबदला देण्यास बांधील राहणार नाही.

३. जितके आधी कॉन्ट्र्याक्ट साईन होईल तितका दर स्वस्त असेल.

४. मरणार्‍याच्या मरतानाच्या रंगरुपावरून मोबदल्याचे दर ठरवले जातील. याचे सगळे हक्क निळे आणि व्हिडो शुटिंग कंपनीकडे असतील, त्यावर कोणतेही चॅलेंज स्विकारले जाणार नाही.

५. हौशे गवश्यांचे स्वागतच आहे. त्यांना व्हिडिओत चार 'शब्द अन रडणे' इतका रोलही दिला जाईल. फूटेजच्या लांबीनुसार त्याचा चार्ज वेगळा पडेल. १५ मिनिट रडणे किंवा ५ मिनिट घाय मोकलून रडणार्‍याला स्पेशल डिस्काउंट+जेवण+ ३ स्टार हाटेलात स्टे कंपनीतर्फे दिला जाईल.

६. हॉलिवूड मधून नट्या आणण्याची सोयही असेल, त्याचा वेगळा चार्ज पडेल. कोणती नटी आणायची याचे सर्व हक्क कंपनीकडे असतील.

७. बॉलीवूडची नटी आणून मरणाराचे तिच्याशी अनैतिक संबंध होते अशी बातमी शेवटी देऊन ट्यार्पी वाढवण्याचा ऑप्शनही दिला जाईल. हा ऑप्शन घेतल्यास विशेष सवलत देण्यात येईल. नटी कोण हे निवडायचे हक्क फक्त कंपनीकडे असतील.

८. मरणशय्येवर केलेल्या उत्तम अभिनयाची दखल घेण्यात येऊन त्यानुसार योग्य असा मोबदला वारसांना देण्यात येईल.

९. एखाद्या मरणार्‍या मित्रास रेकमेंड केल्यास त्याच्या मरणटेप विक्रीतून मिळालेल्या नफ्यातील २०% मरणोन्मुखास वा त्याच्या वारसांना देण्यात येतील. रेकमेंड करणार्‍याने ठराविक एलिजीबीलीटीची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

१०. मरताना दैवी अनुभव आले असे छानश्या अभिनयाने लोकांना पटवून देण्यास मरणारा यशस्वी ठरला आणि त्यायोगे त्याच्या नावाने भविष्यात मठ/आश्रम इ. काढावयाचा असेल तर त्याचे सर्व हक्क फक्त कंपनीकडे असतील. मठ/आश्रम इ. तून मिळालेल्या नफ्याचे २०-५०%* वारसांना दिले जातील. इतर सर्व नफा कसा वापरावा याचे हक्क कंपनीकडेच असतील.
*वारसांचा कंपनीशी आणि मठ/आश्रमाप्रती असलेल्या भूमिकेवरून योग्य प्रमाण ठरवले जाईल.

ह्या प्राथमिक अटींबरोबरच संपूर्ण टर्म्स आणि कंडिशन्स वर सही केल्याशिवाय कोणतेही कंत्राट घेतले जाणार नाही. संपूर्ण टर्म्स आणि कंडिशन्स कंत्राटावर सही करतेवेळीच सादर केले जातील.

इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे, तेव्हा लागा कामाला आणि खाली प्रतिसादात टिपा लिहा.

संस्कृतीगुंतवणूकधर्मव्युत्पत्तीजीवनमानमौजमजासद्भावनाशुभेच्छामदत

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

11 Sep 2011 - 3:02 pm | चित्रगुप्त

सदर शूटिंग चे वेळी ड्यूटीवर असणार्‍या आमच्या हापिसातील यमदूतांना त्यांचे कमिशन आगाऊ दिल्याशिवाय ते त्यांचे काम पूर्ण करणार नाहीत.

तसेच कॉन्ट्र्याक्ट साईन करण्यापूर्वी आमच्या हापिसाकडून त्यादिवशी पुरेसे यमदूत उपलब्ध होतील की नाही, याची आगाऊ खात्री करून घेणे. यासाठी www.yamaraaj.com इथे चवकशी करावी.

हॉलिवूड मधून नट्या आणल्यास, आमच्या दूतांना त्या आवडल्यास त्यांनाही उचलून आणले जाऊ शकते, याची नोंद घ्यावी.

Nile's picture

12 Sep 2011 - 11:35 am | Nile

तुमचं आमचं 'गुप्त' डील असताना ते 'चित्र' असं पब्लिकसमोर कशाला मांडांयचं? काही कमी जास्त झालं असेल तर आपण करु की नीट. कधी बसायचं? ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

11 Sep 2011 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा

@- हॉलिवूड मधून नट्या आणल्यास, आमच्या दूतांना त्या आवडल्यास त्यांनाही उचलून आणले जाऊ शकते, याची नोंद घ्यावी.

.खिक्क...ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मला यमदूताची नोकरी हवी आहे ;-) आणी तसेही आंम्ही हॉलीवूड मध्ल्या अनेक नट्यांवर मरतोच :-p ,त्यामुळे नोकरी पूर्व म्रुत्यू ची अट घालू नये :-)

चित्रगुप्त's picture

11 Sep 2011 - 7:04 pm | चित्रगुप्त

यमदूताच्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता:
शिक्षणः
मार्तिक पास
अनुभवः
१. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही).
२. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य.
३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक.

इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील.
याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Sep 2011 - 7:46 pm | अत्रुप्त आत्मा

:bigsmile: यम दूताच्या नोकरीसाठी पात्र आवश्यकता---

शिक्षणः
@-मार्तिक पास :-D हा परीक्षा निकाल समजावा काय? ;-) आमचा निकाल 'जगणे फेल' असा लागलाय,चालेल का?
अनुभवः
१. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). @-अन्य योनीत माणुस मारल्याचा अनुभव कसा येणार ? :puzzled:

२. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य...ह्ही ह्ही ह्हा ह्हा @-नक्की कोणाची व कोणती वस्तू धरावी ;-) ,याचा उलगडा होइल काय?

३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. @-कुणाच्या? मरणाय्रांच्या की आमच्या? :-D आणी चोवीस ड्यूटी हे काय प्रकरण आहे,ते ही विस्तारून सांगावे... :-)

इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील.@-नुसताच डेटा नेणार की आंम्हालाही? ..नेणार? ;-)

याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.@- यांच बींग आमी कवाच ठोकून फोडलय...आनी तशी बी आपल्याला नाड्या सोडायची हौस नाय... :bigsmile:

Nile's picture

12 Sep 2011 - 11:39 am | Nile

तुम्हाला यमदुताची नोकरी मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. एवीतेवी तुम्ही मरणार्‍याच्या जवळपास त्याच्या मृत्युसमयी असालच तेव्हा कॅमेरामचा जॉबही यमदुतांनाच द्यावा अशी डील आम्ही चित्रगुप्तांना दिली आहे. यमदुत झाल्यानंतर मुंबईच्या मसणात कॅमेराचे ट्रेनिंग देण्यात येईल. हँडसम सॅलरी आणि महिन्याला एक नटी असा छानसा मोबदला मिळेल. ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2011 - 1:56 pm | अत्रुप्त आत्मा

@- एवीतेवी तुम्ही मरणार्‍याच्या जवळपास त्याच्या मृत्युसमयी असालच तेव्हा कॅमेरामनचा जॉबही यमदुतांनाच द्यावा अशी डील आम्ही चित्रगुप्तांना दिली आहे--- ''हमकू फसाता है क्या?'' ;-)
निळूभाऊ करती डाकु-डाव...डाकुडाव ।
२/२ सुपाय्रांना एकच-भाव एकच भाव ॥...आमाले न इचारता...डिल ठरवलं बी... ऊं ऊं ऊं...आमी नाइ ज्जा....हा काम-गारांवरचा अन्याय आहे...माझ्या सर्व काम-गार यमदूत बंधूंन्नो व --- त्यांच्या भगिनींन्नो :-D ...आज रात्री ठीक १२च्या पुढे कधीही- वैकुंठ-दहनखड्डा क्रमांक-३ ''मधेच'' आपल्यावर अन्याय करणाय्रा या भांडवलशाहांचा 'मडकी' फोडून निषेध करायचा आहे ...तेंव्हा सर्वांन्नी जमून यमदूत ऐक्य दाखवून देऊ.... काम-गारे-ग्गार चळवळीचा विजय असो :angry:

@!- हँडसम सॅलरी आणि महिन्याला एक नटी असा छानसा मोबदला मिळेल. -- या ऐवजी आपण आंम्हास उभय पक्षी ;-) मान्य केलेला एक पगार मंजेच ''एक सेलरी व हेंडसम नटी :-p इतके दिलेत तरी आंम्ही मिसळला तर्री फुकट मिळाल्यासारखे आनंदाने कब्बड्डी खेळू... हीह्ह्ह्ह्हा हा हा ;-)

नितिन थत्ते's picture

12 Sep 2011 - 2:06 pm | नितिन थत्ते

>>'एक सेलरी व हेंडसम नटी

"हॅण्डसम" नटीपेक्षा 'एक हॅण्डसम सॅलरी आणि नटी' हेच ठीक आहे.

रमताराम's picture

12 Sep 2011 - 2:30 pm | रमताराम

फक्त 'हँड'सम (मुठीत मावणारी असा अर्थ निघू नये म्हणून) 'अट्रॅक्टिव सॅलरी' अशी दुरुस्ती सुचवतो.

तसेही हँडसम नटी वाचून ह. ह. पु. वा. जोरदार 'फोरहँड' असणारी मार्टिना नवरातिलोवाच एकदम डोळ्यासमोर आली... मेलो. सामान्यपणे बाईला ब्यूटीफुल म्हणतात हो, बाप्या हँडसम असतो.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Sep 2011 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा

@- सामान्यपणे बाईला ब्यूटीफुल म्हणतात हो, बाप्या हँडसम असतो... :-D ह्हा ह्हा ह्हा ह्हा ...ठ्ठार मेलो...

Nile's picture

13 Sep 2011 - 11:22 pm | Nile

ह्हा ह्हा ह्हा ह्हा ...ठ्ठार मेलो...

च्यायला, आम्ही व्हिडिओ शुटिंग काय सुरु केलं आता यमदुतही मरायला लागले!! ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2011 - 4:49 pm | अत्रुप्त आत्मा

@---"हॅण्डसम" नटीपेक्षा 'एक हॅण्डसम सॅलरी आणि नटी' हेच ठीक आहे.---आइच्या गावात....! खरच की राव.... आमचा अनुभव कमी पडला म्हणायचा ;-) ,,,तुम्हाराच बाराब्बर हाय.''श्यालरी हेंडसम---तो नटी पचास'' :-p

इरसाल कार्टं's picture

10 Feb 2017 - 5:15 pm | इरसाल कार्टं

हा...हा...हा.................................................

चित्रगुप्त's picture

11 Sep 2011 - 7:04 pm | चित्रगुप्त

यमदूताच्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता:
शिक्षणः
मार्तिक पास
अनुभवः
१. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही).
२. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य.
३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक.

इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील.
याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.

राजेश घासकडवी's picture

11 Sep 2011 - 5:07 pm | राजेश घासकडवी

मी धाग्याचं शीर्षक वाचलं आणि उडालोच. मला वाटलं मरण्याच्या वेळी गोळ्या घालण्याची सुविधा पुरवताय की काय! व्हिडिओ शूटिंग म्हटल्यावर जरा हायसं वाटलं.

बाकी धागा वाचून 'ही गोळी डोकेदुखीच्या बरोब्बर पंधरा मिनिटं आधी घेतली तर डोकं दुखत नाही' ही जाहिरात आठवली.

इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे,

मी काय म्हणतो, तुम्ही तुमचं प्याकेज वाढवलं पाहिजे. शिवाय चुकीचं डेमोग्राफिक टारगेट करताय असंही वाटतं. आता आपण अमुक दिवशी मरावं आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करून घ्यावं असं वाटणारे लोक किती? आणि त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे असतीलच याची खात्री काय? त्यापेक्षा नातेवाईकांकडे मार्केट करा ना. आपल्या नात्यातलं अमुकतमुक मरावं असं वाटणारे खूप असतील. बरं, त्यांच्याकडे पैसे असण्याची पण गरज नाही. विमा उतरवण्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं की झालं. मग बघा तुमच्याकडे क्लायंट्सचा कसा ओघ येईल ते. आणि लोकं बरोब्बर त्या दिवशी मरतील. सुपाऱ्या घेण्याचं कॉंट्रॅक्ट घ्यायला सुरूवात केलीत की तुमचं पॅकेज परिपूर्ण होईल.

मरणात खरोखर जग जगते... हे वाक्य जगापुरतं लागू झालं नाही तर तुमच्यापुरतं तरी निश्चितच लागू होईल.

(हा प्रतिसाद केवळ गमतीदार असून कोणी कोणाचे खून करावे अशा मताचा मी नाही. मिसळपाव व्यवस्थापन गोत्यात येऊ नये यासाठी हा खुलासा)

Nile's picture

12 Sep 2011 - 11:33 am | Nile

मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे हे पॅकेज देता येणार नाही. मात्र तुमची लोकांना मारायची एजन्सी असेल तर तुमच्याशी कोलॅबरेशन करण्यासंबंधी विचार करू.

साती's picture

12 Sep 2011 - 12:57 pm | साती

गुर्जी मी पण बी "मरणवेळी शुटींगची वेळ " मजी शुटींग करून मरणवेळची सोय करतात की काय असं समजले.

उगाच आम्हा डॉक्टरांच्या पोटावर पाय देतात की काय निळेभाऊ असं वाटलं. :)

राजेश घासकडवी's picture

12 Sep 2011 - 11:12 pm | राजेश घासकडवी

गोळ्या घालून मारणे याबाबतीत डॉक्टरांचा हात कोण धरणार? :)
निळेभाऊ, तुमच्या प्याकेजमध्ये डॉक्टरांनासुद्धा समाविष्ट करून घ्या. रोग्याला (किंवा निरोग्यालाही खरं तर) योग्य वेळी मरण येणं, आणि त्याआधी हॅलुसिनोजेन देऊन तोंडून चित्रविचित्र कहाण्या वदवणं, यासाठी डॉक्टर हवेच तुमच्या टीममध्ये.

(समस्त डॉक्टरांनी ह. घ्या.)

डॉ. राजेश घासकडवी.

धनंजय's picture

12 Sep 2011 - 11:30 pm | धनंजय

"गोळ्यांनी मारले" असे वाचून मला सन्माननीय सदस्य श्री. गोळे यांनी घेतलेले बळी (उदहरणार्थ १, आणि २) क्षणभर आठवले.

चतुरंग's picture

13 Sep 2011 - 2:16 am | चतुरंग

कोणाचं काय तर कोणाचं काय! धन्याशेठचा हा प्रतिसाद जाम आवडला. 'गोळे'फेक आवडली! ;)

रंगगोळा

Nile's picture

13 Sep 2011 - 2:47 am | Nile

डाक्टरच्या पोटावर पाय देऊच कसे! एकाच धंद्यात असलेल्या लोकांबरोबर वैर ठेवू नये म्हणतात! ;-)

बाकी गुर्जींशी सहमत आहे. योग्य डॉं भेटले तर मरणार्‍यावर अभिनयासाठी विसंबून रहावे लागणार नाही, डॉ. लोक गोळ्यावगैरे देऊन हवं तसं घडवून आणतील याची खात्रीच आहे. ट्यार्पी वाढेलच आणि कंपनीचे पैसेही वाचतील.

बाकी यावरून आमच्या ग्रेगरी हाऊसचा 'केन अँड एबल' हा एपिसोड आठवला. रसिकांनी जरूर पहावा.
http://www.usanetwork.com/series/house/theshow/episodeguide/episodes/s3_...

साती's picture

13 Sep 2011 - 10:57 am | साती

भागीदारी मान्य.
किती कट देताय? (आमाना जल्ला कटशिवाय दुसरा सुचना नाय! :) )
साते, भागिदारीत परशेंटेज मागतत कट नाय.

(आमाना जल्ला कटशिवाय दुसरा सुचना नाय! Smile )
साते, भागिदारीत परशेंटेज मागतत कट नाय.

पेशंट्सचे गळे* कापायची सवय असल्यामुळे असेल. ;-)

*हळव्या हृदयाच्या लोकांनी हा शब्द 'खिसे' असा वाचावा. धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2011 - 2:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तीन टक्के देणारेस का रे?

अत्रुप्त आत्मा's picture

11 Sep 2011 - 5:08 pm | अत्रुप्त आत्मा

इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे, तेव्हा लागा कामाला आणि खाली प्रतिसादात टिपा लिहा.-----अता लीहिलेले टीपा--- ;-)

मरण मार्केटींग अ‍ॅड कंपनी प्रा.लिमिटेड...

आमचे येथे घाऊक दरात मरणाचं मार्केटींग करणाय्रांच्या जाहिराती स्विकारल्या जातील...याच धाग्यावर भेटा अथवा लिहा-

''यमदूत'' अपार्मेंटस,प्रेतयात्रा लेन, जुन्या स्मशाना जवळ
मु.पो.- वेताळवाडी,तिरडीखाना,वैकुंठ-दक्षिण.... ;-)

नितिन थत्ते's picture

11 Sep 2011 - 6:27 pm | नितिन थत्ते

आपण कॉण्ट्रॅक्ट साईन करायला तयार आहोत. परंतु निळे आणि कं यांच्याशी केलेले कॉण्ट्रॅक्ट निळे आणि कं च्या वारसदारांस बंधनकारक असणार का? नाही, आमच्या आधीच निळे (किंवा 'आणि कं') खपले तर काय?

मारणार्‍यालाच मारणारे लोक तुम्ही! तुम्ही दलाल स्ट्रीटलाही फसवता तिथे आमची काय बात! ;-)

संतोषएकांडे's picture

11 Sep 2011 - 7:00 pm | संतोषएकांडे

अहो.... शूटींग जर मरणार्‍याच्या 'विडो' च ज कराच अस्ल्यास एवढा सोपस्कर कशाला...?
ती 'विडो' च कय ते करेल.....

संतोषएकांडे's picture

11 Sep 2011 - 7:07 pm | संतोषएकांडे

अहो.... शूटींग जर मरणार्‍याच्या 'विडो' च ज करायचं असेल तर एवढा सोपस्कार कशाला...?
ती 'विडो' च काय ते करेल.....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Sep 2011 - 9:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धागा वाचायच्या आधीच कॉण्ट्रॅक्ट द्यायला पाहिजे होतं. धागा आणि प्रतिसाद वाचून खपले.

आशु जोग's picture

12 Sep 2011 - 11:59 pm | आशु जोग

छोटं त्यामुळे छान वाटलं

धनंजय's picture

12 Sep 2011 - 9:44 am | धनंजय

मस्त बिझिनेस प्लॅन

च्यायला... मरणाचा हसतोय मी इथे. बाकी यमदूत व्ह्यायची लक्षणे आमच्यात पूरेपूर आहेत बरं का..

- पिंगू

नंदन's picture

12 Sep 2011 - 12:16 pm | नंदन

चांगली स्कीम आहे. बादवे, अशीच योजना जालीय आयडींबद्दलही आहे का? काही आयडी अलीकडेच धारातीर्थी पडल्याचे समजते. (सुनीलकाका शेट्टी म्हणतात तसे पंगा ना ले)

सहज's picture

13 Sep 2011 - 6:57 am | सहज

पण मसंवर 'जालकंटक' आयडींना भूत म्हणून सुखाने नांदायचा अधीकार आहे पण कडक शब्दात निषेध / वेगळे मत नोंदवणार्‍या व कंपूत नसलेल्या आयडींना पुनर्जन्म नाही.

पिवळा डांबिस's picture

12 Sep 2011 - 12:17 pm | पिवळा डांबिस

एक सुशिक्षित एरोनॉटिक्स इंजिनीयर मुडदेफरास झाल्याचे बघून ड्वाळे पानावले!!!!!
रिसेशन रिसेशन म्हणतात ते हेच का?
:)

नंदन's picture

12 Sep 2011 - 12:21 pm | नंदन

तसेही निळोबा taking a dig at someone च्या कलेत प्रवीण असल्याने, त्यांनी मुडदे-फरासीकडे वळणं तसं नैसर्गिकच ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Sep 2011 - 11:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एरोनॉटीक्स इंजिनीयर आता लोकांची विमानं उडवीत आहेत; हे ही नैसर्गिकच, नाही का?

Nile's picture

13 Sep 2011 - 2:09 am | Nile

एस डब्बल ओ आर आय! आमच्या क्लायंटने डोळे मिटले की आमचा कॅमेरापण बुब्बुळ मिटणार. आमचा करार तिथेच संपला. मुडद्याची जबाबदारी कंपनीची नाही!!

पुढे मागे इन्शूरंस कंपनीचा कोणी क्लायंट भेटल्यास मूडद्याला काही सवलती मिळणार असतील तर चौकशी करू. ;-)

ऋषिकेश's picture

12 Sep 2011 - 1:41 pm | ऋषिकेश

तुमच्या 'आणि कं' मधे वेकंसी आहे का?

पाषाणभेद's picture

13 Sep 2011 - 12:58 am | पाषाणभेद

हेच विचारणार होतो. तुला काय निरोप आला तर सांग बाबा.

धंदा बहरला तर थोडा मेलोड्रामा अ‍ॅड करता येईल. पाभेंना लिरीक्स डिपार्टमेंट अन ऋला परलौकिक अनुभवाचे स्क्रिप्ट ल्हायला घेऊ! ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2011 - 5:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋषिकेशच प. वि. वर्तक आहे काय?

पाषाणभेद's picture

13 Sep 2011 - 5:40 am | पाषाणभेद

"प. वि. वर्तक" म्हणजे जसे शेअर मार्केट मध्ये एखादा नवीन इश्यू आला तर प्रवर्तक असतात तसली काही पोष्ट आहे काय? तसे असल्यास "प. वि. वर्तक" म्हणजे मोठा माणूस (जाड या अर्थाने नव्हे तर पद या अर्थाने) आहे. काही सेटींग असेल तर मुलाखतीविना त्या कंपनीत वर्णी लागेल काय? काये की रेसेशन सुरू झाली तर पंचाईत नको.

आलेला माणूस कधीतरी जाणारच. त्याला मरण नाही. (म्हणजे माणसाच्या येण्याजाण्याला हो.) हा धंद म्हणजे केसकटिंग च्या धंद्यासारखा आहे. कापलेले केस उगवतीलच. नको ते बेभरवशाचे आयटी फियटी.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Sep 2011 - 10:58 am | अत्रुप्त आत्मा

पा.भे...हा प. वि. वर्तक, म्हणजे आजच्या काळातला स्मूक्ष्म देहाचा आद्य प्रवर्तक-तो म्हणे सूक्ष्म देहानी चंद्रावर/मंगळावर वगैरे जातो,,,तसेच भूतकाळात जाऊन आपले आधीचे जन्म वगैरे पाहुन येतो...असा म्हणे त्याच्या नावाचा दबदबा आहे,पण हाच मानव,शाम मानवांनी दिलेले -''सुक्ष्मदेहानी शेजारच्या खोलीत जा,व तिथे आंम्ही ठेवलेल्या वस्तू पाहुन या,व सांगा '' हे दिलेले साधे आव्हान नाकारतो...असला यांचा दबदबा---बदाबदा खाली पडणारा...

ऋषिकेश's picture

13 Sep 2011 - 11:17 am | ऋषिकेश

आरे वा! लवकर धंदा तेजीत येवो म्हंजे सध्याच्या नोकरीच्या योग्य भागावर योग्य त्या पद्धतीने आघात करून आपण मढ्याच्या शुटींगसोबत त्याचे पारलौकीक अनुभव (चवीचवीने!) सांगून वर पैसे कमवायला मोकळे!

विनायक प्रभू's picture

12 Sep 2011 - 4:49 pm | विनायक प्रभू

मला विसरलास काय?
माझे लिखाण वाचुन कित्येक जण धारातिर्थी पडतात.(विच्चार करुन करुन)
बोल पार्टनर शिप देतोस काय?

मरणाची दिलेली डेट जवळ आली तरी क्लायंट काय हवी ती चिन्हं दाखवत नसेल तर तुमच्या समुपदेशनाचे सेशन्स ठेवायचे आमच्या प्लानात आहेच!! ;-)

रिसेशन रिसेशन म्हणतात ते हेच का?

हि हि हि हि !!!!

नविन व्यवसायाची कल्पना मस्त आहे.

मित्रा फारच जबरदस्त लिहितोयस !

पण इथे लिहिण्याऐवजी पुस्तक का प्रसिद्ध करीत नाहीस
जाम खपेल माहित्ये.
(आपला हितचिंतक ) जोग

चित्रगुप्त's picture

13 Sep 2011 - 12:19 am | चित्रगुप्त

सध्या ते पुस्तक कसे खपेल, यापेक्षा केंव्हा कोण खपेल, याची वाट बघताहेत....

मग तुम्ही कधी खपताय जोग आजोबा?

आशु जोग's picture

14 Sep 2011 - 12:03 am | आशु जोग

हे कसं आता नॉर्मल वाटलं
--

चालू द्या जोरात

ते मेट्रीक्स-२ मधे कसं transparent ghost लोकांच्या अंगावर जातं तसं काहीतरी करायचा विचार आहे.

३डी असेल तर लोकांची जास्त टरकावता येईल. ती सोय असेल तर आम्ही विचार करू.

-एक इच्छूक.