हुसेनच्या मृत्यूची बातमी कळताच अपेक्षेनुसार या संस्थळावर सडक्या प्रतिक्रियांचा एक ओघ येऊन गेला. काहींनी मेल्या माणसाबद्दल हे असं बोलणं कसं रुचिहीन आणि सभ्यतेची पातळी सोडून आहे हे सांगितलं. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी किंवा वृद्ध हुसेनना जो देशत्याग करावा लागला त्याविषयी अनेक उदारमतवादी लोकांनी अनेक ठिकाणी या निमित्तानं पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. पण मुळात चित्रकार म्हणून हुसेन यांचं कर्तृत्व काय याचा थोडा परिचय करून द्यावा यासाठी हा लेख लिहिला आहे.
त्याआधी थोडी स्वातंत्र्यपूर्व भारतातली कलासंस्कृती पाहणं गरजेचं आहे. इंग्रजांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. त्याच साली जे.जे. कला महाविद्यालयही निर्माण केलं. त्यात कलाविषयक शिक्षण हे इतर विद्याशाखांनुसार एका आखीव चौकटीत बांधलं गेलं. स्वत:च्या हुशारीविषयी गर्व असणाऱ्या जगज्जेत्या इंग्रजांना तेव्हा आपलीच कला श्रेष्ठ आहे आणि भारतीय कला कनिष्ठ आहे असा विश्वास होता. त्यामुळे या कलाशिक्षणात युरोपियन पद्धतीचं शिक्षण अंतर्भूत होतं. म्हणजे युरोपात तेव्हा प्रचलित असणारी वास्तवदर्शी शैली त्या शिक्षणातला अविभाज्य भाग होती. ती आकर्षक होती याविषयी वादच नाही. त्याचा एक नमुना पहा:
सॉक्रेटिसचा मृत्यू (१७८७) – जाक लुई दाविद (फ्रेंच)
पण यात झालं असं की भारतीय शैलींचा परिचय शिक्षणचौकटीत होत नव्हता. भारतात हजारो वर्षं अनेक प्रकारची कला निर्माण होत होती. मोहेंजोदारो, भीमबेटका आणि अजिंठा-वेरूळ अशा काळापासून ते मधुबनी किंवा कांगरा अशा आपल्या परंपरेतल्या अनेक शैलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कलाविष्कार होत होता.
भीमबेटका
अजिंठा
मधुबनी
अगदी खेड्यातल्या घरांपुढे काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या किंवा भिंतींवर रेखाटले जाणारे देखावे यांत भारताची कलापरंपरा दिसत होती.
यांपैकी कशाचा त्या शिक्षणात समावेश नव्हता. थोडक्यात कलाक्षेत्रातसुद्धा निव्वळ पाश्चिमात्य शैलीच्या नकलीत निपुण असे ब्राऊन साहेब निर्माण करणारं ते शिक्षण होतं.
गंमत म्हणजे खुद्द युरोपात यानंतर लगेचच म्हणजे १८७०च्या आसपास वास्तवदर्शी चित्रणाला छेद देऊन वेगळी इम्प्रेशनिस्ट शैली निर्माण झाली. वास्तवदर्शी म्हणजेच चांगलं हा विचार हळूहळू मागे पडत गेला. १९०७मध्ये पिकासोच्या Les Demoiselles d'Avignon या चित्रानं क्रांती घडवली. त्यात पिकासोनं आफ्रिकन मुखवट्यांवरून प्रेरणा घेतली होती. यापूर्वी व्हॅन गॉघसारख्यांनी जपानी कलेपासून प्रेरणा घेतली होती. म्हणजे पश्चिमेनं पूर्वेकडून उसनं घेण्याचा एक उलटा प्रवास चालू झाला होता.
पण आपल्याकडे आता पूर्व-पश्चिम संगम वेगळ्या पद्धतीनं होत होता. रविवर्मानं पाश्चिमात्य शैलीमध्ये आपल्या मिथ्यकथा आणि पौराणिक कथांमधले प्रसंग चित्रित केले होते. हे एक प्रकारे पाश्चिमात्य श्रेष्ठत्व मान्य करणं आणि आपली समृद्ध परंपरा सोडून देण्यासारखं होतं. उदा: हे चित्र पहा:
वर दाखवलेल्या दाविदच्या चित्राचं या चित्राशी असलेलं नातं लक्षात येईल.
फाळक्यांनी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. त्यातही परदेशी तंत्रज्ञान वापरून आपल्या पौराणिक कथा आणि त्यातले चमत्कार वगैरे दाखवण्याचे प्रकार सुरु झाले.
पण त्याच वेळी आपण स्वातंत्र्यासाठीसुद्धा लढत होतो. आणि त्यातही पूर्व-पश्चिम असे दोन ध्रुव होतेच. एकीकडे गांधीजी देशीवादाला अनुसरून खेड्याकडे चला वगैरे सांगत होते, तर नेहरूंना विज्ञान-तंत्रज्ञान आणून आधुनिक भारत घडवायचा होता. जर सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचं असेल तर दोनही गोष्टींचा संगम होणं आवश्यक होतं.
कलेतही हे व्हायला हवं होतं. तसे काही प्रयत्न होत होते. उदा: टागोरांच्या प्रभावाखाली शांतीनिकेतनमधून असे प्रयोग होत होते.
बिनोद बिहारी मुकर्जी
नंदलाल बोस
या बेंगाल स्कूल व्यतिरिक्त जामिनी रॉय यांनी कालीघाट शैलीशी साधर्म्य राखत आपली शैली बनवली.
अमृता शेरगिल यांनी पाश्चिमात्य प्रभाव घेऊन आपली एक वेगळी पण खास भारतीय शैली घडवली.
अमृता शेरगिल
पण १९३०-४०च्या सुमाराला काही तरुण या सर्वाविरोधात बंडखोरी करायला उभे ठाकले. प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस ग्रुप नावानं हे ओळखले जातात. त्यांच्या मते हे आधीचे प्रयत्न एकतर फार देशी होत होते किंवा पूर्णत: पाश्चिमात्य प्रभावाचे होत होते. त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं. जे खास भारतीय वाटेल, पण तरीही परंपरागत शैलींशी त्याचं अगदी उघड नातं लागणार नाही आणि त्यावरचा पाश्चिमात्य प्रभाव इतकाही नसेल की त्यात काही भारतीय उरणारच नाही असं त्यांना साधायचं होतं. आता ही तारेवरची कसरत कशी साधणार होती? प्रत्येकानं आपापलं उत्तर शोधलं. आपण फक्त हुसेनचं उत्तर थोडं खोलात जाऊन पाहू.
वेगवेगळ्या भारतीय शैलींमध्ये वरवर पाहता साधर्म्य दिसत नाही. पण नीट विचार केला तर त्याची काही वैशिष्ट्यं लक्षात येतात. भारतीय रंगसंगती पाश्चिमात्यांपेक्षा खूप झगझगीत असते. (म्हणून कदाचित या संस्थळावरची रंगसंगती काहींना भडक वाटते ;-)) कडक उन्हाच्या प्रदेशात रंग नीट उठून दिसावे म्हणून ते नकळत अधिक भडक होत असावेत. कदाचित त्वचेच्या काळ्या रंगावर ते अधिक उठावदार वाटत असतील. राजस्थान किंवा दक्षिण भारत वगैरे ठिकाणी हे प्रकर्षानं लक्षात येतं. उदा: हे पहा, किंवा हे पहा:
हुसेन यांनी हे झगझगीत रंग आपलेसे केले. अर्थात त्यांनी आधी हिंदी सिनेमाची पोस्टर्स चितारलेली असणं याचादेखील या गोष्टीशी संबंध आहे.
(हे हुसेन यांनी रंगवलेलं नव्हे. शैलीचा परिचय होण्यासाठी म्हणून एक प्रातिनिधिक पोस्टर निवडलेलं आहे.)
अवास्तव चित्रण, वास्तवाहून भडक रंग आणि तपशीलांचा काला ही वैशिष्ट्यं पारंपारिक भारतीय कलेत दिसतात, पूर्वीच्या सिनेमाच्या पोस्टर्समध्ये दिसतात आणि हुसेन यांच्या चित्रातही दिसतात. आधुनिक कलेत या रचना आल्या तेव्हा त्या अशा पुरातन आणि खास भारतीय परंपरेशी नातं जोडत आल्या. याशिवाय अगदी अजिंठा-वेरूळ काळापासून प्रचलित असलेल्या शरीरचित्रणाचे अनेक विशेषसुद्धा त्यांनी आत्मसात केले. हे सर्व अर्थात जे. जे. मध्ये शिकवल्या जाणाऱ्या वास्तवदर्शी शरीरचित्रणाहून वेगळं आणि अधिक भारतीय होतं.
पण याशिवाय हुसेन यांनी पाश्चिमात्य कलेत तोवर झालेला आधुनिक विचार उचलला. विशेषत: काही ठळक रेषा वापरून चित्र कशाचं आहे हे पटकन कळावं ही पिकासोची शैली त्यांनी उचलली.
पिकासो - दम्वाजेल द'आविन्यो (१९०७)
गंमत म्हणजे तपशीलांचा काला पिकासोच्या गेर्निकासारख्या चित्रांतदेखील दिसतो. त्यामुळे आधुनिक चित्रणशैली उचलतानासुद्धा हुसेन यांनी आपली भारतीयता जपत ती उचललेली दिसते.
पिकासो - गेर्निका (१९३७)
आणि अर्थात प्रत्यक्ष विषयाच्या निवडीतसुद्धा समकालीन किंवा कालातीत पण परिचित भारतीय विषय त्यांनी निवडले. त्यांत घोडे, हत्ती, गाई असे भारतीयांचे आवडते प्राणी होते; गांधीजी, इंदिरा गांधी, मदर तेरेसा अशा प्रसिद्ध व्यक्ती होत्या. त्यात सामाजिक विषय होते (उदा. गरीबी, भ्रष्टाचार, शिक्षणाचा अभाव); सांस्कृतिक घटक होते. उदा: ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक पाहून त्यांनी काही अप्रतिम चित्रं रंगवली आहेत. त्या काळात मुंबईत अलेक पदमसी, इब्राहिम अल्काझी अशा अनेकांनी जे नवनवीन नाट्यप्रयोग केले ते पाहून काढलेली त्यांची चित्रं गाजली. वाराणसीच्या घाटांवरची त्यांची एक अख्खी मालिका आहे. अशा पुष्कळ गोष्टी सांगता येतील.
हुसेनच्या चित्रांच्या बाबतीत विशेष लक्षात येण्यासारखी अजून एक गोष्ट होती: अनेकदा मुंबईच्या फोर्ट भागात विविध कलादालनांत अनेक आधुनिक चित्रकारांची प्रदर्शनं भरायची. मध्यवर्ती भाग असल्यामुळे कलेविषयी पूर्णत: अनभिज्ञ असे सर्व सामाजिक थरांतले अनेक लोक जाताजाता ही प्रदर्शनं पहायला यायचे. ते हुसेनच्या चित्रांकडे जितके पटकन आकर्षले जायचे तितके क्वचित इतरांच्या चित्राकडे जाताना दिसत. हुसेनच्या चित्रांमध्ये त्यांना काहीतरी आपल्या परिचयाचं दिसायचं. यामागे हुसेनची भारतीय दृष्टीची जाण दिसत असे. (असे अनुभव आता येत नाहीत. कारण हुसेनची चित्रं प्रदर्शित करायला कलादालनं घाबरतात. असो.)
पुष्कळ महागात ज्या कलाकृती विकल्या जातात त्यांच्या बाबतींत येणारी एक अडचण म्हणजे त्या बाजाराच्या काल्यामध्ये आणि खाजगी संग्रहांमध्ये हरवतात आणि आंतरजालावर त्यांच्या प्रतिमा उपलब्ध नसतात. तरीही त्यातल्या त्यात हुसेनच्या मृत्यूच्या निमित्तानं ज्या काही थोड्याबहुत प्रतिमा उपलब्ध झाल्या त्या खाली देत आहे. पण त्याच्या कलेचा हा एक छोटा प्रातिनिधिक अंशही नाही हे लक्षात घ्या. (इथे लेख संपला आहे. आता फक्त चित्रांचा आस्वाद घ्या.)
प्रतिक्रिया
11 Jun 2011 - 3:48 pm | श्रावण मोडक
लेखन आवडले. हुसेन यांचे आणखी घोडे इथं चित्ररुपात हवे होते.
12 Jun 2011 - 12:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन आवडले.
-दिलीप बिरुटे
11 Jun 2011 - 3:51 pm | रणजित चितळे
मस्त चित्र आहेत.
हुसेन बद्दल आपल्या लेखाने खाली दिलेल्या गोष्टीची आठवण झाली
राजा रविवर्म्याच्या प्रतिभेला ओळख दिली नाही फिदा हुसेन ह्यांनी ह्याचे वाईट वाटते. अंगात कला असून तिचा वापर बाकीच्यांच्या संवेदना दुखवण्यात घालवला त्याचे वाईट वाटते. फ्रिडम ऑफ एक्प्रेशनच्या नावा खाली जरा जास्तच फ्रिडम घेतले गेले.
एकदा आपली काठी उभी आडवी मारणा-या इंग्रजी माणसाला बर्नाड शॉ ने दम भरला - ते म्हणाले काठी अशी मारु नकोस कारण आत्ता माझ्या नाकालाच लागणार होती. काठी मारणारा इसम म्हणाला - ही लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे व फ्रिडम ऑफ एक्सप्रेशनचा हा अविश्कार आहे. माझी काठी आहे मी कशीही उगारेन. मला थांबवू नका.
बर्नाड शॉ ने त्याला एक चपराख मारुन सांगितले - yes you can brandish your stick any which way you like but dont forget that your freedom ends where my nose starts.
मला लेख आवडला आपला
11 Jun 2011 - 7:50 pm | लिखाळ
लेख आणि चित्रे छान आहेत. चित्रांची निवड छान.
चित्रकलेतले मला फारसे कळत नाही हे समजले.
हुसेन बद्दलची मते बदलली नाहीत.
रणजित, आपण दिलेले हे वाक्य चपखल आणि भारी आहे.
11 Jun 2011 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार
हे वाक्य वाचल्यावर खालचे वाचायचा अथवा बघण्याचा मूडच गेला.
कदाचित हुसेन तुमच्यासाठी भारताचा पिकासो, एक महान आत्मा किंवा थोर कलाकार असेलही पण म्हणुन सर्वांनी त्याच्याकडे तुमच्याच चष्म्यातुन पहावे का ?
जर हुसेनला अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली भारतमातेचे नग्न चित्र काढता येते तर मिपावरील भारतीयांना त्याच्या ह्या कृतीबद्दल त्याच्या विषय निघाल्यावर (मग भले तो त्याच्या निधनाचा का असेना) स्वतःचे त्याच्या बद्दलचे परखड मत व्यक्त करायचा अधिकार नसावा ?
हुसेननी केले ते अभिव्यक्तीस्वातंत्र आणि मिपाकरांच्या प्रतिक्रिया मात्र सडक्या ?
11 Jun 2011 - 3:59 pm | यकु
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
11 Jun 2011 - 8:20 pm | मृत्युन्जय
+१००००१
12 Jun 2011 - 1:43 pm | अप्पा जोगळेकर
समजा हुसेन यांच्या आईवडिलांचे तसल्या स्थितितले चित्र एखाद्याने कल्पनेने रेखाटले असते/असेल तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व्याख्येनुसार गुन्हा ठरेल का असा प्रश्न पडतो.
11 Jun 2011 - 4:18 pm | सहज
तरी हुसेन स्वता किंवा त्यांची कला अजुनही दुर्बोध वाटतात. वास्तवदर्शी शैली आकर्षक होती , आहे व असणार. त्याचे असे विस्कटलेले स्वरुप('मॉडर्न आर्ट'), सामान्यांना त्याबद्दलची अनाकलनीयता हे त्याकाळच्या बुद्धीजीवी लोकांनी चित्रकला हायजॅक केली म्हणावे की त्याकाळच्या मान्यताप्राप्त वास्तवदर्शी शैलीला फाट्यावर मारुन त्या काळच्या नवचित्रकारांनी, अभिजनांनी खुली केलेली चित्रकारीता म्हणावे हेच मला अजुन कळले नाही. :-)
वर उल्लेख आलेली रंगसंगती, त्यात चित्रातील फारसे न कळणार्यांनाही आकर्षीत करुन घेणे हे कळते तरी एकेक चित्र समजले नाही असेच दिसते. चिंज कृपया या दुव्यातील काही चित्र समजवुन सांगा.
रामदास यांचाही प्रतिसाद वाचायला आवडेल.
बाकी मतभिन्नता असणार. त्यावरुन मिपाकरांच्यात झाले त्यापेक्षा आधीक वादविवाद नकोच.
हा धागा हुसेन यांच्या कलेची ओळख करुन देणारा म्हणुन राहीला तर आवडेल.
11 Jun 2011 - 4:16 pm | रेवती
हुसेनांनी काढलेले घोड्याचे चित्र वगळता कोणतेही पाहिले नव्हते.
चित्रे पाहून त्यातून अर्थ समजावून घेण्याची आवड फारशी नाही तरी वेगवेगळ्या काळातली, विविध संस्कृतीची छाप असलेली चित्रे आवडली. त्याचे स्पष्टीकरणही चांगले आहे.
11 Jun 2011 - 5:18 pm | वाहीदा
त्यांच्या अनवाणी फिरण्याची.. त्यांची माधुरीत भारतिय नारी बघण्याची.. त्यांच्या सर्वसामान्यांना न समजणार्या घोड्यांची.. त्यांच्या पाढर्या शुभ्र दाढीची, त्यांनी मिनाक्षी चित्रपटात प्रेशित मोहम्मदां साठी वापरले जाणारे शब्द ते एका स्त्रीसाठी वापरले त्याची, त्यांच्या नग्न चित्रांचीच चर्चा जास्त झाली पण त्यांच्या कलेतून ते काय सांगू इच्छीतात हे कोणीच समजवून सांगितले नाही . त्यांनी चितारलेल्या गणपतिची कधीच चर्चा झाली नाही . ते आपल्या शेवटच्या दिवसात मायदेशी परत यायला तळमळत होते हे आम्ही आमच्या नातेवाईकांकडूनही ऐकले कारण ते तसे आमच्या आईकडच्या नात्यात होते.. त्यांना भारतासाठी ही नितांत प्रेम होते. अन आपण एक भारतिय आहोत याचा ही अभिमान होता पण त्यांनी अशी नग्न चित्रे का चितारली हे मात्र समजू शकले नाही. ते अत्यंत गरिब परिस्थीतीतून अन हालअपेष्टा सोसून पुढे आले होते पण शेवटी त्यांचा मृतदेह काही मायदेशी आला नाही अन दफन विधी येथे होऊ शकत नाही याचे दु:ख आहे..
(मी खरेतर हे सांगू इच्छित नव्हते पण शेवटी रहावले नाही )
मला खरे तर चित्रकार काय सांगतो हे कोणी कलाप्रेमी (चित्राची जाण असलेला) उलगडून सांगीतल्याशिवाय कधिच समजत नाही अन तशीही मी पक्की कंजूष असल्याने त्यासाठी पैसे ही कधी मोजत नाही..
पण जरी त्यांनी भावना दुखावल्या असतील तरीही त्यांच्यासाठी आदर आहेच कारण कोणाही कलाकारा बध्दल अपशब्द काढण्याची मा़झी तरी लायकी नाही.
चिजं खरेच मनापासून धन्यवाद !
11 Jun 2011 - 7:18 pm | माझीही शॅम्पेन
लेख अतिशय सुंदर :) आणि ही प्रतिक्रिया सुध्धा अतिशय प्रामाणिक ! धन्यवाद !!
हुसेन ह्यांच चांगल ३६० डिग्री मध्ये आभ्यासल तर ते खरोखर ग्रेट होते , भारताबाहेर एका भारतीय चित्रकारला मान मिळणे हे नक्कीच कौतकास्पद आहे. कुठलाही माणूस आयुष्यात चांगले काम आणि ठळक चुका नेहमीच करत असतो , पण प्रसिध्ध व्यक्तींच्या चुकांची चर्चा जास्त होते.
(असो ह्या पार्श्व-भूमीवर राज ठाकरे प्रतिक्रिया बोलकी आहे !!! )
एक मराठी मातीत जन्मलेल्या अस्सल शैली असलेल्या ह्या कलन्दर कलाकाराला अखेरचा सलाम !
11 Jun 2011 - 6:42 pm | योगप्रभू
हुसेन यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली टीका मी एकवेळ समजू शकतो कारण बाळासाहेब स्वतः एक चित्रकार आहेत, हिंदुत्त्ववादी विचारांची एक संघटना चालवतात आणि मुख्य म्हणजे कुठेतरी हुसेन यांच्या पिढीतलेच आहेत (हुसेन यांचे वय ९५, तर बाळासाहेबांचे ८५+) असे असुनही बाळासाहेबांची अखेरची प्रतिक्रिया वाचावी. 'अल्ला त्यांना शांती देवो' हे वाक्य त्यात आहे.
पण जे फक्त दाढीचा ब्रश नियमित वापरतात त्या लोकांनी हुसेन यांनी आपल्या चित्रांतून कसा कुणाचा अपमान केलाय हे सांगत 'थेरडं खपलं' यासारख्या दिलेल्या प्रतिक्रिया सडक्याच. इतिहास ठाऊक नसणारे आणि तशी इच्छाही नसणारे ब्रिगेडी जसे 'दादू' आणि 'बाब्या' या भाषेत बोलतात त्यांच्यात आणि यांच्यात फार फरक दिसत नाही. हुसेन यांच्या कलेतील अधिक-उणे चित्रकारांनीच दाखवून दिले पाहिजे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी कशाला घसे खरवडून थुंकायचे?
चित्रकार हुसेन एव्हाना काळाच्या कुशीत शांतपणे विसावले आहेत. त्यांच्यापर्यंत आता हे शिव्याशाप पोचणार नाहीत.
असो. चिं. ज. यांना विशेष धन्यवाद. कलेतील जाणकार मंडळींचे लेखन अजून वाचायला आवडेल.
11 Jun 2011 - 7:09 pm | परिकथेतील राजकुमार
क्या बात है !
या पुढे बलात्काराचे खटले बलात्कार झालेल्या एखाद्या स्त्रीलाच न्यायाधीश बनवुन चालवायला पाहिजे म्हणा की ;) कधी बलात्कार न केलेल्या किंवा स्वतःवर न झालेल्यांना बलात्काराच्या खटल्यात न्यायदान करायचा काय अधिकार ? काय बोल्ता ?
11 Jun 2011 - 7:16 pm | अभिज्ञ
पण जे फक्त दाढीचा ब्रश नियमित वापरतात त्या लोकांनी हुसेन यांनी आपल्या चित्रांतून कसा कुणाचा अपमान केलाय हे सांगत 'थेरडं खपलं' यासारख्या दिलेल्या प्रतिक्रिया सडक्याच. इतिहास ठाऊक नसणारे आणि तशी इच्छाही नसणारे ब्रिगेडी जसे 'दादू' आणि 'बाब्या' या भाषेत बोलतात त्यांच्यात आणि यांच्यात फार फरक दिसत नाही. हुसेन यांच्या कलेतील अधिक-उणे चित्रकारांनीच दाखवून दिले पाहिजे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी कशाला घसे खरवडून थुंकायचे?
आयला कमाल आहे.
ह्याचा अर्थ तुम्हाला ह्या सर्व कन्ट्रोव्हर्सीचा इतिहास अवगत आहे तर??
चिंजंनी चित्रकारीतेबद्दल लेख लिहिलाच आहे. आता तुम्ही हुसेन ह्यांच्या त्या वादग्रस्त चित्रांबद्दल,त्याच्या पार्श्वभुमीबद्दल व त्याच्या इतिहासाबद्दल लेख लिहून मिपाकरांचे अज्ञान दुर करावेत अशी आपणास विनंती करतो.
अभिज्ञ.
12 Jun 2011 - 12:42 am | योगप्रभू
मरणान्तानि वैराणी, या हिंदू संस्कृतीच्या शिकवणीचा विसर पडू देऊ नये, या भावनेतून मी माझी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मिपाकरांचे अज्ञान दूर करावे किंवा आपले मत इतरांवर लादावे, हा हेतू नाही. हुसेन जिवंत असताना त्यांच्यावर भरपूर टीका झाली आहे आणि वादाचा विषय काय होता, हे प्रतिक्रियांतून कुणालाही समजू शकेल. त्यामुळे इतिहासाबद्दल काही लिहायला नको.
हुसेन यांच्या कलेबद्दल लेख लिहिण्याची माझी लायकी नाही आणि कलेचा आस्वादक इतकेच मी स्वतःपुरते म्हणू शकतो. तसे पहायला गेले तर मीही केवळ दाढीचा ब्रश नियमित वापरणार्यांपैकी आहे. फरक इतकाच की एखाद्या कलावंताच्या चुकांवरुन त्याच्यावर शिवराळ टीका करण्याइतकी माझी उंची नाही, याची मला जाणीव आहे. म्हणूनच हुसेन यांच्या कोणत्याही चुका या कला क्षेत्रातील व्यक्तीनेच दाखवून द्याव्यात, असे नक्कीच वाटते.
हुसेन यांच्या चित्रांकडे आपण कला क्षेत्रातून पाहतो, की धार्मिक दृष्टीकोनातून पाहतो, यावर टीकेची धार/मवाळपणा अवलंबून आहे. कला या अंगाने पाहिले तर चित्रकलेला नग्नतेचे वावडे नाही. किंबहुना न्यूड आर्ट हे एक स्वतंत्र दालन आहे. भारतीयांनी नग्नतेचा बाऊ केला नव्हता. खजुराहोची मैथुनशिल्पे हे उदाहरण आहे. वात्सायनाच्या कामसूत्र ग्रंथावर आधारित मुघल/राजपुताना शैलीची चित्रे बीभत्स न वाटता विषयाशी प्रामाणिक राहून चितारलेली आहेत. भारतीयांपाठोपाठ युरोपियन चित्रकारांनीही नग्नतेतील प्रमाणबद्धतेला (पुरुष असो वा स्त्री) सौंदर्य मानले आहे. 'स्वर्गातून हकालपट्टी' हे अॅडम व इव्ह यांच्यावरील चित्र पहा किंवा 'आई आणि लहान मूल' हे नग्नचित्र पाहा. औंधच्या कला संग्रहालयात अनेक ग्रीक व रोमन देवतांची नग्न संगमरवरी शिल्पे आहेत. ती पाहताना क्वचितच कामुकता मनात येते.
हुसेन यांच्या जागी एखाद्या हिंदू चित्रकाराने ही चित्रे रेखाटली असती तर लोकांच्या प्रतिक्रिया काय असत्या? कलाकार आपल्यापुरता जो फॉर्म निवडतो, तो इतरांना सदोष वाटला तरी तो त्याच्याशी प्रामाणिक असतो. राजा रविवर्मा यांनी आपल्या चित्रांमधील पौराणिक व्यक्तीरेखा (विशेषतः देवी व स्त्रिया) महाराष्ट्रीयन पोशाखात दाखवल्या आहेत. कमळात उभी लक्ष्मी, वीणावादन करणारी सरस्वती, गंगावतरणमधील गंगा व पार्वती या स्त्रिया नऊवारी लुगडे व बाह्यांची चोळी घालून दाखवल्या आहेत. संपूर्ण भारतात त्या काळात विविध प्रांतातील स्त्रिया जी वेशभूषा परिधान करत होत्या त्या सर्वांत मराठी स्त्रियांची वेशभूषा रविवर्मा यांना स्वतःच्या पात्रांसाठी योग्य वाटली. हा फॉर्म त्यांनी निवडला आणि तो लोकप्रिय झाला तरी तो मुळातच कालविसंगत आहे कारण नऊवारी साडी व बाह्यांची चोळी ही मराठी वस्त्रे अलिकडची आहेत. पौराणिक काळात स्त्रिया कंचुकी आणि कटिवस्त्र इतकाच पोशाख करत.
आता गंमत अशी आहे, की रविवर्मा यांच्या देवतांचा पोशाखाचा प्रभाव मनावर दाट असल्यानेच हुसेन यांनी निवडलेला न्युडिटीचा फॉर्म लोकांना खटकलेला आहे आणि हुसेन हे मुस्लिम असल्याने त्या संतापात भर पडलेली आहे. हुसेन यांच्यावर झालेली टीका धार्मिक अंगानेच का होते? कलाक्षेत्रातील समुदाय त्यांना तितका अपराधी का ठरवत नाही? चित्रकारांना या चित्रांत आक्षेपार्ह काही वाटत नाही का? (ठाकरे वगळता). भारतातील चित्रकारांनी या विषयावर गदारोळ केलेला नाही, याचाच अर्थ त्यांनी हुसेन यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानले आहे आणि कलेच्या अंगाने पाहताना त्यांना त्यात काही वावगे वाटलेले नाही. (हा मला समजलेला अर्थ)
असो, ज्यांना शिव्याशाप द्यायचे त्यांनी (मिपाचे धोरण लक्षात ठेऊन त्या मर्यादेत) खुशाल द्यावेत. ते हुसेन यांच्यापर्यंत पोचणार नसल्याने आता निरर्थक आहेत. एवढे बोलून अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनो, मी माझे भाषण संपवतो. :)
(जाता जाता : ब्रिटीशांनंतर आपल्याच लोकांनी साधनसंपत्तीची भयानक लूट करुन देशाची आणि समाजाची आजची अवस्था आणली आहे. एखाद्याला नागवणे/नागडे करणे म्हणजे आणखी काय असते? हेच वास्तव हुसेन यांनी त्यांच्या भारतमातेच्या चित्रातून व्यक्त केले असेल का?)
13 Jun 2011 - 12:16 pm | अन्या दातार
>>कला या अंगाने पाहिले तर चित्रकलेला नग्नतेचे वावडे नाही
मान्य. आता जरा हुसेनसाहेबांच्या आणखी एका नग्न चित्राचा संदर्भ देतो आणि माझा मुद्दा सांगतो.
जरा या चित्राकडे लक्ष द्या. इथे गांधीजी, आईन्स्टाईन इ. मंडळी वस्त्रात दाखवलेली आहेत, पण हिटलर मात्र नग्न दाखवलेला आहे. या चित्राबद्दल माणणीय हुसेनसाहेब म्हणतात कि "ज्या वृत्ती मला आवडत नाहीत त्या मी नग्न चितारतो."
इथेच या माणसाची नियत स्पष्ट होते. ज्याला लॉजिकली विचार करता येतो त्याला जास्त स्पष्टीकरणाची गरज पडू नये.
11 Jun 2011 - 7:27 pm | नगरीनिरंजन
>>हुसेन यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली टीका मी एकवेळ समजू शकतो कारण बाळासाहेब स्वतः एक चित्रकार आहेत
हाच नियम लावायचा तर हुसेन यांचं कौतुक करणाराही स्वतः चित्रकार असायला हवा. असो.
चिंजंचे आभार यासाठी की हुसेन हुसेन म्हणतात लोक ते कोण ते आम्हाला आज कळले. बाकी एका प्रँक शो (मराठी?) मध्ये हत्तीच्या सोंडेत कुंचला देऊन त्याने मारलेल्या फराट्यांचं काही चित्रकला समीक्षक "वा काय बोल्ड रंग आहेत, वा काय जोरकस स्ट्रोक्स आहेत" असं कौतुक करताना पाहिले होते ते आठवले. कला वास्तवदर्शीच खरी.
दुसर्या धाग्यावर धार्मिक भावना, समाजाची लायकी वगैरे लिहीलेले प्रतिसाद वाचून अंमळ करमणूक झालीच होती. समाजापेक्षा कलाकार मोठा आणि दुर्बोध ते भारी असले विचित्र गंड असलेले लोक नेहमीच साध्या, सरळ लोकांना नाकं मुरडत असतातच.
माझ्यामते हुसेन एक धूर्त कलाकार होते. हिंदू संस्कृतीतल्या स्त्री प्रतिमेने ते खुळावले असतीलही, पण ती संस्कृती त्यांनी कधीच अंगिकारली नाही. उलट ज्या धर्मात देवाचं चित्र काढणे पाप मानतात आणि दीन दर बुतशिकन, दीन दर कुफ्रशिकन असे किताब मिरवतात अशा धर्मात राहून त्यांनी दुसर्या धर्माचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर केला. त्यांनी प्रेषिताचं कपडे घातलेलं जरी चित्र काढलं असतं तरी त्या पुढचं चित्र काढायला ते जगले नसते. त्या मानाने त्यांना काहीच त्रास झाला नाही आणि प्रसिद्धी मात्र भरपूर मिळाली असं मी म्हणेन. कालिदासानं केलेल्या पार्वतीच्या वर्णनासारखं आपल्या देवदेवतांचं अस्पर्श्य नसणं सहज स्वीकारणारी आमची संस्कृती आहे, पण ती न स्वीकारता तिचा गैरफायदा घेणार्या रंगार्याला आम्ही डोक्यावर घेऊन का नाचावं?
त्यांच्यापेक्षा आपले दलाल आणि सध्याचे मुळीक कैक पटींनी चांगले वाटतात मला.
11 Jun 2011 - 7:42 pm | यकु
समाजापेक्षा कलाकार मोठा आणि दुर्बोध ते भारी असले विचित्र गंड असलेले लोक नेहमीच साध्या, सरळ लोकांना नाकं मुरडत असतातच.
माझ्यामते हुसेन एक धूर्त कलाकार होते. हिंदू संस्कृतीतल्या स्त्री प्रतिमेने ते खुळावले असतीलही, पण ती संस्कृती त्यांनी कधीच अंगिकारली नाही. उलट ज्या धर्मात देवाचं चित्र काढणे पाप मानतात आणि दीन दर बुतशिकन, दीन दर कुफ्रशिकन असे किताब मिरवतात अशा धर्मात राहून त्यांनी दुसर्या धर्माचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर केला. त्यांनी प्रेषिताचं कपडे घातलेलं जरी चित्र काढलं असतं तरी त्या पुढचं चित्र काढायला ते जगले नसते. त्या मानाने त्यांना काहीच त्रास झाला नाही आणि प्रसिद्धी मात्र भरपूर मिळाली असं मी म्हणेन.
सहमत.
11 Jun 2011 - 7:50 pm | सामान्य वाचक
आणि एक गुण खुप मोठ्ठा आहे म्हणुन बाकी १० त्याही पेक्षा मोठया दुर्गुणा कडे दुर्लक्ष??
एका कलागुणामूळे बेछूट पणे वागायचा परवाना मिळतो का?
11 Jun 2011 - 8:50 pm | मृत्युन्जय
हुसेन यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली टीका मी एकवेळ समजू शकतो कारण बाळासाहेब स्वतः एक चित्रकार आहेत, हिंदुत्त्ववादी विचारांची एक संघटना चालवतात आणि मुख्य म्हणजे कुठेतरी हुसेन यांच्या पिढीतलेच आहेत (हुसेन यांचे वय ९५, तर बाळासाहेबांचे ८५+) असे असुनही बाळासाहेबांची अखेरची प्रतिक्रिया वाचावी. 'अल्ला त्यांना शांती देवो' हे वाक्य त्यात आहे.
गंमत आहे. म्हणजे उद्या सचिनने खुन केला तर (तो असे काही करणार नाही म्हणा तो सज्जन माणूस आहे. गलिच्छ, सडका नाही आहे) तर आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलो नसल्यामुळे आम्हाला त्याच्यावर् टीका नाही करता येणार म्हणा की.
बाळासाहेबांची अखेरची प्रतिक्रिया वाचावी. 'अल्ला त्यांना शांती देवो' हे वाक्य त्यात आहे
उद्या धर्मांध दाउद मेला तरी हेच म्हणावे काय?
बाकी बाळासाहेबांचे वाक्य प्रमाण मानावे काय? नाही म्हणजे ते जनतेने डोळे झाकुन ऐकले नाही म्हणुन या देशात मुसलमान अजुन जिवंत आहेत. नाहीतर १९९४ मध्येच गेले असते.
पण जे फक्त दाढीचा ब्रश नियमित वापरतात त्या लोकांनी हुसेन यांनी आपल्या चित्रांतून कसा कुणाचा अपमान केलाय हे सांगत 'थेरडं खपलं' यासारख्या दिलेल्या प्रतिक्रिया सडक्याच.
परत तेच. पराने दिलेले उदाहरणा फिट्ट बसते इथे. हुसेन असेल मोठा चित्रकार. आम्ही तो भिक्कार चित्रकार होता असे म्हणतच नाही. पण तो दळभद्री आणि भिकारचोट माणूस होता असे माझे स्पष्ट मत आहे.
इतिहास ठाऊक नसणारे आणि तशी इच्छाही नसणारे ब्रिगेडी जसे 'दादू' आणि 'बाब्या' या भाषेत बोलतात त्यांच्यात आणि यांच्यात फार फरक दिसत नाही.
असे असेल तर हुसेननी काढलेली पैगंबराची, स्वतःच्या आईची, आयेशाची, इतर नातेवाईकांचे नग्न चित्रे दाखवावीत. की कला दाखवण्ञासाठी त्याला फक्त हिंदु देवता आणि भारतामाताच केवळ नागडी आवडायची. तसे नसेल तर कृपया दाखवुन द्या कारण सुदैवाने अजुन हा इतिहास नाही झालेला. आमच्या हयातीतच घडलेल्या गोष्टी आहेत या.
हुसेन यांच्या कलेतील अधिक-उणे चित्रकारांनीच दाखवून दिले पाहिजे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी कशाला घसे खरवडून थुंकायचे?
आम्ही चित्रातले अधिक उणे दाखवतच नाही आहोत. एका भिकारड्या माणासाची काळी बाजू दाखवत आहोत.
चित्रकार हुसेन एव्हाना काळाच्या कुशीत शांतपणे विसावले आहेत. त्यांच्यापर्यंत आता हे शिव्याशाप पोचणार नाहीत.
दुर्दैव आमचे. पण पोचले तर आनंद होइल. अल्लाह आहे अजुन. एका विकृत माणासाला तो योग्य ती शिक्षा देइल.
11 Jun 2011 - 9:05 pm | जगड्या
"असे असेल तर हुसेननी काढलेली पैगंबराची, स्वतःच्या आईची, आयेशाची, इतर नातेवाईकांचे नग्न चित्रे दाखवावीत. की कला दाखवण्ञासाठी त्याला फक्त हिंदु देवता आणि भारतामाताच केवळ नागडी आवडायची. तसे नसेल तर कृपया दाखवुन द्या कारण सुदैवाने अजुन हा इतिहास नाही झालेला. आमच्या हयातीतच घडलेल्या गोष्टी आहेत या."
+ १०० सहमत !
11 Jun 2011 - 10:01 pm | वाहीदा
बाकी बाळासाहेबांचे वाक्य प्रमाण मानावे काय? नाही म्हणजे ते जनतेने डोळे झाकुन ऐकले नाही म्हणुन या देशात मुसलमान अजुन जिवंत आहेत. नाहीतर १९९४ मध्येच गेले असते.
सर्व मुसलमान हे धर्मांध असतात का ? अन तुम्ही सर्वांना जिवंत न ठेवण्याच्या पक्षात आहात का ?
सर्व मुसलमान हे दाऊद चे भक्त असतात हे तुम्ही सुशिक्षितांनी म्हणणे योग्य आहे का ?
हुसैन हे धर्मांध मुसलमान नव्हते खरे तर ते Sterio Type मुसलमान काय पण एक Sterio Type व्यक्ती ही नव्हते.
ते फक्त अन फक्त एक मनस्वी कलाकार होते .
सगळ्यांनाच एका तराजूत तोलणे योग्य आहे का ? दाऊद च्या गुन्हाची सजा (मराठी ?) सर्व-सामान्य मुसलमानांना का?? की ज्याचे दाऊद शी काही घेणे देणेही नाही ?? तुमचे वरिल वाक्य कुठे तरी धर्म-द्वेष दाखवितो. आप तो पढे लिखे हो, किसका गुस्सा किसपर उतारना चाहते हो जनाब ? नफरत को नफरत से नहीं प्यार से जिता जाता है !
12 Jun 2011 - 3:49 pm | मृत्युन्जय
सर्व मुसलमान हे धर्मांध असतात का ?
आपण हा मुद्दा आधीच चर्चिलेला आहे. सगळे मुसलमान धर्मांध असतात असे मी कधीच म्हणालेलो नाही. पण दाउद आणि ओसामा धर्मांध नाहीत असे तुम्हाला म्हणायचे आहे का? हुसेन तसा नव्हता असे तुम्ही आधीच म्हणालात. ते मला अर्थातच मान्य नाही आहे. तो सडक्य मनोवृत्तीचा धर्मांध माणूसच होता
अन तुम्ही सर्वांना जिवंत न ठेवण्याच्या पक्षात आहात का ?
धर्मांध आणी देशद्रोही मुसलमान असो अथवा हिंदु भरचौकात मारला जावा अशी माझी इच्छा आहे. आपली तशी इच्छा नाही काय?
सर्व मुसलमान मेले पाहिजेत असे जर हिंदुना वाटत असले असते तर १९९४ मध्ये बाळासाहेबांनी तसे आवाहन केले होते तेव्हाच नरसंहार झाला असता. तसा तो झाला नाही म्हणजेच लोकांना तसे वाटत नाही असे तुम्हाला वाटत नाही का?
बाळासाहेबांचे प्रत्येक वाक्य प्रमाणा मानायची गरज नाही असे म्हणून मी ते उदाहरणा दिले होते ते आपल्याला कळाले नाही का?
स्पष्ट उत्तर द्यायचे तर मी कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात त्याचा धर्म बघुन जात नाही. हुसेनसारखा माणूस किडका सडका आहे हे स्प्ष्ट करण्यासाठी आयेशा आणि मुहम्मदाचा उल्लेख केला. त्यांचीही नग्न चित्रे काढणे मला बरोबर वाटाले नसतेच. हुसेन मात्र धर्म बघुन नग्न चित्रे काढत होता हे यावरुन कळाते.
सर्व मुसलमान हे दाऊद चे भक्त असतात हे तुम्ही सुशिक्षितांनी म्हणणे योग्य आहे का ?
मी असे कुठे म्हणले ते दाखवा. जाहीर माफी मागेन. नसेल तर तुम्ही चुकीचा आरोप केल्याबद्दल किमान खरडीतुन ती मागावी अशी अपेक्षा आहे.
हुसैन हे धर्मांध मुसलमान नव्हते खरे तर ते Sterio Type मुसलमान काय पण एक Sterio Type व्यक्ती ही नव्हते.
ते फक्त अन फक्त एक मनस्वी कलाकार होते .
मनस्वी कलाकाराला स्वधर्मीयांची, स्वकीयांची नग्न चित्रे काढु नयेत हे कळते मात्र हिंदु देवतांची नग्न चित्रे काढावीशी वाटतात हे काही कळले नाही.
सगळ्यांनाच एका तराजूत तोलणे योग्य आहे का ? दाऊद च्या गुन्हाची सजा (मराठी ?) सर्व-सामान्य मुसलमानांना का??
मी असे कुठे म्हटलो हे दाखवुन द्यावे जाहीर माफी मागेन. नसेल तर तुम्ही चुकीचा आरोप केल्याबद्दल किमान खरडीतुन ती मागावी अशी अपेक्षा आहे.
तुमचे वरिल वाक्य कुठे तरी धर्म-द्वेष दाखवितो.
ओक्के म्हणाजे दाउदला धर्मांध आणि देशद्रोही म्हणल्यामुळे मी धर्मद्वेषी होतो असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? की तुम्हाला असे म्हणायचे आहे की दाउद मुसलमान असल्यामुळे आणी मी हिंदु असल्यामुळे त्याला धर्मांध आणी देशद्रोही म्हणु नये?
आप तो पढे लिखे हो, किसका गुस्सा किसपर उतारना चाहते हो जनाब ? नफरत को नफरत से नहीं प्यार से जिता जाता है !
मी कुठल्याही धर्मावर किंवा धर्मसमूहावर राग काढत नाही आहे. राग त्या व्यक्तीवर आहे. अब्दुल कलाम मला कुठल्याही हिंदु देवाएवढेच वंदनीय आहेत आणि देशद्रोह करणारी गुप्ता कुठल्याही अतिरेक्याएवढीच तिरस्करणीय आहे.
नफरत को नफरत से नहीं प्यार से जिता जाता है
म्हणाजे दाउदला भारतात आणाल्यावर त्याचा जाहीर मुका घेउ की काय मी? जमणार नाही.
13 Jun 2011 - 1:06 pm | वाहीदा
मी आधीच सांगीतले आहे की त्यांनी जी काही नग्न चित्रे चितारली ते माझ्या मते चुकीचेच होते.
त्यासाठी आयेशाचे नग्न चित्र असावे हे तुमचे मागणे ही चुकीचेच आहे
अन त्यामुळे मी खरडीत तुमची माफी मागणार नाही.
म्हणाजे दाउदला भारतात आणाल्यावर त्याचा जाहीर मुका घेउ की काय मी? जमणार नाही.
हा हा हा असे कोण म्हणाले तुम्हाला ?
तसे ही तुम्ही अर्थाचा अनर्थ करण्यात पटाईट आहातच त्यामुळी माफी मी कदापी मागणार नाही . माझे तुमच्या बध्दल जे मत आहे ते बदलणार नाही.
हा माझा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद.
13 Jun 2011 - 1:16 pm | मृत्युन्जय
मी आधीच सांगीतले आहे की त्यांनी जी काही नग्न चित्रे चितारली ते माझ्या मते चुकीचेच होते.
संपले तर मग. मग तो माणूस सडका कुजका होता असे कोणी म्हणले तर काय चुकीचे? की केवळ तो मुसलमान आहे म्हणुन तसे म्हणायचे नाही?
त्यासाठी आयेशाचे नग्न चित्र असावे हे तुमचे मागणे ही चुकीचेच आहे
मी अजिबात तशी मागणी केलेली नाही. तसे चित्र असेल तर मी माझे मत बदलेन असे लिहिले आहे. तुम्ही माझा दुसरा प्रतिसाद वाचलेलाच दिसत नाही. त्यात मी हे स्पष्टपणे लिहिले आहे.
अन त्यामुळे मी खरडीत तुमची माफी मागणार नाही.
अपेक्षा होती. आशा मात्र नव्हती. त्यामुळे तुमचे चालु द्यात.
हा हा हा असे कोण म्हणाले तुम्हाला ?
नशीब माझे. धन्यवाद.
तसे ही तुम्ही अर्थाचा अनर्थ करण्यात पटाईट आहातच
कृपया ढगात गोळीबार करु नका. तसली सवय आम्हाला नाही. पण गर्भित अर्थ आम्हाला नीट कळतात.
त्यामुळी माफी मी कदापी मागणार नाही .
चुक पटली तरी खुप झाले. ते ही होणार नाही आहे हे माहिती आहे मला. त्यामुळे सोडुन द्या.
माझे तुमच्या बध्दल जे मत आहे ते बदलणार नाही.
बदलावे असा माझाही आग्रह नाही. तुम्हाला काही गैरसमज करुन घ्यायचा असेल तर करुन घेउ शकता. धन्यवाद.
हा माझा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद.
तसे असेल तर माझाही शेवटचाच समजावा,
12 Jun 2011 - 1:47 pm | अप्पा जोगळेकर
'त्यांचा अल्ला त्यांना शांती देवो' अशी टिपिकल प्रतिक्रिया बाळासाहेबांनी दिली आहे अशी दुरुस्ती करावीशी वाटते.
11 Jun 2011 - 7:39 pm | सेरेपी
लेख आवडला आणि वाहीदा आणि योगप्रभूंची प्रतिक्रियाही.
.
.
.
.
.
.
एक प्रश्नः ते आपल्या जुन्या मंदिरांवर काही-बाही मूर्ती आहेत त्यांच्यासाठी साडी-फंड सुरू करावा काय?
11 Jun 2011 - 7:51 pm | नगरीनिरंजन
>>एक प्रश्नः ते आपल्या जुन्या मंदिरांवर काही-बाही मूर्ती आहेत त्यांच्यासाठी साडी-फंड सुरू करावा काय?
हा हा हा! अहो ताई त्या हुसेननी केलेल्या नाहीएत. काही करायचंच असेल तर ते डेन्मार्कच्या पेपरमध्ये छापलेलं व्यंगचित्र मिळवून डकवा राव इथे. ते पाहायला पण मिळालं नाही.
11 Jun 2011 - 9:00 pm | मृत्युन्जय
एक प्रश्नः ते आपल्या जुन्या मंदिरांवर काही-बाही मूर्ती आहेत त्यांच्यासाठी साडी-फंड सुरू करावा काय?
प्रश्न मनोवृत्तीचा आहे. हुसेनने हिंदु देवता आणी भारतमाते बरो बर आयेशा आणि मोहम्मदाचे नागडे चित्र काढले असते तर तो माणूस विकृत वाटला नसता. त्याला असली चित्रे काढण्यासाठी फक्त हिंदु देवताच दिसल्या यातच सगळॅ आले.
11 Jun 2011 - 10:15 pm | वाहीदा
प्रश्न मनोवृत्तीचा आहे. हुसेनने हिंदु देवता आणी भारतमाते बरो बर आयेशा आणि मोहम्मदाचे नागडे चित्र काढले असते तर तो माणूस विकृत वाटला नसता. त्याला असली चित्रे काढण्यासाठी फक्त हिंदु देवताच दिसल्या यातच सगळॅ आले.
त्यांनी जे काही केले तो अयोग्यच पण ती हिंदू देवतांची होती म्हणून केले हे बोलणे योग्य नाही.
त्यांचे पर्सनल अन प्रायव्हेट चित्रांचे अल्बम अप्रकाशितच आहेत
त्यांनी काही नग्न चित्रे १९७० च्या दशकात चितारली होती अन प्रकाशित ही झाली होती पण त्याची चर्चा मात्र १९९८ - २००६ ला का झाली हे मात्र काही समजू शकले नाही.
12 Jun 2011 - 3:34 pm | मृत्युन्जय
त्यांनी जे काही केले तो अयोग्यच पण ती हिंदू देवतांची होती म्हणून केले हे बोलणे योग्य नाही.
त्यांचे पर्सनल अन प्रायव्हेट चित्रांचे अल्बम अप्रकाशितच आहेत
त्यात एखादे मी म्हणतो तसे चित्र असेल तर दाखवुन द्या. मी माझे मत बदलेन आणि टीका मागे घेइन.
त्यांनी काही नग्न चित्रे १९७० च्या दशकात चितारली होती अन प्रकाशित ही झाली होती पण त्याची चर्चा मात्र १९९८ - २००६ ला का झाली हे मात्र काही समजू शकले नाही.
टीका उशीरा झाली म्हणून माणूस सडका नव्हता हे विधान कळाले नाही. टीका आधीच व्हायला हवी होती हे खरे. पण उतारवयात म्हातार्याचा म्हातारचळ जास्त वाढला असे दिसते आहे.
11 Jun 2011 - 8:56 pm | मृत्युन्जय
हुसेनच्या मृत्यूची बातमी कळताच अपेक्षेनुसार या संस्थळावर सडक्या प्रतिक्रियांचा एक ओघ येऊन गेला.
खुप कमी सडक्या प्रतिक्रिया आल्या तरी. बहुतेकांनी म्हातारा चचल्याबद्दल आनंदच व्यक्त केला होता
काहींनी मेल्या माणसाबद्दल हे असं बोलणं कसं रुचिहीन आणि सभ्यतेची पातळी सोडून आहे हे सांगितलं.
ओसामाला वेगळा न्याय का हो लावला तुम्ही? तो मेल्यावरही गळा काढायचा होतात ना. हरकत नाही अर्ध्या दुनियेला पोचवुन जेव्हा दाउद मरेल ना तेव्हा तुम्ही त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी यज्ञ करा.
एवढ्या चीप, गल्लाभारु, टाळीखाउ प्रतिक्रियेची चि जं कडुन अपेक्षा नव्हती.
चि जं माफ करा तुमच्या प्रतिक्रिया आणी लेख मला खुप आवडतात आणि तुमच्या कलासक्त नजरेची आणि समतोल विचारांची नेहेमीच दाद द्यावीशी वाटते पण इथे सहमती शक्यच नाही. हुसेन एक नंबरचा माद***, भिकारचोत, भें**. आ*** माणूस होता.
तळटीपः मला या असल्या शिवराळा प्रतिक्रियेचा जराही पश्चात्ताप नाही. हा प्रतिसाद उडवला तरीही हरकत नाही. मला जे बोलायचे आहे ते बोलुन झाले आहे.
11 Jun 2011 - 9:16 pm | अनामिक
लेख आवडला. हुसेन बद्दल हिंदू देवतांची नग्न चित्रे काढणार्या चित्रकार या पेक्षाही जास्तं ओळख पटली. चित्रातलं काहीएक कळत नसलं तरी वरची त्यांची चित्रे खरोखरंच छान आहेत. मला ते गणेश दरवाजा जास्तं आवडलं. वरची वाहीदाची प्रतिक्रियाही चांगलीच आहे.
11 Jun 2011 - 9:18 pm | प्रदीप
धावताच नव्हता तर अगदी 'उडता' होता असे खेदाने म्हणावे लागते. चिं. जं. कडून थोड्यातरी सखोल चर्चेची अपेक्षा होती. लेखात भारतीय अभिजात चित्रकला व पाश्चिमात्य चित्रकला ह्यातील ढोबळ फरकाविषयी माहिती दिली आहे, पण मग हुसेन ह्यांनी नक्की त्यांच्या चित्रकलेत भारतीयत्व ठेऊनही पाश्चिमात्य शैलीचा कसा वापर केला इत्यदिविषयी काही टिपण्णी नाही.
त्यातून जाता जाता, दुसर्या धाग्याबर आलेल्या प्रतिसादांचा ह्या लेखाच्या संदर्भात अगदी संपूर्ण विनाकारण असलेला उल्लेख आणि ब्रिटीशांवर अनाकलीय आगपाखड अशा अवांतराने लक्ष इतरस्त्र वेधले गेले आहे. ब्रिटीशांवरील टिका अनाकलीय व अनावश्यक आहे. जेते म्हणून आलेल्या ब्रिट्सांनी इथे कलाविषयक अभ्यासक्रम सुरू केला, ह्यात त्यांचे कौतुक मानायचे, की त्यातही त्यांचे अंतस्थ हेतू शोधत बसायचे? अन्य जेत्यांनी हे केले असते काय? केले आहे काय? (भारताच नव्हे, अन्यत्रही?). आणि शांतिनिकेतन (व कदाचित बडोद्याचे गायकवाड) सोडले तर भारतातील इतर संस्था व अनेक संस्थानिकांनी ह्यादृष्टिने काय केले होते, ह्याची माहिती करून घेण्यास आवडेल.
11 Jun 2011 - 10:04 pm | शाहरुख
लेख मनापासून वाचला.
हिंदू देवतांची आणि भारतमातेची नग्न चित्रे का काढली या बद्दल हुसेनने चित्रकार म्हणून कुठे काही सांगितले असेल तर ते सांगावे अशी जंतू ना विनंती...तसेच या चित्रांचे कलाभ्यासक म्हणून विवेचन वगैरे करावे अशी ही विनंती.
12 Jun 2011 - 1:15 pm | अरुण मनोहर
>>>तसेच या चित्रांचे कलाभ्यासक म्हणून विवेचन वगैरे करावे अशी ही विनंती>>><<
हा एक नंबरी खोडसाळपणा झाला. तुम्हाला मिपाचे वाचक काय बावळट वाटले की काय?
12 Jun 2011 - 6:49 pm | शाहरुख
खोडकरपणा तर केला आहेच पण तरीही,
एखादा चित्रकार जर एका धर्माच्या देवांची नागडी चित्रं काढत सुटला तर माझ्यासारखा चित्रकलेतील ढ आणि जाणशून्य असा माणूस त्या चित्रांकडे खोडी म्हणून बघत असेल तर काय चुकले ? बरं त्यातही कुणी ती चित्रं समजावून देणार असेल तर मी माझे मत बदलायला तयार आहे की ! पटवून सांगा ना इथं असलेली सीता, द्रौपदी, पार्वती, मारुती वगैरे मंडळी नागडी काढण्यामागे काय कलात्मक विचार वगैरे आहे ते....फक्त "न्युडीटी इज मेटाफर फॉर प्युरिटी" ने माझे समाधान नाही होणार.
>>तुम्हाला मिपाचे वाचक काय बावळट वाटले की काय?
निदान जंतू साहेब तरी नक्कीच नाही.
11 Jun 2011 - 10:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या विषयाबाबत काहीच माहिती नव्हती, हुसेन यांच्या मृत्युच्या (दुर्दैवी!) कारणामुळे का होईना, हुसेन यांच्या माध्यमातून थोडीफार भारतीय कलेचीही थोडीफार ओळख झाली. त्याबद्दल चिंतातुर जंतू यांचे पुन्हा एकदा आभार.
11 Jun 2011 - 11:00 pm | जगड्या
वरील लेखात जंतू यांनी राजा रवी वर्मा यांचा ऊल्लेख केला आहे. त्यांनी काढलेले व हुसेन याने काढलेले चित्र खाली डकवत आहे ( कोणाची भावना दुखावण्याच हेतू मुळीच नाही). कृपया या दोन चित्रांची तथाकथित "अभ्यासंकानी" तुलना करून स्पष्टीकरण करावे.
11 Jun 2011 - 11:24 pm | चित्रा
अभ्यासक नाही, तथाकथितही अभ्यासक नाही, पण उत्तर देण्याचा प्रयत्न करते. :)
राजा रविवर्मा यांचे चित्र आणि लक्ष्मीचे हुसेन यांनी काढलेले चित्र यात साधर्म्य काही नाही, कारण हेतूच वेगळे आहेत. हेतू हिंदू देवतांवर टीका करण्याचा नाही, असे मला भासते.
रविवर्म्यांचे चित्र हे सरस्वतीचे मांगल्य दर्शवणारे भारतीय मनाला सुखदायक असे कदाचित अजरामर चित्र आहे. हुसेन यांनी काढलेले चित्र मला थोडे अधिक पुढे जाऊन भाष्य करणारे वाटले होते.
लक्ष्मीने हत्तीच्या पाठीवर पाय दिला आहे. सरळ पाहिले तर लक्ष्मीचे वाहन हत्ती, तिची आरूढ होण्यातील सहजता, सुखासीनता दिसते. अगदी हत्ती नाही, गणपती जरी धरला तरी विद्येच्या देवतेवर आरूढ झालेली लक्ष्मी (बुद्धिवाद्यांवर धनिकांची सत्ता) दिसू शकते.
काळ्या पार्श्वभूमीवर केवळ रेषांनी काढलेले हे चित्र मला काळ्या पाटीवर काढलेल्या चित्राप्रमाणे अधिक जवळचे वाटते.
हुसेनांची सरस्वती ही "स्त्री" दिसते, आई/शिक्षिका दिसत नाही यात मला गैर वाटत नाही.
नग्नतेला फारशी नावे ठेवता येणार नाहीत असे वाटते.
हे शिल्पचित्र पहा.
वराहाने पृथ्वीला मांडीवर (पूर्वी अंकावर ठेवले असे म्हणण्याची प्रथा होती!) धरून वर आणलेले दिसते!
मग नंतरच्या काळात हेच चित्र असे जरा घरात लावण्यायोग्य, मुलाबाळांनी बघण्यायोग्य झाले असे दिसते.
प्राचीन भारतीय शिल्पकलेत स्त्रियांच्या शरीराचे अवास्तव चित्रण दिसते, कधी ही चित्रे मुलाबाळांसोबत बघण्यासारखीही नसतात, पण हे विसरता येणार नाही की जुन्या चित्रांची हीच परंपरा आहे. मधल्या काळात केलेली सफेदी जाऊन ही जुनी पद्धत परत वर आणण्याचे श्रेय हुसेन यांचे म्हणता येईल का, याचे उत्तर माझ्याकडे नाही. पण तसे चित्रण परत झाले आणि तसे होताना ते नवीन भाष्यासकट आले, तर मला त्याचे कौतुक वाटते. त्यात लक्ष्मीचे चारित्र्यहनन झाले असे वाटत नाही. हुसेन यांनी काय म्हटले आहे हे ह्या मुलाखतीत वाचू शकाल.
http://www.tehelka.com/story_main37.asp?filename=Ne020208in_hindu_cultur...
याहूनही अधिक म्हणजे असे चित्रण केले म्हणून हुसेन यांना स्वत:च्या देशात राहणे नकोसे वाटू लागणे हे दु:खदायक वाटते.
बाकी लेखाची सुरूवात आवडली, पण लेख वरवर झाला आहे या प्रदीप यांच्या मताशी सहमत आहे.
12 Jun 2011 - 12:59 am | सेरेपी
सहमत
12 Jun 2011 - 8:34 am | योगप्रभू
<<अगदी हत्ती नाही, गणपती जरी धरला तरी विद्येच्या देवतेवर आरूढ झालेली लक्ष्मी (बुद्धिवाद्यांवर धनिकांची सत्ता) दिसू शकते.>>
चित्रा,
मला थोडेसे वेगळे वाटते. हुसेन यांच्या चित्रातील हा हत्तीच आहे. गणपती नसावा. कारण गणपतीचे मस्तक हत्तीचे असले तरी शरीर मानवी आहे. या चित्रात दाखवलेला पूर्ण हत्तीच आहे कारण त्याचे चार पाय आणि शेपूट स्पष्ट दिसते आहे. फक्त अनाकलनीय गोष्ट म्हणजे हा हत्ती पाय मुडपून का बसला आहे? हत्ती क्वचितच बसतो. (पाळीव आणि माहुताने वजवलेल्या हत्तींची बाब निराळी)
त्यामुळे विद्येच्या देवतेवर आरुढ झालेली लक्ष्मी (बुद्धिवाद्यांवर धनिकांची सत्ता) यापेक्षाही 'गजांतलक्ष्मी' हा अर्थ चित्रकाराला अभिप्रेत असावा, असे वाटते.
हुसेन यांनी परदेशात आश्रय घेतला असताना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गणपती या दैवताबद्दल आपल्याला अपार श्रद्धा आणि आवड असल्याचे स्पष्ट केले आहे. गणपतीची शेकडो चित्रे त्यांनी चितारली आहेत आणि प्रत्येक कार्यारंभी त्या गणेशाचे स्मरण करुनच आपण पुढे जात असल्याचेही त्यात सांगितले आहे. ज्याअर्थी हुसेन यांना गणेशाचे तपशील ज्ञात आहेत, त्या स्थितीत ते त्याच्यावर आरुढ झालेली लक्ष्मी काढण्याची ढोबळ चूक करणार नाहीत.
12 Jun 2011 - 9:41 am | चित्रा
मलाही तो हत्तीच वाटतो. पण हिंदू जागृतीच्या संकेतस्थळावर याचा उल्लेख गणपती केल्याने तसे अगदी धरले तरी त्याचेही वेगळे इंटरप्रीटेशन करता येते असे वाटते.
गजांतलक्ष्मीची सांची वगैरेकडील शिल्पचित्रे बघितली तर हत्ती उभे दिसतात.
12 Jun 2011 - 1:07 am | गोगोल
नुसताच हा वाद ऐकत होतो. प्रत्यक्ष चित्र कधीच पाहिले नव्हते. आता चित्र पाहून अपमान झाल्यासारखे बिलकूल वाटत नाही.
कदाचित चेहरा न दाखवल्यामुळे लक्ष्मी हे एका बाईचे चित्र न वाटता एका अमूर्त संकल्पनेच चित्र वाटतय. आता त्यांनी मोहम्मदाच अस चित्र का नाही काढल हे मला माहीती नाही. पण हे ही निश्चित की हेच चित्र एखाद्या हिंदू ने काढल असत तर कदाचित ईतका गदारोळ माजला नसता.
जाता जाता: लक्ष्मी ला डाव्या बाजूला दोन आणि उजव्या बाजूला एकच हात अस का असाव?
12 Jun 2011 - 12:35 pm | प्रदीप
खुल्या मनाने व थंड डोक्याने ह्या प्रश्नाकडे पाहिलेत, ह्याबद्द्दल धन्यवाद. येथील अनेक आगपाखड लेखकांना अशीच बुद्धी होवो ही त्या गजाननाकडे प्रार्थना आहे.
ह्याचे उत्तर वर चित्रा ह्यांनी दिलेल्या दुव्यातील त्यांच्या मुलाखतीत त्यांनी स्वतः दिलेले आहे,
"... (१९६८ साली डॉ. राम मनोहर लिहीयांच्या सांगण्यावरून मी जेव्हा रामायणावर आधारीत चित्रे काढली, तेव्हा) काही रूढीप्रिय मुस्लिमांनी मला इस्लामसंबंधित चित्रे काढण्याची विनंति केली. मी त्यांना विचारले, 'इस्लाम[च्या अनुयायांत] इतका [म्हणजे तेव्हा हिंदूंनी दर्शवला, तितका] संयम आहे का? माझी काही अक्षरे काढण्यातही जरी चूक झाली तर ते चित्र फाडून टाकतील"
अत्यंत छान मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल चित्रा ह्यांचे आभार.
11 Jun 2011 - 11:36 pm | नगरीनिरंजन
>>नग्नतेला फारशी नावे ठेवता येणार नाहीत असे वाटते
नग्नतेत आक्षेपार्ह काहीच नाही. चीड काचेच्या घरात राहून दुसर्यांवर दगड फेकण्याच्या वृत्तीची आहे किंवा स्वतः दुसर्याला न दिलेला अधिकार दुसर्याकडून न विचारता घेण्याची आहे.
11 Jun 2011 - 11:41 pm | चिंतातुर जंतू
प्रतिक्रिया वाचून गंमतही वाटली अन खेदही झाला. लेखातल्या पहिल्याच परिच्छेदाचा अनेकांनी त्रास करून घेतला. याची गंमत अशासाठी वाटली की मी फक्त एवढंच विधान केलं होतं की तीन प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या, पण माझा लेख त्या तीनही प्रकारांत बसत नाही. बाकी सर्व लेख हा हुसेनच्या चित्रशैलीमागची प्रेरणा आणि पार्श्वभूमी सांगतो. म्हणजे मला त्या तीन प्रतिक्रियांपैकी काहीच करायचं नव्हतं. माझ्या मते प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आपापली पातळी दाखवून देतात. मला हुसेनचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जितकं मान्य आहे तितकंच ते प्रत्येक प्रकारच्या प्रतिक्रियेचंही मान्य आहे. पण मग वेगळी प्रतिक्रिया देण्याचा माझा पर्याय हा सुद्धा माझा मी निवडलेला आहे. आणि तरीही केवळ अशा तीन प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या असं म्हटल्यामुळे लोकांना खूप राग आलेला दिसला. हे मजेशीर आहे. म्हणजे राग येण्यासाठीच जणू काही आपला जन्म आहे असं या प्रतिक्रिया वाचून वाटलं.
आणखी गंमत अशासाठीही वाटली की उदारमतवादी लोकांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या (अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी किंवा देशत्याग याविषयी पुन्हा एकदा खेद) तशी प्रतिक्रियासुद्धा मी दिलेली नाही आहे. पण तरीही अनेक प्रतिक्रिया या अभिव्यक्तिस्वातंत्र्य, धार्मिक भावना आणि एकंदरीत भावनिक मुद्द्यांशीच खेळत राहिल्या.
असो. खेद अशाचा वाटतो की राळ उडवण्यातच रममाण होणारी व्यक्ती आपलं नुकसान करून घेत असते. अनेक व्यक्ती अशा वागतात तेव्हा समाजाचं दीर्घकालीन नुकसान होतं. आणि अशी राळ उडलेली पाहून त्यापुढे काही म्हणूच नये अशी माझी स्वभावगत प्रतिक्रिया होते.
13 Jun 2011 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार
त्यातला एक प्रकार 'सडका होता' हे तुम्हीच ठरवणार.
आणि
हे हि तुम्हीच ठरवणार ;) अर्रे वा रे वा !
आता मी असे विधान करतो की, 'हा लेख एका धर्मांध देशद्रोह्याचे उदात्तीकरण करायला लिहिलेला आहे.' :)
अवांतर :- वाहिदा बाई गो तुझी वाटचाल हळुहळु शबाना आझमी बनण्याच्या दिशेन चालु झाली आहे ;)
13 Jun 2011 - 1:35 pm | वाहीदा
वाहिदा बाई गो तुझी वाटचाल हळुहळु शबाना आझमी बनण्याच्या दिशेन चालु झाली आहे
“Enjoy your own life without comparing it with that of another.” - Marquis de Condorcet
and the same thing goes for others.
श्रीमान परासाहेब ,
मी वाहिदा च बरी आहे . माझी बरोबरी / तुलना कोणाही महान / तुच्छ विचारवंतांशी न केले लीच बरी . I donot hold a Camp-follower attitude . मी कळपवृत्ती ठेवत नाही अन मेंढरांसारखे मान खाली घालून चालत ही नाही . आपल्यापुढे जे कोणी काही म्हणेल त्यांची री ही ओढत नाही ..त्यामुळी मी वाहीदाच राहीन काळजी नसावी. शबाना आझमी काय अन कशी आहे याच्याशी मला तरी काही घेणे देणे नाही.
कारण माझ्या नावाचा अर्थच मुळी 'अद्वितिय' असा आहे :-)
~ वाहीदा - A UNIQUE SELF :-)
12 Jun 2011 - 2:52 am | आबा
आत्तापर्यंत फक्त वादग्रस्त माणूस एवढिच ओळख होती. लेख आवडला !
12 Jun 2011 - 10:16 am | धनंजय
भारतीय आधुनिक चित्रकलेच्या परंपरेची ओळख आवडली.
रणजित चितळ्यांचा नाकाविषयी मुद्दा कळला नाही. बर्नार्ड शॉ हा अभिव्यक्ती आणि शारिरिक दुखापत यांच्यात फरक करत होता, असे वाटते. आणि त्यात "शरिराच्या इंद्रियाला दुखापत होते तेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्य संपते" असे स्पष्टीकरण मला दिसते.
"मला नावडेल= नाकाला लागले ही उपमा" मानली, तर बर्नार्ड शॉचे वाक्य पुरते निरर्थक होते. "मला आवडणार नाही असे काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य नाही" इतपतच अर्थ शिल्लक राहातो.
(बर्नार्ड शॉ याने येशूच्या पात्राकडून येशूचे वर्णन "सुविचार ऐकावे म्हणून बारीकसारीक जादूचे प्रयोग करणारा, आणि लोक डोंबार्याच्या खेळांतच अडकले म्हणून अयशस्वी झालेला" असे काहीसे करवले होते. - स्रोत "ब्लॅक गर्ल इन सर्च ऑफ गॉड" कथा. "येशू हा अयशस्वी डोंबारी" म्हणजे कोणाच्या नाकाला बुक्का मारला होता का?)
12 Jun 2011 - 1:42 pm | अरुण मनोहर
काही प्रतिक्रिया वाचून लक्षात आले की काही जणांनी ती घाणेरडी चित्रे पाहिली नसावित, निदान सगळी चित्रे पाहिली नाहीत.
शाहरुखने त्या चित्रांवर कलाभ्यासक विवेचन व्हावे अशी साळसूद मागणी केली आहे. जगड्याने बहुदा खोल विचार न करता, त्या पैकी एक चित्र दिले देखील आहे. मग व्हायचे तेच झाले, त्या चित्रावर उहापोह होउन मते आली, आणि आमचे देव धुतल्या गेले. त्या चितार्याचा जो काहे उद्देश होता तो साध्य झाला.
मागे एकदा एक बहुवितरण मेल मला आला होता. त्यात चितार्याचे ती सगळी सडकी कला होती. जवळ जवळ पंधरा एक चित्रे असावित. त्यामधली काही तर अगदी उल्लेख देखील करू नये असली होती. संदेश असा होता- असली चित्रे काढून, हिंदू धर्माचे विडंबन त्याने केले. हे सगळ्यांना समजावे म्हणून ही मेल तुम्ही सगळ्यांना पाठवून निषेध पसरवा. मी त्या सगळ्यांना उत्तर पाठवले, निषेध जरूर करा. पण ती घाण तुम्ही आपल्या मेलला का जोडता? तसे करून तुम्ही त्या मुर्खाचेच काम करत आहात.
आता इथेही तेच होऊ द्या. हिंदू धर्म सहिष्णु आहेच. घोसळा त्याला हवा तेवढा. आपल्या महान धर्माचे आणि विशाल मनाच्या देवतांचे काहेच नुकसान अशा क्षुल्लक गोष्टींनी होत नाही हे म्हणणारे कैक भेटतील देखील!
12 Jun 2011 - 6:57 pm | शाहरुख
ओह ! तुमच्या वरील प्रतिक्रियेचा रोख आत्ता लक्षात आला :)
12 Jun 2011 - 6:39 pm | अभिज्ञ
काही प्रतिक्रिया वाचून लक्षात आले की काही जणांनी ती घाणेरडी चित्रे पाहिली नसावित,
अगदि हेच म्हणतो.
मला तर तो प्रकार फारच किळ्सवाणा वाटला होता. अन हि असली फालतु चित्रे काढायचे प्रयोजन देखिल समजले नाही.
अभिज्ञ.
12 Jun 2011 - 6:59 pm | चिंतातुर जंतू
लेख जरा लांबलचक होतो आहे अशी जाणीव लिहिताना झाली होती. त्यामुळे तो शेवटीशेवटी थोडक्यात आटपला होता, हे कबूल करतो. पण शेवटचा भाग त्रोटक करण्यामागे त्याशिवाय अजून एक विचार होता: अखेर चित्रं ही डोळ्यांनी पहायची असतात. त्याविषयीचं विवेचन हे फार फार तर जरा मदत एवढ्यापुरतंच यावं असं मला वाटतं. असो. काही लोकांची तशी इच्छा दिसल्यामुळे थोडं अधिक विवेचन देत आहे. शिवाय प्रत्यक्ष लेखाच्या आशयाशी संबंधित अशा आलेल्या काही प्रश्नांचे प्रतिसादही दिले आहेत. हे सर्व लिहिता लिहिता ते पुन्हा लांब होऊ लागलं म्हणून मूळ धाग्यावर प्रतिसाद देण्याऐवजी पुढचा भाग म्हणून प्रकाशित करत आहे:
मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली (भाग २)
12 Jun 2011 - 8:40 pm | बिपिन कार्यकर्ते
अतिशय समयोचित आणि विवेचनात्मक लेखाकरिता चिंजंचे आभार. काही गोष्टी समजल्या. धन्यवाद! दुसरा भागही आलेला दिसतोय, नक्की वाचेन.
वरील प्रतिक्रियांमधे, प्रदीप यांच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे. इतक्या सुंदर आणि वेगळ्याच उद्देशाने लिहिलेल्या लेखात 'सडक्या' वगैरे शेलक्या विशेषणांचे प्रयोजनच काय? लेखकाला त्याच्या भावना शिष्टसंमत भाषेत मांडता आल्या असत्या. तो शब्द वापरल्याबद्दल मी माझी नाराजी नोंदवतो.
जगड्या, चित्रा, योगप्रभू, प्रदीप यांचेही विशेष आभार. उत्तम चर्चा वाचायला मिळाली.
13 Jun 2011 - 7:55 am | मुक्तसुनीत
प्रतिक्रिया उशीराच देतोय आणि ती आतापर्यंतच्या दोन्ही भागांनाही आहे.
लेख आवडला हेवेसांनल. पहिल्या भागामुळे फारच सुरेख रीतीने पार्श्वभूमी कळली.
गेल्या शतकातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या चित्रकाराच्या जगताला गवसणी घालण्याचा प्रयत्न - मग जरी कुणाला तो अपुरा किंवा उडता वाटला - तरी स्तुत्यच. एक माणूस आपल्या कामाकरता उणेपुरे ९५ वर्षांचे आयुष्य वेचतो. वयाच्या विशीच्याही आधीच उगम झालेल्या ऊर्मीला जो नव्वदीनंतर थांबवू शकत नाही, अनेक प्रकारचे प्रयोग , अनेक शैलींनी व्यक्त होतो. आणि आयुष्याच्या अखेरच्या दशकामध्ये ज्याला देशद्रोही ठरवण्यात येऊन , देशाबाहेर मृत्यूला स्वीकारावे लागते. या सर्वात खचितच भव्यताही आहे नि शोकांतिकाही आहे.
चिंतातुर जंतूंनी कलाबाह्य बाबींना टाळून या माणसाच्या कामामागची पूर्वपीठिका, त्याच्या कामाचे स्वरूप , संदर्भ , याचा शोध घेण्याकरता हे लिखाण केले असल्याचे जाणवले. एकेका लेखनाचे प्रकार असतात. बर्याचदा आपले लेखन हे एक "एक्स्प्रेशन" असते. कधीकधीच त्याचे स्वरूप "आपल्याला काय जाणवले आहे, काय कळले आहे ते आजमावून पहावे, त्याचा आकार कसा उमटतो ते पहावे" असे असते. चिंतातुर जंतूंचे हे लिखाण या स्वरूपाचे वाटत आहे.
आधुनिक भारतीय कलेचा प्रवाह कसा बनत गेला, कुठले कुठले फोर्सेस त्यात कार्यरत होते, निरनिराळे लोक या निमित्ताने एकत्र कसे आले ? कुठले तात्कालिक प्रवाह प्रभावशाली होते , जे नंतर क्षीण ठरले ? हा सगळा आशय एका छोट्या लेखमालेत सामावण्याजोगता नाही. मी चिंतातुर जंतूना असे सुचवतो की , अशा स्वरूपाचा अभ्यास करण्याकरता लागलेल्या संदर्भांची सूची त्यांनी द्यायचा प्रयत्न करावा.
कला आणि समाज , कला आणि धर्म आणि राष्ट्रसंकल्पना आणि यातल्या कमिटमेंट्समधील आंतर्विरोध , कला आणि बाजार या सगळ्या गहन प्रश्नांकरताच मोठ्या चर्चा संभवतात. यातील कुठलीही गोष्ट व्हॅक्युममधे अस्तित्वात नसते आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलची सुट्या सुट्या प्रश्नांवरील चर्चा कदापि अर्थपूर्ण, समग्र ठरणार नाही. हुसेन या सार्याच्या एपिसेंटरला होते. त्यांच्या व्यक्तित्वाचे वर्णन वादळी म्हणून करणे हे अपुरेच ठरेल.
13 Jun 2011 - 9:10 pm | प्रदीप
.
13 Jun 2011 - 2:52 pm | धमाल मुलगा
मकबूल फिदा हुसेन ह्या भारतीय चित्रकाराचा, त्याच्या कलेचा एक छानसा परिचय ह्या लेखाच्या निमित्ताने वाचायला मिळाला. त्याबद्दल चिंतातूरजंतू ह्यांचे आभार. जंतू हे नेहमीच कलेच्या माध्यमांची मोठ्या अधिकारवाणीने आणि सुंदर अशी सफर घडवून आणत आले आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेव्हढे थोडेच.
परंतू....परंतू.. केवळ कला हा एकमेव निकष असू शकत नाही हे ह्या धाग्याच्या अनुशंगाने जाणवले. एका कलाकाराच्या कलाकृतींची आणि कलाप्रवासाची ओळख असलेल्या ह्या सुंदर लेखाच्या सुरुवातीलाच श्री. जंतू ह्यांनी लिहिलेलं पहिलं वाक्यच ह्या संकेतस्थळाच्या सभासदांप्रति अत्यंत हीनता प्रक्षेपित करणारं आहे.
हुसेन त्यांच्या कलेच्या क्षेत्रात फार मोठे असतीलही. आम्हा सर्वसामान्यांना कल्पना नाही. परंतू, कलंदरपणाच्या नावाखाली वाट्टेल ते करायची, आमच्या देवदेवतांची बिभत्स चित्रं चितारायची परवानगी मिळत नाही.
वर उल्लेख आला आहे, की तत्सम चित्रांच्याबाबत भारतीय इतर चित्रकारांनीही टोकाची भूमिका घेतली नाही किंवा त्यात त्यांना वावगं वाटलं नाही..
नसेल! पण म्हणून कुण्या मूठभर लोकांच्या वाटण्या-न-वाटण्याशी आम्ही बहुतांश लोकांनी आपल्या देवदेवतांबद्दलच्या भावना विकलेल्या नाहीत. त्यांनी क्लिन चिट दिली म्हणून आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन का करावा? जमणार नाही. आणि तसे करायची अक्कलही कुणी शिकवायची गरज नाही.
तर मग मुद्दा उभा केला जातो तो खजूराहोच्या शिल्पांचा. देव खजुराहोच्या शिल्पांमध्ये आहेत की गाभार्यामध्ये? गाभार्यामध्ये नग्न/मैथुनावस्था असलेली शिल्पे आहेत का? मंदीरांच्या बाहेरील भिंतींवर कोरलेली शिल्पे ही नक्की कोणाची आहेत? सरस्वती? लक्ष्मी? विष्णू? महादेव? पार्वती? गणपती? ती कोणी कोरली? हिंदूंनी असतील तर त्यांनी बौध्द संस्कृतीची चित्र नंतर त्यात तशाच पध्दतीनं घातली का? तर नाही!
शिवाय, वर प्रतिसादांत आलेला दुसरा मुद्दा आहेच, जर हिंदू देवतांची नग्न (आणि बरीचशी आक्षेपार्ह पध्दतीची) चित्रं काढता येतात तर मग, केवळ हिंदू देवतांचेच का? हा प्रश्न अनुत्तरीत का?
एरवी धर्म-देव इत्यादी गोष्टींना कडाडून विरोध करताना आत्ताच मात्र सोयीस्कररित्या हिंदू संस्कृतीमधील 'मरणान्तानि वैराणि'च्या बुरख्याआडून विरोध करायची वेळ का यावी?
ह्या संकेतस्थळावर हुसेन गेल्याची बातमी आल्याबरोबर धागाप्रवर्तकासकट, प्रतिक्रिया देणार्यांच्याही मनातला राग उत्स्फुर्तपणे बाहेर पडला.इथे तोंडावर बेगडी रंग फासून हिंडण्याची पध्दत नसल्यामुळं ही प्रत्येकाच्या मनातली भावना ताबडतोब प्रामाणिकपणे त्यानं व्यक्त केली. आणि विकृत गोष्टीला विकृतच म्हणणं हे चुकीच असावं असं वाटत नाही.
ही समाजाच्या एका मोठ्या समुहाची प्रातिनिधीक उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती. आणि समाज हा इतरांपासून फटकून राहणार्या चार डोक्यांनी बनत नाही, तर प्रत्येक सामान्य-सर्वसामान्य-तळागाळातल्या मनुष्यापासून बनतो. हिंदू धर्मिय हे समाजाचा एक मोठा हिस्सा आहेत. त्यातल्या काही शेकडा लोकांनी आपल्या मतानुसार उर्वरित लक्षावधी/कोट्यावधी समुहाच्या सामुदाईक मताला हिणवणं आणि आपलंच बरोबर आहे असं म्हणणं हे पुर्णतः अयोग्य आहे.
ह्या वाक्याद्वारे श्री.जंतू ह्यांनी ह्या संकेतस्थळाच्या सदस्यांचा हीनतेने लेखून अपमान केलेला आहे.
हा अपमान समुदायाचा अपमान आहे, एका मताशी बांधलेल्या कित्येक व्यक्तींचा प्रत्येकाचा व्यक्तिशः अपमान आहे, ह्या संकेतस्थळावर येणार्या सदस्य, त्या मतांशी सहमत असलेल्या वाचक ह्यांचाही अपमान आहे.
ज्या पध्दतीनं श्री. जंतू ह्यांनी जाहीररित्या हा अपमान केला आहे त्याच पध्दतीनं त्यांनी समस्त मिपापरिवाराची ह्या अपमानकारक वाक्याबद्दल जाहीर माफी मागितलीच पाहिजे.
13 Jun 2011 - 3:42 pm | Nile
हे वाचुन हसुन हसुन पोट दुखले, हिंदी सिनेमातले एक दोन हिरो सुद्धा डोळ्यांसमोर तरळून गेले. =)) =)) बाकी वादात (आत्तातरी) पडण्याची इच्छा नाही, पण मत नोंदवून ठेवतो.
प्रतिक्रीया सडकी होती म्हटले म्हणजे सदस्यांचा अपमान होत नाही. थोडेसे इतिहासात खोदकाम केले तर याही पेक्षा जास्त शेलकी शब्द अनेकांनी (ज्यांचा आता अपमान झाला असा देखावा उभा केला जात आहे) वापरलेले आम्ही पाहिले आहेत.
13 Jun 2011 - 4:00 pm | धमाल मुलगा
:)
चालायचंच की. शेवटी....
13 Jun 2011 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार
ज्जे बात !! :)
माफीवरुन जाता जाता आठवले की हुसेननी देखील काढलेल्या चित्रांबद्दल माफी वैग्रे मागीतली होती म्हणे. त्याचे काही चुकलेच नव्हते अथवा त्यानी सो-कॉल्ड वेगळ्या दृष्टीकोनातुन ती चित्रे काढली असतील (असे इथले काही महान विभुती म्हणत आहेत) तर मग त्यानी माफी का मागीतली बॉ ?
आणि अरे हो... रामदेवबाबांच्या पलायनावर हॅ हॅ हॅ करुन दात काढणारे आणि खिल्ली उडवणारे आता पार्श्वभागाला पाय लावुन देशच सोडून पळालेल्या हुसेन विषयी काहीच कसे बोलले नाहित बॉ ?
13 Jun 2011 - 4:11 pm | मृत्युन्जय
+१००१
13 Jun 2011 - 3:19 pm | मराठी_माणूस
हुसेनच्या मृत्यूची बातमी कळताच अपेक्षेनुसार या संस्थळावर सडक्या प्रतिक्रियांचा एक ओघ येऊन गेला
नग्न देव/देवतांची चित्रे काढणारा मेंदु हा सुपीक समजायचा का ?
वरील प्रतीसादातील "अपेक्षेनुसार" म्हणजे काय ? हा ह्या संस्थाळाचा सन्मान समजायचा का ?
13 Jun 2011 - 8:52 pm | आनंदयात्री
धमाल मुलाशी, पराशी आणि बिपिनशी बराचसा सहमत.
चिंतातुर जंतुंसारख्या उत्तम आणि आमच्या आवडत्या लेखकाकडून असा त्रागा अनपेक्षित होता, असे संयम सोडुन बोलणे मला वैयक्तिकरित्या धक्कादायक वाटले. त्यांची मिसळपाववर इतकी नाराजी आहे हे पाहुन अगदी वाईट वाटले. मिपाबद्दल साधारण अश्या प्रकारची तुच्छतादर्शक वक्तव्यं उपक्रमावर पहायला मिळतात.
14 Jun 2011 - 1:12 am | आनंदयात्री
बाकी लेख पुन्हा वाचला, आणि आवडला हे नमूद करु इच्छितो. जंतुंनी पुढल्यावेळेस आम्हाला गाळणी हातात घेण्यास लाउ नये ही विनंती,