साकिया (१०) - हाफ डोम

नाटक्या's picture
नाटक्या in पाककृती
19 Feb 2011 - 10:51 am

साकिया (१०) - हाफ डोम

या आधीचे लेखः

साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ..
साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"
साकिया (३) - "टकिला सनराईज"
साकिया (४) - "स्ट्रॉबेरी डायक्युरी"
साकिया (५) - "चॉकलेट बनाना" (लहान मुलांसाठी खास)
साकिया (६) - स्पायसी मार्गारिटा
साकिया (७) - स्कूप युअर लक
साकिया (८) - माय व्हॅलेंटाईन
साकिया (९) - गटारी अमावस्या स्पेशल

===============================================================

या वेळच्या कॉकटेलचे नाव आहे "हाफ डोम" (Half Dome). कॅलिफोर्नियात योसोमिटे नॅशनल पार्क मध्ये उभा डोंगर आहे त्याचा आकार अर्ध्या कापलेल्या वर्तुळाकृती तंबू सारखा आहे, म्हणून त्याला हाफ डोम असे नाव पडले. कॉकटेलची चित्रे बघीतल्यावर मला तसाच आकार वाटला म्हणून मी याला हाफ डोम असेच नाव दिले. असो, नमनाला घडाभर दारू कशाला!!

साहित्य:

- २ औंस व्हिस्की
- १ औंस अ‍ॅपल श्नॅप्प्स (Apple Schnapps)
- ४ सफरचंदाचा रस किंवा सायडर (Cider) असल्यास उत्तम
- चिमूटभर दालचिनीची पावडर
- सजावटी साठी सफरचंदाचे काप
- चमचाभर लिंबाचा रस
- बर्फ

कृती:

शेकर मध्ये बर्फाचे खडे घ्या. त्यात व्हिस्की, श्नॅप्प्स, लिंबाचा रस आणि दालचिनीची पूड घेऊन चांगले एक मिनीटभर शेक करा. तयार झालेले मिश्रण एका मोठ्या ग्लासमध्ये ओतून घ्या. त्यात सफरचंदाचा रस अलगद सोडा. असा अलगद रस सोडायचा असेल तर एक चमचा घेऊन त्याच्या एका टोकावरून रस ओघळून ग्लासात आतल्या बाजूला अगदी चिकटून सोडा.

आता या कॉकटेलला सजवण्यासाठी सफरचंदाचे काप टाका तसेच एक साधारणतः १/३ सफरचंदाच्या फोडीला काप देऊन ग्लासच्या कडेला अडकवा. जर एखाददुसरे फॅन्सी स्ट्रॉ असतील तर त्या ग्लासमध्ये ठेवा.

काही फोटो:

आणि हा दिसणारा हाफ डोम

डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.

धन्यवाद...

- नाटक्या

* हाफ डोमचे चित्र जालावरून साभार

प्रतिक्रिया

मुलूखावेगळी's picture

19 Feb 2011 - 10:58 am | मुलूखावेगळी

वा!!!!
मस्त दिसत आहे .
बर्याच दिवसांनी टाकलेत.

नगरीनिरंजन's picture

19 Feb 2011 - 11:07 am | नगरीनिरंजन

'सुरे'ख! सुरस! सुरमयी!

सहज's picture

19 Feb 2011 - 11:30 am | सहज

अ‍ॅपल सायडर विकांताच्या खरेदीच्या यादीत टाकले आहे.

गुरुवर्य हाफ डोम, हाफ डोम चा फुल्ल प्रोग्रॅम पक्का!!

वाह चला भारताच्या पुढच्या सामन्याची सोय झाली. ;)
नाटक्याशेठ खुप दिसांनी बोर्डावर आलासा. आता अश्येच येंत र्‍हावा नी दर मॅचच्या आधी आमची सोय करीत जा. :)

नाटक्या's picture

19 Feb 2011 - 1:40 pm | नाटक्या

मी पिन्याची सोय करतो तुमी खादाडीची करा!! लय मेहेर्बानी व्हयील!!

स्वाती२'s picture

19 Feb 2011 - 5:26 pm | स्वाती२

व्वा!

श्रावण मोडक's picture

19 Feb 2011 - 5:37 pm | श्रावण मोडक

जळवा नुसतंच.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2011 - 5:50 pm | बिपिन कार्यकर्ते

ह्ये इनोबरुबर पिल्यालं चालतं का?

आत्मशून्य's picture

19 Feb 2011 - 9:48 pm | आत्मशून्य

.

बबलु's picture

20 Feb 2011 - 9:47 am | बबलु

लै भारी.