दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-२)

चिंतामणी's picture
चिंतामणी in जनातलं, मनातलं
2 Mar 2011 - 9:45 am

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१)

संगीतकार- दत्ताराम

दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वाडकर. यांनी स्वतंत्रपणे सुमारे १९ चित्रपटांना संगीत दिले. शंकर जयकीशन यांचे सहकारी म्हणून त्यांनी प्रामुख्याने काम केले. श्रीमान सत्यवादी, अब दिल्ली दूर नही, परवरीश इद्यादी प्रमुख चित्रपट त्यांच्या खाती जमा होते.

हिंदी सिनेमातील संगीतात त्यांनी ठेक्यात (rhythms) नवनवीन प्रयोग केले. त्यातील प्रसीध्द ठेक्याचे नाव "दत्ता का ठेका" असे झाले होते.

त्यांचे सुप्रसीध्द गाणे "आसूं भरी है ये जिवन की राहे" हे ज्या दिवशी ध्वनीमुद्रीत झाले, त्या दिवशी वादकांचा संप होता. ३-४ वादकांच्या साथीने तबला, ढोलकी आणि इतर काही वाद्य वापरून ते गाणे रेकॉर्ड केले. जेंव्हा राज कपूरने ते पहील्यांदा ऐकले त्या वेळी रात्रभर ते गाणे पुन्हःपुन्हा वाजवत ऐकत राहीले.

चित्रपट-अब दिल्ली दूर नही (१९५७)

चुन चुन करती आई चिड़िया
दाल का दाना लाई चिड़िया
मोर भी आया कौवा भी आया
चूहा भी आया बन्दर भी आया

( म. रफी)

चित्रपट- परवरीश (१९५८)
आँसू भरी हैं ये जीवन की राहें
कोई उनसे कह दे हमें भूल जाएं
( मुकेश)

मस्ती भरा है समाँ
हम-तुम हैं दोनों यहाँ
आँखों में आ जा दिल में समा जा
झूमें ज़मीं-आसमाँ
(मन्ना डे आणि लता दिदींने गाइलेले युगल गीत)

चित्रपट- श्रीमान सत्यवादी (१९५९)

हाल-ए-दिल हमारा, जाने न बेवफ़ा ये ज़माना ज़माना - २
सुनो दुनिया वालों आएगा लौट के दिन सुहाना सुहाना
हाले-ए-दिल हमारा
( मुकेश)

चित्रपट- बालक (१९६९)
सुन ले बापू ये पैग़ाम, मेरी चिट्ठी तेरे नाम
चिट्ठी में सबसे पहले, लिखता तुझको राम राम
लिखता तुझको राम राम
(सुमन कल्याणपुर)

कलासंगीतइतिहासचित्रपटमाहितीआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 Mar 2011 - 10:33 am | पैसा

दत्तारामची सगळीच गाणी छान आहेत. कोणीतरी जमेल तेवढ्या लिंका द्या रे!

वसईचे किल्लेदार's picture

2 Mar 2011 - 10:52 am | वसईचे किल्लेदार

छान ,
पण मध्ये मध्ये नविन असलेल्या, पण unknown असणार्‍या संगितकारांचे पण नाव द्या ना ..
म्हणजे जरा ओळखिचे वाटले की वाचायला पण छान वाटते ..

श्रावण मोडक's picture

2 Mar 2011 - 3:20 pm | श्रावण मोडक

असेच लिहित रहा. वाचतो आहे.
दुसरी फळी वगैरे खरं नाही. गाणंच सच्चं सालं... आणि या दोन संगीतकारांचीच इथं यादीत आलेली काही गाणी पुरेशी आहेत त्यासाठी.

चिंतातुर जंतू's picture

2 Mar 2011 - 3:38 pm | चिंतातुर जंतू

दत्ताराम यांची जवळपास विस्मरणात गेलेली काही गाणी
मेरे आसुओं पे न मुस्करा - गायिका: मुबारक बेगम; चित्रपट: मोरे मन मितवा. इथे ऐकता येईल.
कहाँ जाते हो सैंया - गायिका: आशा भोसले; चित्रपट: दो गूंडे. इथे ऐकता येईल.
झूमो रे झूमो रे - गायिका: आशा भोसले; चित्रपटः परवरिश. इथे ऐकता आणि पहाता येईल. (ललिता पवार अंगाई गीत गात आहेत.)
जाने कैसा जादू किया रे - गायिका: आशा भोसले आणि सुधा मल्होत्रा; चित्रपटः परवरिश. इथे ऐकता येईल.
बेलिया बेलिया - गायकः मन्ना डे, लता मंगेशकर; चित्रपटः परवरिश. इथे ऐकता येईल.
भीगी हवाओंमे... झूम झूम झूम लेले मजा - गायकः मन्ना डे, लता मंगेशकर; चित्रपट: श्रीमान सत्यवादी. इथे ऐकता येईल.

चिंतामणी's picture

10 Mar 2011 - 8:51 am | चिंतामणी

चित्रपट- परवरीश (१९५८) मधील आँसू भरी हैं ये जीवन की राहें व इतर काही गाणी येथे डाउनलोड करता येतील.
http://www.mp3rocket.com/mp3/-1_00/Dattaram-Wadkar-Parvarish-old-Aansoo-...